रांगोळ्या

Submitted by सायु on 21 October, 2014 - 07:18

मी काढलेल्या काही रांगोळ्या इथे शेयर करते आहे..
तुम्ही सुध्दा आपआपल्या रांगोळ्या या धाग्यावर शेयर करा...
त्या निमित्यानी रांगोळ्याचे नविन नविन प्रकार बघायला आणि शिकायला मिळतील..:)
Photo0388.jpg

ही सोसायटीत काढली होती, माझा १ नं आला होता..:)
Photo0875.jpgDup(1)SP_A0936_0.jpgPhoto1939.jpg
mg src="/files/u45311/Dup%281%29SP_A0936.jpg" width="320" height="240" alt="Dup(1)SP_A0936.jpg" />
ही ऑफीस मधे गणपतीत काढलेली.. ओमकारातुन गणपती साकारण्याचा प्रयत्न केला होता.. हीला पण बक्षीस मिळाले होते..:)

Photo2021.jpgPhoto2022.jpgPhoto1315.jpgrangoli_1.jpgPhoto2072.jpgRam navmi.jpggudhipadwa.jpgHanuman jayanti.jpgchaittrangan.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव :- O
एकसे बढकर एक आहेत ..

दसरा :

rangoli (4).JPG

दिवाळी :

rangoli (5).JPG

गावी असणार्‍या बहीणीने काढलेली रांगोळी :

rangoli (6).JPG

या इतर :

rangoli (3).JPG

इथे माझ्या दादानी सुद्धा मदत केली रंगवायला :

rangoli (7).JPG

रीया सोप्पी आहे ही रांगोळी नक्की काढ.. पुढ्च्या वेळेला कशाला अजुनही काढू शकतेस की देवदिवाळी पर्यंत Wink

सध्या वेळ नाहीये आणि त्याहीपेक्षा हिंमत नाहीये Wink
तुळशीच्या लग्नाच्या दिवशी काढेन नक्की

वॉव एक से बढकर एक...
टिना फुलांच्या पण मस्तच काढतेस ग!, तुझ्या बहिणीनी पण खुप छान काढलेली, रेषा कीती बारिक आहेत.मस्तच
मुग्धमानसी,स्नेहनिल खुप सुरेख रांगोळ्या:)

खूप सुंदर आहेत रांगोळ्या सगळ्यांच्या.... टीना तुझ्या रांगोळ्या पाहून मलाही मोह होतोय रांगोळी काढायचा...पण त्यासाठी कुणी दार देत का दार ? करत फिराव लागणार आधी Wink Proud

मस्त बीबी.

आमच्याकडे कामाला येणारी आयम्मा रोज अंगण धुवून झालं की रांगोळी काढते. तमिळमध्ये त्याला कोलम म्हणतात. पण तिच्या रांगोळ्या ठिपक्यांच्या असल्या तरी ठिपक्यांना जोडून आकार बनवत नाहीत तर त्यामधून वळनं वळणं घेत आकार बनवले जातात. तिच्या बर्‍याच रांगोळ्यांचे मी फोटो काढून ठेवलेत. रिकामा वेळ मिळाला की इथे अपलोड करेन.

वॉव. सगळ्यांच्या रांगोळ्या सुंदर आहेत . टीना मलाही तुझ्या पोर्चच्या रांगोळीच्या पांढरा रंगाचा वापर आवडला आणि फुलांच्या ,गावच्या बहीणीची पण अगदि सुबक आहे.
नंदिनी , कोलम म्हणजे तांदळाची पेस्ट ची ना ! मी यंदा त्याची पाऊलं काढली होती. विस्कटत नाही ही रांगोळी .मस्त ट्रॅडिशनल वाटतात अगदि या प्रकारच्या रांगोळ्या.

सर्वांच्या रान्गोळ्या सुन्दर...
सायली तुमच्या या धाग्यामुळे.. तुम्ही काढलेल्या छान छान रांगोळ्या तर बघायला मिळाल्याच... पण बाकी कलाकारान्ची कला पण बघायला मिळाली धन्यवाद.

टीना, वारली मधे वेगळे वेगळे रंग वापरायची आयडीया मस्त..
वारली डीझाईन्स मी शक्य असेल तिथे सगळीकडे वापरलीत. ग्लास पेन्टीन्ग, क्लॉथ पेन्टीन्ग, म्युरल, रान्गोळी, ५ वर्षापुर्वी एका स्पर्धेत माझ्या वारली च्या रान्गोळीला बक्षिसपण मिळालेलं....

बाकी टीना तुमच्या बाकीच्या पण कलाक्रुती मस्त.
कान्चन ची गणपती ची संस्कार भारती, मुग्धमानसी ची लक्ष्मीच्या पावलांची, स्नेहनील ची रिया ला आवडली ती ...अश्या सगळ्याच रान्गोळ्या खुप आवडल्या.

नंदिनी, तू लवकर अपलोड कर त्या वळणावळणाच्या रांगोळ्या... मला त्याही खुप आवडतात. मी वाट बघतेय. Happy

नंदिनी , कोलम म्हणजे तांदळाची पेस्ट ची ना ! मी यंदा त्याची पाऊलं काढली होती. विस्कटत नाही ही रांगोळी .मस्त ट्रॅडिशनल वाटतात अगदि या प्रकारच्या रांगोळ्या.
>>
ये कुछ इंटरेस्टींगसा लग रहा है

स्मितु, प्रदिपा धन्यवाद! प्रदिपा तुम्हाला पण खुप माहिती आहे अस दिसतं आहे, तुमच्या पण रांगो़ळ्या शेयर करा.. Happy

नंदिनी कोलम मंगतायच मंगता Happy

कोलम म्हणजे पारंपारिकरेत्या जरी तांदळाची पेस्ट असली तरी हल्ली मात्र सर्रास बाजारात कोलम म्हटलं की रांगोळीची पूडच मिळते. आमच्याकडे साधारण साडेपाच सहा वाजता एक जणं "कोलम्मावे" ओरडत जातो, त्याच्याकडे पण हीच पूड असते. पण ही पूड आपल्याकडच्यासारखी पाण्याने सहजासहजी वाहत नाही.

आयम्मा रांगोळी काढताना आपल्यासारखी दोन बोटांत धरून काढत नाही. तिची वेगळीच स्टाईल आहे, पण त्यामुळे रांगोळी जाड आणि छाप्पील पडते.

फोटो संध्याकाळ्नंतर.

रीया काढच कोलम . तुझ्या त्या लब्बाड मुलीला फसव . Happy अन जाहीर कर तुझा रांगोळीचा प्रोब्लेम (एकाअंशी)सुटलाय म्हणुन ,हे मी तिकडे लिहीणारच होते पण राहिलं. फक्त रांगोळी सुके पर्यंत त्याजागी (काढता काढता सुकतेच तरीही )थांब नाहीतर तीचीच पावलं सगळीकडे उटतील. (असं झालं तरी तीला रंगे पाव पकडता येईल . Happy Wink )

मुंबईला रांगोळीचे "पेन" मिळते. त्याला पाच नळ्या असतात आणि त्या स्वतंत्रपणे बंद करता येतात. त्यांने बारीक रेघ काढता येते. समांतर रेघाही काढता येतात.

माझ्या मावशी कडे सरळ ऑईल पेंट ने काढ्तात रांगोळी, दर वर्शी वेगळी..
पोर्टेबल हवी असेल तर ट्रांस्पीरंसीज वर काढुन चिकटवायची आलटुन पालटुन!

दिनेशदा, मला नाही येत त्यापेनने रांगोळी. आमच्याकडे आहे तो Happy

सिनि, मी तोच विचार करत होते पण त्या पाण्याने जात नाहीत. पुसल्या तर जात असतील Uhoh

रांगोळ्या काढायच्या काही ट्रि़क्स आहेत. उदा. सुपारी ठेवून तिच्यावर रांगोळीची चिमूट टाकायची.. सुंदर गोलाकार मिळतो. काजूची बी ठेवून त्यावर रांगोळी टाकायची कुयरी मिळते. निरांजन किंवा समई उपडी घालून त्याच्या सभोवती रांगोळी घालायची. चांगला फुलाचा आकार मिळतो. या आकारांची कॉम्बिनेशन्स करता येतात.

दिनेशदा ..>> हे नवीनच ऐकल मी .. तुमच्याकडे तर नवनवीन गोष्टींचा पेटाराच आहे... आता हे पण ट्राय करण्यात येईल ..

Pages