माझी आवड - २१ मराठी गाणी

Submitted by दिनेश. on 24 November, 2014 - 09:10

फेसबुकवर आधी १० हिंदी गाण्यांचा आणि आता १५ मराठी गाण्यांचा विषय चालू आहे. मला ती कल्पना आवडली. पण एवढ्या संख्येची मर्यादा मला जमणार नव्हतीच.

म्हणून इथे २१ मराठी गाण्यांची यादी सुरु करतोय. मला ही यादी करणे अजिबात सोपे नव्हते. लता आणि आशा यांचीच जास्त गाणी आठवतात. मग मी इथे गायक कलाकाराने, आपली गायकी जिथे सिद्ध केलीय, असा निकष लावलाय. ( तरीही २१ म्हणजे... )

ही यादी तूम्ही वाढवायची.

१) तूमची यादी आधीच्या यादीतली गाणी वगळून करायची. म्हणजे जर तूमच्या आवडीचे गाणे आधीच यादीत असेल, तर ते परत लिहायचे नाही, पण २१ गाणी लिहायची.

२) तूम्हाला हवा असेल तो निकष लावा. शक्य असेल तर तोही लिहा.. पण "माझी आवड" हा निकष महत्वाचा.

३) याच फॉर्म मधे गाणी लिहिलीत म्हणजे मुखडा - गायक कलाकार तर मी ही यादी अपडेट करत जाईन. हवे असल्याच "पसंती कळवलीय... यांनी" असे पण लिहिन.

४) ही यादी मुखड्यानुसार अकारविल्हे केलीय.. तशीच वाढवत नेईन.

५) इथे कुठलाही क्रम लावायचा नाही, फक्त अकारविल्हे हाच निकष.

तर ही यादी.. आता मोठी होत चाललीय, म्हणून एक्सेल फाईल अपलोड करतोय..

maajhee aavaD 21 gaaNee_1.xls (76.5 KB)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख - आशा भोसले
२. घन तमी शुक्र बघ राज्य करी - लता मंगेशकर
३. स्वर आले दुरूनी - सुधीर फडके
४. ही वाट दूर जाते - आशा भोसले
५ अनुरागाचे थेंब झेलती प्रीतलतेची पाने - अनुराधा पौडवाल
६ छबिदार छबी मी तोर्‍यात उभी - उषा मंगेशकर
७. त्या भवनातील गीत पुराणे - वसंतराव देशपांडे
८. मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे - हृदयनाथ मंगेशकर
९. सुरत पिया की न छिन बिसराये - वसंतराव देशपांडे
१०. हिल हिल पोरी हिला तुझ्या कप्पालिदेशपांडे - जयवंत कुलकर्णी? Uhoh
११. हि दुनिया मायाजाल मनु जा जाग जरा - माहित नाही. (२-३ असावेत. सचिन नक्की)
१२. अमृताहुनी गोड नाव तुझे देवा - माणिक वर्मा?
१३ अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखानं बोला - महेंद्र कपूर
१४ तुला पाहिले मी नदिच्या किनारी - सुरेश वाडकर

बाकींसाठी रूमाल.

१, चरणी तुझीया मज देइ वास हरी - माणीक वर्मा
२. त्या सावळ्या तनुचे मज लागले पीसे - माणीक वर्मा
३. बोला अमृत बोला - ज्योत्स्ना भोळे
४. आला खुशीत समिंदर - ज्योत्स्ना भोळे
५. तुज स्वप्नी पहिले रे गोपाळा - लता मंगेशकर
६. घे झाकुन मुख गे चंद्रमुखी - तलत महमूद
७. जाईन विचारीत रानफुला - किशोरी आमोणकर
८. हे श्यामसुंदर राजसा - किशोरी आमोणकर
९. कशी तुज समजाऊ सांग - जितेंद्र अभिषेकी
१०. हे बंध रेशमाचे - जितेंद्र अभिषेकी
११. देवा घरचे ज्ञात कुणाला - रामदास कामत
१२. मालवून टाक दीप - लता मंगेशकर
१३. मृगनयना रसिक मोहिनी - वसंतराव देशपांडे
१४. ती कुठे राजसा माझी प्रिय वल्लभा
१५. तेच स्वप्न लोचनात रोज रोज अंकुरे - सुरेश वाडकर
१६. शारद सुंदर चंदेरी राती - आशा भोसले
१७. झाली फुले कळ्यांची - अरुण दाते
१८. ती येते आणिक जाते - महेंद्र कपूर
१९. डोळ्या वरून माझ्या उतरून रात्र गेली - अनुराधा पौडवाल
२०. मेंदीच्या पानवर - लता मंगेशकर
२१, सावर रे उंच उंच झुला - लता मंगेशकर
२२, तोच चंद्रमा नभात - सुधीर फडके
२३. नवीन आज चंद्रमा - सुधीर फडके आणि आशा भोसले
२४. कशी काळ नागिणी - लता मंगेशकर
२५. केळीचे सुकले बाग - उषा मंगेशकर
२६. नको जाउ कोमेजून माझ्या प्रितीच्या फुला - उषा मंगेशकर
२७. अजुनी रुसोनी आहे - कुमार गंधर्व
२८. वारीयाने कुंडल हाले - व्ही जी भाटकर
२९. रात्र काळी, घागर काळी - गोविंद पोवळे, प्रभाकर नागवेकर
३०. रिमझिम झरती श्रावण धारा - सुमन कल्याणपूर
३१. तिन्ही सांजा सखे मिळाल्या - लता मंगेशकर
३२. दावा नयनी यशोदेचा सुकुमार - रतीलाल भावसार
३३. हे मना आज कोणी बघ तुला - महंमद रफी
३४. खेळ तुझा न्यारा - महंमद रफी
३५. सर्वात्मका सर्वेश्वरा - जितेंद्र अभिषेकी
३६. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे - रवींद्र साठे
३७. पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा - शोभा गुर्टू
३८. उघड्या पुन्हा जहाल्या - शोभा गुर्टू
३९. मी एकटीच माझी असते कधी कधी - निर्मला देवी
४०. फिटे अंधारचे जाळे - सुधीर फडके
४१. विमोह त्यागुन कर्मफळांचा - सुधीर फडके
४२. माना मानव वा परमेश्वर - सुधीर फडके
४३. तु माझी माउली - छोटा गंधर्व
४४. पक्षीणी प्रभाती चारियासी जाये - सुमन कल्याणपुर
४५. अवेळीच केंव्हा दाटला अंधार - श्रीधर फडके
४६. त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी - श्रीधर फडके
४७. दिन तैसे रजनी - आशा भोसले
४८. सखी गं मुरली मोहन मोही मना - आशा भोसले
४९. सारंगा रे सारंगा - देवकी पंडीत
५०. रंगुनी रंगात सार्‍या रंग माझा वेगळा - देवकी पंडीत

द्क्षे, तूझी यादी पूर्ण झाली की अ‍ॅड करतो.
मन्या, काही गाण्यांचे गायक मला आठवत नाहीत, ते लिहिणार का प्लीज.

१)तीन्ही सांजा सखे मिळाल्या -लता२)कशी काळनागिणी, सखे ग वैरिण झाली नदी-लता ३)चांदणे शिंपीत जाशी -आशा४)अशी पाखरे येती५)त्या तरुतळी विसरले गीत्६)डोळ्यांमधले आसू पुसती ओठावरले गाणे७) धुंद येथ मी स्वैर झोकितो ८)असेच होते म्हणायचे तर सर्व सुधीर फडके ९)विसरशील खास मला -आधीची आवृत्ती सुधा मल्होत्रा आणि?१०) या भवनातील गीत पुराणे- वसंतराव ११)माझे जीवन गाणे- जितेंद्र अभिषेकी १२)समईच्या शुभ्र कळ्या-आशा१३) मेंदीच्या पानावर १४) ही वाट दूर जाते १५) दोन ध्रुवावर दोघे आपण- गजाननराव वाटवे १६) यमुनाकाठी ताजमहाल-गजाननराव वाटवे१७) नदीकिनारी नदी किनारी, नदीकिनारी ग-(बबनराव नावाडीकर?)१८)घननीळा, लडिवाळा -माणिक वर्मा१९)जळते मी हा जळे दिवा-माणिक वर्मा२०) चल नाच नाच रे नंदकिशोरा २१)जीवाच्या जिवलगा नंदलाला रे २२)अजून नाही जागी राधा २३)जा सांग लक्ष्मणा सांग रामराजाला-गीता दत्त२४) काल पाहिले मी स्वप्न गडे-आशा२५) गळ्यात माझ्या तूच जिवलगा मंगल मणि बांधले- आशा
याशिवायही अनेक आवडती आहेत. जनी नामयाची रंगली कीर्तनी, काल पाहिले मी स्वप्न गडे, या कातरवेळी पाहिजेस तू जवळी, इथेच आणि या बांधावर अशीच श्यामल वेळ, सप्तपदी ही रोज चालते, नववधू प्रिया मी बावरते, ते दूध तुझ्या त्या घटातले, तेथे कर माझे जुळती,तुझ्या गळा माझ्या गळा, कशी रे तुला भेटू मला वाटे लाज,राधा गौळण करिते मंथन, पैंजण हरीची वाजली, शुक्र तारा मंद वारा, आश्रमात या कधी रे येशील रामा रघुनंदना, रघुपतिराघव गजरी गजरी तोडित बोरे शबरी वगैरे खूपच आहेत.

१) मन मनास उमगत नाही- श्रीधर फडके
२) सांज ये गोकुळी सावळी सावळी
३) का रे दुरावा का रे अबोला
४) मलमली तारुण्य माझे
५) चांदण्यात फिरतांना
६) धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना
७) गर्द सभोवती रानसाजणी तू तर चाफेकळी
८) जीव गुंगला, दंगला, रंगला असा
९) ओल्या सांजवेळी उन्हे सावलीस बिलगावी
१०) कधी तू रिमझिम झरणारी बरसात
११) स्वीकारा ही पुजा आता उठी उठी गोपाळा
१२) मोगरा फुलला मोगरा फुलला
१३) धुंद मधुमती रात रे रात रे
१४) तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला
१५) पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा
१६) रिमझिम झरती श्रावणधारा
१७) त्याची धुन झंकारली रोमा रोमात- मंगला नाथ, गीत संगीत- यशवंत देव.
१८) जिथे सागरा धरणी मिळते
१९) पैंजण रुणझुणले पाऊल राधेचे अडले
२०) ही चाल तुरुतुरु, उडती केस भुरूभुरू
२१) पिवळी पिवळी हळद लागली, भरला हिरवा चुडा

गाणे, गीतकार, गायक, संगीतकार, चित्रपट्/अल्बम. * = माहित नाही. आधिच यादीत आहे

१)मन उधान वार्‍याचे, गुरु ठाकूर,शंकर महादेवन,अजय-अतुल, अगं बाई अरेच्चा
२) मल्हरवारी मोतियाने द्यावी भरुन,गुरु ठाकूर, शाहिर साबळे - अजय गोगावले, अजय-अतुल, अगं बाई अरेच्चा
३) आभास हा छळतो मला, अश्विनी शेंडे,वैशाली सामंत - राहुल वैद्य,निलेश मोहरीर, यंदा कर्तव्य आहे.
४) गोर्‍या-गोर्‍या गालावरी चढली लाजची लाली, गुरु ठाकुर, योगिता गोडबोले- प्राजक्ता रानडे, अजय-अतुल, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं.
५) जीव दंगला, गुंगला,रंगला असा, *,हरिहरन-श्रेया घोषाल, अजय-अतुल, जोगवा
६) नाविका रे वारा वाहे रे, अशोक परांजपे, सुमन कल्यानपुर, अशोक पत्की, *
७) गोमू संगतीनं माझ्या तु येशिल का,सुधिर मोघे, आशा भोसले-हेमंतकुमार, पं ह्र्दयनाथ, हा खेळ सावल्यांचा
८) साजनी, नभात नभ दाटून आले, रवि जाधव,शेखर रावजीयानी,शेखर रावजीयानी, साजनी-अल्बम
९) स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले मी तुला ,*,अरुण दाते,*,*
१०) मन सुद्ध् तुझ गोष्ट हाये, पृथवी मोलाची,शांताराम आठवले, मा.परशुराम, केशवराव भोळे, कुंकु
११) आता कशाला उदयाची बात, बघ उडुनि चालली रात,अनंत काणेकर,शांता हुबळीकर,मा. कृष्णराव, माणूस
१२) लखलख चंदेरी तेजाची प्यारी दुनिया,शांताराम आठवले,*,मा. कृष्णराव, शेजारी
१३) तरूण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास का रे,सुरेश भट,आशा भोसले,पं. हृदयनाथ,*
१४) तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडुन जाउ रंगमहाल, जगदीश खेबुडकर,उषा मंगेशकर,उषा मंगेशकर,पिंजरा
१५) मला वेड लागले प्रेमाचे,गुरु ठाकुर,बेला शेंडे-स्वप्निल बांदोड्कर,चिनार-महेश ,टाइम्पास
१६) शुक्रतारा मंद वारा,मंगेश पाडगावकर,अरूण दाते - सुधा मलहोत्रा,श्रीनिवास खळे,*
१७) कधी तु, श्रीरंग गोडबोले,हृषिकेश रानडे,अविनाश-विश्वजीत,मुंबई-पुणे-मुंबई
१८) गारवा... गारवा, वार्‍यावर भिरभिर पारावा, सौमित्र, मिलींद इंगळे,मिलींद इंगळे,गारवा
१९) एक झोका एक झोका, चुके कळजाचा ठोका,सुधिर मोघे,आशा भोसले,आनंद मोडक, चौकट राजा
२०) मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात, संदिप खरे,*,*,दिवस असे कि
२१) मी रात टाकली,ना. धों. महानो,चंद्रकांत काळे -रवींद्र साठे- लता मंगेशकर,पं. हृदयनाथ,जैत रे जैत

मी नुस्तीच वाचक आहे या धाग्यावर Happy

तुम्हा सर्वांनी लिहिलेली गाणी शोधून ऐकणारी भावी श्रोता ही

( जमल्यास लिंक्स देणे)

मस्त गाणी आहेत सगळ्यांची .एजे यांची लिस्ट पाहुन आता माझी लिस्ट फिल्टर करावी लागेल . Happy

१) एकदंताय विघ्नहर्ताय - अल्बम - शंकर महादेवन https://www.youtube.com/watch?v=ZlbJK4rHkD0

२) अशी चिक मोत्याची माळ - उत्तरा केळकर https://www.youtube.com/watch?v=Tv2-OBeG6co

३) माउली माउली - लय भारी - अजय गोगवले https://www.youtube.com/watch?v=iFhC_A-iW0w

४) भरलं आभाळ पावसाळी पाहुणा गं - एक होता विदूषक - आशा भोसले https://www.youtube.com/watch?v=8pFZR4me4rc

५) फुलले क्षण माझे फुलले रे - आशा भोसले https://www.youtube.com/watch?v=NbJcnaMXvw4

६) झुंजुर मुंजुर पाउस वारयाने - बिनकामाचा नवरा - आशा भोसले https://www.youtube.com/watch?v=61UehIlArxk

७) जाईजुईचा गंध मातीला - मुक्ता - जयश्री शिवराम https://www.youtube.com/watch?v=1K5YbiDbQ_w

८) वळण वाटातल्या पानात हिरवे छंद - मुक्ता - https://www.youtube.com/watch?v=p-_6n5WHi8M

९) चिंब भिजलेले रुप सजलेले - शंकर महादेवन https://www.youtube.com/watch?v=RA_i_5FifQs

१०) छुम छुम पायी वाजे घुंगुर गिरकी घेता - दे धक्का - https://www.youtube.com/watch?v=ZiWtTii795A

११) दिस चार झाले मन पाखरु - आईशप्पथ - साधना सरगम https://www.youtube.com/watch?v=TJP0fmUn6cI

१२) भिजुन गेला वारा - इरादा पक्का - https://www.youtube.com/watch?v=oToZsqYvCOU

१३) सांजवेळी सांजरंगी - क्षणभर विश्रांती https://www.youtube.com/watch?v=92zskUKyhwM

१४) ढग दाटुनी येतात - आईशप्पथ - साधना सरगम https://www.youtube.com/watch?v=1evPGpLaPFA

१५) प्रेम रंगात रंगुनी - क्षणभर विश्रांती - https://www.youtube.com/watch?v=dVVK4u35Pgo

१६) सदा तेरा ही वास है - शाळा - के मोहन , अग्नी https://www.youtube.com/watch?v=slrnt1S-LBg

१७) सदा तेरा ही वास है - शाळा (२ वर्शन) - श्रीविद्या ,अग्नी https://www.youtube.com/watch?v=qguQKakXy8U

१८) हरवली पाखरे - बालक पालक - शेखर (विशाल -शेखर) https://www.youtube.com/watch?v=61kLtBoTOjc

१९) प्रेमात पडतो शा ना ना -सनई चौघडे - अवधुत गुप्ते, जान्हवी प्रभु अरोरा https://www.youtube.com/watch?v=bcOk0WckX3o

२०) दाटले रेशमी आहे धुके - टाइमपास - महालक्ष्मी अय्यर ,चिनार खारकर https://www.youtube.com/watch?v=fo5UHIotLNQ

२१) देवा तुझ्या गाभारयाला - दुनियादारी - आदर्श शिंदे ,कीर्ती किल्लेदार,आनंदी जोशी https://www.youtube.com/watch?v=qGHJvEV0HIs

२२) बावरी बावरी - प्यार वाली लव स्टोरी - जयदीप बागवडकर ,आनंदी जोशी, संदीप पाटील https://www.youtube.com/watch?v=O_ASwC7j5VA

२३) फ्रेऽऽश जसा सोसाट्याचा वारा - हॅपी जर्नी - शाल्मली खोलगडे https://www.youtube.com/watch?v=kbowPQL4Yf0

गाणी ,गायक व लिंक दिले आहेत. Happy

ही गाणी केवळ आवड म्हणुन दिली आहेत .

मस्त आहे विषय पण आधी कोणी कुठले गाणे निवडले हे वाचून मग आपले गाणे लिहायचे हे जरा फार वेळखाऊ काम होत आहे.

लिंक देण्याची आयडीया छान आहे आणि ती मी माझ्यापासून अमलात आणत आहे:

१) मी राधिका.. मी प्रेमिका - गायिका आहे आरती अंकलीकर - http://www.youtube.com/watch?v=AqH-TkK9NSk

२) धुंद मंद मी अशीच - पद्मजा फेणाणी - http://www.youtube.com/watch?v=gLdTOFVWg_8

३) समईच्या शुभ्र कळ्या - आशा - http://www.youtube.com/watch?v=ccdos20UltE

४) मलमली तारुण्य माझे - आशा - http://www.youtube.com/watch?v=QYXwfGQvFuQ

५) हे श्यामसुंदर राजसा - किशोरीताई अमोणकर - http://www.youtube.com/watch?v=ynUqu1UtL9U

६) बाजे रे मुरलिया बाजे - पंडीत भीमसेन जोशी आणि लताबाई - http://www.youtube.com/watch?v=-W5U53LMsU0

७) सखी मंद झाल्या तारका - पंडीत भीमसेन जोशी - http://www.youtube.com/watch?v=F2gldTrqThk

८) डोळे हे जुलमी गडे - आशाताई - http://www.youtube.com/watch?v=8VMNRjZSX_M

९) कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे - रविन्द्र साठे - http://www.youtube.com/watch?v=6z9ZGu-Pjuo

१०) लव लव करी पात - पद्मजा फेणाणी - http://www.youtube.com/watch?v=BnAjGoCQP3k

११) उगवला चन्द पुनवेचा - बकुळ पंडीत - http://www.youtube.com/watch?v=m-TXWPhX848

१२) बगळ्यांची माळ फुले - प. वसंतराव देशपांडे - http://www.youtube.com/watch?v=bWqEOGiOlO8

१३) भय इथले संपत नाही ...लताबाई
१४) राजसा जवळी जरा बसा.. लताबाई
१५) रात्र काळी घागर काळी.. अजित कडकडे?
१६) रेशमांच्या रेघांनी... लाल पिवळ्या धाग्यांनी -- आशाताई
१७) जिवलगा राहिले रे .. दुर घर माझे -- आशाताई

मला आवडलेली मराठी गाणी..

१] शुक्रतारा मंदवारा चांदणे .. पाण्यातले...
२] स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तु मला -
३] वारा गाई गाणे.. प्रीतीचे तराणे.. - लता मंगेशकर
४] राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी
५] जांभुळ पिकल्या झाडावरी ढोल कुणाचा वाजतो
६] ऐरणीच्या देवा तुला ठीणगी ठीणगी वाहु दे
६] मळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं
७] या चिमण्यानो परत फिरा रे झाल्या तिन्हीसांजा
८] मेंदीच्या पानावर मन अजुन झुलतंय गं - लता मंगेशकर
९] चिंब पावसाने रान झाले आबादानी
१०] गारवा... वार्‍यावर भिर भिर पारवा....
११] मल्हार वारी मोतियानं द्यावी भरुन
१२] भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
१३] आज गोकुळात रंग खेळतो हरी
१४] आला आला वारा.. संगे पावसाच्या धारा - लता मंगेशकर
१५] आभास हा.. छळ्तो तुला... छळ्तो मला... आभास हा..

मी यादी बनवताना फक्त भावगीतेच म्हणजे गैरफिल्मी गीतेच विचारात घेतली होती. चित्रपट आणि नाट्यसंगीताचा समावेश असलेली यादी खूपच वेगळी होईल. त्यात जगाच्या पाठीवर आणि सुवासिनीतली काही गाणी नक्की येतील. नटरंगही असेल. 'धुंद मधुमती रात रे' आणि अमर भूपाळेतले सांगा मुकुंद कुणी हा पाहिला हेही. ' रणांगणी जा सुखे राजसा परतुनि पाहू नका' ह्या गाण्याची पहिली ओळ काय आहे? ह्याची कुणीतरी लिंक देईल का?
तसेच दशरथ पुजारी, विट्ठल शिंदे, आर एन पराडकर, रतिलाल भावसार, कुंदा बोकील, उषा मराठे?(अष्टमीच्या त्या अर्ध्या राती, तुझी नि माझी जुळली प्रीती), मोहनतारा अजिंक्य, मधुबाला जव्हेरी-चावला, ज्योत्स्ना मोहिले, कान्होपात्रा किणीकर, रोशन सातारकर, सुरेश हळदणकर, श्रीपाद नेवरेकर अश्या अनेकांची गाणी अजूनही ऐकावीशी वाटतात. प्रसिद्ध गायक-गायिकांची गाणी बहुतेकांना माहीतच असतात, पण ही काहीशी दुर्लक्षित नावे.
शाहीर साबळ्यांचा दाणेदार आवाजही आवडतो.
खरे तर 'आठवणीतली गाणी' असा एक धागा पुन्हा सुरू करायला हवा.

मस्तच, माझी यादी सावकाश घरून देतो !

पण सुरुवात काही गणेशाच्या गाण्यांनी,

ओंकार स्वरूपा..
प्रथम तुला वंदितो..
अशी चीख मोत्यांची माळ..
सुखकर्ता दुखहर्ता (आरती)..

आणि एक गाणे जे मी कालच रात्री ऐकल्याने ताजे ताजे डोक्यात आहे,

पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले
- सुरेश वाडकर (गुपचुप गुपचुप)

देवा.. भयंकर काम आहे हे! तरी पण प्रयत्न करायला हरकत नाही.
निकष फक्त एकच - मला आवडणारी -

१. घन तमी शुक्र बघ राज्य करी * - लता
२. बांधले मी बांधले इंद्राचे तोरण बांधले - आशा - चित्रपट सर्वसाक्षी
३. पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी - महेंद्र कपूर
४. तू अनश्वरातील अमरेश्वर अविनाशी - कृष्णा कल्ले
५. थांब रे घना - उषा मंगेशकर
६. मी ही अशी भोळी कशी गं - आशा
७. पहिलीच भेट झाली पण ओढ ही युगांची - सुमन आणि अरुण दाते
८. प्रिया तुज काय दिसे स्वप्नात - आशा
९. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी - लता
१०. श्रावणात घननिळा बरसला - लता
११. चंदनासी परिमल आम्हां काय त्याचे - शरद जांभेकर
१२. कशी तुज समजाऊ सांग * - पं. जितेंद्र अभिषेकी
१३. तेजोनिधी लोहगोल भास्कर हे गगनराज - पं. वसंतराव देशपांडे
१४. समाधी घेऊन जाई ज्ञानदेव - सुमन
१५. नाथ हा माझा मोही खला - पं. आनंद भाटे, गायिकेचं नाव लक्षात नाही - चित्रपट बालगंधर्व
१६. जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा * - सुरेश वाडकर
१७. हे जीवन सुंदर आहे - आशा, अंजली कुलकर्णी आणि दिलीप कुलकर्णी - चित्रपट - चौकट राजा
१८. देह देवाचे मंदिर - प्रसाद सावकार (बहुतेक)
१९. लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी - कौशल आणि टीम
२०. प्रेमपिसे भरले अंगी - वाणी जयराम
२१. युवती मना दारुण रण रुचिर प्रेम ते - आशा - नाटक मानापमान

पाप लागणारे मला! अजून दोनशेक गाणी नाहीत यादीत Sad

आभार दोस्तांनो
ज्यांनी २१ गाणी पूर्ण केलीत, त्यांची यादी मी अपडेट केलीय. हा आकडाही अन्यायकारक आहे.. पण.
ज्यांनी २१ पुर्ण केली नाहीत, त्यांनी हीरा यांची गाणे आपल्या यादीत घ्यावीत. पण २१ पर्यंत यादी करावीच.

बी, सध्या मी इथेच अपडेट करतोय.. जास्त गाणी जमली तर त्याची एक्सेल फाईल करून अपलोड करेन. म्हणजे आपली गाणी शोधता येतील.

सई.. देह देवाचे मंदीर.. हे उदयराज गोडबोले यांनी गायलेय. ते प्रितीसंगम, देव दीनाघरी धावला, वर्‍हाडी माणसं.. अशा काही नाटकात संगीत भूमिका करत असत.

ज्यांनी लिंक्स दिल्या आहेत ते तर ग्रेटच लोक !

अन्जू, धुंद मधुमती हे गाणे लताच्याच आवाजात हिंदीतही आहे.. आज मिलनकी रात रे रात रे.. असे शब्द आहे. किचकवध हा चित्रपट हिंदीतही निघाला होता.
.

यादी लांबतेय खरी.. आता एक्सेल फाईलच करेन !
शेवटी आपली म्हणजे मायबोलीकरांची यादी ना ही !

@दिनेश, 'जीवाच्या जिवलगा नंदलाला रे' हे लताबाईंचे आहे का? मला वाटत होते की ते मधुबाला चावला यांचे आहे.

दिनेशदा मस्त माहीती 'आज मिलनकी रात रे' बद्दल.

ओल्या सांजवेळी- प्रेमाची गोष्ट- बेला शेंडे आणि स्वप्निल बांदोडकर.

तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला- सुरेश वाडकर, गायिका नाही माहिती.

धुंद होते शब्द सारे- चित्रपट उत्तरायण

पैजण रुणझुणले-- सुमन कल्याणपूर

मी यादीत बदल केलाय आता.
हीरा, मधुबाला चावला माझ्या नातलग आहेत.

अन्जू.. किचकवध मधेच सुधीर फडके आणि लताने गायलेले, असा नेसून शालू हिरवा.. असे एक छान गाणे आहे. तेच गाणे त्याच चालीवर हिंदीतही आहे. याच दोघांनी गायलेय. आणि पडद्यावर गोपीकृष्ण आणि हेलन आहेत बहुतेक.

http://www.youtube.com/watch?v=NItNnbwFZxY

इथे फक्त ऐकता येतेय.

हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली, धरती प्रकाशवेडी ओल्या दवात न्हाली - अनुराधा पौडवाल
सुन्या सुन्या मैफलित माझ्या - उंबरठा - लताबाई
बगळ्यांची माळ फुले अजुन अंबरात -पं वसंतराव देशपांडे
कानडा राजा पंढरीचा - पं भीमसेन जोशी
चांद मातला मातला त्याला कशी आवरु अंगी वणवा पेटला - उंबरठा - लताबाई
जंतर मंतर रातीनं चंद्राची बिंदली चोरुन नेली - सलील कुलकर्णी गायीका आठवत नाहिये
राजसा जवळी बरा बसा जीव हा पिसा तुम्हाविण बाई - लताबाई
मी रात टाकली, मी कात टाकली - लताबाई - जैत रे जैत
मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे - आशा भोसले
रिमझीम झरती श्रावणधारा धरणीच्या कलशात - सुमन कल्याणपूरकर
जीवलगा राहिले दूर घर माझे - आशा भोसले
मी मज हरपुन बसले ग, सखे मी मज हरपुन बसले ग
असा बेभान हा वारा नदीला पूर आलेला -लताबाई
जय शारदे वागेश्वरी - आशा भोसले
अखेरचा हा तुला दंडवत - लताबाई
निळ्या आभाळी कातर वेळी चांद चांदण फुलती - लताबाई
भस्म विलेपीत रुप साजिरे आणुनी या अंगणी - लताबाई
दे मला गे चंद्रिके - लताबाई
मधु मागसी माझ्या सख्यापरी - लताबाई
तिन्ही सांजा सखे मिळाल्या - लताबाई
झीणी झिणी वाजे बीन सख्यारे अनुदीनी चीज नविन - आशा भोसले
विकत घेतला श्याम बाई मी विकत घेतला श्याम - लताबाई
नभ उतरु आलं अंग झिम्माड झाल - लताबाई
लवलव करी पातं , डोळ नाही थार्‍याला - पद्मजा फेणाणी जोगळेकर
केंव्हा तरी पहाटे - पद्मजा फेणाणी

Pages