तू येण्याच्या आधी काही तू गेल्याच्या नंतर..

Submitted by दुसरबीडकर on 17 October, 2014 - 10:05

तू येण्याच्या आधी काही तू गेल्याच्या नंतर..
सखये मी मग मोजत बसतो दोघांमधले अंतर..!!

सोपे नसते.कळले..!आयुष्याचे चंदन होणे..
वेढा घालुन बसलेला प्रश्नांचा नाग निरंतर..!!

येता-जाता 'तो' डोकावत असतो विहिरीपाशी..
'भरल्या' विहिरीतुन नक्की जगण्याचा मिळतो मंतर..!!

सारवलेली मायेने स्वप्ने शेणा-मातीची..
फरशीवर त्यांना 'पुसण्या'वाचुन नाही गत्यंतर..!!

कृष्णाला पाहुन त्या पुतनेलाही फुटला पान्हा..
मग का आजमितीच्या कैक यशोदांचे स्थित्यंतर..??

-गणेश शिंदे..
दुसरबिड,बुलडाणा...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद वैवकु..
शेतातल्या विहिरीत दररोज डोकवायची शेतकर्याची सवय असते,त्यामागचा उद्देश एकच शेतातल्या उभ्या पिकाला 'पाणी पुरेल' की नाही..म्हणजेच पाण्याची पातळी किती खाली जाते हे बघणे..जोपर्यन्त विहिर भरलेली दिसते तोपर्यन्त दिलासा..की येणार्या पिकाला सध्यातरी धोका नाही...नाहीतर..........

फरशी अजून जिथे पोहोचली नाही त्या घरात मोठ्या मायेने सारवले जाते..म्हणजेच एक लळा तिथे लागलेला असतो,जिव गुंतलेला असतो. फरशीच्या घराला पुसावे लागते पण तिथे इतकी आपुलकी दिसत नाही हा आशय...

छान

सारवलेली मायेने स्वप्ने शेणा-मातीची..
फरशीवर त्यांना 'पुसण्या'वाचुन नाही गत्यंतर..!!

वाह ! क्या बात .

वेढा घालुन बसलेला प्रश्नांचा नाग निरंतर..!!<<व्वा !

मतलाही मस्त . Happy

पहिला शेरातला सहजपणा झक्क्कास...
'सारवलेली..' चा शेर अजून फाईन करता आला असता असं वाटलं... Happy

सोपे नसते.कळले..!आयुष्याचे चंदन होणे..
वेढा घालुन बसलेला प्रश्नांचा नाग निरंतर..!!

वा. दुसरी ओळ फार आवडली.

आवडली गणेशराव

सारवलेली मायेने स्वप्ने शेणा-मातीची..
फरशीवर त्यांना 'पुसण्या'वाचुन नाही गत्यंतर..!!

तू येण्याच्या आधी काही तू गेल्याच्या नंतर..
सखये मी मग मोजत बसतो दोघांमधले अंतर..!!

व्वा व्वा