Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
इब्लिस, नमस्कार कशाला
इब्लिस, नमस्कार कशाला सांगायचा? ज्या लेव्हलसाठी आणि ज्या विषयांतर्गत ते शिकवलं गेलं तिथे ते सांगितलं जायला हवंच होतं. त्या पातळीवर शिकवणारे बहुतेक सगळे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे तज्ज्ञ होते (निदान आमच्या सुदैवात) आणि नसले तरी त्यांना हे बेसिक ज्ञान असणे आवश्यकच असते.
अर्थातच ते शिक्षक मला वंदनीयच आहेत्/होते
नारा म्हणजे वेदामधे पाणी,
नारा म्हणजे वेदामधे पाणी, खरंतर आदिम जल (प्रायमॉर्डिअल वॉटर्स) ज्यात ब्रह्म 'रहाते'...<<< म्हणजे पाण्यामध्ये सृष्टीची व्यूत्पत्ती आहे असं म्हणणं आहे जे योग्य आहे.
आयन म्हणजे प्रवास ना?
विष्णू हा ऋग्वेदात सौरदेव आहे<< विष्णू असं नाव म्हणजे वेदामध्ये या नावनिशी उल्लेख आहे का? की विष्णू हे नाव पुराणात पहिल्यांदा उद्दृत झालेलं असावं/आहे?
वरदा, माहितीसाठी धन्यवाद.
वरदा, माहितीसाठी धन्यवाद.
ह्या पाठची कथा : मधुकैटभ
ह्या पाठची कथा : मधुकैटभ महाविष्णूंना अट घालतात की जिथे प्रलय-आप नाही तिथे तू आम्हाला मारु शकतोस. प्रलयानंतरची सृष्टी अजून बनलेली नसते आणि सर्वत्र फक्त 'आप'च असते. अशुभ वृत्तींना सर्वत्र असणारे ब्रह्म जाणवू शकत नसल्यामुळे ते 'आप' द्रव्याला जल समजत असतात. त्याच क्षणी आदिमाता 'महाकाली' (महिषासुरमर्दिनीचा पहिला अवतार, जो सृष्टीनिर्मितीच्याही आधी झाला) खरोखर 'जल' उत्पन्न करण्याची शक्ती महाविष्णूस देते आणि हे जल कधीच महाविष्णूच्या नाभीपर्यंत येऊन पोहोचणार नाही असा वर देते. मग महाविष्णू ताबडतोब दोन्ही असुरांना आपल्या कटीवर घेऊन 'चक्रा'ने मारुन टाकतो.
नार = विश्वाचे मूलतत्व असणार्या ब्रह्मतत्वाचे प्रत्येक प्रकट स्वरुप. आणि आता ते 'जल' रुपाने प्रकटले म्हणून नार = जल. ह्या 'आप' म्हणजेच जलाची निर्मिती-स्थिती आणि पुनर्निमिती हे चक्र (ऋतुचक्र) आदिमातेने महाविष्णूच्या अमलाखाली दिले म्हणून महाविष्णूचे 'नारायण' हे एक नाम आहे.
स्वारी.
स्वारी.
'आप' द्रव्याला जल << जल चा
'आप' द्रव्याला जल << जल चा समानार्थी शब्द म्हणून आजवर आप लिहीला.जर आप आणि जल वेगळंवेगळं तर मग जल म्हणजे नार म्हणजे एक्झॅक्टली काय? दोन्हीत फरक काय?
विज्ञानदास, ऋग्वेदात विष्णू
विज्ञानदास, ऋग्वेदात विष्णू अशीच देवता आहे. महत्वाची नसलेली देवता आहे. केवळ ५ सूक्ते या देवतेबद्दल आढळतात.
इब्लिस, कृपा करून इथे विनोद म्हणूनही राजकारण नका ना आणू.
विज्ञानदास, मलाही नीटसं
विज्ञानदास, मलाही नीटसं सांगता येणार नाही. पण 'नार' हे ब्रह्मतत्वाचं प्रकट स्वरुप आहे तसं आप हे अप्रकट स्वरुप असावं. सृष्टीनिर्मिती ते प्रलय ह्यामध्ये जल, वायु, अग्नी, आकाश, पृथ्वी (क्रम चुकीचा असू शकतो) ही प्रकट स्वरुपे. प्रलय ते पुनःसृष्टीनिर्मिती ह्यामध्ये जो विलयकाळ आहे त्यात ते द्रव्य 'आप' असावे.
असंच, निर्गुण निराकाराच्या अस्पंद अवस्थेला 'अदिति' नाव आहे आणि तेच जेव्हा विश्वउत्पत्तीसाठी पहिला स्पंद होतो तेव्हा त्या शक्तीला 'गायत्री' नाव आहे. दोन्ही एकच पण अवस्था वेगळी.
वेदापेक्षा विष्णू पुराणात
वेदापेक्षा विष्णू पुराणात व्यक्त झालेली किंवा मुख्य रुप दाखवलेली देवता आहे म्हणता येते.

उत्तरांसाठी दोघींचेही आभार..पूरक माहीती... अजून एक शंका आहे पण गरज भासल्यास विचारेन नंतर विपूत वगैरे...इथे आवांतर होईल.
आपले पूर्वज फारच पोचलेले लोकं होते... जवळपास सगळंच कसं स्पष्ट किंवा कधी कोड्यातल्यासारखं लिहून ठेवलंय
१) लोक बरोबर की लोकं? २)
१) लोक बरोबर की लोकं?
२) शुभेच्छुक हा शब्द हल्ली बराच वापरला जातो. तो योग्य आहे?
अश्विनी के आणि वरदा, तुमच्या
अश्विनी के आणि वरदा, तुमच्या माहितीपूर्ण संदेशांबद्दल आभार!
नारायण म्हणजे नार चं अयन. तर हे कसं घडतं? वरदा, तुम्ही उद्यापरवापर्यंत विचारून लिहिणार आहात ते झालंच. पण धीर धरवत नाही.
आ.न.,
-गा.पै.
वरदा, माहितीबद्दल धन्यवाद. ३३
वरदा, माहितीबद्दल धन्यवाद.
३३ कोटी (प्रकार) देवांमध्ये १२ आदित्य आहेत - सविता, त्वष्टा, विष्णू, पूषा, विवस्वान, भग, अंश, वरुण, शक्र, अर्यमा, धाता, मित्र.
यातल्या इतर आदित्यांबद्दल पण लिहीशील का जमले तर?
<शुभेच्छुक हा शब्द हल्ली बराच
<शुभेच्छुक हा शब्द हल्ली बराच वापरला जातो. तो योग्य आहे?>
हा 'तयार केलेला' शब्द आहे. व्याकरणाचा त्याला आधार नाही, पण तो सर्वत्र वापरला जातो.
<लोक बरोबर की लोकं?>
लोक.
तसंच हल्ली जिकडे तिकडे
तसंच हल्ली जिकडे तिकडे 'करुयात', 'घालुयात', 'म्हणूयात' असं म्हटलं जातं. करुया, घालूया, म्हणूया असं का म्हणत नाहीत?
धन्यवाद चिनूक्स प्रतिसादक हा
धन्यवाद चिनूक्स
प्रतिसादक हा शब्द योग्य आहे का? प्रतिसादक योग्य शब्द नसल्यास पर्यायी योग्य शब्द कोणता?
प्रतिसाददाता?
उत्तट म्हणजे काय?
उत्तट म्हणजे काय?
नंदिनी, उत्तट म्हणजे काय
नंदिनी,
उत्तट म्हणजे काय माहिती नाही, पण बोरकरांच्या एका कवितेत 'उतट' बघुनि हरिकरुणा असा उल्लेख आहे.
तिथे उतट म्हणजे उत्कट असा अर्थ दिलाय.
नाही उत्तट असाच शब्द आहे. कडा
नाही उत्तट असाच शब्द आहे. कडा अथवा कपारीशी संबंधित आहे.
एच सी राजगोपालाचारी यांच्या
एच सी राजगोपालाचारी यांच्या थिअरीप्रमाणे ख्रिस्तपूर्व पहील्या शतकात यमुनातीरी क्षत्रप राजुस्वला (उच्चार चुकीचा असू शकेल) - चतुर्थ, याच्या कार्यकाळात आणि प्रभावात नारायण (स्वामी?) उर्फ वासुदेव नामक कुणा व्यक्तीचा पंथ जोर धरू पाहत होता. या नारायणपंथाची लागण सर्वत्र झाली होती. पण सांस्क्रुतिक इतिहासाचे लेखक असे सांगतात की वासुदेव हा आधी होऊन गेला. नारायण नंतर झाला. नारायणाने वासुदेवाला सर्वोच्च (देव) मानले. काहींच्या मते नारायणाचा स्तुतीपाठक नारद हा स्वामी होता.
द वंडर दॅट वॉज इंडीया या ग्रंथात पहील्या शतकात नारायण पंथ गिळंकृत करून तो विष्णूचाच अवतार असल्याचे सांगण्यात आले असा उल्लेख आहे. डिस्कव्हरी ऑफ इंडीया या पंडीत जवाहरलाल नेहरुंच्या ग्रंथात देखील असेच उल्लेख आढळतात. (या ग्रंथांमधे जे संदर्भ दिलेले आहेत त्यातले भांडारकर, मुजुमदार इ. हे मान्यवर होत).
समुद्रगुप्ताच्या काळात उपनिषदे, पुराणांचे लिखाण झाले हे लक्षात घेतलं तर पुराणांमधे विष्णूचे नाव नारायण म्हणून येणे आणि वरील दोन थिअरींचा काळ यातला योगायोग महत्वाचा वाटतो.
संदर्भ
कृष्णा - कल्ट इन इंडीयन आर्ट - एस के भट्टाचार्य, एम डी पब्लिकेशन्स , नवी दिल्ली.
उत्तट - किनार्यावरून
उत्तट - किनार्यावरून वाहणारे, म्हणजे किनारा ओलांडून वाहणारे.
शब्द देताना असल्यास त्याचा एक
शब्द देताना असल्यास त्याचा एक किंवा दोन वाक्यात समावेश असलेला संदर्भ दिल्यास शोधायला कळयला सोपे पडते.तेव्हा कृपया संदर्भ द्या.सगळेच विचारणारे.
निक्षेप म्हणजे काय ? जसं की
निक्षेप म्हणजे काय ? जसं की वास्तुपुरुष निक्षेप.
निक्षेप करणेचा अर्थ स्थापन
निक्षेप करणेचा अर्थ स्थापन करणे, ठेवणे. वास्तुपुरुष निक्षेप म्हणजे वास्तुपुरुषाची प्रतिमा जमिनीखाली स्थापन करतात तसा असावा.
मला वाटते निक्षेप म्हणजे
मला वाटते निक्षेप म्हणजे प्रेसिपिटेट .विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकात हाच शब्द आहे. म्हनजे तळाला येऊन बसणारा . साचणारा. त्यानुसार अश्विनीने दिलेला अर्थही लागत आहे....
धन्यवाद अके , रॉबीनहुड !
धन्यवाद अके , रॉबीनहुड !
नारा आणि नीर यात काही संबंध
नारा आणि नीर यात काही संबंध असू शकतो का?
नीर हा शब्द (saMskRutamadhye)तमीळ तनीर वरून आला असेही वाचलेले आहे. बहुतेक सर्व दक्षिणभारतीय भाषांत पाण्याला तनीर, नीर, नीरु म्हणतात असे वाटते. कोंकणीत उदक, मराठी-हिंदीत पानी/पाणी म्हणतात. जल हा शब्द सहसा बोलचालीच्या भाषेत वापरला जात नाही. त्याचा तद्भव शब्दही नाही. (मराठीत जळ आहे पण तो काव्यापुरता मर्यादित असावा. रोजच्या व्यवहारात वापरीत नसावेत.) यावरून जल हे साध्या पाण्यापेक्षा वेगळे, उच्चतर, पवित्र असे काहीतरी द्रव्य असावे का? जसे गङ्गाजल,यमुनाजल वगैरे. आणि पूजामंत्रातसुद्धा 'उदक' शब्द जास्त येतो.
-(उगीचच एक तर्कट सुचतेय. हे हेवी वॉटर-जड पाण्यासारखे काहीतरी असावे का?) तसे पाण्याला अनेक समानार्थी शब्द अमरकोशात आहेत पण संस्कृतमध्ये देखील प्रत्यक्ष वापरात कमी आहेत.
नीर हा संस्कृत शब्द आहे.
नीर हा संस्कृत शब्द आहे.
संस्कृतमध्ये तमिळभाषेमधून
संस्कृतमध्ये तमिळभाषेमधून आलेला शब्द ?
जाणकारानी कृपया प्रकाश टाकावा.
कुठून कुठे गेलाय माहित नाही.
कुठून कुठे गेलाय माहित नाही. पण तमिळमध्ये तन्नीर, कानडीमध्ये नीर हे दोन शब्न्द रोजच्या वापरातले आहेत.
बागुलबुवा, संस्कृत आणि तमिळमध्ये खूपसे शब्द सारखे सापडतात. मला तर मराठी-तमिळ असेपण सारखे शब्द सापडलेत. मी तमिळ शिकताना कानडी आणी मराठीच्या आसपास जाणारे शब्द नोट करून ठेवते.
तमिळ संस्कृतोद्भव आहे ना?
तमिळ संस्कृतोद्भव आहे ना?
Pages