घरात शिरलेल्या उंदराला बाहेर कसे काढावे?

Submitted by मेधावि on 1 August, 2013 - 21:22

कालच घराच्या स्वैपाकघराच्या खिडकीतून धबाक्-कन एक ढोल्या उंदराने एन्ट्री मारलीये. त्याला येताना पाहून आम्ही घरातल्या बाकी खोल्यांची दारे बंद करून घेतली जेणेकरून तो इतर खोल्या़ंमधे जाउ नये. आता तो स्वैपाकघरातच असावा असा अंदाज आहे. पण दिसत नाहीये. रॅट कील काल रात्री उघडे करून ठेवले होते परंतु ते आहे तसेच आहे. उंदीर-मामाचाही पत्ता लागत नाहिये. शक्यतो उंदराला न मारता हुसकावून लावण्याचा काही उपाय आहे का? उंदीर प़कडायचा पिंजरा नाहीये आम्च्याकडे त्यामुळे तो उपाय बाद.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या उंदिराच्यात अरेंज मॅरेजचा रिवाज असेल. उंदिरीण दिसली तरी हा वाट्याला नाही जायचा बेटा.

अरे नुस्त अरेंज मॅरेज म्हणल मी ... लगेच काय उंदीरबाबा - उंदरीणआइ तुझ्या घरात संमधी- संमधन गायला थोडी येणार होते. Sad

धागा परत परत वरती आला का ?. त वाचायला धमाल येतीय आत्ता पण. उंदीर मामा कि जय.
दीड वर्ष झाल उंदराला घरात येउन Happy

(धागा ) प्रसव (प्रशव) काढा....>>>]
हा काढा एSSका मबोकराकडे असणारेय नक्किच..

तरीच मला उचक्या लागत होत्या... शोधत शोधत या उंदराच्या बिळापर्यंत यावे लागेल वाटले नव्हते..

रुन्मेश, खाई त्याला ख वखवे किंवा चोराच्या मनात चांदणे...:) खरा रोख दुसर्‍या दिशेला होता रे....

इथे तरी एकटा आलाय्स का? कि ग फ्रे आहे बरोबर?

खरा रोख दुसर्‍या दिशेला होता रे....
>>>
हायला.. माझ्या कॉम्पिटीशनला अजून कोण उगवला Uhoh

इथे तरी एकटा आलाय्स का? कि ग फ्रे आहे बरोबर?
>>>>>
मी मायबोलीवर डोके घरी ठेउन येतो, पण मन नेहमी बरोबर घेऊन येतो Happy

electronic pest control device कोणी वापरेले आहे का? उंदरांसाठी?
प्लीज अनुभव शेयर करा!

काही वर्षांपूर्वी माझ्या घराखाली एक देसी फॅमिली आली आणि जाताना उंदरांची देणगी देऊन गेली. तेव्हा मला याचा खूप फायदा झाला.
http://www.amazon.com/Victor-Electronic-Mouse-Trap-M2524/dp/B000E1RIUU
bait म्हणून पीनट बटर वापरणे.

वत्सला, पूर्ण बीबी वाचून काढला नाहीस का? त्या इलेक्ट्रॉनिक पेस्ट कंट्रोल डिवाईसपेक्षा जास्त चांगले उपाय आहेत की! Biggrin Light 1

साखळी उपोषण असते तसं इथे साखळी उंदीर नायनाट चालू झाला काय ??

इतरांचे उपाय वत्सलेला का?? खास वत्सलाच्या आसपासच्या उंदीरासाठी उपाय - विश्वकप समोर धरा त्या उंदिराच्या. आत बसला की झाकण लावून तिथेच चार वर्षे ठेवा Wink (हलके घ्या! Happy )

योकु, अरे त्या device बद्दल अलीकडेच समजले. म्हणून इथे विचारले. बाकी इथे चर्चीलेल्या उपायांची अमलबजावणी करणे म्हणजे.... Biggrin

सी, Lol

मी सध्या तो चाप वापरतेआहे उंदीर निर्मूलनासाठी. खुप उपयोगी आहे. आत्तापर्यन्त ९ उंदीर वर धाडले पण ते चाप मधून मेलेला उंदीर काढणे जीवावर येते!

सध्या आमच्या आसपास नवीन डेवलपमेंट सुरु आहे त्यामुळे तिथले सगळे प्राणी आमच्या घरात/ backyardat येताहेत. परवा एक हुप्प्या कांगारु येऊन चरत होता...

सध्या आमच्या आसपास नवीन डेवलपमेंट सुरु आहे त्यामुळे तिथले सगळे प्राणी आमच्या घरात/ backyardat येताहेत. परवा एक हुप्प्या कांगारु येऊन चरत होता... <<
असेच तिलारीने पाण्याखाली गेलेल्या जंगलातले हत्ती फिरत होते दोडामार्ग ते दाजीपूर डोंगरपट्ट्यात.
असो.. धाग्यासाठी हे कैच्याकै आहे पण तरी..

अप्पाकाका, ते आपले आपण च निघुन जातात.
(अशा तशा विषयावर आम्ही बाफ काढत नाही Wink )

बापरे नी! बाफसाठी अजिबात कैच्या कै नाहीये Wink
हां बाफच कैच्या कै झालाय.. stressbuster Lol

Pages