गोपीनाथजी मुंडे साहेबांचा दुर्देवी अपघात - जबाबदार सगलेच. कधि सुधारनार ?

Submitted by Babaji on 3 June, 2014 - 21:59

गोपीनाथजी मुंडे साहेबांचा दुर्देवी अपघात होवुन आता ते आपल्यात नाहीत. यावर अजुनपण विश्वास बसत नाहि. सकाळि उठल्यावर वाटल कि काल पडलेल वाइट स्वप्न असल. पन हे खर आहे. अपघात कि घात यात पडायच नाहि, तर इतक्या महत्वाच्या नेत्याचा अन्त एका अपघातात झाला याच दु:ख आहे. यातुन आपन काय शिकनार ?

देशात अपघातात जितके लोक मरतात तितके कुठल्याच कारणान मरत नाहित. बॊम्बस्फोट झाला कि खुप दिवस दळण दळतात. पन अपघात झाला तर कुनीच काहि बोलत नाहि. आता तरि आपन जागे हौ. अपघाताचि कारनं सर्वान्नाच माहित असतात.

दिल्लित तर खुपच अपघात होतात. तिथ कुटलिच गाडि अशि नाहि जिला घासलेल नाहि. कालच्या वर्षि दोन हजार जन अपघातात मेले. यावर्षि आतापर्यन्त एक हजार मेलेत. या प्रत्येकाच्या घरि जेव्हां खबर जात असल तेव्हा काय वाटत असल ? मुंडे साहेब गेले तेव्हा आपल्या सगळ्याना धक्का बसला, मग सामान्य मानुस गेला तर त्याच्यावर डिपेण्ड असनारे काय ? सगळ उद्धव्स्त होवुन जात. सकाळि गेलेल मानुस परतत नाहि. हे भयानक ! ( अपघाताचि भयानकता समजुन घ्यावि).

अपघात टाळता येतात ?
----------------------
मुन्डे साहेबाचा अपघात टालता आला असता. आपल्या देशात खुप रफ गाड्या चालवतात आनि कोनच लक्ष देत नाहि. या इंडीकामुळ एक उदाहरन पुन्याच दिल तर चालेल. सकाळी सकाळी इन्डिका वाले एकदम फास्ट असतात. फिरायला गेलेल्या लोकान्ना उडवलं पन आहे. या इंडिका वाल्यानबद्दल सकाळ च्या टूडे मधे महिनाभर लेखमाला आली होती. फोटो सहित यायच. लोकांना अनुभव पण येतात. या इंडीका वाल्यांवर कंपनीचा कन्ट्रोल नाही. ते एजन्सिकड बोट दाखवतात. गाड्या आयटी कम्पनीच्या कर्मचार्यांसाठी रस्त्यावर वाहतूक करतात, पण आयटी कंपनी जबाबदार नाही. या इन्डिका एकदम रफ असतात. रात्रि बेरात्रि आनि पहाटे फुल स्पिड मधे चालतात. फक्त या इंडीकाच नाही, तर हायर करायच्या सगळ्याच गाड्या रफ चालतात. मुन्डे साहेबान्चि धडक पन अशाच गाडीशी झालि. हे कोन रोखणार ? हि कुनाची जबाबदारि आहे ? नितिन गडकरी ज्या खात्याचे मंत्री आहेत त्या खात्याकड ही जबाबदारि देता येइल का ?

आयटि वाल्याना इन्डिका कार कशाला पाहिजे ? कायद्यात ते बसत नाही. आयटी कंपन्याना लालगालिचा अन्थरताना पवार साहेबानी कायदे वाकवायचि परवानगी दिली होती, त्याचं हे फळ आहे. नियमाप्रमाणे इन्डस्ट्रियल एरियात बस कम्पलसरी असते आणि कंपनीला तिचि जबाबदारि घ्यावि लागते. अपघात झाला तर कंपनिचा एक अधिकारी लगेच तिकडे जातो. निकाळजे राहिल्यावर कंपनीवर लिगल एक्शन होउ शकते. कंपनीला बस हायर कराव्या लागतात. आरटीओला पॆसेंजर्स, कुठ चढनार उतरनार त्या स्टॊप ची माहिती, ड्रायव्हरचा फोटो, पगार की कॊन्ट्रॆक्ट, लायसन नंबर हे सगळं द्याव लागत. त्यामुळ बसेस काळजीपुर्वक चालवाव्या लागतात. अपघात झाला तर कंपनीला अपघातात्ल्या जखमीला हॉस्पिटलचा खर्च आणि नुकसानभरपाई द्यावि लागते. आयटि वाल्याना हे नियम नाहित का ? कसलि जबाबदारि नको म्हनुन इन्डिका वाल्या कंपनीशी कोन्ट्रेक्ट करतात. त्यामुल एका बस आइवजि दहा इन्डिका रत्स्यात येतात. या गाड्या एकदम घरापर्यंत येतात. कर्मचार्याना मोठ्या रस्त्यापर्यंत जायला यायला काय अडचन आहे ? येवडे टिकोजीराव असतिल तर कंपनिला कामाच्या जवळ क्वार्टर बांधुन द्यायला कम्पल्सरि करा. हे एक. (अशीच अट होती पन बिल्डर लोकांसाठि काय झाल माहित नाहि). अशा नियम वाकवन्याने कस काय कायद्याच राज्य राहणार ? सिग्नलला कुनी थांबत नाही. सायकलवाल्याला कुणी विचारत नाहि. रिक्षा बेकायदेशिरपने पॆसेंजर घेतात. कुठही थांबतात. ट्रकवाले फास्ट लेन मधे घुसतात. एक्सप्रेस हायवेला ट्रकवाले भिति वाटल अशि गाडी हानतात. कुनीच बघनारं नाही. .

असे अपघात टाळण्यासाठि काय करायला पाहिजे ?
=================================

लायसन देन्यापासुन सुधारल पायजे सगळ. अमेरिकेत परिक्षेत पास झाल नाहि कि लायसन मिळत नाहि. फुल कंपुतराज्ड सिस्टिम असते. त्या अमेरिकन कम्पनिला बोलावुन त्यान्च्याकदुन लायसनचि सिस्टिम चालवायल पायजे. अमेरिकन नको असतील तर प्रामानिक सामाजिक संस्था उदा- राश्त्रिय स्वयंसेवक संघ, राश्ट्रीय सेवादल अशा लोकाना चालवायला द्यायला पाहीजे. पोलीस नकोच. .ज्यांना लायसेन दिलेत त्याची पन परत टेस्ट घ्या.

पैशे खानार्या पोलिसांच काय करायच ?
ट्राफिक कंट्रोल जरायच्या ऐवजि लपुन बसुन शिकार करनारे पाच सहा पोलिसवाले सगळिकड बघायला मिळतात. काय गरज यांचि कंट्रोल करणार नसतिल तर ? रात्री महत्वाच्या रस्त्यावर पोलिस बन्दोबस्त पाहिजे. दोन शिफ्ट मधे पोलिस पाहिजे. पगार वाधवा, टेक्स घ्या, कायपन करा.

अजुन काय करता येईल ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अपघातासारख्या विषयात उगाच आयटी लोकांच्या सवयी / संघ/ अमेरिकन कंपनी / सेवा दल / करप्शन याची सरमिसळ होतेय का हा सगळा मालमसाला आहे?
फ्लेमवोर टाळा.

हा काय मसाला नाहि. पन तुम्हाला तस वातत असल तर काय करनार ?

इन्डिका गाड्याना खुप सोसायट्यानी आत यायला बन्दि केलि आहे. सकाळ पेपरमधे इन्डिकावाल्यान्च्या सवयिबद्दल मोहिम चालवलि होति. इन्दस्त्रियल एरियातले कामगार बसन जाऊ शकतात तर आयटितल्या कामगाराना बस का नाहि ? त्यान्ना दिलेल्या टायमिन्गमुळे ते रफ चालवतात नाहितर पैसे कटतात. पन त्यामुळ लोकान्च जिव का धोक्यात घालाअचा ?

लायसन निट दिल तर अपघात कमि होतिल. पैशे देउन घरि बसुन लायसन मिळत. मग अपघात होनार ना ?

दुकानभाऊ, फक्त आयटीआल्यांसाठी येणार्‍या गाड्यांमुळे अपघात होतात का? Uhoh

आम्हाला परवडतं म्हणून आम्हाला गाड्या लागतात... तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का?
उगाच आयटीवाल्यांच्या नावाने ओरडण्यापेक्षा असं म्हणा की - की त्या कॅबवाल्यांना वेळेवर जायला काय होतं म्हणजे गाडी रफ चालवावी लागणार नाही...

आजकाल आयटीवाल्यांच्या नावाने उगाच काहीही झालं तरी आरडा ओअरडा करण्याची फॅशन आलेली दिसते Uhoh

अपघात वाईटच. पण तो ज्याच्यामुळे घडला, त्याला दोष द्या नं. उगाच आयटीवाले, जे कॅबमध्ये बसले असतात त्यांना दोष देण्याच काय अर्थ. कालच मी लायसन्स पर्मनंट करायला गेलो होतो, तिथे कोणी गाडी चालवल्याशिवाय लायसन्स मंजुरी मिळत नव्हती, अगदी एजंट असुनही.
परदेशात इतके कडक कायदे असुनही अपघात होतातच ना? हा निव्वळ व्यक्तीचा निष्काळजीपणा आहे. कदाचित लहानतोंडी मोठा घास असेल, पण मुंडेंनी सीट बेल्ट बांधला नव्हता, तेही एक कारण असु शकते, की घाबरल्याने/ कोसळल्याने हार्ट-अटॅक आला असावा. आणि इतकी घाई कशाची असते तेच कळत नाही. जायचं अंतर १०-१५ मिनिटं उशीरा पोहचलो तर पोहचू नाहीतर पोहचवणारे लागतील.
किमान या अपघातातुन सीट बेल्ट लावावा, हे जरी कोणी शिकलं तरी पुष्कळ झालं.

अपघातासारख्या विषयात उगाच आयटी लोकांच्या सवयी / संघ/ अमेरिकन कंपनी / सेवा दल / करप्शन याची सरमिसळ होतेय का हा सगळा मालमसाला आहे?>>> अनुमोदन

रीयादेवि

तुमच्यईतका शिकलेला, हुशार नाहि. तुम्हि खुप पैशेवाल्या पन असाल. घरि मर्सिदीज पन असल. अम्बानि भाउ ना पैशे पन उधार देत असाल. त्यच्याशि मला काय घेनं देनं ?
कंपनी वाल्याना कायदा आहे बसचा. आयडिवाल्याना का नाहि ? आयटिवाल्याना केबवाला पोचतोय म्हनुन फोन करतो. तरिपन खालि येत नाहित. पोचल्यावर दोनदा र्न्ग देतो. आधि तर जोरजोरात होर्न वाजवायचे. सोसायटिवाल्यान्नि बन्दी घातल्यापासुन रिन्ग देतात. मग साहेब खालि येतात. दोन मिन्टं उशिर झाला कि गाडी फास्ट हानायला लागती. यात दोश कुनाचा ? आणि डायव्हर फास्ट गाडि हानत असल्यावर आत बसलेल्याना तोन्ड नाहि व्हय सान्गायला ?

आमचा प्रोब्लेम इतकाच कि आमच्या जिवाशि नका खेळु, कम्पनिच्या बसचे स्टोप ठरलेले असतात. तिथ त्या वेलेला कामगाराने यायच अस्त. उशिर झाला तर बस निघुन जाते. कुनासाठी थाम्बत नाही. एव्हड साध सुचु नये व्हय आयटिव्याल्यान्ना ? केबच्या गाड्या आयटीवाल्यानी वाढवल्या आनि ट्राफिकचि वाट लागलि म्हनल्यावर बजाज, टेक्लो कम्पन्याना दोश द्यायचा का ?

आयटिवाले म्हनजे आत बसलेले नाहि. ज्यानि हि सिस्टिम आनलि आनि त्याचि जबाबदारि घेत नाहित त्यान्च्या बद्दल बोलायला लागतय. कम्पनिच्या कायद्यात बसचा अपघात झाला तर कम्पनि जबाबदार. आता शालेला पन जबाबदार धरनार. मग आयटिवाले कोन लागुन गेले कायद्याच्या वर ?

आयटीवाले कुठून आले ? (जिथून संघ , सेवादल अले तिथूनच आले असतील)
बातम्यांमध्ये ती इण्डिका एका खाजगी कॅब सर्व्हिसची होती आणि इम्पेरियल हॉटेलच्या कर्मचार्‍यांना नेण्या-आणण्याच्या ड्युटीवर होती, असे म्हटले आहे.
स्कूलबससारखी कंपनीची एक बस ठेवली तर कर्मचारी घरी पोचेतो दुसर्‍या दिवशीची निघायची वेळ होईल.

दुर्योधन साहेब, आयटीयन्स वर बराच राग दिसतोय?

आयटिवाल्याना केबवाला पोचतोय म्हनुन फोन करतो. तरिपन खालि येत नाहित. पोचल्यावर दोनदा र्न्ग देतो. आधि तर जोरजोरात होर्न वाजवायचे. सोसायटिवाल्यान्नि बन्दी घातल्यापासुन रिन्ग देतात.> हे तुम्हाला आलेले अनुभव आहेत का?

आय्टि शब्द आला म्हनुन का ? मि वर सकाळ पेपरमधे महिनाभर इन्डिकावाल्यानबद्दल येत होत ते लिहिलय. एक इन्डिका धड असल तर बघा. मग अपघात होत नाहित का ? या गाड्या कोन वापरतं ?

मग आयटिवाल्यानवर राग आहे का अस का विचारता ? मुम्बईत टेक्सी आहेत. पन आहे का अपघात ? विचार करा कि जरा

तुमच्यईतका शिकलेला, हुशार नाहि. तुम्हि खुप पैशेवाल्या पन असाल. घरि मर्सिदीज पन असल. अम्बानि भाउ ना पैशे पन उधार देत असाल. त्यच्याशि मला काय घेनं देनं ? Lol
घेणंदेणं नाही म्हणुन काही पण लिहायचं Sad
असो. वरच्या अपघातात चुक मुंडेंच्या चालकाची होती हे काही वर्तमानपत्रात लिहुन आलय. त्यावर काय म्हणाल? आणि इंडीका आयटीवाल्यांची नव्हती हेही स्पष्ट झालय. उगाच वड्याच तेल वांग्यावर काढु नका.

बायदवे, मी आयटीवाला नाही. Wink

विजय देशमुख भाउ
तुम्हाला बघुन घाबरले असतिल. आरटिओ मधे एजन्टचे लोक एका गाडित बसवतात. थोड यान, थोड त्याने चालवायच. ईन्स्पेक्टरच सान्गतो साईडने घ्या. आता लायसन देतो, पन कालजी घ्या. सगले पास. ते एक पुस्तक वाचायला लागत ते पन नाहि वाचल तर चालत.

सन्घ आनि देवादल मधे प्रामानिक लोक आहेत म्हनुन नाव लिहिल. मला बाकिचे कुनी माहित नाहित. अशा लोकान्कडे लायसन ठेवल तर निट कायद्याप्रमाने लायसन देतिल नाहितर परत अभ्यास करुन बोलवतिल. आरटिओ आता कधिच सुधारनार नाहि. पैशे दिल्याशिवाय कामच होत नाहि. त्यान्च्याकडुन काम काढुनच घ्यायला पाहिजे.

पन एव्हडा मोठा केन्द्रीय मन्त्री सुरक्षित नाहि तरी ट्राफीक बद्दल बोलायच नाहि का ? कोन जबाबदार याला? सरकार पन आनि आपन पन नाहि का ? यात ज्याना मिसळ वाटतिय त्यान्चा आभारि आहे.

वरच्या अपघातात चुक मुंडेंच्या चालकाची होती हे काही वर्तमानपत्रात लिहुन आलय. ..... आयबि, दिल्लि पोलिस बायपास का ?

चुक मुन्डेच्या चालकाचि असल तर त्याला इत्क समजु नये का ? लोकाना चौकात गाडि कशि चालवायचि हे न समजता लायसन मिळत. याला कायपन म्हननार का ? आभारि आहे साहेब तुमचा पन. तुम्हि फक्त आयटि येवडच धरुन ब्सलात कि राव.

वरच्या अपघातात चुक मुंडेंच्या चालकाची होती हे काही वर्तमानपत्रात लिहुन आलय. ..... आयबि, दिल्लि पोलिस बायपास का ?

चुक मुन्डेच्या चालकाचि असल तर त्याला इत्क समजु नये का ? लोकाना चौकात गाडि कशि चालवायचि हे न समजता लायसन मिळत. याला कायपन म्हननार का ? आभारि आहे साहेब तुमचा पन. तुम्हि फक्त आयटि येवडच धरुन ब्सलात कि राव. दिल्लितच किति लोक अपघातात मेल ते पन दिलय. चुक झालि माझि साहेब. आपल्या सगल्यान्चि माफि मागतो.

दुर्योधनरावांशी सहमत.
(कंपनीच्या कामगारांना ने आण करण्यासाठी जो कायदा आहे तो बहुतेक आयटी सेक्टरसाठी लागू नाही. मला कन्फर्म नाही सांगता येत, पण महिलांना नाईट शिफ्ट आणि कंत्राटी वाहतुक याबाबतीत कामगार कायद्यात दुरुस्त्या केल्यात अस वाचनात आल्याचं अंधुक आठवतं. आयटी सेक्टर सेझ मधे असल्यास तिथे भारतीय कायदे लागू होतच नाहीत. फक्त आर्थिक देवाणघेवाणीबाबतचे निवाडे ज्युरीस्डिक्शन अंतर्गत येतात.)

कानतोडे साहेब,
न कळण्यासारखं यात काय आहे हे मला तरी नाही समजलं. एकदा सांगून झाल्यावर पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नसते. कुणाला तरी प्रॉब्लेम लक्षात येतोच.

दुर्योधना , यावर उपाय आहे हिन्दु सन्क्रुती. उण्दीर, बैल, वाघ, गरुड, रथ , पुश्पक विमान ही वाहने आपण वापरली पाहिजेत

दुर्योधना , यावर उपाय आहे हिन्दु सन्क्रुती. उण्दीर, बैल, वाघ, गरुड, रथ , पुश्पक विमान ही वाहने आपण वापरली पाहिजेत

लगो Lol

व्यआकरनाचा आनि अपघाताच काय सम्बन्ध ?
(चुका व्यकरनाच्या नाहित. कि पत पट दाबताना बोट्म चालत नाहित. काहि काहि कि उठत नाहित दाबल्यातरि).

व्यआकरनाचा आनि अपघाताच काय सम्बन्ध ?
(चुका व्यकरनाच्या नाहित. कि पत पट दाबताना बोट्म चालत नाहित. काहि काहि कि उठत नाहित दाबल्यातरि).

दुकान रावानी मुंडेसाहेबांपासून विषय भरकटवला असला तरी आणि त्यांच्या विचित्र शैलीने ते मांडत असले तरी त्यांनी एका गंभीर विषयाला हात घातला आहे. त्यानी मांडलेल्या बाबी या दखलपात्र तर आहेतच पण आय टी सेक्तरला कॅब ची सवलत का आहे याची जरा माहिती घेतलीच पाहिजे की जी इतर सेक्टरला दिसत नाही. कारण महिला कर्मचार्‍यांचे रेप आणि खून या कॅबचालक कडूनच झालेले आहेत . दुर्दैवाने माहीत असलेली उदाहरणे तरी आय टी तलीच आहेत.बहुधा ज्योती चौधरी केसनन्तर परिवहन मंत्र्यानी सम्बंधित क्षेत्राची बैठक घेतली असता आय टी कंपन्यानी तर सुरुवातील कर्मचार्‍यांची सुरक्षा हा आमचा विषयच नव्हे अशीच भूमिका घेतली होती . आजही नवीन कर्मचारी जॉइन झाल्यावर त्याला ट्रान्सपोर्त वाल्याचा फोननम्बर दिला जातो व परस्पर ठरवून घ्यायला सांगितले जाते..नन्तर कॅब ऐवजी बस कम्पल्सरी करण्याचा निर्णय झाला होता असे आठवते पुढे काय झाले माहेत नाही....

जरा पद्धतशीर दाबत जा. आपल्याकडे फास्ट टायपिंगची काँपिटिशन नाही. हळूहळू अन नीट दाबलं की व्यवस्थीत उठतात अक्षरं.
तुमचा कीबोर्ड खराब झालाय का? आजकाल स्वस्तात मिळतात.

व्यआकरनाचा आनि अपघाताच काय सम्बन्ध ?
(चुका व्यकरनाच्या नाहित. कि पत पट दाबताना बोट्म चालत नाहित. काहि काहि कि उठत नाहित दाबल्यातरि).>>>>> बरोबर आहे काही संबध नाही… अहो पण लिखाण जर शुद्ध असेल तर वाचायला बरे पडते म्हणजे ते पटणारे नसेल तरीही

रोबिनहुड साहेब आभारि आहे. सकाल मधे एका पुजारी बाई वर बलत्कार झाल आणि एका बाइला मारुन टाकल तेव्हा खुप आल होत लिहुन. महिनाभर. नन्तर केबवाल्याना विचारल तर ते म्हनतात कि कर्मचारि कधिच वेलेवर खालि येत नाहित. उशिर झाला कि आमच कटिन्ग होत. यातल्या काहि डायव्हर कड लायसन पन नव्हत. पीम्टीच्या कोन्ट्रेक्ट वर घेतलेल्या बसला पन लायसेन नसेलेले डायव्हर असतात. मुन्डे साहेबान्च्या मुळ हा विशय मान्डला. मन्त्रिच जिथ सुरक्शित नाहि तिथ बाकिच्यान्च काय ? इतक्या लोकान्चे जिव जातात पन कुनाच लक्शच नाहि.

लोकहो,

एक कल्पना आली की, घरून काम करायची सोय कायदेशीर करायला हवी. हल्ली घरूनही चांगला राशीदर (डेटा स्पीड) मिळतो. किंवा आस्थापनाची जोडणी वापरता येईल.

आ.न.,
-गा.पै.

रॉबीनहुड
ज्योती चौधरी नाव होतं का ? एक घटना औंध - पाषाण भागातली आणि दुसरी फुरसुंगी भागातली. वर स्कूल बसचा मुद्दा आला आहे. आयटी सारख्या इतकं उत्पन्न मिळवणा-या कंपन्या असं म्हणू लागल्या तर शाळेला दुसरा न्याय कसा ?

बेदरकार ड्रायव्हिंग, सिग्नलला न थांबणे, दुस-या वाहनाला रिस्पेक्ट न देणे या गोष्टी तर कुणीही करू शकतो. त्यासाठी सरकारला दोष देण्याची गरज नाही. परदेशात रस्त्यावर पाय टाकला की ब्रेक लावून कार्स थांबतात. पादचा-याचा हक्क पहिला. आपल्याकडे हे शिक्षणच नाही. कानतोडेंना सांगता येत नसेल कदाचित. पण परदेशात कायदेही कडक आहेत आणि अंमलबजावणीही. आपल्याकडे पोलीस टोळकं करून पावत्या फाडण्यापलिकडे आणि तडजोड करण्यापलिकडे काहीही करत नाहीत. अमेरिकेत परवाना मिळवण्यासाठी परीक्षा द्यावी लागते. ती कडक असते. सर्व कायद्यांचा अभ्यास करावा लागतो. भारतातून गेलेल्यांना तिथे पुन्हा परीक्षा द्यावी लागते यातच सगळं आलं. मुळात कॉमन सेन्स असायला हवा जो दिसत नाही. बसमधून थुंकणे, चालत्या गाडीवरून पिंक मारणे, मोबाईलवर बोलत यू टर्न घेणे हे असले धंदे सुशिक्षित करत असतात.

Pages