माझी आवड - २१ मराठी गाणी

Submitted by दिनेश. on 24 November, 2014 - 09:10

फेसबुकवर आधी १० हिंदी गाण्यांचा आणि आता १५ मराठी गाण्यांचा विषय चालू आहे. मला ती कल्पना आवडली. पण एवढ्या संख्येची मर्यादा मला जमणार नव्हतीच.

म्हणून इथे २१ मराठी गाण्यांची यादी सुरु करतोय. मला ही यादी करणे अजिबात सोपे नव्हते. लता आणि आशा यांचीच जास्त गाणी आठवतात. मग मी इथे गायक कलाकाराने, आपली गायकी जिथे सिद्ध केलीय, असा निकष लावलाय. ( तरीही २१ म्हणजे... )

ही यादी तूम्ही वाढवायची.

१) तूमची यादी आधीच्या यादीतली गाणी वगळून करायची. म्हणजे जर तूमच्या आवडीचे गाणे आधीच यादीत असेल, तर ते परत लिहायचे नाही, पण २१ गाणी लिहायची.

२) तूम्हाला हवा असेल तो निकष लावा. शक्य असेल तर तोही लिहा.. पण "माझी आवड" हा निकष महत्वाचा.

३) याच फॉर्म मधे गाणी लिहिलीत म्हणजे मुखडा - गायक कलाकार तर मी ही यादी अपडेट करत जाईन. हवे असल्याच "पसंती कळवलीय... यांनी" असे पण लिहिन.

४) ही यादी मुखड्यानुसार अकारविल्हे केलीय.. तशीच वाढवत नेईन.

५) इथे कुठलाही क्रम लावायचा नाही, फक्त अकारविल्हे हाच निकष.

तर ही यादी.. आता मोठी होत चाललीय, म्हणून एक्सेल फाईल अपलोड करतोय..

maajhee aavaD 21 gaaNee_1.xls (76.5 KB)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शुभांगी, विकत घेतला श्याम.. आशा आणि सुधीर फडके.. मला २ गाणी वगळावी लागली Sad २१ पेक्षा जास्त झाली म्हणून.

दिनेश दा ,आवड कशी कळवायची?. माझी आधीच आशाजींच्या गाण्यांना आवडलेली समजा .

दा २३ गाणी झाली चालतील ना. अजुन आहेत नंतर तिथेच लिहायची का?

धुंद होते शब्द सारे-- गायक रविंद्र बिजूर.

जीव दंगला, रंगला, गुंगला हे एजेनी दिलेच आहेत गायक्-गायिका.

कधी तू रिमझिम झरणारी बरसात--- गायक ऋषिकेश रानडे.

अजूनी रुसून आहे - कुमार गंधर्व
आज अचानक गाठ पडे - कुमार गंधर्व
मम आत्मा गमला हा, नकळत न वळत हृदय तळमळत, भेटाया ज्या देहा - कुमार गंधर्व
प्रभू अजी गमला मनी तोषला - कुमार गंधर्व
कोणा कशी कळावी वेडात काय गोडी - कुमार गंधर्व
ॠणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी - कुमार गंधर्व, वाणी जयराम
दारी उभी अशी मी, गेली निघून रात - प्रभा अत्रे
जिथे सागरा धरणी मिळते - सुमन कल्याणपुर
केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर - सुमन कल्याणपुर
नाविका रे - सुमन कल्याणपुर
शब्द शब्द जपून ठेव - सुमन कल्याणपुर
एकदाच यावे सखया तुझे गीत कानी - सुमन कल्याणपुर
मृदुल करांनी छेडीत तारा - सुमन कल्याणपुर
सावलीस का कळे उन्हामधील यातना - लता मंगेशकर
घनु वाजे घुणघुणा वारा वाहे रुणझुणा - लता मंगेशकर
रुणुझुणु रे भ्रमरा - लता मंगेशकर
या कातरवेळी पाहिजेस तू जवळी - मालती पांडे
भय इथले संपत नाही - हृदयनाथ मंगेशकर
नवल वर्तले गे माये - आशा भोसले
कंठातच रुतल्या ताना , कुठे गं बाई कान्हा - अशा भोसले
ही कुणी छेडिली तार प्राजक्ताच्या मधुगंधासम कुठुनी ये केदार - आशा भोसले, वसंतराव देशपांडे
या भवनातील गीत पुराणे - वसंतराव देशपांडे
जरी या पुसून गेल्या - रंजना पेठे जोगळेकर
तोडिता फुले मी सहज पहिला जाता- सुधीर फडके
स्वामिनी निरंतर माझी - सुधीर फडके
तव नयनांचे दल हलले गं - रवींद्र साठे
सजल नयन नितधार बरसती - अजित कडकडे
····
काही गाणी रिपीट होतील म्हणून लिहिली नाहीत. अजून बरीचं आहेत वेळ मिळेल तशी टाकेन

गाण्याचे सोने करण्यात गायकाचा जितका वाटा तितकाच गीतकाराचा आणि त्याहून किंचित अधिक संगीतकाराचा! त्यामुळे ही माझी यादी गीतकार, संगीतकारासकट! क्रमाला अर्थातच महत्व नाही कारण सुचली तशी लिहिली आहेत. चुकून २२ गाणी झाली आहेत पण कोणतंच खोडावसं वाटत नाहीये! लिहिताना/लिहिल्यावर जाणवलं की ही अशी यादी हिंदीत करणं शक्यच नाही मला! अर्थात मराठीत देखील अन्याय झालाय Sad ह्यापेक्षा गायक-गीतकार-संगीतकार अशी १० कॉम्बीनेशनस् आणि त्या प्रत्येक कॉम्बीनेशनची आवडती पाच असं करून पाहायला पाहिजे!

१. गगन सदन तेजोमय - लता मंगेशकर- वसंत बापट- हृदयनाथ मंगेशकर
२. पाण्यातले पाहता प्रतिबिंब - आशा भोसले - गंगाधर महांबरे- श्रीनिवास खळे
३. तुला पाहिले मी - सुरेश वाडकर-ग्रेस- श्रीधर फडके
४. पराधीन आहे जगती - सुधीर फडके-गदिमा, सुधीर फडके
५. सर सुखाची श्रावणी- बेला शेंडे-अभिजीत सावंत-गुरु ठाकूर-निलेश मोहरीर
६. आरसा फितूर झाला- माधुरी करमरकर - श्रेयसी वझे- मंदार आपटे
७. आताशा असे हे - सलील कुलकर्णी-संदीप खरे-सलील कुलकर्णी
८. भय इथले संपत नाही- लता मंगेशकर - ग्रेस - हृदयनाथ मंगेशकर
९. माघ मास पडली थंडी - आशा भोसले - गदिमा- सुधीर फडके
१०. एकवार पंखावरूनी - सुधीर फडके -गदिमा-सुधीर फडके
११. हृदयी प्रीत जागते - आशा भोसले - गदिमा-सुधीर फडके
१२. जाईन विचारीत रानफुला- किशोरी आमोणकर - शांता शेळके - हृदयनाथ मंगेशकर
१३. जयोस्तुते श्री महन्मंगले - लता मंगेशकर - स्वा. सावरकर - मधुकर गोळवलकर
१४. या सुखांनो या - आशा भोसले - गदिमा- सुधीर फडके
१५. कळले तुला काही - लता मंगेशकर-शांता शेळके - हृदयनाथ मंगेशकर
१६. काय बाई सांगू - उषा मंगेशकर - शांता शेळके - हृदयनाथ मंगेशकर
१७. मन लोभले मनमोहने - पं. जितेंद्र अभिषेकी - सुधीर मोघे - राम फाटक
१८. एकाच ह्या जन्मी जणू - आशा भोसले - सुधीर मोघे - सुधीर फडके
१९. ने मजसी ने - लता, उषा, मीना, हृदयनाथ मंगेशकर - स्वा. सावरकर - हृदयनाथ मंगेशकर
२०. श्रावणात घन निळा - लता मंगेशकर- मंगेश पाडगांवकर - श्रीनिवास खळे
२१. तिनीसांजा सखे मिळाल्या - लता मंगेशकर - भा. रा. तांबे - हृदयनाथ मंगेशकर
२२. आज कुणीतरी यावे - आशा भोसले - गदिमा- सुधीर फडके

@शुभांगी &विरोचन, गाण्यांची निवड आवडली.
कितीतरी गाणी राहिली आहेत. आवडल्यास आणि अजूनही अनुल्लेखित असल्यास आपापल्या यादीत टाकावी.
काहो धरिला मजवरी राग.- आशा भोन्सले., अजून नाही जागी राधा-सुमन कल्याणपुर, ते फूल पदी वाहीन मी-कांचनमाला बढे, सोनियाचा हरिण सखे पाहिला वनी-माणिक वर्मा, प्रीत माझी चालतिया पंढरीची वाट-उषा मंगेशकर्,सखी शेजारिणी तू हसत राहा-(रतिलाल भावसार?), हृदयी वसंत फुलताना, अंगणी गुलमोहर फुलला, बहरला पारिजात दारी,मानसी राजहंस पोहतो, श्रीरंगा कमला कांता, अप्सरा आली, आता वाजले की बारा,ऊठ मुकुंदा सरली रात,घनघन माला नभी दाटल्या, उमा म्हणे यज्ञी माझे जळाले माहेर्,गोकुळात ग कृष्ण नांदतो अति आनंदानं (शा. साबळे), दूर आर्त सांग कुणी छेडिली आसावरी,टप टप काय बाहेर वाजतंय ते पाहू,रात्र काळी घागर काळी, वसुदेव निघाले नंदघरी, इथेच आणि या बांधावर,नयनात तुझ्या सखी सावन का?, कशी सरली रात सखे प्रणययामिनी, मी मनात हसता प्रीत हसे,आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे, अंधारच मज हवा काजवा उगा दावितो दिवा, दळिता कांडिता तुज गाईन अनंता, नंदाघरी नंदनवन फुलले, माझिया नयनांच्या कोंदणी, , देवा तुझ्या दारी आलो मोरया मोरया, दे कंठ कोकिळे मला,रुसली राधा रुसला माधव रुसले गोकुळ सारे,आल्या आल्या धारा संगे पावसाच्या धारा, मनी माझिया नटले गोकुळ, मनात माझ्या भलते नाही, करू देत शृंगार सख्यांनो, कळा ज्या लागल्या जीवा, स्वकुलतारकसुता,(माणिक वर्मा), जोहार मायबाप जोहार(बालगंधर्व), उपवनी गात कोकिला (हिराबाई), नरवर कृष्णासमान(बालगंधर्व),रजनीनाथ हा नभी उगवला(छोटा गंधर्व)
उगीच का कांता गांजिता (अब्दुल करीम खाँ),जय गंगे भागीरथी(प्रसाद सावकार),मोठ्ठं मोठ्ठं डोळं तुझं, जाळीमंदी पिकली करवंदं, स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकात केव्हा, चांद मोहरे चांदणे झरे, चांद माझा हा हासरा,श्याम मी भ्याले घन बघुनी(इंदुमती पैंगणकर), अजुनी रुसून आहे,आली हासत पहिली रात,
गाणी हा वुईक-पॉइंट. त्यामुळे अक्षरशः शेकडो आठवतात. सगळी आवडीची. आणि आता तर या धाग्यामुळे मधमाश्यांचे मोहोळ डिवचावे तसे झालेय.
धन्यवाद दिनेश,

हीरा, माझेही अगदी तसेच झालेय.. २१ गाणी निवडणे खरेच कठीण आहे. तरी मी प्रत्येकाची २१ गाणी निवडून मुख्य यादी करतोय.. आपल्याकडे उत्तम मराठी गाण्यांचा संग्रह होतोय.
सतरी अजून काही जणांची २१ गाणी व्हायची आहेत.. ती आली तर एक्सेल फाईलच इथे डकवेन.
नाहीतर सई म्हणाली तशी यादी पार तळाला जाईल.

मूळ यादीत काही गाणी रिपीट झालीत, ती वगळतोच. शिवाय त्यात काही तपशीलाच्या चूका असतील तर त्याही सांगा.

रायबागान... २१ लिहा बरं !
आता २०२ गाणी झालीत.

भय इथले, हृदयनाथांनी पण गायलेय का ? मी फक्त लताच्याच आवाजातले ऐकलेय.

आता रिपीट झालेली गाणी वगळून एक्सेल फाईल केलीय. तिच अपलोड करतो.

दिनेशदा, माझी बहुतेक आवडती गाणी वरील यादीत आहेत. जर त्यांचा समावेश करता आला तरचं २१ ची यादी पुर्ण होऊ शकेल नाहीतर कठिण आहे

तुझे रूप चित्ती राहो - सुधीर फडके
पांडुरंग कांती - आशा भोसले
अवचिता परिमळू - लता मंगेशकर
मोगरा फुलला - लता मंगेशकर
का रे दुरावा का रे अबोला - आशा भोसले
धुंद मधुती रात रे - लता मंगेशकर
गर्द सभोती रान साजणी - आशालता वाबगावकर(?)
सांग तू माझा होशील का - आशा भोसले
प्रेमा काय देऊ तुला - लता मंगेशकर
ह्रदयी वसंत फुलताना - सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, सचिन पिळगावकर, सुहासिनी
अप्सरा आली - बेला शेंडे
खेळ मांडला - अजय गोगावले
नटरंग उभा - अजय, अतुल
लटपट लटपट तुझं चालणं - लता मंगेशकर
सुंदरा मनामधे भरली - जयराम शिलेदार
एकाच या जन्मी जणू - आशा भोसले
सांज ये गोकुळी - आशा भोसले
बाई बाई मनमोराचा - लता मंगेशकर
रात्रीस खेळ चाले या गूढ सावल्यांचा - महेंद्र कपूर
छबीदार छबी - उषा मंगेशकर
विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती - ज्ञानेश्वर मेश्राम
घेई छंद मकरंद - वसंतराव देशपांडे
माउली माउली रूप तुझे - अजय गोगावले
चिन्मया सकल ह्र्दया - आनंद भाटे
लाभले आम्हास भाग्य (मराठी अभिमान गीत) - http://en.wikipedia.org/wiki/Marathi_Abhimaangeet
परवरदिगार परवरदिगार - शंकर महादेवन, आनंद भाटे

आठवतील तशी अजून लिहिन.

१) अरे मनमोहना - आशा भोसले.
२) अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला - आशा भोसले.
३) आज प्रितीला पंख हे लाभले रे - आशा भोसले.
४) आला आला वारा - अनुराधा पौडवाल.
५) ऐरणीच्या देवा तुला - लता मंगेशकर.
६) कशी नशिबानं थट्टा आज मांडली - सुधीर फडके.
७) काळ्या मातीत मातीत - अनुराधा पौडवाल.
८) किती सांगु मी सांगु कुणाला - आशा भोसले.
९) तुम्हावर केली मी मर्जी बहाल - उषा मंगेशकर.
१०) तुझ्या गळा माझ्या गळा - आशा भोसले.
११) दिसले मजला सुख चित्र नवे - अनुराधा पौडवाल.
१२) नको देवराया अंत आता पाहू - पं. हृदयनाथ मंगेशकर.
१३) प्रथम तुज पाहता - रामदास कामत.
१४) भातुकलीच्या खेळामधली - अरुण दाते.
१५) माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं - लता मंगेशकर.
१६) सख्या रे घायाळ मी हरिणी - लता मंगेशकर.
१७) संधीकाली या अशा धुंदल्या दिशा दिशा - अरुण दाते, लता मंगेशकर.
१८) सावध हरिणी सावध गं - जयवंत कुलकर्णी.
१९) हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा - लता मंगेशकर.
२०) हा सागरी किनारा - सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल.
२१) राजा ललकारी अशी घे - अनुराधा पौडवाल.

परत यादी अपडेट करून एक्सेल फाईल पोस्ट केलीय.

प्रत्येकाची यादी बघून, असे वाटायला लागलेय, कि हे गाणे मी कसा विसरलो ?

दिनेशदा मला आवडणारी बरीच गाणी यादीत आधी होतीच आणि २१ लिहून झाल्यावर अजून हे राहिले ते राहिले असं झालं. विशाल आणि अफाट, अथांग आहे हा गाण्यांचा सागर.

मस्त धागा, दिनेशदा Happy

हि जिप्स्याची आवडती "उषा मंगेशकर" यांनी गायलेली (नॉन फिल्मी) मराठी गाणी Happy
१. शालू हिरवा पाचू नि मरवा - उषा मंगेशकर
२. आज अंतर्यामी भेटे कान्होवनमाळी - उषा मंगेशकर
३. भास एक स्वप्नातला रंग हळदीचा ओला - उषा मंगेशकर
४. कान्हु घेऊनी जाय आणि धेनु घेऊन जाय - उषा मंगेशकर
५. ना ना ना नाही नाही नाही गं, आता पुन्हा येणे नाही - उषा मंगेशकर
६. वेळ झाली भर मध्यान्ह - उषा मंगेशकर
७. साजनी सई गं, साजण नाही घरी सुकली जाई गं - उषा मंगेशकर
८. ससा तो ससा कि कापूस जसा - उषा मंगेशकर
९. चंपक गोरा कर कोमल हा - उषा मंगेशकर
१०. सूर सनईत नादावला - उषा मंगेशकर
११. प्राण विसावा लहरी सजन कुणी दावा - उषा मंगेशकर
१२. थांब रे घना, जा निरोप घेऊनी सांग मोहना - उषा मंगेशकर
१३. रानच्या पाखरा रे उगीच भेट झाली - उषा मंगेशकर
१४. केळीचे सुकले बाग - उषा मंगेशकर
१५. जे तुझ्याच साठी होते केवळ फुलले - उषा मंगेशकर
१६. खिन्न या वाटा दूर पळणार्‍या - उषा मंगेशकर
१७. थकले रे डोळे माझे वाट तुझी पाहता - उषा मंगेशकर
१८. उठा सकलजन उठिले नारायण - उषा मंगेशकर
१९. पाण्याहून सांजवेळी जात होते घरी - उषा मंगेशकर
२०. अरे अरे श्रीहरी रे, तू माझा कैवारी - उषा मंगेशकर
२१. रातराणी गीत म्हणे गं - उषा मंगेशकर

नंतर जिप्स्या त्याच्या आवडीची "लता मंगेशकर" यांनी गायलेली २१ गाणी घेऊन येईल. Proud

दिनेशदा

बरीच गाणी लिहिली गेली आहेत ,

१) अजुन त्या झुड्पांच्या मागे सदाफुली दोघांना हसते -- दशरथ पुजारी
२) दारी पाऊस पडतो, रानी पारवा घुमतो आला आला ग सुगंध मातीचा -- सुमन कल्याणपुर.
३) साजनी सई गं, साजण नाही घरी सुकली जाई गं - उषा मंगेशकर
४) मानसीचा चित्रकार तो -- सुधीर फड्के
५) सख्या रे घायाळ मी हरिणी --- लता मंगेशकर
६) तुम्हावर केली मी मर्जी बहाल - उषा मंगेशकर
७) रात्रीस खेळ चाले या गूढ सावल्यांचा - महेंद्र कपूर
८) ॠतु हिरवा --- आशा भोसले
९) मोगरा फुलला - लता मंगेशकर
१०) का रे दुरावा का रे अबोला - आशा भोसले
११) धुंद मधुती रात रे - लता मंगेशकर
१२) ने मजसी ने - लता, उषा, मीना, हृदयनाथ मंगेशकर
१३) जाईन विचारीत रानफुला- किशोरी आमोणकर
१४) एकदाच यावे सखया तुझे गीत कानी - सुमन कल्याणपुर
१५) मृदुल करांनी छेडीत तारा - सुमन कल्याणपुर
१६) या बकुळीच्या झाडा खाली ---
१७) मनाच्या धुंदीत -- जयवंत कुलकर्णी
१८) पान जागे फुल जागे भाव नयनी दाट्ला --- आशा भोसले, सुधीर फडके.
१९) म्यानातून उसळे तलवारीची पात -- लता मंगेशकर

भिमराव पांचाळेंची दोन गाणी
२०) आकाशाला भास म्हणालो ---
२१) अंदाज आरशाचा वाटे खरा असावा

आवड कळवलेल्या सर्वांच्याच यादीत माझी पण आवडती गाणी आहेत. आता यादीत नसलेली, पण माझी आवडती अशी शोधावी/आठवावी लागतील.

जिप्सी ही आयडिया लई भारी.

शांकलीताई बरोबर आहेत 'ससा तो ससा' हे आशाताई याचं आहे.

Pages