फेसबुकवर आधी १० हिंदी गाण्यांचा आणि आता १५ मराठी गाण्यांचा विषय चालू आहे. मला ती कल्पना आवडली. पण एवढ्या संख्येची मर्यादा मला जमणार नव्हतीच.
म्हणून इथे २१ मराठी गाण्यांची यादी सुरु करतोय. मला ही यादी करणे अजिबात सोपे नव्हते. लता आणि आशा यांचीच जास्त गाणी आठवतात. मग मी इथे गायक कलाकाराने, आपली गायकी जिथे सिद्ध केलीय, असा निकष लावलाय. ( तरीही २१ म्हणजे... )
ही यादी तूम्ही वाढवायची.
१) तूमची यादी आधीच्या यादीतली गाणी वगळून करायची. म्हणजे जर तूमच्या आवडीचे गाणे आधीच यादीत असेल, तर ते परत लिहायचे नाही, पण २१ गाणी लिहायची.
२) तूम्हाला हवा असेल तो निकष लावा. शक्य असेल तर तोही लिहा.. पण "माझी आवड" हा निकष महत्वाचा.
३) याच फॉर्म मधे गाणी लिहिलीत म्हणजे मुखडा - गायक कलाकार तर मी ही यादी अपडेट करत जाईन. हवे असल्याच "पसंती कळवलीय... यांनी" असे पण लिहिन.
४) ही यादी मुखड्यानुसार अकारविल्हे केलीय.. तशीच वाढवत नेईन.
५) इथे कुठलाही क्रम लावायचा नाही, फक्त अकारविल्हे हाच निकष.
तर ही यादी.. आता मोठी होत चाललीय, म्हणून एक्सेल फाईल अपलोड करतोय..
जिप्स्या, हे नाही चालायचं..
जिप्स्या, हे नाही चालायचं.. हवं तर डू आय घे.. ( "श्लोक" कसा वाटतोय ? )
उषा मंगेशकरची.. १) तू नसता मजसंगे, वाट ही उन्हाची २) पाण्याहून सांजवेळी जात होते घरी ३) चांदणं टिपूर, हलतो वारा... आवडीची नाहीत का तू़झी ?
रायबागान.. डूप्लिकेट होती ती वगळलीत.. पण भिमरावांची गाणी फक्त तूम्हीच कळवली आहेत.
आता यादी परत अपडेट करतोय.
अखेरचा हा तुला दंडवत - लता
सई, अगदी अगदी. शांकली/अंजू,
सई, अगदी अगदी.
शांकली/अंजू, "ससा तो ससा" हे उषा मंगेशकर यांनीच गायलंय.
उषा मंगेशकरची.. १) तू नसता मजसंगे, वाट ही उन्हाची २) पाण्याहून सांजवेळी जात होते घरी ३) चांदणं टिपूर, हलतो >>>दिनेशदा लिहिलीत कि वर लिस्टमध्ये.
३ गाणं चित्रपटातलं म्हणुन नाही लिहिलं. 
असं काही नाही रे,
असं काही नाही रे, चित्रपटातलीही लिहिलेली चालतात. ~
सगळ्यांची मिळून जी यादी झालीय, ती परत परत वाचताना मला मात्र खुप आनंद मिळतोय.
चंदनासी परीमळ.. शरद जांभेकरांनी गायलंय का, मला ते प्रभाकर कारेकरांच्या आवाजात ऐकल्यासारखे वाटतेय.
१. ऊठा गुरुराया जाहला अरुणोदय
१. ऊठा गुरुराया जाहला अरुणोदय आता -
२. विटेवरी ठेला माझा
३. जगत मी आलो असा की
४. दीप घेऊनिया धुंडीती अंधार
५. बनात आली बहार पिवळी
६. आली दिवाळी आली
७. चांदण्याचे हात राजा
८. हे पान तिखट मघईचे
९. दुभंगून जाता जाता
१०. आता तरी पुढे हाच उपदेश
११. मनातल्या त्या भावकळीचे
१२. कोकिळे जा दूर
१३. अंधारल्या मनाला मज टाळता न आले
१४. लाविशी का वेड मजला
१५. आली शुभदा दीपावली
१६. पंढरीची ती पताका
१७.
दा मी लिहिलेली शेवटची दोन
दा मी लिहिलेली शेवटची दोन गाणी लिस्ट मधे दिसत नाहीत. ती पण टाकाल का प्लिज .२१ च लिमिट असेल तर दुसर्या कोणाच्याही लिस्ट मधे टाका.
हो जिप्सी, तुझं बरोबर आहे.
हो जिप्सी, तुझं बरोबर आहे. ससा तो ससा -- उषा मंगेशकर ( आठवणीतील गाणी मध्ये जाऊन बघितलं आणि त्याआधी नवरा पण म्हणाला उषा मंगेशकर ह्यांचे आहे ).
हो जिप्सी, तुझं बरोबर आहे.
हो जिप्सी, तुझं बरोबर आहे. ससा तो ससा -- उषा मंगेशकर>>>>हो अन्जू, माझ्याकडे आहे हे गाणं त्यामुळेच ठामपणे सांगु शकलो.

माझ्याकडे अनुराधा पौडवालने
माझ्याकडे अनुराधा पौडवालने गायलेलं आहे.
माझ्याकडे ते आशाबाईंच्या
माझ्याकडे ते आशाबाईंच्या आवाजातलं होतं.
आणि आणखी एक गाणं - 'सखी मंद झाल्या तारका'.. हे बाबूजी आणि भीमसेन जोशी या दोघांनी गायलेलं होतं माझ्याकडे...
हि जिप्स्याच्या आवडती लता
हि जिप्स्याच्या आवडती लता मंगेशकर यांनी गायलेली २१ गाणी
१. सावर रे सावर रे, उंच उंच झुला - लता मंगेशकर
२. घन तमी शुक्र बघ राज्य करी - लता मंगेशकर
३. भावनांचा तु भुकेला रे मुरारी - लता मंगेशकर
४. सरणार कधी रण प्रभो तरी हे - लता मंगेशकर
५. कसे कसे हासायचे आहे मला - लता मंगेशकर
६. अनाम वीरा जिथे जाहला तुझा जिवनान्त - लता मंगेशकर
७. जीर्ण पाचोळा पडे तो उदास - लता मंगेशकर
८. कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला - लता मंगेशकर
९. असा बेभान हा वारा - लता मंगेशकर
१०. माझ्या सारंगा राजा सारंगा - लता मंगेशकर
११. रंगा येई वो - लता मंगेशकर
१२. मेंदीच्या पानावर मन अजुन झुलते ग - लता मंगेशकर
१३. माझी न मी राहिले तुजला नाथा सर्व वाहिले - लता मंगेशकर
१४. दे मला गे चंद्रिके प्रीती तुझी - लता मंगेशकर
१५. तिन्हीसांजा सखे मिळाल्या - लता मंगेशकर
१६. अवचिता परीमळु, झुळकला अळुमाळु - लता मंगेशकर
१७. आज उदास उदास दूर - लता मंगेशकर
१८. घन ओथंबून येती - लता मंगेशकर
१९. कशी काळ नागिणी सखे ग - लता मंगेशकर
२०. पैल तो गे काऊ कोकताहे - लता मंगेशकर
२१. बाळगु कशाला व्यर्थ कुणाची भिती - लता मंगेशकर
माझ्याकडे ते आशाबाईंच्या
माझ्याकडे ते आशाबाईंच्या आवाजातलं होतं. >>>>>शांकली मी उषा मंगेशकरांच्याच आवाजात ऐकल आहे.
- 'सखी मंद झाल्या तारका'.. हे बाबूजी आणि भीमसेन जोशी या दोघांनी गायलेलं होतं माझ्याकडे...>>>>हो हे गाणं दोन्ही आवाजात माझ्याकडे आहेत.
जिप्स्या, तुझ्याकडच्या
जिप्स्या, तुझ्याकडच्या गाण्यांच्या कलेक्षन करता एक दिवस (सॉरी एक दिवस नाही, बर्याच वेळा) धाड घालण्यात येणार आहे.
अनुराधा पौडवाल यांनी गायलेली
अनुराधा पौडवाल यांनी गायलेली जिप्स्याच्या आवडीची २१ गाणी.
१. रजनीगंधा जीवनी या बहरूनी आली
२. सजना कशासी अबोला
३. बेभान या रात्री बेबंध झाले रे
४. का हासला किनारा पाहुनि धुंद लाट
५. डोळ्यावरूनी माझ्या उतरूनी रात्र गेली
६. रसिका मी कैसे गाऊ गीत
७. अनुरागाचे थेंब झेलती प्रीतलतेची पाने
८. चंद्र वाटेवरी एकटा चालतो, चालता खुणावुन का हासतो
९. कुण्या देशीचे पाखरू माझ्या अंगणात आले
१०. हे सावळ्या घना
११. पाऊस कधीचा पडतो
१२. मी वार्याच्या वेगाने आले
१३. प्रिया साहवेना आता एकलेपणा
१४. हसले फसले हरवून मला बसले
१५. ओलेत्या पानात सोनिया उन्हात भरूनी मेघ आले
१६. कुहु कुहु कुहु येइ साद
१७. चांदण्यात झुलतो बाई गंध मोगरा
१८. माझ्या मातीचे गायन
१९. बंदिनी स्त्री ही
२०. प्रिया आज आले मैफलीत माझ्या
२१. गीत हे गाशील तेंव्हा
जिप्स्या, तुझ्याकडच्या
जिप्स्या, तुझ्याकडच्या गाण्यांच्या कलेक्षन करता एक दिवस (सॉरी एक दिवस नाही, बर्याच वेळा) धाड घालण्यात येणार आहे.>>>>शांकली, कधीही

वर लिहिलेली सगळीच गाणी संग्रही आहेत.
दिनेशदा, Excel Sheet बनवण्याच काम भारी केलंत. आता जी जी गाणी नाहीत त्याच्या शोध घेता येईल/मागवता येतील.

१. तूच कर्ता आणि करविता, शरण
१. तूच कर्ता आणि करविता, शरण तुला भगवंता
२. जीवनात ही घडी अशीच राहुदे
३. तिन्ही सांजा सखे मिळाल्या
४. राजाच्या रंग म्हाली..
५. सुर्व्या आला तलपून गेला
६. माल्याच्या मल्यामंदी पाटाचं पानी जातं
७. सखी गं मुरली मोहन मोही मना
८. पैठणी बिलगुन म्हणते मला
१०. जिवलगा कधी रे येशील तू
११ आज कुणीतरी यावे, ओळखिचे व्हावे
१२ कशी करू स्वागता
१३ प्रथम तुज पाहता
१४ जीवलगा राहिले रे
१५ ये रे घना ये रे घना
१६ रेशमाच्या रेघांनी
१७ तुला पाहते रे तुला पाहते
१८ नाच नाचुनी अति मी दमले
१९ विकत घेतला श्याम
२० डौल मोराच्या मानंचा रं..
२१ मानसीचा चित्रकार तो
२२ त्या फुलांच्या गंधकोषी
२३ हे सावळ्या घना
२४ जाहल्या काही चुका
२५ या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे
२६ मृदुल करांनी छेडित तारा
२७ हे हात असे जुळलेले, हे नेत्र असे खीळलेले
२७ शब्द शब्द जपुन ठेव बकुळिच्या फुलांपरी
२८ चंद्र आहे साक्षीला (पान जागे फूल जागे)
२९ मल्मली तारुण्य माझे
३० हे चांदणे सुरांनी शिंपीत रात आली
३१ एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात
३२ तुझे गीत गाण्यासाठी
३३ हसलीस एकदा भिजल्या श्रावण राती...
३४ मी डोलकरं डोलकरं...
माझी आवड मराठी लोकगीतांपुरतीच
माझी आवड मराठी लोकगीतांपुरतीच मर्यादित ठेवतोय.
१. आधी गणाला रणी आणला - पारंपारीक - नांदी
२. नाचतो डोंबारी ग नाचतो डोंबारी - सुलोचना चव्हाण - डोंबारी गीत
३. देव पावलाय देव माझा मल्हारी - शाहीर साबळे
४. कळीदार कपुरी पान - सुलोचना चव्हाण - बैठकीची लावणी
५. बुगडी माझी सांडली गं - आशा - लावणी
६. भरजरी ग पितांबर दिला फाडून - आशा - जात्यावरची ओवी
७. एकवीरा आई -??? - कोळीगीत
८. घनःश्याम सुंदरा - लता, पंडीतराव नगरकर - भुपाळी
९. सुंबरान मांडलं रं - ??? - धनगर गीत
१०. माझे माहेर पंढरी - भिमसेन जोशी - अभंग
११. मल्हार वारी - शाहीर साबळे (अजय अतुल नव्हे)
१२. गणा धाव रे - शाहीर साबळे - बाल्या
१३. अनादी निर्गुण प्रकटली भवानी - ??? - जोगवा
१४. विंचू चावला - शाहीर साबळे - भारुड
१५. भवानी आई रोडगा वाहीन तुला - शाहीर साबळे - भारुड
१६. नाच गं घुमा - उशा, पुष्पा पागधरे - मंगळागौरी
१७. फु बाई फु फुगडी फु - विठ्ठल उमप -
१८. खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी - छगन चौगुले - वाघ्या मुरळी
१९. गोंधळ मांडीला गं - बाळू शिंदे - गोंधळ
२०. भलगरी दादा भलं रं - पुंडलीक फरांदे - शेतकरी गीत
२१. बिकट वाट वहीवाट नसावी - ??? - पटका
सिनी, २१ चा निकष लावला होता.
सिनी, २१ चा निकष लावला होता. ज्यांनी तो पुर्ण केला नाही, त्यांना विपू करा आणि ही गाणी त्यांना घ्यायला सांगा त्यांच्या यादीत
जिप्स्या.. डू आय घे रे !
शांकली, रिपिट झालेली गाणी वगळून यादी केलीय.. आता खरे तर प्रत्येकाने ती फाईल अपडेट करून लोड करावी असे वाटतेय. म्हणजे रिपीट होणार नाहीत गाणी.
माधव, काही गाणी साबळ्यांचीच आहेत. नाचतो डोंबारी मधे कृष्णा कल्लेचा पण आवाज आहे. हे गाणे रंगल्या रात्री अशा किंवा केला इशारा जाता जाता मधले आहे.
आशाने जयवंत कुलकर्णीसोबतही एक छान डोंबारी गीत गायलेय.. थुई थुई तालावरती डोंबारीण नाचली, कशी मैना गालामधी लाजली, खुदकन हसली असे शब्द आहेत.
तिचेच एक वाघ्या मुरळी गीत पण आहे... नाचे मुरळी नाचे थुई थुई नाचे मुरळी, अगं मुरळी गं.. सोबत कुलकर्णीच आहेत असे वाटतेय.
विंचू चावला मधले संवाद बहुतेक राजा मयेकरांनी सादर केलेत, पण त्यांचे नाव कधी घेतले जात नसे.
ही सर्व गाणी, कामगार सभेत वाजत असत.
जिप्स्या काही ऐकत नाही
जिप्स्या काही ऐकत नाही दिनेशदा यांचे.
दिनेश, हो नाचतो डोंबारीत
दिनेश, हो नाचतो डोंबारीत कृष्णा कल्ले पण आहे. दुसरा आवाज कुणाचा ते आठवत नव्हते मला. आणि हो ते 'केला इशारा जाता जाता' मधले आहे. त्यातल्या सवाल - जवाबाच्या लावण्या पण भारी आहेत - नेहमीच्या लावण्यांपेक्षा खूप वेगळ्या.
जिप्स्या.. डू आय घे रे
जिप्स्या.. डू आय घे रे !>>>>>दिनेशदा, मग भरपूर डू आय घ्यावे लागतील.
त्यापेक्षा तुम्हीच सवलत द्या मला. 
माधव, मस्त लिस्ट
दा, माळ्याच्या मळ्यामंदी हे
दा, माळ्याच्या मळ्यामंदी हे गाणं आलंय आधी. मी माल्याच्या मल्यामंदी असं लिहिलंय...प्लीज ते माझं डिलीट कराल का?
मला वाटतं मला पण डू आयडी घ्यावे लागणार... कारण आज दिवसभर डोक्यात गाणीच गाणी घोळत होती!!
दिनेशदा माझ्या यादीमधील काही
दिनेशदा माझ्या यादीमधील काही गाणी राहीली आहेत बहुधा. राहिलेल्या आणि नविन गाण्यांची यादी देते आहे खाली.
माउली माउली रूप तुझे - अजय गोगावले
धुंद मधुती रात रे - लता मंगेशकर
चिन्मया सकल ह्र्दया - आनंद भाटे
लाभले आम्हास भाग्य (मराठी अभिमान गीत) - अनेक गायक आहेत
परवरदिगार परवरदिगार - शंकर महादेवन, आनंद भाटे
त्या तिथे पलीकडे तिकडे - मालती पांडे
जे वेड मजला लागले - सुधीर फडके, आशा भोसले
कबीराचे विणतो शेले - माणिक वर्मा
भरजरी गं पीतांबर दिला फाडून - आशा भोसले
देव जरी मज कधी भेटला - आशा भोसले
पांडुरंग कांती - आशा भोसले
चिंता क्रोध मागे सारा - उषा मंगेशकर (???)
एकला नयनाला विषय तो जाहला - बालगंधर्व
राजसा जवळी जर बसा - लता मंगेशकर
ने मजसी ने परत मातृभूमीला - लता मंगेशकर, उषा मंगेशकर, ह्रदयनाथ मंगेशकर, मीना मंगेशकर
दिनेशदा, फार छान उपक्रम हाती
दिनेशदा, फार छान उपक्रम हाती घेतलाय.
२१ गाणी पुर्ण करतो माझी.
२१ गाणी पुर्ण करतो माझी. मिक्स मूड मधील आहेत.
(सर्वांचेच गायक मला माहीत नाहीत, कधी शोधावेसेही वाटले नाही, गूगाळावे लागेल)
सुरुवात गणपतीच्या मंगलगाण्यांपासून..
१) ओंकार स्वरूपा.. - सुरेश वाडकर
२) प्रथम तुला वंदितो.. -
३) गजानना श्री गणराया, आधी वंदू तुझ मोरया..
४) अशी चीख मोत्यांची माळ..
५) सुखकर्ता दुखहर्ता (आरती)..
६) अष्टविनायका तुझा महिमा कसा.. (पहिला ते आठवा सारेच गणपती.. एकूणच अल्टीमेट सॉंग!)
७) उघड दार देवा आता, उघड दार देवा .. (हे गाणे ऐकताना बरेचदा मला हिंदीतील ‘ए मालिक तेरे बंदे हम’ आठवते. ते ही प्रचंड आवडीचे)
८) पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले.. (कमालीचे हळूवार रोमॅंटीक गाणे, चित्रपट - गुपचुप गुपचूप) - सुरेश वाडकर
९) आश्विनी, ये ना .. (लहानपणीची आठवण पण आजही मूड हसरा करून जाते हे गाणे, चित्रपट - गंमत जंमत)
१०) आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे - सुनिधी चौहान (मराठीतील एक रॉकींग गाणे, तेव्हा दुर्मिळच असायचे, आणि विशेष म्हणजे माझ्या हिंदीभाषिक मित्रांनाही आवडायचे.
११) कधी तू .. चित्रपट - मुंबई-पुणे-मुंबई (हे गाणे ऐकताना मला शाहरूख आठवतो)
१२) जुळून येती रेशीमगाठी मालिकेचे टायटल ट्रॅक
१३) बेधुंद मनाची लहर मालिकेचे टायटल ट्रॅक
१४) दमलेल्या बाबाची कहाणी (फार कमी वेळा ऐकतो मी हे गाणे.. उगाचच डोळ्यातून पाणी काढते म्हणून)
१५) निंबोनीच्या झाडामागे, चंद्र झोपला ग्ग बाई .. (जगात यापेक्षा भारी अंगाई गीत बनणे अशक्य)
१६) कोंबडी पळाली (हिंदितल्या मुंगडा गाण्यासारखे विक्रमी गाणे)
१७) हि पोळी साजूक तुपातली, हिला म्हावर्याचा लागलाय नाद..
१८) हि सुरेखा, आपल्याला पटलेली हाय.. (या एका ओळीसाठी आणि तिच्या आधीच्या कडव्यासाठी अक्खे गाणे आवडते, पुन्हा पुन्हा ऐकतो. चित्रपट - दुनियादारी)
१९) या कोळीवाड्याची शान, आई तुझे देऊळ .. (मी कोळी नसूनही हे गाणे ऐकताना मला कोळी असल्यासारखे आणि त्याचा अभिमान असल्यासारखे जाणवते.. ‘आई’ या शब्दातील जादू बहुधा)
२०) ढिपाडी ढिपांग ढिचीपाडी ढिपांग इडीबाडी ढिचीबाडी ढिपांग ..
२१) टिक टिक वाजते डोक्यात (सई ताम्हाणकर) - ज्या दिवशी हे ऐकले त्या दिवसापासून आजवर असलेली माझी रिंगटोन
धाग्याबद्दल धन्यवाद !
कालच लागलेला दुनियादारी झी
कालच लागलेला दुनियादारी झी टॉकीजवर दोन सीन तरी बघीतले जातातच ,मधुनच पाहीला तरी.
छान आहे लिस्ट तुमची.तुमची लिस्ट पाहुन मलाही अजुन गाणी आठवत आहेत जसे की चित्रपटातले मानसी चे रिक्शावाला, वादळवाट सिरियलचे टायटल सॉंग,एलतीगो चे सचिन यांनी गायलेले,आणि जय मल्हारचेही गाणे आवडते.
माझी लिस्ट मधली शेवटची गाणी कुणीतरी घ्या!!! कुणालाच फ्रेश -हॅपी जर्नी मधले आवडत नाही. पियु ला लिस्ट करायला सांगा दिनेशदा . ती घेईल कदाचित.
दिनेशदा त्यापेक्शा असा रुलच काढा .प्रत्येकाने इथे प्रत्येक प्रतीसादात कमीत कमी दोन गाणी लिहिणे कंपलसरी. :फिदी:(हा विनोद आहे.पण सिरियसली घ्यायला हरकत नसावी.)
सिनी रिक्षावाला माझेही आवडते,
सिनी रिक्षावाला माझेही आवडते, पण २१ इझ द लिमिट, ते ही सर्वच परकारची आवडीची गाणी. तरी आधीच्या प्रतिसादांमुळे जुनी गाणी अशी तशी कव्हर होणारच म्हणून ती विचारात घेतली नाहीच.
मला काय बरं वाटतंय का, २१ हा
मला काय बरं वाटतंय का, २१ हा आकडा लिहायला ? पण असा विचार करताना ही गाणी मनात रुंजी घालतात त्याने किती आनंद मिळतो ना !
जिप्स्या, समज तूला २१ च गाणी निवडायची असतील तर कुठली निवडशील ? बघ ना प्रयत्न करून.
शांकली, ते सुधारतो आता ! बाकी पैठणी बिलगून म्हणते मला साठी दाद द्यावी तितकी थोडीच. काय आवाज फिरवलाय आशाने त्यात ! त्याच धर्मकन्या चित्रपटात, देव नाही जेवलेला असे एक अतिसुंदर गाणे आहे, ऐकले का ?
ऋन्मेऽऽष.. ही यादी मुखडा-
ऋन्मेऽऽष.. ही यादी मुखडा- गायक कलाकार अशी लिहिणार का प्लीज.. म्हणजे मला यादी अपडेट करता येईल.
येस्स दा, धर्मकन्या मधली सगळी
येस्स दा, धर्मकन्या मधली सगळी गाणी म्हणजे... शब्द नाहीत माझ्याकडे! नेमकं हेच गाणं काल आठवत नव्हतं
Pages