खऱ्या 'ईशा'च्या लग्नाची गोष्ट

Submitted by आशूडी on 8 July, 2014 - 14:50

माझी एक मैत्रीण आहे. सुस्वरुप आहे, एकत्र कुटूंबात वाढली आहे. एल्.एल्.बी करुन पुण्यात एका चांगल्या वकीलांकडे प्रॅक्टिस करते. शिवाय स्वतः स्वतंत्रपणेही काम करते. म्हणजे अगदी आपल्या एका लग्नाची तिसरी गोष्ट मधल्या ईशासारखीच. तिचे लग्न न ठरण्यात मोठा वाटा तिच्या कार्यक्षेत्राचा आहे. कारण मुलगी 'वकील' आहे म्हणताच ऐकणार्‍याचे तोंड एवढेसे होते. मुलाची आईच असेल तर जणू आता आपल्या घरात रोजच 'जनता की अदालत' भरणार हे भविष्य दिसून तिची घाबरगुंडी उडते. मुलगी कशी आहे, काय करते, तिच्या इतर आवडी निवडी काय आहेत हे जाणून घ्यायच्या आधीच नकार दर्शवला जातो.
खरंतर पूर्वी या व्यवसायात असलेल्या स्त्रियांना हा प्रॉब्लेम आला होता का हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. पण ३-४ वर्षांपूर्वी सकाळ च्या मुक्तपीठ मध्ये अगदी हाच मुद्दा धरुन एका उपवर मुलीनेच लिहीलेला लेख प्रसिध्द झाला आणि हा प्रश्न ठळकपणे पृष्ठभागावर आला. आता त्यावर प्रतिक्रिया अशाही होत्या, की या लेखामुळे लोक अजूनच सावध झाले आणि या व्यवसायात आणखीच 'विवाहमंदी' आली.

मैत्रिणीचा मुद्दा क्र. २ असाही आहे की तिचे वडील पोलिस ऑफिसर आहेत. खरंतर ही किती अभिमानाची बाब! पण लोक भयचकित होऊन आ च वासतात! मुलगी वकील आणि वडील पोलीसात? नको रे बाबा! पण काय हरकत आहे? सीमेवर लढायला जावे तर शेजार्‍याच्या मुलाने, हे ठाऊक होते पण कायद्याचे रक्षणही करणारे परकेच कुणी असावेत? कुछ समझ मे नही आ रहा बॉस! आता दुसरी बाजू म्हणजे वकीलच मुलगा शक्यतो नको आहे कारण एकाच व्यवसायात दोघेही असले तर एकसुरीपणाची शक्यता असते. शिवाय 'फिक्स मंथली इन्कम' हा महत्त्वाचा फॅक्टर आहेच.

मुलांच्या अपेक्षा अटी बघाव्यात तर हल्ली पहिली अट ही असते की 'आयटी वाली नको!', फुल टाईम ऑक्युपाईड नको! (हो, नंतर मुलाकडे कोण बघणार ना!) शिकलेली हवी, पगाराची खास अपेक्षा नाही. मग 'वकील' असण्यात प्रॉब्लेम काय आहे? फ्लेक्सी टायमिंग आहे, सर्व सरकारी सुट्ट्या आहेत. मुख्य म्हणजे मुलीची रिलोकेट करण्याची तयारी आहे. भरपूर माणसांची सवय आहे. आणखी काय हवं? आता ही मैत्रिण जराशी बोलघेवडी आहे. पण ते तर तिच्या व्यवसायाला पूरक आहे ना? मग त्या गोष्टीकडे 'व्यावसायिक गुण' म्हणूनही सुरुवातीला नाही पाहता येत? पुढे मागे मुलाचा शांत स्वभाव असेल तर ती ही निवळेलच की. पण हल्ली होकार नकार कळवण्याची काय गणितं असतात समजतच नाही. आणि ही स्टेज येते ती फोटो, पत्रिका इ सोपस्कार झाल्यानंतरच. मग नकाराचे नेमके कारण काय असावे? खरोखर या प्रश्नाने आम्हाला हैराण केले आहे.

'एका लग्नाची तिसरी गोष्ट' मधल्या ओम आणि ईशा मुळे गेल्या काही दिवसात वकीलांना किंचित ग्लॅमर मिळालंय खरं पण त्याचा या गोष्टीसाठी कितपत फायदा होईल कुणास ठाऊक. निदान ईशासारख्या खानदानी वकील मुलीसुद्धा इतर सद्गुणी मुलींसारख्याच घरं तोडण्यासाठी नाही तर जोडण्यासाठी प्रयत्नशील असतात अशी जाणीव जरी झाली तरी दिलासा मिळेल.

तुम्हाला याविषयी काय वाटते, कुठे सुधारणेला वाव आहे याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. Happy

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वकील मुलगी म्हणजे उठसूट कायद्याचा बडगा दाखविणार, तिचे पोलिस इन्स्पेक्टर वडिल कधिही धमकी देऊ शकणार असा विचार करतात वराकडचे लोक.>>> या अश्या पूर्वग्रहदुषित विचार बाळगणार्‍यांच्या घरात संसार न केलेलाच उत्तम!

मी स्वतः गेली ११ वर्षे वकीली करत आहे. आमच्या फिल्ड्मध्ये प्रत्यक्ष वकीली करणारे म्हणजे लिटीगेशन हँडल करणारे, बिल्डर्सच्या ऑफिसमध्ये अथवा पतपेढी, बँका,हॉस्पिटल्स इ च्या पॅनलवर काम करणारे, फक्त कन्व्हियांसिंग करणारे म्हणजे नॉन लिटीगेशन वर्क करणारे आणि कॉर्पोरेट अशा ३ प्रकारची प्रॅक्टीसची विभागणी होऊ शकते.कॉर्पोरेट प्रॅक्टिस करणार्‍यांत पण परत लिटिगेशन अन नॉन-लिटिगेशन हॅंडल करणारे असे प्रकार असतात.
माझे लग्न मीच जमवले असल्यामूळे मला ह्या प्रश्नाला तोंड द्यावे लागले नाही.
पण माझ्या मैत्रिणींनी (ज्याअ‍ॅरेंज मॅरेज करणार आहेत,अथवा केली आहेत त्यांनी)बरेच नकार पचवले आहेत.फक्त त्या वकील आहेत,कोर्ट प्रॅक्टिस करतात अथवा ज्युडिशिअरीमध्ये आहेत ह्या कारणांमूळे.प्रत्येक कोर्टात अश्या बर्‍याच हुशार, सद्गुणी वकील मुली वय होउनही अविवाहित आहेत असेच दिसून येते.
त्यातल्या त्यात माझ्या ज्या मैत्रिणी नॉन-लिटिगेशन वर्क करतात त्यांची लग्न जमायला फारसा काही प्रॉब्लेम आला नाही.
मुग्धानंद आणि लंपन म्हणतात त्या कारणांबरोबरच वकील मुलगी घरात सुन म्हणून, बायको म्हणून आणली तर ती डोईजड होईल अशी भीती मुलाकडच्यांच्या मनात असते. तसेच वकील आहे म्हणजे बाकी कोणाला काही बोलुच देणार नाही घरात, स्वःताचीच मर्जी चालवेल, क्षुल्लक कारणांवरून पोलिसांत, कोर्टात खेचेल कारण त्यासाठी माहित असावी अशी सगळी कायदेशीर माहिती वकील मुलीला माहितच असेल ,सदा सर्वदा अरे ला कारे करेल अन अशी अगणित कारण आहेत.
जशी वकील मुलींची लग्न ठरताना अडचणी येतात तश्याच अडचणी वकील मुलांची लग्न ठरताना पण येतात. पण त्यातले मुख्य कारण उमेदिच्या काळात अतिशय कमी असलेले उत्पन्न आणि फायनाशिअली सेटल होण्यास लागणारा जास्त वेळ हेच असते.
मात्र वकील मुलींची लग्न मात्र ह्या कारणामूळे अडत नाहित.
<<<<<अजून एक मुद्दा म्हणजे रोजची वादावादी. मुद्दे पटवून देण्यासाठी मेल्/फिमेल कलीग्सची आवाजाची पट्टी बरीच जास्त असते. सीनिअर्सचे टँट्रम्स तर खूप भयावह वाटावे असे असतात. वाईट श्ब्दात सर्वांसमोर अपमान करणे, फाईल्सची फेकाफेकी, कागदांची फेकाफेकी ह्या गोष्टी फार वरचेवर अनुभवायला मिळतात. त्यामुळे मानसिक खच्चीकरण होतेच >>>>>>>अगदी अगदी लंपन.

धन्यवाद उजू, सविस्तर पोस्टबद्दल व इतर सर्वांनाही. म्हणजे समस्या तर आहेच. लव्ह मॆरेज नसेल तर वकील मुलामुलींचे लग्न जमण्यात अडचणी आहेत हे तर या चर्चेतून दिसून आले. वैयक्तिक पातळीवर ज्या व्यक्तीला लग्न करायचे आहे (मुलगा / मुलगी) ती काय काय प्रयत्न करू शकते? या समस्येतून स्वत:लाच कशी सोडवू शकते यावर कुणाला काही लिहायचे असेल तर प्लीज लिहा इथे.

तिने लग्न व्हावे यासाठी स्वतःत बदल करावेत का असे काही आले आहे ना वरती? तर त्यावर अजिबात नाही असे मला वाटते.
तिला स्वतःला तटस्थपणे ऑब्झर्व्ह करून एक माणूस म्हणून स्वतःमधे काही कमतरता किंवा चुका आढळल्या तर तिने जरूर बदलावे स्वतःला पण ते गाभ्यातून बदलावे. लग्न होण्यासाठी म्हणून वरवरचे बदलू नये.

असं होतं. मी साक्षीदार आहे. घरी माझ्या दिराचे लग्न ठरवण्याचे काम युद्धपातळीवर चालू असताना मी या सर्व लढ्याची केवळ मूक साक्षीदार आहे. या युद्धाचे सेनापतीपद अर्थातच माझ्या साबा निभावत असून त्यांनीही २-३ अत्यंत चांगल्या मुलींना केवळ वकिलीपेशात आहेत म्हणून नकारलं आहे. तेही पुढचं काहीच आइकून न घेता. यावरूनच मी केवळ मूक साक्षीदार राहणं पसंत का करते ते लक्षात येईल. Happy
अर्थात दिराच्या वाढत्या वयासोबत अपेक्षांचे हिमनग वितळू लागले आहेत म्हणा... Wink

हो ना नी, मुळापासूनच. आधी बोलण्याच्या टोनबद्दल लिहीले आहेच. उगाच गैरसमज होत असेल तर त्यात बदल कसा करावा?
मुग्धमानसी, हिमनग ही करेक्ट उपमा आहे लग्नाच्या अपेक्शांसाठी. Happy

वकील आहे म्हणुन केस करेलच, कायद्यात अडकवेलच हे जरा अति वाटतय म्हणा.
पण बहुद्धा पुढे नाहीच जमला स्वभाव तर काय घ्या म्हणुन अतिसावध पवित्रा घेत असतील लोकं.
अरेन्ज मॅरेज मध्येच दोन भेटीत अंदाज घेणे अवघड असल्याने असा पवित्रा येत असावा.

असो.
नशीब, मॅकेनिकल एन्जिनीअर आहे म्हणजे सगळी मशीन खोलुन जोडतच बसेल अथवा गाडीची सर्व्हीसीन्ग घरीच करेल असं लोकं समजत नाहीत. Happy

मुळात मुलीचं स्थान मुलापेक्षा दुय्यमच असावं ही मानसिकता याचं 'रूट कॉज' आहे. Happy
बाकीच्या इतर उत्तम अर्थार्जन आणि/किंवा जास्त कामाचे तास असलेल्या क्षेत्रांपेक्षा या क्षेत्रातली मुलगी स्वतःच्या ठाम विचारांची, मुद्देसूद अर्ग्युमेन्ट करू शकणारी, इतरांच्या चुकीच्या वर्तनाला जशास तसे उत्तर देऊ शकणारी अशी असणार हे उघड असल्याने पारंपरिक मानसिकतेच्या लोकांना ते झंझट वाटणारच ना...

माझी प्रामाणिक मते:
=====================

माझी एक मैत्रीण आहे. सुस्वरुप आहे, <<<

सुस्वरूप आहे ह्यातून लग्नासाठी शोभायला हरकत नाही असे सुचवायचे आहे का? तसे असल्यास का?

एकत्र कुटूंबात वाढली आहे. <<<

हे क्वॉलिफिकेशनसारखे का सांगितले जात आहे?

एल्.एल्.बी करुन पुण्यात एका चांगल्या वकीलांकडे प्रॅक्टिस करते. शिवाय स्वतः स्वतंत्रपणेही काम करते. <<<

हे मस्त वाटले वाचून!

म्हणजे अगदी आपल्या एका लग्नाची तिसरी गोष्ट मधल्या ईशासारखीच.<<<

धाग्याशी असंबद्ध विधान व उपग्रह वाहिनीवरील कथानकातील पात्राशी तुलना करणे ही फक्त 'परिचयात्मक' नोंद आहे असे जाणवले नाही, ती एक सूचक नोंद वाटली.

तिचे लग्न न ठरण्यात मोठा वाटा तिच्या कार्यक्षेत्राचा आहे. कारण मुलगी 'वकील' आहे म्हणताच ऐकणार्‍याचे तोंड एवढेसे होते. <<<

मुलगा वकील नसेल तर हे होणे आश्चर्यकारक नाही. वकील म्हणजे फक्त बडबडे असतात असा त्यामागील ग्रह नसून वकील मुलगी प्रत्येक पावलाला समानतेच्या विषयावर ठाम भूमिका घेऊन वाद उत्पन्न करत राहील हे गृहीतक आहे. सुनेने 'आवाजच करू नये' असे'च' मानणार्‍यांना फक्त हा प्रॉब्लेम वाटेल असे नव्हे तर एकुणच घरात खेळीमेळीने व समजुतदारपणे गोष्टी घडत राहाव्यात अशी अपेक्षा असणार्‍या कोणालाही असेच वाटेल. वकील हा व्यवसाय संवादकौशल्याने स्वतःचे म्हणणे खरे आहे हे सिद्ध करण्याच्या क्षमतेवर आधारीत असून उपलब्ध कायद्यांचे व पळवाटांचे ज्ञान हा त्याचा दुसरा खांब आहे. ह्या पार्श्वभूमीचा एक नवीनच माणूस आपल्या घरात मुद्दामहून आणायला कोणी का तयार व्हावे? त्या मुलीने वकीलच असलेली मुले का शोधू नयेत, वगैरे! आता ती मुलगी वकील असूनही इतर कोणत्याही मुलीइतकीच खेळीमेळीने वागेल हे मान्य होण्यासारखे असले तरीही ही परिक्षा घ्यावीच असा आग्रह मुलाकडच्यांना का केला जावा? आणि सर्वात महत्वाचे, सून सोशिकच असावी असे 'पालथा घडा' स्वरुपाचे मत मी मांडले असा विपर्यास करण्याची त्वरा करून हमरीतुमरीवर येण्याआधी मुलाकडच्यांना चॉईसच नसावा का, त्यांची पारंपारीक मते चुकीची असली तरी ती ते बदलायला इच्छुक नाही आहेत हे वास्तव स्वीकारताच येत नाही का ह्यावर मनाशी विचार करावा. नाही बदलत लोक, जसे कदाचित येथील अनेकजण स्वतः बदललेले असतील किंवा तसे फोरमवर दाखवून घरी जाऊन सोशिकपणे पसारे आवरत असतील.

मुलाची आईच असेल तर जणू आता आपल्या घरात रोजच 'जनता की अदालत' भरणार हे भविष्य दिसून तिची घाबरगुंडी उडते. मुलगी कशी आहे, काय करते, तिच्या इतर आवडी निवडी काय आहेत हे जाणून घ्यायच्या आधीच नकार दर्शवला जातो.<<<

सेम अ‍ॅज अबोव्ह!

खरंतर पूर्वी या व्यवसायात असलेल्या स्त्रियांना हा प्रॉब्लेम आला होता का हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. <<<

वकीलीच्या व्यवसायाशी सुतराम संबंध नसूनही अत्यंत कजागपणे वसावसा ओरडून घर डोक्यावर घेणार्‍या अनेक स्त्रिया माहीत आहेत. तसेच, वकील असूनही वकील नसलेल्याशी लग्न करून सुखाने स्वतःची प्रॅक्टिस करनार्‍या, नवर्‍याचा इगो मुळीच करिअरच्या आड न येणार्‍या किंवा वकील असूनही वकील नसलेल्याशी लग्न करून प्रॅक्टिस वगैरे न करता गृहिणी झालेल्याही अनेक स्त्रिया माहितीत आहेत. तेव्हा असा प्रॉब्लेम येणे हे कॉमन आहे किंवा कसे हे निरिक्षण अनावश्यक किंवा अवास्तव ठरवणारी अनेक उदाहरणे समाजात आहेत.

पण ३-४ वर्षांपूर्वी सकाळ च्या मुक्तपीठ मध्ये अगदी हाच मुद्दा धरुन एका उपवर मुलीनेच लिहीलेला लेख प्रसिध्द झाला आणि हा प्रश्न ठळकपणे पृष्ठभागावर आला. आता त्यावर प्रतिक्रिया अशाही होत्या, की या लेखामुळे लोक अजूनच सावध झाले आणि या व्यवसायात आणखीच 'विवाहमंदी' आली.<<< ह्यावर माझा पास!

मैत्रिणीचा मुद्दा क्र. २ असाही आहे की तिचे वडील पोलिस ऑफिसर आहेत. खरंतर ही किती अभिमानाची बाब! पण लोक भयचकित होऊन आ च वासतात! मुलगी वकील आणि वडील पोलीसात? नको रे बाबा! पण काय हरकत आहे? <<<

त्या मुलीची जात काय आहे हे येथे (मला) महत्वाचे वाटते. काही जातींमध्ये पोलिसखात्यातील लोकांशी विवाहसंबंध जुळवत नाहीत व त्याचे थेट कारण हे असते की पोलिस खात्यात असलेली व्यक्ती नंतर अरेरावी करेल, डोईजड होईल व त्रास देईल. हेसुद्धा वास्तव आहे. त्यांचा तोरा काही और असतो. आपण आपल्या घरात बाहेरच्या घरातून एक मुलगी सगळे काही पाहून (गोत्र, पत्रिका इत्यादी) आणायची आणि नंतर तिचे वडील किंवा भाऊ पोलिसखात्यात असल्याने येताजाता ताठा दाखवणार आणि आपण तो सहन करायचा हे कोण मान्य करेल? मान्य होवो न होवो, काही व्यवसायच मुलींच्या दुर्दैवाने असे असतात की ज्यात विवाहबंधनही समान व्यवसायामध्येच घडते. 'काही प्रमाणात' डॉक्टर मुलींनासुद्धा असा अनुभव असू शकेल पण मुलगी डॉक्टर म्हणजे मजबूत कमावणार आणि पुन्हा आजारपणात हक्काचा डॉक्टर मिळणार म्हणून मुलाकडच्यांना मोह तरी होतो. पोलिस, वकील, राजकारणी, धनाढ्य असणे, बांधकाम व्यावसायिक असणे, लष्कर अश्या अनेक व्यवसायांमध्ये सहसा विवाह त्याच क्षेत्रातील दोघांचा केला जातो ह्यामागे सांस्कृतीक व कौटुंबिक उलथापालथी घडू नयेत हा विचार असतो.

सीमेवर लढायला जावे तर शेजार्‍याच्या मुलाने, हे ठाऊक होते पण कायद्याचे रक्षणही करणारे परकेच कुणी असावेत? कुछ समझ मे नही आ रहा बॉस! <<<

कायद्याचे रक्षण?????? आणि पोलिस? कोणत्या युगातील प्रश्न आहे हा?

आता दुसरी बाजू म्हणजे वकीलच मुलगा शक्यतो नको आहे कारण एकाच व्यवसायात दोघेही असले तर एकसुरीपणाची शक्यता असते. शिवाय 'फिक्स मंथली इन्कम' हा महत्त्वाचा फॅक्टर आहेच.<<<

मुलीने आणि मुलीकडच्यांनी हा विचार तरी का करावा म्हणे मग? आपण आपली मुलगी देताना तिला पुढे फिक्स्ड इन्कमवाले घर मिळेल, वेगवेगळे व्यवसाय असले की पैसा मिळवण्याचे विविध ऑप्शन्स उपलब्ध राहतील हे जर पाहिले जाते तर असेच काहीतरी मुलाकडच्यांनी पाहू नये ही कुठली एकांगी विचारधारा?

मुलांच्या अपेक्षा अटी बघाव्यात तर हल्ली पहिली अट ही असते की 'आयटी वाली नको!', फुल टाईम ऑक्युपाईड नको! (हो, नंतर मुलाकडे कोण बघणार ना!) शिकलेली हवी, पगाराची खास अपेक्षा नाही. मग 'वकील' असण्यात प्रॉब्लेम काय आहे? फ्लेक्सी टायमिंग आहे, सर्व सरकारी सुट्ट्या आहेत. मुख्य म्हणजे मुलीची रिलोकेट करण्याची तयारी आहे. भरपूर माणसांची सवय आहे. आणखी काय हवं? <<<

ह्या पॅरामध्ये धाग्याचे स्ट्रक्चरच बिनसलेले आहे. आय टी वाली हवी / नको असणे ह्याची वकील मुलगी असणे ह्याच्याशी तुलना, शिक्षण, पगार, फ्लेक्सी टायमिंग, सुट्ट्या, रिलोकेशन, एकत्र कुटुंबाची सवय वगैरे सर्व घटक ही चर्चा हुकुमीपणे भरकटवू तर शकतातच, पण चर्चाप्रस्तावातील मूळ मुद्याशी हे सर्व घटक फारच कमकूवतपणे संबंधीत वाटले.

आता ही मैत्रिण जराशी बोलघेवडी आहे. पण ते तर तिच्या व्यवसायाला पूरक आहे ना? मग त्या गोष्टीकडे 'व्यावसायिक गुण' म्हणूनही सुरुवातीला नाही पाहता येत? पुढे मागे मुलाचा शांत स्वभाव असेल तर ती ही निवळेलच की. पण हल्ली होकार नकार कळवण्याची काय गणितं असतात समजतच नाही. आणि ही स्टेज येते ती फोटो, पत्रिका इ सोपस्कार झाल्यानंतरच. मग नकाराचे नेमके कारण काय असावे? खरोखर या प्रश्नाने आम्हाला हैराण केले आहे.<<<

आम्हाला म्हणजे कोणाला? त्यात तुम्हीही असलात तर हैरानगी व्यक्त करणे हा ह्या फोरमचा उद्देश असल्यासारखे का लिहीत आहात समजले नाही. Happy तुमच्यासारख्या सदस्याने सोल्यूशन्सही द्यायला नको होती का? Happy मुलाचा स्वभाव शांत असेल तर मुलगी निवळेल हे विधान तुमच्या मनातील आहे की त्या मुलाकडच्यांच्या की कोणाच्या? माझ्यामते ते अतिशय चुकीचे विधान आहे.

'एका लग्नाची तिसरी गोष्ट' मधल्या ओम आणि ईशा मुळे गेल्या काही दिवसात वकीलांना किंचित ग्लॅमर मिळालंय खरं पण त्याचा या गोष्टीसाठी कितपत फायदा होईल कुणास ठाऊक. निदान ईशासारख्या खानदानी वकील मुलीसुद्धा इतर सद्गुणी मुलींसारख्याच घरं तोडण्यासाठी नाही तर जोडण्यासाठी प्रयत्नशील असतात अशी जाणीव जरी झाली तरी दिलासा मिळेल.<<< ह्यावर माझा पास!

तुम्हाला याविषयी काय वाटते, कुठे सुधारणेला वाव आहे याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. <<<

१. तुम्ही हा धागा काढून नुसतीच भावनांना वाट काढून दिल्यासारखे वाटले. ह्या विषयावर तुमच्याकडून बरेच मुद्दे समाविष्ट करणारा दीर्घ लेख अपेक्षित आहे असे म्हंटले तर वावगे ठरू नये.

२. मुलाकडच्यांचे चुकले म्हणताना काही ठिकाणी तुम्ही मात्र मुलाकडच्यांच्या अपेक्षा सर्वसंमत असल्याप्रमाणेच लिहिलेले दिसत आहे.

३. मुळात हा प्रॉब्लेम एका (संख्येने) बर्‍याच मोठ्या घटकाचा आहे की नाही ह्याबाबत विशेष भाष्य (किंवा अचूक भाष्य) आढळले नाही.

४. भारत देशातील समाज नवीन तंत्रज्ञान, वेगाने वाढणारी पारदर्शकता, आंतरराष्ट्रीय दबाव, अवेअरनेस ह्या सर्वांमुळे अतिशय वेगाने बदलत आहे. परिवर्तनाचा वेग आधीपेक्षा खूप अधिक आहे. लग्नसंस्थाच अनावश्यक असण्याचे विचार समाजाला भुरळ पाडत आहेत. अश्यावेळी हे असे प्रॉब्लेम्स असलेले घटक अजून काही वर्षे आपले अस्तित्व दाखवत राहतील आणि शेवटी वेगाला आणि परिवर्तनाला शरण जातील व सत्याभिमुख होतील आणि हे सर्व आपोआप घडेल असे वाटते;

-'बेफिकीर'!

बेफी,
मुद्दे विचार करण्यासारखे आहेत.

(आँ अन मी बी ह्यच जवळ्पास लिवले होते की... )

बेफी, तुमचा सविस्तर प्रतिसाद फारच आवडला आणि पटलाही. वरचेही काही प्रतिसाद छान आहेत.

आशुडी, ती मुलगी (किंबहुना तिच्या घरचे) कोणत्या बॅकग्राउंडची मुलं बघत आहेत? ती तिच्यापेक्षा कमी शिकलेले पण कायमस्वरुपी नोकरी, महिन्याला ठराविक पगार, कामाचे कमी तास / फ्लेक्सी तास /घरुन काम अशा नोकरी/व्यवसायातली मुलं पाहत आहे का? केवळ मराठी, त्यातही स्वजातीय बघत आहे का? फक्त पुणे, मुंबई, नाशिक ची मुलं पाहत आहे का? तिचा जोडीदार निवडीत कितपत सहभाग आहे? या सगळ्या गोष्टीही नमुद करायला हव्या होत्यास.

जर ती पठडीतील मुलं पाह्त असेल तर तसंच त्या मुलांकडच्यांनीही पठडीतील मुलीची अपेक्षा केल्यास काय चुकीचे आहे? अरेंज मॅरेज मध्ये बरेचदा तावून सुलाखूनच नातं जोडलं जातं. आणि त्यातही एका एका व्यवसायाचे दिवस असतात. डॉक्टर, वकील, वकील यांचे सुवर्णदिन (फ्लेवर ऑफ द सिझन) येऊन गेलेत. सध्या कोणता व्यवसाय शिखरावर आहे माहित नाही. शिक्षक, बँका, इंजिनियर वगैरे ऑल टाईम फेवरीट असतात बहुतेक.

बेफिकीर, तुमचा अभ्यासपूर्ण प्रतिसाद चांगला आहे. प्रश्नांची उत्तरे वेळ मिळताच देईन.
मामी, मला वाटतं मी प्रतिसादात व मूळ पोस्टमध्ये आवश्यक तेवढं लिहीले आहे. ते कोणत्याही प्रकारची मुले पाहत असले तरी शेवटी या ठरावीक मुद्दयांमुळे नकारच येतो हे पुरेसे नाही का? अर्थातच होकार मिळेपर्यंत शोधाचे पॆरामीटर्स बदलावे लागणारच. त्यात काही शंका नाही.

ते कोणत्याही प्रकारची मुले पाहत असले तरी शेवटी या ठरावीक मुद्दयांमुळे नकारच येतो हे पुरेसे नाही का? >> नाही. त्या लोकांचे काही पॅरॅमीटर्स असू शकतात. अगदी पत्रिका, मुलगी वगैरे पाहून मग या कारणाने नकार दिला तरी त्यात वावगं काहीही नाही.

काही लोकं असा विचार करत असतील की जर समजा पत्रिका छानच जुळली तर बाकी गोष्टीत तडजोड करू. किंवा समजा मुलगी खुपच आवडली तर बाकी बाबींकडे दुर्लक्ष्य करू. हे अ‍ॅरेंज मॅरेजमध्ये होतेच. मुलाकडून होते तसेच मुलींकडूनही होते. शेवटी दोन्ही बाजूंचा होकार महत्त्वाचा. तो मिळेपर्यंत (माझे आजोबा म्हणत तसं घंटा वाजेपर्यंत) नकार का मिळाला याचा काथ्याकूट कितपत करायचा हे आपणच ठरवायला हवं.

लग्न जमण्याकरता तीनच पर्याय उपलब्ध आहेत. अ‍ॅरेंज मॅरेज, प्रेमात पडून मुलामुलींनी लग्न ठरवणे, मुलामुलींनी सजगपणे एकमेकांना भेटून, ओळख करून घेऊन, आवडीनिवडी जुळताहेत ना हे पाहून मग लग्न ठरवणे. तिसरा पर्याय सर्वात योग्य असला तरी तशा संधी फार कमी मिळतात. वर साथ साथ जी लिंक दिली आहे ती संस्था यात भरीव कार्य करत आहे. पण तोवर इतर दोन पर्यायच (त्यांच्या फायदा-तोट्यासकट) उपलब्ध आहेत.

मैत्रिण जशी तिचा भावी जोडीदार शोधत आहे तसंच ज्याच्याशी तिचं लग्न होणार आहे तो ही अजून त्याची बायको शोधत आहेच की. Happy

सगळी चर्चा वाचली. वकिल मुलिंची लग्न जमत नाहीत हे ऐकुन नवल नाही वाटले. कारण अजुनही आपल्या समाजात काही प्रोफेशन्स ही खास पुरुषी समजली गेली आहेत. उदा. सिव्हील इंजिनीअर, प्रॉडक्शन इंजिनीअर, एच. आर. हेड्स (मुख्यत्वे इंडस्ट्रीयल फिल्ड मधे), वकिल, सी. ए. इ.इ. माझे लग्न ठरत होते (१९ वर्षांपुर्वी) तेंव्हा मुळात कॉमर्स कडे जायचा लोकांचा कल कमी होता. कमी मार्क मिळवलेले लोक कोमर्स ला जात असत. त्यातही गेले तर बहुतेक मुली सरकारी नोकृया, बँकात नोकरी करण्यात समाधान मानत. आमच्या १९९१ च्या बी. कॉम च्या बॅच मधे ८०% मुली एल.आय.सी, बँक इकडे लागल्या. सी.ए. फक्त ३ जणी झालो. त्यातही इतर दोघी मारवाडी होत्या व दोघींच्या वडिलांच्या फर्म्स होत्या. मराठी फक्त मी. आमच्या बॅच मधे एल. एल.बी करणार्‍या फक्त दोघी होत्या मी व अजुन एक साउथ इंडियन मुलगी.... बस बाकी सगळ्या सर धोपट मार्गाने गेल्या. शाळेच्या ग्रुप चे स्नेह्संमेलन झले, मी एकमेव सी. ए.+एल.एल.बी. आणि अजुन एक मैत्रिण एल.एल.बी. बास....

मुळात आपल्या समाजात वकिल, सी,ए ही प्रोफेशन्स बायकांची मानली गेलेली नाहीत. मी आधी एल.एल.बी ला अ‍ॅडमिशन घेतली व दोन वर्ष झाल्यावर सी.ए. करायचं ठरवल. आर्थात मी सी.ए. झाल्या मुळे नोकरीच करायचं ठरवलं. पण लग्नाचं पहात असताना नोकरी नव्हती व सी.ए. चा एक ग्रुप बाकी होता. तेंव्हा मुलगी जास्त शिकलेली आहे हे उत्तर अनेकांकडुन आम्ही ऐकलं. आणि हे ही अशा समाजात/जातीत जिथे शिक्षणाला जास्त महत्व आहे. नंतर आर्थात माझ्या येवढा शिकलेला नवरा मिळाला ( आय.सी.डब्लु.ए+ सी.ए) ही गोष्ट वेगळी. तसाच दुसरा एक प्रॉब्लेम आम्हाला झाला तो म्हणजे त्यावेळेस आय टी ची बुम होती. त्यामुळे बहुतेक स्थळं ही अमेरिकेची असत. तिकडे आमचं शिक्षण कुचकामी!!!

मुळात ह्या परिवर्तनाची गरज आहे, की हीही प्रोफेशन्स स्त्रियांची असतात.

>>>अजुनही आपल्या समाजात काही प्रोफेशन्स ही खास पुरुषी समजली गेली आहेत. उदा. सिव्हील इंजिनीअर, प्रॉडक्शन इंजिनीअर, एच. आर. हेड्स (मुख्यत्वे इंडस्ट्रीयल फिल्ड मधे), वकिल, सी. ए. इ.इ<<<

आणि

>>>मुळात आपल्या समाजात वकिल, सी,ए ही प्रोफेशन्स बायकांची मानली गेलेली नाहीत<<<

ही विधाने अजिबात पटली नाहीत. आपला समाज हे सर्व काही पचवून खूप पुढे आलेला आहे.

आणि मुख्य म्हणजे तुम्ही म्हणता ती कारणे त्या विशिष्ट मुलीचा त्या विशिष्ट मुलाशी विवाह न जुळण्याची नाहीच आहेत.

>>>मुळात आपल्या समाजात वकिल, सी,ए
ही प्रोफेशन्स
बायकांची मानली गेलेली नाहीत<<<
ही विधाने अजिबात पटली नाहीत.
आपला समाज हे सर्व काही पचवून खूप पुढे
आलेला आहे.+111

मामी , बेफि पोस्ट आवडल्या

>>>मुळात आपल्या समाजात वकिल, सी,ए
ही प्रोफेशन्स
बायकांची मानली गेलेली नाहीत<<<
ही विधाने अजिबात पटली नाहीत.
आपला समाज हे सर्व काही पचवून खूप पुढे
आलेला आहे.+111

मामी , बेफि पोस्ट आवडल्या

वकिल असण्याने मुलींना नकार मिळतोय लग्नाच्या बाजारात हे या बाफमुळे कळले.
लोकांना आपले अनुभव सांगूदेत ना. लेबल लावू नका.

>>> आमच्या बॅच मधे एल. एल.बी करणार्‍या फक्त दोघी होत्या मी व अजुन एक साउथ इंडियन मुलगी.... बस बाकी सगळ्या सर धोपट मार्गाने गेल्या. शाळेच्या ग्रुप चे स्नेह्संमेलन झले, मी एकमेव सी. ए.+एल.एल.बी.<<<
हे वाक्य खटकले. सी ए किंवा एल एल बी सोडून सगळे सरधोपट हे पटले नाही. तुझ्याच वर्गातली एक मैत्रिण आता अनुवादाच्या क्षेत्रात उतरली आहे. अश्या अजूनही काहीतरी नवीन शोधत असलेल्या असतील.
खरंतर अमुक एक गोष्ट करायची असेल तर अमुक, तमुक आणि ढमुक शिक्षण घ्यायचं, कचकून अभ्यास करून त्यात चमुक पातळीच्या वर प्रावीण्य मिळवायचं. हा खरेतर आखलेला मार्ग आहे.
जिथे आपल्याला काय करायचंय, त्याचे शिक्षण उपलब्ध आहे का नाही?, असल्यास कुठे?, ते शिक्षण घेतल्यानेच एखादे काम करता येते का? महाविद्यालयीन वा तत्सम शिक्षण न घेताही काही लोक त्या क्षेत्रात आहेत, या ठिकाणी घुसायचे कसे? असे हजारो प्रश्न स्वतःपुढे ठेवत, आपली उत्तरं शोधत आपला मार्ग शोधणारी व्यक्ती ही सरधोपट मार्ग न निवडलेली व्यक्ती म्हणता येईल ना?
अश्या व्यक्तीचा प्रवास, मार्ग, शोध हा पन्नाशीतही सुरूच असू शकतो.. त्यामुळे कदाचित सांगण्यासारखे डॅझलिंग करीअर काही नसेल इतरांचे... त्यांना सरसकट सरधोपट म्हणून मोजणे नाही पटले.

अवांतराबद्दल क्षमस्व!

नीधप....

आधी मी काय लिहिले आहे ते नीट वाच.

" बी. कॉम च्या १९९१ च्या बॅच बद्दल मी बोलत होते, १९८६ च्या दहावी च्या बॅच बद्दल नाही... मी कॉलेज च्या ग्रुप बद्दल बोलते आहे, "शाळेच्या" नाही. बी.कॉम झाल्या नंतरची मनसिक ता मी लिहिली आहे. अगं तु माझ्या ज्या मैत्रिणी बद्दल म्हणते आहेस ती शाळेत होती माझ्या.... माझ्या शाळेच्या बॅच मधली व्हरायटी वाखाणण्या जोगी आहे....त्याबद्दल मला रास्त अभिमान सुध्धा आहे. त्या बद्दल मी वर उल्लेखही केलेला नाही.... मी प्रोफेशन्स निवडण्या मागची मानसिकता लिहित होते.... (ती मैत्रिण ही वरील प्रतिसाद वाचुन हसेल)

प्रत्येकाने ज्याला हवे ते शिक्षण घ्यावे ह्यात काहीच वाद नाही.... त्या बद्दल मी काहीच म्हंटलेले नाही.... मी फक्त माझ्या क्षेत्रातल्या मला जाणवलेल्या गोष्टी सांगितल्या. माझ्या शैक्षणिक काळात २० वर्षां पूर्वी काय मानसिकता होती व त्य अनुशंगाने मला आलेले अनुभव य बद्दल लिहित होते. इतर क्षेत्रे खुप महत्वाची आहेत व त्यात ढिग्भर काम केलेले व माझ्या पेक्षा खुप शिकलेले लोक सपडतिल. माझ्या स्वतः बद्दल काहीही कवि कल्पना नाहीत.

पटापट कन्क्लुजन्स नका काढु नक्की अभिप्रेत काय आहे ते समजुन घ्या.....

या समस्येतून स्वत:लाच कशी सोडवू शकते यावर कुणाला काही लिहायचे असेल तर प्लीज लिहा इथे.
>> माझे अजून दोन आणे... स्वानुभवाचे...
मुलीने तिचे वागणे सोडू नये, पण मुले निवडण्याचे नियम थोडे शिथिल किंवा बदलावे.
१. जर मुलगा सरकारी नोकरीत पाहिजे तर प्रॉव्हेटवालापण चालले असं
२. एकुलता एक असेल तर एकत्र कुटुंब असेल तरी चालेल..
३. सेंट्र्ल लाईनचा (म्हणजे घर सेंट्र्ल लाईनला) असावे मग हार्बर पण चालेल (नाही कळलं तर कोणत्याही मुंबईकराला विचारा)
वगैरे

सर्वसाधारणपणे लग्नाळु मुलामुलीने मुलीमुलात काय पाहिजे बघण्यापेक्षा काय कमीत कमी नसावे,ते बघावे म्हणजे सहा महिन्यात लग्न जमते...याच्यापेक्षा चांगल स्थळ मिळेल या स्वप्नात राहू नये.. वधूवरसूचक मंडळात मी बघितले आहे सगळ्यांना स्वतपेक्षा सरस स्थळ पाहिजे असते...

मुळात आपल्या समाजात वकिल, सी,ए ही प्रोफेशन्स बायकांची मानली गेलेली नाहीत. >>> असहमत. कित्येक मुली LLB, LLM, CA आहेत.

>>>वकिल असण्याने मुलींना नकार मिळतोय लग्नाच्या बाजारात हे या बाफमुळे कळले.
लोकांना आपले अनुभव सांगूदेत ना. लेबल लावू नका. <<<

नीधप, कृपया तुमचे हे विधान मला अधिक स्पष्ट करून सांगता का? मला ते खरेच समजलेले नाही आहे आणि मला प्रामाणिकपणे हेही समजलेले नाही आहे की ते मला उद्देशून आहे की 'मोहन की मीरा' ह्यांना! धन्यवाद!

राजू७६ - माफ करा, पण......

>>>मुलीने तिचे वागणे सोडू नये, पण मुले निवडण्याचे नियम थोडे शिथिल किंवा बदलावे.<<<

हे विधान दोन परस्परविरोधी मुद्दे असलेले वाटले.

आशूडी,

हा लेख तुम्ही लिहिला आहेत हे समहाऊ पटत नाही आहे. कृपया ह्याचा अर्थ असा घ्यावात की तुमच्या ह्या विषयावरील लेखनाकडून ज्या अपेक्षा होत्या त्यात विषयावरील फोकस, अश्या बाबींचे परिणाम, कारणमीमांसा, उपाययोजना ह्या बाबींचा समावेश आवश्यक वाटत होता. कृपया हा अभिप्राय व्यक्तीगत नाही ह्याची नोंद घ्यावीत.

Happy

नीधप...

तु कचकुन आभ्यासा बद्दल म्हंटलस तर माझ्या त्या मैत्रिणी ने कदाचित माझ्या पेक्षा कचकुन आभ्यास केला असेल कारण तिचं मूळ शिक्षण वेगळ्याच क्षेत्रात आहे आणि तेही अगदी डिमांडिंग क्षेत्रातलं.... आता तिने ट्रॅक बदलला. तो सर्वस्वी वेगळा विषय आहे. त्याचा आणि ह्या प्र्तिसादाचा काहीच संबंध नाही.... तसा तर ट्रॅक मी ही बदललाच की....

मी कॉमर्स मधल्या वेगळ्या वाटा ज्या २५ वर्षांपुर्वी मराठी समाजाला नविन होत्या त्या बद्दलच्या माझ्या अनुभवाम बद्दल लिहिले. आमच्या कॉलेज मधे एक मुलगी जी मेरीट मधे आली होती १०वीला, तिचा पहिल्या दिवशीच्या ओरिएंटेशन च्या दिवशी सत्कार केला. येवढी मानसिकता वीक होती. मी जेंव्हा कॉमस करायचं ठरवलं तेंव्हा माझ्या घरातिल इतर नातेवाईकानी "भिकेचे डोहाळे" म्हणुन त्या कडे पाहिलं. माझ्या एका डॉक्टर चुलत बहिणीने मला सगळ्यांसमोर विचारले होते" आता आई सारखी क्लार्क होणार का?" ह्या गोष्टी बद्दल मी म्हणते आहे.

आता या क्षेत्रांना ग्लॅमर येत आहे. मी माझा अनुभव शेअर केला.....

तिचं मूळ शिक्षण वेगळ्याच क्षेत्रात आहे आणि तेही अगदी डिमांडिंग क्षेत्रातलं..<<<

कोणतं क्षेत्र असं आहे जे फारसं डिमांडिंग नाही? Happy

मामी

वर मुग्धानेही लिहिले आहे. आजही प्रॅक्टीस करणारी वकिल मुलगी ही मानसिकता समाजात अ‍ॅक्सेप्ट केलेली नाही. नोकरी करनार्‍या वकिल चालतात.

मी परत सांगते मी "प्रोफेशन" बद्दल म्हणते आहे. "शिक्षणा" बद्दल नाही. वकिल एक प्रॅक्टीस , सी.ए. एक प्रॅक्टीस म्हणुन बायकंनी करणे ह्याच्या अ‍ॅक्सेप्टन्स बद्दल म्हणते आहे. नोकरी ला कोणालाच प्रॉब्लेम नाही. शिक्षण म्हणुन ठीक आहे.... पण सनद घ्यायची, म्हणजे अजुनही मुली बिचकतात.

मुली बिचकणे व भावी सासरचे बिचकणे ह्यात फरक आहे. सदर धाग्यात मुलगी बिचकलेली नसून सासरचे बिचकलेले आहेत.

Pages