Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नाही. सालं
नाही. सालं काढायलाच लागतात.
दुसरे जे
दुसरे जे गोडे वाल असतात ( रंगाने पांढरे ) त्याची साले नाही काढली तरी चालतात. तसेच त्याला मोड न आणता, नुसते भिजवून भाजी करायची, खास करुन गुजराथी लोकात रित आहे ( अशी भाजी, व्हीटी ला साबर हॉटेलात असते बरेच वेळा ) अळूच्या पातळ भाजीत पण हे वाल नुसते भिजवून घालतात.
या वालाचे परतून परतून, तिखट, मीठ व थोडा गूळ घालून, मिठाणे नावाचा प्रकार करतात. पण तो चावायला दात मजबूत लागतात.
रेशमी कबाब
रेशमी कबाब कसे करायचे? मी एकदा करण्याचा प्रयत्न केला होता पण भाजल्यावर खूप dry झाले. Marination ३ तास केले होते. चिकनचे बोनलेस, स्किनलेस २ इंचांचे तुकडे घेतले होते.
अंजली,
अंजली, कबाब भाजताना थोडे थोडे तेल सोड वरून म्हणजे कोरडे होणार नाहीत .
अन नंदिनी सगळे वाल पाठव माझ्याकडे. बिरडे, खिचडी वा क्या बात है !
वालाची खिचडी - तेलात २लवंगा, तमालपत्र, हळद घालून त्यावर कांदा परतणे. मग सोललेले वाल चांगले परतणे. मग तांदूळ परतून घेणे. हे परतणे शक्यतर मंद आचेवर . मग त्यात ओले खोबरे, लसूण ( थोडा जास्तच ) याचं वाटण टाकून परतणे. २ मिनिटांनी उकळलेले पाणी, मीठ, तिखट घालून झाकण ठेवावे. वाढताना वरून कोथींबीर टाकावी. अन लिंबाच्या फोड पिळून, तळलेले पोह्याचे पापड, लिंबाचे गोडे लोणचे यासोबत ताव मारावा. अग लिहितानाही भूक लागली. आता उठून आधी वाल भिजत घालते
.
.
डोरेमिसा
डोरेमिसा कडव्या वालाची साल न काढता भाजी करता येते. पण ही जरा पचायला जड असते.
रात्री वाल पाण्यात भिजत घालून सकाळी करायची. भारंगीची भाजी जर तुम्हाला माहीत असेल (मी आज रेसिपी आणि फोटो देणार आहे पण ती साध्या भाजीची) तर ती ही ह्यात घालतात. नाहीतर अशीच साधी भाजीही चांगली लागते.
कोंबडी
कोंबडी वड्यांचे पिठ कसे भिजवतात ? जुन्या मा.बो. वर पण मिळत नाही.
जेवढे
जेवढे पाहिजे तेवढे पिठ घ्यायचे. जिरे आणि धणे जरासे भाजुन (मेथी आधी टाकली नाही तर तीही घ्या), मिक्सरवर वाटुन पुड करुन टाकायची. मीठ घालायचे, थोडे तेल घालायचे. (पिठ करतानाही जिरे धणे टाकले तरी चालते, पण असे आयत्या वेळी टाकले की मस्त वास येतो.)
पाणी गरम करुन घ्यायचे. आणि त्या गरम पाण्याने पिठ भिजवायचे. थोडे गव्हाचे पिठ टाकले तरी चालते. वडे चांगले थापता येतात गव्हाचे पिठ टाकले तर. पिठ एकदम घट्ट भिजवायचे. तासभर झाकुन ठेवायचे. जरासे फसफसते आणि त्यामुळे सैल होते (म्हणुन आधी एकदम घट्ट भिजवायचे). परत एकदा चांगले मळून घ्यायचे. सुपारीएवढे गोळे करायचे आणि थापायचे आणि तळायचे. तळतानाच असा सुवास सुटतो की मुले शिल्लक ठेवतच नाहीत आपण इकडे तळतोय आणि ईकडे झपाझप संपताहेत असे होते. म्हणुन पिठ भरपुर भिजवायचे. नाहीतर कोंबडी भाताबरोबर खावी लागेल.
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
आमच्याकडे
आमच्याकडे कोंबडे वडे हे तांदूळ, उडीदाचे करतात. तांदूळ(१ किलो),उडीद( १/२ किलो), मूठभर चणा डाळ हवीच असेल तर धूवून वाळवायचे. धणे,जीरे,मेथी जरासे परतून चक्कीत दळून आणायचे. बारी़क असायला पाहीजे. २/४ तास आधी भिजवून मस्त वडे थापायचे व तळायचे तेलात.
मी तर ज्वारी,बाजरी, कणीक पिठं हे सुद्धा अॅड करून केलेत वरच्या प्रमाणे केलेल्या आईने दिलेल्या पिठात.
ते देखील मस्त होतात.
वड्याच्या
वड्याच्या पिठात उडदाबरोबर थोडी बडिशेप वापरतात. हे पिठ रात्री भिजवून त्यात एक जळता निखारा ठेवून वर झाकण ठेवतात. दुसर्या दिवशी केळिच्या पानावर (नव्या जमान्यात प्लॅस्टीकवर) वडे थापुन तळतात. आह्हा काय वास सुटलाय म्हणून सांगू !!!!
कोणीतरी........ कुठेतरी
काहीतरी.......काहीतरी
आमच्याकडे
आमच्याकडे तांदळाच्या कण्या शिजवून त्यात पिठ भिजवतात.
भारंग
भारंग नावाची पालेभाजी आणली आहे तिची भिजवलेले वाल घाल्उन भाजी करायची आहे. कोणाला माहीत असेल तर क्रुती सांगाल?जागुची कृती सापडली पण ती वाल घालुन केलेली नाहीये
जागु??
दिनेशदा?
.......................................................................
घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा
अग ते
अग ते भिजवलेले दाणे उकडून किंवा भाजून घे. भाजलेले जास्त चांगले लागतात. आणि कांदा शिजल्यावर भाजीबरोबर घाल.
पण अश्या
पण अश्या प्रकारापेक्षा जागूची मूळ कृतिच चांगली आहे. हि भाजी पातळसरच करतात. आधीच ती कडवट त्यात वाल म्हणजे !!!
परवा एक
परवा एक रेसिपी वाचली- एक नारळ, २०० ग्रॅम प्रत्येकी साखर आणि खवा.. हे सर्व एकत्र करून मिठाई करायची.
मुख्य घटक ओला नारळ आणि कृती गोड पदार्थाची.
मला अश्याच नारळाच्या वेगळ्या गोड कृती सांगा ना. नारळीपौर्णिमेला नारळीभात, करंज्या, वड्या हे सोडून काहीतरी वेगळे करायची इच्छा आहे. ही मिठाई नवीन आणि वेगळी वाटली. असेच काही तुमच्या पोतडीत असेल, तर कृपया सांगा
---------------------------------------------
यह दिल बन जाये पत्थरका, ना इसमें कोई हलचल हो..
पूनम,
पूनम, पूर्वी मिल्कमेड च्या जाहिराती मधे नारळाचे लाडू दाखवत ते खूप छान लागतात.खवलेला नारळ, सुकामेवा आणि मिल्कमेड एकत्र करून लाडू वळायचे.फार टिकत नाहीत पण छान लागतात. नेहेमीच्या नारळाच्या करंज्या करायच्या ऐवजी खाज्याच्या करंज्या पण चांगल्या वाटतात.नारळाचीच बर्फी पण टोमाटो/गुलकंद/आंब्याचा रस वगैरे घालून जरा बदल करता येइल.खवा आणि खोबरे घालून मोदक.नेहेमीच्या उकडी ऐवजी कणकेची पारी करून उकडून किंवा तळून करता येतील.तेलूगु लोकांमधे आपल्या गुढीपाडव्या ला(त्यांची उगादी ) होलिगे म्हणून पोळी असते.तूर डाळ,नारळ आणि गूळ घालून..ती पण फार सुरेख लागते.
तांद्ळाच्
तांद्ळाच्या ओल्या शेवया बनवुन नारळ दुध, गुळ आणि वेलचि च्या मिश्रणात घालुन खायला देणे. खुपच मस्त लागतात. कोकणातला एकदम प्रसिध्ध पदार्थ आहे हा.
माझ्याकडे
माझ्याकडे नारळ घालुन केकची कृती आहे ती टाकते उद्या. अर्थात श्रावण आहे म्हणुन त्यात अंड्याऐवजी काहीतरी दुसरे वापरावे लागेल मंडळींना ..
मिल्कमेडचे लाडु मी करुन खाल्लेत मागे.. एकदम मस्त लागतात. पण कॅलरीच्या दृष्टीने अगदी हायड्रोजन बाँबच आहेत....
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
मला
मला तांदळाची भाकरी कशी करयची ते कोणी सांगु शकेल का पीजsss...
तांदळाची
तांदळाची भाकरी खुप सोप्पी आहे किट्टु
एका कढईत २ ग्लास पाणी उकळु द्यायचे... २-३उकळीला मीठ चवीनुसार टाकायचे..मग तांदळाची पिठ हळु हळु मिक्स करावे .साधारण १.५ ते २ ग्लास पिठ लागते...ते कणीक कसे मळतात तसे मळुन घ्यावे...गरम गरमच मळावे[हाताला जरा भाजते]... मग थापायचे..गरम असल्याने सहसा लाटता येत नाही.. तेव्हा जशी पोळी लाटतो तसे लाटायचे [घडी घालायची नाही]...
आणि तव्यावरच भाजायची.. गॅसवर भाजायची नाही.. कडक होते[मी हा पराक्रम केलाय]...
तुप लावुन छान लागते......
मला माझ्या सासुबांईनी शिकवली......

जुन्या
जुन्या मायबोलीत मी लिहिली आहे तांदळाच्या भाकरीची कृती. एकदम सोपी आहे...
कृपया
कृपया विचारलेली अथवा सुचवलेली पाककृती लिहितांना ती इथे लिहिण्याऐवजी नवीन धागा उघडून तिथे सविस्तर कृती लिहावी व इथे तिचा दुवा द्यावा. असे केल्याने भविष्यात ही पाककृती शोधणार्यांना ती सहज मिळेल; शिवाय योग्य वर्गवारी झाल्याने संकलन नीट होईल.
सस्नेह,
मदत समिती.
mbjapan लाडू चि
mbjapan लाडू चि सविस्तर कृती हवि आहे
मला दही
मला दही आणी मिरची घालून करतात त्याची पाककृती हवी आहे. नावच विसरल्यामुळे गूगलवर पण शोधता येत नाहिये.
--------------
नंदिनी
--------------
लाडू ची
लाडू ची फार काही महान कृती नाही आहे.जाड बुडाच्या कढई किंवा पातेल्यामधे मिल्कमेड आणि खोवलेले खोबरे एकत्र करून ढवळत रहायचे.मिश्रण जरा कडेने सुटू लागले की हवा तो सुका मेवा शक्यतो बारीक पूड करून घालायचा.आणि उतरवायचे.गार झले की लाडू वळायचे.मऊच होतात लाडू.
हवे असेल तर descicated coconut घोळवायचे.लवकरात लवकर संपवायचे
piapeti ..
piapeti .. शोनु..धन्यवाद.. करुन बघते.. आणि माझेही पराक्रम सांगते
मला चिली
मला चिली इडलीची पाककृती हवी आहे. सुगरण फ्रेंड्सनी(मित्र/मैत्रीणी)
पा कृ यो जा टा कृपा करावी.
धन्स
धन्स एमबीजपान
करणार नारळाचे लाडू
तू मदत समितीने सुचवल्याप्रमाणे लिहितेस का वेगळ्या धाग्यावर? का मी सुरू करू मला कळालेली कृती लिहून आणि तू भर टाकतेस?
म.सची सूचना महत्त्वाची आहे.
जल्ला मन्जू, इडलीच्या पीठात चिली टाकायची, हाकानाका

---------------------------------------------
यह दिल बन जाये पत्थरका, ना इसमें कोई हलचल हो..
हो ना...मी
हो ना...मी कृती लिहिली आणि मग लक्षात आले की वेगळा धागा सुरु करायला हवा होता म्हणून.
चालेल तु सुरु केलास तरी हरकत नाही.पण अगदी खरं सांगायचे तर या कृती मधे काहीच नहिये गं....
इडलीच्या
इडलीच्या पीठात चिली टाकायची, हाकानाका
आणि ते सोया सॉस-चिली सॉस पण त्याच पीठात टाकू का?
कसलं भन्नाट लागेल ना....
Pages