बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या एका मैत्र्णीने चहाच्या कपात टोमॅटो सूप दिले होते संध्याकाळी ५ ला डिसेंबरमधे ख्रीसमसच्या पार्टीत. तेच आठवले.

आयडिया चांगली आहे गं... पण सूप आणि दाबेली.... जरा जमत नाहिये... म्हणजे मलाच पटत नाहिये...

चीज पफ किंवा अ‍ॅपल पाय सारखा एखादा पदार्थ, थंडी आणि दाबेली दोघाना पुरुन उरेल.

लाजो,

दाबेली जरा तीखट नी पोट्भर होईल, गोड पदार्थ तु चीज डेनीश करु शकतेस.फ्रोजन क्रोशाचे कणीक आनुन, चीज क्रीमचे सारण करुन बेक करयचे. सोपे पण आहे आणी गरम खायला चान..तिखट हवे असेल तर भेळ करु शकतेस दाबेली बरोबर.

माझ्या मनात अगदी हेच आलं, गरम गरम मसाला दुध मस्त वाटेल. कच्छी दाबेली फार मसालेदार वाट्ते म्हणुन सोबत दही भात पण चांगला वाटेल.

मस्त वेलची घातलेली कॉफी पण मस्त लागेल. Happy

सिंड्रेला, प्रिती सेम पिंच... माझ्या मनात मसाला दुधच होतं...पण त्यात अजुन काही वेगळ करता येइल का? म्हणजे नेहेमिचा मसाला वापरायच्या ऐवजी... दुसर काही???

मसाला कॉफी, आल्याचा चहा हे तर होईलच....

मी एमडीएचचं बदाम मिल्क करते, छान होतं.

फालुदा पण करता येइल. त्यात दुध पण आल आणी जरा वेगळ पण होइल .करायला तस सोप आहे. रोझ फ्लेवर छान लागतो दुधाला.

हाय,

परवाचा बेत छान झाला.

कच्छी दाबेली सगळ्यांना आवडली. त्या बरोबर खारी बिस्कीट - मोठांसाठी जीरे/चाट मसाला आणि मुलांसाठी त्यावर साखर पेरून, सिनॅमन हॉट चॉकलेट विथ मार्शमेलोज आणि लेकीच्या वाढदिवसाचा केक... क्लाऊन च्या शेप चा केला होता.. फोटो टाकेन लवकरच...

सगळ्यांना खुप धन्यवाद...

बरं सुगरणिंनो, मदत मदत मदत प्लीज!
माझ्याकडे रविवारी ५ जणं रात्री जेवायला येणारेत. त्यात एक बाळंतीण, तिचे आई वडील, नवरा, दीर असे आहेत.
ते सगळे शुध्द शाकाहारी आहेत. आणी त्यांनी टिपीकल जेवण नको असे सांगितलय.
वेगळा काय मेनु ठेवता येइल.
मी आधी श्रीखंड, पुरी वगैरे बेत ठरवलेला, पण अता वेगळा बेत जो बाळंतीणीलाही चालु शकेल असा सुचवा प्लीज!

मेथी घालून शिरा किंवा खसखशीची खीर, बेसन पेरुन कुठलीही भाजी, सुरण / गवार / लाल भोपळा भाजी, आंबट वरण, भात, तूप, भाजलेले पापड, गाजर वा फ्लॉवरचे ताजे लोणचे, लसणीची ओली चटणी, भाकरी वा चपाती. ( शक्यतो वांगे, बटाटे व फार मसाले, गरम मसाले नकोत )

(बाळंतीण म्हणजे ऑलरेडी बाळ झालेली ना? ) माझी आई घरच्या तायांना हमखास लापशी/गव्हाची खीर/आळीवाची खीर /मेथीचे लाडू गूळ घालून करायची/करून द्यायची/देते. त्याबरोबर मेथी पराठे. मूगाचे किंचीत टोमॅटो वाटून घातलेले वरण, ज्वारी/नाचणीची भाकरी, मूगाचा हलवा(तूपकट नाही, भिजत घालून रवा काढलेली रेसीपी),नाचणीची खीर,नाहीतर मूगाची उसळ. तूरीचे वरण चांगले नसते असे एकून आहे घरातील तायांबायांकडून. Happy

हेल्थी हवे असेल तर मस्त छान सर्व भाज्या घातलेला पुलाव, वेगळे म्हणून सिंधी कढी(ह्यात सुद्धा सर्व भाज्या व जरासे बेसन लावून, साय भाजी), खमंग काकडी, कूकी पराठा,कोथींबीर घातलेले ताक वगैरे वगैरे.
दिनेश, लोणचे देवू नये म्हणतात ना नुकतेच बाळ झालेल्यांना?

लोणचे मुरलेले नको, म्हणून ताजे करायचे. याने चव येते तोंडाला.

बाळंतिणीचं जेवण बाकीच्यांना कितपत रुचेल माहीत नाही. पण सध्या मीच बाळंतीण असल्या मुळे साधारण कल्पना आहे.त्यातल्या त्यात रुचतील असे कुळथाचं कळण, पालक्+टोमॅटो+दुधी+गाजर ह्यांचं सूप चवीला एक तमालपत्र आणी लवंग घालायची आणी मिक्सर मधून काढायच्या आधी बाजूला काढायची. फार छान लागतं. शिंगाड्याचा शिरा,(फ्लॉवर बेसन शक्यतो टाळावं.)दलियाची खिचडी, लापशी, पडवळ, कारली, तोंडली, पालक , मेथी चालते. पालक किंवा मेथीचे पराठे आणी जोडीला टोमॅटो च सूप करता येईल . दुधीचे मुठीये पण करता येतील. पण बाळंतीण सोडली तर बाकीच्यांना कितपत हे पदार्थ रुचतील माहीत नाही.

दिनेश, मनू, प्रॅडी आणी मृ सगळ्यांनीच अगदी छान पदार्थ सुचवलेत, खूप धन्यवाद!!
प्रॅडी, तुझं अभिनंदन!! Happy

सगळा विचार करून शेवटी जेवणाचाच मेनु खालीलप्रंमाणे ठरवतीये:

टोमॅटो सूप,पालक कबाब (मुग डाळ वापरून)
मोड आलेल्या मुगाची उसळ, परतून कुरकुरीत भेंडी, मेथी मलई मटर,
बीट+कांदा रायता, लसूण चटणी, भाजलेले पापड
पुलाव, फुलके
गुळ वापरून दलियाची खीर

परत एकदा सगळ्या सुगरणींनो मला मदत करा.
नवर्‍याचे १५-२० मित्र मैत्रिणी fireworks पहायला घरी येणार आहेत.
Beer, juice, Ice Tea वगैरे पेये आणि काही तरी snacks, small eats type करायचे आहे.भारतीय १ पण नाही.त्या मुळे NonVeg पण चालेल.एकटीच करणार असल्याने थोडी आधी तयारी करून ठेवता येइल असा मेनू हवा आहे.शिवाय गार झाले तरी चांगले लागेल असे पदार्थ कोणी सुचवू शकेल का?ऊन्हाळा खूप आहे तेव्हा पदार्थ त्याप्रमाणे पण हवेत.
मला सुचलेले काही पदार्थ
1)सामोसे(Indian touch!)
2)Corn Chips & Salasa
3)Veg sticks with 2-3 Dips
4)Cocktail Sandwiches(Mustard-Wasabi spread,cheddar cheese slices,lettuce,ham)
5)Bruschetta
अजून काही?

खिमा कबाब?

खिमा उकडून घ्यायचा. त्यात मिरची, कोथिम्बीर, पुदिना, मीठ, जीरे घालून वाटून घ्याय चा मिक्षर मधून.मग त्यात आले लसूण पेस्ट, एक उकड्लेला बटाटा कुस्करून, घालायचा व नीट मळून घ्यायचे. हे आद्ल्या दिवशी
करून ठेवता येइल. करताना छोटे कबाब करायचे, एक अंडे फोडून एका बोल मध्ये घ्यायचे व एका प्लेट मध्ये
ब्रेड्चा चुरा घ्याय चा. कबाब प्रथम अंडयामध्ये व नन्तर ब्रेड्च्या चुर्यामध्ये घोळवून तळून घ्यायचे. चिन्चेची चट्नी,
हिरवी चट्णी किन्वा सॉस बरोबर वाढा.

चिकन चा खिमा, किन्वा फिश उकडून पण कबाब करता येतील.

प्रॉन तळून पण मस्त लागतील. साधे बॅटर करायचे. मैदा, मीठ, मिरेपूड, कोथिम्बीर वाले.

चिकन सॉसेज तुकडे करून परतून वर मीठ मिरेपूड घालाय ची. टूथपिक ला लावायचे.

मसाला पापड

मोमोज

कबाब मध्ये गरम मसाला घाला.

चिकन ६५ मस्त असते या हवेला. have you tried banne miyan masala?

mbjapan
हारुमाकी नो कावा मध्ये बटाट्याचे सारण भरून तळलेले रोल्स- पटापटा होतात आणी दणकून खपतात
मँगो लस्सी
मी एकदा तोक्योत हानामीसाठी- जपानी आणि १० देशातल्या लोकांसाठी चक्क साबुदाणा खिचडी आणि गुलाबजाम नेले होते. भांड पुसून खायचं बाकी ठेवलं लोकांनी. Proud

रैना सामोसे हारुमाकी नो कावा चे च घडणार आहेत Happy
बीअर असल्यावर मँगो लस्सी ला कितपत मागणी असेल माहित नाही.स्वीट म्हणून गुलाबजाम हरकत नाही.दूध नसल्याने बीअर वर पण चालू शकतील.
कबाब थोडे छोटे करून टूथपीक लावून देता येतील्.जरा कष्ट आहेत पण हरकत नाही.
फक्त आता हे सगळे पदार्थ मलाच धेडगुजरी वाटत आहेत्.काय काय ठेवावे आणि काय काय गाळावे कळेनासे झाले आहे.

mbjapan- यातले काही बघ कसं वाटतेय.
- पनिर टिक्का ( हिट होतो नेहमी. )
- याकीतोरी
- Quiche
- याकीसोबा

याकीतोरी घरी करायची?जीव जाईल माझा Happy
विकत आणता येईल पण गार होईल ना?अवन मधे गरम होईल का नीट?
पनिर टिक्का मला पण वाटत होता करावा पण नवरा जास्त घाट घालत बसू नकोस असे म्हणतो आहे.(कित्ती बाई प्रेमळ!!)खरे कारण त्याला मदत करावी लागेल हे आहे..असो.
हे कसे वाटते
1)सामोसे
2)Corn Chips & Salasa
3)Veg sticks with 2-3 Dips
4)याकीतोरी/कबाब
5)ग्योझा...फ्रोझन आणून फक्त ऐनवेळी फ्राय करणार
6)याकीसोबा

छान वाटतोय बेत. ह्याला पण चिक्कार वेळ लागणारे तुला एकटीने सगळं करायचं म्हणजे. Happy
नाही याकीतोरी विकत आणू शकलीस तर ब्येष्ट. Wink इतके सगळे पदार्थ आहेत तर प्रत्येकी कमी लागतील याकीतोरी. आम्ही शाकाहारी म्हणून विकतच आणावे लागायचे.

आणि हे मी लोकांनी होस्ट केलेल्या पार्टीत पाहिलेय. डिप्स चांगले असेल तर सगळ्याच भाज्या छान लागतात, थोड्या ग्रिल्ड, बेबी कॅरटस वगैरे कच्चे, पिकल्ड काकड्या वगैरे.

अरे हो- कोल्ड पास्ता सॅलेड पण चालू शकेल. आधी करुन ठेवता येते.
आणि फ्रुटबोल/ फुट चाट- चाट मसाला टाकून. फक्त बियरशी विसंगत, पण करण्याच्या आणि वेळेच्या दृष्टिने ब्येष्ट.

१) कांदाभजी, मिरची भजी. सबुदाना वडा.

२) ब्रेड रोल. चिकन टिक्का भिजविलेले हरबरे उकडून विथ कान्दा कोथिम्बीर लिम्बू, चाट मसाला.

३) मोनॅको सार्ख्या बिस्किटावर चीज , केचप चा ठीपका, कोथिम्बिरीचे एक पान.

४) मका, मटार बटाटाचे कट्लेट. ( खिमा कबाब सारखेच)

५) प्रोसेस्ड चीज चा तुकडा व पाइनापल चा तुकडा टूथ पिक ला लावुन.

६) मिनि डोसा रोल. टू.पी. लावून.

पण फटाके कशासाठी आहेत? शिन चान चा बड्डे ? :p

शेव पुरी? सुकी भेळ्?

माझ्या सगळ्या सुगरण मैत्रिणिंनो,

येत्या रविवारी माझ्या कडे ८-१० कपल्स अनी सधारण ५-६ लहान मुले येनार आहेत दुपारि ४ वाजता. टि पार्टि साठि.
लवकर होईल आणि सोपा असा बेत सांगा प्लिज. (सगळे केरळि आहेत).

अश्विनीमामी, धन्यवाद्..खूप प्रकार सुचवल्याबद्दल.जपान मधे समर मधे प्रत्येक शहरात fireworks असतात. आणि जिथून छान दिसते अशा ठिकाणी लोक अगदी गर्दी करून बघायला जातात्.माझ्या घराच्या बाल्कनी मधून आमच्या शेजारील ward ची fireworks दिसतात त्यामुळे यन्दा आमच्याकडे तो कार्यक्रम आहे.

Pages