१०५ किलो ते ७७ किलो एक प्रवास (माझे वजन कमी करण्याचा प्रयोग )

Submitted by केदार जाधव on 2 April, 2014 - 03:41

ही छोटीशी गोष्ट आहे एका आरोग्याबद्द्ल बर्यापैकी उदासिन असलेल्या चहाबाज माणसाने आपला दिनक्रम फारसा न बदलता , कसलीही औषधे ने घेता , जिमला न जाता , केवळ आहारावर नियंत्रण अन व्यायाम याच्या जोरावर १०५ किलोचे वजन ७७ किलो कसे केले (आणि त्याहीपेक्षा जास्त हेल्दी कसा झालो , वजन हा फक्त सहज मोजता येणारा एक पॅरामिटर आहे) याची .
हे लिहिण्याचा मूळ हेतूच जर मी करू शकतो तर तुम्हीही करू शकता आहे हे सांगणे आहे Happy

हा फोटो जरूर पहा Happy

PhotoGrid_1395201659110_1.pnghttps://www.facebook.com/photo.php?fbid=10152365342678833&set=a.10150157...

साधारण ८ वर्षापुर्वी मी वालचंद कॉलेज मधून उत्तीर्ण झाल्यावर सास्केन मधे जॉब सुरू केला , तेव्हा माझे वजन होते ७८ किलो . क्रिकेट खेळण्याची प्रचंड आवड (घरच्यांच्या भाषेत नाद), कधी कधी ट्रेकिंग , पोहणे यामुळे बर्यापैकी फिट होतो . हळूहळू कामाचा ताण , अरबट चरबट खाणे यामुळे वजन ८० , ८५ करत ९० ला कधी पोचले कळलेही नाही . तरी क्रिकेट चालू असल्याने थोडा दिलासा होता. पण एकामागून एक गुडघ्याचे अन हर्नियाचे ऑपरेशन झाल्यावर तेही बंद झाले . मग काय ९५ -१०० Sad . मधे प्रयत्न केलेच नाहीत असे नाही . जी एम डाएट , उपास, अगदी डाएटीशियन कडून ही डाएट घेऊन झाले , पण त्यात गांभीर्य नव्हते . मग काय सेंच्युरी पार . कळतय पण वळत नाही अशी स्थिती होती , आणि काटा १०५ ला पोचला . आणी मग ते घडल.
साधारण १२ ऑगस्ट ला अचानक छातीत दुखायला लागल , आमच्या डॉक्टर दातार(खरोखर देवमाणूस)नी रिस्क नको म्हणून TMT आणी इतर टेस्ट साठी क्रांती कार्डिएक क्लिनिक ला पाठवल अन तिथल वातावरण पाहून आणी आई, वडिल आणी बायकोच्या चेहर्यावरचे भाव पाहून मला जाणीव झाली की अरे हे आपण काय करून बसलोय ? तब्येतीच्या बाबतीत केलेला निष्काळाजीपणा चांगलाच महागात पडणार अस दिसत होत.
सुदैवाने सगळे रिपोर्ट नॉर्मल आले . (दारू अन सिगरेट चे व्यसन नव्हते हा एक फायदा असेल कदाचित )
पण डॉ नी मला प्रचंड झापले ." तू सायन्सचा विद्यार्थी ना ? मग एखाद्या इंजिनला त्याच्या दीडपट लोडने चालवले तर खराब होणार च ना ? नीट जगायचे असेल तर आधी वजन कमी करा " मग त्यानीच मला डॉ वंदना फाटक या डाएटीशियनची चिठ्ठी दिली अन हा प्रवास सुरू झाला . (तशी त्यानी ती आधीही एकदा दिली होती पण त्यावेळी सिरियसनेस नसल्याने त्यांच्याकडे जाऊनही काही फायदा झाला नव्हता . ) पण आता वेळ वेगळी होती

खर तर वजन कमी करायच म्हटल तर अडचणी अनंत होत्या . एक तर रोजच ऑफिसच जेवण (आनंदी आनंद) , रात्री अपरात्री मिटींग . दुसर म्हणजे गुडघा अन पोटाच्या ऑपरेशनमुळे फक्त सायकलिंग , चालणे अन पोहणे च शक्य . त्यात दिवसातून १०-१५ कप चहाची सवय .पण आता ठरवल होत करायचच .

डाएटिशियन ने सांगितल्या प्रमाणे आहार सुरू केला . त्याचबरोबर स्वतःही प्रचंड वाचन चालू केल (पण त्याने उलट जास्त कन्फ्युझ होत Happy )

Equation was Simple
जेवढे कॅलरी खाल्ले जात होते , त्यापे़क्षा जास्त जाळायच्या , अन त्या जाळण्यासाठी (चरबीचे रूपांतर कॅलरीत होण्यासाठी ) प्रोटीन्स जास्त खायचे .
म्हणजे
१. कमी कॅलरी खाणे (साखर , तळलेले पदार्थ , बेकरी पदार्थ , मिठाया , कोल्ड ड्रिंक्स , पिझा ई ..)
२ . जास्त कॅलरी जाळणे ( कमीत कमी एक तास व्यायाम , चालणे किंवा सायकल)
३ . अन प्रोटीन्स जास्त खायचे (मोड , अंड्याचा पांढरा भाग , सोया , टोंड मिल्क )
४ . त्याचबरोबर हेल्थ साठी (फळे , पालेभाज्या इ .) जास्त खाणे

हे वर वर सोप असल तरी करण कठीण होत . पहिला अडथळा होता चहा .
पहिले २ दिवस चहा कमी केला तर अक्षरशः गडाबडा लोळेपर्यंत डोक दुखल .
मग यावर एक सोपा उपाय म्हणजे तलफ संपली की उरलेला चहा ओतून टाकायचा . बर्याचदा पहिल्या काही घोटातच तो तजेला/स्टिम्युलस्/फ्रेशनेस काही म्हणा तो येतो , उरलेला चहा आपण उगाचच पितो तो बंद केला .
हळू हळू सवय कमी होत गेली .
तेच जेवणा बद्द्ल , आपल्याला कल्पना नसते की आपण किती ग्रेन इटर असतो . २ चपात्या चहा बरोबर , भातावर एवढीशी आमटी , उसळी तर कधीच नाहीत. आधी हे सगळ बदलाव लागल . थोड थोड करत कर्ब्ज कमी अन प्रोटीन्स वाढवत गेलो .
त्याच बरोबर फळ आणी पालेभाज्यांच प्रमाणही वाढवल . कुठेही जाताना १-२ सफरचंद, संत्र बरोबर नेऊ लागलो .

वेळोवेळी थोडा थोडा आहार बदलत गेला तरी साधारण तो असा होता .
१. सकाळी ६ वाजता : १ ग्लास पाणी + आवळा रस/लिंबू
२. सकाळी ७ वाजता : १ कप चहा
३. सकाळी ९ वाजता : १ कप टोंड दूध + १ सफरचंद + १ वाटी मोड आलेले मूग/ओट्स
४. दुपारी १ वाजता : ऑफिसमधे २ चपाती + १ भाजी + १ उसळ + सॅलड्/कोशिंबीर + १ ग्लास ताक/लिंबू पाणी
५. संध्याकाळी ५ वाजता : २ इड्ली (चटणी नाही)/ साधा डोसा / सँडविच + १ मूठ फुटाणे
६. रात्री ९ वाजता : २ फुलके + १ भाजी (शक्य असल्यास पालेभाजी) + काकडी/टोमेटो

या सगळ्यात शक्य तितके कमी तेल वापरल .

या सगळ्यापे़क्षाही महत्वाचे होते म्हणजे नियमीत व्यायाम करणे . सुरूवातीला १० मिनीट चालयावर धाप लागायची . मग आज १५ , उद्या २० करत वाढवत गेलो अन मग रोज कमीत कमी १ तास चालणे (वेग हळू हळू वाढवत नेणे) वा सायकलिंग (बैठी) अन जमतील तेव्हा १०/१५ सूर्यनमस्कार हे रूटी न ठेवल .
काही झाल तरी यात खंड पडू दिला नाही . सकाळी नाही तर संध्याकाळी अन संध्याकाळी नाही तर रात्री ११ लाही व्यायाम केलाच .
आणखी एक महत्वाच म्हणजे बाहेरच्या खाण्यावर कंट्रोल ठेवल . कधी बाहेर खाव लागलच तर किती आणी काय खाव यावर ताबा ठेवला . उदा . ऑफिस पार्टी असेल तर सॅलेड , सूप वर जास्त जोर दिला . केएफसी
मधे गेलो तर एकच झिंगर बर्गर . तेच पाहुण्यांचही. जेवायला गेला सगळ्याना (प्रेमाने :)) सांगितल की डाएट करतोय . कधी एखादा दिवस जास्त खाण झाल तर पुढच खाण थोड कमी .

साधारण १-२ महिन्यात परिणाम दिसायला सुरूवात झाली. वजन तर कमी झालच पण स्टॅमीना अन रोग प्रतिकार शक्तीही वाढली . साधारण ४ महिन्यानंतर पोट कमी व्हायला लागल Happy आणी ७ महिन्यानी तर वर पाहिलच असेल Wink
या सगळ्यात तेवढच श्रेय कविताला , माझ्या बहिणीला आणी आईलाही आहे.
प्रयत्न अजूनही चालूच आहेत , टारगेट ७४-७५ आहे ,पाहूया जमतय का ? Happy

मोस्ट इंपॉर्टंट टीप्स ( काही अनुभवाचे बोल )
१. वरच्या आहारात जिथे शक्य नाही तिथे थोडीशी अॅडजस्ट्मेंट करायची (सॅलड नसेल तर फक्त काकडी खायची , उसळ नसेल तर सकाळचे मूग परत खायचे) ऑफिस पार्टी असेल तर सूप , सॅलड वर भर देऊन शेवटी फक्त थोडा दाल राईस घ्यायचा . पण कसल्याही परिस्थितीत पूर्ण कंट्रोल सोडाय्चे नाही.
२. व्यायाम कधीही केला तरी तितकाच फायदा देतो . सकाळी नाही जमला तर रात्री करा, पण चुकवू नका.
३. आपली लाईफस्टाईल अॅक्टीव्ह करा (१ तासाने ऑफिसमधे छोटीशी चक्कर मारा. जिने चढा. कॅरम ऐवजी टेबल टेनीस खेळा . पाण्याची बाटली जवळ ठेवण्याऐवजी तिथे जाऊन दर १-१.५ तासाने पाणी प्या)
४. सर्वात महत्वाचे म्हणजे मी डाएट करतोय याचा अभिमान बाळगा, लाज नको.
लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका.
आणि विश्वास ठेवा, एकदा तुमच्यात बदल दिसून यायला लागले की आधी कुचेष्टा करणारेही कौतुक करतील आणी टीप्सही मागतील Happy
५. फळांचे ज्यूस घ्यायचे असतील तर बिन साखरेचे घ्या , चहा लगेच सोडता येत नसेल तर जेवढा पिल्यावर तलफ भागेल तिथून टाकून द्या (हा उपाय मला फार कामी आला , चहा पिला नाही तर मासे डोके दुखायचे, अन्न टाकून देणे वाईट आहे मान्य , पण नको असताना पोटात टाकणे जास्त वाईट ना Happy )
६. डाएट एंजॉय करा , अकारण कमी खाऊ नका . त्यामुळे फक्त अशक्तपणाच येतो . फळे (चिक्कू , केळ आणी आंबा सोडून), हिरव्या भाज्या हव्या तितक्या खा .
७. शक्य असल्यास वजन करण्याचा काटा खरेदी करा . (साधे ५०० रू पासून आणी डिजिटल १००० रू पासून येतात) . त्यामुळे आपण योग्य दिशेने चाललो आहोत की नाही हे कळते. डाएट न करणार्यानाही त्याचा फायदा होतो डोळा मारा
८ . वजन कमी होण्याचा वेग जितके जास्त दिवस तुम्ही डाएट कराल तितका वाढतो , तेव्हा सुरूवातीलाच हे काही जमत नाही म्हणून सोडू नका.
९ . "आज एका दिवसाने काय होतय " हा विचार सगळ्यात घातक . तो एक दिवस येऊ देऊ नका Happy
१० . आपल्याला हेल्दी व्हायचय , वजन फक्त एक पॅरामिटर आहे हे ध्यानात ठेवा .

बाकी सौ बात की एक बात अन स्वत: खाल्लेल्या चटक्यातून आलेल्या शहाणपणातून दिलेला फुकटचा सल्ला Happy
निरोगी राहून वजन कमी करायचे असल्यास (अन ते तसे टिकवायचे असल्यास) आहारावर नियंत्रण व व्यायामाला पर्याय नाही .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा नवरा fitness trainer ( मराटी ?) आहे. त्याच्या मते रात्रि १० म देखिल व्यायाम करु शकता, जेवना नंतर ४५मिनिटा नंतर, पण चुकवू नका

मागे इथेच विचारलं होतं बहुतेक ... तुम्ही व्यायामाची सायकल वापरली होती का?
ती उपयोगी पडते का? मी इथे व्ययामाच साहित्य जिथे मिळाते त्या दुकानात विचारल तर किंमत ७-८ हजार पर्यंत आहे.. ही किंमत योग्य आहे का?

far sundar lekh kedar.
ka kunas thauk Marathi typing hot nahiye.....

te suruvatila chest pain vishayee sangitalet tyache pudhe kaay? BP normal hota ka.

mi ase ekale aahe ki excess weight lost kelyavar BP aani Sugar almost control madhe yete.
jankar mandlini yavar prakash takava.

आनंदी ,
हो , व्यायामाची सायकल वापरली होती अन तिचा फार उपयोग झाला .
तिचा मुख्य फायदा म्हणजे तुम्ही कधीही व्यायाम करू शकता.
टीव्ही पाहता पाहता किंवा गप्पा मारता मारता १ तास कसा निघून गेला हे कळतही नाही (अर्थात स्टॅमीना बिल्ड झाल्यावर Wink )

.

या धाग्यावर ज्यानी प्रतिसाद देउन वजन कमी करायचे ठरवले होते.. त्या सर्वाची हा धागा वाट पहात आहे.
थोडक्यात धागा वर आणन्यासाठी...

????

????/

????/

नमस्कार ,
वविला कौतुक करणार्या सगळ्यांचे मनापासून आभार .

पण त्याच वेळी जो मी हे काहितरी फार वेगळ / अवघड काम केलय हा सूर जाणवला त्यामुळे मला वाटल की मी हा लेख लिहिण्यात कमी पडलोय . Sad

हे लिहिण्याचा मूळ हेतूच हा होता की काही विशेष बदल न करता तुमच रोजच रूटीन सांभाळत सहज वजन कमी करता येत याच एक उदाहरण दाखवणे . हे करण्यासाठी फक्त थोड्या संयम अन self discipline ची गऱ आहे , बाकी काही नाही .

कदाचित लिहिताना मी थोड स्ट्रीक्ट लिहिल असेल कारण जे लिहिल त्यात १०-२०% सूट आपण घेतच असतो Happy

जर माझी ५२ वर्षे वयाची ऑफिसला जाणारी आई हे करू शकते तर आपण नक्की करू शकतो ना ?

चला हा धागा थोडा वाहता करू या , म्हणजे एकमेकाला प्रेरणा देता येईल .

केदार, तुला याची देही याची डोळा पाहिले आणि धन्य झाले Wink
आणि सगळ्यांचा सूर काहीतरी अवघड वेगळ केलय असा नक्कीच नव्हता पण जे काही तू ठरवलस ते सातत्त्याने केलसं याबद्दलच ते आश्चर्य होत.
सुरवात सगळेच करतात मग या ना त्या अश्या असंख्य कारणाने ते मागे पडतं. अस माझचं नाही तर इथल्या बर्‍याच जणांच झालेलं आहे. त्यामुळे तुझं कौतुक.

आणि सगळ्यांचा सूर काहीतरी अवघड वेगळ केलय असा नक्कीच नव्हता पण जे काही तू ठरवलस ते सातत्त्याने केलसं याबद्दलच ते आश्चर्य होत.
सुरवात सगळेच करतात मग या ना त्या अश्या असंख्य कारणाने ते मागे पडतं. अस माझचं नाही तर इथल्या बर्‍याच जणांच झालेलं आहे. त्यामुळे तुझं कौतुक.
>>
+११११११११

तू जे केलंस त्याबद्दल कौतुक नव्हतं तर ठेवलेल्या सातत्याबद्दल कौतुक होतं Happy
वजन कमी करणं हे अवघड नाही पण याबाबत सातत्य ठेवणं खरचं खुप अवघड आहे Happy

धन्यवाद शुभांगी , जाई अन रीया Happy
ते कौतुक त्यासाठीच होत हे मलाही माहित आहे आणि तोच माझा मुद्दा आहे.
कदाचित मलाच नीट मांडता येत नाहीये.
पुन्हा एकदा लिहितो , काही जणांचा थोडासा सूर याला किती संयम/सातत्य लागणार , आम्हाला हे जमण अवघड आहे असा होता.

हे सातत्य राखण तितकस अवघड नाहीये हेच माझ म्हणण आहे .

सुरूवात तर करा , Take it one day at a time . महिनाभर कसलीही अपे़क्षा न ठेवता करून पहा . नंतर तुमच शरीर आणी मन तुम्हाला आपोआप साथ देत जाईल . आपोआप गुलाबजाम , जिलेबी नको वाटेल (किमान अगदी मस्ट हवी अस वाटणार नाही) चालल नाही/ व्यायाम केला नाही तर कसतरी वाटायला लागेल . मग पुढच बरच सोप आहे. Happy

इथे हा दुवा देतोय पण लिखाण इंग्रजीत आहे....

https://www.facebook.com/notes/prince-mishra/i-was-fat-once-now-i-run/64...

“The only thing standing between you and your goal is the bullshit that you keep telling yourself as to why you can't achieve it.” हे त्यातले शेवटचे वाक्य आहे.

देवकी ,

पावसामुळे फिरायचे थांबवू नका . घरातल्या घरात किंवा ऑफिसमधेही फिरला तरी चालेल . (मीही गेले ३-४ दिवस हेच करतोय ) नेहमी १ तास फिरत असाल तर अर्धा तास फिरा पण सवय मोडू देऊ नका .

केदार, हा लेख खूप छान प्रेरणादायी झालाय. काहीही कमी, स्ट्रिक्ट नाहीये. मी तर मनात आलं की वाचून काढते हे पान. आपोआप गाडी रूळावर येते. श्रावणात गोडावर कंट्रोल ठेवला मी तर सगळे देव प्रसन्न होतील बहुधा. Happy

नंतर पावसामुळे फिरणे थांबले आणि परत वजन वाढले.>> 'वॉक अ‍ॅट होम' असे सर्च केल्यास घरच्या घरी करता येतील असे सोपे आणि भरपूर व्हिडियो सापडतील.

आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की

आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .

आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .

आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .

कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .

गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .

हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही .

त्यासाठी हा धागा .

http://www.maayboli.com/node/50148

ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?

हे रिगरस डाएट बंद करून बरोबर ६ महिने झाले . (जरी यातल्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आता रोजच्या सवयीच्या झाल्या असल्या तरी मोड्/ओट्स बंद झालेच , चहा १चा ३ कप झाला)
वजन ३ किलोने वाढले असले तरी ८० किलोच्या आसपास स्थिर झालय .
मला भीती वाटत असलेला बॅक फायर झाला नाही Happy
सो धिस वर्कस Happy

केदार ह्यात व्यायामाच्या वेळा, उठण्या /झोपण्याच्या वेळा लिहिणार का प्लिज.
>>>.
१. सकाळी ६ वाजता : १ ग्लास पाणी + आवळा रस/लिंबू
२. सकाळी ७ वाजता : १ कप चहा
३. सकाळी ९ वाजता : १ कप टोंड दूध + १ सफरचंद + १ वाटी मोड आलेले मूग/ओट्स
४. दुपारी १ वाजता : ऑफिसमधे २ चपाती + १ भाजी + १ उसळ + सॅलड्/कोशिंबीर + १ ग्लास ताक/लिंबू पाणी
५. संध्याकाळी ५ वाजता : २ इड्ली (चटणी नाही)/ साधा डोसा / सँडविच + १ मूठ फुटाणे
६. रात्री ९ वाजता : २ फुलके + १ भाजी (शक्य असल्यास पालेभाजी) + काकडी/टोमेटो

केदार ह्यात व्यायामाच्या वेळा, उठण्या /झोपण्याच्या वेळा लिहिणार का प्लिज.
>>>.

सकाळी ६ वाजता उठणे

१. सकाळी ६ वाजता : १ ग्लास पाणी + आवळा रस/लिंबू
२. सकाळी ७ वाजता : १ कप चहा
३. सकाळी ९ वाजता : १ कप टोंड दूध + १ सफरचंद + १ वाटी मोड आलेले मूग/ओट्स
४. दुपारी १ वाजता : ऑफिसमधे २ चपाती + १ भाजी + १ उसळ + सॅलड्/कोशिंबीर + १ ग्लास ताक/लिंबू पाणी
५. संध्याकाळी ५ वाजता : २ इड्ली (चटणी नाही)/ साधा डोसा / सँडविच + १ मूठ फुटाणे
६. रात्री ९ वाजता : २ फुलके + १ भाजी (शक्य असल्यास पालेभाजी) + काकडी/टोमेटो

सकाळी ६ला किंवा रात्री ७-८ च्या दरम्यान व्यायाम

रात्री ११ वाजता झोप (७ तास झोप अन २ तास जेवणानंतर अंतरासाठी)

Pages