आपण यांना पाहिलंत का?

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 11 October, 2014 - 02:15

तीन दशकांहून अधिक काळ मराठी व हिंदी अशा दोन्ही भाषांमधील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका आणि नाटके पाहत आहे. अनेकदा असे होते की एखादा चेहरा आवडतो, पण पुन्हा कुठे फारसा दिसतच नाही. माध्यमांतूनही त्या चेहर्‍याची चर्चा होत नाही. जसे काही हा चेहरा सर्वांच्या विस्मृतीतच गेला आहे. नेमका हा चेहरा मला बर्‍यापैकी आठवत असतो, पण इतर अनेकांना त्याचा परिचयच नसतो.

अशाच काही (इतरांच्या) विस्मृतीत गेलेल्या पण मला आवडत असलेल्या या चेहर्‍यांबद्दल.

  1. अभिनव चतुर्वेदी:- हमलोग मालिकेतील नन्हे हे पात्र. या मालिकेनंतर पुन्हा बुनियाद या मालिकेत आणि रिश्ते मालिकेच्या एका भागात पल्लवी जोशीसोबत पाहिले होते, पुन्हा दर्शन नाहीच.
  2. डॉ. पलाश सेनः- फिलहाल चित्रपटात सुश्मिता सेन चा नायक, विद्या बालन सोबत एका विडीओ अल्बम मध्ये नायक व गायक देखील. पुन्हा फारसा दिसला नाहीच.
  3. भानू उदय- स्पेशल स्क्वाड या स्टार वाहिनीवरील मालिकेचा नायक. बराच काळ दूर राहून आता पुन्हा सोनी पल वाहिनीवर डॉक्टरच्या भुमिकेत दिसतोय.
  4. लवलीन मिश्रा:- हमलोग मालिकेतील छुटकी हे पात्र. या मालिकेनंतर पुन्हा स्टार वाहिनीवरील श्श्श कोई है च्या एका भागात इरफान खान सोबत पाहिले होते, पुन्हा दर्शन नाहीच.
  5. काजल किरणः- हम किसीसे कम नही चित्रपटाची नायिका. पुन्हा मांग भरो सजना या चित्रपटात जितेन्द्रसोबत लहानशा भूमिकेत दिसली होती. विक्रम और वेताल च्या दोन भागांमध्येही तिने दर्शन दिले. तिने बहुतेक सर्व बी ग्रेड चित्रपटांतूनच काम केले. तिचे कराटे, सबूत, भागो भूत आया, अंदर बाहर, हमसे बढकर कौन व सात बिजलीयां हे चित्रपट माझ्या संग्रहात आहेत.
  6. वैशाली दांडेकरः- अधांतरी मालिकेची नायिका आणि हमाल दे धमाल चित्रपटात नायिकेची बहीण. पुन्हा दर्शन नाही.
  7. शीतल क्षीरसागरः- रात्र आरंभ चित्रपटातील डॉक्टर. पुन्हा कधीच कुठल्याच चित्रपटात, मालिकेत दिसली नाही. काल अचानक महाराष्ट्र टाइम्स च्या पुणे टाईम्स पुरवणीत दिसली. http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/44755907.cms?prtpa... सत्ताधीश-किस्सा खुर्चीचा, गारंबीचा बापू, इत्यादी नाटकांतून काम करत असते, अर्थात मी अजून पाहिली नाहीत. रामचंद्र पुरुषोत्तम जोशी या आगामी चित्रपटातूनही तिचे दर्शन होईल.
  8. नंदिनी जोग:- काही दूरचित्रवाणी मालिका तसेच पंढरीची वारी, आघात, थांब थांब जाऊ नकोस लांब, कळत नकळत आणि आईशप्पत अशा काही चित्रपटांमधून दिसलेली ही अभिनेत्री आता गायबच झाली आहे.
  9. वन्या जोशी:- हिमालय दर्शन, मैला आंचल, मंझिले, अशा दूरदर्शन मालिका आणि सरदार व संशोधन या चित्रपटांतून दिसलेली ही अभिनेत्री आता कास्टिंग डायरेक्टर बनली आहे.
  10. वंदना पंडितः- अष्टविनायक चित्रपटातून सचिन पिळगांवकर सोबत दिसलेली ही अभिनेत्री पुन्हा कुठेच दिसली नाही.
  11. सोनाली जोशी:- एक्स्क्यूज मी चित्रपटातून आणि एका हिन्दी मालिकेतून श्रेयस तळपदेसोबत दिसलेली अभिनेत्री.
  12. फातिमा शेखः- देव आनंद यांच्या सौ करोड या चित्रपटाची नायिका
  13. सारा खान:- ढुंढ लेंगी मंझिले हमें ही दूरचित्रवाणी मालिका आणि पेबॅक हा चित्रपट यात मुख्य भूमिका केल्यावर ही मध्यंतरी टोटल सियप्पा चित्रपटात नायिकेची बहीण म्हणून दिसली होती.
  14. गायत्री जोशी:- स्वदेस चित्रपटाची नायिका आणि मॉडेल. आयएमडीबीनुसार वाँटेड देखील तिच्या नावावर दिसतोय, मला तरी त्यात दिसली नाही. इतरत्रही फारसे दर्शन नाहीच.
  15. बरखा मदन:- काही दूरदर्शन मालिका, खिलाडीयोंका खिलाडी चित्रपटात सहनायिका, भूत चित्रपटातील भूत आणि सोच लो चित्रपटात प्रमुख नायिकेची भूमिका केल्यावर आता संन्यास घेऊन बौद्ध भिक्खू झाली आहे.
  16. अपर्णा टिळकः- फुटपाथ चित्रपटा इम्रान हाश्मीची नायिका, जीत या स्टार वाहिनीवरील अंकूर नय्यर ची नायिका, लेफ्ट राईट लेफ्ट व कही किसी रोज या मालिकांमधील काही भागांत लहानशी भूमिका तसेच जुन्या सब टीवीवरील एका विनोदी मालिकेत कंवलजीत सिंहच्या मुलीची भूमिका करून आता गायब झाली आहे.
  17. पल्लवी कुलकर्णी:- क्या हादसा क्या हकीगत, वैदेही आणि कहता है दिल या मालिका तसेच बॉबी देओलच्या क्रांती चित्रपटात त्याची बहीणीची भूमिका करून सध्या गायब. https://www.youtube.com/watch?v=Rp_dqBOC9t8&list=UUmYSGwSGkdFBeN1Kxm8wjWA
  18. वैदेही अमृते:- अभिनेत्री / मॉडेल. गृहस्थी मालिकेत किरणकुमार सोबत होती.
  19. अमृता रायचंदः- चित्रपट - बात बन गयी, मालिका - माही वे, रिअ‍ॅलिटी शो - ममी का मॅजिक, जाहिराती - व्हर्लपूल, पॉण्ड्स व इतर अनेक.
  20. आरती चांदूरकरः- खतरनाक चित्रपटात महेश कोठारेंची नायिका https://www.youtube.com/watch?v=B7fYRg2vdb4&list=UUmYSGwSGkdFBeN1Kxm8wjWA
  21. इंदु वर्मा:- सिद्धांत मालिकेतली आर्किटेक्ट अलका, नायक अ‍ॅडव्होकेट सिद्धांतची क्रमांक २ ची प्रेयसी.
  22. जमुना:- दो फंटूश, अंधेरा चित्रपटांतली नायिका, प्रसिद्ध नृत्यांगना

अज्ञात चेहरे:-

  1. हेच माझे माहेर चित्रपटातील मोहन गोखलेची नायिका.
  2. माझं घर माझा संसार चित्रपटातील अजिंक्य देवची नायिका
  3. देव आनंदच्या बुलेट चित्रपटात डॉ. श्रीराम लागूंच्या कन्येची भूमिका करणारी अभिनेत्री
  4. ताल चित्रपटातील ऐश्वर्या राय सोबत असलेली अभिनेत्री. मी चित्रपट पाहिला नसल्याने तिची भुमिका किती मोठी आहे ते माहित नाही पण इथे https://www.youtube.com/watch?v=p_OoCr4uRhM या गाण्यात ३ र्‍या सेकंदाला निळ्या कपड्यांत दिसतेय. अजून एका गाण्यात अक्षय खन्नाला काही तरी चिडवतेय असे पाहिले होते.
  5. पाप चित्रपटातील जॉन अब्राहम ची बहीण https://www.youtube.com/watch?v=ObRQx4PHeTg&list=UUmYSGwSGkdFBeN1Kxm8wjWA

हे चेहरे मी उल्लेख केल्याव्यतिरिक्त आपण कुठे पाहिले असल्यास जरूर नमूद करावे. तसेच आपणांस देखील असे कुठले जनतेच्या विस्मृतीत गेलेले चेहरे आठवत असतील तर त्यांचा देखील उल्लेख करावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्षा उसगावकर च लग्न झाल आहे. जुने सन्गीत् कार रवि यान्च्या मुलाशि. मध्यन्तरि त्यान्च्या घरात प्रोपेर्टि वरुन काहि भान्गडि चालु होत्या. बात्म्या आल्या होत्या वर्त्मान पत्रात

विनी परांजपे सिकंदर नावाच्या तिच्या आईनेच बनवलेल्या सिनेमात होती. मग सोसायटी मासिकात एक जबरदस्त फोटो फीचर! गुलाबाच्या पाकळ्यांवर पहुडलेली वगैरे. हीच का ती आपली परांजपे असे वाटावे. कथा मध्ये आहे ती. मला थोडीशी सीनीअर!

पुण्यात जिमखान्यावर हॉलिवूड नावाचा फोटो डेवलप करऊन देणारा स्टुडिओ होता तिथे एकदा दिसली होती मी आठवी नववीत असताना. हा हॉलीवूड का काय तो डेवलपर म्हणजे एकदम फॅन्सी दुकान होते. एकतर एसी, जे ७० च्या दशकात फार दुर्मीळ होते. व घरोघरी नसे. त्यात तो सफाइदार इंग्रजी बोल्णारा म्हातारा व एकदम पॉश अशी एक - मध्यमवयीन स्त्री. ही मोठी लाल टिकली लावत असे. फोटो फिल्म डेवलप करून घेण्याचे काम पण आमचे फार नसे कारन घरी कॅमेराच नव्ह्ता. कुठले तरी फोटो कधीतरी आणवे लागत किंवा बाबांचे कॉलेजातले काही असले तर. तिथे गेले कि एकदम अन पॉश गावठी वाटायचे.
दबून जायचा जीव त्या एसीत. इंग्रजी येत असून धड बोलता यायचे नाही. तिथे ती वीनी फोटो घ्यायला आली होती.

एकदा ती पॉश बाई बसच्या लायनीत दिसली व कसेतरीच झाले. Wink

नम्रता व महेश बाबू म्हणजे टॉलिवूड रॉयल्टीच आहेत. एक मुलगा आहे तिला.

तारा (विषकन्या)? >>> कृतिका देसाई <<<< नाही, ती कृतिका देसाई नाही.

महाराजा शिवदत्त बरोबर असणारी तारा वेगळीच होती. त्याच्या जिभेला साप डंखवुन त्याची तलफ भागवणारी Happy

आठवा, महाराजा शिवदत्त को विष चाहीये Lol

कृतिका देसाईनी चंद्रकांतामध्ये रम्या, सभ्या, अंबा आणि ज्वाला असे चार रोल केले होते. विषकन्या तारा चे काम अनु धवननी केले होते

महाराजा शिवदत्त बरोबर असणारी तारा वेगळीच होती. त्याच्या जिभेला साप डंखवुन त्याची तलफ भागवणारी

आठवा, महाराजा शिवदत्त को विष चाहीये
>>
खरच खुप छान मालीका होती....काय सेट... शिवदत्त ची महारानी पण खुप सुंदर होती..तीची मैत्रीन सबिया (रड्का आवाज तीची मोत्यामोत्यांची हेअरस्टाईल खुप आवडायची मला) परत ही मालीका पाहायची आहे...

नम्रता व महेश बाबू म्हणजे टॉलिवूड रॉयल्टीच आहेत. एक मुलगा आहे तिला.>>>>मोठा मुलगा आणि लहान मुलगी आहे जी जाम क्युट आहे.
चंद्रकांतासाठी रविवारीपण लवकर उठावं लागायचं .

विनी परांजपेने "चश्मेबद्दूर" मधे काम केले होते छोटेसे.
तसेच तिचा एक जंगलावर आधारित चित्रपट होता कोणाला आठवतोय का ?
त्यात बहुतेक मिलिंद गुणाजी आहे. झिलिपिट्टी मिली रे मिली असे काहीसे गाणे होते त्यात.

'परदेस' वाली महिमा चौधरी कुठे असते आता? तिने 'बिगब्रदर' मधे भाग घ्यायला नकार दिला होता एव्ह्डी माहिती तिच्याबद्दल शेवट्ची..

नताशा-अनिता हंसनंदानी- म्हणजे आत्ता स्टार प्लस 'ये है महोब्बतें' आहे ती? तिच होती ना एकत कपुरच्या 'महाभारत' मधली 'द्रौपदी'?

मासूम मध्ये जुगल हंसराज, उर्मिला मातोंडकर यांच्याबरोबरची तिसरी लहान मुलगी कोण?
ती अलिशा चिनॉय असावी असं मागे कुठेतरी वाचलं होतं. पण ते बहुधा चुकीचं असावं.

रामायण, महाभारत, हमलोग, बुनियाद, नुक्कड, इ. प्रसिद्ध मालिकांमधली पात्रे कुठे आहेत ? नंतर कोणी फार प्रसिद्ध झाल्याचे आठवत नाही.

टिपरेतली शलाका म्हणजे रेश्मा नाईक आमच्या घरासमोर राहायची. (माहेर व सासर शेजारीच) ती अमेरिकेला गेली होती आता परत आली आहे बहुधा. त्यांच्या लग्नाला विरोध होता, पण हे पेपरमध्ये का लिहावं कोणी? तिची आई लिहायची? ** ओह आता नीट वाचले. टीपरेतील तिची आई लिहायची. म्हण्जे शुभांगी गोखले.. ओके ओके..

महाभारत -

दुर्योधन - पुनित इस्सर - अनेक सिरीयल्स आणि पिक्चरमधे आहे.
कृष्ण - नितिश भारद्वाज - सध्या राजकारणात
अर्जुन - अर्जुन - काही पिक्चरमध्ये व्हिलनच्या रोलमध्ये किंवा साईड रोलमध्ये आला नंतर.
द्रौपदी - रुपा गांगुली - काही बंगाली आणि मोजक्याच हिंदी पिक्चरमध्ये आली.
बलराम - सागर साळुंखे - जिन्दगी एक जुआ या पिक्चरमध्ये साईड व्हिलन होता. पोलीस ऑफीसर आहे प्रत्यक्षात.
कर्ण - पंकज धीर - फार थोड्या पिक्चरमध्ये आणि सिरीयल्समध्ये दिसला.

रामायण

राम - अरुण गोविल - काही सिरीयल्स आणि एक-दोन पिक्चरमध्ये साईड रोल
सीता - दिपीका - राजेश खन्नाबरोबर एका टेलीफिल्ममध्ये आली
रावण - अरविंद त्रिवेदी - गुजराती पिक्चरमध्ये असायचा
मेघनाद - विजय अरोरा - बराच जुना ठोकळा

नुक्कड

गुरु - दिलीप धवन - बर्‍याच पिक्चरमध्ये साईड रोल मध्ये. गेला.
पवन मल्होत्रा - आजही असतो
खोपडी - समीर कक्कर - अनेक पिक्चरमध्ये लहानशा रोल्समध्ये असतो. उल्लेखनिय - परिंदा

@ महेश

<< तसेच तिचा एक जंगलावर आधारित चित्रपट होता कोणाला आठवतोय का ?
त्यात बहुतेक मिलिंद गुणाजी आहे. झिलिपिट्टी मिली रे मिली असे काहीसे गाणे होते त्यात. >>

पपीहा

आधी पाहिलेले आता गायब झालेले कलाकार चर्चा करतोय आपण.
पण हे नविन बिग बॉस सुरू झालंय त्यात कितीतरी कलाकार आहेत ज्यांना मी आधी कधीच पाहिलं नाही आहे.

उदा. आर्या बब्बर.. Uhoh ( हा म्हणे राज बब्बर आणि नादिराचा मुलगा आहे असं गुगल्याने सांगितलं.)

कुठे होता हा माणूस आधी? कुणी पाहिलाय?

मासूममधली तिसरी मुलगी मला कुणीतरी आयेशा टकिया (का ताकिया) सांगितलं होतं. Uhoh

बस्के, ते लिहिताना मला शुभांगी हे नावच काही केल्या आठवत नव्हतं बघ. फक्त गोखले लिहायच्या ऐवजी मी फक्त मग ते टिपरेतली आई असा उल्लेख केला. Happy

चेतन ___/\___ Happy
पण पपिहा पुन्हा कुठे पहायला मिळेल आता ?
तसेच त्यात काम केलेली विनीच आहे ना ?

नुक्कड मधला हवालदार "अजय वढावकर" फार हलाखीच्या परिस्थितीत आहे, एका अपघातात पाय अधू झाले आहेत असे वाचल्याचे आठवते. Sad

हमलोग मधे मुलांच्या वडिलांचे काम केलेल्या अभिनेत्याचे नाव काय ?
चश्मेबद्दूर मधल्या एका गाण्यात गायनमास्तरचे काम केले होते.

अंगूर (जुना) हा असा एक चित्रपट आहे की त्यातले सगळेच लोक भारी आहेत Happy
त्यामधला छेदिलाल सोनार कोण आहे ? या व्यक्तीने इतरही अनेक चित्रपटात काम केले आहेसे वाटते.

गोलमाल मधला अमोल पालेकरचा पान खाणारा मित्र कोण आहे,
हा खुबसूरत मधे पण फॅमिली फ्रेन्ड दाखविला आहे.

अंगूर (जुना) हा असा एक चित्रपट आहे की त्यातले सगळेच लोक भारी आहेत>> अनुमोदन. एक अंगूर गटग तो बनता है. " बस आ रही है बस आ रही है. इत्ना फुटेज क्यू खा रही है असल्या वाक्यातून हसवणारा एकच तो आपला संजीव कुमार. और बीस साल तो जिंदा रहना था इन्हे. रिअली मिस हिम.

>>>हमलोग मधे मुलांच्या वडिलांचे काम केलेल्या अभिनेत्याचे नाव काय ?
>>>चश्मेबद्दूर मधल्या एका गाण्यात गायनमास्तरचे काम केले होते.

विनोद नागपाल
मधल्या काळात गायब होते पण आजकाल ३-४ हिंदी चित्रपटात दिसले.

Pages