भारताच्या पंतप्रधानांनी विधानसभेच्या प्रचारांत उतरणे योग्य कि अयोग्य ?

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 October, 2014 - 11:40

नुकतेच महाराष्ट्र विधानसभेच्या निमित्ताने शिवसेना-भाजपा युती तुटल्याने भाजपाला अचानक साक्षात्कार झाला की गोपीनाथ मुंडेंच्या पश्चात आज तितक्याच ताकदीचा एकही नेता महाराष्ट्रात तरी त्यांच्याकडे नाही आणि म्हणूनच त्यांनी आपले भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे प्रचारदौरे मोठ्या घाईगडबडीत आखले.

यावरून अगोदरच विरोधकांनी भाजपाला महाराष्ट्रात चेहराच नाही म्हणून त्यांना मोदींना बोलवावे लागले असा ओरडा सुरू केला आहे. अर्थात यामागे मोदींच्या करिष्म्याची भिती असली तरी यात तथ्य आहे हे देखील जाणवते. कारण भाजपाच्या एकूण एक पोस्टरवर श्री नरेंद्र मोदी यांचाच चेहरा झळकतोय, तिथे दुसरा कुठलाही महाराष्ट्रातील भाजपा नेता नाही.

तर, यावरूनच आज एके ठिकाणी चर्चेत मोदींचा उल्लेख ‘भाजपाचे पोस्टर बॉय’ असा झालेला पाहिला. खरे तर यात फारसे काही आक्षेपार्ह वाटले नाही, पण तरीही भारताच्या पंतप्रधानपदी असलेल्या नेत्यावर कुठल्याही प्रकारची व्यक्तीगत टिप्पणी नको म्हणत मी हस्तक्षेप केला. समोरून या आक्षेपाला दाद न देता उलट, "आज मोदी महाराष्ट्राचा दौरा करत आहेत ते भारताचे पंतप्रधान म्हणून नसून भाजपाचे ज्येष्ठ नेते म्हणून करत आहेत तर यात चुकले काय?" असा खडा सवाल आला.

याउपर मोदींनी भाजपाला महाराष्ट्रात सत्ता द्याल तर केंद्रातून मी मदत करेल असाही एक इशारा दिल्याचे ऐकिवात आहे (चूक असेल तर कर्रेक्ट करा).

एकंदरीत स्वत:देखील विचार करता मला जाणवले की ज्यांना आपण देशाचे प्रधानमंत्री बनवून देश चालवायला दिला आहे, त्यांनी देशासमोर समस्यांचा आणि त्यांच्यासमोर कामाचा डोंगर उभा असताना, ती कर्तव्ये टाळून / वा त्या कामांना प्राधान्य न देता, आपल्या राजकीय पक्षातर्फे विधानसभा निवडणूकीच्या प्रचारांना वेळ देणे योग्य आहे का?

अर्थात हा धागा आता काढला, किंवा हे आता सुचले, तरीही हे निव्वळ मोदींना नाही तर आजवरच्या सर्वच आजी-माजी तसेच भावी पंतप्रधानांना देखील लागू. त्यामुळे आधीही असेच व्हायचे, हे सर्वांनीच केलेय, या पोस्ट टाकायला माझी हरकत नाही. पण तटस्थ बुद्धीने विचार करत मुद्द्यावर देखील प्रामाणिक मत मांडा. प्रश्न अगदीच बालिश असेल तर क्षमाही करा. श्री नरेंद्र मोदी यांचाच नाही तर भारताच्या पंतप्रधानपदाचा मान ठेवतच हा प्रश्न विचारला आहे.

जय हिंद !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>मोदीद्वेषाचे "दळन" इथे ही दळतायत हे खांग्रेजी भक्त.<<<

वर त्यासाठीच मयेकरांचे अभिनंदन केले होते की त्यांना मोदीद्वेष व्यक्त करायला आणखी एक धागा मिळाला म्हणून!

देशाच्या पंतप्रधानांनी नुसते कार्यालयात बसुन देशाची प्रगती होणार आहे. काय?
लोक अगदीच बावळट प्रश्न उपस्थित करत आहेत.
दोन चार दिवस इकडे तिकडे फिरकल्याने देशासमोरील समस्यांचा डोंगर वाढणार नाही, गेली ६० वर्षे काँग्रेसने काय केले.

देशाच्या पंतप्रधानांनी नुसते कार्यालयात बसुन देशाची प्रगती होणार आहे. काय?
लोक अगदीच बावळट प्रश्न उपस्थित करत आहेत.
<<
<<
अगदि अगदि.

म्हणजे, हे पंतप्रधान कार्यालयात नुसतं बसतात?
106.gif
विदुषक.. अनुमोदन कशाला देतोय याचं तरी भान ठेवा!

Proud

म्हणजे, हे पंतप्रधान कार्यालयात नुसतं बसतात?>> अहो बसत नाहीत ते रस्ते सुध्दा साफ करायला वेळ देत आहेत.वेळ काढुन काही लोकांना मोदी मॅनीया झाला त्याला कोण काय करणार

मोदी पंतप्रधान झाल्यावर इतक्या लवकर कांहीं राज्यांत निवडणूका येणं यांत मोदींचा हात नक्कीच नसावा. माझं म्हणणं इतकंच कीं केवळ प्रचारसभा गाजवताहेत म्हणून आत्तांच त्यांच्यावर तुटून पडणं न्याय्य आहे का ? किमान एक वर्ष तरी ते देशाला कोणत्या दिशेने नेवूं पहाताहेत हें बघायला नको ? आपण खरंच इतके द्रष्टे आहोत कीं इतक्या अल्पावधीत त्यांच्यावर व त्यांच्या मंत्रीमंडळावर अधिकारवाणीने काट मारण्याचा आपल्याला हक्क मिळतो ?

आपण खरंच इतके द्रष्टे आहोत कीं इतक्या अल्पावधीत त्यांच्यावर व त्यांच्या मंत्रीमंडळावर अधिकारवाणीने काट मारण्याचा आपल्याला हक्क मिळतो ?<<<

अहो भाऊसाहेब, १७ मे रोजी मोदी पंतप्रधान म्हणून कसे नालायक आहेत हे कीर्तन सुरूही झालेले होते इथे! आता त्यांना अतृप्त आत्मे असे संबोधायला आम्हालाच चार महिने इतका प्रदीर्घ कालावधी लागला तरी ते म्हणतात की आम्ही व्यक्तीगत बोलतो. वास्तविक पाहता मिसेस मोदींचा पन्नास वेळा नको तसा उल्लेखही त्यांच्यापैकी एकाने येथेच केलेला आहे.

आता हा धागा आणखी एक मिळाला आहे त्यांना मोदींवर टीका करण्यासाठी!

अहो बसत नाहीत ते रस्ते सुध्दा साफ करायला वेळ देत आहेत.वेळ काढुन काही लोकांना मोदी मॅनीया झाला त्याला कोण काय करणार
<<
ते पंतप्रधानांचं काम आहे? 13.gif

का ही ही बोलतात राव लोक आजकाल Sad

ते पंतप्रधानांचं काम आहे?
<<
<<
असाच विचार कालपर्यंतच्या प्रत्येक पंतप्रधान व देशातील सव्वाशे करोड जनतेने केल्यामुळे, आज मोदींना स्वत: हातात झाडु घेऊन "सार्वजनिक स्वच्छतेचे" महत्व जनतेला पटवुन द्यावे लागत आहे.

मी तुम्हाला एक मार्क दिला विदुशक

अजुन मार्क हवे असतील तर तुमच्या डु आयडीने हवे तितके मार्क घ्या.

Proud

मोदीजींनी कुणाचीही पर्वा न करता सभा सुरुच ठेवल्यात.

आज पर्यत कोणीच पंतप्रधान राज्याच्या निवडणुकीत प्रचाराला गेलेच नाहीत का ? माझ्याजवळ आकडेवारी नाही पण शोघता येईल.

इब्लिस | 7 October, 2014 - 03:34 नवीन
अन जुन्या पंतप्रधानांबद्दल अश्लाघ्य भाषेत बोलताना, राधासुता,...

<<<

मागे एकदा राधासुता म्हणल्यावर एका माणसाला राग आला होता ते आठवले Wink

आज व्हॉटसॅपवर मेसेज फिरतोय, गुजरातहून देखील बरेच आमदार प्रचाराला आलेत, अर्थात तेथील आपापल्या विभागातील कामे सोडूनच. यथा राजा तथा सेना.
पोलिंग बूथ वर बसणारे एजंटही तिथूनच आले तर नवल वाटायला नको.
बाहेरून कुमक मिळवणारे, महाराष्ट्रात स्वताचा चेहरा नसणारे, महाराष्ट्रात पुर्ण सत्ता मिळवायची स्वप्ने कसे पाहू शकतात?

द्रौपदीचा पांडवांवरचा राग आतां बराचसा निवळला असावा; तिच्यासाठी पांच पांडव एकमेकांचंच असं वस्त्रहरण करताना बघून हंसतही असेल ती गालांतल्या गालांत!! Wink
'भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठीं आतां सेना+मनसे+राष्ट्रवादी युति होणार '- शरद पवारांचा हवाला देत आजच्या 'आफ्टरनून'चा मुख्य मथळा !!!

या पेक्षा एक पाऊल पुढे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचा मुख्य्मंत्री महाराष्ट्रात मान्य होणार नाही म्हणुन जिथे भाजप विरुध्द शिवसेना लढाई आहे तिथे राष्ट्रवादी आणि कोंग्रेसचे खास लोक शिवसेनेला मतदान करणार आहेत.

राष्ट्रवादीचा भ्र्ष्टाचार झाकला रहावा या साठी १५ वर्षे विरोधात राहिलेल्या शिवसेनेला पवार साहेब घोड्यावर बसवत आहेत.

भाजपला एकट पाडुन तीन पक्ष पुढची पाच वर्षे आपली पोळी भाजण्याच्या प्रयत्नात आहेत.

अहो पंतप्रधानानी प्रचारात उतरावे नाही असा धागा आहे. त्यात पतिंगराव ,रा का, काँ, शिस, भाजप यांच्या कुरघोड्याचा कुठे संबंध येतो ? पंप्र,वडाप्रधान, प्रसे याबाबत बोला. त्यावर पूर्वीचे पंप्र नव्हते का येत वगैरे आहे. पण कोणत्याही पंप्रने आपले कामधाम सोडून येणे उचित आहे की नाही हा खरा मुद्दा आहे. त्यावर कन्सेप्ट म्हणून बोलावे अशि णम्ब्र इनन्ति हय..... Happy

पक्षाच्या प्रचारात प्रधान मंत्री उतरल्यास वावगं काय आहे? २००९ च्या विधान सभा निवडणूकीत आमच्या अकोल्यात मनमोहन सिंगांची पण सभा झाली होती..

२००९ ला झाले ते देखील चूकच. (माझ्या मते) जेवढ्या मोठ्या प्रमाणावर होईल त्याच्या पटींनी हि चूक वाढत जाईल आणि आता फारच मोठ्या प्रमाणावर होतेय असे जाणवलेय म्हणून हा मुद्दा उपस्थित केलेला.
जणू काही महाराष्ट्राची सत्ता काबीज करणे हेच एक ध्येय. हिच मोठी प्रायोरीटी.
पण एक चांगलेय, त्या निमित्ताने आम्हा मुंबईकरांनाही ठिकठिकाणी पंतप्रधानांचे सहजसुलभ दर्शन झाले Happy

अवांतर - २००९ साल .. तेव्हा नव्हतो मी मायबोलीवर Happy

<< पण कोणत्याही पंप्रने आपले कामधाम सोडून येणे उचित आहे की नाही हा खरा मुद्दा आहे. >>
१]पंतप्रधान झालेल्या व्यक्तीने आपल्या पक्षाची बांधिलकी तोडली तरच तो खरा पक्षातीत असा सर्व देशाचा आदर्श नेता होतो, हा समज बहुपक्षीय लोकशाहीत समर्थनीय नसावा. महत्वाचे राष्ट्रीय निर्णय घेताना मात्र पक्षपातीपणा नसावा, एवढीच रास्त पण ठाम अपेक्षा पंतप्रधानांकडून करणं योग्य;
२] निवडणूकीत पक्षाच्या प्रचाराचे काम करणं म्हणजेच 'आपले कामधाम सोडून येणे' असं सरळ समीकरणच मांडणं चूकीचं ठरेल. आपलं काम [ पंतप्रधान म्हणून] त्यानी खरंच त्यासाठीं दुर्लक्षलं आहे, हें स्पष्ट व्हावं लागेल. केवळ दिल्लीत आपल्या कार्यालयात असणं, हें सगळेच तांतडीचे निर्णय घेण्यासाठी व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असतंच असं नाही. [ ' परत पाककडून सीमेवर गोळीबार झाला तर त्याला तसंच प्रत्युत्तर द्या', असं ठामपणें सांगायला पंतप्रधानाने दिल्लीत असण्याची किंवा सीमेवर जाण्याची गरज नसावी; पाकच्या आतांच्या प्रतिक्रियेवरून भारतीय सेनेला अशा सूचना दिल्या गेल्या होत्या व त्याची योग्य अंमलबजावणीही झाली असावी, असं वाटतं ];
३] मुंबई-महाराष्ट्रात स्वच्छ व कार्यक्षम शासन येणं, हें देशाच्या हिताच्या दृष्टीने आत्यंतिक महत्वाचं आहे असं जर देशाच्या पंतप्रधानाना वाटलं तर त्या दॄष्टीने त्यानी केलेले प्रयत्न ' कामधाम सोडून येणं' या संज्ञेत बसणार नाहीत.

' परत पाककडून सीमेवर गोळीबार झाला तर त्याला तसंच प्रत्युत्तर द्या', असं ठामपणें सांगायला पंतप्रधानाने दिल्लीत असण्याची किंवा सीमेवर जाण्याची गरज नसावी; पाकच्या आतांच्या प्रतिक्रियेवरून भारतीय सेनेला अशा सूचना दिल्या गेल्या होत्या व त्याची योग्य अंमलबजावणीही झाली असावी, असं वाटतं
<<

हसून मुरकुंडी वळली भाऊ. तुमच्यातला इनोसन्स असाच जपून ठेवा.

हॅप्पी मोदी टू यु.

(रच्याकने : ज्या पाकिस्तानला २दा धूळ चारली, अन त्याचे दोन तुकडेही केले, त्या काँग्रेसचा सरकारने सैन्याला 'पाककडून गोळीबार झाला, तर प्रत्युत्तर देऊ नका' असे सांगितले असेल, असे तुमच्या 'बी'बुद्धीला वाटतेय का?)

<< हसून मुरकुंडी वळली भाऊ.>> माझ्या पोस्टचं सार्थक झालं ! Wink
<< त्या काँग्रेसचा सरकारने 'पाककडून गोळीबार झाला, तर प्रत्युत्तर देऊ नका' असे सांगितले असेल,असे तुमच्या 'बी'बुद्धीला वाटतेय का?)>> नाही. पण ' मीं महाराष्ट्रात प्रचाराला जातो .तुम्ही खुशाल करत रहा सीमेवर गोळीबार', असंच जणूं सध्यांच्या पंतप्रधानानी पाकला सांगितल्याचं प्र-बुद्धिवंतांकडून सुचवलं जातंय, तें खूपच हास्यास्पद वाटतंय माझ्या ब-बुद्धीला.
आणि, मुख्य म्हणजे 'देशाच्या पंतप्रधानानी विधानसभेच्या प्रचारासाठी उतरणं योग्य कीं अयोग्य', हा मुख्य मुद्दा आहे; इथं, नरेंद्र मोदीनी तसं उतरावं कीं नाहीं, याचं फक्त नकारार्थी उत्तरच हवंय कांही प्र-बुद्धिवंताना, असाही समज झालाय माझ्या ब-बुद्धीचा !
[* प्र = प्रगल्भ ]

भाऊ,
पंतप्रधान कुठेही गेले, तर उरलेले मंत्रीमंडळ सक्षम अन हवी ती जबाबदारी सांभाळून घेण्यासारखे हवे, अशी एक कन्सेप्ट आहे.
त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं?

शिवाय, ते पाकिस्तान सीमेबद्दल जे काय लिहिलंत त्याला बगल दिलीतच? तिथे प्रबुद्धी कुठे गेली?

>>> इब्लिस | 13 October, 2014 - 23:11 नवीन

बेफि, यावेळी चक्क स्वतःच्या आयडिने झिल?
<<<

इब्लिस,

तुम्ही सैरभैर व मानसिकरीत्या अस्थिर झालेला आहात. तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. दिसेल त्या धाग्यावर नाचताय. हे बरे नाही,

कठीण आहे. आता मानसशास्त्रातही प्राविण्य का तुमचं? बरंय.
अरे हो. तुमच्याकडचे कमळ वा इतर भगवे उमेदवार कोण? स्वच्छ अन मोदींचे 'हात' बळकट करणारे असतीलच?
हॅप्पी मतदान तुम्हाला.

<रच्याकने : ज्या पाकिस्तानला २दा धूळ चारली, अन त्याचे दोन तुकडेही केले, त्या काँग्रेसचा सरकारने सैन्याला 'पाककडून गोळीबार झाला, तर प्रत्युत्तर देऊ नका' असे सांगितले असेल, असे तुमच्या 'बी'बुद्धीला वाटतेय का>
ती पाकीस्तान ला धूळ चारणारी काँग्रेस केव्हाच संपली असं तुम्हीच अनेक दा अनेक धाग्यांवर लिहीलयं इब्लिस भौ...

मागचि दहा वर्ष मन मोहन सिंग पंत प्रधान होते.. त्यांनी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी व्यतरिक्त कधिहि भाषण केलेले आठ्वत नाहि.. खरच मोहन सिंग बोलायचे का?

पंप्रनी भाषण करावं पण उगाच खोटं बोलू नये. तुम्ही म्ह्णणार महाराष्ट्राचे तुकडे करणार नाही. मग लगेच गडकरी-फडणवीस म्हणणार- आम्ही तुकडे करणारच.
तुमच्याच पक्षात नरेंद्र एक बोलणार देवेन्द्र बरोब्बर उलटं बोलणार.
काय चाललंय?

>>>पंप्रनी भाषण करावं पण उगाच खोटं बोलू नये.<<<

खोटं बोलण्याचा इतिहास खणून काढला की अशी तुरळक सैल विधाने कशी घाईघाईने केलेली असतात हे सत्य समोर येईल.

Pages