गुळ तुप, साधं वरण व बट्टी

Submitted by monalip on 20 November, 2014 - 03:20
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तर बाटी / बट्टी / बिट्टे या विविध नावांनी एका खाद्यपदार्थाचा माबोवर धुमाकुळ चालु आहे. त्यात हा अजुन एक बट्ट्या व वरण. अन बट्ट्या व गुळ तुप.

आई रोज रोज पोळीच काय? कंटाळा येतो. हा संवाद नेहेमीच झडतो. मग ह्याला उत्तर म्हणुन पोळीच्याच जिन्न्सांनी बनलेला हा एक मस्त पदार्थ आहे.

बट्ट्यांसाठी
गव्हाची जाडसर दळलेली कणिक वा पोळ्याना वापरतो ती कणिक व थोडा रवा.
जीरे + ओवा (पुर्ण वा पावडर करुन)
हळद, तिखट, मिठ, पाणी

तुप तळायला व वरणावर घ्यायला

वरणासाठी
तुर / तुर + मुग डाळ + हळद + हिंग + वरुन पिळायला लिंब / लिंबाचा रस

गुळ

चटणी (कोणतिही) + तेल

क्रमवार पाककृती: 

पोळ्यांची मळतो तशी सर्व साहित्य एकत्र करुन बट्ट्यांसाठी कणिक भिजवुन थोडा वेळ ठेवुन द्या. DSC_0840.JPGDSC_0841.JPG
वरणाची तयारी करा. कुकरला वरणाचा डबा ठेवल्यावर त्यावर जाळी ठेवा.
आता त्यावर ठेवायला कणकेचा उंडा तयार करायचा आहे.
आधी २-३ पोळ्यासाठी घेतो तेवढा किंवा जास्त गोळा घेउन तो हाताने दाबुन उभट पसरवत जायचे. त्यावर तेलाचे बोट फिरवुन मग तो फोल्ड करुन घ्यायचा / गुंडाळुन घ्यायचा.
DSC_0842.JPGDSC_0843.JPG
आता हाच गोळा आडवा ठेवुन पुन्हा उभट पसरवत जायचा. थोडक्यात एकदा उभ्या व एकदा आडव्या घड्या पडल्या पाहिजे.
DSC_0844.JPGDSC_0845.JPG
असे ३-४ वेळा झाले की हा उंडा कुकरमधे त्या जाळिवर ठेवुन नेहेमीप्रमाणे कुकर लावायचा. ५-६ शिट्ट्या किंवा २ शिट्ट्यांनंतर १० मिनिटे गॅस मंद करुन पुन्हा ३ शिट्ट्या करुन घ्यायच्या.
DSC_0846.JPG
जर मोठा गोळा घेउन केले असेल तर अळुवडी प्रमाणे हे कापुन घ्यायचे. (वेळ व पेशन्स असल्यास प्रत्येक बट्टी वेगवेगळी पण करता येते.)
तर कापल्येल्या बट्ट्यांना अशा घड्या दिसतिल.
DSC_0847.JPG
ह्या बट्ट्या आता तुपात खरपुस तळुन घ्यायच्या. त्या जास्त तुप शोषत नाहित सो कॅलरीची काळजी करु नका. Wink
DSC_0848.JPG
तर ह्या बट्ट्या तशाच वा कुस्करुन वरण / गुळ तुप याबरोबर खायला घ्या.
ह्या अशा बट्ट्या मुद्दाम उरवुन मग दुसर्‍या दिवशी न्याहारीला चटणी बरोबर पण मस्त लागतात.
DSC_0849.JPG

वाढणी/प्रमाण: 
दोन पोळ्यांचा आहार असेल तर लहान अशा ३-४ बट्ट्या सहज खाल्या जातात. खरपुस असल्याने एखादी जास्तच खाउन मग शतपावली करायची. हाकानाका.
अधिक टिपा: 

तळुनच खा. तरच मस्त लागतात.

माहितीचा स्रोत: 
आई
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त बेत आहे.
मला वाटतं जास्त तूप मळतानाच घातले तर बेक करूनही चांगल्या होतील. तळायची गरज राहणार नाही. वरून तूप अर्थातच घ्यायचे. त्याला पर्याय नाही.

वाह!! झक्कासच.करुन बघेन पण त्या आधी तुझ्या हातची टेस्ट करुन बघायला हवी.
बोल मोनाली कधी बोलवतेस खायला? Happy

मोनाली, तुला ही अशी जाळी कुठे मिळाली? कुकरसोबत जी तळात ठेवण्यासाठी जाळी येते ती अशी नसते? आणि ही जाळी तू कशी ठेवलीस तेही कळले नाही? कणकेचा गोळा पाण्याला स्पर्श करतो का?

जर मी नेहमीचे प्रेशर कुकर लावले खाली जाळी ठेवून आता पाणी जाळी बुडेपर्यंत घालून आणि वर एक रिकामे पातेले ठेवले त्यात हा गोळा ठेवला तर तो वाफेल का नीट? ह्यावर थोडे बोल. धन्यवाद.

अरे व्वा! छानच.. बट्टे / बिट्टे महोत्सवच वाटतोय जणु Happy
बी ती जाळी, बहुतेक दुधाच्या भांड्यावर झाकण म्हणुन वापरतात..

बी,

तुला ही अशी जाळी कुठे मिळाली? >>>> ती दुधाच्या पातेल्यावर ठेवायची जाळी असावी. (फोटोवरून कळले)

कुकरसोबत जी तळात ठेवण्यासाठी जाळी येते ती अशी नसते? >>>> बरोबर.

आणि ही जाळी तू कशी ठेवलीस तेही कळले नाही? >>> कुकरला वरणाचा डबा ठेवल्यावर त्यावर जाळी ठेवा. (वरूनच copy-paste केले.)

कणकेचा गोळा पाण्याला स्पर्श करतो का?>>> नाही.

खमंग प्रकार> योग्य शब्द बी.

एक रिकामे पातेले ठेवले त्यात हा गोळा ठेवला तर तो वाफेल का नीट? ह्यावर थोडे बोल. धन्यवाद.>>> हो बी वाफेल नक्की. अन ती दुधाचे पातेले झाकायची झाकणी आहे.

स्नेहाश्री, तुला आमंत्रण कधीपासुन हवेय? कधीही ये. बट्ट्या व शेपुची ताक पिठाची भाजी असे कॉम्बो करुन पाहुयात का? Wink

बट्टे / बिट्टे महोत्सवच वाटतोय जणु>>>>>>. +१००
मोनाली मस्तय हा पदार्थ. आजच माझी एक मैत्रिण आली होती. तिचं माहेर बडोद्याला. तर तिच्याकडेही बडोद्याला असाच काहीसा पदार्थ व्हायचा असं ती सांगत होती. बर्‍यापैकी असाच ...फरक हा की त्यांच्या बाट्यामधे ते गूळही घालायचे.

धन्यवाद मोनाली. मी ही जाळी कधी पाहिली नाही.

माझी भाची सांगत होती की ती एका लाटलेल्या पोळीवर दुसरी लाटलेली पोळी रचत रचत अशा दहा लाटलेल्या पोळ्या रचते. मग ते ताट कुकर मधे ठेवते. ताट आणि पोळीचा आकार कुकर किती मोठा ह्यावर अवलंबून ठरवायचे. मग दोन शिट्या येऊ ध्यायचा. मग ब्रेडच्या आकारासारखे छोटे तुकडे कापायचे. मला हाही प्रकार करुन बघायचा आहे.

मस्त आहे. माबोवर इतके बिट्टे झालेत की आता घरी करुन पाहावेच लागतील.

दिनेशनी सुचवल्याप्रमाणे थोडे जास्तीचे तुप घालुन मी बेक करेन.

ना कणीक किती घट्ट हवी? - पोळ्यांसाठी असते तशीच.
वाफवल्यानंतर ती मऊ/ पातळ होत नाही ना? - नाही उलट जर्र्र्र्र्र्र्र्र्र्रा घट्ट होते.
गुळ तुपा च काय करायच मग>>> तर ह्या बट्ट्या तशाच वा कुस्करुन वरण / गुळ तुप याबरोबर खायला घ्या.
साधना, अगं पारसिक हिल किस दिन काम आयेगी? घे की तळुनच. Wink

मोनाली..... Happy

तुपात तळणे नको आरोग्यासाठी नाही तर मेलं तुप खुपच महाग झालंय म्हणुन.. Happy पण तरीही एकदा तळेनही कारण वरच्या फोटोत एकदम कातील दिसताहेत तळलेल्या बट्ट्या..

मोनालि, काय हे.. साधनाचा दृढनिश्चय डळमळला कि Happy
माझ्या घरी कढईच नसते.. त्यामूळे असे मोह मला पडतच नाहीत.

माझ्यामते तुप हे गरम गरम पदार्थावर वरतून सोडायचे असते. तुप आचेवर ठेवले की त्यातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. त्यामुळे अमुक तेल चांगल की वाईट हे खूपदा आपण ते कसे आणि किती वापरतो ह्यावर अवलंबून असते. तळण हे नेहमी जाड बुडाच्या कढईत च च च करावे.

झब्बू ख त र ना क! आताच जेवलोय पण तरीही ती वरची डिश गट्ट्म करावीची वाटतेय!
डाळीवर हिरव्या रंगाचं अन लाल रंगाचं काय काय आहे? हिरवी फोडणी म्हणजे तेलासारखं दिसणारंही हिरवं आहे! Uhoh

झब्बू ख त र ना क! आताच जेवलोय पण तरीही ती वरची डिश गट्ट्म करावीची वाटतेय!
डाळीवर हिरव्या रंगाचं अन लाल रंगाचं काय काय आहे? हिरवी फोडणी म्हणजे तेलासारखं दिसणारंही हिरवं आहे!
>>
मम!

छान पाककृती!!! दिनेशदा, खतरनाक झब्बु.

बाटी / बट्टी / बिट्टे या विविध नावांनी एका खाद्यपदार्थाचा माबोवर धुमाकुळ चालु आहे.>>>> हे मात्र १००% खरं. बट्टी फॅन क्लब सुरू करायला हरकत नाही.:)

दा कधी येऊ जेवायला? खतरनाक दिसतेय वरची डिश.

आता तुम्हीच सांगा ती एवढी सुंदर गुंडाळी कशी केलीत ते.

अन ते हिरवा चिली सॉस आहे का? व मध्ये तिखट?

Pages