ऑफिसमधील राजकारणाचे अनुभव.

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 September, 2014 - 02:49

माझ्या "फ्रेंडस अ‍ॅण्ड कलीग्ज" या धाग्यावर `बेफिकीर' यांनी सुचवल्याप्रमाणे "ऑफिसमधील राजकारणाचे अनुभव" हा वेगळा धागा काढत आहे.

धाग्याचा फायदा सर्वांनाच, खास करून माझ्यासारख्या ४-५ वर्षांचा अनुभव असलेल्या आणि तुलनेत मॅनेजमेंटच्या लोअर लेव्हलला असलेल्यांसाठी येथील अनुभवी लोकांचे अनुभव, त्याचे विश्लेषण आणि एक्स्पर्ट टिप फार मोलाचे ठरतील.

आभारी आहे,
ऋन्मेऽऽष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा एक छोटासा पण ताजा अनुभव इथे,
फ्रेंन्ड अ‍ॅण्ड कलीग्ज !

खरे तर हा राजकारणाशी संबंधित नसून व्यावसायिक मैत्री आणि प्रोफेशनल लाईफ मधील रिलेशनशिप बाबत आहे.

खरे तर हा राजकारणाशी संबंधित नसून व्यावसायिक मैत्री आणि प्रोफेशनल लाईफ मधील रिलेशनशिप बाबत आहे.>> तुमचा पूर्न अ‍ॅप्रोचच चुकीचा आहे. व्यवसायात मैत्री नाही. प्रोफेशनमध्ये रिलेशनशिप नाही. व्यवसायत रिटर्न्स प्रोफेशनल लाइफमध्ये पर्फॉर्मन्स महत्वाचा. त्यात ऑफिसमधील पॉप्युलॅरिटीचे अजून आकर्षण आहे असे दिसते पण हे कॉलेज नव्हे. अनुभवाअंती शिकालच. तो परेन्त इथे कोणीतरी हँडहोल्डिंग करेल. खडूस पणे नाही लिहीत. मदत म्हणूनच लिहीले आहे.

इंजिनीयर झाल्यानंतर आवडीनुसार मार्केटिंगमध्येच केलेल्या २४ वर्षांतील ६ नोकर्‍यांमध्ये एक गोष्ट कटाक्षाने पाळली.

जे साहेब सांगतो ते ढळढळीतपणे चुकीचे असले तरी तेच करायचे. खरे तर, ढळढळीतपणे चूक असले तर, तर करायचेच करायचे. आपण आपले डोके वापरण्याचे परिणाम अतिशय दुर्दैवी असू शकतात. समोर चक्क दिसत असले की काय डिसीजन घ्यायला हवा आहे तरीही साहेबाचाच निर्णय रेटायचा. हे वरवर दिसायला कमकूवत नॉनपर्फॉर्मरचे वागणे वाटू शकेलही, पण ऑन रेकॉर्ड्स तुम्हाला कोणीही कधीही काहीही बोलू शकत नाही.

ऑफीस पॉलिटिक्स मी स्वतः अक्षरशः एकदाही केले नाही कारण ते खरोखरच रक्तातच नाही, पण त्या ऑफीस पॉलिटिक्सचा बळी मात्र अनेकदा व्हावे लागले.

हा वाहता धागा होणार आहे काय? तसा तो होऊ नये अशी इच्छा आहे.
>> हे तुमच्यावरच अवलम्बून आहे. जब तक एक एम्प्लॉयी बोलेगा धागा स्थिर रहेगा, जबसे एक प्रचारक बोलेगा, धागा बहता रहेगा Happy

एनी वे, चांगला विषय आहे.

2010-2012 मी ऑस्ट्रेलियन बॉसच्या हाताखाली काम केले, भयानक माणूस एवढाच शब्द मला सूचतो. दर 15 मिनिटांचा कामाचा रिपोर्ट मागायचा, काम करायचे की रिपोर्ट बनवायचा? रेडी रेकनरसारखा लिहिलेला चालायचा नाही, नवीन काहीतरी लिहिलेले हवे असायचे. अॅडमिन मधे दर 15 मिनिटात नवीन काय घडणार नि नवीन काय लिहिणार? तरी मी लिहायचे.

"हरी साडू'च होता.

तांत्रिक गोष्टी शिकव म्हणायचा, आणि शिकवायला गेले की तू हे कसं शिकलीस ते शिकव म्हणयचा.

कॉर्पोरेट क्षेत्र हे क्रूर फील्ड आहे. युटिलिटी हा तिथला पासवर्ड आहे. तिथे भावनाना स्थान नाही . ही त्या क्षेत्राची डिमान्ड आहे . त्यात प्रवेश घेतानाच स्वतःचे फंडे क्लीअर करणे आवश्यक आहे....

भग्वद गीता ! हे एक मॅनेजमेन्ट बूक आहे असे मी मानतो . एरव्ही त्या अरेबियन नाईत्स सारख्या भाकड कथा आहे असे माझे मत आहे...

अर्जुन हा क्षत्रिय होता म्हणजे तत्कालीन समाजव्यवस्था पाहता त्याची नेमणूक लढण्यासाठी होती . एखाद्या आर्मी ऑफिसरसारखी . ते त्याचे कर्म होते . युद्ध भूमीवर ठाकल्यावर त्याला समोर मामे, भाचे, गुरू काके दिसू लागले . आणि ' सीदन्ति मम गात्राणि, मुखं च परिशुष्यति ' असी स्थिती झाली (म्हणजे गात्रे शिथील झाली आणि तोंडाला कोरड पडली). या नातेवाईकाना ,ज्येष्ठाना कसे मारू असा प्रश्न त्याला पडला...

मामे काके भाचे गुरूं,
यांते कैसा मी संहारू,

तोंडात बाटाचे खेटरूं
हाणतील लोक !

असा प्रश्न त्याला पडला. त्यावर श्रीकृष्णाने त्याला सांगितले की बाबा रे तू इथे क्षत्रीय म्हणून उभा आहेस आणि लढणे व समोरच्याचा नि:पात करणे हे तुझे काम /कर्म आहे. तू इथे कोणाचा नातेवाईक म्हणून भूमोकेत नाही. सबब तुझे गांडीव धनुष्य उचल आणि युद्धाला प्रारम्भ कर.

भारत पाकिस्तानचे मागच्या पिढीतले सर्वोच्च सेनाधिकारी आर्मी कॉलेजमधले कलीग, वर्गमित्र, बॅचमेट होते म्हणून मी आता मित्राच्या विरोधात कसे लढू असा प्रश्न त्याना कधी पडला नाही.पडूही नये.

शेवटी ज्याची त्याची भूमिका असते रोल असतो. उद्या रामायणावरील एखाद्या नाटकात स्टेजवर रावणाची भूमिका करणार्‍या पात्राने जर म्हणायला सुरुवात केली की ' वा वा रामा, किती उदात्त तुझे विचार, मला युझे म्हणणे पटते.मी तुझा भक्त झालो आहे' तर लोक त्याला जोड्याने मारतील ' अरे साल्या तुला का हे बोलण्याकरता नाटकात घेतले आहे का? तुझे काम का रामाची स्तुती करणे आहे ? फारच पुळका आला असेल रामाचा तर पडद्याच्या मागे जाऊन त्याच्या गळ्यात पड:फिदीफिदी

तात्पर्यः जग ही रंगभूमी आहे ज्याने त्याने आपापला वाट्याला आलेला रोल व्यवस्थित पार पाडावा स्मित

माझा अनुभव तसा फारसा नाही आहे..
पण माझ्या स्वानुभवावरुन सांगतोय की
1. आपल्या डोमेनमधल्या कोणावरही अतिविश्वास ठेऊ नये.
2. bossला डाइरेक्ट नाही म्हणू नये.
3. खाजगी आयुष्याला officeपासुन दुरच ठेवावे.

मी भारतीय mgmtच्या खाली पुर्वी काम केलंय, सध्या European mgmtच्या खाली काम करतोय.

भारतीय mgmtमधे लोवर लेवलला कमी, पण हायर लेवलला खुप जास्त राजकारण होते.
सध्या European mgmtसोबत काम करायला जास्त चांगलं वाटतंय. पण तिथे दोस्ती-यारी मदतीला येत नाही. जे काही असेल ते official मार्गानेच करतात. पण European - Indian politics / lobbying वगैरे नाही म्हटलं तरी होतंच.

आपल्याकडे आपण बरीच कामं दोस्ती - यारीमधे करुन टाकतो. मेल्स / official requestsची वाट नाही बघत. पण जर कोणाला आपली मागून वाट लावायची असली तर तो आरामात अडकवू शकतो.

बेफ़िकीरजी: खुपच मोलाचा सल्ला..

रॉबीनहूड:
कॉर्पोरेट क्षेत्र हे क्रूर फील्ड आहे.
युटिलिटी हा तिथला पासवर्ड आहे. तिथे
भावनाना स्थान नाही
>>>>>
पुर्णपणे सहमत.

पण कलिग्ससोबत नाही म्हटलं तरी मैत्री होतेच, पण तिची तुलना शाळा /college च्या मैत्रीशी नाही करु शकत.

हायला मी एकटाच हाय कि कॉय, बॉसला पण जरा तुमचेच चुकते म्ह्णुन सांगणारा आणि नाही म्हणणारा ? Uhoh

पण हे मी बर्‍याच वेळा अनुभवल आहे कि दुसर्‍याची गोची करण्यात बर्‍याच जणांना असुरी आनंद मिळतो. आता इथे रुमाल. माझ्याकडे बरेच किस्से आहेत इथे लिहण्यासारखे. पण नंतर लिहेन.

बॉसच्या पुढे आणी गाढवाच्या मागे उभे राहु नये. <<< नक्कीच पण बॉसने अवाजवीपणा केल्यावर नक्कीच लाथ घालावी Happy

सुनिधी, मला कल्पना नाही.तुमचे वय काय आहे हे मला माहीत नाही. मायबोलीकरांचे सरासरी वय मी ३०-ते ३५ धरून चालतो.मी ज्या कार्पोरेट सोबत काम करतो,तिथल्या लोकांचे कामाचे स्वरूप पाहून, कार्पोरेट जॉब मार्केटची भारतातल्या आणि परदेशातल्या , मला जी माहिती झाली आहे, आयुष्याच्या मध्यावर ज्यांचे जॉब्ज गेलेले आहेत आणि जे कुटुम्बप्रमुख आहेत त्यांची जी उदाहरणे मी पाहिलेली आहेत त्यावरून माझे मत तरी तसे झाले आहे खरे...

प्रचंड असुरक्षितता या एकाच शब्दात मला तरी त्याचे वर्णन करावेलागेल....तुमचा ही अनुभव ऐकायला आवडेल !

<हायला मी एकटाच हाय कि कॉय, बॉसला पण जरा तुमचेच चुकते म्ह्णुन सांगणारा आणि नाही म्हणणारा ? >

निपा, आहे आहे. मीही आहे. माझी कीर्ती दूरदूरवर पसरलेली होती. Wink

माझ्या आधीच्या companyche वर्कक्ल्चर इतक खराब होत की विचारु नका.......... सगळ काम झाल असल तरी मॅनेजरचा अह्म satisfy करण्यासाठी लोक बिचारी ८-९ वाजता घरी जायची....पण आम्ही नाही ना त्यातले ........ काम झाल की लगेच पळणार घरी..... मी त्याच एकत नाही हे बघून त्या मॅनेजरने बराच त्रास दिला.....सुट्टी काही कारण नसताना रद्द करणे...... सतत धमकी देणे की याचा तुझ्या appraisalwar परिणाम होईल....सतत शनिवारी/रविवारी काम करण्यास बोलवणे........झालस तर माझ्या कलिगना आणि दुसरया मॅनेजरना सागणे की मी कशी काम करत नाही.....आणि हे मला एका दुसर्या मॅनेजरनेच सान्गितले कि तो अस म्ह्णत होता. आणि मीच त्याल उलट सान्गितले कि ती खूप चान्गली रिसोर्स आहे..... Happy
देवाच्या दयेने मी लवकरच त्या company रामराम ठोकला.......आता जन्मात परत जाणार नाही तिथे कितीही बोलवल तरी

आयुष्याच्या मध्यावर ज्यांचे जॉब्ज गेलेले आहेत आणि जे कुटुम्बप्रमुख आहेत त्यांची जी उदाहरणे मी पाहिलेली आहेत त्यावरून माझे मत तरी तसे झाले आहे खरे...>>>>>>>..बरोबर आहे मला पण असच वाट्त ......... कायन एकतरी बॅकअप प्लॅन हवाय नोकरी गेली तर

<हायला मी एकटाच हाय कि कॉय, बॉसला पण जरा तुमचेच चुकते म्ह्णुन सांगणारा आणि नाही म्हणणारा ? > काऊंट मी इन! क्लाएंटला पण सुनावलं आहे एकदा ..
चुकीच काम मी करणार नाहीय.. नको असेल् तर गेलात उडत..
मी एखादं कामासाठी पात्र आहे तर मी माझ्या पद्धतीने करणार .. चुकलं की कान पकडा पण उगाच चुकीचे सल्ले नकोत! एका सिनिअरने सांगितल की तुझा हा आत्मविश्वास नि अ‍ॅटिट्युड गोत्यात आणेल तुला पण अजुन तरी नाही झालयं तस..

श्रीकृष्णाने त्याला सांगितले की बाबा रे तू इथे क्षत्रीय म्हणून उभा आहेस आणि लढणे व समोरच्याचा नि:पात करणे हे तुझे काम /कर्म आहे. तू इथे कोणाचा नातेवाईक म्हणून भूमोकेत नाही. सबब तुझे गांडीव धनुष्य उचल आणि युद्धाला प्रारम्भ कर.>>>>>>

या वरुन गीतेमधील एक श्लोक आठवला. माझ्या कार्यालयीन ईमेल आयडी ची स्वाक्षरी. Happy

सुखदु:खे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ
ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि

जय पराजय, लाभ हानि, आणि सुख दु:ख यांना समान समजून युद्धाला तयार हो. या प्रकारे युद्ध केल्याने तुला पाप लागणार नाही.

हेच तत्व वापरायचं, आपल्या कंपनीने नेमून दिलेले काम करणे हे आपले कर्तव्य आहे, कर्म आहे. ते वैयक्तिक स्वार्थ न ठेवता, दुजाभाव न करता करायचे. त्यात कोणाचे नुकसान झाले, कोणी दुखावले तरी तो तुमचा दोष नाही. ज्याची चूक असते त्याला आज ना उद्या कळतेच. क्षणिक राग आला तरी नंतर त्याला उमगते, जर अहंकार नसेल तर ! नाही उमगले तर अशा लोकांकडे दुर्लक्ष करुन आपले काम चालू ठेवायचे.

माझ्याकडे लिहिण्यासारखं भ र पू र आहे. ऑफिसच कशाला, जिथे दोनपेक्षा जास्त माणसं एकत्र येतात तिथे राजकारण सुरू होतंच. आता एन्जीओ टाइप काम करतोय. तिथेही तेच आहे.

तर ऑफिसचा (हा एक) अनुभव.

मुंबईहून इंदूरला माझी बदली होऊन साडेचार-पाच वर्षे झाली होती. माझ्यानंतर तिथे बदली होऊन आलेलेही अनेकजण मुंबईचे होते किंवा कधी मुंबईत काम केलेले होते. मुंबईत मी अकाउंट्स सेक्शन मध्ये होतो त्यामुळे ब्रँच, झोनल ऑफिस, हेड ऑफिस सगळ्यांशीच ओळख असायची.
तर मुंबईत मी असिस्टंट असताना माझा ऑफिसर असलेलाच आता एजीएम होऊन भारतभ्रमण करीत माझा ब्रँच मॅनेजर होऊन आला होता. तर इंदूरला ब्रँच मॅनेजर, दोन मॅनेजर आणि ६-७ (बदलती संख्या) असिस्टंट मॅनेजर असे आम्ही होतो. बदलीवर आलेल्या ऑफिसर्सना अ‍ॅकॉमोडेशन ऑफिसकडून. म्हणजे quarters or leased flats. क्वार्टर्स तीनच होते.त्यातला एक ब्रँच मॅनेजरचा. मी लीज्ड फ्लॅटमध्ये राहत असे. क्वार्टर्समध्ये राहणार्‍या दोघांची बदली अन्यत्र झाली आणि त्यांच्यापैकी एकाची रिप्लेसमेंट यायचे चिन्ह नव्हते. त्यामुळे तो तिथे लीझ फ्लॅटमध्ये राहणार्‍या कोणालातरी द्यावा लागणार होता.
मला क्वार्टर्समध्ये जायचे नव्हतेच. एस्बीआयच्या क्वार्टर्स असलेल्या सोसायटीतलेच तीन फ्लॅट आमच्या संस्थेला लीझवर मिळालेले होते. माझ्या सध्याच्या निवासस्थानापेक्षा ते ऑफिसपासून आणखी दोन किमी दूर होते. माझे स्वतःचे वाहन नसल्याने (हे इंदुरात विरळाच) मी रिक्शाने प्रवास करी. तसंच मी जिथे राहत होतो, तिथेच माझी जेवणाखाण्याची सोय झाली होती. क्वार्टर्सच्या जवळ अशी काही सोय होणे शक्य नव्हते.(मी एकटाच राहत होतो). त्यावेळी इंदूरात लोड शेडिंगची समस्या बिकट होती आणि एसबीआयचे ऑफिसर्स/मॅनेजर्सही पाणी खालून भरून आणायचे. त्यावेळी माझा आर्थ्रायटीस पीकवर पोचू लागला होता त्यामुळे ही एक मोठी समस्या होती. मला विचारणा झाल्यावर मी यातलं काही सांगितलं नाही. पण सगळ्यांना ही कारणं माहीत होती. फक्त मला तिथे राहणं अडचणीचं होईल त्यामुळे नॉट इन्टरेस्टेड असं सांगितलं.
ब्रँच मॅनेजरने लीझ्ड फ्लॅटवर राहणार्‍या तिघांची मीटिंग बोलावली. एका ऑफिसरने माझी पत्नी प्रेग्नंट आहे; त्यामुळे जमणार नाही असे सांगितले. मॅनेजरने माझ्या मुली आता रहातो तिथे रमल्यात. त्यांना डिस्टर्ब करायचं नाही असं सांगितलं.

एवढ्यावर गप्प बसणं माझ्या स्वभावात बसत नाही. मी म्हटलं सगळे प्रिव्हिलेजेस सिनियॉरिटीप्रमाणे अलॉट होतात. जास्तीची कामं मात्र ज्याची असतात त्यानंच करायची असतात. तेव्हा मॅनेजर, असिस्टंट मॅनेजरचं किंवा क्लेरिकल काम करत नाही.क्वार्टरही एक प्रिव्हिलेज आहे.
त्यामुळे लेट इट बी अ‍ॅज पर सिनियॉरिटी (बाण मॅनेजरवर, दुसरा ऑफिसर मला ज्युनियर होता) असं सुचवलं.

तीनचार दिवसांनी ब्रँच मॅनेजरने क्वार्टर तुला अ‍ॅलॉट केलाय असं सांगितलं. मी तिथेच त्याला "In that case I will make my own arrangements(म्हणजे लीझ्ड फ्लॅटचा रेन्ट जो ऑफिस भरायचं तो मी भरेन" असं सांगितलं. खरी गंमत पुढे आहे.

दुसर्‍याच दिवशी ब्रँच मॅनेजरची मुंबईला ट्रान्सफर झाल्याची ऑर्डर आली. त्याच्या जागी येऊ घातलेला मनुष्य न आल्याने इथल्याच मॅनेजरला ब्रँच मॅनेजर केले गेले. त्याला त्याच क्वार्टर्समधला ब्रँच मॅनेजरचा फ्लॅट अलॉट झाला आणि तो तिथे गेला. दुसर्‍या ऑफिसरच्या बायकोची डिलिव्हरी झाल्यावर तोही क्वार्टर्सवर राहायला गेला.

त्यानंतर काही दिवसांनी एकदा दोघे माझ्यासमोर "क्वार्टर्समध्ये छान वाटतंय ना?" असं बोलत एकमेकांना अनुमोदन देत होते.

मुंबईला परत येईपर्यंतचे काही महिने घरभाडे मी भरले.

चुकीचं काम करायला सांगणार्‍या बॉसबाबत : मला एका बॉसनेच सांगितलेली युक्ती : "मी काही करायला सांगितलं जे तुझ्या पॉवरमध्ये नसेल किंवा रूटिनबाहेरचं असेल, तर एक नोट बनवून त्यावर माझी सही घ्यायची आणि मगच करायचं" त्याने मला काहीही चुकीचं करायला सांगायचा प्रश्नच नव्हता, पण पुढे दुसर्‍या काही बॉसेसना टॅकल करताना हे सांगणे उपयोगी पडले.

हम्म्म... बरं झालं अजुन कोणीतरी आहे.

पण एक गंम्मत सांगतो. वर रॉहु नी वर म्हटल्याप्रमाणे ' प्रचंड असुरक्षितता' हे एकमेव कारण आहे बळी जाण्याचे. हि कधी मला वाटलीच नाही.
मी ग्रॅज्युएशन झाल्या झाल्या एका ठिकाणी नोकरीत होतो. पगार खुप कमी होता. एकदा आमच्या विभाग प्रमुखांशी काहितरी बिघडलं आणि ते चिडले. तुम्हाला नोकरीवरुन काढुनच टाकतो म्हणाले. मी म्हटले ठिक आहे. माझ्या नोकरीवर काही माझ घर चालत नाहीय. आणि पप्पा मला नोकरी सोडच आणि पिजी एन्ट्रंन्सची तयारी कर म्हणुन सांगताहेत. (त्यावेळी जवानीचा कॉलेज जोश तसाच अंगात होता आणि कोपुच पाणी पण)

विषयच संपला. तेंव्हा पासुन आज पर्यंत कधी असुरक्षित असं वाटलच नाही. कारण आपल्या पेक्षा कमी शिकलेले (शिक्षण) / काही न शिकलेले आयुष्यात निवांत राहतात, सुखी आनंदी रहातात, लागतील तेवढे पैसे मिळवतात कारण त्यांच्या जवळ त्यासाठी लागणारे स्किल असते / किंवा त्यांनी ते स्किल अ‍ॅक्वायर केलेले असते मग आपण काय कमी आहे. आपल्याकडे पण काही स्किल आहेत जी आपल्याला उपाशी मरु देणार नाहीत हा विश्वास वाटतो.

तुम्ही सुध्दा बगितलेत तर असे इन्सिक्युरिटी वाटणारे लोकच या सगळ्या गोष्टींचे व्हिक्टीम असतात. बाकिचे निवांत असतात कारण एक तर त्यांच्या नादाला लागणे परवडणारे नसते / लागुन काही फायदा नसतो. Happy

इन्सिक्युरिटी - येस्स नक्कीच, आणि बरेच जणांना हि लग्नानंतर येत असावी (?).
कारण बरेच विवाहीतांकडून ऐकलेय की तुमचे बरेय, मनात येईल तेव्हा नोकरीला लाथ मारून जाल पण आमच्यावर जबाबदारी असल्याने तसे करता येत नाही.
कि असे काही नसते आणि हे मुळातच कमकुवत मनाचे लक्षण आहे.

इन्सिक्युरिटी हि लग्नानंतर नाही तर कमी आत्मविश्वासामुळे येते , तुझ्यावर घराची बायको मुलांची जबाबदारी आहे तर नोकरीही करावीच लागणार पण जर प्रत्येक काम हे आत्मविश्वासाने केल तर इन्सिक्युरिटी हि येणारच नाही. Happy

हे कमकुवत मनाचे लक्षण नाही. परिस्थितीची अपरिहार्यता म्हणा हवे तर ...जस जसे बंध वाढत जातात तसतसे जबाबदार्‍या (नैतिक विशेषतः) वाढत जातात . मग तुमचे लाईफ एकट्याचे राहात नाहीत त्यावर इतरांचा विशेष्तः कुटुंबियांचा हक्क निर्माण होतो. मग तुम्ही तुमच्या आयुष्याशी तुमच्या मर्जीनुसार अथवा व्हिम्स्नुसार अथ्वा तत्वांनुसार खेळता येत नाही. तुमच्यावर आर्थिक, भावनिक दृष्ट्या अवलम्बून असणार्‍या लोकाण्चा तुम्हाला विचार करावा लागतो. तसा करयचा नसेल, मी माझ्या टर्म्सवरच जगणार असे जर ठरवले असेल तर ते बंध निर्माण करण्याच्या भानगडीत पडू नये. आपल्याकडे निवृत्तीमार्गाचा उपदेश करण्यामागचा उद्देश हाच होता .कित्येक तर्हेवाईक कलावंतांची त्यात काही संतही आले, आयुष्ये पाहिली तर त्यात त्यांच्या कुटुम्बियाना त्यांच्या विचारसरणीचा प्रचंड त्रास झाला आहे, हा एक प्रकारचा अन्याय आहे. नात्यांचा , समूहाचा फायदा आनन्द मी घेईल पन त्यांना वार्‍यावर सोडायला मी कचरणार नाही असे चालणार नाही. कित्येक लोक स्वतःच्या तत्वनिष्ठेसाठी नोकर्‍या, धण्दा बुडवतात त्याचा कुटुम्बियाना किती त्रास होतो हे ते लक्षात घेत नाही. अनिल अवचटांसारखी मण्डळी जेवा पूर्णवेळ समाजसेवा छंद याना वाहून घेतात तेव्हा रीतसर कुटुम्बाशी चर्चा करून असे निर्णय घेतात . याला जबाबदार वर्तन म्हणता येईल....
अन्यथा एकटे रहाबे मनःपूत जगावे....

चनस!! मला प्रचंड आवडला आणि पटला तुझा अ‍ॅटीट्यूड!! नंतर हेच बॉस लोक क्लायंटच्या तक्रारी ऐकून आगपाखड करतात!! क्लायंट सरळ मी असं बोललोच नव्हतो वै. टाईप्स हात वर करतात. म्हणून सगळं ऑफीशियल कन्वर्सेशन टेलिफोनिक पेक्षा मेल थ्रू असावं!! नुकतंच एका मोठ्या गोत्यातून या सवयीमुळे वाचलेय. नाहीतर क्लायंट त्याच्या चूकीचं खापर एजन्सीच्या माथी मारायचा प्रयत्न करत होता. सॉरी हे ऑफीसबाहेरचं तरी रिलेटेड राजकारण!!

Pages