आपण यांना पाहिलंत का?

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 11 October, 2014 - 02:15

तीन दशकांहून अधिक काळ मराठी व हिंदी अशा दोन्ही भाषांमधील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका आणि नाटके पाहत आहे. अनेकदा असे होते की एखादा चेहरा आवडतो, पण पुन्हा कुठे फारसा दिसतच नाही. माध्यमांतूनही त्या चेहर्‍याची चर्चा होत नाही. जसे काही हा चेहरा सर्वांच्या विस्मृतीतच गेला आहे. नेमका हा चेहरा मला बर्‍यापैकी आठवत असतो, पण इतर अनेकांना त्याचा परिचयच नसतो.

अशाच काही (इतरांच्या) विस्मृतीत गेलेल्या पण मला आवडत असलेल्या या चेहर्‍यांबद्दल.

  1. अभिनव चतुर्वेदी:- हमलोग मालिकेतील नन्हे हे पात्र. या मालिकेनंतर पुन्हा बुनियाद या मालिकेत आणि रिश्ते मालिकेच्या एका भागात पल्लवी जोशीसोबत पाहिले होते, पुन्हा दर्शन नाहीच.
  2. डॉ. पलाश सेनः- फिलहाल चित्रपटात सुश्मिता सेन चा नायक, विद्या बालन सोबत एका विडीओ अल्बम मध्ये नायक व गायक देखील. पुन्हा फारसा दिसला नाहीच.
  3. भानू उदय- स्पेशल स्क्वाड या स्टार वाहिनीवरील मालिकेचा नायक. बराच काळ दूर राहून आता पुन्हा सोनी पल वाहिनीवर डॉक्टरच्या भुमिकेत दिसतोय.
  4. लवलीन मिश्रा:- हमलोग मालिकेतील छुटकी हे पात्र. या मालिकेनंतर पुन्हा स्टार वाहिनीवरील श्श्श कोई है च्या एका भागात इरफान खान सोबत पाहिले होते, पुन्हा दर्शन नाहीच.
  5. काजल किरणः- हम किसीसे कम नही चित्रपटाची नायिका. पुन्हा मांग भरो सजना या चित्रपटात जितेन्द्रसोबत लहानशा भूमिकेत दिसली होती. विक्रम और वेताल च्या दोन भागांमध्येही तिने दर्शन दिले. तिने बहुतेक सर्व बी ग्रेड चित्रपटांतूनच काम केले. तिचे कराटे, सबूत, भागो भूत आया, अंदर बाहर, हमसे बढकर कौन व सात बिजलीयां हे चित्रपट माझ्या संग्रहात आहेत.
  6. वैशाली दांडेकरः- अधांतरी मालिकेची नायिका आणि हमाल दे धमाल चित्रपटात नायिकेची बहीण. पुन्हा दर्शन नाही.
  7. शीतल क्षीरसागरः- रात्र आरंभ चित्रपटातील डॉक्टर. पुन्हा कधीच कुठल्याच चित्रपटात, मालिकेत दिसली नाही. काल अचानक महाराष्ट्र टाइम्स च्या पुणे टाईम्स पुरवणीत दिसली. http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/44755907.cms?prtpa... सत्ताधीश-किस्सा खुर्चीचा, गारंबीचा बापू, इत्यादी नाटकांतून काम करत असते, अर्थात मी अजून पाहिली नाहीत. रामचंद्र पुरुषोत्तम जोशी या आगामी चित्रपटातूनही तिचे दर्शन होईल.
  8. नंदिनी जोग:- काही दूरचित्रवाणी मालिका तसेच पंढरीची वारी, आघात, थांब थांब जाऊ नकोस लांब, कळत नकळत आणि आईशप्पत अशा काही चित्रपटांमधून दिसलेली ही अभिनेत्री आता गायबच झाली आहे.
  9. वन्या जोशी:- हिमालय दर्शन, मैला आंचल, मंझिले, अशा दूरदर्शन मालिका आणि सरदार व संशोधन या चित्रपटांतून दिसलेली ही अभिनेत्री आता कास्टिंग डायरेक्टर बनली आहे.
  10. वंदना पंडितः- अष्टविनायक चित्रपटातून सचिन पिळगांवकर सोबत दिसलेली ही अभिनेत्री पुन्हा कुठेच दिसली नाही.
  11. सोनाली जोशी:- एक्स्क्यूज मी चित्रपटातून आणि एका हिन्दी मालिकेतून श्रेयस तळपदेसोबत दिसलेली अभिनेत्री.
  12. फातिमा शेखः- देव आनंद यांच्या सौ करोड या चित्रपटाची नायिका
  13. सारा खान:- ढुंढ लेंगी मंझिले हमें ही दूरचित्रवाणी मालिका आणि पेबॅक हा चित्रपट यात मुख्य भूमिका केल्यावर ही मध्यंतरी टोटल सियप्पा चित्रपटात नायिकेची बहीण म्हणून दिसली होती.
  14. गायत्री जोशी:- स्वदेस चित्रपटाची नायिका आणि मॉडेल. आयएमडीबीनुसार वाँटेड देखील तिच्या नावावर दिसतोय, मला तरी त्यात दिसली नाही. इतरत्रही फारसे दर्शन नाहीच.
  15. बरखा मदन:- काही दूरदर्शन मालिका, खिलाडीयोंका खिलाडी चित्रपटात सहनायिका, भूत चित्रपटातील भूत आणि सोच लो चित्रपटात प्रमुख नायिकेची भूमिका केल्यावर आता संन्यास घेऊन बौद्ध भिक्खू झाली आहे.
  16. अपर्णा टिळकः- फुटपाथ चित्रपटा इम्रान हाश्मीची नायिका, जीत या स्टार वाहिनीवरील अंकूर नय्यर ची नायिका, लेफ्ट राईट लेफ्ट व कही किसी रोज या मालिकांमधील काही भागांत लहानशी भूमिका तसेच जुन्या सब टीवीवरील एका विनोदी मालिकेत कंवलजीत सिंहच्या मुलीची भूमिका करून आता गायब झाली आहे.
  17. पल्लवी कुलकर्णी:- क्या हादसा क्या हकीगत, वैदेही आणि कहता है दिल या मालिका तसेच बॉबी देओलच्या क्रांती चित्रपटात त्याची बहीणीची भूमिका करून सध्या गायब. https://www.youtube.com/watch?v=Rp_dqBOC9t8&list=UUmYSGwSGkdFBeN1Kxm8wjWA
  18. वैदेही अमृते:- अभिनेत्री / मॉडेल. गृहस्थी मालिकेत किरणकुमार सोबत होती.
  19. अमृता रायचंदः- चित्रपट - बात बन गयी, मालिका - माही वे, रिअ‍ॅलिटी शो - ममी का मॅजिक, जाहिराती - व्हर्लपूल, पॉण्ड्स व इतर अनेक.
  20. आरती चांदूरकरः- खतरनाक चित्रपटात महेश कोठारेंची नायिका https://www.youtube.com/watch?v=B7fYRg2vdb4&list=UUmYSGwSGkdFBeN1Kxm8wjWA
  21. इंदु वर्मा:- सिद्धांत मालिकेतली आर्किटेक्ट अलका, नायक अ‍ॅडव्होकेट सिद्धांतची क्रमांक २ ची प्रेयसी.
  22. जमुना:- दो फंटूश, अंधेरा चित्रपटांतली नायिका, प्रसिद्ध नृत्यांगना

अज्ञात चेहरे:-

  1. हेच माझे माहेर चित्रपटातील मोहन गोखलेची नायिका.
  2. माझं घर माझा संसार चित्रपटातील अजिंक्य देवची नायिका
  3. देव आनंदच्या बुलेट चित्रपटात डॉ. श्रीराम लागूंच्या कन्येची भूमिका करणारी अभिनेत्री
  4. ताल चित्रपटातील ऐश्वर्या राय सोबत असलेली अभिनेत्री. मी चित्रपट पाहिला नसल्याने तिची भुमिका किती मोठी आहे ते माहित नाही पण इथे https://www.youtube.com/watch?v=p_OoCr4uRhM या गाण्यात ३ र्‍या सेकंदाला निळ्या कपड्यांत दिसतेय. अजून एका गाण्यात अक्षय खन्नाला काही तरी चिडवतेय असे पाहिले होते.
  5. पाप चित्रपटातील जॉन अब्राहम ची बहीण https://www.youtube.com/watch?v=ObRQx4PHeTg&list=UUmYSGwSGkdFBeN1Kxm8wjWA

हे चेहरे मी उल्लेख केल्याव्यतिरिक्त आपण कुठे पाहिले असल्यास जरूर नमूद करावे. तसेच आपणांस देखील असे कुठले जनतेच्या विस्मृतीत गेलेले चेहरे आठवत असतील तर त्यांचा देखील उल्लेख करावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शोभना समर्थ - तनुजा - काजोल यांचे नेहमी कौतूक होते पण तशीच आणखी दोन उदाहरणे होती.

मिनाक्षी - विनिता - शिल्पा आणि नम्रता... शिरोडकर. विनिताबाईंनी फक्त मॉडेलिंग केले. शिल्पा लग्न होऊन अमेरिकेला गेली. नम्रता मात्र नंतर दिसलीच नाही. ( शेवटची तिला ऐश्वर्या बरोबर एका फिल्ममधे बघितले. )

तसेच
सुचित्रा - मुनमुन - रिमा आणि रायमा ... सेन. मुनमुन पण अकालीच निवृत्त झाली. रिमा ला धूम ३ मधे चान्स मिळाला नाही आणि रायमा पण गायबच झाली. (तिला पण ऐश्वर्याबरोबर चोखेर बाली मधे शेवटचे बघितले )

रायमा असते अनेक चित्रपटांमध्ये. बंगाली चित्रपटांमध्ये तर असतेच असते.

रिमा ला धूम ३ मधे चान्स मिळाला नाही>> धूम १ आणी २ मध्ये होती ती रिमी सेन. तिचा आणी या सेन लोकांचा काही संबंध नाही.

रिमा सेन परत वेगळीच. रिमा सेनने बरेच तमिळ तेलुगु सिनेमे केलेत. दोन तीन वर्षापूर्वी तिचं लग्न झालं.

रायमाची बहिण रिया सेन. तिनंसुद्धा हिंदी, बंगाली, तमिळ सिनेमे केले आह्त.

दिनेशदा ऐश्वर्या आणि नम्रता शिरोडकर? मला वाटत तिचा शेवटचा पिक्चर अनिल कपुर, माधुरी दिक्षित बरोबरचा पुकार हा होता..

हेराफेरी पार्ट२ मध्ये पण होती रिमी सेन...

मध्यंतरी ऋषी कपूर, तुषार कपूर, इशा देओलचा एक हॉरर पिक्चर आला होता कुछ तो है.. त्यातली अजुन एक हिरॉईन ती सुरुवातिला मालिकांमधुन दिसायची ती देखील गायब आहे...

धूम मधे होती ती यांच्यापैकी नाही ? बापरे.. काय गोंधळ होता माझा !
ब्राईड अँड प्रीजुडीस मी हिंदीत बघितला होता.. कायतरी बरंच नाव होतं.. बल्ले बल्ले असे शब्द पण होते नावात.

नम्रता, गार्डन च्या जाहिरातीत खुप छान दिसायची. नंतर ती चित्रपटात आली.

अनित हसनंदानी उर्फ नताशा का? >>> हो नंदीनी.. धन्स.. Happy

दिनेशदा त्याच हिंदीतल नाव "बल्ले बल्ले अमृतसर टु एल ए." अस होत... यात ऐश्वर्याचा हिरो कोण होता? काय मस्त होता तो? हॉलिवुड अ‍ॅक्टर आहे का?

चंद्रकांता सिरियल आठवतीये का? मला जाम आवडायची मी खुप लहान होते तेव्हा...त्यातली चंद्रकांता परत कुठेच नाहि दिसली तसेच एक तारा म्हनुन वीषकन्या पन...
बाकीचे कलाकार दिसतात क्रुरसिंग अजुनपन दिसतो, राजकुमार विरेद्र पन्.सबिया सासुचे रोल करते...पंकज धीर पन दिसतो
अजुन एक सांगा वर्षा उसगावकर आणि उर्मिला मार्तोंडकर चे लग्न झालेय की नाही?

माझे एक निरि़क्षण आहे, जर कोणी कलाकार गेला तर इतर कलाकार त्याच्या आठवणी सांगतात टिव्हीवाल्यांना, त्यामधे अनेकवेळा एकच माणूस खुप पुढे दिसला आहे "रजा मुराद"
त्याने कामे करणे सोडून फक्त आठवणी सांगायचे ठरविले आहे की काय ? Uhoh

चंद्रकांता - शिखा स्वरूप

नागमणी चित्रपटात सुमित सैगल सोबत होती.

अधिक माहिती इथे :-
http://en.wikipedia.org/wiki/Shikha_Swaroop

आता शिखा स्वरूप वरून कुणाला दीपशिखा आणि स्वरूप संपत देखील आठवू शकतात.

चंद्रकांता - शिखा स्वरूप

नागमणी चित्रपटात सुमित सैगल सोबत होती.

>>>धन्यवाद
तारा (विषकन्या)?

"रजा मुराद" चा आवाज छान भारदस्त आहे. प्रसारमाध्यमांना आवडत असेल त्याच्या आवाजात आठवणी ऐकवणं. आता आपल्याला सगळ्यांना रजा मुराद म्हणजे जाडा, भयानक दिसणार खलनायक आठवेल पण आला तेव्हा एकदम लुकडा, काडीपैलवान होता - नमकहराम मधला मद्यपी शायर बदनाम बंधू (कॉम्रेड)

अजुन एक सांगा वर्षा उसगावकर आणि उर्मिला मार्तोंडकर चे लग्न झालेय की नाही?

सीमा२७६ नाही त्या दोघींचे लग्न झालेले नाही. सेपरेट सेपरेट केले असेल तर महित नाय ? Wink

Pages