अटलबिहारी वाजपेयी आणि पं मदनमोहन मालवीय यांना भारतरत्न

Submitted by नितीनचंद्र on 24 December, 2014 - 11:54

राष्ट्रपती भवनामधुन जाहिर झालेल्या पत्रकानुसार आज अटलबिहारी वाजपेयी आणि पं. मदनमोहन मालवीय यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. २५ डिसेंबर ला वाजपेयीयांचा ९० वा तर पं मदनमोहन मालवीय यांचा १५३ वा वाढदिवसाचे औचित्य साधुन हा निर्णय झाला.

अटलबिहारी राजनेते असुनही कवी आहेत हे जसे वेगळेपण तसेच पं मदनमोहन मालवीय राजनेते, शिक्षक आणि काही काळ वकिल म्हणुनही कार्यरत होते. पं मदनमोहन मालवीय यांनी सर्वात मोठी निवासी बनारस हिंदु युनीव्हर्सीटी ची स्थापना देशभरातुन देणग्या जमाकरुन निर्माण केली.

आज पर्यंत ४३ लोकांना १९५४ पासुन हा पुरस्कार मिळाला आहे ज्यात फक्त ५ महिला आहे आणि ४३ पैकी बोटावर मोजण्याइतक्या व्यक्ती राजकारणाशी संबंधीत नाहीत.

सर्वात जास्त व्यक्ती काँग्रेसचे आहेत हे उघडच आहे कारण सर्वात जास्त वर्षे काँग्रेस सरकार मधे आहे. पं मदनमोहन मालवीय सुध्दा तीन वेळा काँग्रेसचे अध्यक्ष राहिले आहेत. नंतरच्या काळात त्यांनी काँगेस सोडुन नविन पक्ष स्थापन केला व शेवटी हिंदु महासभा या पक्षाच्या स्थापनेत त्यांचा सहभाग होता.

ज्यांनी समाज जीवनात समर्पण केले आहे अश्यांना हा पुरस्कार मिळावा असा संकेत असताना भारताचा हा सर्वोच्च पुरस्कार राजकारणी व्यक्तींना अधिक वेळा मिळतो आणि सत्ताधारी आपली विचारधारा सोडुन हा पुरस्कार देत नाहीत ही शोकांतीका आहे. किती पुरस्कार द्यावेत याचे बंधन नसताना सरदार पटेलांना हा पुरस्कार त्यांच्या मृत्युनंतर २० वर्षांनी हा पुरस्कार मिळाला तर नेताजी सुभाषचंद्र बोस हे अद्याप वंचीत आहेत.

आता हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद, बहुजन समाजवादी पार्टीचे संस्थापक काशीराम, क्रांतीकारक भगतसिंग, यांच्या बरोबर अजुन बरेच लोक या प्रतिक्षा यादीत आहेत.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>> चिलटांसारखी इकडुन तिकडे सतत ओरडत फिरत असतात <<<< चिलटे ओरडतात?

>>>> लिंबुभाउ तुम्हीतर गोडसेला देखील द्यायला निघाल बरोबर ना <<<<<
तुम्हाला दिवसाढवळ्या भास होतात का? Wink बघा हो, तब्येत तपासून घ्या एकदा, चांगले नाही हे लक्षण ! Proud

पुरस्कार शास्त्रज्ञ, कलाकार, समाजसेवक यांच्या पुरता मर्यादित ठेवला असता तर चांगले झाले असते हे माझे वैम. कारण सर होमी भाभा, विक्रम साराभाई सारख्या शास्त्रज्ञांनासुध्दा हा पुरस्कार अजुन मिळालेला नाही. >

निव्वळ पुरस्कार दिला तरच त्यांचा मानसम्मान होतो हे खरे नाही. होमी भाभा यांच्यानावे रिसर्च सेंटर इ. बरेच आहे. तसेच राजकारणी लोकांनी देखील बरेच योगदान दिले आहे. ज्यात वाजपेयींचे देखील उल्लेखनिय योगदान आहेच. जरुरी नाही की राजकारणी लोकांचे आयुष्य हे निव्वळ राजकारणच्याच सिमित असते. त्यांचे इतर कार्यांची देखील दखल अवश्य घेतली जाते.

काँग्रेसचं सरकार असतं तर..

सैफ अली, सोहा अली, महेश भट्ट, आलिया भट्ट, विराट कोहली, एम एफ हुसैन, यासिन भटकळ यापैकी एखाद्याला किंवा सर्वांनाच भा.रत्न मिळालं असतं.

अहो जे सत्य आहे तेच सांगतोय Wink आणि त्या तुमच्या महान घटनेचे अजुन एक कार्यकर्ते श्री. अडवाणी यांना देखील द्यावा Lol

क्रिकेटवीर, गायक हे भारतरत्नाचे मानकरी झाल्याने ह्या पुरस्कारातला रस संपलाय आता तो कुणालाही मिळाला तरी काही वाटणार नाही.दिवाकर देशमुख महात्म्याला हा पुरस्कार नको ते विश्वरत्न आहेत.

अटलबिहारी ह्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. अटलबिहारी हे १९४२ च्या स्वातंत्र्य संग्रामातही होते तेथे त्यांनी तुरुंगवासही भोगला होता ह्याबद्दल जास्त माहिती ह्या पुरस्काराच्या निम्मिताने जाणून घ्यायला आवडेल.

काँग्रेसचं सरकार असतं तर..

सैफ अली, सोहा अली, महेश भट्ट, आलिया भट्ट, विराट कोहली, एम एफ हुसैन, यासिन भटकळ यापैकी एखाद्याला किंवा सर्वांनाच भा.रत्न मिळालं असतं.

>>>>>>>.

विणा बाई. इतके वर्ष त्यांचेच सरकार होते. विस्मरण होत आहे का तुम्हाला Lol की विनोदी लिहिण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहात ?
Lol

चिलटे ओरडतात? >>>> तुम्हाला नाही माहीती. ? ९ नंतर या माबो वर Wink

सैफ अली, सोहा अली, महेश भट्ट, आलिया भट्ट, विराट कोहली, एम एफ हुसैन, यासिन भटकळ यापैकी एखाद्याला किंवा सर्वांनाच भा.रत्न मिळालं असतं. >>> ही लिस्ट काही झेपली नाही :). यांना कॉंग्रेस ने का दिले असते आणि भाजप का देणार नाही हे बाउन्सर गेले (आलिया भट्टने भारतरत्न मधे किती कॅरट चे हिरे असतात हे विचारले असते ही गोष्ट वेगळी. आणि कोहली जोपर्यंत चांगला खेळतोय, बार मधे जाऊन दंगे करत नाही, व अनुष्काने ओठांचे जे केले ते आपल्या बॅटिंगचे करत नाही तोपर्यंत भविष्यकालीन भारत रत्न चे चान्सेस आहेत).

कोहली जोपर्यंत चांगला खेळतोय, बार मधे जाऊन दंगे करत नाही, व अनुष्काने ओठांचे जे केले ते आपल्या बॅटिंगचे करत नाही >>>>>>>>

फारएण्डा साहेब. बीसीसीआयने अनुष्काला ऑस्ट्रेलियाला जाण्याची परवाणगी दिली आहे. आता बॉक्सिंग डे कसोटीत कोहली काय दिवे लावणार आहे दिसेलच Wink

>>>> अहो जे सत्य आहे तेच सांगतोय आणि त्या तुमच्या महान घटनेचे अजुन एक कार्यकर्ते श्री. अडवाणी यांना देखील द्यावा <<<<
त्यान्नाही देऊ की, पण नंतर, "मंदिर वहीं बनायेंगे" ही घोषणा जेव्हा मूर्त रूप घेईल, तेव्हा त्यांन्ना देऊ!

"मंदिर वहीं बनायेंगे" ही घोषणा जेव्हा मूर्त रूप घेईल, >>> तुमचा आशावाद बघुन गहिवरुन आले बघा. खरतर तुमचाच शनिवारवाड्यावर सत्कार करायला हवे Wink

>>> खरतर तुमचाच शनिवारवाड्यावर सत्कार करायला हवे <<<<
अहो शनिवारवाड्यावर माझाच काय, हल्ली कुणाचाही सत्कार करू गेलात, तर तुमच्यावर "पेशवाईचे समर्थन" करीत असल्याचा आरोप होईल... भांडारकर संस्थेवरील पुचाट अन भाडोत्री भ्याड हल्ला घटनेनंतरची "ये तो एक झांकी है, शनिवारवाडा बाकी है" ही घोषणा विसरलात काय? Proud

क्रिकेट म्हटलं की पुरूषांना जराही टीका केलेली आवडत नाही आणि हे मात्र टीव्ही मालिकांवर मात्र हक्काने टीका करणार

भांडारकर संस्थेवरील पुचाट अन भाडोत्री भ्याड हल्ला घटनेनंतरची "ये तो एक झांकी है, शनिवारवाडा बाकी है" ही घोषणा विसरलात काय >
अश्या अजुन बर्‍याच आहेत त्या तुम्ही देखील विसरलातच Wink

वीणाताई,

>> ...तर हा पुरस्कार बंद केला तरी चालेल.

अगदी माझ्या मनातलं बोललात. विभूषितांच्या औचित्याचा मुद्दा या धाग्यावर विषयबाह्य असल्याने इथेच थांबतो.

आ.न.,
-गा.पै.

Several awards of the Bharat Ratna have spurred much criticism as they have been considered "political awards" to persons who have not necessarily merited the honour. As the recommendations for Bharat Ratna are made by the Prime Minister of India to the President, the then Prime Ministers Jawaharlal Nehru (1947–64) and Indira Gandhi (1966–77, 1980–84) have been criticised for honouring themselves with the awards in 1955 and 1971 respectively.

In 1988, then Prime Minister of India Rajiv Gandhi (1984–89) conferred the Bharat Ratna posthumously on film actor and former Chief Minister of Tamil Nadu M. G. Ramachandran in a bid to influence voters prior to the Tamil Nadu assembly elections in 1989. The decision was also criticised for awarding Ramachandran before independence activist B. R. Ambedkar and Vallabhbhai Patel, who were bestowed the honour in 1990 and 1991 respectively.

While Ravi Shankar was accused of lobbying for the award, the decision by Indira Gandhi to posthumously honour K. Kamaraj was said to have been aimed at placating Tamil voters for the Tamil Nadu assembly elections in 1977. The seventh Prime Minister V. P. Singh was also criticised for posthumously honouring B. R. Ambedkar to please Dalits.

मनापासून अभिनंदन Happy

मात्र आता हा पुरस्कार देणेच बंद करावा असे वाटू लागलेय. हे असे दरवेळी वाद होणार असतील तर खरेच नको.

कारण पुरस्कारप्राप्त व्यक्ती जी आधीच नावलौकिक राखून असते, पण केवळ हा पुरस्कार मिळाल्याने ती पुरस्काराला कशी लायक नव्हती हे सिद्ध करायच्या नादात तिच्यावर टिका होणार असेल तर पुरस्कार देण्याचा उद्देशच गंडतोय.

आज हि बातमी पाहिली,
<< भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान असलेला 'भारतरत्न' पुरस्कार दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना देण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.>>
आता बाळासाहेबांचे कर्तुत्व अमान्य नसले तरी ते भारतरत्न पुरस्कारासाठी कसे योग्य नाहीत अशी खडाजंगी पेटल्यास यातून हाती काय गवसणार.

म. गांधी, स्वा. सावरकर आणि भाभा यांना हा पुरस्कार मिळावा ही इच्छा आहे. सरकारने मनावर घ्यावे.

लोकहो,

>> भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान असलेला 'भारतरत्न' पुरस्कार दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना
>> देण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे

आता मात्र हद्द झाली. बाळासाहेब ही व्यक्ती कुठल्याही पुरस्काराच्या पलीकडली आहे. हे समजावून सांगावं लागतंय! आणि तेही शिवसैनिकांना!! हेच का ते अच्छे दिन!

बाळासाहेबांचं नाव पाकिस्तानातही गाजत असे. अशा कीर्तीच्या माणसाला बाळासाहेबांच्या नावाने पुरस्कार मिळालेला मला पाहायला आवडेल.

आ.न.,
-गा.पै.

बाळासाहेबांचा पुरस्कारासाठी विचारही होऊ नये म्हणून केवढ्या त्या पैलवानी भाजपायी कोलांट उड्या ! ममोमा, अबिवा हे नव्हते काय पुरस्काराच्या पलिकडचे? त्यांचे नावानेच पुरस्कार ठेवले पाहिजे एवढी त्यांची थोरवी आहे. उलट एम्जीआर आदिंच्या पंक्तीला या दोघाना आणून बसवण्याचा पैं.नी निषेध करायला हवा. नाय का?
केबहे,पपूगु यांचा विचार बहुधा पुढील वर्षी ....

आता ही चर्चा पुरे....
"मायबोलीरत्न" पुरस्काराकरीता धागा उघडा आता.....

रॉबिनहुड,

केबहे,पपूगु यांचा विचार बहुधा पुढील वर्षी .... माझ्या मते अस घडणारच नाही. अन्यथा अटलबिहारी वाजपेयींच्या आधी हे घडले असते.

केबहे,पपूगु > हे २०१९ ला जर भाजपा आली तर नक्की होईल. आता विवाद नकोत म्हणुन तूर्तास बासनांत गुंडाळुन ठेवले असावे. तेव्हा तर नथुरामचे मंदीर पण उभारतील. उप्र मध्ये तशी तयारी सुरु आहेच.

Pages