निसर्गाच्या गप्पांच्या १८ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
वरील फोटो दिनेशदांकडून.
रखरखीत उन्हाला सुरूवात झाली आहे. ह्या नको वाटणार्या उन्हाळ्यात हव्या हव्या वाटणार्या चैत्रपालवीच्या पाऊलखुणा उमटू लागल्या आहेत. तिक्ष्ण सुर्यकिरणांच्या झोतात करंजाची हिरवीगार पालवी, सळसळणारी सोनेरी पिंपळाची पाने, फुललेली शाल्मली, पांगारा, गिरीपुष्प निसर्गप्रेमींसाठी तापलेल्या सूर्यही शितल भासवत आहे. सोबतीला सुट्यांचा हंगामही येत आहे तेंव्हा आपल्या कुटूंबीय, मित्रपरीवारा सोबत ह्या निसर्गाच्या उधळणीचा आनंद लुटा. तसेच उन्हाळा म्हणजे पाण्याची समस्या. पाणी जपून व आवश्यक तेवढेच वापरा, पशू, पक्षांसाठी थोडीफार पाण्याची व्यवस्था ठेवा हा संदेशही सगळीकडे पसरवूया.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
अंजली, आमच्याकडे होते ते
अंजली, आमच्याकडे होते ते झाड. संध्याकाळी कोमेजून जायचे. खरे तर दुपारी ते फुल फिक्कट गुलाबी पण होते.
वांगीवृक्ष ( पोटॅटो ट्री), गायत्री ( गम ग्वायकम ) मधुमालती, गेळ, दुरंगी बाभूळ ही अशीच काही रंगबदलू फुले.
आता काताबद्द्लही वाचू या. (
आता काताबद्द्लही वाचू या.
( माझ्या माहितीप्रमाणे सध्या भारतात कातासाठी खैराची झाडे तोडणे बेकायदेशीर आहे. )
http://www.loksatta.com/navneet-news/paan-red-color-456167/
विडे अनेक प्रकारे आवडीनुसार बनवले जातात, खाल्ले जातात आणि खिलवलेही जातात. पण लक्षात राहातं, ते विडय़ामुळं लाल झालेलं तोंड.
फक्त नागवेलीचं पान खाल्लं तर लाल रंग येत नाही. सुपारी, चुना, तंबाखू यांमुळेही तो येत नाही. मग विडय़ाला लाल रंग येतो, तो कशामुळे? लाल रंग येण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो तो कात. काताशिवाय विडा रंगत नाही. विडय़ामध्ये अनेक प्रकार असले तरी त्यामध्ये चुना-सुपारीबरोबरच काताचे स्थान अबाधित आहे. खैराच्या झाडापासून कात तयार करतात. खैराचे लाकूड (जिवंत झाडाचेच) पाण्यात उकळवून त्यावर अनेक प्रक्रिया करून कात घनरूपात मिळवतात. त्याची जाडसर पेस्ट विडय़ात वापरतात. खैराच्या झाडामध्ये एल अॅपिकॅटेचिन, रॅसेमिक अॅतककॅटेचिन व कॅटेच्युटनिक आम्ल ही संयुगे असतात. झाडात प्रामुख्याने एल अॅपिकॅटेचिन हे संयुग असलेले 'खीरसळ' हे स्फटिकी चूर्ण आढळते.
कात, चुना, सुपारी इ. घातलेला विडा चांगला कुटला, एकजिनसी केला तर त्याचा विटकरी, हिरवट रस दिसतो. तरीही डोळ्यात भरणारा लालभडक रंग येत नाही. परंतु हेच मिश्रण तोंडात चावले की विडय़ाचा रंग खुलतो. म्हणजेच खुलवणारा लाल रंग येण्यासाठी आपल्या तोंडातील लाळेचाही महत्त्वाचा सहभाग आहे. खरं तर कातातील कॅटेच्युटनिक आम्ल (C13H12O5) ) निष्क्रिय असतं, पण कॅटेच्युटनिक आम्ल गरम पाण्याबरोबर तसंच लाळेबरोबर क्रियाशील होतं. सुपारीमुळे लाळ सुटते. चुन्यामुळे किंचित उष्णता तयार होते. कातातील टॅनिंनवर लाळेतील विकरांचा परिणाम होऊन फ्लोबॅफिन हे भडक लाल रंगद्रव्य तयार होतं. ज्यामुळे तोंड लाल दिसतं. फ्लोबॅफिन हा फिनॉलिक पदार्थ पाण्यात विरघळत नाही पण अल्कोहोलमध्ये विरघळतो.
विडा तोंडाची दरुगधी घालवतो. पानातील गंधयुक्त बाष्पनशील तेलामुळे तोंडाची दरुगधी जाते. परंतु पान खाणाऱ्या व्यक्तींच्या तोंडाला एक प्रकारची दुर्गंधी येते. ती पान खाल्ल्यानंतर तोंड स्वच्छ न केल्यामुळे. शिवाय विडय़ाचे प्रमाणाबाहेर सेवन हे आरोग्यास घातकच ठरते. पान खाल्ल्यावर इथे तिथे थुंकून त्याचा इतरांच्या आरोग्यावर हानीकारक परिणाम होणार नाही, याचीही काळजी घेतलीच पाहिजे.
चारुशीला जुईकर (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई ss office@mavipamumbai.org
http://www.loksatta.com/navne
http://www.loksatta.com/navneet-news/curiosity-medicinal-elements-in-min...
पुदिन्याच्या पानांचा उपयोग स्वयंपाकात करतात, पण पुदिन्याचा औषध म्हणून उपयोग अनेक कारणांसाठी केला जातो. पुदिन्यातला खरा हिरो आहे मेंथॉल.
पुदिन्याच्या तेलातील मेंथॉल आणि मेंथाईल अॅसिटेट यांमुळे पुदिन्याला तीव्र वास येतो. मँगनीज, तांबे आणि जीवनसत्त्व 'क' यांचा पुदिना हा उत्तम स्रोत आहे. याशिवाय पुदिन्यात इतर बाष्पनशील तेलेही असतात. पुदिन्यामुळे कॅन्सरची, विशेषत: जठराच्या कॅन्सरची संभाव्यता कमी होते. मेंथॉल हे एक कार्बनी संयुग आहे. ते पाण्यात विरघळत नाही, पण अल्कोहोल आणि इथरमध्ये विरघळतं. पेपरिमट नावाची पुदिन्याची एक जात आहे, त्यात मेंथॉलचं प्रमाण ५० ते ६५टक्के असतं. तर जपानी पुदिन्यात त्याचं प्रमाण ७० ते ८५ टक्के असतं. मेंथॉलचे स्फटिक पांढरे, तीव्र वासाचे, जिभेला थंडावा देणारे, स्वादिष्ट असतात.
आपण पेपरिमटच्या गोळ्या खातो ना, त्यात मेंथॉलच असतं. मेंथॉलमुळेच पेपरिमटच्या गोळ्या गारेगार आणि चवीला छान लागतात. च्युईंगम, टूथपेस्ट, औषधे, गुळण्या करण्यासाठी असणारी द्रावणे, इत्यादींमध्ये स्वादासाठी मेंथॉलचा उपयोग केला जातो. मेंथॉलमुळे त्वचेतील थंड तापमानाची जाणीव करून देणाऱ्या चेतापेशी उद्दीपित होतात आणि मेंदूकडे संवेदना पाठवतात. म्हणूनच पुदिना तेलाचा स्पर्श त्वचेला होताच तेथे थंडावा जाणवतो.
पुदिन्यातील मेंथॉल वापरून काही औषधे तयार केली जातात. फार पूर्वीपासून पोटदुखीवर औषध म्हणून पुदिना वापरला जात आहे. पुदिन्यामुळे पोटाचे मृदू स्नायू शिथिल होतात; त्यामुळे पोटात मुरडा येत नाही. मेंथॉलमुळे पोटाला आराम तर मिळतोच, पण सूक्ष्म जिवांचीही वाढ होत नाही. याशिवाय डोकं दुखलं, की पेपरिमट तेल (पुदिन्याचं तेल) कपाळावर चोळतात. सर्दी झाली की श्वास घ्यायला त्रास होतो, त्या वेळी श्वसन करणं सुलभ व्हावं म्हणून पेपरिमट तेल नाकावर, गळ्यावर चोळतात. मेंथॉलमुळे घट्ट शेंबूड द्रवरूप होतो व बाजूला सारला जातो. चोंदलेलं नाक मोकळं होतं.
तोंडाची दरुगधी घालवण्यासाठी, टूथपेस्टमध्ये, माऊथवॉशमध्ये पेपरिमट तेल घातलेले असते. पुदिन्याचं तेल हे नैसर्गिक कीडनाशक म्हणूनही वापरलं जातं. त्यातील प्युलगॉन (pulegone) व मेंथाल हे घटक विशेष प्रभावी आहेत.
ओह वॉव.. छान माहिती दिनेश..
ओह वॉव.. छान माहिती दिनेश.. पण सीप थ्रू व्हायला वेळ लागेल
तिसरा भाग टाकला.. http://www.maayboli.com/node/48684
वर्षु, जागू, दिनेश दा मस्त
वर्षु, जागू, दिनेश दा मस्त फोटो.
दिनेशदा पुदिना आणि पानाबद्दलची माहीती मस्त.
जागू, पर्जन्य वृक्ष माझं खूप आवडतं झाड. मला अशी विस्तारलेली, दाट सावली देणारी झाडं जास्त आवडतात. बुजुर्ग, इतिहासाची साक्षीदार वैगेरे वाटतात मला. एकांड्या नारळाच्या झाडापेक्षा नारळाची बाग/ वाडी म्हणुनच जास्त आवडते मला. पर्जन्य वृक्षाची पान सुध्दा जरा जास्तच डार्क हिरव्या रंगाची असतात ना ? फुल मात्र झाडाच्या आकाराच्या मानाने खूपच लहान पण दिसायला सुंदर. डार्क हिरव्या रंगावर ही गुलाबी फुले मस्त शोभून दिसतात चव र्या ढाळल्यासारखी. हल्ली सगळीकडे बहरलेत पर्जन्य वृक्ष. तु दिलेला झाडाचा आणि फुलाचा दोन्ही फोटो छान आहेत.
त्या दुसर्या भागात हे चित्र
त्या दुसर्या भागात हे चित्र टाकायचं राहिलं होतं..
आता अॅड केलकाह्त्या सुर्रेख तळ्यांपैकी एका तळ्यात काही बदकं ही मजेत पोहत होती..
त्या भागात रेअर बर्डस् च्या अनेक प्रजाती आढळतात.. एक दोन दिसले पण इतके चंचल होते कि एखादाच फोटो बरा आला..
दिनेशदा, जिप्सी, साधना
दिनेशदा, जिप्सी, साधना धन्यवाद
साधना, हो, हो, ते स्पॅथोडियाच. सतराव्या भागात बरीच चर्चा झालेली दिसतेय ह्या झाडाबद्दल. सोसायटीच्या आवारात बरेच वृक्ष आहेत स्पॅथोडियाचे आणि मध्ये लालभडक फुले फुललेली दिसत होती. शेंगा खायला पोपटांचे थवे येतात. सध्या सगळीकडे ह्या बियाच बिया उडत आहेत. लांबून पाहिले तर प्लॅस्टिकच पडलेय जमिनीवर असे वाटते.
पर्जन्यवृक्षाचे फोटो बघून
पर्जन्यवृक्षाचे फोटो बघून एकदम नॉस्टॅल्जिक झाले. आमच्या शाळेच्या मैदानावर ह्या वृक्षांनी सावली धरली होती. कवायतीच्या तासाला एकमेकींच्या डो़क्यात त्याचे वाळलेले तुरे टाकणे किंवा चुकून वरुन केसांत पडलेले तुरे काढणे असे उद्योग चालायचे. पर्जन्यवृक्ष म्हणजेच शिरीष का ? शाळेत जाताना एका सोसायटीच्या अंगणात सहा फूट उंचीचेच एक झाड होते त्याला थोडी जास्त लालसर पण ह्या वृक्षासारखीच फुले लागायची. सोसायटीतल्या लोकांचा डोळा चुकवून आम्ही ती फुलं तोडायला बघायचो. त्या झाडाला मात्र आम्ही शिरीषाचे झाड म्हणायचो.
सोसायटीत क्लबहाऊससमोर तीन-चार झाडे आहेत. अजून पूर्ण वाढलेली वाटत नाहीत. त्यांना वर्षभर लांबलांब शेंगा होत्या. कसलं झाड ते कुणालाच सांगता येत नव्हते. आता फुलल्यावर कळले की तो बहावा
हा प्लॅस्टिकी फोटो आणि
हा प्लॅस्टिकी फोटो आणि त्याविषयीची माहिती मस्त. माझ्यासाठी ( आणखी) नवीन
पर्जन्यवृक्ष म्हणजेच शिरीष
पर्जन्यवृक्ष म्हणजेच शिरीष का
नाही. दोन्ही वेगवेगळे. फुले मात्र सारखीच दिसतात. शिरिषाची पांढरट हिरवट अशी असतात. शिरीष शिडशिडीत असतो तर पर्जन्यवृक्षाची अगदी दाट अशी गोल कॅनॉपी पसरलेली असते.
Albizia lebbeck - http://en.wikipedia.org/wiki/Albizia_lebbeck हा शिरिष
http://en.wikipedia.org/wiki/Albizia_saman - हा रेन ट्री.
पुण्यात चांदणी चौकातुन पौडकडे जाणा-या रस्त्यावर दोन्ही बाजुला अगदी रेनट्रीच वाटतील इतके प्रचंड पण रेनट्रीपेक्षाही जास्त पसरलेले आणि उंच असे मोठे शिरीषाचे वृक्ष उभे आहेत. मला ते रेनट्री की शिरीष हेच कळायचे नाही कारण मी त्याआधी आणि त्यानंतर पाहिलेले सगळे शिरिष सडसडीत अंगकाढीचे. पण फुले येऊन गेली की अख्खे झाड मोठ्ठ्या चप्पट शेंगानी भरुन जाई. झाडाला लटकलेल्या या अनंत शेंगा अगदी दुरुनही दिसत. आणि त्या शेंगांमुळेच ही झाडे शिरिषाची आहेत यावर शिक्कामोर्तब केले जाई
अगो, शिरीषात आणि
अगो, शिरीषात आणि पर्जन्यवृक्षात अनेक फरक आहेत पण शिरीषाचे गुण जास्त. रंग नसला तरी सुगंध असतो. कोणे एके काळी कर्णफुले म्हणून ती वापरात होती. त्याच्या वाळक्या शेंगा तर पैंजणासारख्या वाजत असतात.
Sadhana, in short navshikyani
Sadhana, in short navshikyani shenganwarun donhi jhade olakhavit. ho na?
(Sorry for English, mayboliwar devanagari umatat nahiye. mhanun ch mi wachan matre mod madhye ahe sadhya sagalikadech)
हा शिरीष आणि ही त्याची शेंग
हा शिरीष
आणि ही त्याची शेंग व बी

मस्त फोटो... खोटं वाटेल, इथे
मस्त फोटो... खोटं वाटेल, इथे अंगोलात ( पश्चिम आफ्रिका ) शिरिषाची बरीच झाडे आहेत.
कुणाकडे शशांक किंवा शांकलीचा
कुणाकडे शशांक किंवा शांकलीचा फोन नंबर असेल तर चौकशी करणार का ? ( माझ्याकडे इथे नाही नेमका. )
बरेच दिवस दोघेही दिसले नाहीत इथे.
माझ्याकडे आहे.. करते मी ..
माझ्याकडे आहे.. करते मी .. कळवीन
दिनेश मेल चेक कर...
दिनेश मेल चेक कर...
कुणाकडे शशांक किंवा शांकलीचा
कुणाकडे शशांक किंवा शांकलीचा फोन नंबर असेल तर चौकशी करणार का ? ( माझ्याकडे इथे नाही नेमका. )
बरेच दिवस दोघेही दिसले नाहीत इथे. >>>> इथेच आहोत ... काही दुखण्यांमुळे दोघेही जरा बेजार होतो - आता पूर्ववत होतोय परत ....
गप्पा मस्त चालल्यात .... सर्वांनी टाकलेले फोटो, माहिती सगळेच मस्ताय .....
kai zaal shashank dada? hope
kai zaal shashank dada?

hope all is well now
kalaji ghya
अरे कोणीच प्लॅन बनवत नाहीय
अरे कोणीच प्लॅन बनवत नाहीय काय उद्याचा किंवा परवाचा?? जिप्सी गावी गेलाय, आला की मला सोलेल तो, एक जबाबदारी टाकुन गेलो तीही जमली नाही म्हणुन......
(आता मेंबरे गोळा करायला काय लालुच दाखवु?? जिस्प्या पियुष पिलवणार होता, मी पियुषच्या दुकानापर्यंत घेऊन जाईन असे म्हणु काय???? )
ओह्ह. सरिवा, शिरीषाशी बी
ओह्ह. सरिवा, शिरीषाशी बी इतकी जवळून कधीच पाहिली नव्हती ग. मस्तय फोटो.
साधना.. मी मेंबरे गोळा ला
साधना.. मी मेंबरे गोळा ला चुकून मेंढरे गोळा करायला असं वाचलं..
सरिवा सुपर फोटो ..
Why Rain tree is known as
Why Rain tree is known as 'Rain' Tree?
I thought , ti fule fulalyawar paus yet asava
Why Rain tree is known as
Why Rain tree is known as 'Rain' Tree? >>>>> रिया, याचे उत्तर या खालील लिंकवर मिळेल तुला ....
http://www.maayboli.com/node/38565?page=28
हे एक गमतीदार झाड दिसलं चीन
हे एक गमतीदार झाड दिसलं चीन ट्रिप मधे
पर्जन्यवृक्ष आणि शिरीषाच्या
पर्जन्यवृक्ष आणि शिरीषाच्या झाडाबद्दलचे कन्फ्युजन दूर झाले. धन्यवाद साधना आणि सरिवा
Varshutai, tuzya china chya
Varshutai, tuzya china chya lekhanmadhye kahi pics ahet,
zarane beh rahe hai par peds in it are rukhe sukhe. asa ka?
panyat rahunahi tya zadachi paane kuthe geli?
shashank dada, Thanks
nig warachya vanaspati janakarano uttar dya
शशांक, छान वाटलं. परत यायला
शशांक, छान वाटलं. परत यायला लागा.
वर्षू, त्या झाडाला एकाच बाजूने वार्याचा सामना करावा लागत असणार बहुतेक.
रियु.. थंडी चा मोसम आता
रियु.. थंडी चा मोसम आता कुठेशी ओसरत आहे.. तिथला विंटर हार्श आहे फार.. थंडीमुळे वाळकुडून , गोरठून जातात झाडं..
आधिक माहिती करता नि ग च्या वनस्पती जाणकारांना साकडं घाल..
वर्षू, अशा ठिकाणी वाढणारी
वर्षू, अशा ठिकाणी वाढणारी झाडे बर्फाला सामना देण्यास समर्थ असतात. अगदी बर्फात गोठली तरी आत जिवंत असतात. ध्रुवीय प्रदेशात शेवटची झाडे हिच असतात. फ्रोझन प्लॅनेट मधे यांचे मस्त चित्रीकरण आहे.
आता परत थोडी माऊंट केनयाची जाहीरात करू का ?
तिथे तर रोज रात्री बर्फ आणि दिवसा ऊन असे असते. तिथे वाढणारी झाडे ( साधारण कोबी सारखी दिसतात ) रात्री सर्व पाने घट्ट मिटून घेतात आणि दिवसा उमलतात. असे रोजच्या रोज घडत असते.
Pages