भारताच्या पंतप्रधानांनी विधानसभेच्या प्रचारांत उतरणे योग्य कि अयोग्य ?

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 October, 2014 - 11:40

नुकतेच महाराष्ट्र विधानसभेच्या निमित्ताने शिवसेना-भाजपा युती तुटल्याने भाजपाला अचानक साक्षात्कार झाला की गोपीनाथ मुंडेंच्या पश्चात आज तितक्याच ताकदीचा एकही नेता महाराष्ट्रात तरी त्यांच्याकडे नाही आणि म्हणूनच त्यांनी आपले भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे प्रचारदौरे मोठ्या घाईगडबडीत आखले.

यावरून अगोदरच विरोधकांनी भाजपाला महाराष्ट्रात चेहराच नाही म्हणून त्यांना मोदींना बोलवावे लागले असा ओरडा सुरू केला आहे. अर्थात यामागे मोदींच्या करिष्म्याची भिती असली तरी यात तथ्य आहे हे देखील जाणवते. कारण भाजपाच्या एकूण एक पोस्टरवर श्री नरेंद्र मोदी यांचाच चेहरा झळकतोय, तिथे दुसरा कुठलाही महाराष्ट्रातील भाजपा नेता नाही.

तर, यावरूनच आज एके ठिकाणी चर्चेत मोदींचा उल्लेख ‘भाजपाचे पोस्टर बॉय’ असा झालेला पाहिला. खरे तर यात फारसे काही आक्षेपार्ह वाटले नाही, पण तरीही भारताच्या पंतप्रधानपदी असलेल्या नेत्यावर कुठल्याही प्रकारची व्यक्तीगत टिप्पणी नको म्हणत मी हस्तक्षेप केला. समोरून या आक्षेपाला दाद न देता उलट, "आज मोदी महाराष्ट्राचा दौरा करत आहेत ते भारताचे पंतप्रधान म्हणून नसून भाजपाचे ज्येष्ठ नेते म्हणून करत आहेत तर यात चुकले काय?" असा खडा सवाल आला.

याउपर मोदींनी भाजपाला महाराष्ट्रात सत्ता द्याल तर केंद्रातून मी मदत करेल असाही एक इशारा दिल्याचे ऐकिवात आहे (चूक असेल तर कर्रेक्ट करा).

एकंदरीत स्वत:देखील विचार करता मला जाणवले की ज्यांना आपण देशाचे प्रधानमंत्री बनवून देश चालवायला दिला आहे, त्यांनी देशासमोर समस्यांचा आणि त्यांच्यासमोर कामाचा डोंगर उभा असताना, ती कर्तव्ये टाळून / वा त्या कामांना प्राधान्य न देता, आपल्या राजकीय पक्षातर्फे विधानसभा निवडणूकीच्या प्रचारांना वेळ देणे योग्य आहे का?

अर्थात हा धागा आता काढला, किंवा हे आता सुचले, तरीही हे निव्वळ मोदींना नाही तर आजवरच्या सर्वच आजी-माजी तसेच भावी पंतप्रधानांना देखील लागू. त्यामुळे आधीही असेच व्हायचे, हे सर्वांनीच केलेय, या पोस्ट टाकायला माझी हरकत नाही. पण तटस्थ बुद्धीने विचार करत मुद्द्यावर देखील प्रामाणिक मत मांडा. प्रश्न अगदीच बालिश असेल तर क्षमाही करा. श्री नरेंद्र मोदी यांचाच नाही तर भारताच्या पंतप्रधानपदाचा मान ठेवतच हा प्रश्न विचारला आहे.

जय हिंद !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुठुनही काम करणं महत्वाचं का केवळ ऑफीसमधे असणं महत्वाचं?>>>>>>>>>>>>.. हाहा केवळ ऑफीसमधे असणं महत्वाचं हा काही आयटी कम्पन्याचा प्रमोशनचा क्रायटेरिया आहे...........बाकी चालू दे

एखाद दोन वेळेला सोडता, मोदी बहुतेक वेळा वस्तीला दिल्लीला जात होते. ३-४ तासांची झोप वगळता त्यांचं प्राणायाम वगैरे रुटीन आणि ऑफीस काम करुन ते दिल्ली सोडत असत. विमानातही कामाच्या फाईल्स बरोबर असत.
>>>>>>>>>>

खूपच समर्थन केल्यासारखे वाटतेय हे.
जर एवढे स्पष्टी द्यायची गरज भासत असेल तर मला वाटते मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळालेय Happy

असो, पण यानुसार, रोजचा महाराष्ट्र-दिल्ली जाऊन येऊन प्रवास, फक्त ३-४ तास झोप(?), विमानातही काम म्हणजे तिथेही झोप नाहीच, सभा घेणे म्हणजे ते देखील खूपच दमछाकवालेच काम ... हे जर सर्व खरे मानले तर, शरीरस्वास्थावर परीणाम नाही होणार.. पंतप्रधानांनी तब्येत जपायला नको.. राजकीय पक्षाच्या प्रचारासाठी तब्येतीची हेळसांड करणेही चूकच नाही का?

किंबहुना आपले हे वर्णन असेच सुचवतेय की एवढा जर त्रास पंतप्रधानांना होत असेल तर हे नक्कीच अयोग्य आहे. Happy

...

आधीच्या पंप्रंनी १० वर्षांतला बराचसा वेळ ऑफीसमधे असूनही वाया घालवला याचा त्यांना कधी जाब विचारला का?
>>>>>>
आधीचे पंतप्रधान केवळ कार्यालयात बसून असायचे हे आपण कश्याचा बेसिसवर म्हणत आहात?
ते देखील मनमोहनसिंग यांच्याबद्दल बोलत असाल तर आपण त्यांची बुद्धीमत्ता आणि पात्रता ओळखलीच नाही असे म्हणावे लागेल.

असो, धागा मी काढला तेव्हा काढला, मला प्रश्न पडला तो पडला, पण हा प्रचार नक्कीच अति झाला आहे हे कोणी मान्य का करत नाही? चूक की बरोबर हे सुद्धा मग त्यानंतर आले.

Proud

मोदी नावाचा एक नवा चेहेरा याच्यापलीकडे भाजपाकडे काही नाहीच.

मंदिर मुद्दा होता तेंव्हा मंदिर राम कारसेवक इ इ चित्रे असायची.

लोकसभेला काँग्रेसच्या विरोधात महागाईची चित्रे छापली. पण हे सत्तेवर आल्यावर त्यानी हेच केले.

अता मोदीचा फोटो आणि छत्रपतीनचे आशिर्वाद (!)याच्यापलीकडे जाहिरातीत काहीच नव्हते.

<आधीच्या पंप्रंनी १० वर्षांतला बराचासा वेळ ऑफीसमधे असूनही वाया घालवला याचा त्यांना कधी जाब विचारला का?>

पुणे नगरपालिकेच्या ढेकूण मारण्याच्या खात्यात काम करणार्‍यांनी विश्वाच्या निर्मितीबद्दल बोलावे etc

पुलंचा नगरपालिकेत ढेकूण मारण्याच्या खात्यात काम करणार्‍यांनी इ. इ. तुच्छतादर्शक वाक्ये टाळावीत. कधी काळी हे वाक्य विनोदी असेलही. पण आज जर कुणी नागरिक पंतप्रधानांना जाब विचारत असेल तर त्याला तो हक्क आहे. लोकशाहीत ढेकूण वा उंदीर मारणारा आणि अब्जावधींचा मालक असणारा हे नागरिक म्हणून, लोकशाहीतील सदस्य म्हणून समान असतात. उलट आपले मत सत्कारणी लागले की नाही हे जाणून घेणारा एक जागरुक नागरिक म्हणून त्याला आदर मिळायला हवा. तो त्याचा अधिकार आहे. एखादा अमक्या निम्न पदावर आहे म्हणून त्याने आपली जागा ओळखून गरीबासारखेच वागले पाहिजे हा एक अत्यंत उन्मत्त हुकुमशाहीत वा राजेशाहीत शोभणारा विचार आहे. पण आपली राजेशाही (निदान पाच वर्षाकरता तरी) मे महिन्यात संपली आहे तेव्हा असला दृष्टीकोन बदलला तर बरे. असो.
मोदींंनी प्रचार करुन भाजपाचे स्थान बळकट करून दिले आहे असे म्हणायला जागा आहे. ह्या प्रचारापायी केंद्राच्या कारभारात ढिसाळपणा झाला आहे असा काही ठोस पुरावा आढळला तर मोदींवर जरूर टीका करावी. पण तसा पुरावा नसताना तसे झालेच आहे असे गृहित धरून त्यांना धोपटणे हे आंधळ्या द्वेषाचे निदर्शक आहे.
पंतप्रधानांनी आपल्या पक्षाकरता काहीच प्रचार करता कामा नये असा कुठला कायदा नाही. तसा संकेतही असल्याचे ऐकिवात नाही. माजी पंतप्रधान मौनीबाबासिंग हे तोंडच उघडत नसत. मग तो अगदी स्वतःच्या पक्षाकरता का असेना. पण तोच कित्ता ह्या पंतप्रधानानीही गिरवावा ही अपेक्षा मूर्खपणाची आहे. उत्तम वक्तृत्व हे लोकशाहीतील सर्वमान्य शस्त्र आहे. त्याने भल्याभल्या विरोधकांना नामोहरम करता येते. असे अमोघ शस्त्र बाळगणारे मोदी जर महाराष्ट्रात प्रचारात उतरले तर त्यात वावगे काही नाही. शिवसेनेपासून वेगळे लढावे लागल्यामुळे अशी "खास" कुमक मागवणे आवश्यकच होते आणि ते भाजपाने केले. त्याचे फळ त्यांना मिळेल असे जनमत चाचण्यांवरून तरी वाटते आहे. खरेखोटे १९ तारखेला कळेलच.

शेंडेनक्षत्र, पुलंचे ते वाक्य आजवर मायबोलीवर अनेकवेळा quote केले गेले आहे. आक्षेप मात्र आज पहिल्यांदाच घेतला गेला आहे. की अमुक पंतप्रधानांबद्दल तुच्छतादर्शक विधाने करणे तेवढे शिष्टसंमत असते असे काही आहे का?

अमुक पंतप्रधानांबद्दल तुच्छतादर्शक विधाने करणे तेवढे शिष्टसंमत असते असे काही आहे का?
>>
अहो मयेकर, तुम्ही त्या उदाहरणात कोणाही पंतप्रधानांचा तुच्छतादर्शक उल्लेख केलायच नाही मुळी तर जाब विचारण्याला तुच्छ लेखलेय असे म्हणू शकतो.

अर्थात हे देखील चूकच आहे आणि त्याची नक्षत्रे यांनी केलेल्या कारणमीमांसेशी मी सहमत!

पण मग हेच मोदींना जाब विचारणार्‍यांनाही लागूच ना Happy

आता ते इथे म्हणतात >>>> ह्या प्रचारापायी केंद्राच्या कारभारात ढिसाळपणा झाला आहे असा काही ठोस पुरावा आढळला तर मोदींवर जरूर टीका करावी. >>>> एक सामान्य नागरीक म्हणून हा पुरावा मी कसा शोधू शकतो? कि मग तो न मिळाल्याने आक्षेप घ्यायचाच नाही. इथे आधीच्या सरकारवर टिका करणार्‍यांनी सर्व पुरावे आणि संबंधित कागदपत्रे तपासून मगच आपला जाब विचारण्याचा हक्क बजावला होता का?

सिंपल लॉजिक आहे, दिवसाचे २४ तास पैकी कोणी १२-१४ तास प्रचारात घालवत असेल तर त्यांचे त्यांना नेमूण दिलेल्या ईतर कामांकडे दुर्लक्षच होत असेल की नाही. हा कॉमनसेन्स वापरून नाही का जाब विचारू शकत.

पण आज जर कुणी नागरिक पंतप्रधानांना जाब विचारत असेल तर त्याला तो हक्क आहे.
<<
सीधी बात.
मोदींना जाब विचारीत आहोत.
तुमचं जळतं कुठेय?

ऋन्मेऽऽष , माझ्या दोन्ही प्रतिसादांना काही थोडेसे जुने संदर्भ आहेत. ते तुम्हाला माहीत नसतील.
<पण मग हेच मोदींना जाब विचारणार्‍यांनाही लागूच ना> हेच तर मी म्हणतोय. मोदींना जाब कोण विचारणार? पण त्यांच्या कामाबद्दल काही बोलले की ते पुलंचं वाक्य धावत येतं. (तेव्हा ते कोणाला खटकत नाही.) तर मनमोहनसिंग यांच्याबद्दल बोलल्यावर का येऊ नये?
असो.

सामान्य नागरीक म्हणून जाब विचारणे वेगळे आणि आमच्याच मालकीचा देश आहे अश्या थाटात जाब विचारणे वेगळे!

मयेकर,

ते विधान तुम्हाला उद्देशून ज्यांनी लिहिले होते त्यांनाच उद्देशून तुम्ही ते लिहिले असतेत तर चर्चा कशाला झाली असती? नक्षत्रांना उद्देशून लिहिल्यामुळे चर्चा होते आहे, नक्षत्र आणि ऋन्मेष ह्यांना संदर्भच माहीत नाही आहे.

तथ्ये मांडणे आणि थापा मारणे यासुद्धा दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

हे जनरल आहे. कोणी अंगाला लावून घेतलेच पाहिजे असे नाही.

सामान्य नागरीक म्हणून जाब विचारणे वेगळे आणि आमच्याच मालकीचा देश आहे अश्या थाटात जाब विचारणे वेगळे!
>>>>>>>
आतापर्यंत झालेल्या चर्चेतील या दोहोंचे एकेक उदाहरण देता येईल का? सुस्पष्टता येण्यासाठी.

माझे एखादे विधान दुसर्‍या प्रकारात मोडले तर मला खरोखर खेद होईल.
अर्थात ते आपले मत आणि आपलेच निकष असतील, मी त्यावर वाद घालू इच्छिणार नाही. पण मला माझी चूक आढळली तर सुधारणा नक्की करेल.

मला माझी चूक आढळली तर सुधारणा नक्की करे.<<< ??

ऋन्मेष,

ह्यातले तुम्हाला उद्देशून काहीही चाललेले नाही आहे. एन्जॉय करा.

मोदींनी आपले काम केले आहे जेव्हा भाजपाकडे आश्वासक चेहरा नाही आहे तेव्हा त्यांनी ती जागा भरुन काढली आहे. परंतु काही दिवसात त्यांना त्याजागेवर कुणालातरी बसवावेच लागेल अन्यथा व्यक्तिकेंद्रीत भाजपा म्हणुन जास्त हेटाळणी कदाचीत भाजपाची होउ शकते. ( अर्थात झाली तरी ठिक आहे कारण इतर पक्षांमधे देखील तेच घडत आहे. परंतु भाजपाला आपण वेगळे दाखवण्याची गरज आहे . वेगळेपणा आहे म्हणुन निवडुन आले आहेत )
असो. आता मोदीसाहेब आपले सगळे लक्ष केंद्राकडे वळवतील. आणि जोमाने काम करतील.

कोकणस्थ आपले प्रतिसाद निव्वळ आगी लावण्यासाठीच असतात हे काही दिवसांपासुन दिसुन आले आहे. आपण मोदीसाहेबांचे अतिगुण गाण्याच्या नादात त्यांचाच अनादर करायला इतरांना जास्त प्रवृत्त करत आहे. त्यामुळे कृपया मोदीसाहेबांचा अनादर होउ नये याचा आपण प्रयत्न करावा ही विनंती.

आम्ही आमच्या माननिय पंतप्रधानाचा अनादर होउ नये म्हणुन सांगत आहोत परंतु आपले उत्तर असे उध्द्त असेल वाटले नव्हते.
असो.

मोदींच्या प्रचाराने काय घडायचे ते घडले आहे. हा घागा आज बंद करायचा की भाजपच्या मुख्यमंत्र्याचा शपतविधी झाल्यावर ते ठरवा.

>>सिंपल लॉजिक आहे, दिवसाचे २४ तास पैकी कोणी १२-१४ तास प्रचारात घालवत असेल तर त्यांचे त्यांना नेमूण दिलेल्या ईतर कामांकडे दुर्लक्षच होत असेल की नाही. हा कॉमनसेन्स वापरून नाही का जाब विचारू शकत.
<<

तुम्ही असे गृहित धरत आहात की नेहमीच्या, रोजच्या कामात मोदी पक्षाचे काम करतच नाहीत. त्यामुळे तुम्हाला त्यांच्या कामांमुळे काही परिणाम जाणवला असेल तर जरूर आक्षेप घ्या. निव्वळ आपला कॉमन सेन्स अमुक सांगतो म्हणून मोदींंना तो लागू होणारच हे पटण्याजोगे नाही. माहितीचा अधिकार वापरुन गेल्या महिन्यात किती कामे झाली? त्या आधीच्या महिन्यापेक्षा ती कामे किती कमी होती? वगैरे शोधता येईल. इच्छाशक्ती असल्यास. निव्वळ मला वाटते म्हणून तसेच असणार हा आक्षेप तर्कशुद्ध नाही. काहीतरी वस्तुनिष्ठ मापदंड वापरून तसा दावा केलात तर जास्त बरे. अर्थात प्रचारामुळे काय मिळवले आणि काय गमावले ह्याचा व्यवस्थित हिशेब असला पाहिजे.

<<
सामान्य नागरीक म्हणून जाब विचारणे वेगळे आणि आमच्याच मालकीचा देश आहे अश्या थाटात जाब विचारणे वेगळे!
<<
पुन्हा तेच. देश हा सामान्य नागरिकांचाच आहे. कुण्या राजघराण्याचा नाही. लोकशाही म्हणजे लोकांचे राज्य, शब्दशः अर्थही तोच आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला अत्यल्प प्रमाणात का होईना देश हा आपला आहे, आपला त्या देशावर हक्क आहे आणि देशाप्रती कर्तव्य आहे असे दोन्ही वाटले तर वाईट काय आहे?

प्रश्न पडणे आणि आरोप करणे यात फरक नाही का?
धाग्याचे शीर्षक आणि पहिल्या पोस्टवरूनही ते जाणवते. त्यानंतर पुढे मलाच स्वत:ला या धाग्यावर समजले की मोदी कसे रोजच दिल्ली-महाराष्ट्र प्रवास, विमानात काम, ३-४ तासांची झोप वगैरे त्रास घेत आहेत. त्यामुळे माझ्या शंकेला पुष्टी मिळत आहे.

अवांतर - माहितीचा अधिकार वापरणे हि कल्पना छान आहे, पण सध्या जरा कामात फारच बिजी असल्याने फॉलोअप नाही घेऊ शकणार. Happy

पुन्हा तेच. देश हा सामान्य

पुन्हा तेच. देश हा सामान्य नागरिकांचाच आहे. कुण्या राजघराण्याचा नाही. लोकशाही म्हणजे लोकांचे राज्य, शब्दशः अर्थही तोच आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला अत्यल्प प्रमाणात का होईना देश हा आपला आहे, आपला त्या देशावर हक्क आहे आणि देशाप्रती कर्तव्य आहे असे दोन्ही वाटले तर वाईट काय आहे?
<<

केवळ इतक्याच भूमीकेतून भाजपाने इमानदारीत काम केले असते तर काँग्रेसला सशक्त पर्याय म्हणून मी सर्वात आधी सपोर्ट केला असता, जसा जनता पक्षाला केला होता.

पण,
अमुक धर्माचा म्हणून तू देशद्रोहीच.
तमुक जातीचा म्हणजे छोटी शिडीवाला ना?

- असल्या प्रकारच्या मानसिकता मला आवडत नाहीत. या गोष्टी संघाच्या, भाजपाच्या मूलभूत प्रचाराचा, विचारांचा मध्यवर्ती भाग आहेत. अन तो तसा प्रचार करताना यांनी हुशारीने, 'काँग्रेस्वाले यांना रिझर्वेशन देतात, अन त्यांचे लांगूलचालन करतात, म्हणून आम्ही यांना हीन लेखतो, आम्हीच खरे हिंदूंचे तारणहार!' अशी हवा निर्माण केलिये, अशी हवा करण्यात हे यशस्वी झालेत. एकाच देशाच्या नागरिकांत धर्म/जातींवर उच्चनीचता निर्माण करा असे सांगणारी, तसे वागणारी भिक्कारचोट इस्लामी राष्ट्रे या बाबतीत यांचा आदर्श होत. हे मला पटत नाही, मान्य नाही.

दुसरा 'विकास'

'विकासा'च्या नावाखाली सरदार सरोवरापासून जे काय घडतंय, अन पुढे सुरू ठेवण्यात आलंय, ते धनदांडग्यांचं तुष्टीकरण मला मान्य नाही. वरून ऑर्डर काढून वेठबिगारीसारखा चालवण्यात येणारा चीन यांचा आदर्श आहे. या दोन बेसिक मुद्द्यांवर तर माझा भाजपाला विरोध राहीलच राहील.

हा विरोध मला उपलब्ध असलेल्या सर्व प्लॅटफॉर्म्सवर मी नोंदविणारच.

उदा. या सरकारचे रिसेंट काम पहायचे, तर श्रमेव जयते लाँच करताना, रोजगार हमी योजना मोडीत काढणे आलेच. त्यात मागेल त्याला काम, हे तत्व गुंडाळून ठेवले गेले आहे. अनेक कामगार संघटनांनी श्रमेवजयतेला विरोध नोंदवला आहे. या अशा लोकांच्या(ही) विरोधाचं कारण निखळ व्यक्तिगत मोदीद्वेष असे नसते, हे आमचे मित्र बेफिकिर व आमचे अहितचिंतक मंदार जोशी यांना उमजेल, तो सुदिन.

कामगार कायदा, किमान वेतन कायदा, इ. मुळे मला काय त्रास होतो ते एक रोजगारनिर्माता म्हणून मला ठाऊक आहे, अन ते इन्स्पेक्टर राज श्रमेवजयतेमुळे कटले तर माझ्यातल्या भांडवलदाराला व्यक्तीशः आनंद होईलच. पण यातून पुढे काय होते, इतर हॉस्पिटलांत/फॅक्टर्‍यांत ३-४ हजार रुपये महिना पगारात कसे लोक राबवून घेतले जातात हे देखिल मला ठाऊक आहे.

पॉलिसी डिसिजन्स घेताना संपूर्ण भारताचा विचार होत नाहिये. मोदी संपूर्ण देशाचे पंतप्रधान असल्यासारखे वागल्याचे दिसत नाहिये, हा आक्षेप आहे.

भाजपाचे सरकार आहे, अन ते किमान ५ वर्षे तिथेच रहाणार आहे व मोदी त्याचे प्रमुख आहेत, हे न समजायला आम्ही दूधखुळे नाही आहोत.

विरोधी पक्षांचे काम सकारात्मक असायला हवे. सरकारने घेतलेल्या निर्णयांवर टीका, चर्चा ही झालीच पाहिजे, त्यातून घडणार्‍या चुकीच्या गोष्टींवर बोलले गेलेच पाहिजे. सभागृहात शिमगा करणार्‍यांनी सत्तेत आल्यावर किमान इतके ऐकलेच पाहिजे.

भाजपाच्या कोलांटउड्या दाखवून दिल्यावरही फक्त भजनेच सुरू आहेत. हे सामान्यांना दिसतेच आहे.

इलेक्शन संपल्याबरोब्बर जयललितांना बेल मंजूर झालाय. - आम्ही भ्रष्टाचार टॉलरेट करत नाही असे आधी डींडीम वाजत होते. आता त्याची गरज उरली नाहीये.

३ वर्षांचा 'मेडिकल' कोर्स बीएस्सी नंतर करून 'खेड्यातल्या' लोकांच्या आरोग्याची 'सोय' लावली जाणारे. खेड्यांतले लोक काय जनावरे आहेत का? अहो, Bachelor's in Veterinary Science is a full time course of 5 years duration which includes a total of 9 semesters.!!

पॉलिसी डिसिजन्स!

यांच्याबद्दल बोलू नका. डिझेल पेट्रोलच्या भावाबद्दल बोलू नका. फक्त भजनं करायची का?

इथे होतंय काय की, स्पेसिफिकली बेफिकीर व मंदार जोशी हे दोन लोक अनेक डूआयड्या, व नितीनचंद्रांसारख्या काहींच्या मदतीने फक्त जितंमया करताहेत. मग यांना यांच्याच भाषेत उत्तर देताना फक्त धुळवड होते. अन नाईलाजाने आम्हालाही हात चिखलात बुडवावे लागतात. हा धागा वाहता होण्याचे कारण हेच लोक आहेत.

तेव्हा, मायबोलीवर आलो त्या दिवसापासून सांगतोय ते पुन्हा एकदा सांगतो,

हा देश माझा(ही) आहे. मी(ही) हिंदू(च) आहे. अन या दोन्ही बाबतीत मी तुमच्या(कोण ते पुन्हा लिहीत नाही)पेक्षा जास्त चांगला भारतीय व हिंदू आहे.

या देशात, अजून तरी, मला वाटेल ते बोलण्याचा, माझे मत मांडण्याचा मला हक्क आहेच आहे.

>>>इथे होतंय काय की, स्पेसिफिकली बेफिकीर व मंदार जोशी हे दोन लोक अनेक डूआयड्या, व नितीनचंद्रांसारख्या काहींच्या मदतीने फक्त जितंमया करताहेत. मग यांना यांच्याच भाषेत उत्तर देताना फक्त धुळवड होते. अन नाईलाजाने आम्हालाही हात चिखलात बुडवावे लागतात. हा धागा वाहता होण्याचे कारण हेच लोक आहेत.<<<

हा सर्वोत्तम प्रतिसाद?

हा प्रतिसाद सर्वोत्तम आहे असा निर्णय मायबोलीवरील नेमक्या कोणी घेतला आहे? ज्याने कोणी घेतला आहे त्याने माझे कोणते ड्यु आय डी आहेत ते इथल्याइथे सिद्ध करावे नाहीतर आधी स्वतः जाहीर माफी मागावी आणि पाठोपाठ इब्लिसांनाही मागायला लावावी.

डोके ठिकाणावर आहे का?

हा प्रतिसाद (वरील उतार्‍यासकट) सर्वोत्तम ठरवणार्‍यांचा आणि हा प्रतिसाद देणार्‍या इब्लिसांचा तीव्र निषेध!

तसेच, ह्या अप्रतिसादाबद्दल इब्लिसांचे अभिनंदन करणार्‍यांचाही तीव्र निषेध!

आता काही कारणाने तो प्रतिसाद संपादीत करण्यात आला तरी मी स्वतःहून माझा हा प्रतिसाद बदलणार नाही. तो कोणी अधिकारी व्यक्तीने संपादीत करण्याचा निर्णय घेतला तर तो निर्णय संकेतस्थळाच्या पॉलिसीच्या विरुद्ध असेल.

शिवाय, 'भिक्कारचोट' असा शब्द असलेला प्रतिसाद सर्वोत्तम ठरायला केव्हापासून लागला मायबोलीवर?

-'बेफिकीर'!

पंतप्रधानांनी विधानसभेच्या प्रचारात उतरावे का हा विषय असताना देशातील तमाम वाईट घटनांची यादी बनवून त्याकरता मोदींना थेट जबाबदार धरणे हे थोडे गंमतीचे आहे.

सध्या इबोलाची मोठी हवा आहे. त्या महामारीमागेही मोदी व त्यांचा विधानसभेचा प्रचार कसा जबाबदार आहे हे दाखवता आले तर बघा. मोदीद्वेष्ट्यांना चांगले खाद्य मिळेल.
दोन चार टायफुने, हरिकेने, चक्रीवादळे आणि ज्वालामुखी फार काय वितळणारे हिमनगही मोदींच्या अमेरिका दौरा वा विधानसभेचा प्रचार यामुळेच झाले असे दावे करता आले तर सोन्याहून पिवळे!

असो. ह्या बाफचे विषयांतर होऊन चला मोदींना झोडपून काढू असे काही नाव देत आले तर सुसंगत होईल.

चिखल क्र. १:

कॉन्फिडंटली थापा मारणे हे शेंडेनक्षत्र यांचे यूएस्पी आहे.
महोदय,
तुम्हीच वर म्हटले आहे,
"पण आज जर कुणी नागरिक पंतप्रधानांना जाब विचारत असेल तर त्याला तो हक्क आहे."

त्याला मी म्हटले आहे,
"<<
सीधी बात.
मोदींना जाब विचारीत आहोत.
तुमचं जळतं कुठेय?"

याला उत्तर इबोला अन टायफून होतं का? ऑबफुस्केशन बंद करा, सरळ बोला Happy

माझे कोणते ड्यु आय डी आहेत ते इथल्याइथे सिद्ध करावे
<<
गंभीर समिक्षक या आयडीने गेल्या काही दिवसांत गझलांव्यतिरिक्त दुसर्‍या कोणत्याच धाग्यावर काहीच लिहिलं नाहिये का?

नक्की?

बेफि, मित्र म्हटलंय तुम्हाला प्रतिसादात. Wink

गंभीर समीक्षक हा मी स्वतः जाहीर केलेला आय डी आहे. रहस्याची उकल केल्याच्या बिनडोक आनंदात फालतू विधाने करू नका.

रच्याकने,

राजकारणाच्या कोणत्याही धाग्यावरमी आजपर्यंत एकही प्रतिसाद वादग्रस्त आहे म्हणून संपादित केलेला नाहिये. खोटे बोलून, भडकावू बोलून नंतर संपादनात पिवळ्या टिकल्या लावणे ही आमची पद्धत नव्हे!

बेफि,
१. माबोवर तुमचे डूआयडी आहेत, हे सत्य आहे.
२. मा. अ‍ॅडमिन यांना ते ठाऊक आहेत.
३. गंस फक्त अन फक्त गझलांसाठी आहेत असे तुम्हीच म्हटला होतात.
४. तुम्ही बोल्ड वाक्यात 'माझे डूआयडी सांगा' असे आवाहन केलेत, त्याला मित्रत्वाच्या नात्याने उत्तर दिले होते Wink

तुमच्याशी बोलत नसून
<<
वरती त्यांना म्हटलात एकदा, 'तुमच्याशी बोलत नाहिये'
आता मला म्हणताय.
जौद्या ब्वा. कहींपे निगाहे कहींपे निशाना काय झेपत नाही आपल्याला. झोपावं झालं. हॅप्पी गुडनाईट टू यू.

पॉलिसी डिसिजन्स घेताना संपूर्ण भारताचा विचार होत नाहिये. मोदी संपूर्ण देशाचे पंतप्रधान असल्यासारखे वागल्याचे दिसत नाहिये, हा आक्षेप आहे.

>>नक्की कोणत्या पॉलिसी डिसिजन्स घेताना संपूर्ण भारताचा विचार झाला नाही?

इलेक्शन संपल्याबरोब्बर जयललितांना बेल मंजूर झालाय. - आम्ही भ्रष्टाचार टॉलरेट करत नाही असे आधी डींडीम वाजत होते. आता त्याची गरज उरली नाहीये.
>> इलेक्शन झाल्यावर जयललिता आत गेल्या होत्या ना?
न्यायसंस्था सरकारच्या नियंत्रणाबाहेर आहे ना? सगळ्या गोष्टींना मोदी जबाबदार?

३ वर्षांचा 'मेडिकल' कोर्स बीएस्सी नंतर करून 'खेड्यातल्या' लोकांच्या आरोग्याची 'सोय' लावली जाणारे. खेड्यांतले लोक काय जनावरे आहेत का? अहो, Bachelor's in Veterinary Science is a full time course of 5 years duration which includes a total of 9 semesters.!!
>> हा निर्णय अचानक घेतला गेला असं तुम्हाला वाटत आहे याचच आश्चर्य वाटतय.

पॉलिसी डिसिजन्स!
>> हे एका रात्रीत घेतले जातात का? समित्या उपसमित्या इ इ . हे आधीपासून असच चालत आलय ना?

यांच्याबद्दल बोलू नका. डिझेल पेट्रोलच्या भावाबद्दल बोलू नका. फक्त भजनं करायची का?
>> पेट्रोल च्या भावाबद्दल आधीच झालय की बोलुन, तो निर्णय काँग्रेस्स्चा होता.

चिखलू,
एकही उत्तर तुम्हालाही पटलेले आहे असे दिसत नाहिये.
पुन्हा विचार करा अन लिहा Wink
जमलं, तर वर्जिनल आयडीने.
परत,
वाईट निर्णय सर्वस्वी काँग्रेसचेच, असे नक्राश्रू किती दिवस ढाळणार आहात?

इब्लीसजी, आपण पोटतिडकीने लिहीलेल्या पोस्टमधे 'स्पेसिफिकली' माझं नांव घेतलं नसलं तरीही भाजपबद्दलची माझी भूमिका पुन्हा स्पष्ट करावी, असं मलाच तीव्रतेने वाटतं.

आपण म्हणतां तसा भाजपा 'धर्मांध', 'जातीयवादी', 'धनदांडग्यांचं तुष्टी करणारा', 'कामगार विरोधी' इ.इ. पक्ष आहे यांतल्या कांहीं किंवा सगळ्याच बाबतींत कमी अधिक प्रमाणात बर्‍याच जणांच्या मनात शंकेची पाल चुकचूकत असेलही. पण आत्तांच मिळालेला भक्कम जनादेश त्या पक्षाला अधिक जबाबदार व व्यापक दॄष्टिकोन देतो कीं नाही, याला माझ्या मतें देशासाठीं सर्वाधिक महत्व आहे - [मला स्वतःला तरी मोदींचा तसा व्यापक दृष्टिकोन अवलंबण्याकडे अजून तरी कल असावा असं जाणवतंय] - व त्याकरतां कोणताही पूर्वग्रह न बाळगतां कांहीं वेळ भाजपा सरकारचा कारभार निरीक्षण करणं मला उचित वाटतं. त्यांचा कोणताही निर्णय चूकीचा वाटला तर त्यावर जोरदार, मुद्देसूद टीका व्हायलाच हवी पण ती पूर्वग्रह दूषित असणं मात्र विधायक न होतां घातक ठरूं शकतं. उदा. 1] 'श्रमेव जयते' वर मुद्देसूद टीका उचित पण ' वरून ऑर्डर काढून वेठबिगारीसारखा चालवण्यात येणारा चीन यांचा आदर्श आहे', याला पूर्वग्रहाशिवाय इतर काय आधार आहे ? २] आपण स्पष्ट सुचवतां आहात कीं भाजपाने निवडणूक पार पडतांच जयललिताला 'बेल' मिळवूं दिला ! या प्रकरणाच्या एकंदरीत न्यायप्रक्रियेत हें कसं शक्य आहे, हें मला खरंच कळत नाही.

बेफिकीर,

१) खरे सांगायचे तर अगदी प्रामाणिक प्रामाणिकपणे तर त्या पोस्टमधील ड्यू आयडी वगैरे मुद्दे आपले नाव गोवले गेले असल्याने आपल्या विशेष ध्यानात आले पण माझ्या तर ते लक्षातही आले नाही साहजिकच आहे मला ती पोस्ट मोदींच्या आणि धाग्याचा संदर्भात आवडली म्हणून तिला सर्वोत्तम उत्तरात गणले.

२) अर्धाच प्रतिसाद सर्वोत्तम द्यायची सोय नसल्याने किंवा तो प्रतिसाद संपादित करून सर्वोत्तम ठरवण्याची सोय नसल्याने तसे झाले याबद्दल मी आपली मनापासून जाहीर माफी मागतो. (तरीही आपली इच्छा आणि अ‍ॅडमिन यांची परवानगी असल्यास मी जाहीर माफीचा वेगळा धागा काढू शकतो, मला माफी मागण्यात कसलाही कमीपणा नाही, कारण मी माझ्या स्वत:च्या मनाशी प्रामाणिक आहे Happy )

३) इथे सहजच आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो आपण एकेकाळी माझ्या स्वत:च्या आयडीला ड्यू आयडी असे म्हणत होतात तो मी असूही शकतो हे ही प्रामाणिकपणे नमूद करू इच्छितो त्याचबरोबर तो मी नसूही शकतो हे ही मोठ्या चातुर्याने इथे मांडतो तरीही आपण माझ्यावर तो आरोप केला जो मी खचितच मनावर घेतला नाहीच आहे पण यावरून एक निष्कर्ष नक्कीच काढू शकतो तो असा की ड्यू आयडी हा आपल्या ही मते फार मोठा आरोप वगैरे नाही जो आपणही सहज एखाद्यावर करतात पण माझे याबद्दलही काही म्हणने नाही हे देखील मी नमूद करू इच्छितो पण तरीही माझ्यामते एखाद्या आयडीला त्याचे ड्यू आयडी आहेत अश्या आरोपापेक्षा एखाद्या आयडीलाच ड्यूआयडी ठरवत त्याचे अस्तित्व नाकारणे हे जास्त चूक असावे पण याबद्दलही माझे काही म्हणने नाहीच आहे हे देखील अखेरचे नमूद करून वाक्याला फुल्लस्टॉप देतो.

अवांतर - माझे स्वत:चेच कित्येक प्रतिसाद सर्वोत्तम आहेत, पण दुर्दैवाने स्वत:च्याच प्रतिसादाला सर्वोत्तम ठरवता येत नाही Sad

Proud

बर उद्या १९ ला निकाल लागल्यानंतर या धाग्याची समाप्ती करायची का ?

बर उद्या १९ ला निकाल लागल्यानंतर या धाग्याची समाप्ती करायची का ?
>>>>>.

उद्याच्या निकालाचा आणि या धाग्याचा संबंध काय?
म्हणजे निकाल भाजपाच्या बाजूने लागला तर मोदींचे पंतप्रधान असून सभा घेणे योग्यच असे की आणखी कसे काय नक्की ??

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका कधी आहेत?
>>>>>>>>>
२०१७ साली बहुधा.
पण आजच्या परीस्थितीत विचार करता तिथे शिवसेना मनसे निवडणूकपूर्व एकत्र आली तर बहुमत मिळण्यास हरकत नसावी.

असो, पण त्याचा इथे काय संबंध हे नाही समजले
तेव्हाही मोदी प्रचारासाठी मुंबईत येतील असे आपणास म्हणायचे आहे का?

सध्या इबोलाची मोठी हवा आहे. त्या महामारीमागेही मोदी व त्यांचा विधानसभेचा प्रचार कसा जबाबदार आहे हे दाखवता आले तर बघा. मोदीद्वेष्ट्यांना चांगले खाद्य मिळेल.
दोन चार टायफुने, हरिकेने, चक्रीवादळे आणि ज्वालामुखी फार काय वितळणारे हिमनगही मोदींच्या अमेरिका दौरा वा विधानसभेचा प्रचार यामुळेच झाले असे दावे करता आले तर सोन्याहून पिवळे!
>>
शेंडनक्षत्र बहुतेक आपण "किरण बेदी" यांचा ट्विट वाचला नसेल अन्यथा आपण असे हास्यास्पद प्रतिक्रिया दिली नसती. भाजपा स्वतः मंगळमिशन वगैरे चांगल्या गोष्टीचे क्रेडीट देत असेल तर याचे देखील घ्यावे.

अजुन देखील काँग्रेस कडे बोट दाखवण्याची सवय सुटलेली दिसत नाही. १० वर्ष विरोधीबाकांवर बसण्याची इतकी सवय झाली आहे की प्रत्येक गोष्टीत काँग्रेसचे नाव आणले जाते त्याशिवाय रात्री जेवण जात नाही वाटते Happy

इथल्या विद्वानांनी करार जर जर्मनी बरोबर झालेला आहे तर स्विस बँकेशी काय घेणेदेणे हे देखील भक्तांनी स्पष्ट करावे? स्विस सरकार जर्मनी देश चालवत आहे ?

या प्रकरणाच्या एकंदरीत न्यायप्रक्रियेत हें कसं शक्य आहे, हें मला खरंच कळत नाही.
<<
भाऊ,
एका महान व्यक्तीला भाजपाच्या अध्यक्षपदी बसवण्यात आलंय, अन त्यांना जामीन देणार्‍या न्यायाधीशांना निवृत्तीनंतर राज्यपालपद मिळालेलं आहे. भारताच्या इतिहासात प्रथमच निवृत्त न्यायाधीशांना राज्यपालपदाची पेन्शन देण्यात आलेली आहे.
या प्रकरणाच्या एकंदरित न्यायप्रक्रियेत हें कसं शक्य आहे, हें मलाही खरेंच कळत नाहीये. Happy
*
>>
[मला स्वतःला तरी मोदींचा तसा व्यापक दृष्टिकोन अवलंबण्याकडे अजून तरी कल असावा असं जाणवतंय]
<<
हे कशावरून जाणवतंय म्हणे नक्की? फक्त इंट्यूशन की इतरही काही?
*
दुसरं, धर्मांध, जातीयवादी इ. बद्दल. इथे मायबोलीवरल्या गोब्राप्रपांनी माझ्याबद्दल पाठवलेली निखालस खोटारडी, बदनामीकारक व धर्मद्वेषी मेल आपणास पोहोचली नाहिये का?

लोकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत नाहीये, तर लोकांसमोर अख्खा डायनॉसोर चित्कारतो आहे. तेव्हा असूच द्या.

आपण स्पष्ट सुचवतां आहात कीं भाजपाने निवडणूक पार पडतांच जयललिताला 'बेल' मिळवूं दिला ! या प्रकरणाच्या एकंदरीत न्यायप्रक्रियेत हें कसं शक्य आहे, हें मला खरंच कळत नाही.
>>>
भाऊ , वावदूक विधाने करण्याबाबत तुमची ओळख नाहीये म्हणून हा प्रश्न तुम्ही खरेच उत्सुकतेने विचारला आहे असे मी मानतो. सरकारी वकीलाच्या तोंडाला सोयीनुसार मुसक्या बांधणे आणि 'योग्य ' वेळी त्याला त्याच्या पदाच्या कंटिन्युएशनची जणीव करून देणें याबाबत ज्ञान कोर्टाच्या आवारात फिरल्यास फुकट मिळते. कोर्टे बिचारी माणसेच असतात जेवढे ऐकू येते आणि वाचायला दिले जाते त्यावरच बिचार्‍याना निर्णय द्यावा लागतो.....

<< लोकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत नाहीये, तर लोकांसमोर अख्खा डायनॉसोर चित्कारतो आहे.>> डायनॉसोर लोकाना फक्त सिनेमात पहायला आवडतो; स्वतःच्या देशावर राज्य करायला लोक त्याला भरघोंस मतानी निवडून देतील ?

Pages