राष्ट्रपती भवनामधुन जाहिर झालेल्या पत्रकानुसार आज अटलबिहारी वाजपेयी आणि पं. मदनमोहन मालवीय यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. २५ डिसेंबर ला वाजपेयीयांचा ९० वा तर पं मदनमोहन मालवीय यांचा १५३ वा वाढदिवसाचे औचित्य साधुन हा निर्णय झाला.
अटलबिहारी राजनेते असुनही कवी आहेत हे जसे वेगळेपण तसेच पं मदनमोहन मालवीय राजनेते, शिक्षक आणि काही काळ वकिल म्हणुनही कार्यरत होते. पं मदनमोहन मालवीय यांनी सर्वात मोठी निवासी बनारस हिंदु युनीव्हर्सीटी ची स्थापना देशभरातुन देणग्या जमाकरुन निर्माण केली.
आज पर्यंत ४३ लोकांना १९५४ पासुन हा पुरस्कार मिळाला आहे ज्यात फक्त ५ महिला आहे आणि ४३ पैकी बोटावर मोजण्याइतक्या व्यक्ती राजकारणाशी संबंधीत नाहीत.
सर्वात जास्त व्यक्ती काँग्रेसचे आहेत हे उघडच आहे कारण सर्वात जास्त वर्षे काँग्रेस सरकार मधे आहे. पं मदनमोहन मालवीय सुध्दा तीन वेळा काँग्रेसचे अध्यक्ष राहिले आहेत. नंतरच्या काळात त्यांनी काँगेस सोडुन नविन पक्ष स्थापन केला व शेवटी हिंदु महासभा या पक्षाच्या स्थापनेत त्यांचा सहभाग होता.
ज्यांनी समाज जीवनात समर्पण केले आहे अश्यांना हा पुरस्कार मिळावा असा संकेत असताना भारताचा हा सर्वोच्च पुरस्कार राजकारणी व्यक्तींना अधिक वेळा मिळतो आणि सत्ताधारी आपली विचारधारा सोडुन हा पुरस्कार देत नाहीत ही शोकांतीका आहे. किती पुरस्कार द्यावेत याचे बंधन नसताना सरदार पटेलांना हा पुरस्कार त्यांच्या मृत्युनंतर २० वर्षांनी हा पुरस्कार मिळाला तर नेताजी सुभाषचंद्र बोस हे अद्याप वंचीत आहेत.
आता हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद, बहुजन समाजवादी पार्टीचे संस्थापक काशीराम, क्रांतीकारक भगतसिंग, यांच्या बरोबर अजुन बरेच लोक या प्रतिक्षा यादीत आहेत.
मायबोली रत्न च्या दावेदार
मायबोली रत्न च्या दावेदार फक्त विना तै .>>..सहमत
हिंदी मध्ये एक कहावत आहे ...
हिंदी मध्ये एक कहावत आहे ... सौ सुनार कि एक लोहार की ...
पोष्टर बोय च्या धाग्याला सरासरी १०० प्रतिसाद येतात ... पण सुरुनच्या एकाच धाग्याची लोकप्रियता बघा... १००० जातोय ...
यांचे सगळे धागे एकीकडे ... आणि यांचा एक धागा एकीकडे ...
नेहरू व राजेन्द्रप्रसाद
नेहरू व राजेन्द्रप्रसाद दोन्ही उत्तुंग व्यक्तिमत्त्वे होती. ते असल्या भानगडीत पडतील असे अजिबात वाटत नाही. या दोघांमधले वादही प्रसिद्ध आहेत. "सेक्युलर" शब्दाचा भारतात जो सध्या अर्थ लावला जातो (जे फार चांगले झाले) त्यात थोडासा राजेन्द्रप्रसादांचाही हातभार आहे. नेहरूंच्या दृष्टीने जगभर इतरत्र लावल्या जाणार्या अर्थाप्रमाणे सरकारने वागावे असे होते. त्यामुळे दोघांत नेहमी वाद होत असे.
गिरींच्या बाबतीत मात्र त्यानंतर राजनिष्ठा दाखवणे जे सुरू झाले त्याचाच तो भाग असावा. अर्थात हे फक्त त्यांनी नाव पुढे करण्याबद्दल. इंदिरा गांधींनी बांगला देश बद्दल जे केले (तसेच संस्थानिकांचे तनखे रद्द वगैरे) त्यामुळे त्यांची निवड बरोबर होती हे नक्कीच.
अगदी सहमत
अगदी सहमत
http://www.ummid.com/news/201
http://www.ummid.com/news/2014/December/24.12.2014/rihai-manch-on-vajpay...
....
अटलबिहारीजी स्वातंत्रलढ्यात नेमके कुणाकडुन लढले ? स्वातंत्रसैनिक की इंग्रज ?
मनमोहन सिंग व जपानचा पुरस्कार या धाग्यावर ममो यांच्या कर्तुत्वाबद्दल वारंवार विचारणा करणारे वीर आयडी आता वाजपेयींबाबत खुलासा करतील का ?
स्वकीयांविरुद्ध लढणार्यांवर
स्वकीयांविरुद्ध लढणार्यांवर पी एच डी चे प्रबंध लिहिणार्या पगारे साहेबांना विचारा.
काउ असे मुद्दे इग्नोर करतात
काउ असे मुद्दे इग्नोर करतात इथे त्यांना अपेक्षित मुद्देसुद चर्चा करता येत नाही.
अटलबिहारीजी स्वातंत्रलढ्यात
अटलबिहारीजी स्वातंत्रलढ्यात नेमके कुणाकडुन लढले ? स्वातंत्रसैनिक की इंग्रज ?
हा अयोग्य प्रश्न लालुप्रसाद यांनी सुध्दा वर्तमान पत्राचा हवाला देऊन संसदेत विचारला गेला होता. ह्याचा समाचार घेताना अटलबिहारी वाजपेयी तत्कालिन लोकसभा अध्यक्षांना म्हणाले की मी १९४२ च्या आंदोलनात चुकीचे काम केले असे सिध्द झाले तर राजकारणातुन संन्यास घेईन.
विरोधकंना नामोहरम करुन त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल शंका उपस्थित करण्याच्या तत्कालिन काँग्रेसी राजनितीच्या डावपेचाचा भाग म्हणजे वरील वाक्य किंवा गुगलावर उपलब्ध्द मटेरीयल आहे. ज्याला आता काहीच मुल्य नाही.
मी अविवाहीत नाही इतकी खाजगी जीवनाबाबत कबुली देण्याचे धारिष्ट्य जी व्यक्ती दाखवते ती नक्कीच आपल्या सार्वजनिक जीवनातल्या चुकांची कबुली देण्यात दाखवेल हा विश्वास मला तर आहेच पण अटलजींच्या सार्वजनिक जीवनाबाबत आदर असलेली प्रत्येक व्यक्तीलाही हा विश्वास असेल.
चिखलच उडवायचा असेल तर कशावरही उडवता येईल.
मी अविवाहित आहे , ब्रह्मचारी
मी अविवाहित आहे , ब्रह्मचारी नव्हे , असे ते बोलले होते.
त्यांच्या * * चे काही महिन्यापुर्वीच निधन झालेले आहे
http://www.misalpav.com/node/29463
काँग्रेसी राजनितीच्या
काँग्रेसी राजनितीच्या डावपेचाचा भाग > हास्यास्पद लिखाण
गांधी परिवार आणि इतर लोकांवर तुमच्या भाजप्यांनी किती चिखल उडवलेला आहे ते सोईस्करपणे विसरले आहेत.
चिखलाशिवाय कमळ जगु शकत नाही
चिखलाशिवाय कमळ जगु शकत नाही
श्री वाजपेयी , मनमोहन सिंग
श्री वाजपेयी , मनमोहन सिंग यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांवर राळ उडवून काय मिळत इथे दोन्ही बाजूंना ? ह्या दोन्ही नेत्यांचा भारतीय विकासात सहभाग आहे हे मान्य करायला काय अडचण आहे ?
चिखलफेक करणे हे काँग्रेसी
चिखलफेक करणे हे काँग्रेसी राजनितीच्या डावपेचाचा भाग आहे,
त्या साठी दिग्विजय सींग, मनिष तिवारी, बेनी प्रसाद, अभिषेक सिंघवी सारखे लोक सतत कार्यरत असतात, काही लोक बाहेरुन ,ह्याला मदत करत असतात, जसे की लालु प्रसाद यादव.
चिखलाशिवाय कमळ जगु शकत नाही
चिखलाशिवाय कमळ जगु शकत नाही
काँग्रेसने ६५ वर्षे भारत भर चिखलच केला म्हणुनच आता भारत भर कमळ उमलायला लागलय
प्राण्यांवर प्रेम करा असे
प्राण्यांवर प्रेम करा असे पेटावाले म्हणतात
च्रप्स, >> मायबोली रत्न च्या
च्रप्स,
>> मायबोली रत्न च्या दावेदार फक्त विना तै ...
स्पार्टाकस,
>> अहो पोस्टर बॉय आहेत ना मायबोलीचे ! धागा रत्न!
दोघांशीही पूर्णपणे असहमत. मायबोलीरत्न फक्त मीच होऊ शकतो. कारण यापूर्वी मी माझी शिफारस केली आहे. तदनुसार मला हे बिरूद श्री रॉबिनहूड यांनी प्रदान केलेदेखील आहे. आता यांत बदल संभवत नाहीत.
आ.न.,
-गा.पै.
अगं बै, मी आणि मायबोली रत्न
अगं बै, मी आणि मायबोली रत्न !!
मै कहा हूं असं वाटलं आणि आत्यानंदानं हार्ट अॅटॅकच यायचा बाकी राहीला होता.
मला कुणीतरी सांगितलंच होतं की मायबोलीकर अतिशय प्रेमळ आहेत, त्याचा प्रत्यय आला.
पण गामा पैलवान म्हणतात तसं हा पुरस्कार त्यांनाच दिला गेला असेल तर मी नाही हो या स्पर्धेत.. हा पुरस्कार एखाद्या पैलवालानाला (कुस्ती = खेळ = खिलाडूवृत्ती ) मिळावा यातच सर्वांचा सन्मान होतो असं मला तरी वाटतं.
>>>मला कुणीतरी सांगितलंच होतं
>>>मला कुणीतरी सांगितलंच होतं की मायबोलीकर अतिशय प्रेमळ आहेत, त्याचा प्रत्यय आला.<<<
अजून वेमांनाही जो प्रत्यय आला नाही तो तुम्हाला आला ह्याबद्दल अभिनंदन!
पण, वेमा हा आणखी कुणाचा शॉफॉ
पण, वेमा हा आणखी कुणाचा शॉफॉ ?
मा म्हणजे मालक का ?
वेबमास्तर मायबोलिचे
वेबमास्तर
मायबोलिचे सुपरवायजर उर्फ चित्रगुप्त .. हॅ सर्वांचा पाप पुण्याचा हिसाब ठेवतात.
ओह ! थँक्स काऊ तै
ओह !
थँक्स काऊ तै
इश्शं ! काउदादा !!
इश्शं ! काउदादा !!
(No subject)
धन्यवाद.. हा कावळा मी घेत आहे
धन्यवाद.. हा कावळा मी घेत आहे
अवांतरः मी एक ठरवलंय. स्वतःच
अवांतरः
मी एक ठरवलंय. स्वतःच स्वतःला पुरस्कार द्यावा म्हणतो. कुठला द्यावा बरं? हं, स्वतःलाच कोकणस्थ कुटुंबरत्न असा पुरस्कार द्यावा म्हणतो, मग त्यात माझा काहीही हात नसून तो पुरस्कार कुठल्याशा आजोबांनी किंवा काकांनी स्वतःच्याच मनानी कसा निश्चित केला असं सांगेन सगळ्यांना. ठरलं तर.
कोकणरत्न नाव ठेवा त्या
कोकणरत्न नाव ठेवा त्या पुरस्काराचं.
सगळे वाद बाजूला ठेवून हे पहा
सगळे वाद बाजूला ठेवून हे पहा - भारतरत्न चे मानकरी!
Pages