मुले सांभाळणार्‍या आयाकडून बाळावर अत्याचार

Submitted by पियू on 13 May, 2014 - 12:46

नुकताच फेसबुकवर एक व्हिडिओ पाहिला: < विषयाच्या संवेदनशीलतेमुळे व्हिडिओची लींक काढुन टाकते आहे. कुणालाही घाबरवण्याचा हेतु नव्हता. सॉरी !!! >

स्त्री काय किंवा पुरुष काय, कोणाचेही मन हेलावेल असा व्हिडिओ बघुन मनाचा थरकाप झाला. लहान मुलांवर कोणी असे अत्याचार करु शकेल असं मन मानायला तयारच नव्हतं.

त्या व्हिडिओच्या कमेंट्स पाहिल्या. एखादी अनाथाश्रामतली घटना असेल, भारतातला व्हिडिओ नाहीये अशी काहीतरी मनाची समजुत घालुन कामावर लक्ष केंद्रीत केलं.

पण आज (थोड्या वेळापुर्वी) साम टिव्हीवर 'पुण्याची पुतना मावशी' या विशेष बातमीपत्रात पुन्हा तेच पाहिलं आणि राहावंलं नाही. पुण्यात ज्याला सांभाळण्यासाठी कामावर ठेवले त्या बाळाला (केवळ काही महिन्यांच्या/ वर्षाच्या) वाट्टेल तसे उचलुन आदळतांना/ त्या बाळाला मारझोड करतांना पाहिले. हाही प्रकार त्या घरात लावलेल्या सीसीटिव्ही कॅमेरात शूट झाल्यामुळे त्या बाळाच्या आईला कळला.

खरंच आपण कुठे चाललो आहोत असं वाटलं. अश्या बातम्या बघुन कोणत्या आईला आपलं बाळ कोणाकडे सांभाळायला द्यायची हिंमत होईल? असे अजुनही कितीतरी अत्याचार होत असतील आणि केवळ सीसीटिव्ही कॅमेरा नसल्याने कोणाच्या लक्षातही येत नसेल.

जी गोष्ट बाळांबाबत तिच गोष्ट आजारी/ बेडरीडन ज्ये. नागरीकांसोबतही घडत असेल असं मनात येऊन गेलं.

कोणाशीतरी बोलावंसं वाटतंय म्हणुन इथे लिहिलंय. नाही आवडलं तर इग्नोर करा. Sad

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मवा+१

लिहायला लागलेच तेवढ्यात तुझी पोस्ट आली मवा. Happy

बेफी,
१. आईच का?
२. वेळेला म्हणजे काही काळासाठी नसेल कशावरून? समजा तुमची घरची केअरगिव्हर व्यक्ती आजारी पडली किंवा विश्वासू केअरगिव्हर काही काळासाठी रजेवर गेली तर?
३. घरातल्याच विश्वासू वाटणार्‍या व्यक्तीलाच शॉर्ट टर्म किंवा आजवर लक्षात न आलेला मानसिक आजार निघाला तर? (वर आईला होऊ शकणार्‍या पोस्ट पॉर्टम डिप्रेशनचा उल्लेख आला आहे.)

मग नका नोकरी करू - हे भयंकर ओव्हरसिम्प्लिस्टिक आणि म्हणूनच चीड आणणारं वक्तव्य आहे.

खरे तर उत्तर द्यायची इच्छा नव्हती, <<< हे लिहून तुमचा कोणतातरी इगो सुखावला असेल तर सुखावूदेत.

पण तुम्ही ३-४ पोस्टी टाकल्या आहेत म्हणून टंकनश्रम घेतेच आता. ( तसा हा माहित असलेलाच मुद्दा आहे, जसे तुमचे प्रश्न नेहेमीचेच व अपेक्षित असेच. )<<< पूर्वग्रह!

हे सर्व निर्णय देखील दोघांचे मिळून असतात / असायला हवे<<< निर्णयप्रक्रियेत नवर्‍याला स्थान नसते असे वेल ह्यांनी म्हंटलेले आहे हे तुमचे गृहीतक नुसतेच चुकीचे नसून मायबोलीवर पाहण्यात येणार्‍या अतिरेकी व चघळण्यास उत्तम अश्या 'वेळघालवू स्त्रीवादी' असण्याचेही निदर्शक आहे.

त्यामुळे सर्व गोष्टींचे खापर बाईच्या / तिच्या नोकरीच्या माथी फोडून मोकळे व्हायची घाई नको.<<<

घाई केली आहे हे तुमचे वैयक्तीक गृहीतक आहे. वेल ह्यांनी व्यवस्थित प्रतिसाद नोंदवलेला आहे, एका वाक्यात लिहिलेले नाही की बायकांनी नोकरी करू नये किंवा बाळाला जन्म देऊ नये. तसेच, 'घाई नको' हे तुमचे म्हणणे पुन्हा प्रशासकांच्या शैलीत आहे. 'घाई कशाला' किंवा 'घाई करू नये' म्हणणे एका सामान्य प्रतिसाददात्यासारखे वाटेल, पण घाई नको हे म्हणणे म्हणजे येथील चर्चेचे सर्वाधिकार तुमच्याकडे सोपवले असल्यासारखे भासते.

मुळातच, 'फक्त बाईच्या माथी' खापर फोडणे असा कोणताही आकांत वेल ह्यांच्या प्रतिसादात नाही, तेव्हा त्यावर गळे काढण्यापूर्वी निवांतपणे प्रतिसाद वाचणे बरे पडेल.

असे म्हणतात, की 'जिस जबानमे सवाल किया जाये, उसी जबानमे जवाब देना चाहिये'! अन्यथा मी तुम्हाला उद्देशून असे मुळीच बोललो नसतो.

मग नका नोकरी करू - हे भयंकर ओव्हरसिम्प्लिस्टिक आणि म्हणूनच चीड आणणारं वक्तव्य आहे.<<<

अहो आईच का वगैरे मुद्दे वेल ह्यांना अभिप्रेत आहेत हेच एक गृहीतक नाही का? ठीक आहे तुम्हाला असे म्हणायचे आहे की बापाने घरी राहावे, पण मग तसे लिहिता आले नसते का पहिल्याच प्रतिसादात मवा ह्यांना? लगेच त्याला 'भलते वळण लावू नका' वगैरे दरडावणे बरोबर आहे का?

आणि पुन्हा लिहितो, वेल ह्यांनी इतर काही पर्याय लिहिलेले आहेत आणि नंतर तसे लिहिलेले आहे. आता ते सगळे पर्याय चुकीचे, स्त्रीचे शोषणच होते असे सुचवणारे आणि पुरुषप्रधानच आहेत असे का गृहीत धरले जात आहे? अजूनही भारतात कित्येक म्हणण्यापेक्षा बहुतेक कुटुंबांमध्ये पुरुषाचे उत्पन्न स्त्रीच्या उत्पन्नापेक्षा अधिक असते व जॉबचे स्वरूपही (पोस्ट वगैरेच्या दृष्टीने) अधिक महत्वाचे असते. ही फॅक्ट आहे त्याला काय करणार? अश्या वेळी जर नवर्‍याऐवजी बायकोने नोकरी सोडणे असे दोघांनी मिळून ठरवले तर तुमचे आमचे काय गेले हे मला काही समजत नाही.

>>
नाही तर नोकरी करू नका किंवा सोडता येत नसेल तर बाळाला जन्म द्यायचा विचार करू नका.
काय अचिव्ह करतात ह्या बायका असं वागून?
स्वतःची नोकरी करियर महत्वाचे की बाळाची सुरक्षितता?
<<

यावरून बेफी.
या प्रतिसादात
१. बायका असं वागतात
२. असं म्हणजे बाळाच्या सुरक्षिततेपेक्षा नोकरी/करियर महत्त्वाची समजतात
असे अर्थ मला लागले.

वेलचा प्रतिसाद भावनातिरेकातून आलेला वाटतो त्यामुळे आणखी वकिली करत नाही. जाऊ दे.

>> अश्या वेळी जर नवर्‍याऐवजी बायकोने नोकरी सोडणे असे दोघांनी मिळून ठरवले तर तुमचे आमचे काय गेले हे मला काही समजत नाही.

हे त्या नवरा-बायकोला ठरवू दे की .. तुम्ही-आम्ही ठरवणारे कोण? ह्यात कोण किती कमावतं, कोणाचा हुद्दा काय हे मुद्दे गौण आहेत ..

मुलाला काही झालं तर आधी आईच्या नोकरी करण्यावर बोट ठेवायचं हे अनरिझनेबल आहे ..

उत्तर द्यायची इच्छा नाही असे म्हणले ते इगो वगैरे मुळे नव्हे तर त्या प्रतिसादावर तुम्ही काय म्हणणार ते माहीत होते, व मायबोलीवर अश्या चर्चा बर्‍याचदा झाल्याने व त्यातून काही निष्पन्न न झाल्याने त्यात आता रस नाही. या व वरच्या पोस्टीत 'तुम्ही' म्हणजे तुम्ही व्यक्तीशः नसून त्या वैचारिक गटातले लोक असा अर्थ आहे.

बाकी तुम्ही (इथे तुम्ही म्हणजे बेफिकीर) जे काय लिहीलेय (अतिरेकी, वेळघालवू, प्रशासकीय वगैरे) त्यावर भाष्य करावेसे वाटत नाहीये.

त्यामुळे आणखी वकिली करत नाही. जाऊ दे.<<<

एखाद्याच्या प्रतिसादाचे मूल्यमापन 'भावनातिरेकातून आलेला' असे करण्याआधी आपल्याला त्याच प्रतिसादाने 'चीड' आलेली होती व आपल्याही 'भावनाच' दुखावल्या गेल्या होत्या हेही नको का विचारात घ्यायला बाई? कोण भावनाहीनपणे प्रतिसाद देतो येथे? कोण तटस्थपणे लिहितो? बहुतेकजण स्वतःचाच दृष्टिकोन मांडतात ना? Happy

हे त्या नवरा-बायकोला ठरवू दे की .. तुम्ही-आम्ही ठरवणारे कोण? ह्यात कोण किती कमावतं, कोणाचा हुद्दा काय हे मुद्दे गौण आहेत ..<<<

अहो सशल, हे तर मीच म्हणत आहे, तुमच्या मैत्रिणी ह्याच्या उलट बोलत आहेत.

(कृपया - केवळ आपला मित्र / मैत्रीण कोठेतरी भावनिक होऊन लिहीत आहेत म्हणून त्यांच्याबाजूने प्रतिसाद देण्याऐवजी कोण काय म्हणत आहे ते वाचले जावे अशी विनंती)

बाकी तुम्ही (इथे तुम्ही म्हणजे बेफिकीर) जे काय लिहीलेय (अतिरेकी, वेळघालवू, प्रशासकीय वगैरे) त्यावर भाष्य करावेसे वाटत नाहीये.<<<

ठीक आहे, धन्यवाद! चु भु द्या घ्या.

>> आपल्याला त्याच प्रतिसादाने 'चीड' आलेली होती व आपल्याही 'भावनाच' दुखावल्या गेल्या होत्या हेही नको का विचारात घ्यायला बाई?
टीपापात या. इथे विषयांतर होईल. Happy

काही काही धागे त्याच त्याच चर्चांवर ( अगणित वेळेला चावून चोथा झालेल्या विषयावर ) जातात.
त्यामुळे इग्नोर मारणेच इष्ट Happy
.सीमा + १ .

बेफिकीर इतकंच सांगा की इतक्या पोस्टी तुम्ही टाकल्यात त्यात कुठे 'बाळाला सुरक्षितपणे ठेवण्यासाठी काय काय उपाय करता येतील' या दृष्टीने विचार केलात का , लिहीलंत का ? आई व तिची नोकरी याच एका उपायावर कितीतरी चर्चा झाली.

बेफिकीर इतकंच सांगा की इतक्या पोस्टी तुम्ही टाकल्यात त्यात कुठे 'बाळाला सुरक्षितपणे ठेवण्यासाठी काय काय उपाय करता येतील' या दृष्टीने विचार केलात का , लिहीलंत का ? आई व तिची नोकरी याच एका उपायावर कितीतरी चर्चा झाली.<<<

तुम्ही आणि तुम्हाला सपोर्ट करणार्‍यांनी अश्या पोष्टी किती टाकल्या तेही मोजून बघा. माझ्याशी तुम्ही आणि तुमच्या बाजूने बाई, बुवा, सशल आणि काही प्रमाणात स्वाती २ इतके जण ह्या एकाच विषयावर चर्चा करत आहेत. कारण काय? तर माझा फक्त एकच प्रश्न, ह्यात भलते वळण काय? तुम्हाला नाही का जाण जरा सुसंबद्ध प्रतिसादच देण्याची? Happy

बाकी पुन्हा एकदा, मी माझा नैसर्गीकपणे आलेला प्रतिसाद पहिला प्रतिसाद म्हणून दिलेला आहे. तसेच मी कुठे काय प्रतिसाद द्यावा हे तुम्ही नक्कीच विचारू शकत नाही.

>> काय अचिव्ह करतात ह्या बायका असं वागून?

स्वतःची नोकरी करियर महत्वाचे की बाळाची सुरक्षितता?

वेल असं म्हणत आहेत आणि त्याला / त्या विचारसरणीला माझ्या "मैत्रिणी" विरोध करत आहेत आणि तुम्ही त्या विरोधाला आणि त्यांच्या विरोध करण्याच्या शैलीला विरोध करत आहात असं दिसतंय मला सगळं वाचून ..

आणि बहुतेक घरात पुरूष जास्त कमावतो, त्याचा हुद्दा जास्त चांगला असतो असे मुद्दे तुम्ही आणत आहात ज्यावर मी भाष्य केलं .. तुम्ही ही सर्व नीट वाचत जा ..

नाही हो सशल,

नीट वाचा:

१. वेल ह्यांनी ते प्रश्न विचारण्यापूर्वी काही 'भावनातिरेकातून' 'न' आलेले असे पर्याय नोंदवलेले आहेत.

२. भारतातील दांपत्यांपैकी नवरा व बायको ह्यांचे पगार व हुद्दा हे मुद्दे मी नोंदवताना मीच असे म्हणालो आहे की ते ते जोडपे जे ठरवेल ते ठरवेल, त्यात 'तुमचे आमचे काय गेले हे समजत नाही'!

आता हे असेच सगळे तुम्हाला तुम्ही सर्व प्रतिसाद नीट वाचलेत तर दिसून येईल आणि मग माझे म्हणणे पटेल.

(बाकीचे प्रतिसाद आत्ता देऊ शकणार नाही - धन्यवाद व शुभरात्री)

Happy

तुमच्या पोस्टींकडे आगोदर दुर्लक्ष केले होते तेच बरे होते. कुठून दुर्बुद्धी झाली उत्तर द्यायची ? असो.

अरेरे, तेच तेच दळण सर्व बाजूने.
वेल , इथल्या मायबोलीवरच्या प्रसिद्ध ज्योतिष्याला आजचे तुमचे भविष्य विचारायचे ना. Wink

-----------------
ती लिंक वरील पोस्टी वाचून एक मिनिटं बघणं हि मानसिक अत्याचार असु शकतो (माझ्यासाठी) म्हणून मी बघितली नाही पण लोकांना पुन्हा आपली (बाळाची) सुरक्षितता पडताळण्याची संधी असु शकते नुसती बातमी/चर्चा वाचूनच अश्या धाग्याच्या निमित्ताने.
-----------------------------------------------------------------------
सीमा,
पियु ह्यांच्यावर काहिहि काय आरोप करताय?
तुम्ही आजकालचा पेपर बघता ना?(वाचता का म्हटलेलं नाही) घरी पेपर येत असेल तर(काय आहे ना, इंटरनेटचे युग आहे).
तेव्हा वाटत नाही का पेपरचे पहिलेच पान नुसती नजर टाकून की पेपर हा जनसामान्यात भिती पसरवण्याचे काम करतो असं? मग काय तुम्ही पेपराच्या नावाने खापरं फोडता का? पेपर घेणं काहीही फायद्याचं नाही म्हणून बंद करु शकताच ना?
तुम्ही ठरवता ना केव्हा काय वाचायचे, काय बघायचे? युट्युब वर हजार विचित्र लिंका आहेत. नुसते टायटल वाचूनच लोकं ठरवू शकतात की काय करायचे?
इथे पियु ह्यांचा हेतु साफ असून सुद्धा फुकटची शेरेबाजी आहे की भिती पसरवु नका वगैरे त्यांना असे म्हणणे . हेतु लक्षात घेवून सुद्धा हि असली पोस्ट? लिंक काढून टाका सांगणे वेगळे पण असले आरोप(भिती पसरवता वगैरे) कमालीच आहेत.

इथे कोणी ना कोणी पुन्हा चाचपडून पाहू शकतो ह्या धाग्याचे निमित्ताने की आपण आणखी सुरक्षितता काय घ्यावी आपल्या बाळासाठी.. आता सर्व जण तुमच्यासारखे खूपच अवेअर, हुशार, संवेदनशील नसतील असे समजू शकता तुम्ही?
----------------------------------------------------------------------------------------------------------------
पुर्वी टीवी हे आणि पेपर एकच साधन होते रोजच्या जीवन विषयक आजूबाजूला काय घडले अश्या माहिती वितरणासाठी तेव्हा टीवी वरच्या काही बातम्या पाहिल्या की आई वडील परत आपल्या लहान मुलांची उजळणी घेत , की बंडया पुन्हा सांगते, नीट दार लाव शाळेतून आल्यावर, दरवाजा उघडू नको अनोळखी असेल तर.... बातम्या त्याच त्याच असल्या तरी काहि ना काहि उजळणी होतेच, अवेअरनेस वाढतो काहि मुद्द्यांबाबत. आता कितीदा उजळणी घ्यायची हे आपल्यावर आहे.
पण तुम्ही बहुधा, अशी न्युज एकली की रागाने टीवी फोडता काय की टीवी/लॅपटॉप भिती पसरवतो म्हणून? टीवी शांतपणे बंद करू शकताच की.

सीमा,
>>तुम्ही अस्वस्थ झालात तर , काहीतरी कन्स्ट्र्क्टीव्ह होवुदे त्यातून. पालकांना काळजी घेण्यासाठी इनकरेज करा.<<

हे कसे करणार ते तुम्हीच लिहित का नाही मग? धागा न उघडता? किंवा कसं ते(तुम्ही खूपच हुशार आहात ना?). तुमचे कन्सस्टक्टीव मुद्दे कळू दे.

तो व्हीडीओ पाहिला नाही. सर्वांच्या प्रतिसदावरुन बघवणार नाही हे निश्चित झाल्याने पाहणार नाही. हिंमत नाही.

पण घरात आया ठेवण्या ऐवजी पाळनाघरात बाळांना/मुलांना ठेवावे हे मत अजुनही कायम आहे. कन्येला ठेवायची वेळ आली तेव्हा ३च पर्याय होते, घरात सांभाळायला बाई किंवा अशा बाया ज्या आपल्या अपार्टमेंटमधे खासगी 'पाळणाघर (?)' चालवतात तिथे किंवा व्यवस्थित डेकेयर मधे.
डोळे झाकुन तिसरा पर्यात निवडला कारण ते सरकारी नोंदणी झालेले असते, खुप शिक्षिका तिथे काळजी घ्यायला असतात, एक नसेल तर तिचे काम दुसरी लगेच करु शकते व भरपुर मुले तिथे जात असल्याने खुप सुरक्षित.

आणला की नाही धागा जागेवर? Happy

आणि हो, सीमाची भिती कळते पण ह्या धाग्यानिमित्ताने पुन्हा एकदा आयांवर अवलंबुन असाल तर सावध रहावे ह्याची उजळणी होतीये हे चांगले आहे.

सीमाची भिती कळते पण ह्या धाग्यानिमित्ताने पुन्हा एकदा आयांवर अवलंबुन असाल तर सावध रहावे ह्याची उजळणी होतीये हे चांगले आहे.>>>>
अगं ही उजळणी अशा लिंक न टाकून सुद्धा घेता येते हेच मला म्हणायच आहे ग.
अशा लिंक्स न देताही तृप्ती आवटी ने काढलेला हा धागा बघ .
http://www.maayboli.com/node/17019

काळजी घ्या. अपघात्/बॅड थिंग्ज मुलांबाबतीत होवू शकतात. हेच सांगितलय ना तिने. बाफच्या ओळखीमधे " हॉट कार मध्ये गुदमरून जाणार्‍या बाळाची" व्हिडीओ लिंक दिली असती तर भिती शिवाय काय वाटेल पालकांना? पुढचे उपाय वाचायला कुणी थांबणार पण नाही त्या ठिकाणी.
होप I am making sense to you. Happy

हो. Happy

कमाल आहे, लिंक देवू नका असे नीट सांगायच्या एवजी आरोप करणे ज्यास्त सोपं आहे वाटतं.
धाग्याचा मुद्दा व हेतु लक्षात घेवु शकत नाही ना सीमाबाई? उगाच आपले, असे लिहिणेच कसे बरोबर , तसे किती बरोबर म्हणून उदाहरणादाखल इतर लिंका वाटत बसायच्या....
धन्य आहे,
कोणाला नुसते लिंक बघून भिती पसरली जाते असे सांगणरे आयडी; त्या आयडीला, अपघाताचे "इत्यंभूत(डीटेल) वर्णन देवून सुरु केलेला धागा वाचून उद्या कोणालाही कसला हि त्रास होवु शकतो ते नाही का समजत?
पण उगाच कोणाच्याही हेतु वर आरोप करून मग हेच कसे बरोबर पसरवायचे काम करायचे चाललेय.
--------
पियु, विषयांतराबद्दल सॉरी.

मला वाट्त लिन्क च्या आधी एखादे डिसक्लेमर टाकले तर? जस मी दिलेली लिन्क फक्त माहिती साठी आहे पण अतिशय स.न्वेदनशिल असुन आपआपल्या जबाबदारीवर बघा!
धाग्याच्या निमित्ताने पालका.न्ना गोश्टि अजुन एक्दा रि वाइज करता येतिल...मायबोलिवर अनेक नवपालक आहेत ज्या बॅक टु वर्क जाणार असतिल त्या.न्ना how to choose right caretaker for your child वर मार्गदर्शन ही मिळेल..
सरते शेवटि लिन्क विशयी .. मी बघु शक्ले नाही.. कारण मला प्र्च.न्ड अस्वस्थता येते, पहिल्या काही सेक.न्दात मी प्र्च.न्ड हलले.. असो देवाची क्रुपाच की CCTV मुळे तरी गोश्टि वेळिच कळल्या..

मला माझा मुद्दा स्पष्ट करायचाय. थोड्या वेळात करते.

मी खोडसाळपणे लिहिलेले नाही हे समजून घेत्ल्याबद्दल आभार.

व्हिडियो पाहिला नाही, पाहणारही नाही.
बाकी, आली का बायकांच्या नोकरीवर गाडी ? उत्तम झाले. ग्लोबल वॉर्मिंगचेही कारण तेच (बायकांची नोकरी आणि बुडणारी संस्कृती) असल्यास नवल वाटणार नाही अजिबात.

मुलांना कुठेही ठेवा, 'सजग राहण्याला पर्याय नाही', एवढेच मला कळते.

mala ka mahit ka pan as vatal ki vel ch te vidhan 'काय अचिव्ह करतात ह्या बायका असं वागून?' he gharkam valya bai sati ahe ki kai? mhanaje tya bayakana as nalayakasarakh vagun nemak kai milat?

kai mahit maz watan chukich asu shakel pan mala tar buva asach lagala tya vakyacha arth :ao:

दुर्दैवी घटना.
प्रतिसादांचे वळण पाहता अजिबात आश्चर्य वाटले नाही Sad
काही पुरुषांना इथे जवळ जवळ प्रत्येक धाग्यावर भारंभार पोष्टी टाकण्यापेक्षा, घरी राहून, जॉब वगैरे कःगोष्टिना प्राधान्य न देता, मुलाबाळांना सांभाळायचे सुचले असते तर आज या समाजात मुलाबाळांचे असे हाल झाले नसते! असो.

Pages