Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29
झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्वस्ति....निर्लज्जपणे
स्वस्ति....निर्लज्जपणे लाजणे....अफलातून....मज्जा आली वाचताना....
जाम शोधला , पण तो एपिसोड परत
जाम शोधला , पण तो एपिसोड परत तुनळीवर सहज नाही मिळाला .
नाहितर फोटो डकवूनच दाखवली असती एक्स्प्रेश्न्स !
"निर्लज्जपणे लाजणे.. " या वाक्प्रयोगाला पर्याय नाही हे कळल असत
त्या बाबाजींनी आता ते गुबु
त्या बाबाजींनी आता ते गुबु गुबु गुबु जे काय सुरु केलयं, ते मला खुप आवडते.
ते ऐकले की खुप हसायला येते.
काळ काय झाले ?
काळ काय झाले ?
कालही काहीही झाले नाही
कालही काहीही झाले नाही
गुबु गुबु की बुगु बुगु??
गुबु गुबु की बुगु बुगु??
आदे आणि मेदे ची आजून एक रात्र
आदे आणि मेदे ची आजून एक रात्र वाया गेली. रिझल्टच्या टेन्शनने मेघना घाबरीघुबरी झाली.
गुबु गुबु च रे झकास आज नाना
गुबु गुबु च रे झकास
आज नाना बाबाजीला चांगलच सुनावणार आहेत
ओह्ह हा.. ते बुगु बुगु बुगु
ओह्ह हा.. ते बुगु बुगु बुगु अहे.
आदे आणि मेदे ची आजून एक रात्र
आदे आणि मेदे ची आजून एक रात्र वाया गेली >>> ही लोक मागे फिरायला गेली होती ना ? मग तिथे काय केल ?
की तेन्व्हा निर्णय व्हायचा होता???
ही मेदे खरच कर्माने मरणार
दोघेही "आज की रात मुड" मध्ये
दोघेही "आज की रात मुड" मध्ये आहेत तर बाकीचे त्यात व्यत्यय आणत आहेत.
काल त्या हिरॉइनने चक्क एक लॉजिकल प्रश्न विचारला तिच्या बाबाना.
बाबाजी प्रकरण अवघड आहे एकुणातच.
बा द वे, मुल नको असेल तर त्यानां सोबत राहु न देणे हा एकच उपाय आहे अस का वाटत बाबाजीना??
ही मेदे खरच कर्माने मरणार
ही मेदे खरच कर्माने मरणार >>>>>> कर्माने की कर्म न करता??
बुगु बुगु ना
कर्माने की कर्म न करता??
कर्माने की कर्म न करता?? >>>>
चिम्स, यु टु
ही मालिकाही आता कैच्याकै
ही मालिकाही आता कैच्याकै वळणावर जाणार बहुतेक. नवीन सुरुवात वगैरे.
बाबाजींच्या विरोधाला न जुमानता पारणं सोडलं जाणार, मग आदेच्या जीवावर बेतणार ( कायमचं की काही वर्षांनी परत एंट्री करण्याच्या शक्यतेवर हे बघायला हवं ) आणि तसं ते बेतल्यावर राक्षस नातवंडाची चाहूल लागणार
रीया, तुझा गेस टाक
मी मध्ये काही मिस केलं का?
मी मध्ये काही मिस केलं का? आधीतर बाबाजी एका वर्षात मुल हव म्हणुन मेदे, आदे आणि देसाई कुटुंबियांच्या मागे लागले होते. त्यावेळी नानांनी त्यांना ज्ञानामृत देखिल पाजले होते. त्याचा परिणाम झाला का? मग आता अचानक एकदम बाबाजींचा विरोध का?
अगो
अगो
ही मेदे खरच कर्माने मरणार
ही मेदे खरच कर्माने मरणार >>>>>> कर्माने की कर्म न करता?? >>>>>> चिमुरी
अगो , क्रम चुकला का?
बाबाजींच्या विरोधाला न जुमानता पारणं सोडलं जाणार, मग राक्षस नातवंडाची चाहूल लागणार आणि मग आदेच्या जीवावर बेतणार .
त्याशिवाय त्याला राक्षस का म्हाणाव ?
सारिका, बाबाजींना स्मृतीभ्रंश
सारिका, बाबाजींना स्मृतीभ्रंश झाला असेल.
स्वस्ति, पारणं पहिलं हे नक्की
नंतरचे दोन कुठल्याही क्रमाने येऊ शकतात. चाहूल नंतर लागली तर आदित्यची निशाणी टाईप शोकांतिका फुटेज जास्त आणि आधी लागली तर आत्ताचा हलकाफुलका मोड अजून ताणता येईल. बाबाजींपासून सुटका नाही !
दुसर्या धाग्यावरचा गेस चुकला. आता स्मृतीभ्रंश वापरुन झालेला असल्यामुळे तो रिपीट होणार नाही अशी आशा आहे.
अगो, मालिका आणि त्याच्य
अगो, मालिका आणि त्याच्य अजाहीराती यातलं काहीच डोळ्यांवर पडत नाहीये सध्या
आज बघुन सांगते
मी चुकून २००० लिहिले
मी चुकून २००० लिहिले
मागे मेघना की जानव्ही यापैकी
मागे मेघना की जानव्ही यापैकी कोणी तरी एक निवडण्यास सांगितले होते आता आदित्य कि श्रीरंग यापैकी एक कोण पसंतीस उतरेल ते बघुया ?( माझ मत अर्थातच आदित्य ला !)
माझे पण मत आदित्यला... :*
माझे पण मत आदित्यला...
:*
आर्चुच्या घराला बहुतेक किचनच
आर्चुच्या घराला बहुतेक किचनच नाही ये वाट्त कारण ती तर सारखि खालीच हादड्ताना दिसते!!!
हो बघाव तेव्हा जेवणापासुन
हो बघाव तेव्हा जेवणापासुन खालीच असते ती अर्ची........ माझ्या आईने मला हाकलुन दिली असती .....अस फुकट जेवुन वर सल्ले देणे, उखाळ्या पाखाळ्या काढणे असे प्रकार केले असते तर......
बादवे काल काय झालं? कोणी ४ ओळीत सांगेल का??? ३ ओळीत ही चालेल
काल बाबाजीच्या भक्ताला जबरी
काल बाबाजीच्या भक्ताला जबरी झाप पडली आदेच्या वडिलांकडून! दहा हजार जप करायचा होता त्याला त्यांच्या घरात बसून! दिला हाकलून त्याला आदेच्या वडिलांनी! आदेची आई मेदेच्या आईला 'बायकांची मने बायकांनाच समजतात' असे एक वाक्य बोलली. इतके बिनडोक विधान गेल्या शतकात ऐकण्यात आलेले नव्हते.
पेटिकोटमध्ये सत्यवादित्वाचा वारा घुसावा तशी उंच उंच उडत मेदे आता गर्जू लागली आहे की वर्षभर तिने भलत्याच आदित्यच्या प्रेमामुळे ह्या आदित्यला चार हात दूर ठेवल्याचे सगळ्यांना सांगणार! आधीच कुचंबणा झालेला आदे त्यामुळे दुष्काळातील बेडकासारखा गपगार झालेला आहे.
थँक्स बेफी... म्हणजे काल न
थँक्स बेफी...
म्हणजे काल न पाहील्यामुळे तसं फारसं बिघडलं नाही...पण मला बाबाजीच्या थोबाडावरचे एक्सप्रेशन्स बघायला आवडलं असतं.... ते मिस केलं
बेफि , पोस्ट लिहीण्यापुर्वी
बेफि , पोस्ट लिहीण्यापुर्वी ऑफीसात वाचू नये असं डिस्क्लेमर लिहीणार का प्लीज! वरची पोस्ट वाचून फुटले मी!
ऑर्किड, प्रत्यक्ष बघताना
ऑर्किड,
प्रत्यक्ष बघताना माणसाचे काय होत असेल विचार करा.
आदेची आई मेदेच्या आईला
आदेची आई मेदेच्या आईला 'बायकांची मने बायकांनाच समजतात' असे एक वाक्य बोलली. इतके बिनडोक विधान गेल्या शतकात ऐकण्यात आलेले नव्हते.>> हवेत तेवढे मोदक घ्या या एका लाख वाक्यासाठी बेफी....
बेफी प्लीजच अपडेट्स देत राहा... वेळात वेळ काढून... नवरा उचकतो मेदेचं तोंड जरी दिसलं टिव्ही स्क्रीन वर तरी... (बरं झालं आधी कितीक कौतुकाची निरांजने ववाळून झालेली... दिसते कित्त्ती छान, हसते कित्त्ती छान... छान छान छान.... मेदेने जसे आपले एकेक रंग नक्षीदार पँडोरा पेटार्यातून बाहेर काढायला सुरुवात केल्यावर बिथरला...
)
बिथरला<<<
बिथरला<<<
Pages