जुळुन येती रेशीमगाठी- नवीन मराठी मालिका

Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29

झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक पुस्तक लिहितो, प्रकाशकाकडे धावाधाव करतो, एखादा प्रकाशक पहिली आवृत्ती छापतो.
प्रथम आवृत्ती, १००-५०० प्रती, किंमत १३० रुपये. विकायला १-२ वर्षे जातात . चालले तर पुढील आवृत्ती.
इथे आदित्य आणि मेघना नऊ महिन्यापूर्वी लग्न करतात , आठ महिने सोबत राहून ठरवत कि आता पुढची लाईफ सोबत काढायला हरकत नाही.
एक महिन्यात सोबत झोपायला एक सुद्धा रात्र मिळत नाही,
रोजची रुटीन, रात्री झोपायला भेटेल का ? जेवायला काय असेल ? या रविवारी कोणता चित्रपट बघायचं.
दाखवणार मेहनत का करेल जर त्याचे बरे चालले असेल.
१९२५ पूर्वीचे सर्व साहित्य कॉपीराईट मुक्त आहे. पण मेहनत का घ्यावी
पिकते ते विकते
पंजाब मध्ये, अमेरिकेत , सिंगापोर मध्ये साहित्य संमेलने घ्यायची, मराठी साहित्याला प्रोत्साहन पाहिजे.
हेच कलाकार ती अटेंड करणार. आणि प्रोग्राम संपताना त्याची जाहिरात करणार
…… तर बघायला विसरू नका, याच चेनल वर "रविवारी संध्याकाळी ७ वाजता " मराठीला भरभरून प्रोत्साहन द्या.

ऑ! अग चिऊ मग त्या उतरणचा शेवट काय आहे ग? की ती पण चालूच आहे सध्या? ही असावा सुन्दर त्या चार दिवस सासुचे सारखी लाम्बतच चाललीय. वैताग आला राव.

बाबाजी आता जरा चाचपडतायत आदे चिडल्या मुळे. मेघना पण नाराज झालीय बाबान्जीमुळे. भोचक अर्चु घरात नव्हती त्या वेळे हेच आश्चर्य आहे.

उतरणचा शेवट यावा एवढे आपण भाग्यवान नाही.....:( ती सिरेल अजून सुरुच आहे....एक हिरवीण पाकमध्ये पोचली आहे पण नशीबाने (आपल्या) तिची जानू झाली नाहीये.... Wink

जे आदित्य ला आठ महिन्यात शक्य नाही झाले , ते रितेश एका रात्रीत करून दाखवेल का ?
काय करेल आदित्य ? दरवाजावर पहारा देईल का बाथरूम मध्ये हात हलवत बसेल ?
पाहायला विसरू नका "जुळून येती रेशीमगाठी "

रितेश एक व्हिलनच्या प्रमोशन साठी तरी यायला हवा होता... सगळेच सुटले असते...

आकांडतांडव करणारी अर्चू, उगाचच फसाफसा हसणारी आणि अर्चूच्या हो ला हो करणारी विजया, सतत अग्गो बाई हो क्का चं पालुपद आळवणारी मोरंब्याची बरणी, नुकताच (बाबाजी)एरंडेल चा डोस प्यायलासारखं तोंड करणारं आंबट द्राक्ष, शेजारच्या भोचक भवान्या, (मावशी पात्र सध्या अज्ञातवासामुळे बचावेल कदाचित) आणि आपल्या सर्वगुण(!!@@$%##)संपन्न गुलाबी गवनीतला गुळाच्या ढेपेबद्दल काय काय वर्णावं!!! सगळ्यांची एकाच फटक्यात कत्तल झाली असती... मग गिओ, आदे, आन, बाबाजी, अमीत, सतीश आणि आपला एक विलन फेर धरून गाणं म्हणतील... मुक्याने बोलले गीत ते जाहले, पहाटे पाहीले स्वप्न साकारले.

पण हाये स्वप्न.. स्वप्नच राहीले... माऊली आईभक्त आहे... मोरंब्याच्या बरणीला अजून ऊत येणार Sad

मोरंब्याच्या बरणीला अजून ऊत येणार अरेरे>>>>>>>>>>>>>>>>>> Lol Lol Lol

खरच...पण हे आदे मेदे किती दिवस तेच तेच बोलणार आहेत....गाडी सरकतच नाहीये....

दळून झाल्या रेशीमगाठी>>>>>>>>>>> Lol

खरतर आदे मेदेमुळे जळून गेल्या रेशीमगाठी

मला वाटले येव्हाना बंद झाली असेल. तर अजून चालूच आहे.

ते आदे मेदे बोलताना पन किती लांब उभे राहून बोलतात... नवीन प्रेमात पडलेले वाटतच नाही.

आता मेदेला सत्याचा पुळका चढलाय... का ही ही चाललेय. भयानक आहे हि सिरियल.

ते अग्गबाई, एकणं म्हणजे ताप आहे.

सुख दुखणे किंवा भिकेचे डोहाळे जे काही असतात ते सगळं या मेदे ला झालंय. आणि स्वतःच्या मुर्खपणामूळे ती त्या आदे चं आयुष्यही बरबाद करणार.

आदे चं आयुष्यही बरबाद करणार.??? त्याचं झालंय ऑलरेडी!!! Proud म्हणून तर त्याच्या चेहर्‍यावर सतत "भय इथले संपत नाही" भाव असतात Lol

>>>>>>मला वाटले येव्हाना बंद झाली असेल. तर अजून चालूच आहे.
.
अशी कशी संपेल? आत्ताशी सुरु होऊन नऊ महिनेच तर झालेलं
आणि संपली तर फाटक्या चड्डी वाल्याची कशी विल्हेवाट लावली ती गंमत तर शिल्लकच राहून जाईल न
आणि ती शेजारची कोणीतरी तीच काय झाल कळायला नको का?
आणि बॉक्स मध्ये काय गंमत आहे याची उत्कंठा तर काही प्रेक्षकांना अनावर झालीये

बॉक्स मध्ये काय गंमत आहे>> उर्वरित देसाई फॅमिली सोडून जगाला माहीतीये ती गंमत!!! आणि मेघनाचा अचानक उफाळून आलेला सत्यवादीपणा अनावर झालाय (ती आधीच अनावरच आहे) ती गंमत देसायांना दाखवायला... "रीईईईईईईईईईईली सॉरी मी तुम्हाला गंमत आधीच दाखवणार होते खरं तर पण हा आदित्य आहे ना... कॉय रे आ दि त्य..."

मी गेले कित्येक महिने बघतच नाही, झीची फक्त एका लग्नाची तिसरी गोष्ट बघते. पण इथे वाचायला यायला मजा वाटते.

तुझ्या संमतीशिवाय मी कोणाला काहीच सांगणार नाही...असे म्हणते ती. पण सतत हाच विषय काढून डोक खाते.

एखादा म्हटला असता, नाना-माई ला कशाला पेपर मधेच छापूया! लग्नाला जे जे आले होते त्यांच्यासमोर सुद्धा खोटेच वागलीस ना. मग आता प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगूया तू लग्नाआधी आणि लग्नानंतर काय दिवे लावलेस ते. या घरातली मुले पण निरागस आहेत त्यांची काकू-मामी म्हणून खोटेच वावरत होतीस...मग त्यांनाही सांग.

नवरा-बायकोमधे काहीतरी बिनसले आहे हे कळत असूनही त्यांनी कधी विचारले नाही पण म्हणून चांगले आहेत म्हणत एव्हढे छळायचे!
त्याने खडसाऊन सांगायला हवे तिला कि तो विषय बंद आता...आणि बाहेरून काही कळेल याची काळजी करू नकोस. कळले तर काय करायचे ते मी बघेन. तरीही तिने डोक खायचे सोडले नाहीतर तिलाच सोडून द्यावे.

असे दाखविले तर बरे वाटेल मला. नेहमीच काय तो संतपणा मिरवायचा.

:खोखो:.... आज नणंदबाई अर्चूचं 'सिम्बॉलिक' लांब नाक ( ज्यात त्यात आपलं poke होणारं ) थोरल्या तसेच 'नववधू प्रिया मी बावरते'-मोडातील धाकट्या भावजईबरोबर झालेल्या रिपीटेड कोलिजन्समुळे सिम्बॉलिकरीत्या दुखावलं गेलं....भा.पो.हो लेखक-दिग्दर्शक, भा.पो....

अंजली,
हेच हेच म्हणायच होत...काय मूर्खपणा चाललाय...त्या अर्चि चा तर फारच राग येत आहे आता..स्वताचा घरी जरा लक्ष दे म्हणाव...

हे दोघेतर हवेतच आहेत...एवढ चिकटायच कि इअर फोन हि एकच वापरतायेत,आषाढीचि भजनं ऐकायला.त्या आदे ला एकादशीचि सुट्टी होती का....

त्या आदे ला एकादशीचि सुट्टी होती का....>>>> त्याचं ऑफिस महाफ्लेक्सिबल आहे बाई Proud
काहीही सवलती मिळतात त्याला.
आजची अर्चू-विजया-मेघना आपटाआपटी नाकात गेली आपलं डोक्यात गेली Proud
माईंना जर अर्चो (सतिशच्या भाषेत) आदळली असती तर नाकच काय तीच तीनताड उडाली असती.

आदेला काय शाळेत असल्यासारखी सुट्टी असते एकादशीचि.....???? अर्चोला काहीही काम नसतं आदे मेदे मध्ये लुडबुड करते नुसती... ....आता सुमोच प्रवचन आहे आजच्या भागात....

Pages