खऱ्या 'ईशा'च्या लग्नाची गोष्ट

Submitted by आशूडी on 8 July, 2014 - 14:50

माझी एक मैत्रीण आहे. सुस्वरुप आहे, एकत्र कुटूंबात वाढली आहे. एल्.एल्.बी करुन पुण्यात एका चांगल्या वकीलांकडे प्रॅक्टिस करते. शिवाय स्वतः स्वतंत्रपणेही काम करते. म्हणजे अगदी आपल्या एका लग्नाची तिसरी गोष्ट मधल्या ईशासारखीच. तिचे लग्न न ठरण्यात मोठा वाटा तिच्या कार्यक्षेत्राचा आहे. कारण मुलगी 'वकील' आहे म्हणताच ऐकणार्‍याचे तोंड एवढेसे होते. मुलाची आईच असेल तर जणू आता आपल्या घरात रोजच 'जनता की अदालत' भरणार हे भविष्य दिसून तिची घाबरगुंडी उडते. मुलगी कशी आहे, काय करते, तिच्या इतर आवडी निवडी काय आहेत हे जाणून घ्यायच्या आधीच नकार दर्शवला जातो.
खरंतर पूर्वी या व्यवसायात असलेल्या स्त्रियांना हा प्रॉब्लेम आला होता का हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. पण ३-४ वर्षांपूर्वी सकाळ च्या मुक्तपीठ मध्ये अगदी हाच मुद्दा धरुन एका उपवर मुलीनेच लिहीलेला लेख प्रसिध्द झाला आणि हा प्रश्न ठळकपणे पृष्ठभागावर आला. आता त्यावर प्रतिक्रिया अशाही होत्या, की या लेखामुळे लोक अजूनच सावध झाले आणि या व्यवसायात आणखीच 'विवाहमंदी' आली.

मैत्रिणीचा मुद्दा क्र. २ असाही आहे की तिचे वडील पोलिस ऑफिसर आहेत. खरंतर ही किती अभिमानाची बाब! पण लोक भयचकित होऊन आ च वासतात! मुलगी वकील आणि वडील पोलीसात? नको रे बाबा! पण काय हरकत आहे? सीमेवर लढायला जावे तर शेजार्‍याच्या मुलाने, हे ठाऊक होते पण कायद्याचे रक्षणही करणारे परकेच कुणी असावेत? कुछ समझ मे नही आ रहा बॉस! आता दुसरी बाजू म्हणजे वकीलच मुलगा शक्यतो नको आहे कारण एकाच व्यवसायात दोघेही असले तर एकसुरीपणाची शक्यता असते. शिवाय 'फिक्स मंथली इन्कम' हा महत्त्वाचा फॅक्टर आहेच.

मुलांच्या अपेक्षा अटी बघाव्यात तर हल्ली पहिली अट ही असते की 'आयटी वाली नको!', फुल टाईम ऑक्युपाईड नको! (हो, नंतर मुलाकडे कोण बघणार ना!) शिकलेली हवी, पगाराची खास अपेक्षा नाही. मग 'वकील' असण्यात प्रॉब्लेम काय आहे? फ्लेक्सी टायमिंग आहे, सर्व सरकारी सुट्ट्या आहेत. मुख्य म्हणजे मुलीची रिलोकेट करण्याची तयारी आहे. भरपूर माणसांची सवय आहे. आणखी काय हवं? आता ही मैत्रिण जराशी बोलघेवडी आहे. पण ते तर तिच्या व्यवसायाला पूरक आहे ना? मग त्या गोष्टीकडे 'व्यावसायिक गुण' म्हणूनही सुरुवातीला नाही पाहता येत? पुढे मागे मुलाचा शांत स्वभाव असेल तर ती ही निवळेलच की. पण हल्ली होकार नकार कळवण्याची काय गणितं असतात समजतच नाही. आणि ही स्टेज येते ती फोटो, पत्रिका इ सोपस्कार झाल्यानंतरच. मग नकाराचे नेमके कारण काय असावे? खरोखर या प्रश्नाने आम्हाला हैराण केले आहे.

'एका लग्नाची तिसरी गोष्ट' मधल्या ओम आणि ईशा मुळे गेल्या काही दिवसात वकीलांना किंचित ग्लॅमर मिळालंय खरं पण त्याचा या गोष्टीसाठी कितपत फायदा होईल कुणास ठाऊक. निदान ईशासारख्या खानदानी वकील मुलीसुद्धा इतर सद्गुणी मुलींसारख्याच घरं तोडण्यासाठी नाही तर जोडण्यासाठी प्रयत्नशील असतात अशी जाणीव जरी झाली तरी दिलासा मिळेल.

तुम्हाला याविषयी काय वाटते, कुठे सुधारणेला वाव आहे याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. Happy

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे, लंपन! पण सगळेच वकील असे नसतात ना.
बागुलबुवा, दुसरी बाजूच वाचायचीये, लिहा.
सुधारणेला वाव हा एटिट्यूड> > कुठल्या एकाच बाजूत ती हवी असं कुठेेही लिहीलेलं नाही. काहीही करून ही समस्या सोडवायची असेल तर काहीतरी बदलावं लागेलंच ना?

मला गोची इथे जाणवते आहे,
<< पण हल्ली होकार नकार कळवण्याची काय गणितं असतात समजतच नाही. आणि ही स्टेज येते ती फोटो, पत्रिका इ सोपस्कार झाल्यानंतरच. मग नकाराचे नेमके कारण काय असावे? खरोखर या प्रश्नाने आम्हाला हैराण केले आहे. >>>

'आपलं जमेल असं आम्हाला वाटत नाही' हे कारण समोरच्याला सांगायला इगो का आड येत असावा?
'पत्रिका जमत नाही', 'नोकरीचं/ व्यवसायाचं क्षेत्र आवडलं नाहीये', 'राहण्याचं ठिकाण सोईस्कर नाही', 'उंची कमी/ जास्त आहे', 'रंग काळा/ गोरा आहे', 'पगार जास्त/ कमी आहे' इत्यादी कारणं का पुढे केली जातात? त्या स्थळाला सामोरं जाण्याअगोदर या बेसिक गोष्टी ठाऊक नसतात का? मग पहिली गाळणी तिथेच का लावली जात नाही?

आणि दुसरं म्हणजे आशू, << आता दुसरी बाजू म्हणजे वकीलच मुलगा शक्यतो नको आहे कारण एकाच व्यवसायात दोघेही असले तर एकसुरीपणाची शक्यता असते. शिवाय 'फिक्स मंथली इन्कम' हा महत्त्वाचा फॅक्टर आहेच.>> अश्या प्रकारचा विचार समोरची बाजूही करत असेल, चॉईस त्यांनाही आहे हे गृहीत धरून काही कटू गोष्टी पचवायला हव्यात असं मला वाटतं.
एकाच व्यवसायात असल्यामुळे जास्त चांगल्या प्रकारे ब्रेनस्टॉर्मिंग, अनुभवांची देवाण-घेवाण, वेगळा दृष्टीकोन मिळण्याची शक्यता इत्यादी बाबीही लक्षात घेऊन त्यादृष्टीने विचार करायला हरकत नाही.

सीएस आणि लॉ सिमिलर क्षेत्र दिसत असली तरीही त्यातल्या वर्किंग कंडीशन मध्ये फरक आहे >> नक्कीच मी स्वतः सनद घेण्याआधी २ वर्षे सी एस म्हणून काम केले आहे. पण लग्न ठरवताना सी एस ही डिग्री जास्त अधोरेखीत होते.

तेच तर ना, पहिल्या गाळणीत बाद होतात ते वकील व वडील पोलीसात असल्याने. इथे 80% कोटा संपतो. उरलेले भेटल्यावर बाद. म्हणूनच मी बोलण्याच्या टोनबद्द्ल लिहीले व त्यात काही बदल करायला काय करावे?
आणि तितकाच चांगला वकील मुलगा असेल तर ती नाही म्हणणार नाही याची खात्री आहे. स्ट्रॉंग नो नो नाहीये. Happy

पण लग्न ठरवताना सी एस
ही डिग्री जास्त अधोरेखीत होत>>>>>> एक्साक्ट्ली
माझ्याकडेही दोन्ही डिग्रीज आहेत
पण व्यावसायिक दृष्टीने सीएस प्रेफर केल

आणि सीएस म्हटल्यावर वेगळा दृष्टीकोन अधोरेखित होतो ।जस तुम्ही म्हणालात तसे

त्या उरलेल्या २० टक्क्यातच जरूर कोई अनदेखा अन्जाना होगा, जो बादलोंमें छुपा बैठा है| एक ना एक दिन ये बादल जरूर हटेंगे Wink
आय अ‍ॅम सिरीयस!

बापरे, लंपन! पण सगळेच वकील असे नसतात ना. >> आशूडी मी स्वतः हे अनुभव घेतले आहेत (वेगवेगळ्या फर्ममधे). माझी बॉस बरेचदा असे वागते Happy सीनीअर पार्टनर आणि त्यातून जर सॉलिसिटर असेल तर प्रचंड माज.

माझ्या दोन सहकार्यांच्या बायका वकील आहेत.
पैकी एक सिविल लॉ प्रॅक्टीस करते , तिच्या नवर्यानेही तिला मदत म्हणून फिजिओथेरपीबरोबरच लॉ चा अभ्यास सुरू केला आहे.
एकाची बायको क्रिमिनल लॉ प्रॅक्टीस करत होती. ती आता दोन मुले झाल्यावर घरीच असते कारण डॉक्टर नवर्याचे अनियमित
वर्क अवर्स! तिला अधून मधून डिप्रेशन येतं पण इथे तिच्यायोग्य दुसरं कॉर्पोरेट किंवा ऑफिस वर्क नाही.

वकील, डॉक्टर्स, मॅनेजर्स यांच्या बोलण्यात आपोआप एक ऑथोरिटी येते आणि तो टोन सासरी कुणाला आवडत नाही हा अनुभव आहे.
Happy

लंपन - माज कोणाला नसतो. माज हा फिल्ड पेक्षा माणसाच्या स्वभावाशी रिलेटेड असतो. आयटीवाल्या मुली देखील किती माज दाखवतात त्याला काही लिमिट नाही. असो अवांतर पुरे.

एखादी मुलगी फटकळ असते, ऑथोरिटिने बोलते किंवा मोठ्याने बोलते म्हणजे ती स्वभावाला चांगली नसते हे जनरलायझेशन झालं. असा विचार करणं हे समोरच्या पार्टीचं विचार दारिद्र्य दाखवतं असं मी स्पष्ट म्हणेन. आणि अशा विचारांचे लोक आपल्याला नाही म्हणत आहेत हे चांगलच आहे पुढे जाऊन त्रास होण्यापेक्षा.

आशू तुझ्या मैत्रिणीला शुभेच्छा. तिला सूटेबल मुलगा तिला नक्की मिळेल आणि आजूबाजूचे विचारतात किंवा वय वाढत आहे इत्यादी कारणासाठी स्वतःला बदलून लग्नाच्या बंधनासाठी स्वतःला वेगळं मोल्ड करण्याची काही गरज नसते.

>>नकार देणाऱ्यांना गेलास उडत म्हटले म्हणून तर त्यांच्या बाजूची उत्सुकता आहे ना!<<
नकार देणार्‍यांची बाजू जाणण्यात कशाला वेळ घालवा. आणि कोणी नाही म्हटले म्हनजे आपल्यातच काही कमी असेल असे समजू नये. आधीच्या पोस्टीत लिहिल्याप्रमाणे, मुलींना सुद्धा काही विशिष्ट क्षेत्रातील मुलगे नकोच असतात.
तसेही, काही सामाजिक समज/ गैरसमज्/अपेक्षा ह्यामुळे सुद्धा असे प्रेफरेन्सेस वाढीस लागतात.
त्यामुळे उगाच नकारांची मानसिकता समजण्यापेक्षा, दुसरे स्थळ समजून घ्यावे.(अ. आ. मा. म.).

सीए, डॉक व काही इतर क्षेत्रातील मुलींना (स्वतःची) सुद्धा लग्न करून सासरी असे नाही तसे एकावे लागते. पण त्या काही कायदेशीर स्टेप घेणार नाहीत असे 'समज' असल्याने करतात लग्न काही (सर्व जण नाही)ठोकळे. पण झेपत नाही मग बायकोच्या करीयरला सपोर्ट करणे. त्यापेक्षा नकार बरा.

आणि, मुलगी जोरात बोलो वा वाद घालो... ती लग्नाआधी भेटताना कमी बोलली तरी लग्नानंतर कशाला हा बुरखा. मुलीने सरळ आपण जसे आहोत तसे सामोरे जावे.

ईंटरनेट मुळे, मॅचमेकर वगैरे ओपन साईट्स असतात, तिथे कुठलेच प्रेशर नाही असे भेटून बघावे.

तसेही मुलीचे करीयर कसेही असो, पण लग्नात फक्त दोघांनी मिळून घेतलेलेच निर्णय बरे रहातात शेवटी. त्यामुळे तसे जुळणारे विचार असलेले बरे. उगाच करीयर बदलून मग दु:खी होत लग्नात राहून असमाधानी होवु शकतात काही जणं.
मुद्दा, आपले शोध विस्तारावे लागतील. मिळेलच कुठेतरी तो खास.

-----------------------
बोलघेवड्या मुली पारंपारीक पद्धतीने लग्न करत नाहीत.. हि. एक अगदीच टुकार टिप्पणी.

आपण एक मध्यमवर्गिय वरमाय होऊन विचार करावा अरेंज मॅरेज करताना मुलाकरिता वडिल पोलिस इनपेक्टर आणि मुलगी कोर्टात प्रॅक्टीसिंग वकील असे प्रपोजल पाहू का?
मी तरी नाही पहाणार रे बाबा!
हां, आता प्रेमाबिमात पडला असेल मुलगा तर गोष्टं वेगळी!

एखादी मुलगी फटकळ असते, ऑथोरिटिने बोलते किंवा मोठ्याने बोलते म्हणजे ती स्वभावाला चांगली नसते हे जनरलायझेशन झालं. असा विचार करणं हे समोरच्या पार्टीचं विचार दारिद्र्य दाखवतं असं मी स्पष्ट म्हणेन. आणि अशा विचारांचे लोक आपल्याला नाही म्हणत आहेत हे चांगलच आहे पुढे जाऊन त्रास होण्यापेक्षा.>> स्वभाव कळून घेण्याईतपतपण भेटी होत नाहीत. १-२ भेटीमधेच निकाल लागतो. आणि व्यवसायामुळे वाद घालण्याची किंवा आपले मत पटवून घ्यायला लावण्याची सवय लागते. आणि हे फक्त मुलींनाच लागू आहे असे नाही. मुलांना पण तितकेच लागू आहे. आणि मुलांना पण ह्या समस्या येतातच. वकील मुलांना पण असे नकार येतातच.

वडील पोलिस ऑफिसर आहेत. खरंतर ही किती अभिमानाची बाब! >>
एक वर्तमानपत्रातलं सल्ला विषयक पत्र आठवलं. मुलीचा भाउ पोलिसात होता, मुलगी मनमानी करणारी होती, लग्नानंतर मुलीचा मनमानी कारभार मुलाला जड जात होता, त्या मुलाने ने काही तक्रार/भांडण केल्यास मुलगी भावाला सांगत असे, भाउ घरी येउन त्या मुलाला डोस/धमक्या देत असे (आत टाकीन, हातपाय तोडेन वगैरे), पत्रावरुन तरी मुलगा समंजस वाटत होता. (दुसरी बाजु असु शकते).
पण लोक भयचकित होऊन आ च वासतात!>>
पोलिसच ह्याला कारणीभुत नाहीत काय?

आमच्याकडे माझे सगळे काका वकील आहेत. पण औरंगाबादला हायकोर्टात किंवा बीड /अंबाजोगाई/केजमध्ये सेशन कोर्टात प्रॅक्टीस करतात. त्यांच्या लग्नाच्यावेळी बहूतेक असा काही प्रश्न नव्हता आला. Happy

एक बहिण वकील आहे. तीचं औरंगाबादला हायकोर्टातच ज्युनियरशीप करत असताना तिथल्याच एका वकीलाशी लग्न झालं. आता ती नवर्‍याच्याच प्रॅक्टीसमध्ये त्याला मदत करतेय /त्याच्याकाडेच ज्युनियरशीप करतेय.

मुलींपेक्षा वकील मुलांना लग्न जमायला जास्त त्रास होत असेल असं वाटतंय. स्पेशली मुंबई-पुण्या बाहेरच्या. जिथे लॉ फर्म नाहीयेत आणि स्वतःची प्रॅक्टीस करायची आहे तिथे वकील झाल्यावर किमान ४-५ वर्ष तरी ज्युनियरशीप. त्याकाळात बेदम काम आणि नावापुरता पगार. (तुलनेनी खूपच कमी पैसे मिळतात ज्युनियर्सना). नेमकं हेच वय लग्नाचं असतं. बरं थोडं उशिरा स्वतःची प्रॅक्टीस सुरु करून लग्न करायचं म्हटलं तरी प्रॅक्टीस एस्टॅब्लिश व्हायला (चांगल्या वकिलाला) २-४ वर्ष लागतात. तोपर्यंत बर्‍याचदा आई-वडीलांच्याकडून मिळणार्‍या पैश्यावर घर चालतं. त्यामूळे मुलगा चांगला वकील असला तरी अजून त्याच्या वयाच्या इंजिनियर्स्/मॅनेजर्सपेक्षा कित्येक पटीने कमी कमावतोय म्हणून मुलीकडचे नकार देत असणार.
जोपर्यंत प्रॅक्टीस एस्टॅब्लिश होते तोपर्यंत वय ३५ + नक्कीच झालेलं असतं.

ओळखीतल्या वकील मुलींनी वकील, आर्मी ऑफिसर्स,सी ए, डॉक्टर्स, प्राध्यापक या व्यवसायातल्या मुलांशी लग्न केली आहेत.

आशूडी, तुझी मैत्रिण पुण्यातली असेल तर तिला साथ-साथ ची सदस्य व्हायला सांग. माझ्या एका मैत्रिणीचा आणि मित्राचा तिथला अनुभव (स्वतंत्रपणे, एकमेकाबरोबर नाही Wink ) खूपच चांगला आहे

आपण एक मध्यमवर्गिय वरमाय होऊन विचार करावा अरेंज मॅरेज करताना मुलाकरिता वडिल पोलिस इनपेक्टर आणि मुलगी कोर्टात प्रॅक्टीसिंग वकील असे प्रपोजल पाहू का?
>>
साती, का नाही? मला ही हे ऐकायला आवडेल.
इथे फक्त वकील मुलींची चर्चा अपेक्षित आहे का (ना)?
आयटी माधल्या मुलींचे हाल तर काय सांगावे बाईsssssssssssssssssss Proud

वाचते आहे प्रतिसाद. वकील मुलांचेही अवघड आहे हा मुद्दा पटलाच.
वरदा, नक्की सांगणार.
साती, का गं अशी वरमाय होणार तू? Happy मुलीचे वडील तर लवकरच रिटायर्डही होणारेत, म्हणजे त्या पोलीस भावासारखे तरूण व गरम डोक्याचेही नाहीत.
एक्झॆक्टली, त्या ऑथॉरिटी टोनचेच काय करायचे?

इथे फक्त वकील मुलींची चर्चा अपेक्षित आहे का (ना)?>>
एका ओळखिच्या कुटुंबामध्ये वकिल सुन आहे.(साबु मुख्याध्यापक, साबा त्याच शाळेत शिक्षिका, ह्यांचा मुलगा इंजिनियर आहे, त्याची बायको वकिल आहे). तर त्या मुलीचं वकिली शिक्षण पुर्ण झालं होतं, साबुंच्या ओळखीने एका नामांकित वकिलाकडे नोकरी मिळाली, पण त्या बिचार्‍या मुलीची तिथे येणारे गावठी/ रानटी क्लायंटस (आठवा ते सोनसाखळदंड घातलेले, मोबाइल कानाला लाउन काढलेले फ्लेक्स बॅनर्सवरचे न्येते) बघुन नोकरीवर जाण्याची हिंमतच नाही झाली. ती आता एमबीए का असचं काही तरी करतिये.

मी जर वरमाय असते तर उलट मला पोलिस व्याही आणी वकील सून आवडली असती. (हे मी पूर्णपणे कोकणी झाल्याचे व्यवच्छेदक लक्षण मानावे का? वकिलाला कोकणाइतका मान क्वचितच कुठेतरी मिळत असेल!!)

रच्याकने. एका मैत्रीणीच्या वकिल बहिणीचे लग्न मागणी घालून झाले.. तिला त्या मुलानं कुणाच्यातरी लग्नात पाहिले. त्याने आईला ती आवडल्यचं सांगितलं आणि मग पुढची बोलणी वगैरे होऊन महिन्याभरात त्यांचं लग्न झालं. ती मुलगी आता एल एल एम करतेय. घरच्यांना वकिल सून असल्याचा प्रचंड अभिमान आहे. सासरी ही सर्वात धाकटी म्हणून हिचेच लाड जास्त. घरात वादावादी झाली (एकत्र कुटुंब असल्याने बर्याचदा होतात) हिचा शब्द फायनल!!!

बापरे वकील मुला / मुलींचं लग्न जमायला इतका त्रास होतो ?
शक्यतो आपाआपल्या फिल्डमधल्या मुला / मुलीशी लग्न करावं जेणेकरुन त्या फिल्डमध्ये येणार्‍या अडचणी आणि त्यामुळे बनलेला स्वभाव स्विकारायला फारशी अडचण येणार नाही. आणि कदाचीत मुलगा /मुलगी एकमेकांना जास्त चांगल्या प्रकारे समजुन घेऊ शकतील . अर्थात हे सब घोडे बाराटक्के प्रमाणे पण लागु होणार नाही.
पहिल्याच भेटीत जर कोणी डॉमिनेटींग वागत असेल तर समोरच्या व्यक्तीचं मत नक्कीच अनुकुल होणार नाही. अर्थात हे मुलांसाठी पण लागु होतं.
प्रश्न आहे ' स्वभाव बदलणार कसा ,कोण आणि का ' ?

लंपन, मंजू आणि जाई प्रतिक्रिया आवडल्या.

एखादी मुलगी फटकळ असते, ऑथोरिटिने बोलते किंवा मोठ्याने बोलते म्हणजे ती स्वभावाला चांगली नसते हे जनरलायझेशन झालं. असा विचार करणं हे समोरच्या पार्टीचं विचार दारिद्र्य दाखवतं असं मी स्पष्ट म्हणेन. आणि अशा विचारांचे लोक आपल्याला नाही म्हणत आहेत हे चांगलच आहे पुढे जाऊन त्रास होण्यापेक्षा.>> हे फारच पटले.

एकंदरीतच लग्नाच्या बाबतीत मला स्वत:ला आलेला अनुभव मुली व त्यांच्या घरचे याबाबतीत नव्या परिस्थितीनुसार बदलले आहेत त्यामानाने मुले व मुलाच्या घरचे अजूनही जुन्या काळालाच धरून आहेत त्यामुळे एकंदरीत विचारांत तफावत येतेय (हे जनरलायझेशन ही असू शकेल व्यक्तींनुसार पण मला माझ्या माहीतीतील आजूबाजूच्या लग्नाळू मुलामुलींच्या व त्यांच्या घरच्यांच्या अपेक्षा पाहून असंच वाटलं)

वकील मुलगी म्हणजे उठसूट कायद्याचा बडगा दाखविणार, तिचे पोलिस इन्स्पेक्टर वडिल कधिही धमकी देऊ शकणार असा विचार करतात वराकडचे लोक.
कितीही समानता म्हटली तरी नवर्याच्या घरच्यांचा लग्नात वरचश्मा रहाणार हे नक्कीच .
किंवा रहावा अशी इच्छा तरी असते. त्यामूळे नकोच ते झंजट ते ही स्वतःहून ओढवून का घ्या असे लोक म्हणणारच.
याऊलट ज्यांच्या घरात /नात्यात वकील आहेत त्यांनाच फक्त वकील घरात पण कोर्टासारखी अर्ग्यूमेंटस करत नाही हे ठाऊक असते.

(मी नाही करणार रे बाबा- हे मध्यमवर्गीय, शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये इ. विचार असणार्या वरमायच्या दृष्टीकोनातून लिहिले आहे.)

Pages