Submitted by मेधावि on 1 August, 2013 - 21:22
कालच घराच्या स्वैपाकघराच्या खिडकीतून धबाक्-कन एक ढोल्या उंदराने एन्ट्री मारलीये. त्याला येताना पाहून आम्ही घरातल्या बाकी खोल्यांची दारे बंद करून घेतली जेणेकरून तो इतर खोल्या़ंमधे जाउ नये. आता तो स्वैपाकघरातच असावा असा अंदाज आहे. पण दिसत नाहीये. रॅट कील काल रात्री उघडे करून ठेवले होते परंतु ते आहे तसेच आहे. उंदीर-मामाचाही पत्ता लागत नाहिये. शक्यतो उंदराला न मारता हुसकावून लावण्याचा काही उपाय आहे का? उंदीर प़कडायचा पिंजरा नाहीये आम्च्याकडे त्यामुळे तो उपाय बाद.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बादवे, उंदीर तुळस खातो?>>
बादवे, उंदीर तुळस खातो?>> मरतुकडा असेल. "आज तुळशीपत्र खाऊन प्राण सोडेन, आजतरी सोडेन" अशा आशेवर रोज येऊन तुळशी खात असेल. प्रदिपा नको मारू बाई बिचार्याला...
सिमे पुन्हा एकदा या धाग्यावर
सिमे पुन्हा एकदा या धाग्यावर तुझ्यामुळे हाहापुवा
हाय्ला! तुळशीचा चहा पिऊन
हाय्ला!
तुळशीचा चहा पिऊन सर्दी बरी करणार्यातला असेल असा आडाखा होता माझा.
भारतीय उंदीरहक्क संघटनेने
भारतीय उंदीरहक्क संघटनेने सर्व घरांमध्ये उंदरांसाठी ३०% राखीव जागेची मागणी केल्याचे वृत्त आहे. मफलरवाले बाबांनी या मागणीला पाठींबा दिल्याचे समजते.
या धाग्याचा निषेध म्हणून संघटनेने समस्त मायबोलीकरांच्या घरांवर आक्रमणाचा इशारा दिलेला आहे. सावध रहा..!!
काय ? कसे काय आहेत उंदीर ?
काय ? कसे काय आहेत उंदीर ? सगळं ठीक चाललयं ना त्यांचं ?
Sumedha tai , superhit dhage
Sumedha tai , superhit dhage kadhata tumhee.
Sampurna baaf vachala. Ha Ha Pu Va
मी उंदीर पाळत नाही. ज् स्ट
मी उंदीर पाळत नाही. ज् स्ट फॉर द रेकॉर्ड .
गुजरात मधे एका फ्लॅटच्या
गुजरात मधे एका फ्लॅटच्या बाथरूममधे मगर सापडली ही बातमी फेसबुकवर कालपर्यंत होती. शोधाशोध केली पण आता खूप मागे गेली असेल. पुण्यात एका घरात पाचव्या मजल्यावर अजगर निघाला अशी बातमी सकाळ मधे होती.
तर एका माणसाच्या अंगाखाली झोपेत नाग चिरडून मेल्याचीf एक बातमी होती.
अशा बातम्या वाचून धाग्याच्या शीर्षकात उंदीरच्या जागी अनेक प्राण्यांची नावं येऊ शकतात याची खात्री पटली. पुढचा बाफ कुठल्याही प्राण्याचा असू शकतो.
लगे हाथ कुठला प्राणी पाळल्यावर कुठली पथ्ये पाळावीत यावर चर्चा करण्यासाठी आणखी एका एका बाफची सोय झाली. कुणीतरी म्हटलंच आहे...
मायबोली सण मोठा
विषयांना नाही तोटा
ह्यातून काहीतरी प्रेरणा
ह्यातून काहीतरी प्रेरणा घ्या.
https://www.youtube.com/watch?v=_1J3KP6AIfQ&list=UUmYSGwSGkdFBeN1Kxm8wjWA
उंदिर स्वंयपाकाच्या खोलीतच का
उंदिर स्वंयपाकाच्या खोलीतच का घुसला याची कारणे शोधा...
घरात शिरलेल्या उंदराला बाहेर
घरात शिरलेल्या उंदराला बाहेर कसे काढावे? << या प्रश्नाला मला रोज एक नवीन उत्तर सुचते...
आजचे उत्तरः बाबा-पुता करून..
medical store madhe undir
medical store madhe undir pakadyacha puttha milto to ana tyala udir chiktel mag takun dya.
kalpana manjrekar
मी आज पहिल्यांदाच हा बाफ
मी आज पहिल्यांदाच हा बाफ वाचला ..
मायबोलीवर असे एक से बढिया एक विषय आणि त्यावर मतप्रदर्शन वाचायला मिळत त्यामुळे मज्जा येते ...
एकूणच मायबोलीकर कोणालाही सळो का पळो करुन सोदतात ...तर उंदीर काय चीझ आहे ...
बर सद्ध्या काय परिस्थिती आहे उंदराची ?
आमच्या गावाकडे घरात कधीतरी
आमच्या गावाकडे घरात कधीतरी चिचुन्द्रया दिसतात , त्या रॅटकील ला मुळीच तोंड लावत नाहीत , भाज्यान मध्ये किंवा कणके मध्ये विषारी औषध टाकले तरी त्या खात नाहीत,मांजर बहुधा त्यांना खात नसावी या चिचुन्द्रया ना कसे घराबाहेर घालवायचे कुणी सांगू शकेल काय ??
चिचुन्द्रया ना कसे घराबाहेर
चिचुन्द्रया ना कसे घराबाहेर घालवायचे <<< चुचकारून...
चुचकारून >>
चुचकारून >>
(No subject)
गोगा ..
गोगा ..
यावरून 'मायबोलीवरील धम्माल
यावरून 'मायबोलीवरील धम्माल धागे' ही पाहिलेत अन मॅड्सारखा एकटाच हसतोय ऑफिसात...
(No subject)
भारत सरकारही कित्येक वर्षे
भारत सरकारही कित्येक वर्षे अशाच उंदरांचा नायनाट करायचा प्रयत्न करत आहे! पण काही सरड्यांमुळे त्यांना ते कठिण होऊन बसलंय...

कुठलीही समस्या राजकारणाशी
कुठलीही समस्या राजकारणाशी जोडून धोपटाधोपटीचा खेळ सुरू करण्याच्या क्षमतेला सलाम!
नीधप: माफ करा चुकीचे बोललो
नीधप: माफ करा चुकीचे बोललो असल्यास..
बाकी माझ्या वक्तव्यात राजकारणाचा काहिही मागमूस नाही आहे
हुश्श!!! ( धाप लागलीय खुप..)
हुश्श!!! ( धाप लागलीय खुप..) ....आख्खा धागा वाचुन काढला..
.
.
सर्वांनाच सा. दंडवत !!
सर्वांनाच सा. दंडवत !!
आआआआआआआआ हसून हसून पोट
आआआआआआआआ
हसून हसून पोट दुखलं..
उंदीर असेल जर अजून , तर हा धाग्यावरील मतं वाचून दाखवा.. त्याचंही पोट दुखेल आणि तो पळून जाईल :))))))))
उंदीर अजूनही गेला नसेल तर
उंदीर अजूनही गेला नसेल तर आतापर्यंत उंदीर फॅमिली राहायला लागली असेल नाही सुमेधाव्हींकडे?
आला का हा उंदीर वर!!!
आला का हा उंदीर वर!!! :p
एका उंदरामुळे फॅमिली? तो काय
एका उंदरामुळे फॅमिली? तो काय अमीबा आहे का?
आणि तुम्ही म्हणता तसे अजून एक उंदीर आलाच असता तर धागाकर्ती ह्रुदय्झट्क्याने उडाली अस्ती ना...
अमीबा >>> नाही नाही.
अमीबा >>>
नाही नाही. उंदराला आतापावेतो उंदरीण मिळाली असेल असा निरागस विचार केला मी.
Pages