नुकतेच महाराष्ट्र विधानसभेच्या निमित्ताने शिवसेना-भाजपा युती तुटल्याने भाजपाला अचानक साक्षात्कार झाला की गोपीनाथ मुंडेंच्या पश्चात आज तितक्याच ताकदीचा एकही नेता महाराष्ट्रात तरी त्यांच्याकडे नाही आणि म्हणूनच त्यांनी आपले भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे प्रचारदौरे मोठ्या घाईगडबडीत आखले.
यावरून अगोदरच विरोधकांनी भाजपाला महाराष्ट्रात चेहराच नाही म्हणून त्यांना मोदींना बोलवावे लागले असा ओरडा सुरू केला आहे. अर्थात यामागे मोदींच्या करिष्म्याची भिती असली तरी यात तथ्य आहे हे देखील जाणवते. कारण भाजपाच्या एकूण एक पोस्टरवर श्री नरेंद्र मोदी यांचाच चेहरा झळकतोय, तिथे दुसरा कुठलाही महाराष्ट्रातील भाजपा नेता नाही.
तर, यावरूनच आज एके ठिकाणी चर्चेत मोदींचा उल्लेख ‘भाजपाचे पोस्टर बॉय’ असा झालेला पाहिला. खरे तर यात फारसे काही आक्षेपार्ह वाटले नाही, पण तरीही भारताच्या पंतप्रधानपदी असलेल्या नेत्यावर कुठल्याही प्रकारची व्यक्तीगत टिप्पणी नको म्हणत मी हस्तक्षेप केला. समोरून या आक्षेपाला दाद न देता उलट, "आज मोदी महाराष्ट्राचा दौरा करत आहेत ते भारताचे पंतप्रधान म्हणून नसून भाजपाचे ज्येष्ठ नेते म्हणून करत आहेत तर यात चुकले काय?" असा खडा सवाल आला.
याउपर मोदींनी भाजपाला महाराष्ट्रात सत्ता द्याल तर केंद्रातून मी मदत करेल असाही एक इशारा दिल्याचे ऐकिवात आहे (चूक असेल तर कर्रेक्ट करा).
एकंदरीत स्वत:देखील विचार करता मला जाणवले की ज्यांना आपण देशाचे प्रधानमंत्री बनवून देश चालवायला दिला आहे, त्यांनी देशासमोर समस्यांचा आणि त्यांच्यासमोर कामाचा डोंगर उभा असताना, ती कर्तव्ये टाळून / वा त्या कामांना प्राधान्य न देता, आपल्या राजकीय पक्षातर्फे विधानसभा निवडणूकीच्या प्रचारांना वेळ देणे योग्य आहे का?
अर्थात हा धागा आता काढला, किंवा हे आता सुचले, तरीही हे निव्वळ मोदींना नाही तर आजवरच्या सर्वच आजी-माजी तसेच भावी पंतप्रधानांना देखील लागू. त्यामुळे आधीही असेच व्हायचे, हे सर्वांनीच केलेय, या पोस्ट टाकायला माझी हरकत नाही. पण तटस्थ बुद्धीने विचार करत मुद्द्यावर देखील प्रामाणिक मत मांडा. प्रश्न अगदीच बालिश असेल तर क्षमाही करा. श्री नरेंद्र मोदी यांचाच नाही तर भारताच्या पंतप्रधानपदाचा मान ठेवतच हा प्रश्न विचारला आहे.
जय हिंद !
फेकुचंदाचे अनेक दाखले
फेकुचंदाचे अनेक दाखले पहार्यावर नांदत होते.
नरेंद्र मोदी महाराष्ट्रात
नरेंद्र मोदी महाराष्ट्रात भाजपचे प्रचारक म्हणून फिरत असतात कि देशाचे प्रांतप्रधान म्हणून ????
आणि जर ते भाजपचे प्रचारक म्हणून फिरत आहेत तर भारत सरकारने त्याचा खर्च का उचला वा ?
आणि जर ते भाजपचे प्रचारक
आणि जर ते भाजपचे प्रचारक म्हणून फिरत आहेत तर भारत सरकारने त्याचा खर्च का उचला वा ?
>>>>>>>
खर्च नक्कीच भाजपाच उचलत असणार. कोणत्याही राजकीय पक्षाला पैश्याची कमी नसतेच.
सुरक्षेचा ताण मात्र येत असेल ती गोष्ट वेगळी.
घोडा मैदान जवळ आहे. फक्त एक
घोडा मैदान जवळ आहे. फक्त एक दिवस !!
गाढव- उकीरडा जवळ आहे म्हणा
गाढव- उकीरडा जवळ आहे म्हणा नितीन भौ....
धन्यवाद इब्लिस
धन्यवाद इब्लिस
बेफीजी, ते तुरळक सैल किंवा
बेफीजी,
ते तुरळक सैल किंवा घाईघाईत केलेलं विधान असलं तर मोदींनी दुसऱ्या दिवशी सफाई दयायला हवी होती. ट्विटरवरुन दिवसभर टिवटिवतात- एक ट्विट करायला एक मिनिट पुरे. अडानींच्या हेलिकॉप्टरमध्ये बसल्याबसल्या पण ट्विट करता आलं असतं की बाबा माझा विदर्भ वेगळा होण्याला पाठिंबा आहे/नाही.
पण तसं करण्यात आलेलं नाही. मोदी मुद्दाम नरो वा कुंजरो वा पोझिशन घेतायत. लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रकार आहे. निवडणुकीपूर्वी वचन दयायचं की महाराष्ट्र तोडणार नाही आणि नंतर म्ह्णायचं की मी विदर्भाबद्दल नाही म्हटलं ते वाक्य.
देव फडणवीस सीएम उमेदवार आहेत मग ते जर पीएमला contradict करतात आणि त्यांच्यावर काहीही कारवाई होत नाही तर याचा अर्थ काय?
अरे बाबांनो, तुमच्यामते
अरे बाबांनो, तुमच्यामते मोदि/भाजप फेकुचंद आहे ना? मग कशाला जीवाचा आटापीटा करताय?
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/edit/editorial/election-campaign-...
दिवाकर देशमुख यांनी दिलेल्या
दिवाकर देशमुख यांनी दिलेल्या मटाच्या लिंकवरून हा उतारा
>>>>.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या पंतप्रधानांच्या आतापर्यंतची परंपरा सर्वच आघाड्यांवर मोडीत काढण्याचा निर्धार केला आहे आणि ते त्यांनी या निवडणुकीत दाखवून दिले. पंतप्रधानपदावरील व्यक्तीने एका राज्याच्या निवडणुकीत किती लक्ष घालावे, याच्या सीमारेषा त्यांनी पार केल्याच, परंतु संबंधित पदावरील व्यक्तींनी पाळावयाच्या मर्यादाही ओलांडल्या. आतापर्यंतच्या इतिहासात पंतप्रधानपदावरील नेत्याने पदावर असताना कधी व्यक्तिगत टीका केली नाही. मोदी यांनी प्रारंभीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापुरताच आपल्या टीकेचा रोख ठेवून स्वतःला राष्ट्रीय नेतृत्वाच्या मर्यादेत ठेवले होते. परंतु ते त्यांना अखेरपर्यंत टिकवून ठेवता आले नाही आणि शेवटी शेवटी ते स्थानिक पुढाऱ्यांपर्यंत घसरले. पंतप्रधानपदी मनमोहन सिंग असताना मोदी, अडवाणींसह भाजपच्या नेत्यांनी त्यांची यथेच्छ टवाळी केली. अर्थात त्यासाठी सरकारचा आठ-नऊ वर्षाचा कालावधी जावा लागला. मोदी मात्र अवघ्या सहा महिन्यांत जाहीर आणि सोशल मीडियातही टवाळीचा विषय बनले. विशेष म्हणजे स्वतःचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेकडून अफझलखान वगैरेंसारख्या विशेषणांचे धनी बनले. छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख असलेली भाजपची पोस्टरे झळकली आणि त्यानंतर निवडणूकप्रचार वर्तमानातून थेट ऐतिहासिक काळात पोहोचला, तो अखेरपर्यंत वर्तमानात आलाच नाही.
>>>>>
याचा अर्थ मी धागा अगदीच काही हवेत नाही काढला याला एक दुजोरा मिळाला.
मी माझ्या हेतूशी प्रामाणिक, मी समाधानी
तुम्ही हाच नाही, युती
तुम्ही हाच नाही, युती तुटण्याचाही धागा आधीच काढलेला होता. अभिनंदन.
>>>आतापर्यंतच्या इतिहासात
>>>आतापर्यंतच्या इतिहासात पंतप्रधानपदावरील नेत्याने पदावर असताना कधी व्यक्तिगत टीका केली नाही. <<<
१. नुकत्याच दहा वर्षे पंतप्रधानपदी घालवलेल्या पंतप्रधानांनी तोंड उघडणे हा प्रकारच मुळात नगण्य प्रमाणात केला. स्वतःच्या निवडणूकीतही ते काहीच बोलले नाहीत ते दुसर्या राज्यात काय बोलणार? त्यांचा सगळा भरवसा माननीय राहुलजी गांधी ह्यांच्या भेदक वक्तृत्वावर होता.
२. ज्यांनी पंतप्रधानांनी काढलेले आदेश पसाचे उपाध्यक्ष ह्या नात्याने फाडून टाकण्याची हिम्मत निव्वळ स्वतःच्या आडनावाच्या बळावर केली ते काँग्रेसमधील पंतप्रधानांपेक्षाही महत्वाचे असलेले माननीय राहुलजी गांधी इथे महाडात येऊन बेताल बडबडून गेले आहेत नुकतेच. त्यांनि अचानक घोषणा केली आहे की ह्यापुढे आम्ही अखंडीत वीज देऊ आणि पाणीकपात बंद करू. जसे काही गेली पंधरा वर्षे हे विरोधी पक्षातच बसलेले होते.
३. माननीय सोनियाजी गांधी अजूनही मोदींवर व्यक्तीगत टीका करत आहेत व प्रचारादरम्यानच करत आहेत.
४. पंतप्रधान पदावरून स्व. श्रीमती इंदिरा गांधी व्यक्तीगत टीका करत असत.
५. माननीय स्व. राजीवजी गांधी हे एकदा लाटेवर स्वार निवडून आले होते तेव्हा इतरांवर टीका करण्याचे कारणच उरलेले नव्हते. पुढे एकदा त्यांना त्यांच्याच मंत्रीमंडळातील एका नगण्य अर्थमंत्र्याने पदावरून खाली खेचून ते पद स्वतःकडे घेतले.
६. पंतप्रधानपद हा एक विषय झाला. सध्या व्यक्तीगत टीका करण्यात मा. शरद पवार (सूं छे), मा. अजित पवार, मा. बाबा चव्हाण, मा. नारायण राणे, मा. उद्धव ठाकरे, मा. राज ठाकरे हे सगळे हिरीरीने पुढे आहेत. कोणी पक्षाचे संस्थापक आहेत तर कोणी अध्यक्ष तर कोणी मुख्यमंत्री! मा. आबा पाटील हे तर खूपच वाहवत गेलेले आहेत.
७. मोदींनी महाराष्ट्राच्या पातळीवर उतरून प्रचार करू नये म्हणणे म्हणजे आमच्या देशात येऊन क्रिकेटची सीरीज खेळा, पण व्हिवियन रिचर्ड्सला नाही हां खेळवायचे, असे म्हणण्यासारखे आहे.
मोदींनी महाराष्ट्राच्या
मोदींनी महाराष्ट्राच्या पातळीवर उतरून प्रचार करू नये म्हणणे म्हणजे आमच्या देशात येऊन क्रिकेटची सीरीज खेळा, पण व्हिवियन रिचर्ड्सला नाही हां खेळवायचे, असे म्हणण्यासारखे आहे.
>>>>>>>
हे उदाहरण पुन्हा चुकलेय.
मी सतत कर्रेक्ट नाही करणार
हेच उदाहरण आधी कोणी दिलंय का?
हेच उदाहरण आधी कोणी दिलंय का? पुन्हा म्हणजे काय?
हो, हेच असेच, पहिल्या पानावर
हो, हेच असेच, पहिल्या पानावर कुठेतरी ..
आमची नैट ड्युटी लागली. उद्या
आमची नैट ड्युटी लागली. उद्या गावी जाणे शक्य नाही . मतदान बुडले !
काँग्रेसची जाहिरात म्हणते, '
काँग्रेसची जाहिरात म्हणते, ' माझ्या गाडीची नस जाणतो त्याच्याच हातात गाडी देणार !'; शिवसेना नेतृत्व ठणकावते, ' माझ्या महाराष्ट्रात बाहेरून येवून याल, तर तुम्हाला इंगा दाखवल्याशिवाय रहाणार नाही !'; काँग्रेसच्या जाहिरातीत पृथीराज चव्हाणही ,' माझा महाराष्ट्र .. सारं कसं स्वच्छ, पारदर्शक.... ! '. म्हणजे, भाजप काय महाराष्ट्राचा नाही ? देशाचा पंतप्रधान काय महाराष्ट्राला मात्र परका कुणी तरी ? आणि हें ठरवणार कोण - मतदार कीं हे नेतेच ? जर महाराष्ट्राला महाराष्ट्रात भाजपाला नाकारायचे असेल तर तसं तें निवडणूकीत स्पष्ट होईलच. पण तें नाकारणं महाराष्ट्राच्या भाजपाला महाराष्ट्रात नाकारणं असेल; तो कुणी बाहेरचा पक्ष म्हणून नव्हे . सतत तसं भासवणारे नेते व पक्ष मतदारांचाच अपमान करत आहेत, असं मला वाटतं. पंतप्रधान म्हणून मोदीना उच्चासनावर बसवल्याचा आव आणायचा व महाराष्ट्रात आले तर त्याना घुसखोर असल्यासारखं वागवायचं , हा दुटप्पीपणा वाटतो. मला तरी हें खटकतं.
मला स्वतःला कोणत्याच पक्षाबद्दल खास प्रेम नाही; पण खर्याखुर्या मुद्यांकडे दुर्लक्ष करून फक्त भावनिक आवाहनं व चिखलफेंक हाच स्थायीभाव असलेल्या आतांच्या प्रचाराचा - यांत भाजपासहित सर्वच पक्ष दोषी आहेत - तिटकारा आला आहे.
भाऊ मुद्दा पटला, भाजपा म्हणजे
भाऊ मुद्दा पटला, भाजपा म्हणजे महाराष्ट्राबाहेरचे आहेत असे नाही म्हणू शकत, पण भाजपा सुद्धा या चित्रामुळे एकंदरीत खुश आहे असेही वाटतेय.
अमराठी मते त्यांना यातून जास्त मिळू शकतात. याउलट मराठी मतांची विभागणी होणारच आणि त्यात त्यांचाही वाटा आहेच.
अमराठी समाजामध्ये गुजराती समाजाबद्दल बोलाल तर त्यांची यंदा एकगठ्ठा मते मिळतील आणि ते लोक नेहमीच्या प्रमाणापेक्षा जास्त हिरीरीने मतदानाला उतरतील. आता हे बातम्या वा कानावरच्या खबरींवरून नाही बोलत तर साधारण तसे निरीक्षण आहे. मोदी सरकार आल्यापासून माझेही झाडून सारेच गुजराती मित्र-मैत्रीणी आपले सरकार आले अश्याच आविर्भावात आहेत.
याउपर भाजपाही जाणून आहे की या प्रसारामुळे महाराष्ट्राशी आणि मराठी माणसाशी आपली नाळ यातून कमकुवत होण्याची शक्यता आहे. म्हणून त्यांनीही लगेच शिवरायांचा आशिर्वाद घेऊन टाकला.
पण यावरूनच त्यादिवशीची एक गंमत सांगतो. मोदींनी मुंबईत घाटकोपर या गुज्जू बहुल भागात सभा घेतली होती. मोदींना बघायला कोण नाही जाणार. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात घेतली असती तरी गर्दी खेचलीच असती. तरी तिथे जमलेले बहुतांश लोक गुजराती वा परप्रांतीयच असावेत. कारण मोदींनी शिवरायांचा उल्लेख केला. दोनचार संवाद फेकले. पण अश्यावेळेस आढळणारा तो टाळ्यांचा अपेक्षित कडकडाट कुठेच नाही दिसला. माझ्या मराठी मनालाही मोदींच्या तोंडी महाराजांचे नाव मिसमॅच वाटले. त्यानंतर का माहीत नाही, पण मला पुढचे भाषण ऐकवले नाही मी आतल्या खोलीत निघून आलो
भाऊ नमसकर, भाजपला मुंबईसहीत
भाऊ नमसकर, भाजपला मुंबईसहीत संयुक्त महाराष्ट्राचा कन्सेप्टच मान्य नाहीये. त्यांना महाराष्ट्र आज जसा आहे तसा नकोच आहे. त्यांना त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत. हे भाजपने स्वत:च सांगितलंय. फडणवीस-गडकरी-खडसे हेच तर बोंबलत फिरतायत. फडणवीस-गडकरींना पश्चिम महाराष्ट्राशी तर काहीच देण-घेणं नाहीये. शत्रूबद्दल बोलावं तसं स्वतःच्या मातृभाषाबांधवांबद्दल बोलत फिरतात.
त्यामुळे 'माझा महाराष्ट्र' म्हणायचा भाजपला अधिकारच नाही.
तो कुणी बाहेरचा पक्ष म्हणून
तो कुणी बाहेरचा पक्ष म्हणून नव्हे . सतत तसं भासवणारे नेते व पक्ष मतदारांचाच अपमान करत आहेत, असं मला वाटतं >> भाउ, लोकसभेला (आणि काही प्रमाणात महा विधानसभेला पण) भाजपा जेव्हा काँग्रेसमुक्त भारताची घोषणा करत होती तेव्हा पण ते मतदारांचा अपमान करत होते असं तुम्हाला वाटलं होतं काय?
वेदिका, एकदम कडक. या एका
वेदिका,
एकदम कडक. या एका मुद्द्यावर मी माझे लोकसभेला भाजपाला दिलेले मत फिरवू शकतो, किंबहुना उद्या फिरवणार आहे. आणि ते फिरवलेले शिवसेनेलाच देणार कारण त्यांची सत्ता येवो वा भाजपाशी युती होवो वा ते विरोधी पक्षात बसो ते हे होऊ देणार नाहीत.
मनीष, हुशार हा, पॉईंट आहे.
भाजपाने मुंबईला
भाजपाने मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करण्याबद्दल एक चकार शब्दही काढलेला नाही. जर कुणी तसे म्हणत असेल तर तो खोटारडा कांगावा आहे.
विदर्भ वेगळा झाला तर काय असे आकाश कोसळणार आहे? भारतात अनेक मोठी राज्ये तोडून लहान राज्ये बनवलेली आहेत. त्याने काही विपरित झालेले नाही. प्रशासकीय दृष्ट्या छोटी राज्ये सोयीची आहेत. विदर्भाने कायम मुंबई वा पश्चिम महाराष्ट्राची दादागिरी का सहन करायची? कारण सरकार, नवे प्रकल्प ह्यात पश्चिम महाराष्ट्राचा जास्त प्रभाव व दबाव असतो. विदर्भ वेगळा झाला तर त्यांचे उत्पन्न घटेल पण त्यांचे सरकार ते हवे तसे चालवू शकतील. जर नीट चालवले नाही तर तिथले नागरिक त्यांना सत्ताभ्रष्ट करू शकतात.
वेगळा विदर्भ बनला म्हणजे काही वेगळा देश बनणार नाही. लगेच दोन्ही राज्यांचे लोक युद्ध करु लागणार नाहीत. संविधानाप्रमाणे कुणीही कुठेही जाऊ येऊ शकतो. त्यामुळे व्यापार बाकी दळणवळण अव्याहत राहील ह्याची खात्री आहे.
आणि हो, भाजपाच्या जाहीरनाम्यात वेगळा विदर्भ हा प्रधान मुद्दा नाही. त्यावरची चर्चा नंतर होऊ शकते. पुरेशा लोकांचा विरोध असेल तर तो मुद्दा बारगळेलच.
भाजपाने मुंबईला
भाजपाने मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करण्याबद्दल एक चकार शब्दही काढलेला नाही.
>>>>
काढलाय
मोदी मुंबईतल्या भाषणात म्हणाले होते की मुंबई महाराष्ट्राचीच आहे. वेगळे नाही करणार. फेवरमध्ये शब्द काढलाय पण काढलाय...
पण तसे ते महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही असेही म्हणाले होते.
पण लागलीच फडणवीस वगैरे मंडळींनी विदर्भ तेवढा वेगळा करणार म्हटले.
कदाचित ते विदर्भाला महाराष्ट्राचा तुकडा समजतच नसतील. असतं एकेकाचे.
पण यामुळे मोदींच्या विधानाला कितपत महत्व द्यायचे हे कोडेच.
वेगळ्या विदर्भाचा मुद्दा आता थोडाथोडा मांडत राहिला तरी फारशी मते जाणार नाहीत, किंबहुना काही मिळतीलही, म्हणून ते तळ्यात मळ्यात चालूय. जिथे मते जातील तिथे नाही म्हणायचे, जिथे या मुद्द्यावर मिळतील तिथे हा म्हणायचे..
याउलट मुंबईचा मुद्दा आता काढणे म्हणजे मतांचे नुकसानच.
आणि तसेही ते डोक्यात असल्यास(?) आधी विदर्भाला वेगळे करून मगच याद्रुष्टीने पावले उचलणे त्यांना जास्त सोयीचे पडावे.
आणि तसेही ते डोक्यात
आणि तसेही ते डोक्यात असल्यास(?) आधी विदर्भाला वेगळे करून मगच याद्रुष्टीने पावले उचलणे त्यांना जास्त सोयीचे पडावे.
+१ तोच तर प्लॅन आहे त्यांचा!
अमित शाहच्या बॉडी लँग्वेजमधूनच कळतं!
मुंबईतल्या एलिट्सना (पक्षी
मुंबईतल्या एलिट्सना (पक्षी इंग्रजी वृत्तपत्रांचे संपादक,columnists, पेज थ्री वर झळकणारे, उद्योगपती इत्यादींना) मुंबईचं वेगळं राज्य, रादर चंदिगढ टाइप केंद्रशासित प्रदेश झालेला हवाय. त्याचं प्रशासन कॉर्पोरेट पद्धतीने सी इ ओ नेमून झालेलं हवंय. राजकारणी आणि सरकारी अधिकारी यांना न सांभाळता येण्याजोगं झालंय मुंबई महानगर.
आणि त्या मुंबईत मराठी लोक
आणि त्या मुंबईत मराठी लोक फक्त भांडी घासणे, कामवाली बाई, रखवालदार किंवा ड्रायव्हर याच कामांसाठी दूर कुठेतरी झोपडपट्टीत राहत असलेले हवेत. हा नोकरवर्ग सोडून इतर कुठेही मराठी भाषा नको. हे एलिट्सचं सुखस्वप्न आहे!
<< भाउ, ..... भाजपा जेव्हा
<< भाउ, ..... भाजपा जेव्हा काँग्रेसमुक्त भारताची घोषणा करत होती तेव्हा पण ते मतदारांचा अपमान करत होते असं तुम्हाला वाटलं होतं काय? >> कृपया मीं काय म्हटलंय बघा - << तो कुणी बाहेरचा पक्ष म्हणून नव्हे . सतत तसं भासवणारे नेते व पक्ष मतदारांचाच अपमान करत आहेत, असं मला वाटतं>> काँग्रेस हा कुणी बाहेरचा पक्ष आहे, म्हणून भाजपाने काँग्रेसवर झोड उठवली असती तर तेंही मतदारांचा अपमान केल्यासारखंच असतं.
<< ...शत्रूबद्दल बोलावं तसं स्वतःच्या मातृभाषाबांधवांबद्दल बोलत फिरतात.>> असं बोलणं ही भाजपातल्याच कांहींची मक्तेदारी आहे असं नाही; जरा 'विधानसभेत भाजपा विरुद्ध शिवसेना झाल्यास कोण मारेल बाजी?' व ह्या धाग्यावरही विदर्भातल्या मराठी बांधवांबद्दल काय लिहीलं गेलंय तें वाचल्यावर हें लक्षांत यावं.
मीं भाजपाचं/मोदींचं वकीलपत्र घेवून इथं आलेलों नाही व तशी माझी इच्छा पण नाही. पण निदान आपण नालायक आहोत हें सिद्ध करण्याचा अधिकार व त्यासाठीचा वेळ तरी भाजपाला मिळणं न्याय्य आहे, असं मला तीव्रतेने वाटतं. ते महाराष्ट्राची व देशाची कशी वाट लावणार याची स्वतःच कल्पना करून त्याना आत्तांच झोडणं योग्य नाही. उदा. <<आणि त्या मुंबईत मराठी लोक फक्त भांडी घासणे, कामवाली बाई, रखवालदार किंवा ड्रायव्हर याच कामांसाठी दूर कुठेतरी झोपडपट्टीत राहत असलेले हवेत.>> मराठी माणसाच्या या अवस्थेला जबाबदार भाजपा की इतर सारे पक्ष ? << मोदी सरकार आल्यापासून माझेही झाडून सारेच गुजराती मित्र-मैत्रीणी आपले सरकार आले अश्याच आविर्भावात आहेत.>> ' एक मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर सर्व मतभेद बाजूला ठेवून अख्खा महाराष्ट्र पवारांच्या पाठीशीं उभा राहील', ही हवा नव्हती महाराष्ट्रात ? आपल्या राज्यातला माणूस देशाचा पंतप्रधान होणं अभिमानास्पद वाटलं या साध्या गोष्टीतून इतका भलताच अर्थ निघतो ? भाजपाबद्दल खास प्रेम नसूनही त्यांच्यावर होणारी बरीचशी टीका अवाजवी व अन्याय्य आहे असं प्रामाणिकपणे वाटतं, केवळ म्हणूनच मीं या चर्चेत सहभागी आहे.
जर भाजपला कमी जागा मिळाल्या
जर भाजपला कमी जागा मिळाल्या तर कॄंन्मेश सारखे दुतोंडी लोक म्हणणार मोदींचा पराभव झाला.
मोदी प्रचाराला आले तर म्हणणार पंतप्रधान कधी प्रचाराला येतो का?
एक तरी लाइन पकडुन बोला.
काँग्रेस हा कुणी बाहेरचा पक्ष
काँग्रेस हा कुणी बाहेरचा पक्ष आहे, म्हणून भाजपाने काँग्रेसवर झोड उठवली असती तर तेंही मतदारांचा अपमान केल्यासारखंच असतं.
>>>>>>
भाऊ मग ईटालीवाल्या बाई वा ईटालीवाल्या बाईंचा पक्ष या संबोधनाबद्दल काय म्हणाल?
जर भाजपला कमी जागा मिळाल्या
जर भाजपला कमी जागा मिळाल्या तर कॄंन्मेश सारखे दुतोंडी लोक म्हणणार मोदींचा पराभव झाला.
मोदी प्रचाराला आले तर म्हणणार पंतप्रधान कधी प्रचाराला येतो का?
>>>>>>>>>
पंतप्रधानांनी एवढ्या हिरीरीने प्रचारात उतरणे, गल्लीबोळात सभा घेणे, महाराष्ट्रातील भाजपाच्या इतर सर्व नेत्यांपेक्षाही स्वता जास्त प्रचार करणे हे चूक आहेच. (भले त्यात आश्वासक चेहराच नव्हता हे कारण असेल) पण या आधी कोण्या पंतप्रधानांनी थोड्याफार सभा घेतल्या तरी ते आणि तेच लीड करत नव्हते, तर हातभार लावत होते.
आज तुम्हाला मला फडणवीस, खडसे वगैरे नाव ठाऊक आहे पण रस्त्यावर उतरून सर्व्हे घ्या सामान्य लोकांचा त्यांना मोदींच्या पलीकडे महाराष्ट्र भाजपाचा चेहराच माहीतच नसेल. (यांच्या ऐवजी गोपीनाथ मुंडेंचे नाव घेण्याची शक्यता आहे.)
त्यामुळे भाजपाला अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळाल्यास त्या यशाचे श्रेयही मी मोदीलाटेलाच देईन आणि तसे न झाल्यास अपयशाचा ठपका मोदींवर ठेवण्याएवजी जनता लाटेत वाहावत नाही गेली म्हणत जनतेला श्रेय देईन.
अवांतर - कॄंन्मेश हे जर टाईप
अवांतर - कॄंन्मेश
हे जर टाईप कसे करायचे माहीत नसल्याने झाले असेल तर ......... RunmeSh - ऋन्मेष
जर मुद्दामून केले असेल तर ................................................... लव्ह यू डूड

Runmesh, sometimes you talk
Runmesh, sometimes you talk so much of sense. Pat yourself for the last few posts.
रस्त्यावर उतरून सर्व्हे घ्या
रस्त्यावर उतरून सर्व्हे घ्या सामान्य लोकांचा त्यांना मोदींच्या पलीकडे महाराष्ट्र भाजपाचा चेहराच माहीतच नसेल.
या वाक्याला सहमती...आमच्या भागात बिजेपीच्या उमेदवाराचा प्रचार करत घरी आलेल्या एका कार्यकर्तीला विचारले ...श्रश्रश्र यांचेच पत्रक आहे ना..आलेय आमच्याकडे...
तर म्हणे नाही हे मोदींचे आहे.... असे म्हणून तेच पत्रक दिले.
<< पण रस्त्यावर उतरून सर्व्हे
<< पण रस्त्यावर उतरून सर्व्हे घ्या सामान्य लोकांचा त्यांना मोदींच्या पलीकडे महाराष्ट्र भाजपाचा चेहराच माहीतच नसेल.>> शक्य आहे. पण ज्या पक्षांचे चेहरे त्याना चांगलेच माहीत आहेत व ते अनुभवामुळे जर त्याना आतां असह्य होत असतील तर ..... !!
तर भाऊ लोकंच ते ठरवतील ..
तर भाऊ लोकंच ते ठरवतील .. किंबहुना आज ठरवून झाले.. त्याबाबत आपण बहुमताचा आदर करूच.
वरची पोस्ट टोचा यांच्या पोस्टमधील मुद्द्याला अनुसरून होती
<< त्याबाबत आपण बहुमताचा आदर
<< त्याबाबत आपण बहुमताचा आदर करूच.>> भाजपावाला नसूनही इथं मीं हेंच सांगायला धडपडतो आहे कीं अख्ख्या देशाने आत्तांच मोदी व भाजपावर जर एवढा प्रचंड विश्वास दाखवला आहे तर त्या बहुमताचा इतक्या लवकर अनादर करत सुटणं उचित नसावं; << निदान आपण नालायक आहोत हें सिद्ध करण्याचा अधिकार व त्यासाठीचा वेळ तरी भाजपाला मिळणं न्याय्य आहे, असं मला तीव्रतेने वाटतं. >> असं वाटणंही चूकीचं आहे का ?
बहुमताचा आदर करायचा म्हणजे
बहुमताचा आदर करायचा म्हणजे काय?
त्यांनी मारलेल्या कोलांट्यांकडे दुर्लक्ष करायचं की त्यांचं कौतुक करायचं?
त्यांच्या चुकीच्या वाटणार्या निर्णयांबद्दल बोलायचं नाही? : वानगीदाखल : पर्यावरणरक्षणासंबंधींचे नियम शिथिल करणे.
<< ...त्यांनी मारलेल्या
<< ...त्यांनी मारलेल्या कोलांट्यांकडे दुर्लक्ष करायचं की त्यांचं कौतुक करायचं? >>
रास्त टीका व अनादर यांत फरक आहे. माझा रोख फक्त सर्रास अविश्वास, अनादर दाखवण्यावरच आहे.
पेरलं तसं उगवलंय. त्यांनी जी
पेरलं तसं उगवलंय. त्यांनी जी भाषा वापरलीय ती ऐकायला त्रास होऊ नये. त्यामुळे अजूनही त्यांना आदर कमवायचाय. डिट्टो विश्वासाबद्दल. २०१३ ते २०१४ चा पूर्वार्ध सीमेवरच्या कुरुबुरींंचं राजकारण करणार्यांचं, टीका केलेली धोरणेच आता गळ्यात मिरवणार्यांनी विश्वास कमावण्याआधीच गमवायला सुरुवात केली आहे.
तसंच सर्रास अविश्वासाचं कारण म्हणजे ज्या प्रकारचं वातावरण निर्माण होतं आहे. त्याला पायबंद घालण्याचं बारीकसंही चिन्ह दिसत नाही.
बहुमत हे चिलखत सगळ्या ठिकाणी लागू पडत नाही.
तसंच नमोरुग्णांच्या सोशल साइट्सवरून फिरणार्या टाळ्या आणि विरोधकांना लाथांवर उपाय म्हणून योग्य तिथे चिमटे काढत राहणं गरजेचं आहे.
तसंच नमोरुग्णांच्या सोशल
तसंच नमोरुग्णांच्या सोशल साइट्सवरून फिरणार्या टाळ्या आणि विरोधकांना लाथांवर उपाय म्हणून योग्य तिथे चिमटे काढत राहणं गरजेचं आहे.<<<
बहुमत हे चिलखत सगळ्या ठिकाणी लागू पडत नाही. <<< बहुमत हे चिलखत?
भाउ तुमच म्हणने मान्य की
भाउ तुमच म्हणने मान्य की मोदींना आणि भाजपाला वेळ देण गरजेच आहे. पण मोठ्या योजना / सरकारी कारभारात भरीव सकारात्मक बदल ह्या गोष्टींना फकत येक टर्म (५ वर्षे सत्ता) पुरेशी नाहीये. कमीत कमी २ टर्म तरी लागतील. उदा. मेट्रो प्रकल्प / गंगा शुद्धीकरण .
विचार करा जर मोदी अशीच चमकोगिरी करत राहिले तर ५ वर्षानंतर काँग्रेस परत सत्तेत येईल आणि राहुल बाबा पंतप्रधान होणार.
तुम्हीच ठरवा तुम्हाला मोदींच्या पाठीमाघे आत्तापासुनच लागायचय की राहुल बाबा पंतप्रधान म्हनुन चालणार आहे.
(No subject)
<< भरीव सकारात्मक बदल ह्या
<< भरीव सकारात्मक बदल ह्या गोष्टींना फकत येक टर्म (५ वर्षे सत्ता) पुरेशी नाहीये. कमीत कमी २ टर्म तरी लागतील.>> सुशांतजी, चमत्काराची अपेक्षा न करतां कोणत्या दिशेने व किती जिद्दीने वाटचाल होतेय, हें कळायला ५ वर्षं पुरेशीं आहेत, असं नाही वाटत ? शिवाय, इच्छाशक्ती व धमक असेल तर सकारात्मक बदलही तांतडीने घडवतां येतात. उदा. श्री. सेशन हे निवडणूक आयुक्त झाल्यानंतरच्या पहिल्याच निवडणूकीत त्यानी घटनेनेच दिलेले अधिकार वापरुन निवडणूकीतल्या अनेक गैरप्रकाराना प्रथमच आळा घातलाच ना !
<< तुम्हीच ठरवा तुम्हाला मोदींच्या पाठीमाघे आत्तापासुनच लागायचय की... >> याचं उत्तर वर दिलंय मीं - << रास्त टीका व अनादर यांत फरक आहे. माझा रोख फक्त सर्रास अविश्वास, अनादर दाखवण्यावरच आहे.>>
भाऊ, तुम्ही शिव्या का देताय
भाऊ, तुम्ही शिव्या का देताय (सुशांतजी)
कोणतेच सरकार चम्त्कार करु शकत नाही. ना कोणता पंतप्रधान.
पण मोदींनी भाजपचा मुख्य प्रचारक असाव की भारताचा सक्षम पंतप्रधान?
भाजपाला मिळालेल अभुतपुर्व यशाची कारण मला तरी वाटतात
१. काँग्रेस विरोधी प्रचंड राग
२. त्या मुळ आलेली काँग्रेसविरोधी लाटेवर स्वार होण्याची मोदींमधली कुवत
३. प्रभावी प्रचार ज्यात गुजरातच्या विकासाचा आणि मोदी महापुरुष असल्याचा वाजवलेला ढोल (हे माझ वयक्तिक मत आहे, वाद घालु नये, माझ मत बदलणार नाहीये)
आधीचा पंतप्रधान मुका होता आताचा फक्त पोपटपंची करतोय अस माझ मत बनत चाललय. मला येकवेळ मुका पण आपल्या कामातुन बोलणार पंतप्रधान आवडेल.
उदा. मोदींनी पाकीस्तानबद्दल (सध्या सीमेवर चालु असलेल्या गोळीबाराबद्दल ) येक शब्द पण न बोलणे आणि युनो अध्यक्षानी पाकीस्तानच्या पत्राला केराची टोपली दाखवणे. मनमोहन सिंगांची भरपुर उदाहरण आहेत.
मोदींनी मुख्य प्रचारकाची भुमिका सोडावी हे माझ मत आहे. भारंभार प्रचारसभा घेण्यापेक्षा जर २ ऑक्टोबरच्या स्वच्छता अभियानात फकत पहिल्या दिवशी फोटो काढण्यापुरती चमकोगिरी करु नये त्यात स्वतःचा पुर्ण अभियानात सक्रीय सहभाग दाखवावा. नक्कीच खुप मोठा आणि दुरगामी प्रभाव पडला असता जनसामान्यांनवर.
माझ्या लेखी रिकाम टोपल डोक्यावरुन फिरणारा राहुल बाबा आणि हातात झाडु घेऊन फक्त २ ऑक्टोबर ला दिसलेले मोदी यात काहीच फरक नाहीये. अशीच जर वरवरची मलमपट्टी होत राहीली तर ५ वर्षा नंतरचा पंतप्रधान चा ऑप्शन ऐकुन पण मला जाम भीती वाटतेय.
सुशांत, अभिनंदनीय
सुशांत,
अभिनंदनीय प्रतिसाद.
सहमती अर्थात आहेच.
इथे आम्ही हेच नेहेमी सांगून सांगून थकलोय, पण ते केवळ आमच्या तोंडून येतंय म्हणून लोक कान बंद करायला लागलेत.
डोळे उघडून भजन बंद होईल तेव्हा कळेल कुठे पोहोचलो आहोत, अन कुठल्या दिशेने जात आहोत ते.
|| जय नरेन्द्रभाई ||
|| जय नरेन्द्रभाई ||
नमोरुग्ण , सोनियारुग्ण ,
नमोरुग्ण , सोनियारुग्ण , राहुल्-प्रियांका-वद्रारुग्ण , पवाररुग्ण, सगळे रुग्णचं भरलेत काय महाराष्ट्रामध्ये ? मला तर वाटलं होतं महाराष्ट्रात मराठी लोकं रहातात ?
<< भाऊ, तुम्ही शिव्या का
<< भाऊ, तुम्ही शिव्या का देताय (सुशांतजी) >> दोष तुमचा नाहीय. निवडणूकीचा शिवराळ प्रचार अजून कानात घुमत असल्याने सौजन्यही शिव्याच वाटल्या असाव्यात तुम्हाला !

<< ..... माझ मत बदलणार नाहीये >> कोण लेकाचा स्वतःचं मत बदलायला येतो इथं ! मला प्रामाणिकपणे काय वाटतं तें मीं लिहीलंय. इतरानीही त्याना काय वाटतं तें लिहीलंय. कोणाचं बरोबर , कोणाचं चूक हें काळ ठरवेलच !!
कोण लेकाचा स्वतःचं मत बदलायला
कोण लेकाचा स्वतःचं मत बदलायला येतो इथं ! >>> भाऊ असे नका बोलू, निष्ठावान कार्यकर्ते (मग ते कोणत्याही पक्षाचे) आणि अंध भक्त (मग ते कोणत्याही नेत्याचे) वगळता आपण सामान्य नागरीक आपली मते बदलण्यावर विश्वास ठेवतो म्हणून तर सत्ताबदल होतात
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=WOtbmn4LKkw
या टॉक शो मध्ये होस्ट सकट पॅनलवरच्या कोणालाही ह्या धाग्यावरचा प्रश्न पडला नाहीये. उलट अर्णवसकट सगळे मोदींनी एवढ्या सभा घेतल्या, तर काँग्रेस हाय कमांडनी का नाही? असा प्रश्न विचारत आहेत.
मलाही हेच वाट्तं की प्रचारासाठी कुणी काय करावं हे ज्यानी त्यानी ठरवावं. कायद्याच्या चौकटीत असल्याशी कारण.
दुसरं, एखाद दोन वेळेला सोडता, मोदी बहुतेक वेळा वस्तीला दिल्लीला जात होते. ३-४ तासांची झोप वगळता त्यांचं प्राणायाम वगैरे रुटीन आणि ऑफीस काम करुन ते दिल्ली सोडत असत. विमानातही कामाच्या फाईल्स बरोबर असत.( त्यांच्या लोकसभेच्या इलेक्शनलाही हाच पॅटर्न त्यांनी राबवला होता. )
प्रचाराच्या सभांसाठी मोदींनी कामाचा वेळ घालवला म्हणणार्यांनी आधीच्या पंप्रंनी १० वर्षांतला बराचासा वेळ ऑफीसमधे असूनही वाया घालवला याचा त्यांना कधी जाब विचारला का? कुठुनही काम करणं महत्वाचं का केवळ ऑफीसमधे असणं महत्वाचं?
Pages