अटलबिहारी वाजपेयी आणि पं मदनमोहन मालवीय यांना भारतरत्न

Submitted by नितीनचंद्र on 24 December, 2014 - 11:54

राष्ट्रपती भवनामधुन जाहिर झालेल्या पत्रकानुसार आज अटलबिहारी वाजपेयी आणि पं. मदनमोहन मालवीय यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. २५ डिसेंबर ला वाजपेयीयांचा ९० वा तर पं मदनमोहन मालवीय यांचा १५३ वा वाढदिवसाचे औचित्य साधुन हा निर्णय झाला.

अटलबिहारी राजनेते असुनही कवी आहेत हे जसे वेगळेपण तसेच पं मदनमोहन मालवीय राजनेते, शिक्षक आणि काही काळ वकिल म्हणुनही कार्यरत होते. पं मदनमोहन मालवीय यांनी सर्वात मोठी निवासी बनारस हिंदु युनीव्हर्सीटी ची स्थापना देशभरातुन देणग्या जमाकरुन निर्माण केली.

आज पर्यंत ४३ लोकांना १९५४ पासुन हा पुरस्कार मिळाला आहे ज्यात फक्त ५ महिला आहे आणि ४३ पैकी बोटावर मोजण्याइतक्या व्यक्ती राजकारणाशी संबंधीत नाहीत.

सर्वात जास्त व्यक्ती काँग्रेसचे आहेत हे उघडच आहे कारण सर्वात जास्त वर्षे काँग्रेस सरकार मधे आहे. पं मदनमोहन मालवीय सुध्दा तीन वेळा काँग्रेसचे अध्यक्ष राहिले आहेत. नंतरच्या काळात त्यांनी काँगेस सोडुन नविन पक्ष स्थापन केला व शेवटी हिंदु महासभा या पक्षाच्या स्थापनेत त्यांचा सहभाग होता.

ज्यांनी समाज जीवनात समर्पण केले आहे अश्यांना हा पुरस्कार मिळावा असा संकेत असताना भारताचा हा सर्वोच्च पुरस्कार राजकारणी व्यक्तींना अधिक वेळा मिळतो आणि सत्ताधारी आपली विचारधारा सोडुन हा पुरस्कार देत नाहीत ही शोकांतीका आहे. किती पुरस्कार द्यावेत याचे बंधन नसताना सरदार पटेलांना हा पुरस्कार त्यांच्या मृत्युनंतर २० वर्षांनी हा पुरस्कार मिळाला तर नेताजी सुभाषचंद्र बोस हे अद्याप वंचीत आहेत.

आता हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद, बहुजन समाजवादी पार्टीचे संस्थापक काशीराम, क्रांतीकारक भगतसिंग, यांच्या बरोबर अजुन बरेच लोक या प्रतिक्षा यादीत आहेत.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प. पू. अटलबिहारी वाजपेयींजींना मिळेल असं वाटलंच होतं.
समाधानकारक निर्णय. अच्छे दिन आ गये.

+ १

पं. मदन मोहन मालवीय याना पुरस्कार मिळाला . आनंद झाला.

बाजपेयी का ? उत्तर उघड आहे.

भगतसिंगाना मिळणे मुष्किल वाटते.. कारण १९४७ नंतर ज्या व्यक्ती जिवंत होत्या त्यानाच हा पुरस्कार दिला जातो , असे वाटते.

तसे लिमिट नसेल तर भगवान बुद्ध , अशोक . शिवाजी महाराज , प्रभू रामचंद्र , श्रीकृष्ण , अकबर ... सगळेच वेटिंग लिस्टमध्ये येतील.

हा सर्वोच्च बहुमान तरी वादातीत असावा, अशी प्रत्येक भारतीयाची मनापासूनची इच्छा असावी. अपवाद वगळतां, हा बहुमान नेहमीं वादाचा भोंवराच निर्माण करतो, हें त्या बहुमानाचं दुर्भाग्य !! Sad

माबोरत्न काउ,

तू पण १९४७ नंतर जिवंत असलेली एकमेव स्त्रीलिंगी कावळट आहेस.

तुझा विचारच झाला नाही ह्याचे वैषम्य ज्यांना वाटेल त्यांना सहानुभुती!

ज्यांना मिळाले त्यांचे अभिनंदन करूयात का?

>>>पण मनमोहन सिंगांना आणि सोनियां ना द्यायला हवे होते ना?<<<

हा धागा विनोदाचा नव्हे.

येथे कृपया विनोद करू नयेत अशी नम्र विनंती!

नितीनचंद्रसाहेब माहीती अर्धवट न घेता बोललात तर बरं होईल.
लिस्ट टाका जरा कळेल लोकांना
नेताजींना पुरस्कार दिला गेलेला परंतू नंतर कोर्टमधे त्याला आव्हान दिले होते त्यानंतर त्यावरून ते परत घेतले गेले. त्यांच्या मृत्युबद्दल असलेल्या गुंत्यामुळे बहूदा असे झाले होते.

तसे लिमिट नसेल तर भगवान बुद्ध , अशोक . शिवाजी महाराज , प्रभू रामचंद्र , श्रीकृष्ण , अकबर ... सगळेच वेटिंग लिस्टमध्ये येतील.
>>>>

महंमद पैगंबर आणि येशू ख्रिस्त नको का आणखीन?
त्यांना कसे विसरलात हो?

बेफीं नी विनंति केली आहे:

<हा धागा विनोदाचा नव्हे.

येथे कृपया विनोद करू नयेत अशी नम्र विनंती!>

तेव्हा दि.दे. क्रुपया विनोद करणे टाळा..

>>
मदनमोहन मालवीय आणि वाजपेयी - अगदी योग्य निवड.>> +१
पं. मदनमोहन मालविय यांना पुरस्कार जाहीर झाला याचा विशेष आनंद!

शिवछत्रपती, सम्राट अशोक, चंद्रगुप्त मौर्य, राणा प्रताप, भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, चंद्रशेखर आझाद आणि अनेक क्रांतिकारक, नेताजी सुभाषचंद्र बोस, बाळ गंगाधर टिळक, लाला लाजपतराय यांना कोणताही पुरस्कार देऊन तो पुरस्कार मिळालेल्या इतरांच्या बरोबरीला त्यांना आणून बसवू नये असं माझं प्रामाणिक मत आहे.

श्रीयू,

त्यांच्याशी बोलणार्‍यांना डुक्कर म्हणण्याची प्रथा पाडायचा प्रयत्न होत आहे.

असे अनेक पुरावे मी स्वतःच सेव्ह केलेले आहेत, पण केवळ स्वतःच्या शौकासाठी!

तुम्ही कशाला तुमचे माणूसपण घालवताय? Proud

श्री अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित मदनमोहन मालवीय या दोघांचेही अभिनंदन !

ईथले आणि अश्या अन धाग्यांवर पसरलेले डु आय वागण्याचा किमान समंजसपणा दाखवणार आहात का?

>>>ईथले आणि अश्या अन धाग्यांवर पसरलेले डु आय वागण्याचा किमान समंजसपणा दाखवणार आहात का?<<<

छे छे! कैच्याकैच अपेक्षा तुमच्या!

Pages