गोपीनाथजी मुंडे साहेबांचा दुर्देवी अपघात - जबाबदार सगलेच. कधि सुधारनार ?

Submitted by Babaji on 3 June, 2014 - 21:59

गोपीनाथजी मुंडे साहेबांचा दुर्देवी अपघात होवुन आता ते आपल्यात नाहीत. यावर अजुनपण विश्वास बसत नाहि. सकाळि उठल्यावर वाटल कि काल पडलेल वाइट स्वप्न असल. पन हे खर आहे. अपघात कि घात यात पडायच नाहि, तर इतक्या महत्वाच्या नेत्याचा अन्त एका अपघातात झाला याच दु:ख आहे. यातुन आपन काय शिकनार ?

देशात अपघातात जितके लोक मरतात तितके कुठल्याच कारणान मरत नाहित. बॊम्बस्फोट झाला कि खुप दिवस दळण दळतात. पन अपघात झाला तर कुनीच काहि बोलत नाहि. आता तरि आपन जागे हौ. अपघाताचि कारनं सर्वान्नाच माहित असतात.

दिल्लित तर खुपच अपघात होतात. तिथ कुटलिच गाडि अशि नाहि जिला घासलेल नाहि. कालच्या वर्षि दोन हजार जन अपघातात मेले. यावर्षि आतापर्यन्त एक हजार मेलेत. या प्रत्येकाच्या घरि जेव्हां खबर जात असल तेव्हा काय वाटत असल ? मुंडे साहेब गेले तेव्हा आपल्या सगळ्याना धक्का बसला, मग सामान्य मानुस गेला तर त्याच्यावर डिपेण्ड असनारे काय ? सगळ उद्धव्स्त होवुन जात. सकाळि गेलेल मानुस परतत नाहि. हे भयानक ! ( अपघाताचि भयानकता समजुन घ्यावि).

अपघात टाळता येतात ?
----------------------
मुन्डे साहेबाचा अपघात टालता आला असता. आपल्या देशात खुप रफ गाड्या चालवतात आनि कोनच लक्ष देत नाहि. या इंडीकामुळ एक उदाहरन पुन्याच दिल तर चालेल. सकाळी सकाळी इन्डिका वाले एकदम फास्ट असतात. फिरायला गेलेल्या लोकान्ना उडवलं पन आहे. या इंडिका वाल्यानबद्दल सकाळ च्या टूडे मधे महिनाभर लेखमाला आली होती. फोटो सहित यायच. लोकांना अनुभव पण येतात. या इंडीका वाल्यांवर कंपनीचा कन्ट्रोल नाही. ते एजन्सिकड बोट दाखवतात. गाड्या आयटी कम्पनीच्या कर्मचार्यांसाठी रस्त्यावर वाहतूक करतात, पण आयटी कंपनी जबाबदार नाही. या इन्डिका एकदम रफ असतात. रात्रि बेरात्रि आनि पहाटे फुल स्पिड मधे चालतात. फक्त या इंडीकाच नाही, तर हायर करायच्या सगळ्याच गाड्या रफ चालतात. मुन्डे साहेबान्चि धडक पन अशाच गाडीशी झालि. हे कोन रोखणार ? हि कुनाची जबाबदारि आहे ? नितिन गडकरी ज्या खात्याचे मंत्री आहेत त्या खात्याकड ही जबाबदारि देता येइल का ?

आयटि वाल्याना इन्डिका कार कशाला पाहिजे ? कायद्यात ते बसत नाही. आयटी कंपन्याना लालगालिचा अन्थरताना पवार साहेबानी कायदे वाकवायचि परवानगी दिली होती, त्याचं हे फळ आहे. नियमाप्रमाणे इन्डस्ट्रियल एरियात बस कम्पलसरी असते आणि कंपनीला तिचि जबाबदारि घ्यावि लागते. अपघात झाला तर कंपनिचा एक अधिकारी लगेच तिकडे जातो. निकाळजे राहिल्यावर कंपनीवर लिगल एक्शन होउ शकते. कंपनीला बस हायर कराव्या लागतात. आरटीओला पॆसेंजर्स, कुठ चढनार उतरनार त्या स्टॊप ची माहिती, ड्रायव्हरचा फोटो, पगार की कॊन्ट्रॆक्ट, लायसन नंबर हे सगळं द्याव लागत. त्यामुळ बसेस काळजीपुर्वक चालवाव्या लागतात. अपघात झाला तर कंपनीला अपघातात्ल्या जखमीला हॉस्पिटलचा खर्च आणि नुकसानभरपाई द्यावि लागते. आयटि वाल्याना हे नियम नाहित का ? कसलि जबाबदारि नको म्हनुन इन्डिका वाल्या कंपनीशी कोन्ट्रेक्ट करतात. त्यामुल एका बस आइवजि दहा इन्डिका रत्स्यात येतात. या गाड्या एकदम घरापर्यंत येतात. कर्मचार्याना मोठ्या रस्त्यापर्यंत जायला यायला काय अडचन आहे ? येवडे टिकोजीराव असतिल तर कंपनिला कामाच्या जवळ क्वार्टर बांधुन द्यायला कम्पल्सरि करा. हे एक. (अशीच अट होती पन बिल्डर लोकांसाठि काय झाल माहित नाहि). अशा नियम वाकवन्याने कस काय कायद्याच राज्य राहणार ? सिग्नलला कुनी थांबत नाही. सायकलवाल्याला कुणी विचारत नाहि. रिक्षा बेकायदेशिरपने पॆसेंजर घेतात. कुठही थांबतात. ट्रकवाले फास्ट लेन मधे घुसतात. एक्सप्रेस हायवेला ट्रकवाले भिति वाटल अशि गाडी हानतात. कुनीच बघनारं नाही. .

असे अपघात टाळण्यासाठि काय करायला पाहिजे ?
=================================

लायसन देन्यापासुन सुधारल पायजे सगळ. अमेरिकेत परिक्षेत पास झाल नाहि कि लायसन मिळत नाहि. फुल कंपुतराज्ड सिस्टिम असते. त्या अमेरिकन कम्पनिला बोलावुन त्यान्च्याकदुन लायसनचि सिस्टिम चालवायल पायजे. अमेरिकन नको असतील तर प्रामानिक सामाजिक संस्था उदा- राश्त्रिय स्वयंसेवक संघ, राश्ट्रीय सेवादल अशा लोकाना चालवायला द्यायला पाहीजे. पोलीस नकोच. .ज्यांना लायसेन दिलेत त्याची पन परत टेस्ट घ्या.

पैशे खानार्या पोलिसांच काय करायच ?
ट्राफिक कंट्रोल जरायच्या ऐवजि लपुन बसुन शिकार करनारे पाच सहा पोलिसवाले सगळिकड बघायला मिळतात. काय गरज यांचि कंट्रोल करणार नसतिल तर ? रात्री महत्वाच्या रस्त्यावर पोलिस बन्दोबस्त पाहिजे. दोन शिफ्ट मधे पोलिस पाहिजे. पगार वाधवा, टेक्स घ्या, कायपन करा.

अजुन काय करता येईल ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गडकरी मायबोली वाचतात आणि त्यांना तुम्ही हे जे काही लिहिलय ते समजतं हे वाचून टडोपा!!!
>>. गडकरींना वाचता येते हे वाचून धक्का बसला::फिदी:

पण हे सगळे करण्यापेक्षा (जे इतकी वर्षे करायचा प्रयत्न करूनहि जमले नाही), सरळ आय टी च बंद करा ना! कुणीहि आय टी करायचे नाही असा कायदा काढा! कारण वरचे बरेच लेख वाचून समस्या आय टी मुळे निर्माण झाल्या असे वाटू लागले आहे.
साधी गोष्ट आहे.
नो आय टी, नो पैसा, नो पैसा, नो गाडी. मामला खतम!!
Happy

Pages