मुले सांभाळणार्‍या आयाकडून बाळावर अत्याचार

Submitted by पियू on 13 May, 2014 - 12:46

नुकताच फेसबुकवर एक व्हिडिओ पाहिला: < विषयाच्या संवेदनशीलतेमुळे व्हिडिओची लींक काढुन टाकते आहे. कुणालाही घाबरवण्याचा हेतु नव्हता. सॉरी !!! >

स्त्री काय किंवा पुरुष काय, कोणाचेही मन हेलावेल असा व्हिडिओ बघुन मनाचा थरकाप झाला. लहान मुलांवर कोणी असे अत्याचार करु शकेल असं मन मानायला तयारच नव्हतं.

त्या व्हिडिओच्या कमेंट्स पाहिल्या. एखादी अनाथाश्रामतली घटना असेल, भारतातला व्हिडिओ नाहीये अशी काहीतरी मनाची समजुत घालुन कामावर लक्ष केंद्रीत केलं.

पण आज (थोड्या वेळापुर्वी) साम टिव्हीवर 'पुण्याची पुतना मावशी' या विशेष बातमीपत्रात पुन्हा तेच पाहिलं आणि राहावंलं नाही. पुण्यात ज्याला सांभाळण्यासाठी कामावर ठेवले त्या बाळाला (केवळ काही महिन्यांच्या/ वर्षाच्या) वाट्टेल तसे उचलुन आदळतांना/ त्या बाळाला मारझोड करतांना पाहिले. हाही प्रकार त्या घरात लावलेल्या सीसीटिव्ही कॅमेरात शूट झाल्यामुळे त्या बाळाच्या आईला कळला.

खरंच आपण कुठे चाललो आहोत असं वाटलं. अश्या बातम्या बघुन कोणत्या आईला आपलं बाळ कोणाकडे सांभाळायला द्यायची हिंमत होईल? असे अजुनही कितीतरी अत्याचार होत असतील आणि केवळ सीसीटिव्ही कॅमेरा नसल्याने कोणाच्या लक्षातही येत नसेल.

जी गोष्ट बाळांबाबत तिच गोष्ट आजारी/ बेडरीडन ज्ये. नागरीकांसोबतही घडत असेल असं मनात येऊन गेलं.

कोणाशीतरी बोलावंसं वाटतंय म्हणुन इथे लिहिलंय. नाही आवडलं तर इग्नोर करा. Sad

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असे विडिओ टाकायचे कारण समजले नाही. एक कुत्रा घरात असेल तर तो मेडला असे वागूच देणार नाही. फाडून खाईल. अगदी पिट्बुल सारखे फेरॉशिअस कुत्रे अमेरिकेत १९ व्या शतका परेन्त बेबी सिटिन्ग साठी वापरले जात होते. चांगल्या ब्रीडला उगीचच अपप्रसिद्धी मिळाली आहे.

सजग राहिले पाहिजेच. आणि अर्थार्जन हा प्रत्येक महिलेचा अधिकार आणि हक्क आहे. त्या अनुषंगाने इन्फ्रा स्ट्रक्चर आणि पॉलिसीज डेवलप झाली पाहिजे. एक साधी गोष्ट करू शकतो रिमोट कंट्रोल क्यामेरा किंवा स्काइप, किंवा घरातीलच सिस्टिम मधील क्यामेरा मध्ये सर्वेलन्स विडीओ घेता येतात. तसे घेउन वर्तन बेकार आढळल्यास बेबी सिटर ला हाकलून द्यावे.

अवांतरः
दारुडे बाप, घरातील इतर पुरुष, डिलिवरी देणारे लोक्स, दुधवाले इत्यादी आई घरात अस्तानाही मुलांना/मुलींना अब्यूज करू शकतात. मुलग्याचे शोषण करणार्‍या वडिलांना पकडून दिल्याची केस परवाच मुंबईत घडली आहे. अश्या मुलांच्या आया मुलांनाच गप्प राहायला सांगतात. अर्थात हे अवांतर आहे.

कहर झाला आहे आता एकसूरी आणि असंबद्ध पोष्टींचा!

========================================

पूर्ण बातमी तपशीलवार आजच्या सकाळ व मिररमध्ये वाचता आली.

दांपत्य दक्षिण भारतीय असून दोघेही पुण्याच्या हिंजवडी आय टी पार्कमध्ये कामाला आहेत व एकाचवेळी दोघांनाही रात्रपाळी असणे शक्य असल्याने ही ४२ वर्षाची आया ठेवलेली होती. तिने रात्री बाळ झोपत नसल्याने चिडून त्या बाळावर केलेले अत्याचार 'नाईट व्हिजन'ची सोय असणार्‍या कॅमेर्‍यात चित्रित झाल्यावर मग तिच्याविरुद्ध पोलिसांत फिर्याद करण्यात आलेली आहे.

वैर्‍याचे लहान मूल असले तरी कोणाच्या मनात येऊ शकणार नाही असे राक्षसी कृत्य ह्या बाईने केलेले आहे. त्यातल्यात्यात नशीब इतकेच की त्या बाळाला आदळण्यासाठी तरी राक्षसिणीने बेड आणि बीन बॅगचा वापर केला आहे, देवाचे आभार की तिच्यासारख्या पशूत इतकी तरी माणूसकी शिल्लक ठेवली.

घरात घरचे दुसरे कोणीही नसताना, इतर सर्व कुटुंबीय परगावी असताना, आपल्या बाळाची काळजी घेण्यास जे पर्याय उपलब्ध आहेत त्यात:

१. नोंदणी झालेले पाळणाघर
२. खासगी (विश्वासार्हता सिद्ध झालेले) पाळणाघर
३. घरीच आया ठेवणे
४. कुटुंबियांपैकी कोणालातरी घरी राहण्याची व बाळाकडे पाहण्याची विनंती करणे
५. ह्यातील काहीच शक्य होत नसेल तर एकाने दीर्घ रजा काढणे (उपाय मिळेतोवरची रजा)
६. तेही शक्य नसल्यास एकाने नोकरी सोडून घरी राहणे

आता ह्यापैकी १ किंवा २, ३ आणि ४ हे उपाय वेल ह्यांनी त्यांच्या प्रतिसादात व्यवस्थितपणे नोंदवले व ते नोंदवून झाल्यानंतर काहीश्या भावनिक उद्वेगाने त्या म्हणाल्या की ह्या बायकांना करिअर इतके का महत्वाचे असते, आणि असते तर बाळाला जन्मच देऊ नये.

त्यांच्या त्या पोस्टमधील हा शेवटचा जेमतेम दहा टक्के भाग सोयीस्कररीत्या वाचून त्यावर स्वतःचा असा ग्रह करून घेणे की वेल ह्यांना बाईनेच नोकरी सोडावीशी वाटत असून त्यात स्त्रीचे शोषण आहे, ते पुरुषप्रधान संस्कृतीचे निदर्शक आहे, नवराबायको दोघांची जबाबदारी समान असताना वेल ह्यांच्या ह्या प्रतिसादाने बाफ भलत्या वळणावर जाईल ही सर्व माझ्यामते सोयीस्कर अश्या एकांगी दृष्टिकोनाची लक्षणे आहेत. फक्त अश्या दृष्टिकोनाची माणसे आजूबाजूला संख्येने भरपूर भेटतील ह्याची खात्री असल्याने 'आपलेच म्हणणे बरोबर' असा ग्रह येथे झालेला दिसतो. वास्तविक पाहता वेल ह्यांना स्त्री विरुद्ध पुरुष वगैरे काहीही अभिप्रेत असण्याची सुतराम शक्यता नाही. त्यांनी एक नैसर्गीक विधान केलेले आहे की ह्या आयांना काहीच का वाटत नाही. आता त्याचा अर्थ पुरुषांना तरी कोठे वाटते, पुरुषांना का वाटू नये, आयांनाच का वाटावे वगैरे असा लावून 'तुमच्याशी बोलू इच्छित नव्हतेच, पण' वगैरे स्वरुपाचे तद्दन फिल्मी प्रतिसाद देणार्‍यांचा निषेध!

वेल ह्यांच्या प्रतिसादाने बाफ भलत्या वळणावर जाईल ही भीती मनात येणे हेच मुळात भलत्याच मानसिकतेचे लक्षण आहे. म्हणजे ह्या प्रकारात ह्या प्रतिसादाने नक्कीच स्त्रीपुरुष वाद निर्माण होईल हे वाटणे हेच स्वतःचे विचार तेव्हढ्याच परिघात फिरतात ह्याचे निदर्शक आहे!

पुन्हा एकदा:

आयांनी करिअर करू नये किंवा बाळाला जन्म देऊ नये ह्याचा अर्थ बाळाची सर्व जबाबदारी आईची असून पुरुषावर ह्याचा काहीही भार पडत नाही / पडू नये असे म्हणायचे असावे हा अर्थ काढणे निषेधार्ह आहे. घडलेल्या घटनेवर आलेल्या एका नैसर्गीक प्रतिसादावर (जो प्रतिसादही सुरुवातीचे ऐंशी टक्के अतिशय समतोलपणे दिला गेलेला आहे) 'धागा भलत्या वळणावर नेऊ नका' असे म्हणणे हीच धागा भलत्या वळणावर जाण्याची सुरुवात आहे.

उगाचच 'झाली का चर्चा सुरू शेवटी बायकांच्या नोकरीची' वगैरे लूज कमेंट्स करून तीच चर्चा स्वतःच वाढवू नये अशी विनंती!

आपल्याकडे पाळणाघर चालवण्यासाठी काही पात्रतेचे निकष आहेत का ? कूणीही उठावं आणि पाळणाघर सुरु करावं अशी परिस्थिती आहे. पाळणाघर शोधताना पण घराच्या जवळ आहे का, एवढाच मुद्दा महत्वाचा ठरतो.

व्यावसायिक स्तरावर पाळणाघरे असायला हवीत. कामाच्या ठिकाणाहून जवळ हाही मुद्दा असू शकेल पण मग लहान बाळाला घेऊन मोठा प्रवास करावा लागेल.

पेथे - हे अवांतर नाहीये. संबंधितच आहे.

<<अश्या मुलांच्या आया मुलांनाच गप्प राहायला सांगतात.>> इथे सुद्धा मी हेच म्हणेन कशा वागू शकतात ह्या आया अशा. अरे पक्षी आणि प्राणी सुद्धा आपल्या पिल्लांना कोणी काही केलं तर सोडत नाहीत. मग आपण माणसेच असे कसे वागू शकतो. (आया सुद्धा स्वतःच्या सख्ख्या मुलाला किंवा अगदी मुलीलाही फिजिकल / सेक्श्युअल अब्युज करू शकतात. पण ही रेअरेस्ट ऑफ रेअर केस असेल म्हणून इथे नको बोलूया.)

सगळ्या मैत्रिणींनो आणि पुरुष मायबोलीकरांनो - मी स्वतः नोकरी करते आणि ते करणं मला आवडतं देखील आणि त्याची माझ्या कुटुंबाला गरज देखील आहे. मला असं अजिबात म्हणायचं नाही बायकांनी नोकरी करू नये किंवा अर्थार्जन करू नये. प्लीज तसा अर्थ काढू नका. प्रत्येक स्त्रीने आर्थिक आणि इतर सर्व दृष्टीने स्वावलंबी असावं असं माझं वैयक्तिक मत आहे.

परंतु लग्न करणं ही जेवढी मोठी जबाबदारी आहे त्यापेक्षा कित्ती तरी पटीने मोठी जबाबदारी आहे मुलांना जन्म देऊन त्यांना निरोगी वातावरणात वाढवणं. आणि माझ्या मते ह्या जबाबदारीची तयारी प्रत्येकाने आणि प्रत्येकीने लग्न करतानाच ठेवली पाहिजे. लग्न करावं की नाही लग्न केल्यावर कुठे राहावं कशी लाईफ स्टाईल जगावी ह्यावर प्रत्येकाचं वेगळं मत वेगळे मुद्दे असू शकतात.

मी आत्ता इथे लिहिताना फक्त भारतातल्या मोठ्या आणि लहान शहरांत राहाणार्‍या लग्न केलेल्या न केलेल्या मूल झालेल्या आणि मुलाचा विचार करणार्‍यांबद्दल लिहिते आहे.

लग्न करताना किती जण पुढच्या मुद्द्यांवर चर्चा करतात?

१. लग्न केल्यावर नव्या जोडप्याने कुठे राहायचे?

२. एकत्र कुटूंबात राहिल्यवर वाद झाल्यास काय करायची?

३. एकत्र कुटूंबात न राहिल्यास स्वतःची जागा घेऊन - विकत / भाड्याने कुठे राहायचे?

४. ते आपल्या कामाच्या जागेपासून किती लांब असेल?

५. मूल हवच आहे का आणि हो तर मूल होण्याचा विचार कधी करायचा?

६. एकटे राहाणार असू तर त्या बाळाला कोण सांभाळणार? नोकरी सोडून आई बाबा का पाळणाघर

७. एकत्र कुटुंबात राहात असू तर बाळाला आजी अजोबा किम्वा घरातले इतर सदस्य सांभाळतील की नाही की घरात बाई ठेवायची (आता प्लीज कोणी असा प्रश्न विचारू नका की बाळाला सांभाळायला बाईच का ठेवायची) ?

८. कोणत्याही कारणाने बाळाला पाळणाघरात ठेवायची वेळ आल्यास आपण राहणार त्या घराच्या आजूबाजूला पाळणाघर आहे का नाही?

९. नसल्यास चांगले पाळणाघर असलेल्या ठिकाणी आपण घर शिफ्ट करणार का?

१०. चांगले पाळणाघर असलेल्या ठिकाणी घर हवे असल्यास तिथून आपले ऑफिस किती जवळ किम्वा लांब आहे?

११. नवे घर घेताना कोणाच्या ऑफिसपासून ते जवळ असावे?

१२. जो लांब असेल तो उशीरा पोहोचणार आणि घरच्या आणि बाळाच्या जबाबदारीत त्याचा कमी हात्भार असणार हे मान्य आहे का?

१३. जे घर घेणार ते विकत घेणार की भाड्याने. विकत घेतले तर त्यासोबत येणारे कर्जाचे हफ्ते एकट्याला पेलवणार का दोघांनी मिळून भरायचे? त्यातल्या एकाला नोकरी सोडावी लागली किंवा त्याची नोकरी गेली तर काय?

१४. जे घर घ्यायचे ते ऐसपैस २-३-४ बीएचके घ्ययचे की छोटेसे अन बीएचके. कारण लहान घर म्हणजे किंमत कमी आणि त्यामुळे दोघांवर पैशाचा ताण कमी. म्हणजे आई किंवा बाबा एककण नोकरी सोडून बाळाला सांभाळू शकतो.
आता मुंबईचे उदाहरण घ्यायचे झाले तर मुंबईत कुठेही घर घ्यायचे तर त्याची किंमत ६० लाखाच्या वरच आहे. २ बीएचके हवे असेल तर ८० लाखाच्या वर. मग वन बीएचके ऐवजी टू बीएचके हवे असेल तर त्याचा लोनचा हफ्ता जास्त त्याकरता कामाचे प्रेशर जास्त दोघांनी नोकरी करणे मस्ट. मग बाळाला इतर कोनीतरी सांभाळणे मस्ट मग. अनेक ठिकाणी सासू सासर्‍यांवर आरोप तुम्ही माझ्या मुलाच नीट करतच नाही. किंवा तुम्ही तुमची कामे टाका तुमचं जगणं बाजूला सोडा आणि माझ्या मुलांना येऊन सांभाळा..मग आईचे किंवा बाबाचे आई वडिल येऊन राहाणार मग त्यांच्यासाठी एक रूम जास्त हवी. मग त्यासाठी जास्त पैसा जास्त काम मग मुलाकडे जास्त दुर्लक्ष.

ह्या सर्वात आई बाबाची लाईफ स्टाईल जपण्यासाठीच्या खर्चाबद्दल मी बोलतच नाही आही

१५. मग बाळ शाळेत जाणार मग आपल्या इनकमच्या आणि नोकरीच्या स्टेटसला शोभेल अशा महागड्या शाळेत बाळाला घालणार. मग तिथल्या स्टँडर्ड प्रमाणे राहाण्यासाठी तिथल्या लोकात मिसळण्यासाठी महागदे कपडे महागडे शूज, महागड्या बड्डे पार्टीज, महागडे गिफ्ट्स महागडे रिटर्न गिफ्टस, महागडे समर कॅम्पस इत्यादी इत्यादी इत्यादी. तो खर्च पेलवण्यासाठी पुन्हा जास्त काम पुन्हा मुलाकडे दुर्लक्ष.

आणी ही लिस्ट वाढतच जाणार.

मला इथे प्रश्न पडतो जर आई किंवा बाबा मुलाला सांभाळू शकत नसतील (मी ०-५ ह्या वयातल्या मुलांबद्दल बोलतेय) तर मुलांना जन्म का द्यावा? किंवा आई आणि बाबाने दोघांनी नोकरी का करावी. भारतात राहाताना मी फार कमी ठिकाणी पाहिलय की आई नोकरी करतेय आणि बाबा घरी बसलाय किंवा स्वत:चा असा बिझनेस करतोय की जो करता करता तो बाळाला उठवून दूध पाजून तयार करून त्याच्याशी खेळणे त्याला जेवायला घालणे घरातले आवरणे असे करतो. अशी मेंटॅलिटि कॉमन नाहीये अजून तरी. पुरुषांची सोडा पण खूप कमी लग्नाळू बायकांची मेंटॅलिटि अशी आहे. म्हणून ते वाक्य <<काय अचिव्ह करतात ह्या बायका असं वागून? स्वतःची नोकरी करियर महत्वाचे की बाळाची सुरक्षितता?>> शिवाय अजूनही अनेक घरात स्त्रियांचा पगार पुरुषांपेक्षा कमी असतो त्यामुळे घरासठी स्त्रीने नोकरी सोडणं - कायमच करियर नव्हे पण ब्रेक घेणं आणी बाळ मोठं झालम की पुन्हा सुरुवात करण्ं तिथे तुमची सिनियॉरिटि कमी झाली तरी ते स्वीकारणं - हे योग्य ठरतं.

आपल्याला क्रीम एरियात राहायला मिळावं म्हणून आपली लाईफ स्टाईल कमी होऊ नये म्हणून आणि अशा अनेक कारणांनी होऊ घातलेल्या आई बाबा दोघांनी अट्टाहासाने नोकरी चालू ठेवण्यात काय अर्थ आहे. मूल हवं असेल आणि घरची सपोर्ट सिस्टीम नसेल तर एकाने नोकरीत काही वर्ष ब्रेक का घेऊ नये आणि हा ब्रेक कोणी घ्यायचा कधी घ्यायचा कसा घ्यायचा. तो ब्रेक घेतलेला असता काही साईड बिजनेस किंवा शिकवण्या इत्यादी करायचे की नाही हे मूल होण्याआधी ठरवायला हवे.

जन्माला आलेले मूल ही आई वडिलांची निर्जीव प्रॉपर्टी नाहीये. ती तुमच्याचसारखी जिवंत व्यक्ती आहे हे जी तुमच्या निर्णयाने जन्माला आली आहे. तिच्या निरोगी पालन पोषणाची जबाबदारी तुमची आहे आणि ती जबाबदारी तुमच्या स्वतःच्या स्वत:कडे असलेल्या जबाबदारीपेक्षा मोठी आहे. जन्माला आलेलं बाळ निरोगी पद्धतीने वाढणं हे तुमचा (आई आणि वडिल दोन्ही) तुमच्या सासू सासर्‍यांशी असलेला वाद, तुमच्या मोठ्या घराच्या आणि भरपूर पैशाच्या अपेक्षा इत्यादी इत्यादी ह्या सगळ्या पेक्षा फार फार महत्वाचं आहे आणि हे करता येत नसेल तर मूल होण्याचा निर्णय लांबणीवर टाकलेलाच बरा.

स्त्रियांनीच नोकरीला तिलांजली का द्यावी आणि इतर प्रश्न खूप छोटे आहेत. प्रत्येक होऊ घातलेल्या आई वडिलांनी स्वत:ला स्वतःच्या आर्थिक आणी मानसिक परिस्थितीला पटेल असं करावं पण भौतिक सुखांसाठी व बाळाला असुरक्षित पद्धतीने वाढवण्याचा अधिकार कोणत्याही आईवडिलांना नाही. हे माझे वैयक्तिक मत.

नोकरी फक्त पैशासाठी असते अस अत्यंत चुकीचं गृहित क.

मी तो विडिओ पाहिला नाही. जर पूर्वेकडच्या देशातला असेल त. आधी शेअर केला गेलेला तेव्हाही पाहिला नाही. पण ती बाई त्या बाळाची आई होती आणि ती तुरुंगात आहे एवढच सांगू इच्छि ते.
अस. विडिओज शेअर केले, प्रसिद्ध झाले तर विकृत आणि पैश्या पायी लालची लोक मुद्दाम असे विडिओज काढतील हे लक्षात येतय का ? असे विडिओज शेअर करून तुम्ही स्वतः इतरांवर अब्युज करताहात, हे कळतय का?

प्लीज स्टॉप बिईंग इन्सेंसिटिव. प्लीज स्टॉप शेअरिंग!

अगदीच धाग्याला अवांतर लिहित आहे .. पण असेच खराब, अश्लिल नाही (सेक्चुअल या अर्थाने) पण किळस येणारे व्हिडिओ लोक आवडिने शेअर करत आहेत.. कुणाचा खुन होताना .. कोणी कुणाला मारताना ई अनेक..
कारण आणि स्त्रोत कळत नाही पण .. तंत्रज्ञानाच्या विकासा बरोबर सगळ अवघडच होत चाललय.. अर्थात हे धागाकर्तीला उद्देशुन नाही..

valle, mi tar kahich nahi bolale bai ithe tya vishaawar
ugach mala prasiddhi kashala?

अगदी अगदी. मला ते लोक (असले काही शेअर करणारे) मेंटली सिक वाटतात.
परवा एक फेबुवर अ‍ॅबॉर्टेड चाईल्ड चा फोटो शेअर करत होते लोक Sad

हो खरच... नवर्याच्या एका वॉट्स अप ग्रुपवर असे काही शेअर होत होते .. ते चांगले शिकले सवरले यंग लोक शेअर करत होते.. त्याने ग्रुप सोडला.. पण फार डिस्टर्बिन्ग होत ते...

प्लीज स्टॉप बिईंग इन्सेंसिटिव. प्लीज स्टॉप शेअरिंग!>>> नानबा + १००.

मीही पहिल्याच प्रतिसादात अशी विनंती केलेली आहे, तीच रिपीट करतो. ह्यात पियू ह्यांचे कोणतेही स्वस्त प्रसिद्धीचे हेतू आहेत असे माझे मुळीच म्हणणे नाही पण लिंक अत्तिशय डिस्टर्बिंग आहे.

वल्ले, ४ आणि ५ च्या मधे मूल हवेच आहे का हा मुद्दा असायला हवा. प्रत्येक लग्न केलेल्या व्यक्तीला मूल हवेच्च असते असे नाही आणि लग्न झालं म्हणजे मूल कंपलसरी नाही.

लग्नानंतर काय ठरवायचे?
<<
डिव्होर्स का घेऊ नये, त्याची कारणे?
किंवा घ्यायचा ठरला तर प्रापर्टीची वाटावाटी? Wink

दिवे घ्या.

अशा व्हिडिओज शेअर करून कोणतीही जागृती होत नाही, फक्त भय भावना व गैरसमज वाढीला लागतात.
असे व्हिडिओज शेअर करायचे, ते भयमिश्रित कुतुहलाने पाहायचे प्रमाण वाढतच चालले आहे. एखाद्या रियालिटी हॉरर शो सारखे.
अत्याचार करणार्या व्यक्तीच्या वर्तनावरून सरसकटपणे मुलं सांभाळणार्यांबद्दल किंवा त्या मुलांच्या आई वडिलांबद्दल विधाने, जनरलायझेशन गैर वाटते.

>>साती | 14 May, 2014 - 06:13
वेल, बापरे, लग्नापूर्वी इतके सगळे ठरवायचे मग लग्नानंतर काय ठरवायचे?>> साती, मला वेगळाच प्रश्न पडला. हे एवढं सगळं लग्नापूर्वी बोलायचं असेल तर प्रेमाच्या गप्पा कधी करायच्या? Wink

पुण्या च्या बातमी ने
मीही
डीस्ट्ब झालेय

मी श्रिया ला घरगुती पाळणाघरात
ठेवते या पुर्वी तिच एक पाळणाघर बदलुन झालय
कारण मला ते ला.न्ब पडायचे
आत्ताच्या काकु तिला नीट
पाहतात माझा १-२ वेळा त्या.न्च्या कडे
फोन ही होतो

अजुन
कशी काळजी घेउ ?

प्रत्येक पाळणाघर वाईट असत असा धरून का चालतो आपण? तसच प्रत्येक आया वाईट असही नसत. पालकांनी जागृत रहायची गरज आहे बास. हा किंवा असा वाईट अनुभव घरातल्याच व्यक्तीकडून पण येऊ शकतोच ना.
अगदी एकत्र कुटुंब असेल तरी घरी ठेवण शक्य नसत कधीकधी. आपल्यामागे घरी असणारे लोक आपल्या बाळाला सांभाळण्यासाठीच असतात का?

बाकी बायकांनी करियर कराव का नाही या बाबत करियर करण्याऱ्या बायका सोडून सगळ्यांना मत द्यायचा अधिकार असतो.

वेल, बाकीचे मुद्दे मुद्देसूद आणि पटतील असे लिहीलेस तरीही नोकरी न करणे हा पर्याय आता उपलब्धच नाहीये कारणे काहीही असोत. (पर्याय असलाच तरीही तो अगदीच अपवादात्मक) त्यामुळे पाळणाघर ही जवळपास गरज झाल्यामुळे त्यात सतर्कता कशी बाळगता येईल याचीच चर्चा अपेक्षित होती. अर्थात तू तुझं मत मांडलंस आणि ते पूर्णपणे पटत नाहीये असंही म्हणू शकत नाही.

तो व्हिडीओ अजून का आहे या धाग्यावर? धागाकर्तीचा उद्देश समजला आणि पाळणाघरे व मुलांची सुरक्षितता या अनुषंगाने (अधेमधे भरकटत का होईना) चर्चा सुरू आहे... तरीही ती लिंक अजून का आहे तिथे? प्लीज माझी विनंती आहे काढून टाका ती लिंक... यात गैरसमज, आज्ञा वै. काहीही नाहीये पण तो अतिशयच डिस्टर्बिंग व्हिडीओ आहे. पूर्ण पाहणे तर सोडाच पण सुरूवात बघूनही हबकायला होतंय...

अगदी एकत्र कुटुंब असेल तरी घरी ठेवण शक्य नसत कधीकधी.>> याचा अनुभव बाळंतपणानंतर सासरी आलाच होता. त्यामुळे आपल्या दोघांनाच निभवायचं आहे अशी मनाची पूर्ण तयारी केलेलीच होती.

म्हणुन मी ठेवत नाही
एक तर सासु- सासरे खुप वयाने आहेत
आणी
दिर जाउ
बाई/
त्याची मुले

छोट्या गोस्टी वरुन माझ्या लेकी समोर
एक्दम मोट्याने ओरडतात
रागवतात
कधी कधी
मारतात
ही

मी जेव्हा पासुन पाहीले तेव्हा पासुन बाहेर ठेवते

पियापेटी - किती मोठी आहे लेक? बोलत येत असेल तिला तर तिच्याशी बोलून तुम्हाला अंदाज घेता येऊ शकतो.
आपल्या बाळाने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेऊन शहानिशा करावीच. त्याला/तिला काही कळत नाही असा विचार नकोच.

जर अजून बोलायला येत नसेल तर तिच्या मूड वरून पण कळेल. बाळाच काहीहि बिनसलं तर आई-बाबांना लगेच कळत.
याशिवाय वेगवेगळ्या वेळी पाळणाघरात जाणे, चर्चा करणे, इतर पालकांच्या संपर्कात राहणे या गोष्टी करता येतील.

मी पाहिलाच नाही तो व्हिडीओ, कारण काही वर्षापूर्वी, मायबोलीवर सेम अशी लिन्क होती, ज्यात कुवैअत की सौदी अरेबीया मध्ये घडलेल्या घटनेविषयी बातमी आणी तिचा व्हिडीओ होता. विशेष म्हणजे ती पण एक बाईच होती. स्वतः एक आई असुनही या बायका अशा नीच पातळीवर कशा जाऊ शकतात हेच उमगत नाही. या बायकाना चार लोकात सोलवटुन काढावे म्हणजे समजेल. त्यावेळेस तो व्हिडीओ पहावला गेला नाही, त्यामुळे हा पाहीलाच नाही.

http://www.maayboli.com/hitguj/messages/46/102486.html?1138118002 इथे ती चर्चा झाली होती बहुतेक, मला बरेचसे नीट वाचता येत नाहीये, पण सेम केस होती.

>>धागा भलत्या वळणावर नेऊ नका' असे म्हणणे हीच धागा भलत्या वळणावर जाण्याची सुरुवात आहे>>

माझ्यापुरते बोलायचे तर मला या धाग्यावर पाळणाघर, नॅनी वगैरे सोईंचे प्रमाणीकरण, कायदे इ. चर्चा अपेक्षित होती. कुणी नोकरी करावी/सोडावी, रजा घ्यावी, सांभाळायला आजी-आजोबा, नातेवाईक वगैरे पर्याय विचारात घेतले तरी मूळ मुद्दा रहातोच. तो म्हणजे कुणीही उठते आणि घरात पाळणाघर चालवते. त्याबाबत कसलेही नियम नाहीत.
चांगले पाळणाघर ही रिलेटिव टर्म झाली. टोकाचा छळ झाला की तेवढ्यापुरती चर्चा होते पण सुरक्षिततेचे, साधे स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवलेली, हेळसांड करणारी पाळणाघरे आहेत त्यांचे काय? २ बेडरूमचा फ्लॅट त्यात १२ मुलं, त्यातली काही मुलं लिफ्टने वर-खाली जायचा खेळ करत आहेत, शिक्षा म्हणून थोबाडीत मारणे वगैरे प्रकार बिनबोभाट सुरु असलेले पाहीले. एका ठिकाणी पाळणाघरातील मोठ्या मुलांवर लहान मुलांना सोपवलेले देखील पाहीले. पालकांकडे दुसरा पर्याय नाही त्यामुळे त्यांचा नाइलाज झालेला. Sad

>>प्रत्येक होऊ घातलेल्या आई वडिलांनी स्वत:ला स्वतःच्या आर्थिक आणी मानसिक परिस्थितीला पटेल असं करावं पण भौतिक सुखांसाठी व बाळाला असुरक्षित पद्धतीने वाढवण्याचा अधिकार कोणत्याही आईवडिलांना नाही. हे माझे वैयक्तिक मत.>>
बाळ सांभाळायची सेवा देणार्‍या व्यक्ती/संस्थेमुळे बाळाची असुरक्षितता धोक्यात येऊ नये म्हणून नियम/कायदे असावेत म्हणून प्रयत्न होणे योग्य नाही का? भौतिक सुखासाठी वगैरे सोडून द्या पण अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण या साध्या गरजा भागवण्यासाठी रोज जे पालक घराबाहेर पडतात त्यांचे काय? बाळाला / मुलांना सुरक्षितता हवी मग ती पालकांच्या सानिध्यात असो, पाळणाघरात असो किंवा शाळेत असो आणि यासाठी नियमावली आणि कायदेच हवेत.

स्वाती२,

खरंच कोणताही गैरसमज करून घेऊ नयेत कृपया. तुमचा संयत, मैत्रीपूर्ण वावर मला नेहमीच आदरपात्र वाटतो. ते किंवा त्यातील एकही विधान तुम्हाला उद्देशून नाही ह्याची खात्री असू द्यावीत.

Pages