तर बाटी / बट्टी / बिट्टे या विविध नावांनी एका खाद्यपदार्थाचा माबोवर धुमाकुळ चालु आहे. त्यात हा अजुन एक बट्ट्या व वरण. अन बट्ट्या व गुळ तुप.
आई रोज रोज पोळीच काय? कंटाळा येतो. हा संवाद नेहेमीच झडतो. मग ह्याला उत्तर म्हणुन पोळीच्याच जिन्न्सांनी बनलेला हा एक मस्त पदार्थ आहे.
बट्ट्यांसाठी
गव्हाची जाडसर दळलेली कणिक वा पोळ्याना वापरतो ती कणिक व थोडा रवा.
जीरे + ओवा (पुर्ण वा पावडर करुन)
हळद, तिखट, मिठ, पाणी
तुप तळायला व वरणावर घ्यायला
वरणासाठी
तुर / तुर + मुग डाळ + हळद + हिंग + वरुन पिळायला लिंब / लिंबाचा रस
गुळ
चटणी (कोणतिही) + तेल
पोळ्यांची मळतो तशी सर्व साहित्य एकत्र करुन बट्ट्यांसाठी कणिक भिजवुन थोडा वेळ ठेवुन द्या.
वरणाची तयारी करा. कुकरला वरणाचा डबा ठेवल्यावर त्यावर जाळी ठेवा.
आता त्यावर ठेवायला कणकेचा उंडा तयार करायचा आहे.
आधी २-३ पोळ्यासाठी घेतो तेवढा किंवा जास्त गोळा घेउन तो हाताने दाबुन उभट पसरवत जायचे. त्यावर तेलाचे बोट फिरवुन मग तो फोल्ड करुन घ्यायचा / गुंडाळुन घ्यायचा.
आता हाच गोळा आडवा ठेवुन पुन्हा उभट पसरवत जायचा. थोडक्यात एकदा उभ्या व एकदा आडव्या घड्या पडल्या पाहिजे.
असे ३-४ वेळा झाले की हा उंडा कुकरमधे त्या जाळिवर ठेवुन नेहेमीप्रमाणे कुकर लावायचा. ५-६ शिट्ट्या किंवा २ शिट्ट्यांनंतर १० मिनिटे गॅस मंद करुन पुन्हा ३ शिट्ट्या करुन घ्यायच्या.
जर मोठा गोळा घेउन केले असेल तर अळुवडी प्रमाणे हे कापुन घ्यायचे. (वेळ व पेशन्स असल्यास प्रत्येक बट्टी वेगवेगळी पण करता येते.)
तर कापल्येल्या बट्ट्यांना अशा घड्या दिसतिल.
ह्या बट्ट्या आता तुपात खरपुस तळुन घ्यायच्या. त्या जास्त तुप शोषत नाहित सो कॅलरीची काळजी करु नका.
तर ह्या बट्ट्या तशाच वा कुस्करुन वरण / गुळ तुप याबरोबर खायला घ्या.
ह्या अशा बट्ट्या मुद्दाम उरवुन मग दुसर्या दिवशी न्याहारीला चटणी बरोबर पण मस्त लागतात.
तळुनच खा. तरच मस्त लागतात.
हिरव्या मिरच्या तेलातच
हिरव्या मिरच्या तेलातच वाटल्या. मग ते वाटण हळद आणि हिंगाच्या फोडणीवर परतले.. असे वाटण फ्रीजमधे कायम असते माझ्या. त्यातल्या तेलाला असा छान रंग येतो. हिरव्या मिरच्या तश्या टिकत नाहीत, पण असे वाटण टिकते फ्रिजमधे. तेच वाटण नोझलने वरणावर टाकले मधे लाल तिखटाची चिमूट सोडली.
आणि वळकट्या मोनालिच्याच पद्धतीने केल्या. माझ्याकडे पोलपाट नाही. एक फ्लेक्सीबल चॉपिंग बोर्ड आहे त्यावर लाटले ( साधारण ३० सेमी बाय ६० सेमी आकार होता ) त्याचीच वळकटी करून वाफवली.
सजावटीचे म्हणाल तर .. तूम्हाला दाखवायचा असतो ना नैवेद्य.. म्हणून जरा दिखावेगिरी !
हा जरा नीट काढलेला फोटो !
हा जरा नीट काढलेला फोटो !
वाव बट्टी. उद्याच करणार. सोबत
वाव बट्टी. उद्याच करणार. सोबत वांग्याची घोट्लेली भाजी.
दिनेशदा, तुम्ही बट्ट्या
दिनेशदा, तुम्ही बट्ट्या तळल्या की बेक केल्या? खूप छान दिसत आहेत.
मी थोडे तेल व थोडे तूप असे
मी थोडे तेल व थोडे तूप असे पसरट कढईत घेऊन शॅलो फ्राय केल्या. मोनालिने लिहिल्याप्रमाणे फारच कमी तेलात झाले तळून.
Pages