फेसबुकवर आधी १० हिंदी गाण्यांचा आणि आता १५ मराठी गाण्यांचा विषय चालू आहे. मला ती कल्पना आवडली. पण एवढ्या संख्येची मर्यादा मला जमणार नव्हतीच.
म्हणून इथे २१ मराठी गाण्यांची यादी सुरु करतोय. मला ही यादी करणे अजिबात सोपे नव्हते. लता आणि आशा यांचीच जास्त गाणी आठवतात. मग मी इथे गायक कलाकाराने, आपली गायकी जिथे सिद्ध केलीय, असा निकष लावलाय. ( तरीही २१ म्हणजे... )
ही यादी तूम्ही वाढवायची.
१) तूमची यादी आधीच्या यादीतली गाणी वगळून करायची. म्हणजे जर तूमच्या आवडीचे गाणे आधीच यादीत असेल, तर ते परत लिहायचे नाही, पण २१ गाणी लिहायची.
२) तूम्हाला हवा असेल तो निकष लावा. शक्य असेल तर तोही लिहा.. पण "माझी आवड" हा निकष महत्वाचा.
३) याच फॉर्म मधे गाणी लिहिलीत म्हणजे मुखडा - गायक कलाकार तर मी ही यादी अपडेट करत जाईन. हवे असल्याच "पसंती कळवलीय... यांनी" असे पण लिहिन.
४) ही यादी मुखड्यानुसार अकारविल्हे केलीय.. तशीच वाढवत नेईन.
५) इथे कुठलाही क्रम लावायचा नाही, फक्त अकारविल्हे हाच निकष.
तर ही यादी.. आता मोठी होत चाललीय, म्हणून एक्सेल फाईल अपलोड करतोय..
११, २१ अशा नंबरात गाणी,
११, २१ अशा नंबरात गाणी, पुस्तके बसवणे हे त्या गाण्यांच्या आणि माझ्या मानवी हक्काच्या विरोधातील गोष्ट आहे - म्हणून त्या फंदात पडणार नाही.
पण तुम्ही सर्वांनी घेतलेल्या मेहनतीचा फायदा नक्कीच झाला.
गेली चार वर्षे नवऱ्याच्या मागे माझ्या आयपॉडवर नवी गाणी घालून दे म्हणून मागे लागले होते. आणि तो तितक्याच चिकाटीने तू सगळी गाणी एकदाच लिस्ट बनवून दे म्हणून माझी विनंती, गळ , धमकी ई ई परत माझ्या कोर्टात पाठवत होता .
काल इथे सगळाच ठेवा सापडला आणि मोठ्ठी लिस्ट एकत्र गेली त्याच्या कोर्टात --- आता बसला आहे एक एक गाणे ओवीत त्या आयपॉडवर!
आता ही लबाडी आहे हे मान्य दिनेशदा, पण confess केले की गुन्हा काही गुन्हा राहत नाही -- आणि उद्या ऑफिसला जाताना मस्तपैकी गाडीत ही गाणी ऐकताना तुम्हा सर्वांना दिलसे दुवापण मिळेलच
नवऱ्याला चांगलंच कामाला
नवऱ्याला चांगलंच कामाला जुंपलं, शबाना
आवडती बरीच गाणी वरती येऊन
आवडती बरीच गाणी वरती येऊन गेलेली आहेत. ही त्यावेगळी काही:
१) गन्या मन्या तुका - अवधूत गुप्ते (चित्रपट: तुकाराम)
२) गवरीचा बाळ गे गणोबा धाकला - चंद्रकांत काळे (अल्बमः शेवंतीचं बन)
३) सरलं दळन माझी भरली ओंजळ - माधुरी पुरंदरे (अल्बमः शेवंतीचं बन)
४) आम्ही लटिके न बोलू - चंद्रकांत काळे (अल्बमः अमृतगाथा)
५) उजळ उजळल्या राजमंदिरी - माधुरी पुरंदरे (अल्बमः प्रीतरंग)
६) भरतार नव्हं माझा मखमली शेला - प्राची दुबळे (अल्बमः शेवंतीचं बन)
७) पाऊस आला - माधुरी पुरंदरे माधुरी पुरंदरे (अल्बमः साजणवेळा)
८) माझे मन तुझे झाले - विभावरी आपटे (मूळ गीत 'स्वामी' मालिकेत)
९) श्रावणातल्या सरी बांधिला झुला झुले - वीणा सहस्त्रबुद्धे
१०) आत्मरूप ओंकार - वीणा सहस्त्रबुद्धे
११) अग्गोबाई ढग्गोबाई - सलील कुलकर्णी, संदीप खरे
१२) मुंगीबाय मुंगीबाय - सलील कुलकर्णी, अंजली कुलकर्णी
१३) कुण्या देशीचे पाखरू - अनुराधा पौडवाल (काही बोलायाचे आहे)
१४) कंठात दिशांचे हार - माधुरी पुरंदरे (अल्बमः साजणवेळा)
१५) झिणी झिणी वाजे बीन - आशा भोसले (अल्बमः ऋतु हिरवा)
१६) साकार गंधार हा -आशा भोसले (अल्बमः साकार गंधार हा)
१७) मी राधिका - आरती अंकलीकर
१८) असेल कोठे रुतला काटा - आशा भोसले (आराम हराम आहे)
१९) कुणीतरी बोलवा दाजिबाला - आशा भोसले (देवमाणूस)
२०) उघड्या पुन्हा जहाल्या - शोभा गुर्टू
२१) सासुर्यास चालली लाडकी शकुंतला - सुधीर फडके
दमले वाचून! पोस्टस पण आणि
दमले वाचून! पोस्टस पण आणि एक्सेल शीट वाचून पण
जिप्सी, दंगा-धुरळा उडवलायस आवडत्या गाण्यांचा
शबाना, द्या टाळी... मलापण
शबाना, द्या टाळी...
मलापण यासाठीच सगळ्यांना कामाला लावायचे होते. प्रत्येकाची आवड निराळी असली तरी अशी यादी करायला घेतली कि आपसूक आवडत्या गाण्यांचा विचार केला जातो आणि सर्वोत्तम ( अर्थात आपल्या मते ) निवडली जातात. अशी सर्वोत्तमांची यादी म्हणजे आपल्यासाठी मेजवानीच कि !
अदीजो, वेगळीच गाणी.. उद्या
अदीजो, वेगळीच गाणी.. उद्या परवा अपडेट करतो यादी.. !
दिनेशदा ,मी गाण्याच्या लिंक व
दिनेशदा ,मी गाण्याच्या लिंक व जितके गायक शोधलेत ते दिले आहेत. मी फक्त घरी माझा व इतर सगळ्यांचे फोन मधील लिस्ट काढली आणि त्यातली माझी आवड म्हणुन जुनी नवीन अशी २३ गाणी दिली आहेत.
माधव, उत्तम लोकगीतं अदिजो,
माधव, उत्तम लोकगीतं
अदिजो, तुमचीही गाणी खुप छान आहेत..
हि जिप्स्याच्या आवडीची २१
हि जिप्स्याच्या आवडीची २१ नाट्यगीते.
१. ऋणानुबंधाच्या जिथुन पडल्या गाठी - पं. कुमार गंधर्व, वाणी जयराम - देव दिनाघरी धावला
२. हे सुरांनो चंद्र व्हा - अर्चना कान्हेरे - ययाति आणि देवयानी
३. गर्द सभोती रान साजणा - आशालता वाबगावकर - मत्स्यगंधा
४. का धरीला परदेस - बकुळ पंडित - हे बंध रेशमाचे
५. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर - पं. जितेंद्र अभिषेकी - गोरा कुंभार
६. सुरत पियाकी - पं. वसंतराव देशपांडे - कट्यार काळजात घुसली
७. विकलमन आज झुरत - बकुळ पंडित - हे बंध रेशमाचे
८. प्रिये पहा रात्रीचा समय सरूनी - छोटा गंधर्व - संगीत सौभद्र
९. उगवला चंद्र पुनवेचा - बकुळ पंडित - पाणिग्रहण
१०. नभ मेघांनी आक्रमिले - प्रभाकर कारेकर - संगीत सौभद्र
११. रे तुझ्यावाचून काही येथले - संगीत स्वरसम्राज्ञी - कीर्ती शिलेदार
१२. प्रिती सुरी दुधारी - बकुळ पंडित - पाणिग्रहण
१३. या भवनातील गीत - पं. वसंतराव देशपांडे - कट्यार काळजात घुसली
१४. मर्मबंधातली ठेव हि - - आशा भोसले - सन्यस्तखड्ग
१५. घेई छंद मकरंद - पं. वसंतराव देशपांडे - कट्यार काळजात घुसली
१६. मधु मिलनात या विलोपले मधु मिलनात या - आशा भोसले - ब्रह्मकुमारी
१७. जोहार मायबाप जोहार - बालगंधर्व - संत कान्होपात्रा
१८. शुरा मी वंदिले - आशा भोसले - संगीत मानापमान
१९. युवती मना - आशा भोसले - संगीत मानापमान
२०. देवा घरचे ज्ञात - मत्स्यगंधा - रामदास कामत
२१. काटा रूते कुणाला - पं. जितेंद्र अभिषेकी - हे बंध रेशमाचे
दिनेशदा, अजुन फक्त दोन पोस्ट टाकतो (लता मंगेशकर आणि सुमन कल्याणपूर) आणि मग रजा घेतो.
तुमचा धागा असल्याने आगाऊपणा करत आहे, त्याबद्दल क्षमस्व.
जिप्सी, नाट्यगीतांची लिस्ट
जिप्सी, नाट्यगीतांची लिस्ट एकदम मस्त.
ऋणानुबंधांच्या आणि कैवल्याच्या चांदण्याला माझे ऑल टाईम फेव्हरेट.
धन्यवाद नरेश
धन्यवाद नरेश
माझा एक छोटासा प्रयत्न १.
माझा एक छोटासा प्रयत्न
१. नकळता असे ऊन मागून येते
२. मंदिरात अंतरात तोच नांदत आहे
३. काय बाई सांगू, कसं गं सांगू
४. डौल मोराच्या मानंचा र
५. मलमली तारुण्य माझे, तू पहाटे पांघरावे
६. गुंतता हृदय हे
७. केव्हा तरी पहाटे, उलटून रात्र गेली
८. एक झोका चुके काळजाचा ठोका
९. विठू माउली तू माउली जगाची
१०. धुंद होते शब्द सारे
११. भरलं आभाळ पावसाळी पाहुणा
१२. मी गाताना गीत तुला लडिवाळा
१३. घन ओथंबून येती, बनांत राघू ओगिरती
१४. तुम्हावर केली मी मर्जी बहाल
१५. सुन्यासुन्या मैफिलीत माझ्या
१६. गंजल्या ओठांस माझ्या धार
१७. मनाला झाली कृष्ण सख्याची
१८. विकत घेतला श्याम
१९. बाई बाई मन मोराचा
२०. फिटे अंधाराचे जाळे
२१. नको देवराया अंत आता पाहू
जिप्स्या... तूझे काय दशावतार
जिप्स्या... तूझे काय दशावतार चाललेत का ? अगदी खरेच प्रयत्न कर बघू.. एक फायनल लिस्ट बनवायचा.
मला एक किस्सा आठवतोय.
लताला तुकारामांचे अभंग गायचे होते तर तिने गोनिदांना आणि शांताबाईंना १०/१२ अभंग निवडायची विनंती केली.. तर दोघांनी २५० च्या वर अभंग निवडून ठेवले. त्यातला एकही कमी करायला ते दोघे तयार नव्हते.
माझी हार्ड डिस्क घरी राहिलीय.. ती आणली कि लिस्ट अपडेट करतो.
दशावतार
दशावतार
जिप्स्या... तूझे काय दशावतार
जिप्स्या... तूझे काय दशावतार चाललेत का>>>>> दिनेशदा
, दोन अवतार अजुन बाकी आहे, ते झाले कि अवतारकार्य समाप्त करतो.

माझी लिस्ट : १. शब्दावाचुन
माझी लिस्ट :
१. शब्दावाचुन कळले सारे.
२. माझे जीवनगाणे
३. सुहास्य तुझे मनास मोही- जितेंद्र अभिषेकी
४. जय शारदे वागीश्वरी
५. राजाच्या रंगमहाली
६. चांदकेवड्याची रात
७. तारीणी नववसन धारिणी- माणिक वर्मा
८. मधुकर वनवन
९. मम आत्मा गमला - कुमार गंधर्व
१०. अजुनी रुसुनि आहे
११. पावा वनी वाजतो - बकुल पंडित
१२. विश्वाचा विश्राम रे
१३. अवचिता परीमळु- किशोरी आमोणकर
१४. गगना सुगंध आला- आरती अंकलीकर
१५. जाईन विचारीत रानफुला- किशोरी आमोणकर
१६. राम रंगी रंगले मन - श्रुती सडोलीकर
१७. तुझे गीत गाण्यासाठी
१८. नाथ हा माझा- माणिक वर्मा
१९. मला मदन भासे हा - माणिक वर्मा
२०. आनंदी आनंद गडे
२१. रम्य ही स्वर्गाहुनी लंका
जे गाणे दोन किवा आधिक गायक / गायिकानी गायिलेल त्यातील मला ज्यांचे आवडले त्यांचेच नाव लिहिले आहे. बाकीच्या गाण्यांचे गायक कलाकार सर्वाना माहित असतीलच!
ही यादी लता आशा वगळून आहे.२१
ही यादी लता आशा वगळून आहे.२१ गाणी हा अत्याचार आहे.
1. हे आदिमा हेअंतिमा = रामदास कामत
2. गोमु माहेरला जाते = जितेद्र अभिषेकी
3. तुझी चाल तुरुतुरु = जयवंत कुलकर्णी
4. एक लाजरा न साजरा = अरुण सरनाईक, उषा मंगेशकर
5. माजे राणी माजे मोगा= सुरेश वाडकर, लता
6. निर्गुणाचा संग धरिला जो = फैयाज
7. रानात सांग कानात = बबनराव नावाडीकर
8. वारियाने कुंडल हाले = गोविंद पोवळे
9. किती पांडुरंगा वाहु = ज्योत्स्ना मोहिले
10. शत जन्म शोधिताना = दिनानाथ मंगेशकर
11. विठ्ठ्लाच्या पायी = भिमसेन जोशी
12. सावळ्या विठ्ठला = सुमन
13. एकवार पंखावरुनी = सुधीर फडके
14. कशी केलीस माझी दैना = किर्ती शिलेदार
15. फड सांभाळ तुर्याला ग आला = सुलोचना चव्हाण
16. आल्या नाचत नाचत मेनका रंभा =बाळ्कराम
17. दिस नकळत जाई= अरुण दाते
18. मिलनास आपुल्या हासे धवल = स्नेहल भाटकर
19. अरे कृष्णा अरे कान्हा = शाहीर साबळे
20. भाळी अर्ध चंद्र माथी शुभ्र गंगा = विठ्ठल शिंदे
21. तु तलम अग्नीची पात = प्रभंजन मराठे
22. धीर धरी धीर धरी = पं वसंतराव देशपांडे
23. बोला अमृत बोला = ज्योत्स्ना भोळे
24. त्यांनीच छेडले ग = शोभा गुर्टु
25. वर ढगाला लागली कळ = महेंद्र कपुर, उषा मंगेशकर
शेवटचे गाणे जरी कोणास ऑड वाटले तरी मला फार आवडते ; its different.
'रानच्या पाखरा रे उगीच भेट
'रानच्या पाखरा रे उगीच भेट झाली' या उषा मंगेशकर यांच्या गाण्याची ऑडिओ लिंक कोणी पाठवू शकेल का. हे गाणं मला कुठेच सापडत नाहीये.
मस्त धागा. दोन तीन
मस्त धागा. दोन तीन प्लेलिस्टस बनवून होतील.
Pages