Submitted by राज1 on 24 July, 2014 - 04:05
माझा मुलगा 2ND STANDARD (७ वर्षे) आहे.
घरी अभ्यास घ्यायला लागल्या वर T.V. वर किंवा खेळण्यातील गाड्या खेळत बसतो. आमच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतो. तोंडी उत्तरे पटकन देतो. कधी मारल्यावर ५ किंवा १० मिनटे अभ्यास करतो. नेहमी मारून अभ्यास करून घेणे हि बरोबर नाही. शाळेतील HOME WORK हि नेहमी अपूर्ण आसतो.
त्याचे बोलणे हि थोडे बोबडे आहे. व तोंडात बोटे घालण्याची सवय आहे. या बद्दल कृपया सल्ला द्या.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पालक मंडळी, तुम्हा कोणाला
पालक मंडळी, तुम्हा कोणाला आपल्याला लहानपणी अभ्यासाची किती आवड होती ते आठवत नाही का?
मला लिहिणे अजिबात आवडायचे नाही. कारण म्हणजे लिहायला वेळ लागायचा. मनात विचार करणे / बोलणे वेगात होते. मग एकदा उत्तर आले की ते सावकाश लिहीत बसण्यात काय पॉइंट आहे असे वाटायचे.
असो, उपाय - वेगवेगळ्या प्रकारच्या, रंगाच्या पेनांनी लिहिणे. एकदा बॉलपेन, एकदा शाईपेन असे करत प्रत्येक अक्षर कसे उमटते वगैरे.
मारामारी अजिबात नको. बोलण्याकडे दुर्लक्ष, तोंडात बोटे वगैरे म्हणजे संवादाचा अभाव. मुलाच्या आवडीचे विषय गाड्या, कार्टून वगैरे काय असेल ते घेऊन बोलायला सुरुवात करायला हवी. एकदा संवाद सुरू झाला की मग आपण काय करूया आज असे म्हणून अभ्यासाला सुरुवात.
एवढे नक्की म्हणेन की मारणे हे
एवढे नक्की म्हणेन की मारणे हे सोल्यूशन नाही! याचा अर्थ इतकाच होतो की तुमचा पेशन्स कमी पडतोय आणि मुलाला मारून तुम्ही ते फ्र्स्ट्रेशन काढत आहात. केवळ तो तुम्हाला उलटून मारू शकत नाही म्हणून तुम्ही मारणे हे बरोबर का ? समजा आज जरी माराच्या भितीने मुलाने तुमचे ऐकले तरी लवकरच तो उपाय चालेनासा होईल , मग पुढे काय ? असा विचार करा.
उद्या बायकोला तुमचे वागणे नाही पटले तर तिने तुम्हाला फटके टाकायचे का?
का छ्डी लागे छ्मछ्म हाच जुना
का छ्डी लागे छ्मछ्म हाच जुना उपाय योग्य आहे?>> Pl do not hit and abuse your young children. They take time to adjust to new surroundings. Do not react to such wrong advise or comments. instead spend some time with your little ones.
'तारें जमिन पर' सिनेमा बघा.
'तारें जमिन पर' सिनेमा बघा.
अभ्यासाला बसल की भूक लागते,
अभ्यासाला बसल की भूक लागते, शी होतेय, पाणीच पाहिजे. एक ना अनेक कारण किवां दुसराच काहीतरी दाखवून, बोलून आमचं लक्ष विचलीत करणे, यांवर काही उपाय आहे का ? खुप समजावतो दोघेपण पण ही ढीम्म असते, हसते किवां पळून जाते काकाआजोबा कडे
मी_केदार, लक्ष विचलित करून
मी_केदार, लक्ष विचलित करून घेणे आणि परत गाडी रुळावर आणणे एव्हढाच उपाय. वर स्वस्तिने सांगितले तसे अभ्यास झाल्यावर मिळणार्या इन्सेंटिव बद्दल बोलायचे. उदा, आता खाऊ खात बसलो तर नंतर पार्कात जायला वेळच मिळणार नाही. किंवा कार्टूनची वेळ संपून जाईल इत्यादी. शिवाय जितके वय असेल त्याच्या फार तर चारपट मिनिटे लक्ष एकाग्र राहील - उदा ५ वर्षाच्या मुलीचे २० मिनिटे. नावडते काम असेल तर पुन्हा त्याच्या निम्मीच मिनिटे. त्यामुळे आहे तो अभ्यास १० / १५ मिनिटांच्या तुकड्यात वाटून थोडा थोडा करता येईल.
मुळात दुसर्या व्यक्तीने (आपले बाळ) आपले का ऐकावे याचा विचार करून बघा. धाक दाखवून अभ्यास करून घेणे म्हणजे अभ्यासाविषयी प्रेम कमी करवणे.
अजून सर्वांच्या अनुभवाचे
अजून सर्वांच्या अनुभवाचे ज्ञानकण वेचायला आवडतील
राजेंद्र, अभ्यास करायची नावड
राजेंद्र,
अभ्यास करायची नावड हे कॉमनच आहे
ती सोडवायला शाळेच्या पुस्तकांऐवजी दुसरीच नॉलेज बँक टाईप पुस्तके वापरु द्यायची)
आपल्या कडे अभ्यास म्हणजे दिलेला होमवर्क पूर्ण करणे / लिखाणच असते. मृदुला म्हणतेय ते बरोबर आहे. लिहायला वेळ लागतो म्हणुन त्याचा कंटाळा.
मुळात आपण 'अभ्यास कर ' असे सांगुन या वयातली मुलं तासभर मान मोडुन अभ्यासाला बसली आहेत असं होणं कठीणच. जो अभ्यास मौखिक करायचा तो त्यांना चालत, नाचत , उड्या मारत करु द्या. लेखी अभ्यासासाठी बोलुन, समजावुन आणि पूर्णपणे त्याच्यावर जबाबदारी ( म्हणजे झाला नाही तर वर्गात सगळ्यांसमोर टिचर बोलतील / तुझेच राहिलेले चांगले वाटेल का वगैरे वगैरे ) टाकुन करुन घ्या.
त्याव्यतिरिक्त जास्तिचे वाचन इत्यादी रोज पझल / कोडी / चॅलेंज ऑफ द डे असे काहीतरी देऊन वेगवेगळ्या विषयांवर वाचु द्या. ( म्हणजे शाळेच्या पुस्तकात जे टॉपिक्स आहेत ते आधीच बघुन ठेवुन त्याप्रमाणेच पझल्स घालायची
आत्ता रंगित पेन देता येणार नाही / शाळेत रंगित पेन्सिलीही बहुधा चालणार नाही पण विचारुन घ्या.
वेळाबाबतीतही मी माबोवरच कुठेतरी वाचले होते की १लीला १० मी, २रीला २०मिनीटे ( इयत्ते नुसार १० / १० मि वाढवा) इतका वेळ मुलं शांत बसुन अभ्यास करु शकतात. बर्याच शाळात तेवढाच अभ्यास देतात पण मुलं १० मी च्या अभ्यासाला अर्धातास लावत असतील तर मधे मधे ब्रेक घ्यायला द्या.
ज्यु. केजी आणि सि. केजी ( वय ३ ते ५ ) मधल्या मुलांनी अभ्यासाला एकाग्र बसावं ही अपेक्षा अगदीच अति आहे. उगाच धपाटे घालुन या वयात अभ्यासाला लावलं की अभ्यास म्हणजे वाईट असंच वाटायला लागेल. या वयात खरंच काय गरज आहे बसुन अभ्यास करायची. या वयात मोटर स्किल्सही डेवलप झालेले नसतात नीट, कर्सिव वगैरे लिहायला शिकवणे म्हणजे जास्तच. ( वाचायला शिकवायला हवे )
मुलांना मारताय का? तुम्हाला
मुलांना मारताय का? तुम्हाला उलटून मारू शकत नाहीत म्हणुन? तुमच्या समवयस्क व्यक्तीने तुमची एखादी गोष्ट ऐकली नाही कि तिला पण मारता का?
पहिल्यांदा ते मारण बंद करा. आठवणी निर्माण करण्याच वय आहे हे. तुम्ही कितीही लाड केलेत तरी "मारण्याच्या" आठवणी कायमच्या तळाशी बसतात.
खरतर शाळांची चुक आहे इतका अभ्यास देणे ही. इथे पहिलीली १० मिनिटे रोज, दुसरीला २० मिनिट्,तिसरीला ३० मिनिट इतपतच अभ्यास ठिक आहे अस म्हणतात.
असो. अभ्यास घ्यायचाच असेल तर ....
ठरावीक वेळ राखून ठेवावी. घोकंपट्टी वर भर न देता विषय समजावून घ्यावा. लहान मुलं असेल तर रंग, आवाज इत्यादीचे फार अॅट्रॅक्शन असेत त्यांना. शक्यतो त्याचा वापर करावा. लहान मुलांचा अटेंशन स्पॅन खूप कमी असतो. १५ मिनिटे मग ब्रेक मग परत १५ मिनिटे अस करता येईल का हे पहावे. बास आहे तेवढा अभ्यास इलेमेंटरी एज च्या मुलांना.
मिडल स्कुल/हायस्कुल मुलांना त्यांच त्याना टाईम टेबल पाळून करु दे अभ्यास. आपण फक्त अडचन आली तर मदत करावी.
पाच वर्षापर्यंत मुलांचा अभ्यास घेण्याची खरच गरज नाही असे मला वाटते. ५ वर्षापर्यंत बाळाला गाणी, इतर लाईफ स्किल्स (हात धुणे, रुमाल वापरणे, डबा उघडून खाणे व परत बंद करणे, वस्तु जागेवर ठेवणे, स्वतःच्या वस्तुंची काळजी घेण, प्लेट सिंक मध्ये ठेवणे, रांगेत उभ रहाणे इत्यादी गोष्टी), रंग इत्यादी गोष्टी शिकविण्यात भर द्यावा असे मला वाटते,.
खरतर शाळांची चुक आहे इतका
खरतर शाळांची चुक आहे इतका अभ्यास देणे ही. इथे पहिलीली १० मिनिटे रोज, दुसरीला २० मिनिट्,तिसरीला ३० मिनिट इतपतच अभ्यास ठिक आहे अस म्हणतात. >>>
अधिक माहिती मिळेल का ? शाळेला दर आठवड्याला सांगतेय.
आत्ता तर ते म्हणाले दुसरी शाळा पहा.
दुस-या शाळेत पण तेच
हम्म,लहान मुलांना अभ्यासही
हम्म,लहान मुलांना अभ्यासही करावा लागतो.
>>माझा मुलगा 2ND STANDARD (७
>>माझा मुलगा 2ND STANDARD (७ वर्षे) आहे.
घरी अभ्यास घ्यायला लागल्या वर T.V. वर किंवा खेळण्यातील गाड्या खेळत बसतो. आमच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतो. तोंडी उत्तरे पटकन देतो. कधी मारल्यावर ५ किंवा १० मिनटे अभ्यास करतो. नेहमी मारून अभ्यास करून घेणे हि बरोबर नाही. शाळेतील HOME WORK हि नेहमी अपूर्ण आसतो.
त्याचे बोलणे हि थोडे बोबडे आहे. व तोंडात बोटे घालण्याची सवय आहे. या बद्दल कृपया सल्ला द्या.
नेहमी काय, कधीच मारून अभ्यास करून घेणं योग्य नाही. प्लीज, त्याला मारू नका! अगदी चापटीदेखिल नको! तुम्ही त्याच्या अभ्यास न करण्यामुळे फ्रस्ट्रेट होऊन त्याच्यावर राग काढत असाल तर थांबवा. ही डझन्ट डीझर्व धिस!
सगळ्यात पहिले त्याला स्पीच थेरपिस्टकडे नेऊन आणा. कदाचित शाळेत बोबडं बोलण्यामुळे मुलं चिडवत असतील. तोंडात बोटं घालणं हे अपसेट झाल्यावर स्वतःला सूद करण्याचं, शांत करण्याचं साधन असू शकतं.
टीव्हीचं व्यसन मोठ्यांना, जाणत्यांना सुटत नाही, ते तर लहान पोर आहे. मुलांना डिसिप्लिन शिकवायला आधी आपण शिकावा लागतो हे पालक झाल्यावर जाणवलं. ठराविक वेळीच टीव्ही लावला जाईल. 'अभ्यास पूर्ण झाल्याचं बक्षीस म्हणून टीव्ही बघता येतो, सततचा विरंगुळा म्हणून नाही' हे त्याला कळलं तरी खूप मदत होईल. अभ्यास आणि आई-बाबाच्या रागाचा चढता पारा-मार हेच समीकरण झालं की मूल दिवसाचा तो अप्रिय भाग टाळू बघतं.
इतक्या लहान वयात गृहपाठ नको, लिखाण नको हे सगळं कबूल असलं तरी शाळेत जे काय चालतं ते बदलताही येत नाही आणि मूल मागे पडलेलं चालत नाही अश्या स्थितीत पालकांचा जीव वैतागणं स्वाभाविक आहे, पण पेशन्स हजारपटीनं वाढवायला हवा. मुलाकडून अभ्यास करवून घेताना थोडं त्याच्या कलानं, प्रोत्साहन देऊन, गृहपाठ कंटाळवाणा नव्हे तर मजेत होऊ शकतो हे त्याला आणि आपल्याला कळलं तरी फायदा होतो. यासाठी अनेक वेबसायटींवर माहिती उपलब्ध आहे.
ऑल द बेस्ट!
मृण्मयी, उत्तम पोस्ट!
मृण्मयी, उत्तम पोस्ट!
मृण्मयी, पोस्ट आवडली. मुलाने
मृण्मयी, पोस्ट आवडली.
मुलाने ऐकलं नाही तर नकळत आवाज चढतोच... आणि तो ते बरोबर ओळखतो. आणि त्याला आवडलं नाही हे दाखवून देतो.
संयम .. पेशंस वाढवणे... मला प्रचंड जरुरी आहे.
आणि एक... शांत आवाजात, कधी हसत, कधी चेहऱ्यावरचे भाव न बदलता समजावलं तर अजून तरी ऐकतो, पण मलाच स्वतःला नियंत्रणात रहायला नेहेमी जमत नाही. नवीन गोष्ट शिकवताना फ़क़्त हसत, प्रोत्साहन देत, मजा करत, टिवल्या -बावल्या करत शिकवली तर अजिबात न घाबरता करतो, असं ओब्सरवेशन आहे. स्विमिंग हे लेटेस्ट उदाहरण.
राजेंद्र, मृण्मयीने सांगितले
राजेंद्र,
मृण्मयीने सांगितले आहेच.पण मुलाचा अभ्यास एका ठराविक वेळेलाच घेण्याचा प्रयत्न करा.त्यावेळी टि.व्ही. बंद राहू द्या.म्यूट नव्हे.अभ्यासाच्यावेळी त्याच्याशेजारीच बसा. त्यावेळी गप्पा मारता मारता मूल बरेच काही सांगून जाते.पाळणाघर, शाळा येथील खटकणार्या गोष्टी शेयर करते.अशावेळी अभ्यास १० मिनिटांचा आणि गप्पा तासाभराच्या होतात.मान्य आहे हे कंटाळवाणे होते,तरीही मुलाबरोबर दोस्ताना होतो.
मुलं फक्त बोलून ऐकतात. फक्त,
मुलं फक्त बोलून ऐकतात.
फक्त, तुमच्या आवाजातली जरब त्यांना समजली पाहिजे. They must believe that you really will hurt them.
बाकी,
मुलांना बोटही लावू नका.
फक्त आर्ग्यूमेंट्स करा.
समजवूनच सांगा.
इ. स्कूल ऑफ थॉट बर्याच ठिकाणी ओके आहे, पण मला ते संपूर्णतः मान्य नाही. विशेषतः भारतीय समाजव्यवस्थेत.
मुलं अनेकदा अनेक गोष्टी करतात, जिथे instant compliance to command नसेल, तर जिवावर बेतण्याचे प्रसंग येऊ शकतात. उदा., चिरंजीव हातात खिळा घेऊन इलेक्ट्रिकल सॉकेटमधे घालायचा प्रयत्न करीत आहेत. या ठिकाणी त्यांच्याशी आर्ग्युमेंट करून उपयोग नसतो. काही ठिकाणी कंडीशनिंगसाठी रिवॉर्डसोबत पनिशमेंटची निगेटिव्ह एन्फोर्समेंट अत्यावश्यक असते.
असो.
अवांतर झालं, बाकी चालू द्या. मुलांचा अभ्यास घ्यायचे माझे दिवस संपून कित्येक वर्षे लोटलीत आता. तेव्हा या चर्चेस पास.
न मारताही पनिश करता येतं. जसे
न मारताही पनिश करता येतं. जसे १० मिनिटे न बोलणे. मुलाची आवडती गोष्ट न करणे, एकट्याला एक जागी बसवणे, रिवार्ड न करणे... असं म्हणायचं असेल बहुतेक वरच्या पोस्ट मध्ये.
पण खिळा सॉकेट मध्ये घालत असेल तरी मारून काय होणारे... लाकडाने मार म्हणताय का? तिकडे कोणी खिळा काढून न घेता समजावेल असं खरच वाटलं तुम्हाला?
आणि सेफ्टी का नियम .. मध्ये अर्थात सेफ्टी.
bobby jasoos 10 minute rule
bobby jasoos
10 minute rule for Homework असे म्हणतात त्याला. गुगल करून पहा बरीच माहिती मिळेल.
अमित, Love and Logic वाचून पहा.
अं... अमितव, थोऽडं वेगळं. मी
अं...
अमितव,
थोऽडं वेगळं.
मी अनेक मुलं पाहिली आहेत, जी फिजिकली व्हायोलंट असतात. स्पेसिफिकली आजी/आजोबांशी किंवा बेबीसिटिंग करणार्यांशी. लाथा मारणे, बुक्क्या मारणे, चावणे बोचकारणे इ. अन हे पहाणारी आई (रेऽअरली बाबा) 'अले बबडू, अशं नै कलू' असं म्हटली, तर लै डिसिप्लीन झाली.
हीच बिहेवियर ती मुलं इतरत्रही कॅरी करतात. एकुलतं कींवा फारतर दुकटं असल्याने एकप्रकारचा प्रिन्स्/प्रिन्सेस माज काँप्लेक्स डोक्यात येतो, आय थिंक..
आता, या काँटेक्स्टमधे
"मुलांना का मारता? ती उलट मारू शकत नाहीत म्हणून?"
हे आर्ग्युमेंट संपूर्णतः पटत नाही.
सक्काळी उठून छातीवर बसून तुमचा शोन्या जेव्हा फाडफाड तोंडात मारून 'बाबा ऊऽट!' करतो, तेव्हा किती गोड अन किती कडू लागतं, ते सांगा पाहू?
अनेकदा, अशा प्रकारच्या व्हायोलंट बिहेवियरला कंट्रोल करायला, फटके पडलेच पाहिजेत. मग समजतं, की आपण कुणाच्या तोंडात दिली तर नक्की काय होतं?
"अले बबडू, पडशील, लागेल!" या वाक्यातलं "लागेल" काय अस्तं ते "लागल्या"शिवाय कळत नाही, तसंच, "आज्जीला चावू नकोस, नैतर मी तुला चावीन", ही निगेटिव्ह इन्फोर्समेंट असते. अन ती चावल्याशिवाय कळत नाही.
पनिशमेंट किती द्यायची याची अक्कल एक अॅडल्ट म्हणून असलीच पाहिजे याबद्दल दुमत नाहीच. पण झीरो पनिशमेंट इज नॉट राईट पॉलिसी. नॉट फॉर किड्स, अँड नॉट फॉर अॅडल्ट्स.
प्रौढपणी पुढे काय नुकसान्/इजा/त्रास होईल या अँटिसिपेशनमधून स्वतःचे बिहेवियर मॉडिफिकेशन करण्यासाठी ही लहानपणची "शिक्षा" कामात येते. नैतर हे प्रिन्स प्रिन्सेस हाताबाहेर जाऊन लै गुण उधळतात, अन मग परत समुपदेशन, अन नंतर ज्युव्हेनाईल डेलिक्वन्सीचे वय कमी करावे काय?? असले धागे निघतात.
मी अभ्यासाबाबत फार सांगत बसत
मी अभ्यासाबाबत फार सांगत बसत नाही कारण्,शाळा आणि पालकांना त्याचं बरंचसं ज्ञान आता आहे.त्याचे रिसोर्सेस उपलब्ध आहेत.पण तो जे बोबडं बोलतोय आणि तोंडात बोट घालण्याचा प्रयत्न असतो असं जे म्हणताय्,त्याकडे लक्ष्य द्या.कारण,बोबडे बोलणे हा असा भाग आहे,ज्याने संवादाचे न्यूनगंड वाढीला लागतात.आत्मविश्वास हा बोलणे या गोष्टीवरपण बेतलेला आहे.तेव्हा लवकर..
तोंडी प्रश्नाची उत्तरे व्यवस्थित.होमवर्क करायला टाळाटाळ.तो असं का करतो,याचं कारण तुम्हाला माहित्ये का?
त्याला गोड बोलून ते विचारून घेतलंय का?
अभ्यास ही नॉर्मल गोष्ट आहे.तुम्ही या दोन मुद्यांवर फोकस करा आधी.तेच महत्वाचे आहेत.
पण खिळा सॉकेट मध्ये घालत असेल
पण खिळा सॉकेट मध्ये घालत असेल तरी मारून काय होणारे... लाकडाने मार म्हणताय का? तिकडे कोणी खिळा काढून न घेता समजावेल असं खरच वाटलं तुम्हाला?
<<
तिथे आवाजातली जरब पोहोचली पाहिजे.
खिळा काढून घेण्याइतपत वेळ मिळेल च असे वाटले की काय तुम्हाला?
अजून एक अवांतर. पनिशमेंट ही
अजून एक अवांतर.
पनिशमेंट ही एक गमतीची बाब करता येते.
"तू ताटातली भाजी खाल्ली नाहीस, (कींवा तत्सम) तर तुला शाळेत पाठवणार नाही!" असा 'दम' आमच्याकडे देण्यात येत असे.
आय मीन, आपण सगळेच, 'अरे वा! सुट्टी का? मग मज्जाच!' असं का सांगतो मुलांना?
'अरेरे! सुट्टी का? मग तुझी मित्रमैत्रिणींना भेटायची मज्जा बुडाली गड्या!' असं का सांगत नाही?
शाळेत जाणे ही मजेची गोष्ट आहे. तिथे मित्रमैत्रिणी मिळतात. नव्या गोष्टी शिकायला मिळतात. इ. कन्सेप्ट तयार करणे ही एक लै भारी आयडिया आहे. माझ्या नशिबाने म्हणा, आमच्या घरात तरी यशस्वी झालेली आहे.
केवळ मुलं ट्यूशनला गेले की
केवळ मुलं ट्यूशनला गेले की शाळेत दिलेला होमवर्क करतात म्हणून ट्यूशन लावा हे म्हणने नाही पटत मला. मी तर ट्यूशनच्या अगदी विरोधात आहे. आधीच पुर्णवेळ शाळा, त्याचा अभ्यास परत ट्यूशन, मग मुलांनी खेळायचं बागडायचं ते कधी?
मुलांशी सातत्याने बोलत त्यांना हे टि.व्ही. पाहाण्याची एक ठराविक वेळ ठरवून द्यायला हवी. सुरवातीला त्यांच्या सोबत बसून न आरडता ओरडता, अजिबात न मारता त्यांच्या गतीने आणि कलेने अभ्यास घ्यायला हवा.
मुलांशी बोलताना आपण सकारात्मक बोलतो की नकारात्मक हे एकदा पहायला हवे. जसे की आत्ता टि.व्ही पाहू नकोस. सारखे खेळू नकोस. बारक्याला त्रास देऊ नकोस. हे करू नकोस, ते करू नकोस.
आता ह्यात जरा बदल करता येऊ शकतो. जसे की आत्ता टि.व्ही पाहू नकोस.>> ऐवजी सकारात्मक पर्याय द्यायला हवा म्हणजे तुम्हाला त्याने/ तिने जे करणे अपेक्षित आहे ते सांगावे. इथे आपण सांगू शकतो की चला पाहू बरं आज आहे लिहायला. आपण दोघे मिळून लिहूयात. किंवा एखाद्या कामात मदतीस घ्यावं. पण जे काय सांगाल, म्हणाल ते सकारात्मक हवं.
मुलांसाठी एक स्लिपटॉक पद्धती वापरता येते. मुलं झोपली की लगेच ५ ते १० मिनिटात तुम्हाला हवे ते पण फक्त सकारात्मक मुलांशी बोलायचे. ते ठराविक ४-५ वाक्य दररोज सातत्याने ऐकवायचे. ह्याचा नक्कीच फायदा होतो.
खिळा आणि लाईटचं सॉकेट-इज इट अ
खिळा आणि लाईटचं सॉकेट-इज इट अ मर्फीज लॉ.
कारण बर्याच ठिकाणी ही गोष्ट ऐकलीये,पाहिली आहे.
बाफं गळकं टाकं आहे. आधी
बाफं गळकं टाकं आहे. आधी दुरुस्त करवून मग लांब पोस्टी टाका.
माझ्या तोकड्या अनुभवावरून,
माझ्या तोकड्या अनुभवावरून, (जनरलाईझ झालं तरी ते करायचा हेतू नाही...)
२.५ वर्षाची मुलं मुद्दाम दुसऱ्याला लागावं म्हणून लाथ मारत नाहीत, पण त्यांना मस्ती करायची असते. त्याला सांगितलं तुला लाथ बसली तर कसं वाटेल.. अगदी लाथ न मारता तरी समजतं. निगेटिव इंन्फोर्स्मेंत शी सहमत.
तिखट आहे.. गरम आहे... पडशील.... या बाबतीत त्या संकल्पना काय आहेत ते त्यांना कळू द्यावे शी पण पूर्णपणे सहमत. एकदा तिखट खाल्लं की पाणी मागतो / साखर मागतो... त्याची पण गम्मत वाटू शकते.
शेवटच्या परिच्छेदात कशावरून कशावर जातंय....
शाळेबाबत इब्लिस +१. शाळेत
शाळेबाबत इब्लिस +१.
शाळेत जाणे मजेची गोष्ट आहे असे मला वाटत असे. (आणि सगळेच आनंदीआनंद गडे कसे असणार म्हणून परीक्षेत निबंध वगैरे त्रासदायक प्रकार मधे मधे येतो असेही. :-))
अर्र! धागाकर्ते, अॅडमिन
अर्र!
धागाकर्ते, अॅडमिन यांना साकडे घालून वाहत्या पानाला बांध घाला. अन्यथा माझी विचाररत्ने काळाच्या उदरात गडप होतील
हो मला पण इब्लिसांच्या
हो मला पण इब्लिसांच्या विचाररत्नाम्वर माझे मैक्तिक सांडायचे आहेत. पण वाहून जाणार असेल तर नको.
वाहते पान थांबवले आहे.
वाहते पान थांबवले आहे.
Pages