खऱ्या 'ईशा'च्या लग्नाची गोष्ट

Submitted by आशूडी on 8 July, 2014 - 14:50

माझी एक मैत्रीण आहे. सुस्वरुप आहे, एकत्र कुटूंबात वाढली आहे. एल्.एल्.बी करुन पुण्यात एका चांगल्या वकीलांकडे प्रॅक्टिस करते. शिवाय स्वतः स्वतंत्रपणेही काम करते. म्हणजे अगदी आपल्या एका लग्नाची तिसरी गोष्ट मधल्या ईशासारखीच. तिचे लग्न न ठरण्यात मोठा वाटा तिच्या कार्यक्षेत्राचा आहे. कारण मुलगी 'वकील' आहे म्हणताच ऐकणार्‍याचे तोंड एवढेसे होते. मुलाची आईच असेल तर जणू आता आपल्या घरात रोजच 'जनता की अदालत' भरणार हे भविष्य दिसून तिची घाबरगुंडी उडते. मुलगी कशी आहे, काय करते, तिच्या इतर आवडी निवडी काय आहेत हे जाणून घ्यायच्या आधीच नकार दर्शवला जातो.
खरंतर पूर्वी या व्यवसायात असलेल्या स्त्रियांना हा प्रॉब्लेम आला होता का हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. पण ३-४ वर्षांपूर्वी सकाळ च्या मुक्तपीठ मध्ये अगदी हाच मुद्दा धरुन एका उपवर मुलीनेच लिहीलेला लेख प्रसिध्द झाला आणि हा प्रश्न ठळकपणे पृष्ठभागावर आला. आता त्यावर प्रतिक्रिया अशाही होत्या, की या लेखामुळे लोक अजूनच सावध झाले आणि या व्यवसायात आणखीच 'विवाहमंदी' आली.

मैत्रिणीचा मुद्दा क्र. २ असाही आहे की तिचे वडील पोलिस ऑफिसर आहेत. खरंतर ही किती अभिमानाची बाब! पण लोक भयचकित होऊन आ च वासतात! मुलगी वकील आणि वडील पोलीसात? नको रे बाबा! पण काय हरकत आहे? सीमेवर लढायला जावे तर शेजार्‍याच्या मुलाने, हे ठाऊक होते पण कायद्याचे रक्षणही करणारे परकेच कुणी असावेत? कुछ समझ मे नही आ रहा बॉस! आता दुसरी बाजू म्हणजे वकीलच मुलगा शक्यतो नको आहे कारण एकाच व्यवसायात दोघेही असले तर एकसुरीपणाची शक्यता असते. शिवाय 'फिक्स मंथली इन्कम' हा महत्त्वाचा फॅक्टर आहेच.

मुलांच्या अपेक्षा अटी बघाव्यात तर हल्ली पहिली अट ही असते की 'आयटी वाली नको!', फुल टाईम ऑक्युपाईड नको! (हो, नंतर मुलाकडे कोण बघणार ना!) शिकलेली हवी, पगाराची खास अपेक्षा नाही. मग 'वकील' असण्यात प्रॉब्लेम काय आहे? फ्लेक्सी टायमिंग आहे, सर्व सरकारी सुट्ट्या आहेत. मुख्य म्हणजे मुलीची रिलोकेट करण्याची तयारी आहे. भरपूर माणसांची सवय आहे. आणखी काय हवं? आता ही मैत्रिण जराशी बोलघेवडी आहे. पण ते तर तिच्या व्यवसायाला पूरक आहे ना? मग त्या गोष्टीकडे 'व्यावसायिक गुण' म्हणूनही सुरुवातीला नाही पाहता येत? पुढे मागे मुलाचा शांत स्वभाव असेल तर ती ही निवळेलच की. पण हल्ली होकार नकार कळवण्याची काय गणितं असतात समजतच नाही. आणि ही स्टेज येते ती फोटो, पत्रिका इ सोपस्कार झाल्यानंतरच. मग नकाराचे नेमके कारण काय असावे? खरोखर या प्रश्नाने आम्हाला हैराण केले आहे.

'एका लग्नाची तिसरी गोष्ट' मधल्या ओम आणि ईशा मुळे गेल्या काही दिवसात वकीलांना किंचित ग्लॅमर मिळालंय खरं पण त्याचा या गोष्टीसाठी कितपत फायदा होईल कुणास ठाऊक. निदान ईशासारख्या खानदानी वकील मुलीसुद्धा इतर सद्गुणी मुलींसारख्याच घरं तोडण्यासाठी नाही तर जोडण्यासाठी प्रयत्नशील असतात अशी जाणीव जरी झाली तरी दिलासा मिळेल.

तुम्हाला याविषयी काय वाटते, कुठे सुधारणेला वाव आहे याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. Happy

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशुडी, यामधे तुमच्या मैत्रिणी च लग्न न ठरण ह्याला एकमेव कारण म्हणजे अजुनही जुन्या पुरुषप्रधान विचारनी बुरसटलेला समाज. मुलगी वकिल अस्ल्याने मुलाला Insecured feeling आणि Defeat Fear. पोरगी घरात आली अन शिरजोर झाली तर ह्या विचारातुन आइ-बडिल ही स्थळ मुलापर्यन्त आणतच नाहीत.

ह्याला उपाय काय म्हणाल तर समाजाची मानसिकता बदलावी लागेल जे तुम्च्या मझ्या आनि तुमच्या मैत्रिणीच्या जन्मात तरी शक्य नाही. Happy तेव्हा उपाय काय ? Arrange marriage होत नाहीये त्यामुळे Love Marriage हाच एक्मेव पर्याय आहे अस आत्त तरी वाटत.

ह्या अशा समस्या समोर आल्या कि एक प्रश्ण नक्कि पडतो की ह्या सामाजिक समस्यांवर पाशचात्त्य Live In Relationship पर्याय ठरु शकेल का !! ?? आता मी Direct Live In Relationship मधे हात घातला म्हणुन अनेक लोक भिवया उन्चावतील पण व्यावहारीक द्रुष्ट्या तोच पर्याय उरतो. मुलगा-मुलगी वकिल किन्व Merchant Navy etc मधे आहे म्हणुन नापसंत करण किन्वा मुलीचा जास्त पगार असण खटकण ही बहुन्तांशी झापड लावुन पारंपारीक जुनाट पद्धतीने जगणार्या समाजाची लक्षण आहेत.

मुली बिचकतात कारण त्यांना स्थळे मिळत नाहीत.

मुग्धानंद मला तुझी पोस्ट सॉलिड पटली. कारण खरा अनुभव आहे ना....

मुळात आपल्या समाजात वकिल, सी,ए ही प्रोफेशन्स बायकांची मानली गेलेली नाहीत<<<

ही विधाने अजिबात पटली नाहीत. आपला समाज हे सर्व काही पचवून खूप पुढे आलेला आहे. >>> हे म्हणणे फार सोपे आहे. मुली या व्यवसायात आहेत सुद्धा. पण कितीजणी टॉप ला आहेत? हा एक वेगळा आणि महत्वाचा मुद्दा आहे. सीए, सीएस मुली चालतात पण त्या पुरुषांसारख्या फुल फ्लेज्ड करिअरीस्टिक चालतात का? तज्ञ म्हणून बघितले जाते तेव्हा या सीए , सीएस, वकिली क्षेत्रांमधल्या कितीजणींची नावे आठवतात?
मला तर झिया मोदी आणि पल्लवी श्रॉफ सोडून प्रसिद्ध वकिल स्त्रियांची नावेसुद्धा लक्षात येत नाहीयेत.

या सगळ्याला कारणीभूत या क्षेत्रात उतरणार्‍या स्त्रियांचे कमी टॅलेंट नक्कीच नाहीये. ते कुठल्यातरी ईशाच्या लग्नाला त्रास होतो ना तेथे मूळ आहे.

>>>हे म्हणणे फार सोपे आहे. मुली या व्यवसायात आहेत सुद्धा. पण कितीजणी टॉप ला आहेत? हा एक वेगळा आणि महत्वाचा मुद्दा आहे. सीए, सीएस मुली चालतात पण त्या पुरुषांसारख्या फुल फ्लेज्ड करिअरीस्टिक चालतात का? तज्ञ म्हणून बघितले जाते तेव्हा या सीए , सीएस, वकिली क्षेत्रांमधल्या कितीजणींची नावे आठवतात?
मला तर झिया मोदी आणि पल्लवी श्रॉफ सोडून प्रसिद्ध वकिल स्त्रियांची नावेसुद्धा लक्षात येत नाहीयेत. <<<

ह्या उतार्‍यातील शेवटचे विधान महत्वाचे आहे. तुम्हाला काही चंद नांवे सोडली तर इतर नांवे माहीत नाहीत किंवा लक्षातही येत नाहीत! धिस इज अबाऊट एक्स्पोजर, इझन्ट इट? Happy

माझ्या (नुकत्याच हाती आलेल्या) कामानिमित्त मी गेल्या एक महिन्यात तीन अश्या वकील स्त्रियांना प्रत्यक्ष भेटलो ज्या:

१. सुखेनैव विवाहीत आहेत
२. त्यांना मुलेबाळे आहेत व त्या संसारही बघतात
३. त्या पोलिसांच्या नाकी नऊ आणतात
४. त्यांच्यापैकी एकीने चक्क स्त्रियांसाठी एन जी ओ स्थापन करून स्वतःचा सेल नंबर चोवीस तास हेल्पलाईन म्हणून दिलेला आहे.
५. मुलाखतीदरम्यात त्या फोनवर येत असलेले अगणित फोन कॉल्स तिची सहाय्यिका घेत होती.
६. त्या वकील स्त्रीच्या पतीने आजतागायत त्याच्या पत्नीला क्रॉस क्वेश्चनिंग तर सोडाच, किरकोळ विरोधही केलेला नाही, उलट प्रोत्साहन दिलेले आहे.

पुण्याच्या कोर्टाच्या आसपास चक्कर टाकली तर वकीलांच्या पाट्या आणि कोर्टात हिंडणार्‍या वकीलांपैकी किती स्त्रिया आहेत (प्रॅक्टिस करणार्‍या) हे सहज समजू शकेल.

स्वातीजी, तुमचा निव्वळ प्रतिवादासाठी प्रतिवाद करणे हा माझा अजिबातच हेतू असू शकत नाही, मात्र तुम्ही जे म्हणत आहात तो काळ उलटून खरंच भरपूर काळ गेलेला आहे असे माझा अभ्यास सांगतो. हा अभ्यास एखाद्या साईटवर, एखाद्या संख्याशास्त्रीय रिपोर्टवर अवलंबून असलेला नसून प्रत्यक्ष त्या जगात जाऊन केलेला अभ्यास आहे. Happy

डॉक्टर नको , सीए नको , सीएस नको , वकील नको , नर्स नको
मग कोणत क्षेत्र निवडाव म्हणजे सुरळित होईल सर्व मुलींच ?
अवघड आहे Uhoh

जाई,

तुमचे वरील दोन प्रतिसाद मला तरी अयोग्य वाटले. मूळ धाग्यात प्रश्न एका विशिष्ट मुलीबाबतचा आहे. सर्वत्र असे'च' होते असे नाही हे मला शिकायला मिळाले. Happy

मोहन की मीरा,
भापो..

>>आपला समाज हे सर्व काही पचवून खूप पुढे आलेला आहे. >>> हे म्हणणे फार सोपे आहे.
+१
पण असे खरेच झाले आहे का? असे चित्र तर दिसत नाही.
वकील, शॉप फ्लूअर, प्रोडक्शन, साईट/सिव्हिल इंजिनिअरींग इ. मध्ये शिक्षण घेणे वेगळे आणि फुल्ल टाईम करिअर करणे वेगळे... अशा क्षेत्रात शि़क्षण घेणार्‍या बर्‍याच मुली असतील पण नंतर काम पण यातच करणार्‍या तुलनेने कमी आहेत.. यातील बर्‍याच जणी IT/ITES किंवा non-litgation मध्ये, काही कारणास्तव नोकरी नाही करता येत किंवा अन्य कारणाने कुटुंबाची जबाबदारी घेऊ लागल्या.
यावर कोणी असेही म्हणेल की गेल्या १० वर्षात मुले नाही का prod, civil, mech किंवा b.com आणि मग काही कोर्स करून IT/ITES क्षेत्रात गेली?

बेफिकीर,
अहो त्यांनी लेख कुठे पाडला आहे.. हा एक प्रश्न पण असू शकतो ना? आणि त्या यावर इतरांची मते जाणू इच्छित असतील.. त्यांची क्षमता आहे चांगला लेख पाडायची- लेखाची तुमची अपेक्षा पूर्ण करतीलही, कोण जाणे.

असो,
मागे झंपी ने म्हणल्याप्रमाणे नकाराचे कारण कशाला शोधत बसायचे.. नकार तर नकार,.. नकाराचा होकार होणार नसेल तर उगाच त्यावर विचार करून डोक्याचा भुगा कशाला करून घ्या.. बर्‍याच लोकांना असे वाटत असेल की या [किंवा अजून कोणत्या] क्षेत्रातली नको आहे. खरेतर अशा लोकांनी सुरुवातीलाच प्रोफाईल पाहून ही गाळणी लावली पाहिजे पण यातले बरेच असे पण असतील की खूप मुली पाहिल्या पण काही जमत नाहिये, अपेक्षा कमी केल्यात इ. इ. तर ही मुलगी पाहून तर घेऊ!

>>दुसरी बाजू म्हणजे वकीलच मुलगा शक्यतो नको आहे कारण एकाच व्यवसायात दोघेही असले तर एकसुरीपणाची शक्यता असते. शिवाय 'फिक्स मंथली इन्कम' हा महत्त्वाचा फॅक्टर आहेच.
बेफिकीर नी म्हणल्याप्रमाणे मुलाकडचे पण असा विचार करू शकतात् ना..
तुम्ही लिहलेले हे ही वाचले की फिक्स्ड नो नो नाहिये पण मुलीने आणि घरच्यानी खरच विचार करायला हवा की हा निकष खरच का आहे? बेसुरीपणा कारण वै. मला पटत नाही..असे असेल तर कित्येक डॉ, इंजिनिअर, आताचे IT क्षेत्रातले बरेच लोक - असे आहेतच की. की या व्यवसायतली माणसे जवळून पाहिल्याने यातला मुलगा नको आहे?
फिक्स मं. साठी एकाने प्रॅक्टिस करायची आणि दुसर्‍याने non-litgation किंवा तत्सम बॅक ऑफिस जॉब करायचा हा पर्याय पण आहे पण हे करायची तयारी आणि विचार केला आहे का?

गाभ्यातून्/मुळातून बदला हे म्हणायला ठीक आहे पण असे किती जणांना जमलय? आणि किती वर्ष लागली? मुलीचे सध्याचे वय माहित नाही पण हा पर्याय मला रिअलिस्टीक वाटत नाही.. [जमान्यापासून लोक म्हणतात मूळ स्वभाव बदलत नाही.. Happy ]

पहात राहणे आणि प्रयत्न करणे हे आपल्या हातात आहे..तुमच्या मैत्रीणीला शुभेच्छा!

लवकरच कोण कोणाशी कोणत्या कारणाने का भिडत आहे हे समजण्यापलीकडे प्रतिसाद जातील अशी सार्थ शक्यता वाटत आहे. Light 1

इकडे काहीतरी गडबड प्रतिसाद येत आहेत.
इकडे ज्या बायका पुरुष ह्या वकिलीच्या प्रोफेशन मधे आहेत ते लिहुन राहिलेत की आमचं अ‍ॅरेंज मॅरेज जमताना त्रास झाला... अगदी जमलच नाही असं नाही पण त्रास किंवा इरिटेशन नक्की झालं.... आणि दुसरी कडे ज्यांचा ह्या प्रोफेशन शी एक क्लायेंट म्हणुन फक्त संबंध आहे, आणि प्रत्यक्ष काहीच संबंध नाही ते म्हणताहेत.."नाही नाही!!! हा कांगावा आहे..... असं होवुच शकत नाही"

आता त्या पाट्या लावलेल्या प्रत्येकाला कोण विचारायला गेलं का की बाई ग लग्न जमताना त्रास झाला का? आणि तिर्‍हाइताला असं कोण सांगणार.... म्हणजे ह्या क्षेत्रातल्या व्यक्तिंचा अनुभव महत्वाचा की नुसता बघीव अनुभव, बरं जे ह्या प्रोफ्शन मधे आहेत ते सांगताहेत की लग्न होतात, होत नाही असं नाही... पण असे नाकारले जाण्याचे प्रसंग जरुर येतात

बरं इथे फक्त लग्न जमतानच्या अडचणी डिस्कस होत आहेत. लग्ना नंतर च्या सुखी किंवा दु:ख्खी जिवनाची गाथा सांगितली जात नाहिये.... पुढे त्या नवरा बायकोचं एकमेकांशी प्रोफेशनल गोष्टीं मुळे पटणं न पट्णं हा अतिषय वेगळा मुद्दा आहे.

मुळात ह्या प्रोफेशन मधे आहे म्ह्णुन पहिल्याच पायरी वर येणार्‍या अडचणी डिस्कस होत आहेत.

मोहन की मीरा | 10 July, 2014 - 21:33 नवीन<<<

इकडे काहीतरी गडबड प्रतिसाद येत आहेत.<<<

प्रथमच सहमत!

मला वाटत वकिलच मुलगा निवडावा! बस्तान बसले की मिळुन लॉ फर्म वैगरे काढावी!,समान क्षेत्रात असल्याने यातले
लो आणी हाय सगळेच पॉइन्ट माहित असणार!
(सासरी झालच भा.न्डण तर मुद्देसुद होईल..smiley2.gif)
( ते लॉ-फर्म वैगरे जनरल इथेतिथे वाचुन लिहलय मला खरोखर या क्षेत्रातल काही कळर्त नाही, मर्म समजुन घ्या)

आधी मी काय लिहिले आहे ते नीट वाच. <<
नीट वाचूनच मला जे वाक्य खटकलं तेवढ्याच बद्दल लिहिलंय. त्या खटकण्याचा या बाफ शी संबंध नाही.
माझी पोस्ट वाचून तुझी मैत्रिण पण हसेल तर हसूदेत बापडी. मला काय. परत वाचल्यावरही ते वाक्य खटकतंय तर खटकतंय मला. तू पण तुझ्या मैत्रिणीसारखी हस माझ्या पोस्टला. मला काहीच फरक पडत नाही.
तुझ्या त्या पोस्टनंतर मी काहीच लिहिलेलं नसताना परत माझ्या पोस्टमधले मुद्दे संदर्भ सोडून पुढे आणून कशाला काहीतरी एक्स्प्लेनेशन्स?
कचकून अभ्यास वगैरे मुद्दा मी काय संदर्भाने लिहिला होता आणि तू काय संदर्भ घेऊन उगाच मी काहीतरी भयंकर लिहिल्यासारखं सांगतीयेस मला..

मला उद्देशून आहे की 'मोहन की मीरा' ह्यांना! <<
कोणा एकाला उद्देशून नाही. बाफवर एकुणात लेबलं लावायला सुरूवात झाली आहे असं वाटलं म्हणून लिहिलं.

एकुणात लेबलं<<<

येथे जो तो आपापले लिहीत आहे. मूळ लेख मर्यादीत कर्मचारीविश्वाबाबत आहे असे बहुधा (फक्त) मीच म्हणालो आहे. लेबलं कोणी लावली आहेत असे मला नाही आहे वाटत!

असो!

>> मूळ लेख मर्यादीत कर्मचारीविश्वाबाबत आहे
तो हा नव्हे. Proud

तो हा नव्हे<<< Lol

असे झाले होय!

एका माणसाने तरी काय काय करायचे! एकीकडे गझल वगैरे.......

==============================================

नीधप,

तुम्हाला बरोबर वाटत आहे, कारण मला जे वाटत आहे ते कोठे वाटायला हवे हाच प्रश्न आहे Happy

================================================

जोक्स अपार्ट (अ‍ॅम आय सेयिंग धिस?)

हो!

पण लेबलं?

सर्व प्रतिसाद वाचले. काही ठोस उपाय निघालेला दिसत नाही.

लोकांना काही ना काही कारणाने लग्न ठरवायला त्रास होतच असणार की... काहींना पेशामुळे, काहींना जाडीमुळे, काहींना हडकुळेपणामुळे, काहींना उंचीमुळे...

ईशा आणि सर्व इतर लग्नेच्छुकांना शुभेच्छा!

सगळे प्रतिसाद नीट वाचले. काही प्रश्नांना उत्तरे माझ्या या पोस्टमधून मिळतील असे वाटते. मुळात मी हा बाफ काढला तो लेख लिहीण्यासाठी नाही तर काही माहिती, उत्तर मिळते का हे चाचपण्यासाठी. मला समस्या जाणवली ती थोड्या फार किंवा कितीही प्रमाणात सार्वत्रिक/ साधारण/ कॉमन/ जनरल आहे का हे पाहण्यासाठी. (अर्थात त्यासाठी हा फोरम फार लिमिटेड आहे हे गृहीत धरुनच). मला प्रश्न पडले आहेत त्यांचं माझ्या परीने मी निराकरण करते आहे. त्यामुळे त्यावर उपाययोजना, एकूण भारतीय समाजातले या समस्येचे प्रमाण, त्याविषयीचे धोरण इ इ बद्दल लिहीणे फार दूरची गोष्ट. कदाचित मी याच गोष्टींच्या शोधात आहे म्हणा. त्यामुळे खरंतर मी या धाग्यावर वाचनमात्र असणे मलाच अपेक्षित आहे. तरीही काही प्रश्न मांडून चर्चा भरकटली जाऊ नये म्हणून ही पोस्ट. (पुन्हा एवढे सविस्तर लिहायला वेळ सापडेल असे नाही.)

दुसरी गोष्ट, मी मुलीबद्दल जे काही लिहीले आहे ते आजवर आलेल्या अनुभवांवरुन. सुस्वरुप (प्रमाणाबाहेर जाड/ बारीक नसणे, कोणतेही व्यंग नसणे, इ इ) तसेच एकत्र कुटुंबात वाढलेली असणे ही आज क्वालिफिकेशन्स 'च' आहेत आणि त्याबद्दल कुणीही काहीही मत व्यक्त केले तरी फरक पडणार नाही.

नंबर तीन, मुलाकडच्यांनी वकील मुलीला नाही म्हणूच नये असा मूर्ख आग्रह नाहीये. त्यांची बाजू काय असू शकते याची आजवर कल्पना आलेली आहे. पण खरंच, बाकी सगळे तपशील गेले तेल लावत पण मुलगी/ मुलगा 'फक्त वकील' आहे म्हणून 'नाही' अशी वस्तुस्थिती कुणाला सामोरी आली आहे का हे हवे होते ज्याचे उत्तर मुग्धानंद, लंपन, उजू, अल्पना, काशी, साती या व अजून काहींच्या पोस्टमधून मिळाले. मुलाकडच्या ज्या अपेक्षा मी लिहील्यात त्या अर्थातच त्या मैत्रिणीला आलेल्या स्थळांवरुन. (कारण प्रश्न तिचाच आहे!) त्या 'जनरल' नसणारच. ज्या मुलांना भक्कम पगारवाली मुलगी हवी आहे ते हे स्थळ शॉर्ट्लिस्ट करतीलच कशाला? त्यामुळे सरसकट सगळ्या मुलांच्या या अपेक्षा नाहीत. तसेच, मुलगी अजून कितीतरी बाबतीत तडजोडीला तयार आहे तेही मी लिहीले नाही. कारण इथे मला तिची 'प्रोफाईल' नाही, समस्या मांडायची आहे.

नंबर चार ( व अत्यंत फालतू मुद्दा) टीव्हीतल्या 'ईशा'चा संदर्भ केवळ गंमत म्हणून घेतला होता त्याला वैचारिक फूटपट्ट्या लावत बसू नका.

आणि अखेर नंबर पाच, ( अगदीच टाकाऊ मुद्दा) मैत्रिणीचं लग्न व्हावं अशी मनापासून इच्छा आहे म्हणून तर हा प्रपंच केला, मग त्याला भावनांना वाट म्हणा, उद्रेक म्हणा, नसत्या उठाठेवी, पंचायती म्हणा किंवा खुर्च्या टाकून पॉपकॉर्न खायला मिळालेले निमित्त म्हणा! शेवटी इथल्या चर्चेतून हवं तेच घेणार. तेव्हा कंटिन्यू. Happy

आशुडीने धागा काढला- घरासमोरच्या वनवेतून जाताना अपोझिट साईडने गाडीने येऊन ठोकलं काय करावं?

प्रतिसाद १. - गाडीवाल्यावर केस करावी, मागे त्याच रस्त्यावर माझ्याबरोबरही असेच झाले, मी तक्रार केली
प्रतिसाद २. - वनवेत अपोझिट साईडने गाडी येईलच कशी?
प्रतिसाद ३. - वनवेत अपोझिट साईडने गाडी येतंच नाही
प्रतिसाद ४.-पण मला ठोकलंय ना असं एका गाडीने
प्रतिसाद ५- शक्यच नाही. अश्या असिविलायजेशनच्या भारत फार पुढे निघून आलाय
प्रतिसाद ६- आजकालच्या मुलींना गाडी चालविता येते का?
प्रतिसाद७- अहो अजून कित्येकजण वनवेतून अपोझिट साईडने गाडी चालवितात
प्रतिसाद ८- भारतात कुठेही वनवेतून गाडी अपोझिट साईडने येत नाही. हे मी सांगिवांगीतून नव्हे तर विविध रस्त्यांवर फिरता विक्रेता म्हणून काम करत असताना आलेल्या अनुभवांवर लिहितोय
प्रतिसाद ९- पण अल निनोचं इथं काय काम, पवनचक्क्याच जबाबदार
प्रतिसाद १०- अहो ते इथे नव्हे , दुसर्या धाग्यावर
प्रतिसाद११- अरे असं का, होतं असं कविता लिहिता लिहिता
प्रतिसाद १२- आता गाडी दुरूस्त झाली की अख्ख्या मायबोलीला पार्टी द्या.

Happy

आशुडी, <मला समस्या जाणवली ती थोड्या फार किंवा कितीही प्रमाणात सार्वत्रिक/ साधारण/ कॉमन/ जनरल आहे का हे पाहण्यासाठी. > ह्या प्रश्नाचे उत्तर मिळण्यास मदत म्हणून: माझे बाबा वकील आहेत आणि त्यांच्या हाताखाली बऱ्याच मुली ज्युनियर वकील म्हणून काम करतात (गेल्या ३० वर्षांत मिळून २० तरी नक्की). शिवाय कोर्टात सहकारी महिला वकील पण आहेत. मी म्हणून त्यांना विचारलं तर त्यांच्या पाहण्यात तरी ही गोष्ट इतकी कॉमन नाही. ह्यातल्या बहुतांशी सगळ्या मुलींची लग्न झाली, काही practice करतात, काही नोकरी करतात, काहीजणी गृहिणी आहेत. पण त्यांचे वकील असणे त्यांच्या लग्नाच्या आड आले असे झाले नाही.
माझी स्वतःची वर्गमैत्रीण वकील आहे आणि तिचेही ठरवून लग्न झाले आहे. ओळखीचे वकील मित्र आहेत त्यांचीही लग्ने झाली आहेत. एक वकील मैत्रीण आहे तिचे मात्र अजून (लग्नाचे वय असून) लग्न झालेले नाही. हे माझ्या आजूबाजूचे चित्र.

एकत्र कुटुंब म्हणजे काय? न्युक्लिअर फॅमिली की इंडियन जॉइंट फॅमिली? व्याख्या काय आहे? हे क्वालिफिकेशन का आहे? अशी मुलगी जास्त मनमिळाउ असते का?

अशी मुलगी जास्त मनमिळाऊ> > कुछ भी.
एकत्र कुटुंब = आई बाबा, आजी आजोबा, असलेच तर काका काकू व त्यांची मुले असा परिवार.
न्यूक्लिअर फॆमिलीमुळे तसेच एकुलते एक पणामुळे हल्ली 'नातेवाईक, पाहुणे या माणसांची सवय असणे' एक महत्वाची बाब समजली जाते, म्हणून ते एक क्वालिफिकेशन आहे.

आशुडी... +१

सुरेख प्रतिसाद....

तुमच्या मैत्रिणीच्या लग्नाला माझ्या शुभेच्छा

अरे कोणीतरी लग्न न झालेल्यांनी पण विचार त्यांचे लिहा..........

सगळेच लग्न झालेले लोक लग्न न झालेल्यावर लिहित आहे ...ते ही तावातावाने.......... Happy

Pages