निसर्गाच्या गप्पा (भाग १८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 March, 2014 - 07:34

निसर्गाच्या गप्पांच्या १८ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील फोटो दिनेशदांकडून.

रखरखीत उन्हाला सुरूवात झाली आहे. ह्या नको वाटणार्‍या उन्हाळ्यात हव्या हव्या वाटणार्‍या चैत्रपालवीच्या पाऊलखुणा उमटू लागल्या आहेत. तिक्ष्ण सुर्यकिरणांच्या झोतात करंजाची हिरवीगार पालवी, सळसळणारी सोनेरी पिंपळाची पाने, फुललेली शाल्मली, पांगारा, गिरीपुष्प निसर्गप्रेमींसाठी तापलेल्या सूर्यही शितल भासवत आहे. सोबतीला सुट्यांचा हंगामही येत आहे तेंव्हा आपल्या कुटूंबीय, मित्रपरीवारा सोबत ह्या निसर्गाच्या उधळणीचा आनंद लुटा. तसेच उन्हाळा म्हणजे पाण्याची समस्या. पाणी जपून व आवश्यक तेवढेच वापरा, पशू, पक्षांसाठी थोडीफार पाण्याची व्यवस्था ठेवा हा संदेशही सगळीकडे पसरवूया.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय छान लिंबे आहेत. बाजारात क्वचितच उपलब्ध असतात अशी लिंबं.. आता उन्हाळा असेल ना. जास्तीची लिंबे कोरडी करून न कापता मीठ लावून एका मडक्यात भरुन ठेवायची. काही दिवसांनी ती आक्रसतात व सुकून जातात. ति लिंबे दहीभाताबरोबर खायला छान लागतात.
त्याही कोरडी पूड होते. चमचाभर ती पूड घेऊन त्यावर उकळते पाणी टाकायचे. ते पेय रोज सकाळी प्यायल्यास अनेक फायदे होतात. ( तहान कमी लागते, तोंडाला चव येते, उन्हाचा त्रास कमी होतो. ) ओमानमधे असे केले जाते.
अजूनही ती प्रथा आहे.

शशांक, सकाळी ज्या फुलाबद्दल आपण बोलत होतो त्याचे नाव "Castanospermum australe" आहे. दिनेशदांनी राणीबागेत दाखवले होते.

आणि दुसर्‍या स्प्रिंगसारख्या फुलाचे नाव "Roupellina boivinii Apocynacea""

सरिवा, लिंब क्लास. आणि सजावट ही वेधक. सीड्लेस लिंब मी तरी पाहिलेली नाहीत अजून. आमच्याकडच्या लिंबात कित्ती बिया असतात. हिरवी पान आणि त्यावर पिवळी लिंब !! लिंबीण कय मस्त दिसत असेल ना बहरलेली. काय राजा वाटत असेल ना दारची लिंब वापरताना.

सॉरी जिप्सी, आज माबो ओपनच नाही केलं सकाळपासून. आज सुट्टी ना ! मला उद्या राणीबागेत यायला आवडले असते. तुमच्या सारख्या माहितगारांसोबत झाडं पानं बघायला मस्त मजा आली असती. प्रत्यक्ष भेटण ही झालं असतं पण उद्या एका मुंजीच्या केळवणाला जायच असल्याने येणं शक्य होणार नाही.

साधना, तळलेले गरे तुझ्या मुलीला आवडतात ना ? हे घे. गावाला आमच्या घरी केलेले. मांजरानाही ते अतिशय प्रिय असतात. मँव मँव करुन पायात घुट्मळून मागून घेतात. नाही दिले तर आपली नजर चूकवून डल्ला मारतात आणि कुडुम कुडुम करत खात बसतात.
From mayboli
सॉरी विषयांतर आहे. त्या लिन्क वर पण पोस्ट टाकली आहे पण साधना एखाद वेळेस ते बघणार नाही म्हणुन इथे पण दिली आहे. समजून घ्या जरा.

समजून घ्या जरा.>>>>समजवून घेऊच, पण त्यासाठी आधी वरच्या टोपातील तळलेले गरे द्यावे लागतील आणि ते ही खर्रेखुर्रे Proud

जिप्सी, हा हा हा.
आपण गावाला जायचा बेत आखायचा आहे ना पुढच्या वर्षी?

"अरे मामा, देव कसा बसतो ते तरी सांग आधी." (माझी विकेट)>>>>>>>>>..जिप्स्या, भविष्यात विकेट पडू नये Wink म्हणून आत्तापासूनच संभाव्य प्रश्नांची उत्तरे माहित करून घे. Proud

<<<<जास्वंदीच्या वर्गातले पण एक असे झाड असते, त्याची फुले
सकाळी पांढरी असतात व जसजसा दिवस चढत जातो, तसतशी गुलाबी
होत जातात. आता हे झाड दिसत नाही फारसे.>>>>> दिनेश ह्याचा उल्लेख नि ग ५,पान १२ वर वाचला. गोव्यात हि झाडं खुप आहेत. सप्टेंबर मधे फुलतात. त्यामुळे come September असं म्हणतात.>>>>>>>>>>.माझ्या कोकणाच्या लेखात आहे फोटो व नाव . Happy (भेंडी जास्वंद.)
इथे पहा. प्रचि. ४९ व ५०. www.maayboli.com/node/34209

श्री. व सौ. पुरंदरे, तब्बेतीची काळजी घ्या. Happy

सर्व पानं वाचून झाली. फोटो, माहिती, चिऊचिऊ , चिंग्चॅंग चुंग मस्तच. Lol

जागू, डिंकाचे लाडू करायला घे. Happy

जिप्स्या, जनाची नाही तर मनाची तरी. पुण्यात येऊन गेलास? कुणाकुणाला भेटलास?

अरे, माझ्या प्रतिसादांची हॅट्रीक झाली. Happy

सध्या हा रानमेवा दिसू लागला आहे. मुंबईचे गल्ल्या-बोळ भटकताना त्याचे झाडही दिसले. ह्या फळांना रायणे किंवा राजणे म्हणतात. अगदी मऊ पिकलेली राजणे गोड लागतात. हिरवत पोपटी फळांमध्ये मात्र थोडासा चीक असतो आणि त्याचा किंचितसा तोठरा बसतो.

सगळ्यांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

दिनेशदा,वर्षभर ताजी लिंबे ठेवण्याची सोय असल्याने मी ती तशीच वापरत आले. तुमची माहिती मला नवीनच.आता असेही करून बघेन.

गप्पा मस्त चालू आहेत.

नुकताच माझा उजवा हात जायबंदी झालाय! त्यामुळे आता महिना-दीड महिना डाव्या हाताने सगळे करणे अवघडच जाणार! इथे येऊन वेळ तरी छान जाईल.

उद्याच्या गटग साठी शुभेच्छा.

आई गं सरिवा,, माबो वर ये गप्पा मारायला.. डाव्या हाताने टिंब क्लिक करेल .अम्हंजे आम्हाला तू आमच्यातच

आहेसे वाटत राहील Happy

मनीमोहोर ...माऊ आणि गरे .....कोकणातलं अगदी परिचित दृश्य.
सरिवा....लिंबं मस्तच आणि तीही सीड्लेस!
लहानपणी घरी झाडाला खूप लिंबं निघायची. वाटावाटी करून उरलेल्याचं "ढकललिंबू" बनायचं.
हेकाम पिताजींचं असायचं. एका चिनी मातीच्या बरणीत ही लिंबं घालून त्यात खडे मीठ घालून घट्ट झाकण लावून वर छतावर ही बरणी कायम उन्हात राहील अशी ठेवायची आणि अधून मधून खाली काढून बरणीच जागेवर नुस्ती ढकलून गड्गड्वायची. (अर्थातच हळू). म्हणून हे ढकललिंबू.
मग ही आख्खी लिंब मुरतात आणि काळी पड्तात. आणि महाचविष्ट होतात.

ह्या फळांना रायणे किंवा राजणे म्हणतात...........ह्या लिंबोण्या ना? जे काही नाव असेल ते,पण मस्त लागतात.माझ्या लहानपणी फळवाले याला चिनीमेवा म्हणत.

मुंबईच्या भर उन्हात राणीबागेत जिप्सी सारखे मनसोक्त भटकलो. चैत्रबहर पाहण्यात आणि निसर्गाची साधना करण्यात ३-४ तास कसे गेले ते समजलेच नाही. अगदी ईनमीन तीन मायबोलीकर असुनही निसर्ग गटग दणक्यात पार पडले. Happy

मुंबईच्या भर उन्हात राणीबागेत जिप्सी सारखे मनसोक्त भटकलो. चैत्रबहर पाहण्यात आणि निसर्गाची साधना करण्यात ३-४ तास कसे गेले ते समजलेच नाही. >>>> फोटो ????????????????????????

हिरा आमच्याकडे ही रांजणे येतात विकायला. माझा आवडत्या रानमेव्यातले हे एक फळ. खाताना तोंड चिकट होते पण गोड लागते. कालच घेऊन खाल्ली.

मी मिसले गटग. मुरुडला गेले होते दोन दिवस. तिथेही निसर्ग न्याहाळला.

मुरुडला जाताना ही झाडे बरीच दिसली रस्त्याला. कोणती फुले आहेत ही?

आई गं सरिवा,, माबो वर ये गप्पा मारायला.. डाव्या हाताने टिंब क्लिक करेल .अम्हंजे आम्हाला तू आमच्यातच

आहेसे वाटत राहील स्मित ++++ अनुमोदन..

जागूने ज्या फुलांचा फोटो टाकलाय ती बहुतेक कुंभा / कुंभीची फुले असावीत ...
Careya arborea कृपया गुगलून कन्फर्म करणे ..... Happy

Pages