निसर्गाच्या गप्पा (भाग १८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 March, 2014 - 07:34

निसर्गाच्या गप्पांच्या १८ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील फोटो दिनेशदांकडून.

रखरखीत उन्हाला सुरूवात झाली आहे. ह्या नको वाटणार्‍या उन्हाळ्यात हव्या हव्या वाटणार्‍या चैत्रपालवीच्या पाऊलखुणा उमटू लागल्या आहेत. तिक्ष्ण सुर्यकिरणांच्या झोतात करंजाची हिरवीगार पालवी, सळसळणारी सोनेरी पिंपळाची पाने, फुललेली शाल्मली, पांगारा, गिरीपुष्प निसर्गप्रेमींसाठी तापलेल्या सूर्यही शितल भासवत आहे. सोबतीला सुट्यांचा हंगामही येत आहे तेंव्हा आपल्या कुटूंबीय, मित्रपरीवारा सोबत ह्या निसर्गाच्या उधळणीचा आनंद लुटा. तसेच उन्हाळा म्हणजे पाण्याची समस्या. पाणी जपून व आवश्यक तेवढेच वापरा, पशू, पक्षांसाठी थोडीफार पाण्याची व्यवस्था ठेवा हा संदेशही सगळीकडे पसरवूया.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुंबईच्या भर उन्हात राणीबागेत जिप्सी सारखे मनसोक्त भटकलो. चैत्रबहर पाहण्यात आणि निसर्गाची साधना करण्यात ३-४ तास कसे गेले ते समजलेच नाही. >>>> फोटो ????????????????????????>>>>>२-३ दिवसात पिकासावर अपलोड करून लिंक देतो इथेच. Happy

सायली लागोपाठ पोस्ट टाकण्यापेक्षा शक्यतो एडीट करुन एकाच पोस्ट मध्ये टाकत जा. Happy

शिशीराची फुले नाहीत ती. ही मुरूडला पाहीलेली शिशीराची फुले.

शशांकचे बरोबर आहे. कुंभाची फुले आहेत. याला नंतर कुंभही लागतात Happy सह्याद्री भरलाय ह्या झाडांनी. हिरव्या पानांच्या पार्श्वभुमीवर ही पांढरी फुले खुप सुंदर दिसतात.

जिस्प्या लै भारी हा.....

राणीबागेतील झाडांची काहि अपडेट्स:

१. पांढरा बहावा - बहावा फुललाय, पण जास्त बहर नाही आहे. हाताच्या बोटावर मोजण्या इतपत झुंबर लागले आहेत.

२. Castanospermum australe - हळदीकुंकु रंगाची हि फुले भरपूर बहरली आहेत. झाडाखाली फुलांचा सडा पडलाय.

३. Roupellina boivinii Apocynacea - स्प्रिंगसारख्या दिसणार्‍या या फुलांचाही बहर छान आलाय. नितिनने या फुलांचे "पास्ताची फुले" असे नामकरण केलेयं. Happy

४. कौशी - कौशीचे गुच्छही बहरले आहेत. यावेळेस मात्र कौशीच्या कोवळ्या शेंगा पहायला मिळाल्या.

५. गायत्री - गायत्रीच्या काही झाडांवरच अगदी तुरळक फुले दिसली.

६. गुलाबी कॅशिया - याने मात्र साफ निराशा केली. एकही फुल दिसले नाही. याच्या बहराचा सीझन कुठला असतो?

७. गुलाबी/जांभळा तामण - दोन्ही अगदी भरभरून फुललेत.

८. उर्वशी, लाल झुंबर, सोनसावर, गुलाबी कांचन, शिवण, वरूण/वायवर्ण यांचा बहर ओसरला आहे.

९. सीता अशोक - लाल-पिवळसर रंगाने संपूर्ण बहरलेलं झाड अफलातुन दिसत होतं.

१०. बकुळ - राणीबागेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच बकुळ भरभरून फुलला आहे.

काहि विशेष अपडेट्स:
१. कलाबाश आणि एक मणीमोहराचे झाड मृत्युपंथास लागले आहे. Sad
२. यावेळेस राणीबागेत आपटा आणि नागकेशराच्या बिया गोळा करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
३. अखेरीस साधनाला "कृष्णवडाचे" झाड दिसलेच.
४. बकुळीच्या फुलाला चक्क चिकू लागले आहेत. Proud
५. गुलमोहर कुळातील एका झाडाचे बारसे "वारस" या नावाने झालेले आहे.
६. वटवाघुळाच्या झाडालाही भरपूर बहर (अर्थात वटवाघळांचा) आलाय. Wink आणि एका झाडावरून पिकलेला कावळा धप्पकन खाली पडला (इति नितीन).

(अजुन काही अपडेट्स आठवले तर याच प्रतिसादात अ‍ॅड करेन. Happy Wink )

शशांक यांची पोस्ट कुठे आहे? अग दुसर्‍या झाडांना कुंभ पण लागलेले. मला वाटलच तिच फुले आहेत.

जागू, कुंभाचीच फुले ती.. पण त्या फुलांना भयंकर घाण वास येतो ( नासलेल्या दूधासारखा ) याचीच एक लाल पाकळ्यांची ( पुंकेसराची ) जात असते. गोव्याला फोर्ट अग्वाद मधे आहे.

जिप्स्या, अपडेट्स छान रे. गायत्रीला वेळ आहे अजून फुलायला. आपण दोघे पावसात गेलो होतो ना ?
कलाबाश तसाही काही उपयोगाचा नाही पण पुण्याला संभाजी पार्कात झाड आहे.
वारसाची फुले दिसली का ? खुप छान मोतिया रंगाची असतात ती ! ऑस्ट्रेलियन चेस्टनट्स... पाणघोड्याच्या पिंजर्‍याजवळचा कळम ?

कौशीच्या कोवळ्या शेंगा जून झाल्या की परत बघ. मस्त गडद गुलाबी रंग असतो, अगदी होडीसारखा बाक पण बी मात्र शेंगेच्या बाहेर. खरं तर कौशीच्या फुलांना पाकळ्याच नसतात. ते केशरी रंगाचे पुष्पकोष असतात.

त्या झाडांची, फिर कब आओगे ? अशी साद तूलाही ऐकू आली तर !

अंबवा तले फिरसे झुले पडेंगे, सावन कि होगी फुहारे.... !

या खास अंगोलन फळाबद्दल लिहिले होते का मी ?

नाव माहीत नाही पण संत्रासारखे दिसत असले तरी संत्रे नाही, त्या वर्गातलेही नाही.
साल कडक असते. आपटून फोडावे लागते. फोडले कि आत असे ( मेंदूसारखे ? ) असते. चवीला आंबट गोड लागते.

सलादचा फुलोरा. फुलाचा आकार जेमतेम ८ मिमी.. फुले केवळ २/३ तासच उमललेले असते. किटक कुणी दिसत नाही पण बिया मात्र तयार होतात. ( परीसरात दुसरे झाड असायची शक्यता कमी आहे. ) गरज पडलीच तर झाडे स्वपरागीभवन करतात, तसे हे करत असेल का ?

हे आहे फेजीओहा.. माझ्या लेकीचे आवडते फळ. ११ वर्षांपूर्वी ती पहिल्यांदा भेटली त्यावेळी मी तिला अंबोलीला घेऊन गेलो होतो. तिथल्या जंगलातली करवंदे, जांभळे, पेरू भरपूर खाल्ले. त्यावेळी तिने या फळाचा उल्लेख
केला होता. ( माझ्या उच्चारावर तिनेच मेहनत घेतली )
पण प्रत्यक्ष हे फळ मला चाखायला मिळायला मात्र ११ वर्षे लागली. तिच्या घरी झाड आहे पण मी जातो त्यावेळी सिझन नसतो. केनयातही झाड बघितले पण बाजारात फळे नाही दिसली कधी.

टेक्श्चर पेरूसारखे पण चव साधारण स्ट्रॉबेरी सारखी असते. किंचीत आयोडीनचा वास येतो. बिया नसतात. ( किंवा खाता येतात. ) साल सोडले तर सर्व फळ खाण्याजोगे. आकाराने ३ इंच बाय १ इंच ( साधारण परवराएवढे ) असते.

आंबोलीत कुंभाची खुप झाडे आहेत, मला लहानपणी ती पेरुची वाटायची आणि इतक्या प्रचंड संख्येने लागलेले पेरु माझ्या हाताला तर येत नाहीत पण बाकीचे लोकही ते खाण्याचे कष्ट घेत नाहीय याची प्रचंड हळहळ वाटायची.

पुढच्या आठवड्यात बहुतेक कोकणच्या रोडट्रिपवर जाईन. इन्शाला क्रॉस्ड फिंगर्स... Happy

आंबोलीला ढवसा खायला मिळावित ही इच्छा आहे. माझ्या आठवणीतले ढवसांचे चित्र ती पॅशनफृट फॅमिलीतली असावीत असा संकेत देतेय. बघुया खरे काय ते. कित्येकदा आपल्या आठवणीतल्या गोष्टी अगदी विचित्र पद्धतीने सरमिसळ करुन बसलेल्या असतात, प्रत्यक्षात त्या गोष्टी परत पाहिल्या की मुळ आठवणीपासुन खुपच दुर गेलेल्या दिसतात.

जिप्स्या, अजुन एक अपडेट - एक एकुलता एक ओवळा (बकुळीचे फळ) मिळाला, पण तो आधीच फुटलेला त्यामुळे चव घेऊन बघितली नाही.

दिनेश, राणीबागेत वारस हे नामकरण कुठल्यातरी भलत्याच झाडाचे झालेय. आणि ज्या झाडाचे बकुळ हे नामकरण झालेय त्याला चक्क चिक्कु लागलेले दोन. जर ते खरेच बकुळीचे झाड असेल तर मग एवढे मोठ्ठे ओवळे आणि तेही चॉकलेटी रंगाचे लागल्याबद्दल त्याचे नाव सुवर्णाक्षरात जमले नाही तरी कुठल्यातरी अक्षरात लिहुन ठेवणे आवश्यक आहे (पुलंकडुन साभार Happy )

कळम फुललेला. एक कळम राणीबागेच्या दरवाजाकडे होता. दुसरा आत कुठेतरी पाहिला, आता आठवत नाही, बहुतेक गेंड्याच्या इथलाच असणार पण आम्ही मागच्या बाजुने पाहिला. त्याला कदंबासारखी रंगरुपाची पण आकाराने लहान फुले आलेली (तोच ना कळम???)

तुम्ही टाकलेले फोटो मस्तच... सलादचा फुलोरा मस्तय.

जागू, दिनेशदा फोटो मस्त. शशांकजी thanx, हे कुंभाचे झाड नाव माहिती नव्हतं.

माठाचा तुरा किती कलरफुल दिसतोय.

त्या झाडांची, फिर कब आओगे ? अशी साद तूलाही ऐकू आली तर !

अंबवा तले फिरसे झुले पडेंगे, सावन कि होगी फुहारे.... !

पुढच्या महिन्यात जायचे ठरले देखिल. कोणी नाही मी तरी जाईन नक्कीच. कंपनीने शनवारी दिलेली सुट्टी कधी परत काढुन घेईल सांगता येणार नाही, त्यामुळे आहे तोवर मजा करुन घ्यायची.

कौशीच्या कोवळ्या शेंगा जून झाल्या की परत बघ. मस्त गडद गुलाबी रंग असतो, अगदी होडीसारखा बाक पण बी मात्र शेंगेच्या बाहेर. खरं तर कौशीच्या फुलांना पाकळ्याच नसतात. ते केशरी रंगाचे पुष्पकोष असतात.>>>>हो दिनेशदा, हे पाहिलंय आणि फोटोही काढलाय. Happy

शोभा, २-३ दिवसात फोटोची लिंक देतो.

ऑस्ट्रेलियन चेस्टनट्स... पाणघोड्याच्या पिंजर्‍याजवळचा कळम ?>>>>>हो दोन्ही पाहिली. साधना तो कळमच आहे.

माठाचा आणि सलादचा तुरा मस्तच फोटो. Happy

आंबोलीत कुंभाची खुप झाडे आहेत, मला लहानपणी ती पेरुची वाटायची >>>>> यालाच Wild Guava असेही म्हणतात .... Happy

यालाच Wild Guava असेही म्हणतात ....

आयला खरे की काय??? म्हणुन मला ती पेरुसारखी वाटायची.....

गेल्या वेळेच्या नि.गटग खादाडीबद्दल सांगितल्यावर
"हा निसर्गाच्या गप्पांचा धागा आहे कृपया मेरवान केक वगैरे वगैरे खाण्याच्या गप्पा मारून जे इच्छा असुनही गेले नव्हते त्यांना अशा गप्पा मारून जळवू नये :हाहा:" या अशा तर्‍हेचे प्रतिसाद आलेले Proud तेंव्हा कालच्या गटगमध्ये साधनाने आणलेल्या घरच्या अननसाचा शिरा, सातार्‍याचे कंदी पेढे, झरबेराने पाठवलेले कप केक्स आणि सरतेशेवटी "पर्शियन दरबार"मध्ये सामिष भोजन आणि थंडगार फिरनी याचा उल्लेखदेखील करणार नाही. Proud

साधना.. मस्त कमेंट्स.. काय काय फुलं पाहिली ना तुम्ही..

आणी हो तू ऐशू चे कप केक्स नव्हतेस ना आणले , मी नाही येणार म्हणून... गुड गर्ल Lol

जिप्स्या चा रुसवा अजून जात नाही.. Uhoh सासुरवाडी घाबरतील रे कळ्ळं तर Wink

दिनेश, खूपच मस्त मस्त माहिती आणी फळांचे फोटो.. ते गमतीदार फळ डब्यात भरलेल्या शिर्‍या ( मी केलेला ,

बिघडलेला मऊ शिरा Wink ) सारखे दिस्तंय..

आणी लाल भाजी चा तुरा तर सुप्पर्ब दिस्तोय .. ब्यूटीफुल्ल

शोभे समुद्र सुंदर आहे..

आणी हो तू ऐशू चे कप केक्स नव्हतेस ना आणले , मी नाही येणार म्हणून... गुड गर्ल>>>>वर्षूदी, माझी वरची पोस्ट वाच. Lol

बाप्रे...बाप्रे!! एवढे प्रकार झाले?
हॉय्लॉ... मी मागेच म्हणाले होते, पुण्यातलं पण निग गटग करुया असं.
मला ते बालगंधर्व परिसरातलं कैलाशपती आणि कदंब वै. कित्येक वृक्ष बघायचेत.

रच्याकने, पनवेलजवळच्या 'पर्शियन दरबार'मधे (१९९२च्या बहुतेक) बॉम्बस्फोटांचा कट रचला गेला होता ना ?

Pages