गोपीनाथजी मुंडे साहेबांचा दुर्देवी अपघात - जबाबदार सगलेच. कधि सुधारनार ?

Submitted by Babaji on 3 June, 2014 - 21:59

गोपीनाथजी मुंडे साहेबांचा दुर्देवी अपघात होवुन आता ते आपल्यात नाहीत. यावर अजुनपण विश्वास बसत नाहि. सकाळि उठल्यावर वाटल कि काल पडलेल वाइट स्वप्न असल. पन हे खर आहे. अपघात कि घात यात पडायच नाहि, तर इतक्या महत्वाच्या नेत्याचा अन्त एका अपघातात झाला याच दु:ख आहे. यातुन आपन काय शिकनार ?

देशात अपघातात जितके लोक मरतात तितके कुठल्याच कारणान मरत नाहित. बॊम्बस्फोट झाला कि खुप दिवस दळण दळतात. पन अपघात झाला तर कुनीच काहि बोलत नाहि. आता तरि आपन जागे हौ. अपघाताचि कारनं सर्वान्नाच माहित असतात.

दिल्लित तर खुपच अपघात होतात. तिथ कुटलिच गाडि अशि नाहि जिला घासलेल नाहि. कालच्या वर्षि दोन हजार जन अपघातात मेले. यावर्षि आतापर्यन्त एक हजार मेलेत. या प्रत्येकाच्या घरि जेव्हां खबर जात असल तेव्हा काय वाटत असल ? मुंडे साहेब गेले तेव्हा आपल्या सगळ्याना धक्का बसला, मग सामान्य मानुस गेला तर त्याच्यावर डिपेण्ड असनारे काय ? सगळ उद्धव्स्त होवुन जात. सकाळि गेलेल मानुस परतत नाहि. हे भयानक ! ( अपघाताचि भयानकता समजुन घ्यावि).

अपघात टाळता येतात ?
----------------------
मुन्डे साहेबाचा अपघात टालता आला असता. आपल्या देशात खुप रफ गाड्या चालवतात आनि कोनच लक्ष देत नाहि. या इंडीकामुळ एक उदाहरन पुन्याच दिल तर चालेल. सकाळी सकाळी इन्डिका वाले एकदम फास्ट असतात. फिरायला गेलेल्या लोकान्ना उडवलं पन आहे. या इंडिका वाल्यानबद्दल सकाळ च्या टूडे मधे महिनाभर लेखमाला आली होती. फोटो सहित यायच. लोकांना अनुभव पण येतात. या इंडीका वाल्यांवर कंपनीचा कन्ट्रोल नाही. ते एजन्सिकड बोट दाखवतात. गाड्या आयटी कम्पनीच्या कर्मचार्यांसाठी रस्त्यावर वाहतूक करतात, पण आयटी कंपनी जबाबदार नाही. या इन्डिका एकदम रफ असतात. रात्रि बेरात्रि आनि पहाटे फुल स्पिड मधे चालतात. फक्त या इंडीकाच नाही, तर हायर करायच्या सगळ्याच गाड्या रफ चालतात. मुन्डे साहेबान्चि धडक पन अशाच गाडीशी झालि. हे कोन रोखणार ? हि कुनाची जबाबदारि आहे ? नितिन गडकरी ज्या खात्याचे मंत्री आहेत त्या खात्याकड ही जबाबदारि देता येइल का ?

आयटि वाल्याना इन्डिका कार कशाला पाहिजे ? कायद्यात ते बसत नाही. आयटी कंपन्याना लालगालिचा अन्थरताना पवार साहेबानी कायदे वाकवायचि परवानगी दिली होती, त्याचं हे फळ आहे. नियमाप्रमाणे इन्डस्ट्रियल एरियात बस कम्पलसरी असते आणि कंपनीला तिचि जबाबदारि घ्यावि लागते. अपघात झाला तर कंपनिचा एक अधिकारी लगेच तिकडे जातो. निकाळजे राहिल्यावर कंपनीवर लिगल एक्शन होउ शकते. कंपनीला बस हायर कराव्या लागतात. आरटीओला पॆसेंजर्स, कुठ चढनार उतरनार त्या स्टॊप ची माहिती, ड्रायव्हरचा फोटो, पगार की कॊन्ट्रॆक्ट, लायसन नंबर हे सगळं द्याव लागत. त्यामुळ बसेस काळजीपुर्वक चालवाव्या लागतात. अपघात झाला तर कंपनीला अपघातात्ल्या जखमीला हॉस्पिटलचा खर्च आणि नुकसानभरपाई द्यावि लागते. आयटि वाल्याना हे नियम नाहित का ? कसलि जबाबदारि नको म्हनुन इन्डिका वाल्या कंपनीशी कोन्ट्रेक्ट करतात. त्यामुल एका बस आइवजि दहा इन्डिका रत्स्यात येतात. या गाड्या एकदम घरापर्यंत येतात. कर्मचार्याना मोठ्या रस्त्यापर्यंत जायला यायला काय अडचन आहे ? येवडे टिकोजीराव असतिल तर कंपनिला कामाच्या जवळ क्वार्टर बांधुन द्यायला कम्पल्सरि करा. हे एक. (अशीच अट होती पन बिल्डर लोकांसाठि काय झाल माहित नाहि). अशा नियम वाकवन्याने कस काय कायद्याच राज्य राहणार ? सिग्नलला कुनी थांबत नाही. सायकलवाल्याला कुणी विचारत नाहि. रिक्षा बेकायदेशिरपने पॆसेंजर घेतात. कुठही थांबतात. ट्रकवाले फास्ट लेन मधे घुसतात. एक्सप्रेस हायवेला ट्रकवाले भिति वाटल अशि गाडी हानतात. कुनीच बघनारं नाही. .

असे अपघात टाळण्यासाठि काय करायला पाहिजे ?
=================================

लायसन देन्यापासुन सुधारल पायजे सगळ. अमेरिकेत परिक्षेत पास झाल नाहि कि लायसन मिळत नाहि. फुल कंपुतराज्ड सिस्टिम असते. त्या अमेरिकन कम्पनिला बोलावुन त्यान्च्याकदुन लायसनचि सिस्टिम चालवायल पायजे. अमेरिकन नको असतील तर प्रामानिक सामाजिक संस्था उदा- राश्त्रिय स्वयंसेवक संघ, राश्ट्रीय सेवादल अशा लोकाना चालवायला द्यायला पाहीजे. पोलीस नकोच. .ज्यांना लायसेन दिलेत त्याची पन परत टेस्ट घ्या.

पैशे खानार्या पोलिसांच काय करायच ?
ट्राफिक कंट्रोल जरायच्या ऐवजि लपुन बसुन शिकार करनारे पाच सहा पोलिसवाले सगळिकड बघायला मिळतात. काय गरज यांचि कंट्रोल करणार नसतिल तर ? रात्री महत्वाच्या रस्त्यावर पोलिस बन्दोबस्त पाहिजे. दोन शिफ्ट मधे पोलिस पाहिजे. पगार वाधवा, टेक्स घ्या, कायपन करा.

अजुन काय करता येईल ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यांची पोस्ट ते कशावर लिहीत आहेत हेही ते वाचत नाहीत,
मी मायबोलीवर लिहीतो आहे याची मला जाणीव असते. म्हणून कशावर, काय याचा विचार मी करत नाही.

आत्ता मला घरात बरीच कामे आहेत, ती करण्याचा कंटाळा आला म्हणून इथे आलो आहे. जसे आय टी वाले म्हणे कामाच्या ठिकाणी मायबोलीवर लिहीतात तसेच. मी आय टी त असताना मायबोली नव्हती, त्याचा वचपा आता काढतो आहे.

 

 

 

 

आपल्या देशात खुप रफ गाद्या चालवतात
<<
गादी चालवणे हे आपल्या देशाचे व्यवच्छेदक लक्षण आहे.
पानाची गादी, संतमहंतांची गादी अन राजाची, राजकारण्यांचीदेखिल गादीच.
या गादी चालवण्यावरून फार रफ भांडणं होतात आपल्या देशात.

बीडला कार्यकर्त्यांकडून केल्या जाणाऱ्या सत्काराचा स्वीकार करण्यासाठी मुंबई गाठता यावी म्हणून मंगळवारी सकाळी मुंडे आपल्या २१, लोधी इस्टेट या निवासस्थानाहून पृथ्वीराज रोडमार्गे ओरोविंदो मार्ग चौकात पोहोचले असता, त्यांच्या लाल दिव्याच्या (डीएल ८ सी बीएफ ००३४) मारुती एसएक्स-फोर गाडीने ६० ते ७० किमीच्या वेगाने लाल सिग्नल मोडला. त्याचवेळी हिरवा सिग्नल मिळाल्याने समोरून वेगाने इंडिका कार येत होती. इंडिकाचा चालक गुरविंदर सिंह याने जोरात ब्रेक लावूनही त्याची गाडी मुंडेंच्या कारला डाव्या बाजूला धडकली. याच बाजूला मुंडे पेपर वाचत बसले होते. इंडिकाची धडक लागताच मुंडे समोर आदळले आणि त्यांच्या नाक व चेहऱ्याला मार लागला. या अकस्मात धक्क्यामुळे हादरलेल्या मुंडेंनी त्यांचे स्वीय सहायक नायर यांच्याकडे पिण्यासाठी पाणी मागितले. नंतर तत्काळ हॉस्पिटलात नेण्यास सांगितल्याचे नायर यांचे म्हणणे आहे. पण 'एम्स'मध्ये पोहोचण्यापूर्वीच मुंडे यांची प्राणज्योत मालवली होती.
<<

ही बातमी. : http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/munde-death-ac...

हेच टीव्हीवर देखिल पाहिले.

त्या इंडीकावाल्याच्या ड्रायविंगची, अन त्याची चूक नसल्याची नोंद नक्कीच तिथल्या सीसीटीव्ही फूटेजमधे असणार आहे. त्याशिवाय त्याला इतक्या व्हीआयपी प्रकरणात १० हजाराच्या जामीनावर सोडले नसते.

झाले ते वाईट झाले, दुमत नाही. पण यात कॉन्स्पिरसीज शोधणार्‍यांना कुणीतरी आवरायला हवंय.

दुर्योधन कानतोन्डे साहेब,

मुन्डेंचा अपघात झाला ही खरिचं दुख्खःद घटना आहे. पोलिस आणि प्रशासन योग्यतो निकाल लावेल आणि जबाबदार व्यतीला योग्यती शिक्षा होईल अशी आपण अपेक्षा करू.

पण या घटनेतून उगाच आय.टी. मधल्या लोकांवर कशाला राग काढता राव? उगाच वड्याचे तेल वांग्यावर काढून प्रश्न सुटणार नाही. लक्षात घ्या, गाडीत प्रवासी जरी आय.टी. मधले असले तरी गाडीचालवणारा आय.टी. मधला नसतो.

तुम्ही विचरलत .. आयटि वाल्याना इन्डिका कार कशाला पाहिजे? बरेच आय.टी. मधले लोक परदेशी वेळेप्रमाणे वेगवेगळ्या शिफ्ट मधे काम करतात. त्यांना घरून ऑफीस पर्यंत नेण्यासाठी कंपनी रहदारीची सोय करते. कित्तेक वेळा, शिफ्ट काम करणार्‍या लोकांची संख्या वेगळी बस लावण्यासाठी पुरेशी नसते. लोक कमी असतात, म्हणून कंपनी छोट्या गाड्यांचा वापर करते. साधे एकनॉमिक्स आहे ते. वरुन, जर कॅब बंद केल्या तर ड्राइवर लोकांच्या पोटापाण्याच काय? इडिका चालवणारा दुसरा तिसरा कोणी नसून, तो आपल्याच गल्लीतला पोटापाण्यासाठी झटणारा तरुण असतो. त्यांची रोजिरोटी कशाला काढून घ्यायची?

या वर एक उपाय मात्र नक्की आहे. प्रतेक आय.टि. कंपनीने स्वतंत्र रहदारीची सोय करण्याएऐवजी सर्व कंपन्यानी मिळून शिफ्ट मधे काम करणार्‍या लोकांसाठी संयुक्त बस सेवा ठेवावी. त्यामुळे कदाचित अपघात कमी होतील. पण, बस ड्राइवरने काळजीने बस चालवली नाही तर हा पर्यायसुद्धा काही कामाचा नाही.

रॅश ड्राइविंगचा प्रॉब्लेम सोडवायचा असेल तर कॅब कंपनी आणि कॅब ड्राइवरच्या प्रशिक्षणावर भर दिला पाहिजे. किंबहुना सर्व (टू वीलर, थ्री वीलर, फोर वीलर, प्राइवेट आणि पब्लिक) प्रकारच्या ड्राइवरनी सुरक्षित आणि नियम पाळून गाड्या चालविल्या पाहिजेत. प्रवाश्यांना सुरक्षित पोहोचवणे ही प्रत्येक ड्राइवरचे कर्तव्य असते. त्याची जाणीव कॅब ड्राइवर्सना करून दिली तर आपोआप ते नीट चालवतील की गाड्या. आजकाल, कॅब कंपन्या सुधारल्यात - सगळ्या कॅबवर रॅश ड्राइविंगची तक्रार करायला फोन नंबर दिलेले असतात. थोडक्यात सांगायाच तर, ड्राइवरला सुधारा, उगाच आय. टी. वाल्यांवर राग काढू नका.

मी स्वतः पुण्यात सेनापती रोड वर सिग्नलला दोरी घेऊन सिग्नल तोडणार्‍याणा थांबवायाला उभा असायचो. पण टू व्हीलर वाले आणि कार वाले सिग्नल संपायच्या आत पळ काढायचे. आता, असा तिरसटपणा ड्राइवर्सनी केला तर त्यात आय. टि. वाल्यांचा काय दोष?

तुम्ही आम्ही आपलं ड्राइविंग सुधरुया, मग अमेरिकन कंपनी, राशत्रिय स्वयन्सेवक सन्घ, सेवादल या पैकी कोणाचीच गरज पडणार नाही. आणि आपणच सुधरायचं नाही असं ठरवलं तर अमेरिकन कंपनी, राशत्रिय स्वयन्सेवक सन्घ, सेवादल सोडाच, ब्रम्हदेव जरी आणून उभा केला तरी काही फरक पडणार नाही. काय खरं हाय नव्हं?

विश्वा तुम्ही फारच सिरियस प्रतिसाद दिलायत. तो अतिशय जेन्युइन आहे यात शंका नाही. पण हे लिखाण आहे का तितके वर्थ?

स्व. गोपीनाथ मुंडे या व्यक्तीचे कार्य महान आहे आणि त्यान्च्या जाण्यामुळे अतिव दु:ख झालेले, तिव्र धक्का बसलेले माझ्यासारखे लाखो लोक आहेत... त्यान्चे नाव बाफ च्या मथळ्यात एव्हढ्यातच आलेले जाम खटकले आहे. अपघातास २४ तासही होत नाही आणि अशा नाजुक विषयावर चर्चा करण्यासाठी बाफ निघतो... हे मला स्विकारायला जड जात आहे Sad .

रस्ते अपघात या विषयावर प्रामाणिक चर्चा घडावी असे वाटत होते तर मथळ्यामधे त्यान्चे नाव लिहायचा मोह टाळायचा होता... त्यान्चे नाव लिहणे आवश्यक होते तर काही दिवस तरी थाम्बायचे...

दक्षिणा,

शेवटी इतरांच्या विचारांना वर्थ बनवनं (किंवा न बनवनं) आपल्याच हातात आहे, नाही का?

माझ्या मते दुर्योधनरावांचा रॅश ड्राइविंगचा मुद्दा आणि राग (काही अंशी) योग्य आहे. आजकाल असा राग येनं गरजेचं आहे. रॅश ड्राइविंग हा खरचं मोठा प्रॉब्लेम आहे. पण तो राग चुकीच्या जागी (आय टी मधल्या लोकांवर) वापरला तर त्यातून चांगलं निष्पन्न होईल असं वाटत नाही. त्यांचा राग योग्य त्या मार्गी लागावं आणि त्यातून काही चांगल्या गोष्टी घडाव्या या शुद्ध हेतूने मी माझा प्रतिसाद नोंदवीला. Happy

आणखी एक... आजकाल नवीन प्रकारचा भेदभाव सुरू झालाय. पुर्वी जाती धर्मावरून भेद व्हायचे, पण आजकाल नोकरीच्या क्षेत्राच्यावरुन (आयटी - नॉन आयटी) भेदभाव सुरू झालाय. कॅब चा प्रश्न असो किंवा घरभाड्याने देण्याचा, आयटी वाले म्हणून लोक बराच प्रकारे त्रास देतात. हे काही अंशी कमी व्हावे हा माझ्या प्रतिसाद देण्याचा दुसरा हेतू Happy

मि कुनालाच उत्तर देनार नाहि आता. आयटिवाल्यान्नि आयटिच नाव आल म्हनुन विशय भर्क्टवला.
सकाल मधे महिनाबर या विशयावर लिहुन येत होत तेव्हा का नाहि कोन बोलल ? आयटि वाल्यान्च कितिपन खर असल तरि कम्पनि कायदा सगल्यान्ना एकच लागु होतो का वेगवेगला ? इन्दिका रफ चाल्वतात हा सगल्यान्चा अनुभव आहे. ते का रफ चाल्वतात याच कारन पन सकाल मधे दिल होत. मि काहिच मनाने लिहिलेल नाहि. आनि तशे अनुभव पन आहेत.

मुम्बईत टेक्सिवाला टेक्सि चालवायला दिपोझित भरतो. इन्दिका वाले लायसन नसलेले डायवर असतात. गाडि तिस-याचिच असते.ठोकलि तरि कुनाला काहि नसत. कम्पनित जानारी पन मानसच असतात. त्याना कम्पनि कायदा लागु आहे. त्यान्ना पन इन्दिका चालु केलि तर किति गाद्या रस्त्यावर येतिल ? आयटि कम्पन्यान्च्या अटि कशा पन मान्य करुन कायदा धाब्यावर बसवयाने इन्दिकाचि सिस्टिम आलि. बसचि सिस्टिम राबवन काय अशक्य नव्हत. त्या बसचि जबाबदारि कम्पनितल्या अधिका-यावर ताकलि कि अपघात कमि होतिल. इन्दस्त्रियल एरियाच्या बस काहि आतल्या भागात येत नाहित. ते पन मानसच आहेत. आयटित काम करना-यानि स्वथावर का ओधवुन घेतल आहे ते मला कलत नाहि. मि जे इथ लिहिल तेच काल एबिपि माझा मधे वाचुन दाकवत होते. यावरुन काय ते समजा या विशयाच महत्व.

गोपिनाथ मुन्डेनच नाव का लिहिल ? तुम्हाला एकत्यालाच हा प्रश्न पदला आहे. त्याच कारन आधि दिल आहे. गुदनाईट !

आपल्या मुलान्चि नाव कुनि झक्कि, बेफिकिर, इब्लिस अशि ठेवतात का ? विद्न्यानदास असु शक्त. अन मानसासारका मानुस असुन मलाच दुआय म्हन्तात. तर उदवतात. यालाच कम्पुशाहि म्हनत अस्तिल. मि इत्क सोप लिहुनपन कस कलत नाहि ? जेवायला गेल्तो तरि विशवास नाहि ? उपाशि बसुन उत्तर द्यायच का ?

१. इतक्या मोठ्या मानसाच्या, त्यात पन मन्त्रिला अपघात झाला. म्हनुन या विशयावर चरचा व्हायला पाहिजे.
२. धदक देनारि गाडि इन्दिका होति. अशा कोन्ट्रेक्टच्या गाद्यान्चि सन्ख्य खुप वाधलि आहे आनि या सगल्याच फास्त असतात. त्यावरुन आयति स्केतर साथि जि इन्दिका गाद्यान्चि सिस्टिम आहे त्यावर पन बोलायला पाहिजे ना ? या गाद्यान्चि जबाबदारि या कम्पन्या घेत नाहित हे कस चालल ?
३. कुनाला पन कारचा उपयोग पेसेन्जर नेन्यासाथि करायचा असल तर रिक्शा, टेक्सि, बस प्रमाने गादिचा परवाना घ्यवा लागतो. गादि चालवायचा परवाना वेगला. इन्दिकाचा बिझनेसच बेकायदेशिर आहे.
४. कम्पनि कायद्या प्रमाने कामगारान्चि वाहतुक करायला बस सेवा असते. जि बस घेनार तिचि माहिति आरटिओला द्यावि लागते. कम्पनिचा एक अधिकारि या बसने रस्त्यात केलेल्या अपघाताला जिम्मेदार असतो. आयटि वाले अस करतात का ? इन्दिका वाल्यान अपघात केला तर यान्चे हात वर. इथ पन तेच सान्गताहेत. अशे वेगवेगले रुल असु शकतात का ? तुमचि मुल शालेत पाथवता ना ? मग बस वाला आमचा नाहि, काहि झाल तर शाला जबाबदार नाहि हे आवडल का ऐकायला ? शालेला कदक नियम आनि खुप पैशे कमावना-या कम्पन्याना सुट अस का ? कम्पन्यात जे अधिकारि उशिरपर्यन्त थाम्बतात त्यान्च्यासाथि कम्पनिच्या स्वथाच्या गाद्या असतात. स्वथाचा डायव्हर अस्तो. हा खर्च तालायला लोकान्चा जिव धोक्यात का घालायचा ?
५. फक्त आयतिच्या गाद्या हाच पोइन्त नसुन दिल्लित किति अपघात झाले ते पन दिल आहे. हे काय इन्दिकावाल्यानि केले नाहित. मग जरा विचार केला असत तर विशय भर्कटला नसता. हा विशय फक्त आयटित काम करना-या आनि गादित बसना-यान्साथि आहे हे कस काय वातल हे मला कलत नाहि.
६. सगल्यात शेवटि मि विचारल आहे कि अजुन काय ? म्हनजे तुम्हि चान्गले पोइन्त आनु शक्ला असता. पीम्टिच्या कोन्त्रेक्त मधल्या बसेसवर पन लायसन नसलेले डायव्हर असतात.
अपघात हा विशय कुनालाच सिरियस वाटत नाहि. या घतनेमुल तरि लोक जागे होतिल अस वातल होतम.
’या विशयावर बोलुअन आपल्याआ वाइत वातल्याने सर्वान्चि माफि माग्तो.

१. इतक्या मोठ्या मानसाच्या, त्यात पन मन्त्रिला अपघात झाला. म्हनुन या विशयावर चरचा व्हायला पाहिजे. >> बरोबर. मंत्रीअसो किंवा साधा माणूस .. प्रत्येक जीव मोलाचा असतो. अश्या प्रसंगांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी चर्चा झाली पाहिजे. चर्चा करा पण नीट लॉजिक वापरुन योग्य कारणांवर चर्चा करा. चर्चा पीण पोइन्टेड पाहिजे. लॉजिक नीट नसेल तर मूळ मुद्दा बाजूला राहतो आणि बाकीचे मुद्दे डोकं वर काढतात.

२. धदक देनारि गाडि इन्दिका होति. अशा कोन्ट्रेक्टच्या गाद्यान्चि सन्ख्य खुप वाधलि आहे आनि या सगल्याच फास्त असतात. त्यावरुन आयति स्केतर साथि जि इन्दिका गाद्यान्चि सिस्टिम आहे त्यावर पन बोलायला पाहिजे ना ? या गाद्यान्चि जबाबदारि या कम्पन्या घेत नाहित हे कस चालल ? >>> आय. टी सेक्टर इडिका गाड्या स्वतः विकत घेत नाही किंवा चालवत नाही. इडिका पुरवणार्या कंपन्या वेगळ्या असतात. आय टी सेक्टर त्यांची सेवा विकत घेते. तुमचे म्हणाण्याप्रमाणे, इडिका पुरवणार्या कंपन्यांनी सुरक्षेची जबबदारी घेतली पाहिजे.

३. कुनाला पन कारचा उपयोग पेसेन्जर नेन्यासाथि करायचा असल तर रिक्शा, टेक्सि, बस प्रमाने गादिचा परवाना घ्यवा लागतो. गादि चालवायचा परवाना वेगला. इन्दिकाचा बिझनेसच बेकायदेशिर आहे. >>> बेकायदेशीर पणे इडिका चालवणार्याण्ना पोलिसांनी अटक करावी. तुम्हाला असा कोणी दिसला तर नक्की पोलिसात तक्रार करा.

४. कम्पनि कायद्या प्रमाने कामगारान्चि वाहतुक करायला बस सेवा असते. जि बस घेनार तिचि माहिति आरटिओला द्यावि लागते. कम्पनिचा एक अधिकारि या बसने रस्त्यात केलेल्या अपघाताला जिम्मेदार असतो. आयटि वाले अस करतात का ? इन्दिका वाल्यान अपघात केला तर यान्चे हात वर. इथ पन तेच सान्गताहेत. अशे वेगवेगले रुल असु शकतात का ? तुमचि मुल शालेत पाथवता ना ? मग बस वाला आमचा नाहि, काहि झाल तर शाला जबाबदार नाहि हे आवडल का ऐकायला ? शालेला कदक नियम आनि खुप पैशे कमावना-या कम्पन्याना सुट अस का ? कम्पन्यात जे अधिकारि उशिरपर्यन्त थाम्बतात त्यान्च्यासाथि कम्पनिच्या स्वथाच्या गाद्या असतात. स्वथाचा डायव्हर अस्तो. हा खर्च तालायला लोकान्चा जिव धोक्यात का घालायचा ? >>> गाडी ज्याची जबाबदारी त्याची, साधा सरळ नियम आहे तो. शाळेच्या बस चा अपघात झाला तर शाळा जबाबदारी घेते हा चुकीचा समज आहे तुमचा. जर बस शाळेच्या मालकीची असेल तरच शाळा जबबदारी घेते, नाहीतर ती जबाबदारी बस मालकची असते. शाळेची नाही!

५. फक्त आयतिच्या गाद्या हाच पोइन्त नसुन दिल्लित किति अपघात झाले ते पन दिल आहे. हे काय इन्दिकावाल्यानि केले नाहित. मग जरा विचार केला असत तर विशय भर्कटला नसता. हा विशय फक्त आयटित काम करना-या आनि गादित बसना-यान्साथि आहे हे कस काय वातल हे मला कलत नाहि. >>> तुमच्या मूळ लेखात तुम्ही आय टी मधल्या लोकांवर भडास काढलीत त्याचा परिणाम आहे हा.

६. सगल्यात शेवटि मि विचारल आहे कि अजुन काय ? म्हनजे तुम्हि चान्गले पोइन्त आनु शक्ला असता. पीम्टिच्या कोन्त्रेक्त मधल्या बसेसवर पन लायसन नसलेले डायव्हर असतात. >>> आणले की चांगले पॉइण्ट. तुम्हाला (म्हणजे इथल्या सगळ्यांनाच) खरंच काही करावं अस वाटत असेल तर एक सल्ला आहे. आय टी कंपन्यांच्या अॅडमिनला पत्र पाठवून कळवा की रॅश गाडी चलवण्याच रेकॉर्ड असलेल्या कंपन्यानकडून इन्नडिका भाड्याने घेऊ नका म्हणून. आय टी मधे काम करणार्‍यांनी अॅडमिन वर थोडं प्रेशर आणा किंवा रॅश चालवणार्या ड्राइवरच्या इन्नडिका मधे बसण्यास नकार द्या. मग आपोआप चांगला बदल घडेल.

अपघात हा विशय कुनालाच सिरियस वाटत नाहि. या घतनेमुल तरि लोक जागे होतिल अस वातल होतम. >>> अपघात हा विषय सीरीयस आहे आणि सगळ्याना तो सीरीयसच वाटतो. पण इथे विषय ज्या पद्धतीने मांडला गेलाय त्यामुळे चर्चा भरकटली.

’या विशयावर बोलुअन आपल्याआ वाइत वातल्याने सर्वान्चि माफि माग्तो. >>> असु द्या हो. हे चालायचाच.

दुर्योधनराव... तुम्ही रॅश ड्राइविंगचा मुद्दा चर्चेला आणून खरच चांगला काम केलय. त्याबद्दल आभार. आत्ता चर्चेला रुळावरून घसरू न देता (आणि आय टी वाल्यांवर फाइरिंग ना करता) आपण सगळे काही तरी चांगला मार्ग काढू. पटलं काय?

विश्वा - कानतोंडे अशुद्ध लिहीत असले तरी त्यांचे मुद्दे तुमच्यापेक्षा योग्य आहेत. जरा शाळेच्या वाहतुकीबद्दलचे जीआर काढून पहा गेल्या वर्षीचे. सार्वजनिक वाहतूकीसाठी परवानगी नावाचं काही प्रकरण आहे का ते गूगळून पहा जमल्यास. असं काही असतं हे गावीही नसल्याने सगळा गोंधळ उडत असावा.

आठवले साहेब,

१. मी काणतोंडेनच्या शुद्धलेखनाच्या विषयी कधीच आक्षेप घेतला नाही. हा मराठीच्या परीक्षेचा पेपर नाहीय याची मला पूर्ण जाणीव आहे. कानतोंडेंना काय म्हणायचे आहे ते मला समजतं आणि ते माझ्यासाठी पुरेसं आहे.

२. "त्यांचे मुद्दे तुमच्यापेक्षा योग्य" हा निव्वळ तुमचं मत आहे आणि त्याची कारणं तुम्ही दिलेली नाहीत. त्यामुळे तुमच्या उत्तरातून फार काही उपयोगी बाहेर पटत नाही. असे जनरल स्टेट्मेंट करण्यापेक्षा मुद्द्याला धरून उत्तर (काय बरोबर आणि ते का बरोबर) दिल्यास चर्चा जास्त उपयोगी ठरेल. मी काणतोंडेनच्या मुद्द्याला उत्तरे दिली आहेत. त्यावर तुम्हाला काही विचार मांडायचे असतील तर कृपया मुद्द्याला धरून लिहा. मी जरूर त्याच स्वागत करेन.

३. सार्वजनिक वाहतूकीसाठी परवानगीचे नियम नक्कीच उपलब्ध असतील. ते नियम कॅब / बस वाल्यांना लागू होत असतील तर त्याची अंमलबजावणी कशी करता येईल या विषयी चर्चा करू आणि मार्ग काढू. उगाच आयटी वाल्यांच्या नावाने शंख करून तो मुद्दा सुटणार नाही - उलट विषयांतर होईल आणि मूळ प्रश्न बाजूला पडेल. जर कॅबवाले कुठला नियम मोडत असतील तर त्यांना सरळ करायची जबाबदारी ट्रॅफिक पोलीस, मनपा, आणि प्रशासनाची आहे. आपण सगळे मिळून त्यांच्या नावाने शंख करूया आणि त्यांना जागं करूया. फुकट आयटी वाल्यांना कशाला धारेवार धरायचं?

४. जर नीट वाचले तर तुम्हाला कळेल की मी कानतोन्डेन्चा मुद्दा उचलून धरण्याचा आणि चर्चेतून काहीतरी उपयोगी निश्पन्न करण्याच प्रयत्न करतोय.

...तर सांगा ...कसे सोडवता येतील रॅश ड्राइविंग चे प्रॉब्लेम्स (आणखी कुणाचा जीव जाण्याआधी)?

नोटपॅड मधे टाईप करून कॉपी पेस्ट करून पाहिले, पण काहीतरी गडबड होत आहे.
माबोच्या प्रतिसाद खिडकीमधे टाईप करणेच सोपे आहे.

वरील प्रतिसाद पाहून,
मी दुकानरावांचा (किंवा दुकानराव माझा) डुआयडी आहे असा गैरसमज वाचकांनी कृपया करून घेऊ नये ही विनंती.

दुर्योधन,
आपण हे नाव घेऊन इकडे आलात हेच कौतुकास्पद आहे.एका दु-पात्राच्या नावाने संचार करणेही धाडसाचे.

आपण आपले मुद्दे शुध्द मांडावेत.ते वाचायला योग्य वाटतील.तसेच त्यावरच्या उपायांचा ऊहापोहही करावा. माबोवर मतभेद होणे हे उच्च विद्वत्तेचे लक्षण आहे,हे ध्यानी असू द्यावे.दुर्योधन कुटील असला तरी तो हुशार होता एवढे बरे वाटावेसे होते त्याच्यात.

तेव्हा मूळ मुद्दा व्यवस्थित परत पुढे आणा.एकाचवर खापर फोडताय तुम्ही,तेवढं आवरा.
लेखन सतत यावे.आभारी आहे.

Pages