पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बदाम,काजू,बेदाणे,आक्रोड वापरुन ड्रायफ्रुट मिल्कशेक करु शकता. मागे इथेच डेट फजची कृती आली होती त्यातही हा सुकामेवा वापरु शकता. तसेच हे सर्व रेफ्रिजरेटरमधे ठेवा, म्हणजे लवकर खवट होणार नाही. खजूर तुपात परतुन रेफ्रिजरेटरमधे ठेवला तर जास्त दिवस टिकतो.

खजुर रोल मधे हे सगळे संपुन जाईल. त्याची रेसिपी इथे मिळेल - http://vadanikavalgheta.blogspot.com/2007/03/blog-post_30.html

दूध मसाला करुन ठेवता येईल फ्रीझरमधे. त्याची रेसिपी इथे मिळेल - http://vadanikavalgheta.blogspot.com/2007/03/blog-post_5494.html

~~~~~~~~~~~~~
मराठी रेसिपीज साठी आजच अवश्य भेट द्या: http://vadanikavalgheta.blogspot.com/
~~~~~~~~~~~~~

mbjapan,

खजुर आणि अक्रोड वापरुन केलेल्या लोफ च्या २ पाककृती टाकल्यात मी अत्ताच Happy

कुणाला दह्यातल्या मिरच्यांची रेसेपि माहिते का.... मी मागे एकदोनदा केली होती पण त्याला बरिच वर्षे झाली ..आठवतच नाहिये.. Sad

किट्टू, मीदह्यातल्या मिरच्या अश्या करते - हिरवी मिरच्या देठाला धरुन गॅसवर भाजून घ्यायची. मग देठ आणि बिया काढून त्या एका वाटीत कुस्करायच्या. त्यात कोथिंबीर आणि आवडत असेल लसूण ठेचून घालायची. मीठ आणि हिंग घालून दही घालून कालवायचं आणि थालिपीठ, घावन ह्याबरोबर खाऊन टाकायचं. बरेच लोक ह्यात दाण्याचं कूट पण घालतात. पण लसूण आणि दाण्याचं कूट हे कॉम्बिनेशन मला तरी आवडत नाही.

मागे इथे जुन्या मायबोलीवर "उकडीचे मोदक " क्रुती फोटोसहित कोणीतरी दिली होती , कोणाला माहित असल्यास इथे लिंक द्या ना

****************************************
सर्व मंगलमांगल्ये शिवे सर्वाथ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते

धन्यवाद मंजु ..
ही पण छान आहे रेसेपी.. करुन बघेन कधी.. माझ्यासाठी नविन आहे Happy

पण मी जे करायची ती मिरच्या फोड्णीत घालुन त्यातच दही घालायचे असं काही तरी होते पण नक्की नाही आठवत्...काय काय लागते ते.. Sad

माझी दह्यातल्या मिरच्यांची सोप्पी रेसिपी....

हिरव्या / लाल मिरच्या देठ, बिया काढुन, लसणी बरोबर भरड वाटायच्या.
तेलाची फक्त हिंग - हळद घालुन फोडणी करायची (आवडत असेल तर मोहरीची पावडर घालायची), त्यात हे भरड वाटण घालायचे. मस्त परतायचे. थंड झाले की मीठ घालायचे आणि दह्यात मिसळायचे....

नाहीतर, मिरचीच्या लोणच्यात दही घालायचे.... Happy

Happy
छान आहे...
एक विचारली तर अजुन दोन नविन माहिती झाल्या .. Proud

जय मायबोली देवी....
खाणारा मगतो एक.. मायबोली देते दोन (रेसिपीज बरका?) Biggrin

जय हो.. Happy

हे मिरचीचे प्रकार आवडले. पावसाळ्यात भाज्या आणायचा कंटाळा केला तरीही डाळभात सुखाने जाईल पोटात ह्यांच्या बरोबर..

(आज सकाळी माझे १५-२० वर्षांपुर्वीचे रद्दी कागद काढुन पाहात होते, तर एकावर चटका मिरची रेसिपी दिसली. सेम मंजुच्या रेसिपीसारखी....कागद परत जपुन ठेवले.)

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

दोडक्याचे भाजी शिवाय अजून काही/ काय करता येईल? Uhoh
त्याच्या शीरांची चटणी करायची आहे, पण त्यासाठी भरपूर दोडका आणायला लागेल, तर तो खपवू कुठे? Happy
एनी आयडीयाज?
-------------------------
God knows! (I hope..)

दोडका किसून त्याचा भात करतात. त्यात ताक व हिरवी मिरची घालतात. शिरांच्या चटणीत तीळ, खोबरे, लसुण घातल्याने तशी भरपुर होते. दोन तीन दोडक्याच्या साली पुरतात.

वावा! लगेच उत्तर! Happy दोडका भाताची डीटेल रेसिपी लिहिणार का?
-------------------------
God knows! (I hope..)

दोडका भाताची रेसिपी खरंच द्या लवकर. भाजीच्या रुपात दोडका खायचा कंटाळा येतो.
- सुरुचि

धन्स dafodils23 , हि लिंक बघितली मी , पण अजून एक लिंक होती ज्यात फोटोसहित माहिती दिली होती , ती लिंक मला मिळत नाही आहे , प्लीज कोणाला माहित असल्यास सांगा

****************************************
सर्व मंगलमांगल्ये शिवे सर्वाथ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते

पुनम,

दोडक्याचा किस करुन त्यात पीठ (कणिक / भाजणी) घालुन, तिखट, मीठ, हळद, ओवा घालुन पराठे / थालिपीठ करता येतिल....

कोरडी सुकट(झिन्गा) चटणी कशी करतात ? त्याला थोडे पाणी मारावे लागते का?

पूनम, मी करते तशी दोडका चटणी इथे आहे - http://vadanikavalgheta.blogspot.com/2008/03/blog-post_8498.html

डाळ्वांग्यासारखी डाळ दोडका करतात. माझ्या आज्जीची डाळ्वांग्याची रेसिपी इथे आहे - त्यात वांग्याऐवजी दोडके घाल. - http://vadanikavalgheta.blogspot.com/2008/08/eggplant-daal.html

अजुन एक दोडक्याची भरलि भाजी टाकेन आज उद्यात.

~~~~~~~~~~~~~
मराठी रेसिपीज साठी आजच अवश्य भेट द्या: http://vadanikavalgheta.blogspot.com/
~~~~~~~~~~~~~

कीस बाई कीस,
दोडका कीस..
दोडक्याची फोड
लागते गोड..

आणिक तोड बाइ
आणिक तोड......

--एक लोकगीत Happy

मल मक्रोवेव घ्ययच आहे तर तो प्रशन [कस लिहयच हे] कुठे विचरयचा?

लाजो, 'पू'नम कृपया Happy पराठ्याची आयडीया बेहतरीन आहे, धन्यवादच Happy
मिनोती, येस्स.. डाळदोडका! Happy चटणीसाठी आणेन तो कोवळा असेल बर्‍यापैकी, त्याची ही भाजी मस्त लागेल.. रेसिपी सहीये बरंका..
दिनेशने भातही लिहिला आहे..
वा वा! दोडक्यासारख्या भाजीचे इतके पदार्थ होऊ शकतात! सर्व पाकशास्त्र निपुणांना किती धन्यवाद देऊ? Happy
---------------------------------------------
यह दिल बन जाये पत्थरका, ना इसमें कोई हलचल हो..

दोडक्या मध्ये मटकी घालुनहि चांगली लागते.

दोडका किसून अळूवडीमधे पण घालतात. त्याने अळूवड्या कुरकुरीत होतात.

दोडका आणि दुधी, (मिळत असेल तर झुकीनी ) यांची एक भन्नाट चटणी होते. साले काढून दोडक्याचे/दुधीचे भाजीसाठी करतो तसे छोटे तुकडे करायचे. कढईत तेल तापवून उडदाची डाळ गुलाबी होईपर्यंत, खमंग वास येईपर्यंत परतायची. त्यातच मोहोरी, जिरे, हिंग, कढीपत्त्ता आणि लाल/हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकायचे. त्यात चिरलेला दोडका/दुधी टाकून साधारण शिजवून घ्यायचा, अगदी मऊ करायची गरज नाही. थंड झाला, की मिक्सीतून सगळं मीठ टाकून चटणीसारखं फिरवून घ्यायचं.
यात हळद टाकायची नाही आणि झुकिनी असेल तर साले काढायची नाहीत.

झुकिनी असेल तर साले काढायची नाहीत.

भाग्या, झुकीनीची साले काढायची नाही की दोडका किंवा दुधीची साले काढायची नाहीत? Lol

Pages