मुले सांभाळणार्‍या आयाकडून बाळावर अत्याचार

Submitted by पियू on 13 May, 2014 - 12:46

नुकताच फेसबुकवर एक व्हिडिओ पाहिला: < विषयाच्या संवेदनशीलतेमुळे व्हिडिओची लींक काढुन टाकते आहे. कुणालाही घाबरवण्याचा हेतु नव्हता. सॉरी !!! >

स्त्री काय किंवा पुरुष काय, कोणाचेही मन हेलावेल असा व्हिडिओ बघुन मनाचा थरकाप झाला. लहान मुलांवर कोणी असे अत्याचार करु शकेल असं मन मानायला तयारच नव्हतं.

त्या व्हिडिओच्या कमेंट्स पाहिल्या. एखादी अनाथाश्रामतली घटना असेल, भारतातला व्हिडिओ नाहीये अशी काहीतरी मनाची समजुत घालुन कामावर लक्ष केंद्रीत केलं.

पण आज (थोड्या वेळापुर्वी) साम टिव्हीवर 'पुण्याची पुतना मावशी' या विशेष बातमीपत्रात पुन्हा तेच पाहिलं आणि राहावंलं नाही. पुण्यात ज्याला सांभाळण्यासाठी कामावर ठेवले त्या बाळाला (केवळ काही महिन्यांच्या/ वर्षाच्या) वाट्टेल तसे उचलुन आदळतांना/ त्या बाळाला मारझोड करतांना पाहिले. हाही प्रकार त्या घरात लावलेल्या सीसीटिव्ही कॅमेरात शूट झाल्यामुळे त्या बाळाच्या आईला कळला.

खरंच आपण कुठे चाललो आहोत असं वाटलं. अश्या बातम्या बघुन कोणत्या आईला आपलं बाळ कोणाकडे सांभाळायला द्यायची हिंमत होईल? असे अजुनही कितीतरी अत्याचार होत असतील आणि केवळ सीसीटिव्ही कॅमेरा नसल्याने कोणाच्या लक्षातही येत नसेल.

जी गोष्ट बाळांबाबत तिच गोष्ट आजारी/ बेडरीडन ज्ये. नागरीकांसोबतही घडत असेल असं मनात येऊन गेलं.

कोणाशीतरी बोलावंसं वाटतंय म्हणुन इथे लिहिलंय. नाही आवडलं तर इग्नोर करा. Sad

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाळणाघरांचे प्रमाणीकरण करण्यात नक्की काय अडचणी आहेत, त्याबद्दल नियमावली - कायदा - तपासणी इ. कशा प्रकारे लागू करता येईल याची चर्चा जास्त उपयुक्त ठरेल ना?
स्वाती२, +१.

अश्या अब्यूजचे बेबीज वर फार दूरगामी परिणाम होतात. मुख्य म्हणजे आईबाबा आपले चांगलेच बघतील ह्या विश्वासाला तडा जातो. आणि एक फार मोठे असुरक्षितता स्वभावात येते. त्रास देउ नये म्हणून सर्वा:शी उगीचच मिळते जुळते घेणे, स्वतःच्या गरजा न सांगून गप्प बसणे, लो सेल्फ एस्टीम हपिसात तोंड उघडून आपले मत न सांगता येणे, बॉसची अति भीती
असे मॅनिफेस्ट होते. जाणत्यावयात हे त्रास खूप जाणवतात.

विडिओज शेअर केले, प्रसिद्ध झाले तर विकृत आणि पैश्या पायी लालची लोक मुद्दाम असे विडिओज काढतील हे लक्षात येतय का ? >>> नानबा, यू सेड इट !!!

ती लिंक जास्त बघवलीच नाही पण जेवढी बघितली त्यावरुन ते सीसी टिव्हीचं चित्रीकरण वाटलं नाही. कुणीतरी शूट केलेला व्हिडियो आहे. एक थोडं मोठं मूलही आजूबाजूला दिसतं आहे. फार जास्त भयंकर वाटलं हे ! ( मुळात चाईल्ड अब्यूज भयंकर असण्याचं मोजमाप नाहीच पण तरी नकळत शूट झालेल्या व्हिडियोपेक्षा हे एक टक्का जास्त गंभीर आहे. )
अ‍ॅडमिननी किंवा धागाकर्तीने ती लिंक काढावी अशी विनंती !
* लिंक काढल्याबद्दल धन्यवाद.

पाळणाघरं सुरक्षित कशी करता येतील, तिथल्या स्टाफला प्रशिक्षित कसे करता येईल ह्यादृष्टीने पाऊलं उचलली गेली पाहिजेत ह्याला जोरदार अनुमोदन !
कामाच्या ठिकाणी आपला मूडचा कामावर नकारात्मक परिणाम होऊ नये किंवा आजूबाजूच्या परिस्थितीचा ( उदा. डेकेअरमध्ये मस्ती करणारी, हट्टी, रडकी मुलं ) आपल्या मूडवर नकारात्मक परिणाम होऊन काम बिघडू नये हे बहुतेकांना पूर्णपणे उपजत साधत नाही. पण ट्रेनिंगने नक्कीच साधू शकते. निदान अ‍ॅब्यूजचे प्रमाण लक्षणीय रित्या कमी होऊ शकेल ह्याची खात्रीच आहे.

भारतात असे ट्रेनिंग कुठे दिले जाते हे कुणाला माहीत आहे का ? मुळात डेकेअर किंवा टीचर्स ट्रेनिंगचा कोर्स असतो त्यात नक्की काय शिकवतात ? मानसशास्त्राची तत्वे रुजवण्यावर भर असतो का ?

बेफि, गैरसमज अजिबातच नाही. सुरक्षित बालपण हा माझा फार जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे साहाजिकच जिथे व्यवस्थेतच बदल गरजेचा आहे तिथे तात्पुरते उपाय पटत नाहित. मोबदला देऊन सेवा घेणार तर ती चांगली हवी. एक ग्राहक म्हणून तो हक्क आहे. साधे फ्रीज, टिव्ही घेताना रेटिंग असते मग पाळणाघरासाठी प्रमाणीकरण नको? स्कूलबस असुरक्षित आहे म्हणून स्वतः शाळेत सोडायला जाणे आणि स्वतःपुरता प्रश्न सोडवणे हा पर्याय आहेच पण सर्व पालकांनी संघटीत होऊन सुरक्षित बससेवा मिळवणे हे जास्त योग्य आहे तसेच हेही.

इथल्या सर्व सुजाण पालकांनी आपापले नोकरी व्यवसाय आणि मूल वाढवणे हे दोन्ही करताना आई व वडिल दोघांनी काय प्रकारच्या तडजोडी केल्या, सपोर्ट सिस्टीम निवडताना/उभारताना काय विचार केला, कश्या प्रकारे कामाची आणि जबाबदार्‍यांची विभागणी केली इत्यादी गोष्टींबद्दल सांगितले तर जे अजून सुपात आहेत त्यांना मार्गदर्शन होईल.
तसेच काय गोष्टींची उणीव जाणवली, त्यातून मार्ग कसा काढला, ती उणीव कश्या प्रकारे भरून निघू शकते इत्यादी गोष्टींची चर्चा झाल्यास अजून बरे.
मला वाटतं तो व्हिडिओ पाहून जे पॅनिक क्रिएट झालंय (पियूचा तो हेतू नव्हता तरी!) त्याला हे जास्त सकारात्मक उत्तर असेल.

इथल्या सर्व सुजाण पालकांनी आपापले नोकरी व्यवसाय आणि मूल वाढवणे हे दोन्ही करताना आई व वडिल दोघांनी काय प्रकारच्या तडजोडी केल्या, सपोर्ट सिस्टीम निवडताना/उभारताना काय विचार केला, कश्या प्रकारे कामाची आणि जबाबदार्‍यांची विभागणी केली इत्यादी गोष्टींबद्दल सांगितले तर जे अजून सुपात आहेत त्यांना मार्गदर्शन होईल.
तसेच काय गोष्टींची उणीव जाणवली, त्यातून मार्ग कसा काढला, ती उणीव कश्या प्रकारे भरून निघू शकते इत्यादी गोष्टींची चर्चा झाल्यास अजून बरे>>>>>+११११११

ह्या अगोदर ही असाच एक विडीओ आला होता फेसबूक वर, कोलकाता चा होता, त्यातले मूल अजुन लहान होते, ते बघुन त्या रात्री नीट झोप ही लागली नाही. Sad

त्याबाईला १० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा झाली.

प्रिरिक्विझिट्स (मराठी शब्द काही केल्या सुचेना ...)

१. आई-वडिलांना आपले मुलं ही आपली प्राथमिक जबाबदारी हे माहित, कळतं आणि पटत असायला हवं
२. आजी-आजोबा अशी माणसं बरोबर असली तरी मूल जन्माला आल्यावर पहिल्या दोन-तीन वर्षांत गोष्टी कशा करणार ह्याच बेसिक आराखडा पालकांच्या मनात तयार हवा (अर्थात ही सगळी आयोजन वेळ येताच वार्‍यावर उडून जातात पण तरिही मनाची काहीतरी तयारी झालेली असते. )
३. आई-वडिलांनी स्वतः सोडून इतर कोणालाही मुलाच्या जबाबदारीसाठी गृहीत धरू नये. स्वतःला जबाबदारी झटकण्याचा पर्याय असू नये.
४. एकजण घरांत आणि एकजण बाहेर असणार असेल तर दोघांना एकमेकांच्या कामाबद्द्ल आणि जबाबदारीबद्द्ल प्रचंड आदर हवा. जर दुसर्‍या व्यक्तीने ती जे काही करत आहे नोकरी / घर तर मला मी जे काही करतो आहे ते करायला जमणार नाही ह्याची जाणिव हवी.
५. बाहेर जाणारी व्यक्ती काय बाहेर मजाच करत असणार, घरांत राहणारी काय दुपारी झोपाच काढत असणार अशी किल्मिष नकोत.

सध्या एवढचं सुचतयं.

आई-वडिलांनी स्वतः सोडून इतर कोणालाही मुलाच्या जबाबदारीसाठी गृहीत धरू नये. स्वतःला जबाबदारी झटकण्याचा पर्याय असू नये.
४. एकजण घरांत आणि एकजण बाहेर असणार असेल तर दोघांना एकमेकांच्या कामाबद्द्ल आणि जबाबदारीबद्द्ल प्रचंड आदर हवा. जर दुसर्‍या व्यक्तीने ती जे काही करत आहे नोकरी / घर तर मला मी जे काही करतो आहे ते करायला जमणार नाही ह्याची जाणिव हवी.>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> बाकीठिकाणी माहीत नाही पण मुंबई पुणे सारख्या ठिकाणी किंवा अब्रॉडमधे आपली नोकरी सोडणे हा पर्याय शक्य होउच शकत नाही ( अगदी मुलाला सांभाळण्यासाठीही ).......सासु सासरे किंवा आई वडील जवळ राहत नसतील तर पालकांना एक तर बेबी सिटींग किंवा कोणीतरी सांभाळायला ठेवणे हा एकच पर्याय राहतो...मग जे आहे त्यात वरती बाकीच्यांनी लिहीलेत ते उपाय करणे आवश्यक आहे

मूल जन्माला आलं की पहिल्या वर्षात खूप मजा असते आणि खूप आनंदाचे क्षण असतात आणि दोघा पालकांपैकी निदान एकाला तरी तो आनंद उपभोगण्याचे सुख मिळण्याइतके आर्थिक स्वातंत्र्य आणि विवंचना नसाव्यात हे माझे विशफुल (का fool?) थिंकिन्ग!

मूल जन्माला आलं की पहिल्या वर्षात खूप मजा असते आणि खूप आनंदाचे क्षण असतात आणि दोघा पालकांपैकी निदान एकाला तरी तो आनंद उपभोगण्याचे सुख मिळण्याइतके आर्थिक स्वातंत्र्य आणि विवंचना नसाव्यात हे माझे विशफुल (का fool?) थिंकिन्ग!>>>>>>>>>>>>>>> आर्थिक स्वातंत्र्य आणि विवंचना नसाव्यात ???? असा कोण आहे ज्याला हे प्रश्न नाहीत

आर्थिक स्वातंत्र्य आणि विवंचना नसाव्यात ???? असा कोण आहे ज्याला हे प्रश्न नाहीत<<<<<
तेही आईचे वय ३० व्हायच्या आत?

आईचं वय ३० च्या आत आणि आर्थिक विवंचनां नकोत, पूर्ण सेटलमेण्ट हवी म्हणजे वडिलांच वय ३५ पेक्षा जास्तच असायला .. बालविवाह पुन्हा सुरू करायला हरकत नाही, काय? ..... (मी काय आणि का म्हणतेय ते ज्यांना कळायचं त्यांना कळलच असेल ...)

स्वाती२, नेहमीप्रमाणे व्यवस्थित उलगडलंत. धन्यवाद आणि अनुमोदन. Happy

बेफी, भावनावेगात उत्स्फूर्तपणे आलेला उद्गार 'असं का करतात हे लोक' असा नसून 'असं का करतात या बायका' असा होता म्हणून हा सगळा फाटा फुटला हे बहुधा एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल. वेल यांचं हे वैयक्तिक वाटणारं मत किती प्रातिनिधिक आहे आणि ती मानसिकता किती खोलवर रुजलेली आहे याचा त्रास त्या एका प्रत्यक्ष उद्गारापेक्षा कितीतरी पटींनी अधिक होतो. (हे उत्तरही फक्त तुम्हाला नाही, त्या मानसिकतेलाच आहे.)
सहसा नवर्‍यांचा पगार जास्त असतो म्हणून घरी गरज पडल्यास बाईने करिअर सोडावी हे एक दुष्टचक्र आहे हे लक्षात येत नाहीये का तुमच्या? असो.

सहसा नवर्‍यांचा पगार जास्त असतो म्हणून घरी गरज पडल्यास बाईने करिअर सोडावी हे एक दुष्टचक्र आहे.

>> वेल सेड.

अनेक देशांत हे विशफुल थिंकिंग सत्यात आणणाऱ्या योजना आहेत.
कॅनडात आई/ वडील / आई वडील विभागून १ वर्ष मातृत्व/ पालकत्व रजा घेऊ शकतात. ह्या रजेच्या काळात employment insurance कडून पैसे मिळतात. ($१५०० पर्यंत). अर्थात तुम्ही सुट्टी घेण्यापूर्वी ६०० तास काम केले असेल आणि EI चे पैसे भरले असतील तरच. याची काही प्रमाणात मदत होते.

माझ्या ओळखीतले उदाहरण ( पण भारतातले नाही ) शाळेची वेळ संपल्यावर मूले शाळेतच थांबतात. शाळेत खेळायच्या सोयी आहेत. वाचनालय आहे, सुरक्षितता आहे, सवंगडी आहेत. शिक्षकांना त्यांच्या कामासाठी म्हणून शाळेत थांबावेच लागते. शाळा त्यासाठी काही पैसे घेते. पालक कामाच्या ठिकाणाहून थेट शाळेत जातात व मूलांना घेऊन येतात.
अशी सोय भारतात होऊ शकेल का ?

मूल स्वतःला इच्छा आहे म्हणून जन्माला आले असेल तर आणि आहे त्यात आनंदी आणि समाधानी राहण्याची मानसिक तयारी असेल, लहान आणि निरर्थक गोष्टींचा उगाच बाऊ केला नाही तर सगळे सोपे आहे.

अशी सोय भारतात होऊ शकेल का ?

>> भारतात (निदान अंबरनाथ आणि पुणे इथे) गुरुकुल पद्धतीच्या शाळा माहित आहेत जिथे मुले सकाळी शाळेत जातात व संध्याकाळी घरी येतात. शाळेतच त्यांचा अभ्यास, गृहपाठ, छंद, जेवण, नाश्टा, मैदानी खेळ, प्रार्थना सगळंच होतं. पण ते ऑप्शनल नसते. त्या शाळेत मुलांना घातले कि सगळ्यांनाच सरसकट तिथेच थांबावे लागते. पालक कामावर जाणारे असोत किंवा नसोत.

मूल स्वतःला इच्छा आहे म्हणून जन्माला आले असेल तर आणि आहे त्यात आनंदी आणि समाधानी राहण्याची मानसिक तयारी असेल, लहान आणि निरर्थक गोष्टींचा उगाच बाऊ केला नाही तर सगळे सोपे आहे.>>>>>>>>>>>>> तुमचे विचार फार चांगले आहेत ताई

पियु, मी अस ऐकलंय की गुरुकुल डे बोर्डिंग बंद करणार आहे या वर्षीपासून. अजून कुठली अशी शाळा असेल पुण्यात तर माहीत नाही.

<< वेल यांचं हे वैयक्तिक वाटणारं मत किती प्रातिनिधिक आहे आणि ती मानसिकता किती खोलवर रुजलेली आहे >> इतरांच माहित नाही पण माझ्यापुरतं तरी हे मत मानसिकतेचा नाही तर कन्व्हिनियन्सचा भाग आहे.

<<सहसा नवर्‍यांचा पगार जास्त असतो म्हणून घरी गरज पडल्यास बाईने करिअर सोडावी हे एक दुष्टचक्र आहे>> करियर कायमची सोडा असं कोणीच म्हणत नाही आहे. नवरा बायकोत ज्या व्यक्तीचा पगार जास्त तिने नोकरी चालू ठेवावी आणि दुसर्‍याने काही काळापुरती सोडावी आणि बाळाला सांभाळाव हे संसारासाठी असलेलं साधं लॉजिक आहे. कमीत कमी माझ्यापुरतं तरी.

<<आपली नोकरी सोडणे हा पर्याय शक्य होउच शकत नाही>> i do defer in opinion. स्वतःचे फायनान्सेस व्यवस्थित मॅनेज केले आणि दोघांपैकी एकाच्या नोकरी नसण्याच्या काळात पैशाच गणित प्लान केलं की जमतं. वर दिलेले मुद्दे मुद्दाम उदाहरण म्हणूनच दिले आहेत की एकाने नोकरी सोडायच ठरवलं तर कसं जमेल किंवा काय काय करावे लागेल. आणि नोकरी सोडायची कायमची नाहीच आहे. त्याशिवाय घरी बसल्या बसल्या इतर अनेक गोष्टी करता येतात शिकता येतात. बिझनेस करता येतो. पण हे करताना स्वतःच्या अनेक इच्छांना मुरड घालावी लागते. महागाचे - ब्रॅण्डेड कपडे, गॅजेटस, मल्टिप्लेक्स मध्ये मूव्हीज, स्टार हॉटेल्स इत्यादी. आणि मी हे स्वतः केलं आहे म्हणून बोलू शकते

बाईने करियर सोडावं ह्यासोबत अनेक दुष्टचक्र बायकांच्या नशिबी पिढ्यान पिढ्या आहेत आणि ती एलिमिनेट करायचा प्रयत्न आपण करतच नाही आहोत.

आणि मी असंही कुठे म्हणत नाहीये की प्रत्येकाने असच केलं पाहिजे. मी एवढच म्हणते आहे की ह्या सगळ्या गोष्टींचा विचार मूल होऊ देण्याचा विचार करण्याआधी करावा.

गुरुकुल पद्धतीच्या शाळा आता मुंबईत सुद्धा आहेत. पण त्या पहिली नंतर आहेत.

असो मी इथे का लिहिते आहे स्वतःला का डिफेण्ड करते आहे मलाच कळत नाहीये.
तरीही मी माझी मते अगदी स्पष्टपणे मांडली आहेत. कोणत्याही प्रकारे मी अँटी फेमिनिस्ट नाही किंवा फेमिनिस्टसुद्धा नाही.

प्रत्येक नवरा बायकोने ज्यांना मूल हवे आहे त्यांनी आपण आई वडिल बनायला आर्थिक, मानसिक आणि सामाजिक रित्या सक्षम आहोत की नाही ह्याचा आढावा घेतला पाहिजे असे मला वाटते.

इथे मुद्दा मुलांच्या सुरक्षेचा आहे. आणि तिथे कोणतेही कॉम्पोमाईज होऊ शकत नाही. ती सुरक्षा सर्वसाधारण मानसिक आणि शारिरीकरित्या निरोगी कुटुंबिय जितक्या व्यवस्थित देऊ शकतात तितक्य व्यवस्थित कोणीही देऊ शकत नाही.

आणि स्वतःच जन्माला घतलेल्या मुलाच्या सुरक्षिततेपुढे स्त्री सक्षमीकरण, स्त्रीचा स्वाभिमान, स्त्रीसमोरचे दुष्टचक्र किंवा पुरुषाचा अहंकार पुरुषाच समाजातलं स्थान इत्यादी मुद्दे जास्त महत्त्वाचे खरच आहेत का ह्याचा प्रत्येकाने विचार करावा.

आजच एबीपी माझावर हि पुण्यातली बातमी वाचलली : बाळ झोपत नाही म्हनून सोफ्यावर आपटलं.

डिस्क्लेमरः खालची लिंक संवेदन्शील आहे.

http://abpmajha.abplive.in/incoming/2014/05/14/article313355.ece/%E0%A4%...

दोघांपैकी एकाच्या नोकरी नसण्याच्या काळात पैशाच गणित प्लान केलं की जमतं.>>>>> हे दोघांपैकी एक जरा उशिराच आलं तुमच्या बोलण्यात. पहिल्या पोस्ट मध्ये "का असं करतात बायका.." अशा अर्थाचं असल्यामुळे फाटे फोडले जात आहेत असं वाटणं सहाजिकच आहे ना वाचकाला?
नोकरी सोडावी की नाही हा सर्वस्वी वैयक्तिक प्रश्न आहे. नोकरी सोडूनच हा प्रॉबलेम सॉल्व होईल असंही काही नाही. तुमच्या पोस्टीत पुढे परत काय त्याग करताय तर "ब्रॅण्डेड कपडे, गॅजेटस, मल्टिप्लेक्स मध्ये मूव्हीज, स्टार हॉटेल्स इत्यादी" हा पण अगदी बाळबोध आणि दिशाभुल करणारं वाक्य आहे.
मी आधीही लिहिलं आहे की कोणी नोकरी सोडत नसेल तर त्याचा संबंध थेट पोरांचे हाल करुन स्वतः "मजा करणे" असा लावणे म्हणजे शुद्धा वेडेपणा आहे. हे सगळं सिनेमा आणि टिव्ही सिरियलिंच्या स्टिरियोटाईपिंगचा परिणाम वाटतो मला तर.
पुढे तुम्ही स्वतः हा वरलिखित त्याग केलाय म्हणताय म्हणजे खरं तर नोकरीकरुन मिळालेला पैसा = मजा हा तुमचीच लाईफस्टाईल आहे असाही अर्थ निघतोय.

Pages