मुले सांभाळणार्‍या आयाकडून बाळावर अत्याचार

Submitted by पियू on 13 May, 2014 - 12:46

नुकताच फेसबुकवर एक व्हिडिओ पाहिला: < विषयाच्या संवेदनशीलतेमुळे व्हिडिओची लींक काढुन टाकते आहे. कुणालाही घाबरवण्याचा हेतु नव्हता. सॉरी !!! >

स्त्री काय किंवा पुरुष काय, कोणाचेही मन हेलावेल असा व्हिडिओ बघुन मनाचा थरकाप झाला. लहान मुलांवर कोणी असे अत्याचार करु शकेल असं मन मानायला तयारच नव्हतं.

त्या व्हिडिओच्या कमेंट्स पाहिल्या. एखादी अनाथाश्रामतली घटना असेल, भारतातला व्हिडिओ नाहीये अशी काहीतरी मनाची समजुत घालुन कामावर लक्ष केंद्रीत केलं.

पण आज (थोड्या वेळापुर्वी) साम टिव्हीवर 'पुण्याची पुतना मावशी' या विशेष बातमीपत्रात पुन्हा तेच पाहिलं आणि राहावंलं नाही. पुण्यात ज्याला सांभाळण्यासाठी कामावर ठेवले त्या बाळाला (केवळ काही महिन्यांच्या/ वर्षाच्या) वाट्टेल तसे उचलुन आदळतांना/ त्या बाळाला मारझोड करतांना पाहिले. हाही प्रकार त्या घरात लावलेल्या सीसीटिव्ही कॅमेरात शूट झाल्यामुळे त्या बाळाच्या आईला कळला.

खरंच आपण कुठे चाललो आहोत असं वाटलं. अश्या बातम्या बघुन कोणत्या आईला आपलं बाळ कोणाकडे सांभाळायला द्यायची हिंमत होईल? असे अजुनही कितीतरी अत्याचार होत असतील आणि केवळ सीसीटिव्ही कॅमेरा नसल्याने कोणाच्या लक्षातही येत नसेल.

जी गोष्ट बाळांबाबत तिच गोष्ट आजारी/ बेडरीडन ज्ये. नागरीकांसोबतही घडत असेल असं मनात येऊन गेलं.

कोणाशीतरी बोलावंसं वाटतंय म्हणुन इथे लिहिलंय. नाही आवडलं तर इग्नोर करा. Sad

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो मुद्दा आपण का नाही मांडला असं बेफिकीरना वाटतंय का? <<< Proud

मयेकर तुम्ही काहीतरी ओरिजिनल लिहीत चला बुवा, आलेल्या धाग्यांवर तुमचे प्लस वन्स आणि मायनस वन्स पाहणे आता नेहमीचे झालेले आहे. Proud

<<<<< 'कमी पगारामुळे स्त्रीला नोकरी त्यागावी लागते हे दुष्टचक्र आहे' >>>>>

असेलही परंतू तितकच व्यवहार्य सुध्दा !

आईच्या वर्कींग अवर्समधे बाळाच्या संगोपनाची जबाबदारी एकत्र कुटूंब असूनही घेतली जाईलच याची शाश्वती नसते. तश्यातच बहुतेकवेळा संसाराची नि दोघांच्या करीयरची नव्याने सुरवात झालेली असल्याने दोघांनाही सवलत मिळत नसल्यास एकाने कॉम्प्रमाईज करण्यात काहीच अडचण नसावी. तर या परिस्थित ज्याचा पगार तुलनेत कमी असेल नि ज्याची घराला बाळाला जास्त आवश्यकता असेल अश्या स्त्रिने ते केल्यास फारशी हरकत नसावी. (वै म )करीयर तर पुढेही काही वर्षांनी तिलाही घडवता येतेच.

नीधप यांच्या कल्पनेला दुजोरा देवून सांगू इच्छीते की, माझ्या मुलाच्या जन्मानंतर परिस्थितीला तात्पुरते शरण जाऊन मी माझी ईंडस्ट्रीतली नोकरी तात्पुरती सोडली होती पण या फुरसतीच्या वेळेत बाळाच्या संगोपना व्यतिरिक्त मी बाहेरुन माझ पुढील शिक्षण पूर्ण करत गेले त्याबरोबरीने घरबसल्या ट्यूशन्स घेवून व एका नर्सरीत पार्ट टाईम नोकरी करुन आर्थिक सह्भाग ही देवू शकले.

मुलगा ३ वर्षांचा झाल्यावर एका शाळेत टेक्निकल ईंस्ट्रक्टर म्हणून संधी चालून आली तोवर माझे बाबाही रिटायर झालेले होते ते मुलाचा सांभाळ त्याच्या शाळेच्या वेळेनंतर ३ एक तास आनंदाने करू शकत होते.
सारासार विचार करून मी माझे फिल्ड बदलले व कालंतराने त्या अनुषंगाने नोकरी करत करत माझी शैक्षणीक पात्रता वाढवली. पुढे दोन एक वर्षात गाव बदलावे लागले मुलाच्याच शाळेत त्याच्या शाळेच्या वेळेनुसार स्वत:ची कामाची वेळ जुळवून एक प्रशिक्षित शिक्षिका म्हणून एका मान्यवर संस्थेत पुढील १५ एक वर्षे नोकरी केली.

या दरम्यान बरेच महत्वाचे निर्णय मनावर दगड ठेवून घ्यावे लागले त्यातला एक म्हणजे दुसर मुल होवू न देणं.

वाकला तो संपला नसते असेही
वादळाशी झुंजण्या झुकते डहाळी.

-सुप्रिया.

ज्या विडिओ लिंकमुळे हा बीबी उघडला आहे त्याची सत्यासत्यता पडताळून पहाण्याची गरज आहे. आज माझी मोलकरीण सांगत होती की काल कन्नडा चॅनेल्सवर राजाजीनगर मधली एक नॅनी बाळाला धोपटताना दाखवत होते, तिला पोलिसनी पकडून नेले Uhoh धोपटण्याचे वर्णन वरील प्रकाराशी मिळतेजुळते आहे.

नाहीतर एखाद्या स्त्रीअर्थाजनाविरद्ध असणार्‍या लॉबीने खोटाच विडिओ शूट करून प्रसारित केलेला नसला म्हणजे मिळवल Sad

ज्या बायका कामाच्या ठिकाणी राहुन सतत घराकडे लक्श देत असतात त्या कामाला पुर्ण न्याय देत नाहीत,हा माझा अनुभव आहे.ह्याला अपवाद असतीलही.
त्या नोकरी मुख्यत्वे पैसे ह्या एक्मेव उद्दीस्तासठी करत असतात.
कामे कारकुनी किंवा त्याम्च्या स्वतःपुरतीच असतील तर कदाचित फारसा फरक पदत नाही, पन जबाब्दारीची कामे असतील तर खुप जनांचे ह्यामुळे नुकसान होताना मी पाहिले आहे.
माझ्या सहकार्‍यांमधे अशा बायका नसाव्यात अशी मी देवाकडे सतत प्रार्थना करत असते.अर्थात सगळ्या गोस्ती मनाप्रमाने घडतीलच असे नाही त्यामुले आलिया भोगासी असावे सादर होतेच.

sulu | 14 May, 2014 - 23:19 नवी
<<
अश्या आया/बाब्यांचा पगार सुमारे किती रुपये/डॉलर अस्तो अमेरिकेत?

गूगलून पाहता, रोज ८ तासाचे, ताशी ४ $ प्रमाणे अनट्रेण्ड बेबीसिटरचे सुमारे ४०-५० हजार रुपये मिनिमम पडतील असे दिसले. (The federal minimum wage for covered nonexempt employees is $7.25 per hour effective July 24, 2009. Babysitting is not covered by minimum wages act.)

Depending on where you live and how stiff the competition is for qualified candidates, you may need to pay a full-time nanny between $350 and $700 a week, though if it's a live-in situation and you can offer pleasant living quarters, that may bring your costs down a bit.

ट्रेण्ड नॅनी चे रेट्स हे असे आहेत. १४०० - २८०० $ प्रति महिना. रुपयांतला हिशोब पहाता, गूगलबाबा सांगतात,
1400 US Dollar equals 83160.00 Indian Rupees.
अन १४०० हा कमीत कमीवाला आकडा झाला. भारी पगारवाली न्यानी सुमारे १.६ लाख रुपये. प्र ति म हि ना.

रुपयांच्या हिशोबात हा भारतातील (शासकीय) महाविद्यालयातील प्राध्यापकाच्या पगारापेक्षा जास्त आकडा आहे. या प्रमाणातील पगार मिळणार असेल, तर भारतातही उच्च प्रतिचे ट्रेनिंग दिलेली माणसे मिळायला फारसे अवघड नसावे.

अमेरिकेतल्या नॅनी/हाऊसमेडचा पगार परवडत नाही म्हणून कुणीतरी एका भारतीय बाईंवर बरेच गुन्हे वगैरे दाखल झाल्याचे मध्यंतरी वाचनात आले होते. आता, अमेरिकेत रहाणार्‍या लोकांचा पगार किती, त्यापैकी नॅनीसाठीचा हा पगार एकूण उत्पन्नाच्या किती टक्के असतो वगैरे कल्पना मला नाही. आमची अक्कल गूगलपर्यंतच.

पण, अमेरिकास्थित लोकांनी कळकळीने दिलेल्या चांगल्या व अगदी आयडियल सूचना वाचल्यानंतर, अशा सुविधा तयार करून वापरायच्या असतील, तर भारतातील लोकांनी किती पैसे मोजायची तयारी ठेवली पाहिजे? हा हिशोब डोक्यात आल्याशिवाय राहिला नाही. म्हणून हा टंकनप्रपंच करतो आहे.

कारण मायबोलीवर पैकं किती पडत्यात? हा प्रश्न विचारल्यास उत्तर द्ययची पद्धत नाहिये. पिकनिक स्पॉटच्या धाग्यावर विचारलं, की अहो अमुक ठिकाणी जाऊन आलात, छान रिव्ह्यू लिहिलात, तर सुमारे किती पैसे लागले त्या हॉटेलचे? तर उत्तर येत नाही.

या सुंदर क्वालिटीच्या नाना/न्यानीसाठी किती पैसे लागतील? परत उत्तर येईल की नाही ठाऊक नाही. मीच आपलं गूगलून लिहिलंय, कुणी कन्फर्म केलं तरी पुरे.

सहसा नवर्‍यांचा पगार जास्त असतो म्हणून घरी गरज पडल्यास बाईने करिअर सोडावी हे एक दुष्टचक्र आहे हे लक्षात येत नाहीये का तुमच्या? असो.
>> हे दुष्टचक्र नाहिये. रोहिनी,अनुरुप्,शुभविश्वमधे बहुतांश मुली आणि पालक स्वतः by choiceमहीना किमान १ लाख पगार ,उच्चपदस्थ वर हवा अशी अपेक्षा नोंदवतात्.त्यामगचे त्याम्चे हेतु हे स्पष्टच आहेत.जगातल्या सर्व मुली करीअरीस्त आहेत हा तुमचा गैरसमज आहे.बर्‍याच वेळा करीअर नाइलाजातुन जन्माला येते.

काही लोकांना आज तरी इथे लिहावेसे वाटले>>> अनुमोदन Proud (काय दिवस आले माझ्यावर Happy )

बहुतांश मुली आणि पालक स्वतः by choiceमहीना किमान १ लाख पगार ,उच्चपदस्थ वर हवा अशी अपेक्षा नोंदवतात्.त्यामगचे त्याम्चे हेतु हे स्पष्टच आहेत.जगातल्या सर्व मुली करीअरीस्त आहेत हा तुमचा गैरसमज आहे.बर्‍याच वेळा करीअर नाइलाजातुन जन्माला येते.>>>+१

arc,

>> पन जबाब्दारीची कामे असतील तर खुप जनांचे ह्यामुळे नुकसान होताना मी पाहिले आहे.

सहमत आहे.

मात्र मी बरोब्बर उलट उदाहरण पाहिलं आहे. त्या सहकारीणीला चारेक वर्षांची मुलगी होती. मात्र तिचं सासर मोठं (एकत्र कुटुंब) होतं. छोटीला घरच्यांवर निर्धास्तपणे सोपवून ती कामावर येत असे. ही सुविधा सगळ्यांना मिळेलंच असं नाही.

शिवाय कचेरीतून (सीप्झ, मुंबई) घरी ७ वाजता (वसईच्या पुढे एसटीने आणि त्यापुढे अर्धा किमी चालत) पोहोचल्यावर घरकामाचा राडा उपसायचा असे तो वेगळाच. झोपायला किमान ११ वाजत. दुसऱ्या दिवशी पहाटे ४॥ ला उठून योगासने करून स्वयंपाक करून ७ ला निघावे लागे. केवळ मुलीसाठी म्हणून इतके कष्ट उपशीत होती.

काम खूप जबाबदारीचं होतं. डोकं प्रचंड वेगवान होतं किंवा आहे. हे अत्यंत दुर्मिळ उदाहरण आहे. लहान मुलं असलेल्या बायकांना भारतातल्या व्यावसायिक जगात तग धरून राहायचं असेल तर बरीच मोठी पाठराखण (सपोर्ट सिस्टीम) लागते.

आ.न.,
-गा.पै.

इब्लिस, तुमचं कॅल्क्युलेशन पण बरोबर आहे ..... भारतात आर्थिकदृष्ट्या सामान्य लोकांना परवडणारी नाही ही सिस्टिम..... परत एकदा काय दिवस आले माझ्यावर Happy

वा, कसली सोप्पी उत्तरं प्रश्नांची! चांगली, विश्वासार्ह सपोर्ट सिस्टिम घडवणं हा योग्य मार्ग असला तरी त्याला वेळ लागणार. त्यापेक्षा बाईला करियर सोडायला सांगणं किती सोपं, किती झटपट! पैसा मिळवून चैनीत जगायला तर ती नोकरी/करियर करते. सोडता आलंच पाहिजे. मग तिने हवं तर बिझनेस करावा (बिझनेस म्हणजे २४*७ ची नोकरी जिथं प्रत्येक बाबीची जबाबदारी पूर्णपणे आपली असते हे सोयीस्कररीत्या विसरायचं) किंवा शिकवण्या घ्याव्यात (बाईचं करियर इन्व्हेस्टमेंट बँकिंग वा आयटी कुठलंही असू दे, ते सोडून ट्यूशन्स घेणं हेच बरोबर) अशी सगळी जनरलाइज्ड विधानं करून बाईच्या समोर पर्यायी करियर उभी केल्यावर तिची काय बिशाद नोकरी न सोडण्याची?

मुलांची सुरक्षितता ह्या विषयाच गांभीर्य न समजून घेता त्या विषयावर काही न बोलता केवळ "बाईने नोकरी सोडावी" ह्या एकाच मुद्द्यावर चर्वीत चर्वण करणार्‍या सर्वांना माझा ह्या बाफवरचा शेवटचा नमस्कार

काय मिळवतात ह्या बायका असं वागून किंवा बायकांनी नोकरी करियर सोडावी हा शेवटचा मुद्दा असूनही ह्याआधीचे माझे मुद्दे न वाचल्याबद्दल धन्यवाद.

ज्यांना मुलांच्या सुरक्षिततेपेक्षा स्वतःचा अहंकार, स्वतःच्या इन्व्हेस्टमेंट बँकिंग वा आयटी ही करियर्स महत्त्वाची वाटतात, ज्यांना मुलांच्या सुरक्षिततेपेक्षा "बाईनेच नोकरी का सोडावी" ह्या विषयावर वाद घालायचा आहे त्यांनी चालू ठेवावे. झोपलेल्याला उठवता येत झोपेच सोंग घेतलेल्याला नाही.

बाकी माझे १५ मुद्दे ह्या विषयाशी irrelevant आहेत असे वाटत असेल तर तसे नाहीये. कधी तरी वेगळ बाफ काढून हे सगळे एक्स्प्लेन करेन. इथे पेटलेल्या रानात अधिक तेल नको.

पुन्हा एकदा मी हे खोडसाळपणातून लिहिले नव्हते. हे तुम्हाला पटले आहे काहींना खूप पोस्टींनंतर पटले आहे. ते पटवून घेतल्याबद्दल धन्यवाद.

मला आता ह्या विषयावर बोलण्याचा आणि माझा मुद्दा एक्स्प्लेन करायचा कंटाळा आला आहे. त्यामुळे ह्या मुद्द्यांवरचे हे माझे शेवटचे पोस्ट बाकी तुमचे समज गैरसमज वाद विवाद चालू द्या.

>>>>> वेल | 13 May, 2014 - 22:49 नवीन
ह्यावर काय बोलायचे. >>>> <<<<< स्वतःची नोकरी करियर महत्वाचे की बाळाची सुरक्षितता? <<<<<<

मला वेलचा वर उल्लेखलेला रोखठोक व प्रश्नाच्या मूळाशी पोहोचणारा प्रतिसाद आवडला! Happy

जर,
१. बेबीसिटिंग हे जर फुलटाईम प्रोफेशन व करियर ठरू शकते,
२. जे ('पुढारलल्या देशात') स्त्री/पुरुष दोघेही करतात, व
३. त्याला इतका मस्त दणकून मोबदलाही मिळतो,

तर,
१. आपल्या बाळासाठी.
२. दोघांपैकी एकाने, करियर ऐवजी बाळाकडे जास्तवेळ लक्ष दिल्यास काय प्रॉब्लेम आहे?
२अ. किंबहुना घराकडे पहाणे ही फुलटाईम करियर नसू शकते का?
३. काही अपरिहार्य कारणाने, ९ महिन्याची गर्भावस्था व त्यानंतरचे ४-६ महिने तरी ब्रेस्टफिडींग इ. कामे स्त्रीदेहधारी व्यक्तीकडे सोपविळी गेली असल्याने, स्त्रिलिंगी व्यक्तिंना किमान १ वर्ष तरी करियरमधून दुर्लक्ष करावेच लागते असा हिशोब होतो. - याच्याच एक्स्टेन्शनने, बालसंगोपनाचा विषय आला की बाबापेक्षा आई हा शब्द जरा जास्त लवकर आठवतो, असं आमचं एमसीपी ट्रेनिंग आहे, हा नाइलाज.

मुलांची सुरक्षितता ह्या विषयाच गांभीर्य न समजून घेता त्या विषयावर काही न बोलता केवळ "बाईने नोकरी सोडावी" ह्या एकाच मुद्द्यावर चर्वीत चर्वण करणार्‍या सर्वांना माझा ह्या बाफवरचा शेवटचा नमस्कार<<<

Lol

इतक्यात कंटाळलात? अहो अजुन वीस बावीस आय डी येऊन तेच तेच बोलणार आहेत. आत्ता कुठे तुम्ही मागासलेल्या मानसिकतेच्या ठरायला लागला आहात. अजून स्त्रीच्या नावाला लागलेला बट्टा झालेला नाही आहात.

Proud

याच्याच एक्स्टेन्शनने, बालसंगोपनाचा विषय आला की बाबापेक्षा आई हा शब्द जरा जास्त लवकर आठवतो, असं आमचं एमसीपी ट्रेनिंग आहे, हा नाइलाज<<<

इब्लिस, तुमचे पारंपारीक पुरुषप्रधान मुद्दे येथे घुसडू नका. नाहीतर हा बाफ भलत्या वळणावर जाईल. आणि तो भलत्या वळणावर जाईल अशी भीती व्यक्त करणारे पुन्हा त्याच मुद्यावर खूप काही लिहून शेवटी म्हणतील की हे तुमच्यामुळे झाले. Proud

सुलु ह्यांनी अमेरिकेतली जी सिस्टीम एक्स्प्लेन केली ती मला फक्त दक्षिण मुंबईतल्या धनदांडग्यांकडे दिसली. जिथे ते ट्रेन्ड नॅनी साठी वीस हजारापेक्शा जास्त पगार देतात. सध्या मुंबईत मध्यम वर्गाला परवडणार्‍या बायका ज्या आठ ते बारा तास काम करतात, ब्युरो मधून येतात त्यांचा महिन्याचा पगार आठ ते बारा हजार असतो. त्या बायका साधारण चौथी ते दहावी शिकलेल्या असतात. पण म्हणून लहान मुलांना सांभाळण्यासाठी त्यांनी काही खास ट्रेनिंग घेतलेले नसते. शिवाय अनेक बायकांना प्रचंड अ‍ॅटिट्युड असतो, (ही आपल्या भारतीय समाजाची खासीयत आहे.) त्यांना काहीही सांगितले - वागण्यात स्वच्छता पाळण्यात, मुलांना सांभाळण्यात, त्यांच्या बोलण्यात सुधारणा करायला सांगितली. टीव्ही कमी बघा, मुलांना खेळायला घेऊन जा, त्यांना उगाच उचलून घेऊ नका, त्यांना स्वतःची काही कामं स्वतःकरू द्या इत्यादी.. की त्यांना प्रचंड राग येतो आणि त्या काम सोडून जातात

ब्युरोवाले तुमच्याकडून तीन ते पाच हजार रुपये रजिस्ट्रेशनचे घेतात त्याबदल्यात तुमच्या घरी दोन ते तीन बायका पाठवतात. पण त्यांनी पाठवलेल्या तीन चार बायकांपैकी एकचेही काम आपल्याला पसंत न पडल्यास ते आपलेच नाव ब्लॅक लिस्ट मध्ये टाकतात.

हे सगळे मुद्दे मूळ लेखाशी संबंधित असले तरीसुद्धा त्यातून एक मुद्दा मिस होत आहे. 'किमान माणूसकी' व तीही 'एका निष्पाप लहानग्याच्या बाबतीत' दाखवण्याचा संबंध आकारण्यात येणार्‍या पैशाशी नसतो. तो फक्त एक विश्वासाचा भाग असतो. समजा स्त्री नोकरी करत असली किंवा नसलीही, तरीही ती विश्वासाने ज्याच्याकडे आपले मूल दहा मिनिटांसाठीही सांभाळायला देते त्याच्यावर एक किमान 'माणूसकी'चा विश्वास असतो म्हणून देते.

हा जो प्रकार झालेला आहे तो माणूसकीहीन प्रकार आहे. आज छापून आले आहे की तो मुलगा पाऊल टाकायला शिकलेला होता, पण आता घाबरून पाऊल टाकण्यास नकार देत आहे. ही त्याला वाटनारी भीती त्याला झालेल्या शारीरिक जखमांपेक्षा अधिक गंभीर आहे.

असे प्रकार होऊ नयेत म्हणून खात्रीलायक विश्वासू माणसाची गरज असते व त्यामुळेच 'आपण किंवा अगदी आपले असे कोणीतरी' हे सर्वात सुरक्षित पर्याय उपलब्ध असतात. कोणतेही पोलिस व्हेरिफिकेशन, उत्तुंग पगार, आधीचे ट्रॅक रेकॉर्ड वगैरे माणसाला नेमके विश्वासपात्र बनवतीलच असे नाही.

इतक्यात कंटाळलात? अहो अजुन वीस बावीस आय डी येऊन तेच तेच बोलणार आहेत. आत्ता कुठे तुम्ही मागासलेल्या मानसिकतेच्या ठरायला लागला आहात. अजून स्त्रीच्या नावाला लागलेला बट्टा झालेला नाही आहात.>>>> Biggrin

मुलांची सुरक्षितता ह्या विषयाच गांभीर्य न समजून घेता त्या विषयावर काही न बोलता केवळ "बाईने नोकरी सोडावी" ह्या एकाच मुद्द्यावर चर्वीत चर्वण करणार्‍या सर्वांना माझा ह्या बाफवरचा शेवटचा नमस्कार<<< अहो! असा नाही निरोप घ्यायचा असं म्हणावं गाढवापुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता Happy वाटतय का नाही असं तुम्हाला Happy

बाळाची सुरक्षितता महत्त्वाची वाटणं आणि करियर महत्त्वाचं वाटणं या दोन्ही म्युच्युअली एक्स्क्लुझिव्ह गोष्टी आहेत, असा सूर जो प्रत्येक पोस्टीत लागतोय त्याचं काय कारण म्हणे? दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या वाटणारे लोक (त्यात बायकासुद्धा आल्याच बर्का!) आहेत अस्तित्त्वात.

असो, बाई घरी बसली की यच्चयावत सगळे प्रॉब्लेम सुटून जग नंदनवन होईल, अशा विचारांच्या लोकांना त्यांचे विचार लखलाभ! आणि अशा मानसिकतेचे लोक जोवर जास्त आहेत तोवर त्या सपोर्ट सिस्टीमवाल्यांना स्वतःत सुधारणा करायची काडीची गरज नाही, हेही आहेच.

असो, बाई घरी बसली की यच्चयावत सगळे प्रॉब्लेम सुटून जग नंदनवन होईल, अशा विचारांच्या लोकांना त्यांचे विचार लखलाभ! आणि अशा मानसिकतेचे लोक जोवर जास्त आहेत तोवर त्या सपोर्ट सिस्टीमवाल्यांना स्वतःत सुधारणा करायची काडीची गरज नाही, हेही आहेच.<<<

हे खरे भलते वळण लावणे आहे. क्षमस्व!

१. बाई घरी असली की सगळे प्रॉब्लेम्स सुटतात असे वेल ह्यांना वाटते.
२. जगाचे नंदनवन होते असे वेल ह्यांना वाटते.
३. अश्या मानसिकतेने वेल लिहीत आहेत.
४. ह्या सगळ्याचा प्रभाव सपोर्ट सिस्टिमवाल्यांच्या वर्तनावर होतो.

एका प्रतिसादात जेमतेम आठ ओळी आणि त्यात चार चुकीची गृहीतके!

हद्द झाली.

श्रद्धा,

>> बाई घरी बसली की यच्चयावत सगळे प्रॉब्लेम सुटून जग नंदनवन होईल,...

हो! होणारंच मुळी!! पण घरोघरी मात्र रणकंदन होईल. Lol

आ.न.,
-गा.पै.

टीप : Light 1

मला तर हेही सुचवायचे होते की शिकवण्या किंवा इतर काही बिझनेस पेक्षा तुमच्याकडे एखादी किंवा दोन खोल्या जर जास्त असतील तर पाळणाघर सुरू करावे आणि आपल्याला पाळणाघरात ज्या सोयी सुविधांची अपेक्षा आहे त्या आपणच इतरांना द्याव्यात. जेणे करून
१. आर्थिक स्वातंत्र्य राहिल,
२. आपले बाळ आपल्याच सोबत घरात राहू शकेल.
३. आपल्या बाळाला खूप मित्र मैत्रिणी मिळतील
४. आपल्या सारख्या इतर अनेक बायकांचे टेन्शन कमी होईल.
५. आपले बाळ काय शिकते, काय बोलते, काय खाते ह्यावर लक्ष राहिल.
६. आपले बाळ इतर बायकांच्या हातात राहिल्याने, त्याच्या जडण घडणीच्या वयात त्याला ज्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत आणि ज्या त्याला शिकवता येत नाहीत, त्या आपण स्वतः शिकवू शकू.
७. त्या चांगल्या गोष्टी आपण आपल्याकडे येणार्‍या मुलांनाही शिकवू शकू, थोडक्यात समाज प्रबोधनाला हातभार लागेल.
८. आपल्याच बाळाचे नव्हे तर इतर अनेक मुलांचे प्रेम आपल्याला मिळेल, आपण स्वतः एक व्यक्ती म्हणून अधिक संपन्न होऊ.

पण मी हे त्यावेळी सुचवले नाही आणि आत्ताही मी हा पर्याय घराबाहेरच्या पूर्ण वेळ नोकरीला पर्याय म्हणून सुचवणार नाही कारण न जाणो कोणाला तो स्वतःचा अपमान वाटेल.

मी म्हणत होतो त्या शाळा गुरुकूल पद्धतीच्या नव्हत्या. त्या देशात बहुतांशी सिंगल पेरेंट्स असतात त्यामू़ळे नेहमीच्या शाळांनीच ही सोय दिली होती.
अर्थात ही सोय पहिलीनंतरच्या मुलांसाठीच होती.
शाळेपेक्षा ते प्लेग्राऊंडच बनते, त्यामूळे मुले मस्त एंजॉय करतात.

सुखाची चाहूल... आगमन ... अवर्णनीय ! बीबीवर जाऊन ह्या बीबीची लिंक पोस्टावी असा का? एक दुष्ट विचार माझ्या मनांत चमकून गेला Proud (सॉरी! 'तुमचा अभिषेक' Light 1 Happy I mean no disrespect Happy ) .... अति झालं आणि हसू आलं (पक्षी : दुष्ट विचार) झालयं माझं Lol किंवा सटकलयं ( more appropriate?)

बालसंगोपनापासून कोणाचं काय महत्त्वाचे अश्या विविध मुद्द्यांचा परामर्श घेतलेला आहे इथे Happy

दिनेशदा,

मला वाटतं पियू पूर्वीच्या गुरुकुल पद्धतीच्या शाळांबद्दल नाही बोलत आहे तर गुरुकुल नावाच्या शाळेबद्दल बोलत आहे. बोरिवलीत ह्या नावाची शाळा होती. तेव्हा शाळेची वेळ नऊ ते साडेचार होती. मग शाळेचे मॅनेजमेंट बदलले. आता शाळेची वेळ साडेआठ ते साडेतीन आहे. वांद्रे येथे देखील एक पूर्ण दिवसाची शाळा आहे जिथे मुलांना अर्ध वेळ शाळेतले अभ्यासाचे विषय शिकवतात. उरलेल्या अर्ध्या वेळात संगीत, नृत्य, वादन, मैदानी खेळ इत्यादी शिकवले जाते. मला जर नीट आठवत असेल तर त्याच शाळेत मुलांना बागकाम सुद्धा शिकवले जाते.

तशीच एक शाळा अंधेरीत / पार्ल्यात आहे त्रिधा म्हणून.ती अगदी नऊ ते पाच वेळेची आहे की नाही माहित नाही पण रेग्युलर साडेपाच पावणेसहा तासापेक्षा जास्त वेळ आहे ती शाळा. तिथे सुतारकाम, रंगकाम हेही शिकवले जाते म्हणे. अर्थात मुले सुरक्षित ठिकाणी असतात आणि अनेक नवीन गोष्टी शिकतात.

Pages