युक्ती सुचवा युक्ती सांगा- ४

Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36

स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.

याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिपाली, सर्व पिकलेल्या आंब्यांचा रस काढून नेहमीप्रमाणे चवीला मीठ, साखर, मीरपूड घालून घुसळून घट्ट झाकणाच्या कोरड्या डब्यात घालून डीप फ्रिजमधे ठेवा. लागेल तसा वापरा. मुंबईच्या हवेला दोन महिने आरामात राहतो. माझ्या फ्रिजरमधे एक पायरीचा आणि एक हापूसचा असे दोन डबे विराजमान झालेले आहेत.

इथे उसगावात शेझवान सॉस कुठल्या कंपनीचे चांगले मिळते ? आणि नुडल्स पण कुठून घेऊ ? इतके ब्रांड असतात कि कन्फ्युज्ड आहे .

Please somebody guide me..how to write in marathi here..I m new and want to write in marathi. The option with marathi tab is taking too much time for me..

हिम्सकूल Happy

पराठे (वेगवेगळ्या भाज्या, डाळ, पनीर इ. सारण घालून किंवा ओवा-मीठ घालून) व चटणी
फ्रँकी
दलिया उपमा/ खीर
रव्याचा उपमा / सांजा/ शिरा
सँडविचेस
इडली चटणी / फोडणीची इडली / कांचीपुरम् इडली / हांडवो इत्यादी.
ब्रेडचा चिवडा, पोळीचा चिवडा इ.

केळपुऱ्या, बनाना ब्रेड, तिखटाचे किंवा गोडाचे आप्पे (माबोवर आहेत अनेक पाकृ), सांज्याची पोळी
मखाण्यांचा चिवडा
पॅटिस / टिक्की / कटलेट
कोरडी भेळ
सोनकेळी / इलायची केळी, सफरचंद, पेअर, पेरू, संत्रे यांसारखी फळे, मोड आलेले मूग तिखट मीठ मसाला लावून, स्वीट कॉर्न दाणे - उकडून / तसेच,
उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा, चणे फुटाणे, मनुका, सुके अंजीर, चिक्की.

दोन वर्शापुर्विचे आम्ब्याचे लोणचे उरले आहे. तेल टाकुन सम्पवण्याचा प्रयत्न केला. पण काही केल्या खपत नाहीए. फेकवत नाही. काय करता येइल?

पालक पनीर, मटर पनीर, पनीर माखनी करून संपवता येईल. फार कशाला रोजच्या कांदा बटाटा फ्लॉवर कुठल्याही भाजीत घालता येईल, वाईट कशाला लागेल? Happy पस्ताचा सॉस क्रीमी करण्यासाठी पण वापरता येईल.

एक मोठी पेंढी मस्त ऑरगॅनिक बेसील आहे. एका कलिगने तिच्या बागेतली दिलीय. गेले ३ दिवस पेस्टो पास्ता आणि बेसिल+मोझोरेला सँडविच करून झालेय. पण अजून बरीच आहे. सध्या भरपूर ऊन आहे. त्यामुळे उन्हात वाळवून ठेवू शकते पण अजून काही करता येइल का?

बेसिल फ्राईड राईस. नेहमी सारखाच फ्राईड राईस पण भ्रपुर लसुण आणि भरपुर (१ पेंढीपण चालते) बेसिल घालुन.

Dhanashree u can freeze pesto. freeze it in ice cube trअy. Just plane basil paste also freezes really well.

Pages