जुळुन येती रेशीमगाठी- नवीन मराठी मालिका

Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29

झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झाला एकदाचा मधुचंद्र
आता आदित्य मरायला मोकळा
आता आणा रे त्या फाटक्या चड्डीवाल्याला
कोण आहे रे तिकडे

.. Repeat

>>>>झाला एकदाचा मधुचंद्र<<<<<<<

कधीच्या भागात दाखवले हे?

Lol ती मेदे Sweetheart काय म्हणते आदेला किती खोटं वाटतं ते....कोणी असं म्हणत असेल का ?? प्रेमाने दुसरं काहितरी म्हट्लेल दाखवा म्हणावं ...आदि...आदु....आद्या...पण Sweetheart ....??? नको....एकवेळ आदे सुध्दा चालेल...;)

याच्यापुढे ….
श्रावणातील सर्व सण , गौरी गणपती , दिवाळी साजरी केल्यानंतर आता कुठलाही सण साजरा करायला शिल्लक नाही , आदित्य मरेल
मेघनाला दिवस ,महिने ,वर्ष ,काहीतरी गेलेले असेल
राक्षस बाळामुळे हे सर्व झाले म्हणून बाबाजी पिसळेल
अशावेळी फाटक्या चड्डी वाला परत येईल
मुरंब्याच्या बरणीला प्रोग्राम मध्ये राहायचे असल्याने ती त्याला आदित्यचा replacement मानेल.

दरवेळी तिलाच नवीन गोष्टी का मिळतात यावर अर्चू वैतागेल
.
आदित्य परत येईल पण फक्त मेघानालाच दिसेल
आदित्यला सुमोचा कंटाळा आल्यामुळे तो घराच्या कोणाशीही संपर्क ठेवणार नाही .
दोन वर्षानंतर
शेवटचा एपिसोड
फाटक्या चड्डी वाला आदित्य ला समोर आणेल

राक्षस बाळामुळे हे सर्व झाले म्हणून बाबाजी पिसळेल>> हे मलाही असच वाट्लं.
आता तर नाना आणि माई पण बाबाजीच्या नादी लागतील असही वाटतय. Happy

आदे अभिनय छान करतो पण मेदे अगदीच व्यर्थ आहे अरेरे बावळट भवानी.>>>>> ++++1111111

दरवेळी तिलाच नवीन गोष्टी का मिळतात यावर अर्चू वैतागेल>>>>>>>>> Lol Lol Lol

मेदेची सातारा महोत्सवची जाहिरात पाहीली का कुणी??? बापरेच कपडे आहेत तिचे.......आणि तिचा नाच तर काय वर्णावा.... Sad

दक्षिणा .... ती प्रोफेशनल डान्सर आहे ......??? हो का गं ??? माहितच नव्हतं मला...पहायला हवा कार्यक्रम....पण त्या झलकमध्ये फार नाही वाटत प्रोफेशनल डान्स....त्यात ड्रेस अगदीच काहीतरी आहे....त्यामुळे अजूनच भयानक वाट्ला प्रथमदर्शनी....

काल रितेशची एंट्री पण होती. लय भारी प्रमोशनसाठी. सुमोने त्याला पण खिचडी खाऊन जायचा आग्रह केला हो!!
रच्याकने रितेश किती घाण मराठी बोलतो म्हणजे अ..शु..द्ध !!!
लय बेक्कार! Sad

हि मेघना काय आदित्य ला राहून राहून बॉक्स उघडायची धमकी द्यायला लागलीय , आदित्य ने पण सूर बदललाय , काकुळतीला येउन समजावतोय
एकदम अवघड जागेवरचे दुखणे आहे हि , सहनही होत नाही आणि कुणाला सांगताही येत नाही

बहुतेक आदेबुवांना उडवणार किंवा त्याची जानूबाई सहस्त्रबुद्धे-गोखलेतरी होणार असं दिसतंय एकूणात....मेदेबाई तर इटर्नली डिप्रेस्ड आहेच, पण मेदेचे इटर्नली ऑसम साबा आणि साबुसुद्धा सुखदु:खाचे फेरे, दु:खामुळेच सुखाचं महत्व असतं असं काहीतरी बोलत होते....तसं झालंतर पुन्हा तीच घिसीपिटी गोष्ट....:(

बेफी Proud

अंजली - अगदी अगदी अतिशय बेक्कार बोलतो तो मराठी. आणि कालचा रितेशचा भाग अगदीच बोर होता. सुकन्याने तोलून धरला समर्थपणे.

आता रितेश होसूमियाघ मध्ये पण येणार आहे. असं प्रोमोत आत्ताच पाहिलं.

आता रितेश होसूमियाघ मध्ये पण येणार आहे.>>>>>> हो क्का?? आणि श्री भेटुन काय बोलणार??? "तुझ्या बायकोची मेमरी गेली. तुला म्हणे ती ओळखत नाही. च्यामायला लय भारी!!!

झी मराठी हा विविध प्रकारच्या नवर्यानी नटलेला चैनल आहे
७ वाजता / दोन बायकांत ओढाताण होणारा खंडोबा
७.३० वाजता / घरजावई व्हायला नको म्हणून खटपट करणाऱ्या बायकोचा मंदगोळा नवरा राया
८ वाजता / बायकोशी दुसर्या लग्नाचा घाट घालणारा श्री
८.३० वाजता / ८ महिन्याच्या अथक तपस्येनंतर बायको पावलेला आदित्य
९ वाजत / घरी बघत नाही म्हणून सुटलो , पण काहीतरी घटस्फोट वगैरे प्रकरण असावे

Pages