Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36
स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.
याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बेसि ल चिकन पण मस्त बनते.
बेसि ल चिकन पण मस्त बनते.
मला मदत हवी आहे.---माझे बेसन
मला मदत हवी आहे.---माझे बेसन लाडु करुन झाले. खाल्यावर लक्षात आले कि बेसन अजुन भाजायला पाहेजे होते. आता साखर घातल्यावर पुन्हा भाजुही शकत नाही. आता काय करु त्या लाडवाचे? लाडु पुन्हा फोडुन ते मिश्रण डब्यात घालुन कुकर मधे ठेउन एक वाफ काढली तर बेसन शिजेल का? बेसन थोडेच कच्च वाटते.
दुधात शिजवून खीर करू
दुधात शिजवून खीर करू शकता.
किंवा नावडत्या पाहुण्यांना आग्रहाने खायला घालून संपवा.
मला पण एक प्रश्न होता. मला
मला पण एक प्रश्न होता. मला कुळथाचं पीठ करायचं आहे. कुळीथ्/हुलगे आहेत घरी. ते मिक्सरमधून काढण्याआधी धुउन वाळवून भाजून घ्यायचे असतात का?
धुवून वाळवायचे असणारच नक्कीच.
धुवून वाळवायचे असणारच नक्कीच. भाजायचे की नाही ते हायर अथॉरिटीला विचारून सांगू शकेन.
ओक्के. विचारा तुम्ही करतो
ओक्के. विचारा तुम्ही करतो आम्ही.
कुळीथ्/हुलगे हे गिरणीत देतात
कुळीथ्/हुलगे हे गिरणीत देतात पीठ करायचं असल्यावर. धुवायची गरज नसते. जाणकार सांगतीलच
स्वच्छ निवडलेले हुलगे तसेच न
स्वच्छ निवडलेले हुलगे तसेच न भाजता पीठ करायचं.
आम्ही कुळीथ भाजुन घेतो मग
आम्ही कुळीथ भाजुन घेतो मग त्याचे पीठ करतो...पीठी करताना वेगळे भाजावे लागत नाहीत
कुळीथ भाजुन मग त्याचे पीठ
कुळीथ भाजुन मग त्याचे पीठ करतात (असे ऐकले आहे). खुप चांगले भाजावे लागते म्हणे.
आम्ही तयार आणतो, सो घरी कधी नाही केलेय.
कुळीथ आहे तर त्याची उसळ करा...
हो मोनाली ते नीट भाजावे
हो मोनाली ते नीट भाजावे लागते...
कुळीथ आधी भाजायचे मग ते
कुळीथ आधी भाजायचे मग ते जात्यावर हलकेच भरडायचे म्हणजे साल मोकळी होतात. मग साल वेगळी करण्यासाठी पाखडायचे. म्हणजे स्वच्छ साल विरहीत डाळ मिळते. मग ती डाळ गिरणीत द्यायची दळायला. अशा तर्हेने केलेले पीठ सुंदर लगते चवीला आणि पिवळसर दिसते रंगाला. साल काढली की काळपट पणा येत नाही पिठाला. पण परदेशात किंवा शहरात एवढे शक्य नाही करणे एवढ्याशा पीठासाठी.
आम्हाला ही असे पीठ तयार मिळते गावाहुन. पण तिकडे मदतनीस बायका असतात आणि प्रमाण ही जास्त असते म्हणूनच शक्य होते.
मी भाजायचे ठरवले आहेत कुळीथ
मी भाजायचे ठरवले आहेत कुळीथ पीठ करण्यापूर्वी पण धुवायचे वाळवायचे का?
धुवायचे नाहीत. मस्तं वास
धुवायचे नाहीत.
मस्तं वास सुटेपर्यंत भाजायचे. करपवायचे नाहीत.
मग थंड करायचे.
मग दळायचे.
लहानपणी आम्ही जात्यावर दळायचो.
कुळथाचं आमसूल घालून केलेलं पीठलं आणि भात हे कंफर्ट फूड आहे माझ्यासाठी.
धन्यवाद साती.. आणि बाकी
धन्यवाद साती.. आणि बाकी सर्वजणी.
शूम्पी, धुवुन वाळवायची गरज
शूम्पी, धुवुन वाळवायची गरज नाही, पण चांगले भाजावेत कुळीथ आणि जमेल तेवढी जास्तीत जास्त साल काढून टाकून मग पीठ करावे.
मी कुळथाची पीठी चिंचेचा कोळ
मी कुळथाची पीठी चिंचेचा कोळ घालुन करते
मी कधी कुळीथ बघितले नाही ...
मी कधी कुळीथ बघितले नाही ... इंग्रजी मध्ये काय म्हणतात? इकडे कुठे मिळेल हे पीठ?
हॉर्स ग्रॅम म्हणतात त्याला.
हॉर्स ग्रॅम म्हणतात त्याला. इं ग्रो मध्ये मिळतात. तरी तयार पीठ मात्र मी तरी नाही पाहिलं दुकानात.
धन्यवाद शूम्पी .. मी शोधेन...
धन्यवाद शूम्पी .. मी शोधेन...
२०-२२ जण डीनरसाठी येणार
२०-२२ जण डीनरसाठी येणार आहेत. गोड म्हणून ४ पौंड गाजरांचा हलवा पुरेसा होईल का?
कुळथाचे पिठलं करायचं असेल तर
कुळथाचे पिठलं करायचं असेल तर कुळीथ भाजायलाच लागतात. तो देशावरचा शेंगोळया प्रकार करतात त्यात बहुतेक भाजत नाहीत असेच दळतात. श्रीरामपूरला असताना बघितलं आहे.
नको रे नको ते कुळथाचं पीठलं..
नको रे नको ते कुळथाचं पीठलं.. लई डेंजर वास असतो त्याला.. त्यापेक्षा ढेकणांची (हुलग्यांची) उसळ बेस्ट..
हिम्सकुल आम्हाला आवडतं पिठलं.
हिम्सकुल आम्हाला आवडतं पिठलं. अर्थात ह्यात दोन प्रकार आहेत ज्यांना आवडतं त्यांना खूप आवडतं आणि आवडत नाही त्यांना अजिबात आवडत नाही. विशेषतः कोकणातील लोकांना खूप आवडतं.
२ कप मोड आलेले मुग शिल्लक
२ कप मोड आलेले मुग शिल्लक आहेत, उसळ आधिच करुन एवढ उरलेत..काय करता येइल?
कुळथाचं पिठलं हे कोकणी
कुळथाचं पिठलं हे कोकणी लोकांचं फारच आवडतं खाद्य आहे ह्याची मला पूर्णत: कल्पना आहे..
कोकणातल्या लोकांना बोंबिलादि
कोकणातल्या लोकांना बोंबिलादि सुकी मासळी देखिल आवडते याची हि कल्पना असेलच
प्राजक्ता, मोड आलेल्या
प्राजक्ता, मोड आलेल्या हिरव्या मुगाचे अनेक पदार्थ बनवता येतील :
१) चाट : कच्चे किंवा आवडत असल्यास उकडून / वाफवून त्यांना तिखट-मीठ-चाटमसाला, वरून कांदा टोमॅटो कोथिंबीर शेव पेरून खाणे.
२) किंचित तेलावर / बटरवर परतून तिखट मीठ लावून पण मस्त लागतात.
३) मुगाचे डोसे : http://www.maayboli.com/node/46883
४) मूग घालून कोशिंबीर : कोचवलेली काकडी, किसलेले गाजर, मोड आलेले मूग, मीठ, साखर, लिंबाचा रस. हवी असल्यास वरून फोडणी.
५) मोड आलेले मूग घालून तांदळाची खिचडीही छान होते. मूग डाळ थोडी कमी घालायची व त्या ऐवजी मोडाचे मूग घालायचे.
६) उपमा, सूप, सॅलड इत्यादींतही छान लागतात.
अरुंधती, करेक्ट मी पण हेच
अरुंधती, करेक्ट मी पण हेच सुचवणार होते. वरील सगळेच ऑप्शन बेस्ट. मी तर असं काही करण्यासाठी मुद्दाम मूग जास्त भिजत घालते उसळीसाठी भिजवताना. मूगाची आमटी पण मस्त होते नेहमीच्या आमटी सारखीच. पण त्यासाठी दोन कप नाही लागणार.
शूम्पी, कुळथाला हॉर्स ग्राम म्हणतात कारण मला अस वाटत की ते खरच घोड्यांना खायला घालतात पौष्टिक म्हणून .
कोकणात खोबरेल तेल हे एक
कोकणात खोबरेल तेल हे एक खाद्यतेल आहे. हेही लक्षात ठेवा.
Pages