Submitted by मेधावि on 1 August, 2013 - 21:22
कालच घराच्या स्वैपाकघराच्या खिडकीतून धबाक्-कन एक ढोल्या उंदराने एन्ट्री मारलीये. त्याला येताना पाहून आम्ही घरातल्या बाकी खोल्यांची दारे बंद करून घेतली जेणेकरून तो इतर खोल्या़ंमधे जाउ नये. आता तो स्वैपाकघरातच असावा असा अंदाज आहे. पण दिसत नाहीये. रॅट कील काल रात्री उघडे करून ठेवले होते परंतु ते आहे तसेच आहे. उंदीर-मामाचाही पत्ता लागत नाहिये. शक्यतो उंदराला न मारता हुसकावून लावण्याचा काही उपाय आहे का? उंदीर प़कडायचा पिंजरा नाहीये आम्च्याकडे त्यामुळे तो उपाय बाद.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उंदरावर करणी करा ! हा विनोद
उंदरावर करणी करा !
हा विनोद वाटला तरी असे करणी करणारे आणि त्यांना पैसे देऊन करणी करवून घेणारे बरेच जण पुण्यात आहेत.
अजय यु टु
अजय यु टु
घ्या,आता अजय पण आले. आता हा
घ्या,आता अजय पण आले.
आता हा धागा कितीही पळू शकतो.
Ajay
Ajay
बघा मास्तर आले ऑफ तासाला पण
बघा मास्तर आले ऑफ तासाला पण छडी घेउन नाय तर पीटीसाठी फुटबॉल घेवुन.. ( हे आमचं शाळेतलं सर्वोच्च स्वप्न. )
कल्लाच की...
काहीही 'कांची नरद राजा' माझी
काहीही
'कांची नरद राजा' माझी आजी लिहून ठेवायची भिंतीवर. बाकीचे सग़ळे तिला पालीला मराठीतून लिहिलेलं कानडी वाचता येत नाही असं चिडवायचे. त्या अक्षरांवरुन सुद्धा पाली सरपटत गेलेल्या पाहिल्या आहेत
अवघड आहे सगळे माय्बोलीकर
अवघड आहे सगळे माय्बोलीकर
(No subject)
केद्या
केद्या
(No subject)
हा माउस ट्रॅप वापरुन पाहा...
हा माउस ट्रॅप वापरुन पाहा...
उंदरावर करणी? ऐतेन. ते पायपर
उंदरावर करणी? ऐतेन.
ते पायपर वाजवत येतो आणि गावातली उंदरं नेऊन गावाबाहेर सोडतो अशी काहीतरी गोष्ट आहे ना, तसलं काही वाजवून बघा.
ऐतेन.. म्हणजे काय?
ऐतेन.. म्हणजे काय?
उंदरावर करणी? ऐतेन. >> हो
उंदरावर करणी? ऐतेन. >> हो करता येइल की.
पण उन्दराच्या शेपटीचा केस हवा/
त्याशिवाय नाही होनार///
ऐकावे ते नवलच. झक्या मिशीचा
ऐकावे ते नवलच.
झक्या मिशीचा चालेल का?
झक्या मिशीचा चालेल का?>>> हो
झक्या मिशीचा चालेल का?>>> हो चालेल की.
पण शेपटीचा मिळण जास्त सोप्प आहे रे.
अधिक माहिती विकु मान्त्रिक (क्रमशः फेमस) ह्याना विचारावी लागेल..
पण ते सध्या बिज्जी आहेत..
त्यांना पैसे देऊन करणी करवून
त्यांना पैसे देऊन करणी करवून घेणारे बरेच जण पुण्यात आहेत. >>>
केदार ,कोल्डकॉफी
एक उंदीर मायबोलीकरोंको स्ट्रेस मुक्त कर देता है ....
मास्तर सुद्धा दंग्यात
मास्तर सुद्धा दंग्यात सामील...चालु द्या लोकहो ..
केदारदा ,कोल्ड्कॉफी
ते पायपर वाजवत येतो आणि
ते पायपर वाजवत येतो आणि गावातली उंदरं नेऊन गावाबाहेर सोडतो अशी काहीतरी गोष्ट आहे न >> अरे देवा! मरतात त्या गोष्टीत उंदीर त्यापेक्षा सिंड्रेलाला (ग्रीम बंधूंची) मेसेज करा - r@4u. निदान तिची घोड्यांची सोय होईल.
उंदीरमामाकी जय!
उंदीरमामाकी जय!
थोडासा बदल, अमावस्या नव्हे
थोडासा बदल, अमावस्या नव्हे पौर्णिमा हवय इथे>>> अरे हो! खरंच की! थॅंक्स गं, चिमुरे.. गलतीसे मिष्टेक हो गया...
त्या उंदराने हा बाफ वाचला
त्या उंदराने हा बाफ वाचला असेल तर गुदमरून मेला असेल एव्हाना.
पुढचा बाफ पाली-झुरळांवर येऊ द्या. मागे एक बाफ असाच साबण-पालीचा होता एकदम भन्नाट.
श्रो डिंजराचे मांजर त्या वर
श्रो डिंजराचे मांजर त्या वर सोडा. उंदीर मेला तर मांजर जिवंत. नाही मेला तर मांजर मेले.
पुढचा बाफ पाली-झुरळांवर येऊ
पुढचा बाफ पाली-झुरळांवर येऊ द्या. मागे एक बाफ असाच साबण-पालीचा होता एकदम भन्नाट.>> माझाच होता गं जागु
जगन मिथ्या ब्रहम सत्यं ,हे
जगन मिथ्या ब्रहम सत्यं ,हे झक्कींचे वाक्य त्याला ऐकवा
आतापर्यंतच्या चर्चेतुन तो
आतापर्यंतच्या चर्चेतुन तो उंदीर आहे असं समजतयं, तर मग आता उंदराच्या बायकोला आणुन ठेवा त्याच्याच खोलीत बघा आपोआप पळेल!
आता उंदराच्या बायकोला आणुन
आता उंदराच्या बायकोला आणुन ठेवा त्याच्याच खोलीत बघा आपोआप पळेल<<< बापरे... आणि नाही पळाला म्हणजे सुहागरात...हनीमुन...आणि मग बाळंतपण..
लाजो, आदे अरे, तुम्ही
लाजो, आदे
अरे, तुम्ही त्याला बाहेर काढायचे उपाय सांगता आहे की पुर्ण फॅमिलीला बोलवता आहे त्याच्या
एक से एक उपाय आहेत इथे! पण
एक से एक उपाय आहेत इथे!
पण सिरीयसली, उंदीरमामांनी घरी प्रवेश केला असेल तर सर्व वायरी, उपकरणे, खास करून गॅस सिलेंडर वगैरेची रबरी नळी सुरक्षित आहे ना हे तपासून बघत चला. आमच्याकडे एकदा किचनमध्ये प्रविष्ट झालेल्या उंदीरमामाने इतर काही खायला मिळाले नाही म्हणून टाईमपाससाठी शेगडीला जोडलेली गॅस सिलेंडरची रबरी नळीच कुरतडली होती. वेळीच लक्षात आले व गॅस एजन्सीच्या माणसाला तातडीने पाचारण करून नळी बदलली व तिला धातूचे आवरण घालून घेतले. नंतर त्याने उंदराने कुरतडलेल्या नळीचा अवतार आम्हाला दाखवला तेव्हा काय घडू शकले असते याची कल्पना येऊनच घाम फुटला होता.
उंदरांवर माझ्या आजीची पीएचडी होती. रादर उंदीर पकडण्यावर! कधी कधी तिला घरात शिरलेल्या टिल्ल्याने दर्शन दिले तर ती त्याला हातात धरून खिडकीबाहेर भिरकावून द्यायची. माझा जीव भीतीने अर्धमेला, थंडगार, लोळागोळा झालेला असायचा तोवर! उंदराला जलसमाधी देणे, त्याला केरसुणीने बदडणे, त्याला कोंडीत पकडणे, केरभरणीत घेऊन त्याला बाहेर टाकणे इत्यादी प्रकार तिला उत्तम अवगत होते. तिच्या तुलनेत आम्ही बाकीचे सारे अगदीच शेंदाड शिपाई आहोत!
बापरे... आणि नाही पळाला
बापरे... आणि नाही पळाला म्हणजे सुहागरात...हनीमुन...आणि मग बाळंतपण.. >>> लाजो आणि मग त्यांच्या मुलांची लग्न वै पण का?
Pages