भारताच्या पंतप्रधानांनी विधानसभेच्या प्रचारांत उतरणे योग्य कि अयोग्य ?

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 October, 2014 - 11:40

नुकतेच महाराष्ट्र विधानसभेच्या निमित्ताने शिवसेना-भाजपा युती तुटल्याने भाजपाला अचानक साक्षात्कार झाला की गोपीनाथ मुंडेंच्या पश्चात आज तितक्याच ताकदीचा एकही नेता महाराष्ट्रात तरी त्यांच्याकडे नाही आणि म्हणूनच त्यांनी आपले भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे प्रचारदौरे मोठ्या घाईगडबडीत आखले.

यावरून अगोदरच विरोधकांनी भाजपाला महाराष्ट्रात चेहराच नाही म्हणून त्यांना मोदींना बोलवावे लागले असा ओरडा सुरू केला आहे. अर्थात यामागे मोदींच्या करिष्म्याची भिती असली तरी यात तथ्य आहे हे देखील जाणवते. कारण भाजपाच्या एकूण एक पोस्टरवर श्री नरेंद्र मोदी यांचाच चेहरा झळकतोय, तिथे दुसरा कुठलाही महाराष्ट्रातील भाजपा नेता नाही.

तर, यावरूनच आज एके ठिकाणी चर्चेत मोदींचा उल्लेख ‘भाजपाचे पोस्टर बॉय’ असा झालेला पाहिला. खरे तर यात फारसे काही आक्षेपार्ह वाटले नाही, पण तरीही भारताच्या पंतप्रधानपदी असलेल्या नेत्यावर कुठल्याही प्रकारची व्यक्तीगत टिप्पणी नको म्हणत मी हस्तक्षेप केला. समोरून या आक्षेपाला दाद न देता उलट, "आज मोदी महाराष्ट्राचा दौरा करत आहेत ते भारताचे पंतप्रधान म्हणून नसून भाजपाचे ज्येष्ठ नेते म्हणून करत आहेत तर यात चुकले काय?" असा खडा सवाल आला.

याउपर मोदींनी भाजपाला महाराष्ट्रात सत्ता द्याल तर केंद्रातून मी मदत करेल असाही एक इशारा दिल्याचे ऐकिवात आहे (चूक असेल तर कर्रेक्ट करा).

एकंदरीत स्वत:देखील विचार करता मला जाणवले की ज्यांना आपण देशाचे प्रधानमंत्री बनवून देश चालवायला दिला आहे, त्यांनी देशासमोर समस्यांचा आणि त्यांच्यासमोर कामाचा डोंगर उभा असताना, ती कर्तव्ये टाळून / वा त्या कामांना प्राधान्य न देता, आपल्या राजकीय पक्षातर्फे विधानसभा निवडणूकीच्या प्रचारांना वेळ देणे योग्य आहे का?

अर्थात हा धागा आता काढला, किंवा हे आता सुचले, तरीही हे निव्वळ मोदींना नाही तर आजवरच्या सर्वच आजी-माजी तसेच भावी पंतप्रधानांना देखील लागू. त्यामुळे आधीही असेच व्हायचे, हे सर्वांनीच केलेय, या पोस्ट टाकायला माझी हरकत नाही. पण तटस्थ बुद्धीने विचार करत मुद्द्यावर देखील प्रामाणिक मत मांडा. प्रश्न अगदीच बालिश असेल तर क्षमाही करा. श्री नरेंद्र मोदी यांचाच नाही तर भारताच्या पंतप्रधानपदाचा मान ठेवतच हा प्रश्न विचारला आहे.

जय हिंद !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाऊ,
लोक काय वाट्टेल ते करतात हो!
स्पेसिफिक प्रश्न विचारला आहे, उत्तर देणार का?
पुन्हा डकवतो, हे घ्या :
*
>>
[मला स्वतःला तरी मोदींचा तसा व्यापक दृष्टिकोन अवलंबण्याकडे अजून तरी कल असावा असं जाणवतंय]
<<
हे कशावरून जाणवतंय म्हणे नक्की? फक्त इंट्यूशन की इतरही काही?

>>>एकमेकांची उणीदुणी काढणं, वैयक्तिक शेरेबाजी करणं हेच प्रकार अधिक घडताना दिसतात.<<<

लेट मी पेस्ट द होल पॅरा:

>>>मायबोलीवर राजकीय चर्चांना बंदी नाही. मात्र या चर्चांमध्ये शेलकी विशेषणं वापरणं, एकमेकांची उणीदुणी काढणं, वैयक्तिक शेरेबाजी करणं हेच प्रकार अधिक घडताना दिसतात. मुद्द्यांवर आधारित चर्चा होताना दिसत नाही. चर्चांना लागलेल्या या वळणांमुळे बहुतेक मायबोलीकर या धाग्यांपासून दूर झालेले दिसतात.<<<

http://www.maayboli.com/node/50308

मग असे सगळे केलेला प्रतिसाद येथे सर्वोत्तम कसा ठरतो?

तसेच, जर एखादा प्रतिसाद अनेकांनी दिलेल्या प्लस वन मुळे सर्वोत्तम ठरू शकत असेल तर एखाद्या वादग्रस्त प्रतिसादाला अनेकांनी प्लस वन म्हंटले तर तो सर्वोत्तम ठरेल काय?

नम्र विनंती:

तो धागा व येथील सर्वोत्तम प्रतिसाद ह्यापैकी नेमकी काय भूमिका 'टीम'ने घेतलेली आहे हे समजावे.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

The best responses chosen by the creator of the thread, in this case Mr. Runmesh. Will this topic of best response get discussed everyday at around 9 PM?

भरत मयेकर | 18 October, 2014 - 21:23 नवीन

The best responses chosen by the creator of the thread, in this case Mr. Runmesh. Will this topic of best response get discussed everyday at around 9 PM?
<<<

Do you think people are answerable to you?

Timing? I got time to respond now. Do you have a problem?

I was not aware that the best response is the one that is chosen as the best response by the creator of the thread. If that is so, I have nothing to say.

But if it is not so, then I feel that others need not poke their noses.

I never wanted to be so harsh with you Mayekar, but your sarcastic style lead to that.

<<....कोर्टे बिचारी माणसेच असतात जेवढे ...>> रॉबिनहूडजी, कोर्टाच्या आवारात काय काय चालतं यावर मीं तज्ञ नसलो तरी अनभिज्ञ अजिबात नाही. [ माझे अनेक मित्र नामांकीत म्हणण्याइतपत चांगले वकील आहेत व न्यायव्यवस्थेतही माणसंच काम करतात याची मलाही जाणीव आहे]. माझं विधान ' भाजपाने जयललिताना निवडणूक संपतांच जामीन मिळवूं दिला ', या आरोपापुरतंच मर्यादित होतं. या मॅडमना हायकोर्टाने जामीन नामंजूर केला. त्या मग जामीनासाठी सुप्रीम कोर्टात गेल्या. तिथंही, अशा सबबी काढून मूळ केस महिनोनमहिने लांबवली जातेय या कारणावरून जामीन नाकारलाच जात होता; पण मॅडमच्या वकीलानी मूळ केस लांबवली जाणार नाही असं निश्चित आश्वासन दिल्यावरच जामीन मंजूर झाला. यावरून, महिनोनमहिने हायकोर्ट व मग सुप्रीम कोर्ट भाजपाच्या तालावरच नाचत होतं असा निष्कर्ष काढायचा का ? ज्याना तसा काढायचा असेल त्यानी खुशाल काढावा; मला मात्र हा आरोप बिनबुडाचाच वाटतो.

नै म्हणजे तुमचं नाव घेतलं नाही तरी मला उद्देशून लिहिलंत.
त्याला उत्तर देऊन एक सोपासा प्रश्न विचारला, तर आता इग्नोरास्त्र वापरताहात, ही गम्मत काय आहे, ते इस्कटून सांगूच का इथे?
तुम्हाला अमुक गोष्ट मनापासून का वाटते हेदेखिल सांगता येत नाहिये?? कम्माले ब्वा!

आणि हो, विसर्लोच!!

बेफि,
तुमचे सग्ळे प्रतिसाद इग्नोऽर्ड! 47.gif

भाऊसाहेब,

केंद्रात सरकार कोणाचे किंवा महाराष्ट्रात सरकार कोणाचे ह्याबाबत प्रत्येक माणूस फक्त एक मत देऊ शकतो.

त्यानंतर मतमोजणी होणे, निकाल बाहेर येणे, निकालापश्चातच्या युत्या होणे वगैरे प्रकार घडतात. तेव्हा मत देणार्‍याला विचारले जात नाही व विचारले जावे अशी प्रोव्हिजनही नसावी.

त्यानंतर आलेले सरकार जमेल तसे निर्णय घेत राहते.

माणसे चांगली वाईट नसतातच, परिस्थितीही नसते चांगली वाईट!

गांधीकाळापासून तुमच्यावर तुमच्या आधीच्या पिढीकडून काय संस्कार करण्यात आले इतकाच प्रश्न असतो. कितीही झाले तरी माणूस त्या चौकटीबाहेर पडायला रेझिस्ट करतो.

प्रत्येकाला आपण बरोबर असेच वाटत असते.

सरतेशेवटी बघायच्या गोष्टी इतक्याच की:

१. पेट्रोल, डिझेल कमी झाले का
२. कूकिंग गॅस कमी झाला का
३. रस्ते बनले का?
४. मी ह्या देशाचा नागरीक आहे ही भावना अधिक व्यापक झाली का?

<< तिसर्‍यांदा डकवू का माझा प्रश्न?>> इब्लीसजी, तुम्ही म्हटलं, ' लोकांसमोर डायनॉसोरसारखा भाजपा चित्कारतोय'. मीं विचारलं, ' तरीही त्यानी निवडून दिलं भाजपाला ?' त्यावर तुमचं उत्तर, 'लोक काय वाट्टेल ते करतात हो!' . इतरांकडून 'स्पेसिफीक' उत्तरं येणं किंवा त्यांच्याकडे तीं तशीं मागणं हा एकतर्फी व्यवहार नाही होवूं शकत !

डायनॉसोर लोकाना फक्त सिनेमात पहायला आवडतो; स्वतःच्या देशावर राज्य करायला लोक त्याला भरघोंस मतानी निवडून देतील ?
>>>

भाऊ, लोकांनी दिल्लीत एके यांच्या आपलाही निवडून दिले होते. ते देखील कश्यात काही नसताना नवख्या पक्षाने अशी कामगिरी बजावणे म्हणजे भरघोसपेक्षाही मोठे यश म्हणू शकतो.

लोकांनी मोदींना जेव्हा निवडून दिले तेव्हा काँग्रेसविरोधी लाट आली होती. आधी याच काँग्रेसविरोधी लाटेने केजरीवालवर यांच्यावर विश्वास टाकून झाला होता, तो फसला. पण यातून ईतरांना एक पॅटर्न समजला की लोकांना भ्रष्टाचार संपवतो आणि विकास करतो असे म्हटले की लोक तो पर्याय चाचपून बघणारच. म्हणून भाजपाने नेहमीच्या हिंदुत्वावादाच्या मुद्द्याला टोटली बाजूला सारून फक्त विकासाचा मुद्दाच पुढे रेटला. सोबतीला गुजरातचे विकासाचे मॉडेल तयार होतेच. मोदींची हिंदुहृदयसम्राट अशी प्रतिमा न करता विकासपुरुष अशी प्रतिमा करून त्यांना काँग्रेसविरोधी लाटेवर स्वार करून तिचे मोदीलाटेत रुपांतर केले. आणि भरघोस मते आली.

त्यानंतर सध्या जी धडपड चालू आहे ती लाट ओसरू न देण्याची आहे हे जाणवते. अजूनपर्यंत त्यात ते यशस्वी आहेत असे म्हणू शकतो. पण एण्ड ऑफ द डे तुमचे कामच बोलते. विकास खरेच झाला की नाही हे पाच वर्षांनी लोकच ठरवतील. त्यावेळी जर मोदी वा भाजपा असेच भरघोस मतांनी निवडून आले, तर तेव्हा तुमचे हे वाक्य (स्वतःच्या देशावर राज्य करायला लोक त्याला भरघोंस मतानी निवडून देतील?) लागू होईल. Happy


अवांतर - मी एक खूप सामान्य नागरीक आहे. जेव्हा आपची दिल्लीत हवा होती तेव्हा मी या देशात आता क्रांती घडणार या उत्साहात होतो. एके यांनी लोकसभा लढवावी आणि मी त्यांनाच मत देणार असा विचार पक्का केलेला. त्यानंतर तिथे माझ्या विश्वासाने माती खाल्ली. मग मोदीलाट आली. अच्छे दिन आता खरे येणार म्हणत मी लोकसभेत मोदींना वोट दिले. ते जिंकल्यावर मला कोण आनंद झाला हे माझे त्या दिवशीचे फेसबूक स्टेटस शोधून दाखवू शकतो. मग आली विधानसभा. ज्यात भाजपाने सत्तेच्या लालसेपोटी शिवसेनेचा विश्वासघात केल्याने माझी मराठी अस्मिता जागृत झाली आणि मोदींसह भाजपाला महाराष्ट्रातून हद्दपार करायला मी शिवसेनेला मत दिले.

<< पण एण्ड ऑफ द डे तुमचे कामच बोलते.>> ऋन्मेऽऽषजी, १००% सहमत. म्हणूनच मीं कळकळीने सांगतोय इतकंच कीं 'एण्ड ऑफ द डे' ला काय होणार हें स्वतःच पक्कं ठरवून मोदी व भाजपाला सक्काळपासूनच झोडणं सुरूं करणं बरोबर नाही.

बाकी, प्रत्येकाची अस्मिता कशाने जागृत व्हावी व परिणामीं त्याने कुणावर किती आकस ठेवावा , ही बाब व्यक्तीनिष्ठ आहे व ती प्रत्येकाने स्वतःच वारंवार तपासून पहाणं उचित; तो चर्चेचा विषय नसावा.

भाऊ येथील झोडपणे एण्ड ऑफ द डे काय होईल या नुसार नक्कीच नाही. तर घडत असलेल्या त्या त्या मुद्द्यावर भाष्य होतेय असे मला तरी वाटते.

शेवटचा अस्मितावाला पॅराग्राफ मी माझा स्वताचा म्हणून नाही तर प्रातिनिधिक म्हणून लिहिला होता. हे दाखवायला की भरघोस मते आणि लाट कशी येते आणि लोक कसा विचार करतात. याचा अर्थ त्यांनी निवडून दिलेला उमेदवार, पक्ष वा सरकार १०० टक्के योग्यच असते असे नाही Happy

<< तर घडत असलेल्या त्या त्या मुद्द्यावर भाष्य होतेय असे मला तरी वाटते.>> अनेकानी चर्चेत आणलेले मुद्दे व आरोप बघून मला तरी तसं नाहीं वाटलं म्हणून तर माझा हा आटापिटा ! हा आपल्यातला एक खराखुरा मतभेद आहे असं समजूया हवं तर.

<< याचा अर्थ त्यांनी निवडून दिलेला उमेदवार, पक्ष वा सरकार १०० टक्के योग्यच असते असे नाही >> मान्य. पण याचा अर्थ निवडून दिलेला उमेदवार/पक्ष १००% अयोग्यच असतो असाही नाही ना होत; हें ठरवण्यासाठीच तर थोडा वेळ तरी त्या उमेदवाराला/पक्षाला मिळणं न्याय्य आहे, एवढीच माफक अपेक्षा मीं व्यक्त करतोय. चुकतंय का माझं यात कांहीं ?

भाऊसाहेब, आपने दिल्लीत सरकार स्थापन केल्याक्षणापासुन त्यांचे प्रगतीपुस्तक तयार करण्यामागे भाजपा लागली होती हा फार जुना ईतिहास नाही Happy

<< आपने दिल्लीत सरकार स्थापन केल्याक्षणापासुन त्यांचे प्रगतीपुस्तक तयार करण्यामागे भाजपा लागली होती हा फार जुना ईतिहास नाही >> भाजपाने तसं केलंच असेल तर , तेंही निंद्यच. पण त्याचा सूड म्हणून भाजपाच्या बाबतींत आतां असं होतंय, असं तर सुचवायचं नाहीय ना इथं ? Wink

वेळ द्यायचा म्हणजे काय करायचे? सरकारच्या कामकाजावर टीका केली म्हणजे, तुम्ही हे काम करू नका से सांगितले (आणि त्यांनी ते ऐकले?)की आत्ताच्या आत्ता पुन्हा निवडणुका घ्या असे सांगितले?
का ही ही (हां श्री)

अर्धे २०१३ आणि २०१४ चे पहिले पाच महिने आधीच्या सरकारच्या तथाकथित चुकांवर घणाघाती घाव घालण्यात गेले. त्याची फळेही मिळाली. आधीच्या सरकारचे काय चुकले हे माहीत असताना , त्यावर टीका करताना बरोबर काय हे नक्कीच माहीत असणार. अगदीच काही नवखे नाहीत मोदीसरकार. बारा-तेरा वर्षे देशातले सर्वात प्रगत राज्य चालवण्याचा अनुभव असलेले दृष्टे नेते आहेत ते.

ज्या गोष्टीवर टीका केली त्याच गोष्टी हा अलौकिक महापुरुष करताना दिसत असेल तर ते सांगायला एन्ड ऑफ द डे ची वाट कशाला पाहायला हवी? हां एक कारण असेल. आधीच्या सरकारच्या त्याच कृतीमध्ये राष्ट्रहितवाली वो बात नहीं होती थी|

नक्की किती काळानंतर सरकारच्या कामकाजाचे विश्लेषण केलेले चालणार आहे?
एक घटनादुरुस्ती(वटहुक्कूम) करून एखाद्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले की विरोधी पक्षांना अज्ञातवासात पाठवण्यात यावे. सरकारच्या कामकाजावर पुढल्या निवडणुका घोषित होईपर्यंत टीका करता येणार नाही असा नियम करावा असे सुचवल्यानेही सरकारला बोचेल का?

मयेकरजी, माझं म्हणणं सरळ व स्पष्ट आहे <<... त्याकरतां कोणताही पूर्वग्रह न बाळगतां कांहीं वेळ भाजपा सरकारचा कारभार निरीक्षण करणं मला उचित वाटतं. त्यांचा कोणताही निर्णय चूकीचा वाटला तर त्यावर जोरदार, मुद्देसूद टीका व्हायलाच हवी पण ती पूर्वग्रह दूषित असणं मात्र विधायक न होतां घातक ठरूं शकतं. >> . कोणतंही नविन सरकार निवडून आलं तरीही त्याबाबत मीं हेंच म्हणेन.

पूर्वग्रह म्हणजे काय? निवडणुकीपूर्वी ते काय बोलत होते एवढेही लक्षात ठेवायचे नाही की काय?

इथे मुद्द्यांवर आधारित टीका केली की काय होतं ते पाहिलंच आहे. पुढेही तेच होणार आहे हेही माहीत आहे.

<< पूर्वग्रह म्हणजे काय? >> तेंही मीं वर उदाहरणं देवून सांगितलं आहे.
<< इथे मुद्द्यांवर आधारित टीका केली की काय होतं ते पाहिलंच आहे.>> अहो, मुद्द्यावर आधारित टीका सोडाच, इथं मीं माझी याबाबत सरळ ,साधी, प्रामाणिक भूमिका मांडली तर तीही समजून न घेतां मला झोडपणंच सुरुं आहे !!! Wink

इतक्यात टीका करू नका, त्यांना वेळ द्या, एन्ड ऑफ द डे काय होते ते पहा, पूर्वग्रहदूषित टीका करू नका यातलं काहीच पटण्यासारखं नाही.

<< ....यातलं काहीच पटण्यासारखं नाही.>> तशी अपेक्षाही नाही माझी सगळ्यांचकडून; फक्त मीं नेमकं काय म्हणतो आहे एवढं नक्की समजून घ्यावं ,हीच एक माफक अपेक्षा.

एक घटनादुरुस्ती(वटहुक्कूम) करून एखाद्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले की विरोधी पक्षांना अज्ञातवासात पाठवण्यात यावे. सरकारच्या कामकाजावर पुढल्या निवडणुका घोषित होईपर्यंत टीका करता येणार नाही असा नियम करावा असे सुचवल्यानेही सरकारला बोचेल का?

म्हणजे आणिबाणी सारखेच म्हणायचे आहे का तुम्हाला ? तरी बर गुजराथेत अजुनही काँग्रेस आहे. भाजप मधुन निर्यात केलेला शंकरसिंह वाघेला अजुन डरकाळी फोडतो आहे.

काय भीषण आगपाखड चालली आहे इथे!

मुद्यांवर आधारीत टीका<<< म्हणजे काय असते बुवा?: कोणाचे किती ड्यु आय डी आहेत, कोणामुळे आमचा भरभरून आलेला धागा वाहता झाला, कोण भजनी मंडळाचे सदस्य आहे हे लिहिणे का?

>>>इतक्यात टीका करू नका, त्यांना वेळ द्या, एन्ड ऑफ द डे काय होते ते पहा, पूर्वग्रहदूषित टीका करू नका यातलं काहीच पटण्यासारखं नाही.<<<

कसे पटेल? पूर्वग्रहदूषित टीका करण्यात तर आपण सगळे पारंगतच आहोत ना? किती घाई, किती घाई? साठ साठ वर्षे देश हातात होता. अजून साधे लोकसंख्या नियंत्रण, शिक्षण, स्वच्छता, रस्ते, व्यापार उदीम ह्यासारखे घटक नियंत्रणात आणलेले नाहीत. नियंत्रण सोडाच, फोकसमध्येसुद्धा आणले नाहीत. आणि इथे सहा महिने थांबायची तयारी नाही. सुदैवाने ह्या मानसिकतेपेक्षा 'सत्तापालट आवश्यक आहे' अश्या मानसिकतेचे मतदार संख्येने अधिक आहेत.

तिकडे स्वतः सोनिया आणि राहुल पराभव स्वीकारून, जनमताचा आदर व्यक्त करून, कार्यकर्त्यांना धन्यवाद देऊन मोकळे झालेले आहेत. आणि इथे त्यांचे बिनभाड्याचे पित्ते (भजनी मंडळ ह्या शब्दप्रयोगाचा नैसर्गीक परिणाम) त्यांच्यावतीने आक्रोश करत आहेत.

अश्या जनाधार नसलेल्या मतप्रदर्शनाकडे संपूर्ण दुर्लक्ष केलेले बरे!

अश्या जनाधार नसलेल्या मतप्रदर्शनाकडे संपूर्ण दुर्लक्ष केलेले बरे!

>>>

..................... आणि इथे झाला लोकशाहीचा पराभव !

बेफी, लोक दुर्लक्ष करतात हेच दोन निवडणुकांतून सिद्ध झालेले आहे ना. बोलूदे काय बोलताहेत ते. तेवढाच विरंगुळा (कुणाचा ते विचारू नका Proud )

भारताच्या पंतप्रधानांनी विधानसभेच्या प्रचारांत उतरणे योग्य कि अयोग्य ?

अतिशय अयोग्य. कारण ते आल्यामुळेच आम्चा पक्ष बंद पडायच्या मार्गावर आहे. पाठवलं होतं ना दिल्लीला.
कायले परत आले म्हाराष्ट्रात उगा,
हात गेला चोळीत,
घड्याळ बंद पडले
शिवधनुष्य तुट्ता तुटता राहिले
इंजीन शेडात गेले

सडेतोड यात भुवया उंचावण्यासारखं काय आहे. ? २०१९ चं तिकीट पक्कं ....

सहमत, मलाही त्या नागपूरच्या डॉनच्या बातमीत फारसे भुवया उंचावण्यासारखे वाटले नाही. म्हणजे एखाद्या भाजपाविरोधकाने ती बातमी सोशलसाईटवर फिरवली तर त्याला आजच्या काळात कोणी फारसा भावही देणार नाही.. उलट तुमच्या पक्षात नाही का म्हणून .. नवीजुनी उदाहरणे दिली जातील ..

बाकी ते मोदींच्या सभांचे ५०-५० गणित बरेच ठिकाणी वाचलेय, पण तो हिशोब काही पटत नाही. किंबहुना त्या हिशोबांवरून मोदी लाटेचा इफेक्ट ओसरलाय असा निष्कर्श काही पटत नाही.

::

Proud

पुरावा? पालूपद जुने झाले नविन बोंबा मारा

मोदीच्या 27 सभांपैकी 17 जागी भाजप हारला आहे जरा सत्य परिस्थितिवर पण नजर फिरवा

shendenaxatra ,

>> माहितीचा अधिकार वापरुन गेल्या महिन्यात किती कामे झाली? त्या आधीच्या महिन्यापेक्षा ती कामे किती
>> कमी होती? वगैरे शोधता येईल. इच्छाशक्ती असल्यास. निव्वळ मला वाटते म्हणून तसेच असणार हा आक्षेप
>> तर्कशुद्ध नाही. काहीतरी वस्तुनिष्ठ मापदंड वापरून तसा दावा केलात तर जास्त बरे.

तुम्ही जे म्हणताय ते सगळ्यांना कळतं. अगदी मोदीविरोधकांनादेखील कळतं. त्यांचं खरं दुखणं वेगळंच आहे.

त्याचं काये की संघिष्ट माणसाने अर्धीचड्डी घालावी, संघ-दक्ष-पोरींकडे-लक्ष वगैरे घोषणा द्याव्यात, कुठल्याश्या शाखेत जाऊन काहीबाही बौद्धिक घ्यावं, जमल्यास लाठी-काठी घेऊन संचलन करावं, अशा त्यांच्या अपेक्षा आहेत. कोणी उपटसुंभ संघिष्ट कुठूनसा टपकतो आणि सरळ पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसतो, म्हणजे काय!

आ.न.,
-गा.पै.

पैल्वान ,वकील बिकील आहात काय ? दर वेळी पुरावा पुरावा ओरडत असता तें? आणि काहीतरी सोइस्कर लिंका अथवा स्टॅ टिस्टिक्स डकवत असतात ते? एकूण पूर्वावतारातील भाषा व आवेश यात काही बदल नाही म्हणायचा... असो

बाकी शेंडेनक्षत्र ( ठाकरे तालमीचे पैल्वान ) आणि गापै ( नागपूर तालमीचे पैल्वान) ही कुस्ती इंटरेस्टिंगच....

रॉबिनहूड, उगाच आपली मतं ही वस्तुस्थिती म्हणून ठोकून द्यायची रीत माबोवर पडली आहे. म्हणून पुरावा मागितला.
आ.न.,
-गा.पै.

इतरांना
स्वतः सारखे समजू नये
सनातनात लिहीलेले सत्य आणि इतरत्र लिहीलेले खोटे अश्या मनोवृत्तीचे लोक पुरावे मागत असल्याचे बघून मनोरंजन होत आहे

Pages