मुले सांभाळणार्‍या आयाकडून बाळावर अत्याचार

Submitted by पियू on 13 May, 2014 - 12:46

नुकताच फेसबुकवर एक व्हिडिओ पाहिला: < विषयाच्या संवेदनशीलतेमुळे व्हिडिओची लींक काढुन टाकते आहे. कुणालाही घाबरवण्याचा हेतु नव्हता. सॉरी !!! >

स्त्री काय किंवा पुरुष काय, कोणाचेही मन हेलावेल असा व्हिडिओ बघुन मनाचा थरकाप झाला. लहान मुलांवर कोणी असे अत्याचार करु शकेल असं मन मानायला तयारच नव्हतं.

त्या व्हिडिओच्या कमेंट्स पाहिल्या. एखादी अनाथाश्रामतली घटना असेल, भारतातला व्हिडिओ नाहीये अशी काहीतरी मनाची समजुत घालुन कामावर लक्ष केंद्रीत केलं.

पण आज (थोड्या वेळापुर्वी) साम टिव्हीवर 'पुण्याची पुतना मावशी' या विशेष बातमीपत्रात पुन्हा तेच पाहिलं आणि राहावंलं नाही. पुण्यात ज्याला सांभाळण्यासाठी कामावर ठेवले त्या बाळाला (केवळ काही महिन्यांच्या/ वर्षाच्या) वाट्टेल तसे उचलुन आदळतांना/ त्या बाळाला मारझोड करतांना पाहिले. हाही प्रकार त्या घरात लावलेल्या सीसीटिव्ही कॅमेरात शूट झाल्यामुळे त्या बाळाच्या आईला कळला.

खरंच आपण कुठे चाललो आहोत असं वाटलं. अश्या बातम्या बघुन कोणत्या आईला आपलं बाळ कोणाकडे सांभाळायला द्यायची हिंमत होईल? असे अजुनही कितीतरी अत्याचार होत असतील आणि केवळ सीसीटिव्ही कॅमेरा नसल्याने कोणाच्या लक्षातही येत नसेल.

जी गोष्ट बाळांबाबत तिच गोष्ट आजारी/ बेडरीडन ज्ये. नागरीकांसोबतही घडत असेल असं मनात येऊन गेलं.

कोणाशीतरी बोलावंसं वाटतंय म्हणुन इथे लिहिलंय. नाही आवडलं तर इग्नोर करा. Sad

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जाई, http://www.maayboli.com/node/7805 हा बाफ शोधायचा होता का ?

हो, वरचा विडीओ नाही बघवला माझ्याने.

ह्यावर काय बोलायचे.

नोकरी करताना कोणीही मिळेल त्या मुलीला बाईला नोकरीवर ठेवावे लागते. आपण काम करणार्‍यांचे अ‍ॅड्रेस प्रूफ घेत नाही तर ता बायकांची मानसिक कंडिशन काय आहे ते थोडच चेक करतो.

जर घरात बाळाला सांभाळणारं कोणी नसेल तर सासरचे / महेरचे ह्यांच्यासोबत/ जवळ राहा. कमीत कमी बाईला कामावर ठेवलं तरी तिच्यावर लक्ष तरी राहिल. नाही तर बाळाला पाळणाघरात ठेवा. तिथे अनेक मुलांमध्ये तर रिलेटिव्हली सुरक्षित राहिल. नाही तर नोकरी करू नका किंवा सोडता येत नसेल तर बाळाला जन्म द्यायचा विचार करू नका.

काय अचिव्ह करतात ह्या बायका असं वागून?

स्वतःची नोकरी करियर महत्वाचे की बाळाची सुरक्षितता?

हा व्हिडियो खूप जुना आहे. मी एक - दीड वर्षांपूर्वी बघितला होता फेसबुक वरतीच . ती त्या बाळाची आई आहे कि सांभाळणारी मुलगी आहे ते समजत नाहीये. शेजारी एक छोटी मुलगी पण उभी आहे.

मुलांना स्वताच्याच घरात ठेऊन गावावरून सांभाळणाऱ्या मुली आणण खूप डेंजरस आहे. माझ्या ऑफिस मधल्या माझ्या मैत्रिणीने गावरून मुलगी आणली होती .पण ती सतत फोन वर बोलत असायची परत कुठल्याही वेळी तिचा बोय फ्रेंड घरी येत होता. मुलाचा खाऊ खाऊन टाकायची. त्याला वेळच्या वेळी जेवायला देत नव्हती हे सगळ तिच्या मुलानीच तिला सांगितलं

तिला आम्ही सतत सांगत होतो. पाळणा घरात ठेव. पण तिने कधीच ऐकल नाही Sad .
अशा गावावरून मुली आणून स्वताच्या घरी ठेवण खूपच धोकादायक . त्या पेक्षा पाळणाघरात ठेवावे . मुलांना त्यांच्या सारखे पाळणाघरात येणारे मित्र मिळतात .:) आणि पाळणा घरातही ठेऊ नये अस मात्र कोणी म्हणू नये. कारण काही वेळा वेळा दुसरा पर्यायही नसतो निदान एकट्या पालकांना तरी .:)

पियू,

१४व्या सेकंदाच्या पुढे तो व्हिडिओ बघवला नाही. कृपया ताबडतोब लिंक काढून टाका अशी विनंती, कारण ती पाहून आणखीन लोक हळहळतील आणि त्यांचे विचार वाचून पुन्हा तेच आठवून वाईट वाटत राहील.

कृपया बाफ भलत्या वळणावर नेऊ नका.<<<

नीट समजले नाही. कोणते भलते वळण आणि ते कोण लावणार? आणि हे कोणी कोणाला सांगणे योग्य आहे?

अ‍ॅडमीनच्या शैलीतील सूचना वाटली ही! क्षमस्व!

क्लिप बघवली नाही. जर घरचं/विश्वासाचं कोणी लक्ष ठेवू शकणारं माणूस उपलब्ध नसेल तर पाळणाघराचा ऑप्शन safer वाटतो.

>> कृपया बाफ भलत्या वळणावर नेऊ नका
+१
अर्थार्जन/करिअर करण्याचा याच्याशी काहीही संबंध नाही, मूल किंवा कुटुंबातील वृद्ध/अपंग सदस्य यांच्यासाठी वेळेला मदत कोणालाही लागू शकते.

तो व्हिडिओ भयानक आहे. डोक्यातून जात नाहीये.

मुलांना सांभाळणार्या बायकांचे हे असे प्रसंग इतक्यात बरेच वाचले. इतक्या वाईट थराला जातील इतकं मानसिक संतुलन का बिघडते त्यांचे? Sad

कृपया बाफ भलत्या वळणावर नेऊ नका>>>भलत्या नाही, योग्य प्रकारेच बोलत आहेत त्या.रणरणत्या उन्हात दाणे टिपून आपल्या पिलाला भरवणारी चिमणी ,त्या मुक्या प्राण्याला जे कळते ते आजच्या पोरिंना कळत नाही.
घारीचे लक्ष तिच्या पिलांकडे असते पण करीयर करणार्या बायकांचे लक्ष पैसे आणि चंगळवादाकडे असते .दुर्दैवाने हेच सत्य आहे.

नाही तर नोकरी करू नका किंवा सोडता येत नसेल तर बाळाला जन्म द्यायचा विचार करू नका.
>>>>> हे भलतच वळण आहे बेफि. दुसरे ही ऑपशन आहेत जे वापरले तर असं काही भयंकर टळू शकतं. त्या करता लगेच नोकरी करणे ह्या गोष्टीला दोष द्यायची काहीच गरज नाही.

बेफी, माफ करा पण
>>स्वतःची नोकरी करियर महत्वाचे की बाळाची सुरक्षितता?>> हे योग्य आहे का?
यापेक्षा सुरक्षित नॅनी/आया सर्विस/पाळणाघरांची उपलब्धता, प्रमाणीकरण, कायदे याबाबत विचार व्हायला हवा.

>>>काय अचिव्ह करतात ह्या बायका असं वागून?

स्वतःची नोकरी करियर महत्वाचे की बाळाची सुरक्षितता? >>> हे काय??

>>कृपया बाफ भलत्या वळणावर नेऊ नका>> +१००

तो व्हीडिओ फार फार डिस्टर्बिंग आहे. Sad ती बाई नक्की कोण आहे हे समजत नाही पण मुलांना सांभाळायला ठेवली असेल तर नक्कीच वाईट आहे.

त्या बाळाची आईच असेल तर तिचे मानसिक संतुलन पण तपासून घ्यायला हवे. पोस्ट पार्टम डिप्रेशन बर्‍याच बाळंतीणींना असते. २-३ वर्षे राहीलेली काही उदा आहेत. त्यामधे असं आई सुद्धा करू शकते.

नॅनी ठेवताना, निदान लहान बाळांसाठी तरी, खरंच विचार करा. पाळणाघरात निदान २-३ बाया असतील तर एकीवर दुसरी असे लक्ष राहते. त्यांचे नियम बरेच असतात. पण बाळ लहान असताना स्वतः काय झाले हे सांगू शकत नाही. तेव्हा अशावेळी तरी रजिस्टर्ड डे केअर, किंवा नॅनी + तिच्यावर लक्ष राहील असे घरातले कुणीतरी असा विचार करावा.

घरी कॅमेरे बसवणं हा पण महत्त्वाचा भाग.

चित्रपटात देखील अशा प्रकारचे दृश्य कुणी विचारात घेईल असे वाटत नाही. छळ करणारी ती मुलगी आपण उद्या आई झालो तर माझ्या मुलाला असे कुणी छळेल का ? असा विचार तिच्या मनी एक सेकंदही आला नसेल ? भयानक आहे सारे.... संपूर्ण क्लिप पाहाणे अशक्य झाले....पाहिलीही नाहीच.

पियू....मला वाटते काढून टाकावास तू हा धागा.

इडलीवाला,

>> पण करीयर करणार्या बायकांचे लक्ष पैसे आणि चंगळवादाकडे असते .दुर्दैवाने हेच सत्य आहे.

हे विधान फार सरसकट वाटतं. नोकरी करणारी प्रत्येक बाई करियरवाली नसते. अर्थात आपल्या मताचा आदर आहेच.

आ.न.,
-गा.पै.

सगळ्यांना अनुमोदन .
<<नोकरी करणारी प्रत्येक बाई करियरवाली नसते>> +१११११११११
नोकरी करण हि मजबुरीही असते Sad दुसरा पर्यायच नसतो

अन करियरवाल्या लगेच पैसे आणि चंगळवादाकडे लक्ष असणार्‍या असतात हेही सरसकटच आहे. ज्यांच्या कडे पैसा आहे ते आणखिन चांगल्या सोयी करु शकतात आपल्या मुलांकरता. आता मध्यंतरी वाचलेले उदाहरण म्हणजे याहू कंपनीची सी ई ओ (मरिसा मायर). त्यांच्या ऑफिस मध्ये नर्सरी आहे मुलांकरता.

तुम्ही सगळे का खोडसाळ प्रतिसादांना उत्तरं देताय? सरळ दुर्लक्ष करा. मुद्दाम भडकावण्यासाठी लिहिलेले प्रतिसाद आहेत ते (वेल चा प्रतिसाद पटणारा नसला तरी खोडसाळ नाही)

वेल चा प्रतिसाद पटणारा नसला तरी खोडसाळ नाही<<<

खोडसाळ नाही ह्याच्याशी सहमत! पटणारा नाही ह्याच्याशी काही प्रमाणात सहमत कारण काही जणांना तो पूर्णपणे पटू शकतो. आता ज्यांना पटू शकतो त्यांचे ते विचार चूक आहेत असे काहींनी म्हणणे आणि त्या काहींचे विचार चुकीचे आहेत असे इतरांनी म्हणणे असे वाद होतीलही. पण तरीही 'वेल ह्यांच्या प्रतिसादाशी मनातून पूर्ण सहमत असणारे' जगात खूपजण असू शकतील हे मान्य करायला काय हरकत आहे?

वैयक्तीक मतः - नोकरी व करिअर महत्वाचे असल्याने कोणत्यातरी बाईच्या ताब्यात आपले मूल त्या महिलेने दिलेले नसणार. अश्या घटना दुर्मीळ असतात ( / असाव्यात) आणि बरेचदा माणूस दुसरा माणूस किमान माणूसकी दाखवेल ह्या विश्वासावरच जगत असतो. त्यामुळे थेट ह्या गोष्टीचा संबंध नोकरी व करिअरशी लावता येईलच असे नाही. पण निदान असे काही घडते हे इतरांना समजल्यावर तरी इतरांनी वेळ पडलीच तर करिअरपेक्षा बाळाच्या संगोपनाला प्राधान्य द्यावे हे वेल ह्यांचे मत नाकारता येणार नाही.

चु भु द्या घ्या

स्वाती२ | 13 May, 2014 - 23:15

बेफी, माफ करा पण
>>स्वतःची नोकरी करियर महत्वाचे की बाळाची सुरक्षितता?>> हे योग्य आहे का?
यापेक्षा सुरक्षित नॅनी/आया सर्विस/पाळणाघरांची उपलब्धता, प्रमाणीकरण, कायदे याबाबत विचार व्हायला हवा.
<<<

स्वाती,

नक्कीच! पण वेल ह्यांच्या मूळ प्रतिसादातील ही विधानेही बघा ना आपण!

>>>आपण काम करणार्‍यांचे अ‍ॅड्रेस प्रूफ घेत नाही तर ता बायकांची मानसिक कंडिशन काय आहे ते थोडच चेक करतो.

जर घरात बाळाला सांभाळणारं कोणी नसेल तर सासरचे / महेरचे ह्यांच्यासोबत/ जवळ राहा. कमीत कमी बाईला कामावर ठेवलं तरी तिच्यावर लक्ष तरी राहिल. नाही तर बाळाला पाळणाघरात ठेवा. तिथे अनेक मुलांमध्ये तर रिलेटिव्हली सुरक्षित राहिल.<<<

म्हणजे वेल ह्यांनी तुम्ही म्हणत आहात त्यातील काही पर्याय आधीच विचारात घेतलेले आहेत आणि मग त्यावर तसे भाष्य केलेले आहे. Happy

>>>मूल किंवा कुटुंबातील वृद्ध/अपंग सदस्य यांच्यासाठी वेळेला मदत कोणालाही लागू शकते.<<<

बाईंचे हे मत नीटसे पटले नाही.

वेळेला कोणालाही मदत लागणे हा वेगळा प्रकार आहे. नियोजन करून आपण जेव्हा आपले मूल एका अनोळखी आयाच्या हवाली करतो आणि त्या आयावर लक्ष ठेवण्यास आपल्या घरचे असे कोणीही नसते तेव्हा असे प्रश्न येतात. मूळ लेखातील उदाहरणात 'अचानक, वेळेला मदत आवश्यक झालेली नाही आहे'. Happy

आणि त्यामुळेच त्याचा (काही प्रमाणात) संबंध अर्थार्जनाशी येतो हे वेल ह्यांचे मत मला योग्य वाटते. आई जर नोकरी करत असल्याने अनोळखी व्यक्तीकडे मूल विश्वासाने सोपवत असेल आणि नंतर जर असे प्रकार घडत असतील तर 'पाळणाघर / घरचे कोणीतरी घरात असणे' अश्यापैकी काहीच शक्य नसेल तर करिअरपेक्षा बाळाला अधिक प्राधान्य द्यावं हे त्यांचं मत अगदीच भलते वळण लावणारे वाटू नये.

नाही तर नोकरी करू नका किंवा सोडता येत नसेल तर बाळाला जन्म द्यायचा विचार करू नका.
>>>>> हे भलतच वळण आहे बेफि.<<<

बुवा, तुम्ही हे जे वर लिहिले आहेत - ह्याच्याशी सहमत आहे (बाळाला जन्म न देणे, नोकरी सोडणे हे निव्वळ पर्याय नाहीत ह्याच्याशी सहमत आहे). . फक्त वेल ह्यांनी ते विधान लिहिण्यापूर्वी इतर पर्यायही नोंदवलेले आहेत हे विचारात घेतले जावे.

मी तो व्हिडीओ पाहिला नाही. पाहनारही नाही. इतर नोकरी करणार्‍या/न करणार्‍या कुठल्याच पालकांनी तो व्हिडिओ पाहू नका.
पियु तुम्हाला वाईट वाटल . अस्वस्थ झालात अगदी मान्य. पण हा धागा अशा प्रकारे उघडून काय साध्य होनार? तुम्ही अस्वस्थ झालात तर , काहीतरी कन्स्ट्र्क्टीव्ह होवुदे त्यातून. पालकांना काळजी घेण्यासाठी इनकरेज करा. हे असे धागे टाकून भिती पसरवण्याला हातभार लावू नका ही विनंती.
इग्नोअर करा अस म्हटलय तुम्ही पण हे इग्नोअर करता येत नाही मला म्हणुन लिहिले.

खरे तर उत्तर द्यायची इच्छा नव्हती, पण तुम्ही ३-४ पोस्टी टाकल्या आहेत म्हणून टंकनश्रम घेतेच आता. ( तसा हा माहित असलेलाच मुद्दा आहे, जसे तुमचे प्रश्न नेहेमीचेच व अपेक्षित असेच. )

बाळाला जन्म देणे, न देणे हा निर्णय एकट्या आईचा नसतो, तर आई-बाबा दोघांचा असतो तेव्हा त्याला कुठे कसे ठेवायचे, त्याची सुरक्षितता, नोकरी करणे, न करणे, आईने की बाबांनी सांभाळ करण्यासाठी घरी थांबणे, की घरी थांबायच्या टर्न्स घेणे हे सर्व निर्णय देखील दोघांचे मिळून असतात / असायला हवे. त्यामुळे सर्व गोष्टींचे खापर बाईच्या / तिच्या नोकरीच्या माथी फोडून मोकळे व्हायची घाई नको.

आता मूळ प्रॉब्लेम वर उपाय शोधण्यापेक्षा, स्वाती२ यांनी सुचवलेल्या उपायांची चर्चा करण्यापेक्षा, बायका, त्यांचे करीयर हेच चघळायचे आहे तर काही इलाज नाही.

Pages