राष्ट्रपती भवनामधुन जाहिर झालेल्या पत्रकानुसार आज अटलबिहारी वाजपेयी आणि पं. मदनमोहन मालवीय यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. २५ डिसेंबर ला वाजपेयीयांचा ९० वा तर पं मदनमोहन मालवीय यांचा १५३ वा वाढदिवसाचे औचित्य साधुन हा निर्णय झाला.
अटलबिहारी राजनेते असुनही कवी आहेत हे जसे वेगळेपण तसेच पं मदनमोहन मालवीय राजनेते, शिक्षक आणि काही काळ वकिल म्हणुनही कार्यरत होते. पं मदनमोहन मालवीय यांनी सर्वात मोठी निवासी बनारस हिंदु युनीव्हर्सीटी ची स्थापना देशभरातुन देणग्या जमाकरुन निर्माण केली.
आज पर्यंत ४३ लोकांना १९५४ पासुन हा पुरस्कार मिळाला आहे ज्यात फक्त ५ महिला आहे आणि ४३ पैकी बोटावर मोजण्याइतक्या व्यक्ती राजकारणाशी संबंधीत नाहीत.
सर्वात जास्त व्यक्ती काँग्रेसचे आहेत हे उघडच आहे कारण सर्वात जास्त वर्षे काँग्रेस सरकार मधे आहे. पं मदनमोहन मालवीय सुध्दा तीन वेळा काँग्रेसचे अध्यक्ष राहिले आहेत. नंतरच्या काळात त्यांनी काँगेस सोडुन नविन पक्ष स्थापन केला व शेवटी हिंदु महासभा या पक्षाच्या स्थापनेत त्यांचा सहभाग होता.
ज्यांनी समाज जीवनात समर्पण केले आहे अश्यांना हा पुरस्कार मिळावा असा संकेत असताना भारताचा हा सर्वोच्च पुरस्कार राजकारणी व्यक्तींना अधिक वेळा मिळतो आणि सत्ताधारी आपली विचारधारा सोडुन हा पुरस्कार देत नाहीत ही शोकांतीका आहे. किती पुरस्कार द्यावेत याचे बंधन नसताना सरदार पटेलांना हा पुरस्कार त्यांच्या मृत्युनंतर २० वर्षांनी हा पुरस्कार मिळाला तर नेताजी सुभाषचंद्र बोस हे अद्याप वंचीत आहेत.
आता हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद, बहुजन समाजवादी पार्टीचे संस्थापक काशीराम, क्रांतीकारक भगतसिंग, यांच्या बरोबर अजुन बरेच लोक या प्रतिक्षा यादीत आहेत.
बेफिकीर, डु आय म्हणजे डुक्कर
बेफिकीर,
डु आय म्हणजे डुक्कर डोळा का हो!
असो.
ममोमा यांना भारतरत्न मिळणं योग्य आहे. पण वाजपेयी उचित दावेदार वाटत नाहीत (वैम).
आ.न.,
-गा.पै.
व्यक्तिश: वाजपेयी हे माझे
व्यक्तिश: वाजपेयी हे माझे अत्यंत नावडते नेते आहेत. विशेषतः पंतप्रधान बनल्यावरची त्यांची कारकीर्द अत्यंत सुमार व निस्तेज होती. त्यांची धोरणे, त्यांनी राबवलेले कार्यक्रम ह्यात कुठलीही चमक आढळली नाही. बुळबुळीत आणि कणाहीन वाटेल असे ते सरकार होते. काही वेळा तर असे वाटायचे की कॉग्रेसच नव्या रुपात अवतरली आहे की काय? त्यांना भारतरत्न द्यावे असे मला वाटत नाही. अर्थात राजीव गांधींना ते दिले असेल तर वाजपेयींनी काय घोडे मारले आहे म्हणा!
मदनमोहन मालवीय हे मात्र त्यांच्या अफाट कर्तृत्त्वाकडे बघून असे वाटते की ते या सन्मानाला पात्र आहेत.
मोदी सरकारने बिगर गांधी घराण्याच्या लोकांना भारतरत्न देण्याचा पायंडा पाडला हे उत्तम झाले. नाहीतर सोनिया, राहुल आणि प्रियांकाला आणि देव न करो, रॉबर्टजी वद्रासाहेबांना भारतरत्न दिलेले बघायला मिळाले असते!
ममोमा यांना भारतरत्न मिळणं
ममोमा यांना भारतरत्न मिळणं योग्य आहे. पण वाजपेयी उचित दावेदार वाटत नाहीत (वैम).
------
वाजपेयी यान्ना पुरस्कार जाहिर होण्याचा निर्णय स्तुत्य आहे आणि तो योग्य वेळी मिळत आहे. सर्व प्रमुख राजकिय पक्षान्नी या निर्णयाचे स्वागत केले आहे यातच सर्व काही आले.
मदनमोहन मालवीय हे मात्र त्यांच्या अफाट कर्तृत्त्वाकडे बघून असे वाटते की ते या सन्मानाला पात्र आहेत.
-----
पुरस्काराची स्थापना १९५४ मधे झाली. मदनमोहन मालवीय ( १८६१-१९४६) यान्ना २०१४ मधे सर्वोच्च नागरी सन्मान मिळू शकतो तर थोर महात्मा गान्धी (१८६९-१९४८) यान्ना का नाही जाहिर झाला?
टिप- मालवीय ह्यान्चे कर्तुत्व हे भारतरत्न पुरस्कारापेक्षा मोठे आहे. मृत्यु नन्तर ६८ वर्षान्नी मिळालेला पुरस्कार एक चुकीचा पायन्डा (जो अगोदर च्या सरकारान्नी घालुन दिला आहे) पुढे नेतो आहे असे वाटते.
महामना पंडित मदनमोहन मालवीय
महामना पंडित मदनमोहन मालवीय यांचे व्यक्तिमत्व, कार्य हे नक्कीच या पुरस्कारापेक्षा कैक पटीने मोठे आहे.
त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन ! वाराणसीला गेलो होतो तेव्हा आवर्जुन हिंदू विश्वविद्यालयात गेलो आणि महामनांच्या पुतळ्यासमोर २ मिनिटे स्तब्ध उभा राहिलो होतो. डोळ्यात पाणी येते आत्ता लिहितानासुद्धा.
एवढी प्रखर बुद्धिमत्ता, एवढी प्रखर जिद्द, आयुष्याच्या अर्ध्या कालखंडात एक महाविद्यालय उभे करणे ते देखील पारतंत्र्याच्या काळात, देणग्या गोळा करून. _/\_
वाजपेयी हे व्यक्तिमत्व तर महान आहेच, पण खरेतर व्यक्तिशः मला त्यांना भारतरत्न देण्याचा निर्णय पुर्णपणे उचित आहे असे कधी वाटले नाही. अर्थात अन्य राजकारण्यांबाबतही तेच विशेषतः पंप्र.
पण असो मिळाला आहे तर कौतुक आहेच. _/\_
अभिनंदन! काँग्रेस सरकारने
अभिनंदन! काँग्रेस सरकारने वाजपेयींना दिले असते तर जास्त आवडले असते. त्याच लॉजिक ने सध्याच्या सरकारने लौकर मनमोहन सिंगांना द्यावे.
महेशजी तुमचा प्रतिसाद वाचून
महेशजी
तुमचा प्रतिसाद वाचून गहीवरून आलं.
माझ्या बाबतीत म्हणाल तर वाजपेयींना पुरस्कार मिळण्यामागे विरोधी पक्षात इतकी वर्षे राहण्याची कठोर तपश्चर्या, पहिलं अस्सल गैरकाँग्रेसी सरकारचं स्वप्न प्रत्यक्षात साकार होण्यामागे असलेले त्यांचे अथक प्रयत्नयाबरोबर भारतीय राजकारणाला त्यांनी प्रदान केलेली शालीनता, साहीत्यिक मूल्यं यासाठी भारतरत्न देता येत नसेल आणि क्रिकेटसाठी ते देता येत असेल तर हा पुरस्कार बंद केला तरी चालेल. शिवाय वाजपेयींचा बहुमान करणारे सरकार सत्तेत बहुमताने निवडून आलेले असताना हा पुरस्कार का मिळू नये. ( हा तर्क पुरस्कारासंदर्भात दिला आहे. मी या कंपूत वगैरे नाही प्लीज नोट).
वीणा सुरु ह्यांच्या अक्ख्या
वीणा सुरु ह्यांच्या अक्ख्या पोष्टी ला अनुमोदन !!
पं मालविय ह्यांचे कार्य अफाट आणि ह्या पुरस्कारांपेक्शा कैक पटि ने मोठे आहे. तरि ही त्यांना हा पुरस्कार मरणोत्तर मिळाला तो ही त्यांच्या मृत्यु च्या जवळ जवळ ६०-६२ वर्षांनी हे थोडे खटकलेच !!
कींबहुना ते स्वतः दोन दा काँग्रेस अध्यक्ष असुन ही काँग्रेस नी त्यांच्या राजवटीमध्ये हा सन्मान त्यांना मरणोत्तर का होईना पण देण्याचा विचार करु नये हि आश्चर्याची बाब आहे. अर्थात त्यांनी दिला नाही म्हणुन पं मालविय ह्यांचे कार्य महान ठरत नाही असे नाही, पण काँग्रेस नी अश्या वाह्यात गमती जमती ह्या पुरस्काराच्या बाबतीत बर्याच दा केल्या आहेत. ADMK चे संस्थापक M. G. Ramachandran ह्यांना हा पुरस्कार असाच मरणोत्तर १९८८ मध्ये देण्यात आला, व बाबासाहेबांना त्या नंतर दोन वर्षांनी १९९० मध्ये मरणोत्तर देण्यात आला. M. G. Ramachandran असतील ग्रेट पण बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तुत्वा पुढे MGR ह्यांचे कार्य फारच संकुचित होते...
तीच बाब पं. नेहरु आणि इंदिराजींची....त्यांचे especially इंदिराजींचे कार्य अफाट होते, पण स्वतः च्याच कारकिर्दीत स्वतः लाच भारतरत्न मिळवुन घेणे कितपत योग्य आहे? भारतरत्न च्या नावाची शिफारस मा. पं. प्र. मा. राष्ट्रपतींना करतात पं. नेहरु आणि इंदिराजींनी ती तशी केली असेल तर "खरेच आवरा!" असे म्हणावे लागेल...पण असो आपल्या कडे रा़जकारण ही सगळ्यात मोठी entertainment industry आहे.
अटलजींची निवडपण अगदी योग्यच...अतिशय बुद्धीमान, समंजस, मुत्सद्दी पण तितकेच हळवे, भावनाशील राजकारणी म्हणुन आपण त्यांना मानतो. ते अतिशय उत्तम आणि कसलेले संसद्पटु होते. राजकारणात राहुन ही स्वच्छ प्रतिमा ठेवणे, अजातशत्रु असणे आपला कार्यकाळ उत्तम करणे आणि योग्य वेळ आल्यावर सक्रिय राजकारणातुन retirement घेणे हे अटलजींसारख्या योग्यालाच जमु शकेल.
दोन्ही खर्याखुर्या "भारतरत्नांचे" अभिनंदन
________/\____________
>>>> कींबहुना ते स्वतः दोन दा
>>>> कींबहुना ते स्वतः दोन दा काँग्रेस अध्यक्ष असुन ही काँग्रेस नी त्यांच्या राजवटीमध्ये हा सन्मान त्यांना मरणोत्तर का होईना पण देण्याचा विचार करु नये हि आश्चर्याची बाब आहे. <<<<<
वर उल्लेख आला आहे की ते हिंदूमहासभेच्या स्थापनेत पुढाकार घेणारे होते, व हिंदू विश्वविद्यालय स्थापन केले.... आता दोनदोनदा "हिंदू" शब्दाशी संबंधित भरीव कार्य केलेल्याला कॉन्ग्रेस/कम्युनिस्ट कसले पुरस्कार देणार? उलट आणिबाणीपर्यंत जिवंत असते ते तर वाजपेयींसोबत ते देखिल तुरुंगातच असते !
उशीरामागिल वरील तत्त्व लक्षात घेतले तर उशीर खटकण्याची गरज नाही. गेल्या साठपासस्ट वर्षात हिंदूत्ववादी पुढार्यांना(ही) मानसन्मान द्यायची पद्धत कॉन्ग्रेस/कम्युनिस्ट राजवटीची कधीही नव्हती व नसेल.
"भारतरत्न" पंडित मदनमोहन मालवीय यांचे स्मृतीस सादर अभिवादन, आणि वाजपेयींचे अभिनंदन.
अन भारतरत्नचा हा निर्णय घेतल्याबद्दल मोदीसरकारला या या लिम्ब्याकडून शाबासकी.
लिंबूशेत हिंदू पुढारी म्हणजे
लिंबूशेत हिंदू पुढारी म्हणजे काय? नेहरूही हिंदू पुढारीच होते की. सर्व भारतीयांकरिता त्यांनी जे केले त्यात ८५% हिंदूही आलेच ना?
वाजपेयींसोबत ते देखिल
वाजपेयींसोबत ते देखिल तुरुंगातच असते ! > हो का ? बरं
जरा १९४२-४७ चे कार्यावरुन नजर फिरवा
फारेन्ड, चूक दुरुस्त केली
फारेन्ड, चूक दुरुस्त केली आहे, हिंदु ऐवजी हिंदुत्ववादी असा बदल केला आहे. चुक नजरेस आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
अच्छा म्हणजे प्रविण तोगडीया,
अच्छा म्हणजे प्रविण तोगडीया, साक्षी महाराज, आदित्यनाथ सारख्यांना देखील संधी आहे.
येत्या वर्षात देउन टाका मग
बायदिवे, स्वा.सावरकरान्ना
बायदिवे, स्वा.सावरकरान्ना नाही ना अजुन जाहिर झाला कोणता सरकारि पुरस्कार?
मी आता वाट बघतो आहे की त्यान्ना केव्हा मिळेल भारतरत्न!
महात्मा गांधींना देखील
महात्मा गांधींना देखील भारतरत्न दिला नाही आहे
मी देखील वाट बघतोय
, स्वा.सावरकरान्ना नाही ना
, स्वा.सावरकरान्ना नाही ना अजुन जाहिर झाला कोणता सरकारि पुरस्कार?
मी आता वाट बघतो आहे की त्यान्ना केव्हा मिळेल भारतरत्न!
>>. गाय हा एक उपयुक्त पशू आहे हे त्यांचे मत हे सर्कार, त्यांचे रिमोट्स मान्य करतील त्या दिवशी....
. राजीव गांधी (मरणोत्तर)
. राजीव गांधी (मरणोत्तर) भारताचे सातवे पंतप्रधान> राजीव गांधींनी मरण पावल्यानंतर स्वतःला पुरस्कार दिला? इथले काही महाभाग बेंबीच्या देठा पासुन ओरडत आहेत म्हणुन हा प्रश्न
दिदे, वाट बघाच हो, अन द्या
दिदे, वाट बघाच हो, अन द्या की.
अहो पण त्यान्ना इकडेजिकडेतिकडे इतके एक्स्पोझ केलय म्हणजे बघा की पोस्टाचे स्टॅम्प्स, नोटा, नाणी, चौकाचौकातिल पुतळे, रस्ते/नगरे/पुल यांची नावे.... जिकडेतिकडे केवळ अन केवळ गांधीच!
त्यात अजुन भरीचे भारतरत्न कशाला हवय?
जसे सावरकरांचे पुतळे रस्ते
जसे सावरकरांचे पुतळे रस्ते पुल स्टँप नाहीच आहे
तरी तुम्ही मागणी करतच आहे ना ? 
अटलजी आणि पं. मदनमोहन मालवीय
अटलजी आणि पं. मदनमोहन मालवीय यांना भारतरत्न मिळाल्याचे वाचून आनंद वाटला.
वीणा सुरू यांच्या पोस्टला अनुमोदन.
पी. व्ही. नरसिंह रावांनाही हा पुरस्कार एकदा मिळावा असे वाटते.
बरोबर सग्ळ्या पंतप्रधानांना
बरोबर सग्ळ्या पंतप्रधानांना पुरस्कार द्यावा
देवेगौडा, गुजराल चंद्रशेखर सारखे दिग्गज देखील आहेत
>>> पी. व्ही. नरसिंह
>>> पी. व्ही. नरसिंह रावांनाही हा पुरस्कार एकदा मिळावा असे वाटते. <<<
मलाही तसेच वाटते, फक्त एक सुधारणा सुचवितो, बघा पटली तर, हा पुरस्कार कै. नरसिंहराव अन कल्याणसिंग यांना जोडीने वा विभागुन द्यावा ! एका महान ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार/शिल्पकार आहेत दोघेही!
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Pt-Madanmohan-Malviya-Bhar...
लिंबुभाउ तुम्हीतर गोडसेला
लिंबुभाउ तुम्हीतर गोडसेला देखील द्यायला निघाल बरोबर ना
बाळासाहेब ठाकरे
बाळासाहेब ठाकरे
>>राजीव गांधी (मरणोत्तर)
>>राजीव गांधी (मरणोत्तर) भारताचे सातवे पंतप्रधान> राजीव गांधींनी मरण पावल्यानंतर स्वतःला पुरस्कार दिला? इथले काही महाभाग बेंबीच्या देठा पासुन ओरडत आहेत म्हणुन हा प्रश्न<<
कुठला महाभाग बेंबी च्या देठा पासुन असे ओरडत आहे देशमुख साहेब ? बाकी त्यांनी भारतात मुक्त अर्थव्यवस्था आणली आणि संगणक क्रांती घडवली हे जरी खरे असले तरी ह्या दोन्हींचे खरे श्रेय पी. व्ही. नरसिंह रावांनाच जाते !!
प्रसन्न हरणखेडकर यांच्या ९:११
प्रसन्न हरणखेडकर यांच्या ९:११ च्या संपुर्ण पोस्टला अनुमोदन.
भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींची यादी पाहता त्यात राजकारणी लोकांचाच भरणा जास्त आहे. त्यातील कोणाचेही कर्तृत्व नाकारता येत नाही पण हा पुरस्कार शास्त्रज्ञ, कलाकार, समाजसेवक यांच्या पुरता मर्यादित ठेवला असता तर चांगले झाले असते हे माझे वैम. कारण सर होमी भाभा, विक्रम साराभाई सारख्या शास्त्रज्ञांनासुध्दा हा पुरस्कार अजुन मिळालेला नाही.
महात्मा गांधीना हा पुरस्कार अजुन का मिळाला नाही ह्याबद्दल कोणाला काही माहिती आहे का?
आहेत काही रुग्ण ज्यांना
आहेत काही रुग्ण ज्यांना उपचाराची गरज आहे
चिलटांसारखी इकडुन तिकडे सतत ओरडत फिरत असतात
जाउ द्या हो मग.....
जाउ द्या हो मग.....
माने साहेब धन्यवाद !
माने साहेब धन्यवाद !
प्रसन्न हरणखेडकरजी उत्तम
प्रसन्न हरणखेडकरजी
उत्तम पोस्ट. अभिनंदन आपले.
Pages