जा अबे जा दिल्या किनारी सुखी रहा....

Submitted by स्वाती_आंबोळे on 9 April, 2014 - 13:35
ठिकाण/पत्ता: 
मेहंदी रेस्टॉरन्ट 3 Speedwell Ave, Morristown, NJ 07960 Phone:(973) 871-2323

अधिक माहिती अबेलाच विचारा.

माहितीचा स्रोत: 
बाराबाफ
विषय: 
तारीख/वेळ: 
शनिवार, April 26, 2014 - 12:01 to 14:01
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चनस every one is nice आणि Take it in good way म्हणताना डोळे मारणारी बाहुली काढलीये....नक्की काय समजावे ?? Proud (दिवे घ्या)

सायो.. नाही गं.. मै नसली तरी ऑफिसात मॅनेजर आहेच गन घेवुन Wink

दी.. समझनेवाले समझ गये है ना समझे वो अनाडी है Proud Wink

तसा मी प्रत्यक्ष नसलो तरी माझ्या शुभेच्छा आहेत अबेला.
अबे, एक वार्निंग - खुळी कैदशिण (Khlo Kardashian) व लोहार (लोहान) या बायकांपासून दूर रहा! वाईट्ट हो! तुमचे सुखाचे आयुष्य उगाच झंझटीचे करून ठेवतील.
बाकी चुकीच्या किनार्‍यावरील इतर लोकांचेहि काय सांगावे? तुम्ही आपले माबोकरांमधेच रहा.
दीपांजली टॅटू करत असेल तर एम्पायर स्टेट काढून घ्या हातावर. - सुखद आठवणी!
Happy

गटगची सांगता झालेली आहे. आत्ताच १५,२० मिनिटांपूर्वी मंडळी बाहेर पडली आहेत. नेहमीप्रमाणेच मजा आली. देसाई फार वेळाकरता येऊ शकले नाहीत पण तरीही दुरून येऊन हजेरी लावल्याबद्द्ल धन्यवाद. बाई अपरिहार्य कारणामुळे नंतर चहापानाकरता येऊ शकल्या नाहीत आणि बुवांनी अगदीच फुसकं कारण देऊन टांग मारली त्याबद्दल त्यांचा निषेध.

(विसू: चहा गाळायला कुणाचीही मदत लागली नाही.)

त्यांचं ते अपरिहार्य अन आमचं फुसकं? येन्न्यायनईअन्न्याय हय सायो. Proud

कमी वेळ होतं पण मजा आली! आता मेजर गटगची तयारी करायला हवी.
Happy

फुसकं नाहीतर काय? नंतर माझ्याकडे चहा प्यायला जायचंय हे माहीत असताना प्लॅन्स कशाला केले? आणि आला असतात थोडा वेळ तर काय बिघडलं असतं?

काही अपरिहार्य कारणांने मला येता आलं नाही पण मी लवकरच कॅलिफोर्नियाला जाईन आणी कोट, टोपी, धोतर , झिललेली चप्पल अशा वेषात चंद्रकांत गोखलेंचा चेहेरा करून कार्डेशियनांच्या घरी अबेची पत्रिका घेऊन जाईन. अबेचा गृहकृत्यदक्षपणा, भारतीय आणी अमेरिकन पाककलेतील निपुणता, त्याने केलेल्या गुंड्यांचे बदक ई ई नमुने दाखवून आमच्या अबेला जावई करून घ्या अशी विनंती करेन.

जर अबेने नशीब काढले अणी तो कार्डेशियानांच्या घरचा जावई झाला तर आपल्यालाही कीपिंग अप मध्ये भुमिका मिळेल आणी चार पैसे सुटतील.

विकु Lol

तुम्हीही मोस्टली टांगच मारता. तेव्हा तुमचंही स्थळ नेऊया कार्डॅशियनकडे. इनफॅक्ट तुमच्या सगळ्यांची सोयरीक होईल एवढ्या मुली आहेत त्यांच्याकडे. Wink

अबे गटग ला मज्जा आली. मेहंदीचा आंबियन्स (च) चांगला होता, पण अंधारात जास्त अप्रिशियेट करता आला नाही Happy हे ठिकाण सुचवल्याबद्दल बुवांचा लवकरच "सत्कार" करण्यात येईल. Proud
नंतरच्या चहाबद्दल सायोला धन्यवाद! वृंदाताईंनी तेवढ्यात चहाबरोबरचा एक्झॉटिक खाऊ पाठवून इतरांना कॉम्प्लेक्स दिला. सिंडीने पण काहीतरी आणलं होतं म्हणाली पण काय ते दिसलं नाही नंतर!
गोगा सगळ्यात शेवटी आले ! आणि सर्वात आधी गेले. त्याबद्दल भरपई म्हणून माझ्या लेटरबॉक्स जवळ एकटेच पायजमा गटग करणार आहेत म्हणालेत.
अबे ने एक विशिष्ट आय्डी कोण असे विचारून आधीच अंधारलेल्या बफे लायनीत काही काळ सन्नाटा पसरवला . तरी नंतर कमालीच्या शिताफीने कॅच अप करून चुक् चुक्, तेच ना, काय सांगतेस अशा सपोर्टिंग कमेन्ट्स पण केल्या त्यामुळे काकवा इम्प्रेस होतच होत्या पण तशाच कमेन्ट्स नंतर श्री, सायो पण काहीही माहित नसताना देत होते , त्यामुळे मग आम्ही कन्फ्युज झालो!
एकूण , मज्जा आली - अ‍ॅज युज्वल.

सिंडीची स्विस चॉकलेट्स होती जी मी विसरलेच. पिशवीवर चक्क शंकरपाळे लिहिलंय Proud
मेहंदी, मिंग मध्ये असाच अंधारमय, गूढ अँबियान्स असतो. एसेम २३ मध्येतर याहीपेक्षा दाट. माणसं एकमेकांवर आपटत नाही हे विशेष. Wink

हायला मला फज आणि शंकरलेट्स दोन्ही मिळाले नाहीत.
शोनूने टांग मारली. भाई, विकु, झक्की यांनी नावंसुद्धा नोंदवली नाहीत. सर्वांचा निषेध.
ते टट्टूही कुठे दिसलं नाही. अबे कार घेऊनच आला होता. Proud

>> माझ्या लेटरबॉक्स जवळ एकटेच पायजमा गटग
>> माणसं एकमेकांवर आपटत नाही हे विशेष
Lol

एक बरं होतं की वीकेन्ड असूनही मेहंदीत फार गर्दी नव्हती. त्यामुळे आरामात गप्पा झाल्या. जेवण नसेनाका खास. Proud

जेवण झाल्यावर सगळे तिथे उभं राहूनच जेवण काही ग्रेट नाही वगैरे बोलत होते Proud
तीन तीन गुलाबजाम खाऊन जेवण खास नाही म्हणता? अगदीच शोनाहो

मी संध्याकाळी घरी पोहोचलो आणि थंडी वाजून आडवा पङलो..

मेहंदीमधे एका वेटर शिंकल्याचे स्मरते.. बा़की सगळे बरे असावेत ही अपेक्षा...

गोगांचं पुस्तक सानिकाने पाहिलं आणि लेख्क परिचय मधे फोटो बघून म्हणे, ओह धिस ऑथर !! आय नो हिम, इजन्ट ही द वन हू कुक्स ऑसम पास्ता ?!! गोगा, आता यावरून खूष व्हायचं की कसं ते तुम्ही ठरवा Happy

Pages