Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भाग्य, छान
भाग्य, छान आहे चटणी, तूझी कोबीची करुन बघितली होती आता हि पण करेन. या भाज्या तश्या चवीला सपक लागतात, म्हणून असे प्रकार केले तर छान.
coconut milk powder चा
coconut milk powder चा एक डबा खूप दिवसांपासुन पडून आहे,टाकावासा वाटत नाही, कोमट पाण्यात पावडर टाकुन नारळाचे दूध बनवता येते. नारळाच्या दुधापासून काय काय बनवता येईल?
!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*
ये रे ये रे पावसा...........
नारळाच्या
नारळाच्या दूधाचे, कोळाचे पोहे, सोलकढी, अननसाचे सांबारे, रसघावणे, तांदळाच्या गोड शेवया, केळ्याची खीर, माश्याचे कालवण असे अनेक प्रकार करता येतील.
शप्पथ,
शप्पथ, दिनेशदा.. तुमच्याच पोष्टाची वाट पहात होते!.. एकदम इन्श्टंट !! आता शोधते सगळ्या कृती... डबा संपला म्हणून समजा आता ४-५ दिवसात! ठँकू..
!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*
ये रे ये रे पावसा...........
सासूबाईनी
सासूबाईनी कडवे वाल कुळीथ चवळी आणि फणसाच्या आठ़ळ्या दिल्या आहेत. त्याचे मी काय काय करू?
--------------
नंदिनी
--------------
वालाच्या
वालाच्या बिरड्याची कृती आहे इथेच. कुळीथ निवडुन घेऊन दळुन आण आणि त्याचे शिंगोळे कर. चवळी भिजत घालुन त्याची आमटी कर. फणसाच्या आठळ्या पिकलेल्या असतील तर खाऊन टाक नाहीतर लोणचे कर (आणि मला पाठव :फिदी:).
सिंडी,
सिंडी, कित्ती तो शॉर्टकट मारयचा?? जरा नीट एक्स्प्लेन करून सांग की बयो.
वालाचे बिरडे मला बिल्कुल आवडत नाही. सासरी गेलं की काहीतरी "खास" म्हणून सासूबाई करतातच!!!
चवळीची आमटीची कृती शोधून बघते. आठळ्या पिकलेल्या म्हणजे??? फणस पिकलेला होता यवढं माहिताय! त्यचे लोणचे कसे करायचे???
--------------
नंदिनी
--------------
ते वाल
ते वाल इकडे अमेरिकेतल्या पार्ल्याक्कांना पाठवून देणे.
चवळ्या भिजवून , हळद मीठ घालून कुकर मधून शिजवून घ्यायच्या अन मग मटकी सारखी उसळ करायची. नाहितर कांदा , टॉमेटो, आलं लसूण पेस्ट परतून , त्यावर गरम मसाला / कोल्हापुरी लसूण चटणी घालून त्यात शिजवलेली चवळी घालायची. मस्त लागते.
कुळीथ रात्रभर भिजवून , भरपूर पाणी घालून शिजवायचे कूकर मधे. पाणी गाळून घ्यायचं. मूठभर कुळीथ वाटून त्यात घालायचे. मीठ, आमसुल घालायचं. अन हिरवी मिरची - लसूण फोडणी द्यायची. भाताबरोबर किंवा नुस्त ओरपायला सुद्धा मस्त लागतं. ( उरलेले कुळीथ गाईच्या आंबोणात घालायचे ).
आठळ्या चुलीतल्या निखार्यावर भाजून खायच्या.
वालाचं
वालाचं बिरडं नाही का आवडत? मग खिचडी करून खायची. हा का ना का!
वालांसाठी शोनूने सुचवलेला उपाय मला पण आवडला.
शिजवलेल्या चवळ्या तोंडल्याच्या भाजीत, थालीपीठात आणि मिश्र डाळिंच्या वरणात छान लागतात.
आठळ्या
आठळ्या बत्त्याने फोडायच्या आणि टरफल कढुन टाकायचे. ते तुकडे तुरडाळीबरोबर कुकरला शिजवुन घ्यायचे. आणि चिंच - गुळ - गोडा मसाला घालुन आमटी करायची. मस्त लागते
आठळ्या टरफले काढुन मिठाच्या पाण्यात कुकरला शिजवुन घ्यायच्या. त्या नुसत्याच खाता येतात किंवा कांदा परतून त्यात शिजलेल्या आठळीचे तुकडे घालुन भाजी करता येते. आठळी बरीच पिठूळ असते त्यामुळे मीठ घालुन शिजव.
चवळी किंचीत मीठ आणि थोडे आले घालुन कुकरला शिजवुन घे. फोडणी कर नी त्यात ठेचलेला लसुण घाल. त्यावर शिजलेली चवळी, चवीप्रमाणे मीठ, आमसूल्/चिंच, गूळ, गोडा मसाला-लाल तिखट किंवा कांदा लसूण मसाला घालायचा. हवे असेल तर पाणी घालून उकळायचे. आगदी पळीवाढी किंवा आमटीइतकी पातळ उसळ छान लागते. भरपूर कोथिंबीर घालायला विसरु नको.
~~~~~~~~~~~~~
मराठी रेसिपीज साठी आजच अवश्य भेट द्या: http://vadanikavalgheta.blogspot.com/
~~~~~~~~~~~~~
खुप खजुर
खुप खजुर आणली आहे.तीन किलो आहे.काय करु जास्त दिवस टिकेल अस.
कोकणात
कोकणात वालाच बिरड - ब्राम्हणी पद्धतिच - गोडा मसला घालुन करतात. त्यातच शिजलेल्या आठळया पण घालतात. मस्त लागतं.
कुळथाची, भिजवुन, थोडे मोड आणुन मस्त उसळ होते. या उसळीला लसणीची फोडणी सही लागते. छान गोड लागतात मोड आलेले, उकडलेले कुळिथ. उकडताना जे पाणी घालतो त्याचं कळणं करायच. पाण्यात थोड ताक, आणि बेसन घालायच, एक उकळी आणायची, वरतुन कढीलिंब, जीरे, मोहरी, हिंग आणि लसणीची चुरचुरीत फोडणी... आहाहा तोंडाला पाणी सुटल... भारतात गेले की हा बेत होतोच होतो...
चिऊ, ३ किलो खजुर??? एव्हढे का बरे??? खजुराची गोड चटणी, खजुर रोल, खजुर लोफ, तुपावर परतुन फ्रिज मधे ठेव...
चिऊ, ३ किलो
चिऊ, ३ किलो खजुर??? एव्हढे का बरे??? >> नवर्याने आणली खास साउदीहुन .बघते करुन आता काय जमतय ते.हे सगळे पदारथ साधारण किती दिवस टिकतील फ्रिज मधे ? धन्यवाद.
रमजान
रमजान येतोच आहे. रोज दिवसा उपास करून खजूर खावून सोडा चिउताय.
खजूर म्हणजे साखर जास्त. ( मधुमेह बाफ पासून दूर ठेवा) ते खजुर मधे बदाम घालुन रोल्स करतात ना ते करता येतील.
चिऊ
चिऊ खजुराचे थोडे लहान तुकडे करुन तुपात परतुन घ्या. छान लागतात खायला. आणि गोडही कमी होतात..
-------------------------
एकतारी संगे एकरुप झालो,
आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो.
गाजर खजूर
गाजर खजूर हलवा अल्टिमेट लागतो. समप्रमाणात किसलेले गाजर आणि मिक्सरमधून भरड वाटलेल्या खजूराची पेस्ट घालायची. नेहमी पेक्षा साखर कमी घालायची आणी दुधात गाजराचा किस आणि खजूराची पेस्ट आटवायची.
नंदीनी अग
नंदीनी अग कडवे वाल खुप छान लागतात. आम्ही ५ किलो भरुन ठेवतो दर वर्षी. श्रावणातल्या शनिवारी न विसरता ही भाजी असते.
कडव्या वालाची भाजी, आमटी, पुलाव करता येतो. तसच साल न काढता एक दिवस भिजवुनही ह्याचि भाजी करता येते. मला वाटत ह्या भाजीची रेसिपी जुन्या माबो वर आहे.
कुळीथ दळून त्याच पिठल चांगल होत. तसच त्याचे लाडूही करता येतात. अख्या कुळीथाची मोड आणुन उसळही करता येते.
आठळ्या कडधान्याच्या भाजीत, आमटीत टाकता येतात. नुसत्या मिठ घालून पाण्यात शिजवुन खाता येतात. तव्यावर भाजुन खाता येतात. आठळ्या पुलावात कोलंबीच्या कालवणात, मटणात सुद्धा घालतात.
सिंड्रेला
सिंड्रेला शिंगोळे कसे करतात ?
चिउ, खजूराचे लाडू छान लागतात. तसेच खिर, चटणी, केक, करता येतो.
sonu_aboli चिकन
sonu_aboli
चिकन खात असाल तर कांदा टॉम्याटो शिजव. त्यात आल लसुण पुदिना कोथिंबिर गरम मसाला पेस्ट टाक. थोड परत आणि चिकन टाक. थोड्यावेळाने साइडने तेल / तुप सुटायला लागल्यावर अख्खा टिनच coconut milk जाडसर बनवुन ओत. शिजल्या नंतर कोथिंबिर घालुन गरम गरम पोळ्यांबरोबर घे.
nandini2911 कुळथा
nandini2911
कुळथाचि पण आमटि करता येते. कोणत्याहि गरम मसाल्याच्या आमटिसारखि करावी. मोड काडुनहि चांगलि लागते.
सुकवलेल्या फणसाच्या आठ़ळ्या थोड्या ठेचुन मसुरच्या आमटित टाक(मसुर शिजतानाच हा.) मस्त लागते.
सोनू
सोनू नारळाच्या दुधाचा सारही बनवता येतो उकडलेला बटाटा घालून. तसच माशांच्या कालवणातही घालता येतो पाण्या ऐवजी.
खजुर रोल
खजुर रोल केले आत्ताच. संध्याकाली आले कि देते सग्ळ्यांना .आवडले तर बर्,नाहीतर दोन दिवसांनि परत ईथे च विचारावे लागेल खजुर रोल खुप उरलेत काय करु.:हाहा:.
चिउ अग
चिउ
अग उरतील कशाला ? जो भेटेल त्याला देऊन टाक प्रसाद सांगून.
मी
मी शाकाहारी आहे हे आधीच सांगायला हवे होते मी.. तरीही केतकी, जगू धन्यवाद. चिकन ऐवजी काही दुसरे वापरता येईल का?
!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*
ये रे ये रे पावसा...........
शिंगोळे नं
शिंगोळे
नंदिनी, मी आठळ्या लिहिले पण डोळ्यांसमोर गरे होते म्हणुन लोणचे कर म्हणाले. सॉरी, आठळ्या नुसत्याच भाजून खा, मस्त लागतात.
sonu_aboli <मी
sonu_aboli
<मी शाकाहारी आहे हे आधीच सांगायला हवे होते मी.. तरीही केतकी, जगू धन्यवाद. चिकन ऐवजी काही दुसरे वापरता येईल का?>
हो तु चिकन एवजी मटर - बटाटा - गाजर - फ्लॉवर - पनीर हे सगळ किंवा या पेकि काहिही घालु शकतेस. सगळ प्रमाण मात्र अंदाजाने. झटपट होत हे सगळ.
किंवा आमटि / डाळ करताना थोड थोड coconut milk बनवुन टाक. चांगलि चव येते.
sonu_aboli मि पण स्वता: शाकाहारी आहे. रविवारच्या माझ्या किचन उद्योगातुन बनलेले हे पदार्थ आहेत. आणि कोकणातलि असल्याने नारळाचा वापर जास्त ना !
लाजो.......
लाजो....... जबानको लगाम दो !!!
कुणी ?....
कुणी ?.... कुणी रे त्या शेंगोळ्यांची आठवण काढली? नका रे असा छळ नका करू लाळग्रंथींचा
हुडा...
हुडा... <<लाजो....... जबानको लगाम दो !!! >> ???? कन्फ्युज्ड बाहुली????
कुणाच्या जबान ला लगाम देऊ?????
कडव्या
कडव्या वालाचे बिरडे करताना साले नाही काढली तर चालेल का ? मी नेहमी साले काढुनच करते पण वेळकाढू काम आहे ते बरेच.
Pages