बँक व इतर संस्थांमधील अनुभव व माहिती

Submitted by बेफ़िकीर on 22 April, 2014 - 02:15

नमस्कार!

बँक व तत्सम कचेर्‍या (एल आय सी, शासकीय कर भरणा केंद्रे) येथील अनुभव, माहिती, त्याबाबतची मतमतांतरे, सुचवण्या ह्या धाग्यावर एकत्रीत करूयात.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'कस्टमर ओरिएन्टेशन' चे वर्ग घ्यावेत>>> शक्य नाही. सरकारी बँकांमधे sheer volume मुळे आणि प्रायव्हेट बँकांत तुमच्या banding नुसार म्हणजे तुमची बँकेसाठी असलेली profitability , तुमच्याशी TAT (turn around time per customer) पुरते तरी बोलायचे का लगेच फुटवायचे ते ठरते.

अवांतर : मी एकदा ग्राहकांची पूर्ण मदत केली म्हणून माझ्या शाखेचे Quality Audit ढासळले होते. Lowest band customer ला TAT पेक्षा जास्तवेळ दिला म्हणून. मी मदत पूर्ण करू शकले ची कारणे : १. मला करायची होती २. तो दुपारच्या वेळेला आलेला होता आणि शाखा अजून नवीच सुरु झालेली असल्याने गर्दी नव्हती. ३. माझी इतर काही पेन्डिन्ग कामं नव्हती. मला मॅनेजरने Quality Audit खराब केल्याबद्दल समज दिली काय माझी बिशाद परत कोणाला व्यवस्थित उत्तरं द्यायची?

किती कठोर बोलता हो राजसी>>> हात्तिच्या! Induction training मधे काय सांगतात असं वाटतयं सगळ्यांना? Engg Grads, The Great MBAs and IT rejects ना debit, credit, crossed chq, order chq, payable at par etc. शिकवतात आणि सगळ्यांना bank's culture towards customer's treatment ची तोंडओळख करून देतात.

एक मात्र खरे या धाग्याबाबत की मुद्द्याच्या बाजूने वा त्याच्या विरोधात लिहिणारे अत्यंत सविस्तरपणे आपली मते मांडत आहेत, ती वाचनीय आहेत. अन्य धाग्यावर सहसा एकदोन पानानंतर तेचतेच एकोळी प्रतिसाद येत राहातात, पण हा धागा मात्र प्रत्यक्ष अनुभवाच्या तसेच अभ्यासू धाग्यांनी सजत चालल्याचे दिसत आहे.

जर्मनीमध्ये आमच्या प्यांटवाल्यांच बँकेत खात उघडण्यासाठी आधी APPOINTMENT घ्यावी लागली . बँकेच्या कर्मचार्याने १- १.३० तास मुलाखत घेतली . त्यानंतर मग काही दिवसांनी खात उघडल गेल . भारत हे कधी तरी होऊ शकेल का ? इतक सिस्टीम्याटीक ? भारतात लोकसंख्याच इतकी आहे कि कितीही वाटल तरी हे अमलात येणार नाही . इथे देश- परदेश वाद नकोत .
कितीतरी वेळेला माझी कामे सांभाळून मी खाते उघडायचे फॉर्म्स भरून दिले आहेत कारण ग्राहक निरक्षर , आजीबात लिहिता वाचता यायचं नाही असे. कशीबशी सही करता यायची . म्हंजे फक्त नावच लिहिता यायचे . काय काय नमुने यायचे रे देवा . गुटख्याचे , शिगारेटीचे , बिडीचे सेंट्स लावून यायचे . लांबूनच ओळखू यायचे .

माझ्या विद्यर्थीदशेत माझ्याच 'बँक औफ धृतराष्ट्र' मधील खात्यातून पैसे काढणे हा एक दिव्य अनुभव असायचा.
तसेच दिव्य अनुभव माझ्या तिसर्‍या नौकरिच्या पगाराचे वेळेस आला. बौंक तीच, ही दक्खन क्षेत्रातली. एकदा तर मला काऊंटर वरच्या माणसाने अक्षरशः 'जा पुढल्या दारी' अविर्भावात पुढील काऊंटर वर जाण्यास सांगितले. मी शांतपणे तिथेच ठिय्या देउन बसलो. मँनेजर बिचारा धावत धावत आला. त्याने मला त्याचे केबिन मध्ये बसवून माझे काम केले. त्याने तो माणूस तसाच असल्याचे सांगितले आणी 'युनियन' मुळे हतबल असल्याचे सांगितले.

त्याविरुद्ध्द अनुभव आणी खूपच चांगला असा तो 'कॅप' भागातील 'सिंडिकेट' बँकेचा फटाफट सेवा. गर्दी ज्यास्त असूनही. ही बॅक सदैव लक्षात ह्यासठी रहील कारण मी त्या भागातील नौकरी सोडून इतरत्र गेल्यानंतर सुमारे ५ वर्षा नंतर मि एकाला चुकून त्याच खात्याचा चे़ दिला (वापरात नसलेल्या) तेंव्हा तेथिल एका कर्मचार्‍याने माझ्या जुन्या ऑफिस् मधून माझा नविन नंबर घेउन मला फोन करून नम्रपणे माझ्या निदर्शनास आणून दिले. मला एकदम आश्च्रर्यच वाटले अन त्याचे मनःपूर्वक आभार मानले. नंतर तिथे जावून त्या नव्या मित्रास भेटेलो व ते खाते बंद केले.

ICICI बँकेचा अनुभव (१९९६ पसून) नेहेमिच चांगला. अन SBI चा पण. विशेष म्हणजे माझ्या रिसेल होमलोन केस च्या मी स्वतः लक्ष घालून तयार केलेल्या व सर्व कागद्पत्रे असलेल्या फाईल वर श्री. अजवानी (मॅनेजर) ह्यांन्नी पुर्ण अभ्यास करून समाधान व्यक्त करून फक्त एका तासात 'आपका लोन सँक्शन हुआ' अशी बातमी दिली. वर 'आप चेक कब लेकर जाओगे? अशी पृच्छा केल्यावर मिही गमतीने 'अभ्भी' म्हणालो.
त्यांनी हे एकल्यावर त्याच दिवशी मला चेक सुपुर्त केले! मी चाटच! कारण मला बर्याच जणांन्नी सुमारे एक महीना लागेल असे सांगितले होते!

सारस्वत बँकेचेच आणखी २ किस्से
१. लग्नानंतर नावातील बदल्,सही इ. सर्व सोपस्कार पूर्ण केले होते. काही काळानंतर पैसेही काढले होते.
पण दुसर्‍याच महिन्यात परत मी पैसे काढायला गेले तर सही जुळत नाही म्हणून सांगितले.(तेही कुर्यात) त्या बाळीला सांगितले की बाई गं, मी सर्व डिटेल्स दिले आहेत.तरी ,नाही तुम्ही दिले नसतील. आत जाऊन बाळीच्या हातातील बाडामधील माझे बदललेले नाव, सही इ.पेपर्स दाखवल्यावरही दिलगिरी व्यक्त करण्याची तसदी तिने घेतली नाही.मीच माझी समजूत घातली की एकतर ती खजील झाली असेल नाहीतर पेड जब बडा होता है ,तो झुकता है या न्यायाने जाऊ दे ,पोरगी लहान आहे.होतात चुका!

२.आईच्या एफ. डी.बद्दल काम होते.या सायबाचे फक्त इनिशियल्स हवी होती.हा प्राणी लँडलाईनवरून ३०-३५
मिनिटे मित्राशी बोलत होता.एकतर शनिवार होता आणि हे काम आटपून पोस्टातही जायचे होते.माझ्यानंतर आणखी पण लोक आले होते.त्या बँकेतील मॅनेजरकडे तक्रार करण्याचा विचार चालू असतानाच त्याचा फोन संपला.आणि सही झाली.तिसर्‍या मिनिटाला मी बँकेबाहेर होते.

पण हे अनुभव वगळता बाकी सगळे अनुभव चांगले/ सहकार्याचे आहेत.

Lowest band customer ला TAT पेक्षा जास्तवेळ दिला म्हणून मनेजर ने समज दिली ? पण मग जेष्ठ नागरिक कायमच Lowest band कस्टमर असणार ना ? मग त्यांना कायमच फुटवले जाणार कि काय ?

वाईट:
स्थळ - एल आय सी - स्वारगेट ब्रांच (सीटी प्राईड समोर) - काकू १० ला उगवल्या, पर्स काऊंटर वर ठेवून, पिंजर्या मागे गेल्या आणी सखी सोबत गप्पा सुरु झाल्या. १०:१० ला परत आल्या संगणक सुरु केला तेव्ढ्यात चहा आला, मग चहा, गप्पा-टप्पा (आणी च्या मारी) . लॉगीन केलं १०:२० ला, डाटा कनेक्षन सेट केलं नाही, मग थोडा वेळ कनेक्षन, कनेक्षन खेळल्या १-२ डोकी गोळा केली, मग लक्षात आलं की स्विच ऑन नाहीये, म्हण्जे ज्यात पीन होती तो ऑन नसुन भल्ताच ऑन होता. आता १०:३० झाले. मग एक माणूस त्यांच्या पिंजर्यात शिरला काहीतरी फाईल घेवून त्यात १०:४५ झाले. मग कुठे काम सुरु झालं तो पर्यंत २० एक लोकांची रांग लागली होती. नुसतं प्रीमीयम भरण्यासाठी २ तास गेले.
अजुन रु. २०० जास्त गेले कारण तो पर्यंत जेवणाची वेळ झाली आणी तिरंगा जवळ्च होतं Happy

चांगला:
स्थळ - ड प्रभाग कार्यालय पिं चिं मनपा - पाणी मीटर विषयी तक्रार होती, श्री. परदेशी साहेब स्वतः आले, त्यांनी प्रोसीजर सांगीतली, अर्ज भरून घेतला लगेच प्रोसेस सुरु ही केली वेळ ३० मिनटे.
चांगला:
थेरगांव: कर संकलन केन्द्र - : घरपट्टीच्या नोटीशीत नाव दुरुस्ती होती, हातोहात करुन दिली. वेळ ५ मिनटे

मी दिव्यश्री अन राजसीच्या अनुभवांशीदेखिल सहमत, Happy
अन इब्लिसशी अज्जाब्बात सहमत नाही! Proud

कोणे एके काळी पुण्यातल्या यच्चयावत ब्यान्क्यान्च्या यच्चयावत मुख्य शाखा अन इतर मोठ्या शाखांमधे माझे नियमित येणेजाणे असायचे. ब्यान्केतील अडचणी जवळून बघितल्यत, तसेच आडमुठे अधिकारी कर्मचारीदेखिल बघितलेत. मात्र एखाद्या ठिकाणी आड मुठा अनुभव आला की यच्चयावत सगळ्या ब्यान्कात तसाच आडमुठा अनुभव येईल अशी बायस्ड पूर्वग्रहदुषित भुमिका घेऊन जात नसल्याने माझे ब्यान्केच्या म्यानेजर ते शिपाई ते युनियन लिडर पर्यंत चांगले संबंध होते. असो.

काही ज्येना बँकेत येताना बरोबर दहावी बारावीतल्या नातवंडाला आणतात आणि काम करून घेतात हे फार चांगली गोष्ट आहे . उलट रेल्वे रेझ०बुकिंगला ज्येना ची वेगळी रांग असते म्हणून त्यांचे नाव तिकीटात असले की त्यांना पाठवतात हे चुकीचे आहे .त्यांच्या रांगेपेक्षा इतर रांगाच भराभर सरकतात कारण चौकशी आणि ज्येना साठी एकच खिडकी आहे .शिवाय सकाळी पंधरा मिनीटांतच काही गाड्यांना वेटिंग लागले की यांचा तिळपापड होतो .डोंबिवलीत तीन वर्षाँपूर्वी असे झालेले .ती बाई हटूनच बसली कन्फम तिकीटासाठी .मुलाला बोलावले तोही हटून बसला .पाच सहा तास प्रकार चालला .हल्ली देवजरी प्रसन्न झाला तरी सांगेल दोन गोष्टी सोडून काहीही माग १आईबाप (ते मलाही नाहीत) २रेल्वेचे क०रेझर्वेशन (ते नारदालाही माहीत नाही )

एकदा SBI च्या डेक्कन च्या शाखेत जाउन बघा. खाजवायला पण वेळ नसतो काउंटर वरच्या माणसांन्ना. चहा पीता पीता सुद्धा काम करतात.

मला Bank of Maharashtra सोडुन सर्व बँकेत चांगला अनुभव आला आहे.

सध्याच्या नेटबॅंकिंग, फोनबॅंकिंग, एटीएमबॅंकिंग च्या जमान्यात तुम्ही बँकेच्या शाखेत तुमच्या पदस्पर्शाने ती भूमी पावन करायला जाता म्हणजे तुम्ही रिकामटेकडे असून तुमच्याकडे भरपूर वेळ मोकळा आहे म्हणून (निदान प्रायव्हेट) बँका तुमचा वेळ सत्कारणी लावतात, तुम्हाला वाट बघायला लावून. (बेफिकिर : तुमच्यासाठी पुरेसे हळूवार आहे का? Lol )

माझा आयसीआयसीआयचा लोनबाबतीतला अनुभव चान्गला नाही, मात्र तो व्यक्तिसापेक्ष नसून त्यान्च्या "शिश्टीम" शी संबंधित होता.
पण आयसीआयसीआय च्या चिंचवड शाखेत जाऊन मी जेव्हा नेटब्यान्किगकरता मदत मागितली, तेव्हा ( बहुधा मला ज्येष्ट नागरीक समजुन Wink ) तेथिल सुकन्येने हे आमचे काम नाही पण तुमच्याकरता मी करते असे सान्गुन नेटब्यान्किन्गकरताच्या नम्बरवर फोन करुन जोडून दिला व बोलणे करुन नेट ब्यान्किन्ग अ‍ॅक्टीव झाले. अर्थात मला त्यान्चेवर किती कसे काम असते व ते नुस्ते अन्डी उबवायला खुर्च्यात बसलेले नसतात हे माहित असल्याने अपार नम्रतेने व नविन पिढीबाबत कौतुकयुक्त आदरयुक्त स्वराने बोलत असल्याने /बघत असल्याने व हव तर माझ्या (डबडा) मोबाईलवरुन फोन करा पण मला त्या ऑटोरिप्लाय लाईनचा अनुभव नीट येत नाही असे सान्गितल्याने तिने माझे काम चुट्टदिशी केले. खास म्हणजे तीला मराठी समजत होते.
त्यानन्तर दोनेक वर्षान्नी निगडीतल्या शाखेत नेटब्यान्किगचा पासवर्ड ब्लॉक झाला म्हणून गेलो, तर तिथे मात्र "उडवुन लावले" व तुमचे तुम्ही दिल्या हेल्पलाईनशी बोला म्हणाली, तिला मराठी कळत नव्हते व ती देखिल बहुधा मला "ज्ये.ना" समजली असावी व काय शिन्ची कटकट आहे या म्हातार्‍यान्ची, काहीच कसे कळत नाही यान्ना, अन येतात इथे त्रास द्यायला असा अविर्भाव होता. मला हे नविन नसल्याने व तिच्या खनपटीस बसण्याइतका वेळही नसल्याने छानसे हसुन मी तिचा निरोप घेतला. Wink वेळ अस्ता तर मीच नस्ता का हेल्पलाईनच्या ऑटोरिप्लायचे अर्थ लावत एकेक बटण दाबत बसलो अस्तो?
इतकेच नव्हे तर काही वर्षांपूर्वी औन्ध ब्र्यान्च मधे लिम्बीचे नाव जोडून घ्यायला गेलो असताना तेथिल सुकन्येने सांगितले की अहो इतक्या लाम्ब कशाला आलात, चिंचवड मधे काम झाले असते, तेव्हा (माहित असूनही) अशा व्यवस्थेबाबत अद्भुत आश्चर्य व्यक्त करुन तिला सांगितले की चिंचवड मधे जायला तशी हरकत नाही पण त्या ब्र्यान्चमधे येणारे "पब्लिक" .... यू नो..... पब्लिकच अस्ते, अगदी रेल्वे ठेसनात गेल्याचा भास होतो, त्यापेक्षा तुमच्या इथे किती स्वच्छ, सुन्दर, व्यवस्थित, टापटीप, टोकन वगैरे घेऊन, बसायला जागा असे आहे, तेव्हा इथेच येणे बरेवाटते जरी वीसेक किलोमीटर लाम्ब पडले तरि! हो की नै ग लिम्बे? लिम्बीने देखिल या खान्द्यापासून त्या खान्द्यापर्यन्त मान डोलावुन संमती दर्शविल्यावर त्या सुकन्येला जे समाधान वाटले व चेहर्‍यावर उमटले त्याची किम्मत पैशाबैशात का करावी? हां, आता आपण दुसर्‍याशी जरा गोड बोललो, तर बापजाद्यान्च्या इष्टेटीतील नैतर स्वतःच्या घामाच्या पैशावर दरोडा पडल्यागत कुणाचि भावना असेल व ती व्यक्ति गोड बोलण्यासच महाग असेल, तर जगात कुठेही गेली तरी तिरस्काराला तिरस्कारानेच कधीनाकधी उत्तर मिलणारच.... शेरास सव्वाशेर अस्तात्च. ! जसे की "उपटायला बसलोय का" असे विचारणारे Wink

ICICI FD - they don't count in months OR years. But in days !! its for 999 days. Why ? Because you can't compare returns easily with other banks.
They cheat customers here. beware of this scam.

लिंबूराम गोडबोले,

त्या पिंजर्‍यातला तो उपटसुंभ नमूना ब्यांकेच्या युनियनचा सो कॉल्ड पदाधिकारी होता, अन त्या युनियनचा त्याच्या डोक्यावरचा नेता माझ्या नात्यातला भाऊ होता. अन हे त्याला त्या क्षणाला ठाऊक नव्हते.

काय उपटायची ती योग्यप्रकारे उपटली, अन त्या ब्यांकॉफ धृतराष्ट्र (हे लै भारी नांव ज्यानी ठेवले त्यांचे अभिनंदन) शी मी डील करतो याचे एकमेव कारण म्हणजे आमचे ते दूरचे बंधूराज. त्यांना युनियनच्या "कामा"तून वेळ काढून पर्फॉर्मन्स वगैरे दाखवायला अमुक एक रुपयांची गिर्‍हाईकी दाखवायला लागते म्हणे.

उपटायला 'बसलेले' उभे राहून गेलेत माझ्या समोर. तेव्हा फिकर नॉट.

Presently I am fighting with fund houses if I can get work done, I will write a story here>>> माझं AMC च काम झालेले आहे. काही गुंतवणूकी चुकून माझ्या फर्स्ट नेमवर (राजसी) केल्या गेल्या होत्या. कागदोपत्री सगळीकडे माझे पूर्ण नांव लागलेले आहे; आडनांव, पहिले नांव, मधले नांव किंवा पहिले नांव, मधले नांव, आडनांव. काही कारणांनी मला गुंतवणूकीचे सोर्स फंड खाते बंद करावे लागले. बंद करताना पुढे change of bank mandate करुन घेऊ असा विचार केला होता. सर्व Fund housesना Change of bank mandate दिले तर प्रत्येकानी ते reject केले कारण त्यांच्या रेकॉर्डमधे - फॉर्मवर फक्त माझे पहिले नांव होते आणि नव्या change of bank mandate मधे पूर्ण नांव. खालील प्रोसेस करून मी माझे पैसे मिळवले.

१. KRA करून घेतले. KYCआधीच केलेले होते पण २००९ साली सेबीने नवीन प्रोसेस आणली KRAची.

२. सगळ्या संबंधित फंड हाऊसेस ना मेल पाठवले - माझे KYC/KRA झालेले आहे आणि ते तुमच्या रेकॉर्डमधे कसे अपडेट करायचे? मेलबरोबर पॅनकार्ड, आधारकार्ड, जुने कॅन्सल्ड चेक्स, जुने बँक स्टेट्मेंट जिथे माझे पूर्ण नांव होते स्कॅन कॉपीज अशी कागदपत्रे पाठवली.

३. एका फंड हाऊसने तेवढ्यावर माझे सगळे रेकॉर्ड्स अपडेट केले. तिथे फक्त नवे bank mandate देऊन काम भागले.

४. इतर फंड हाऊसेसना त्यांच्या रेकॉर्ड्समधे माझे पूर्ण नांव अपडेट करायला सेल्फ अटेस्टेड पॅनकार्ड कॉपी आणि नांव बदलाचे पत्र हवे होते. त्याबरोबर वरील सर्व कागदपत्रे पण सेल्फ अटेस्टेड कॉपीज दिल्या.

५. इतर फंड हाऊसेसनी रेकॉर्ड्स अपडेट केल्यावर, change of bank mandate दिले आणि काम पूर्ण झाले.

महत्त्वाचा सल्ला : कोणतेही बँक खाते बंद केलेत तरी त्याचे एखादेतरी चेकबूक नेहमी तुमच्या रेकॉर्ड्समधे असू दे. जुने चेकलीफ शोधायला मला प्रचंड त्रास झालेला आहे.

अगदी मुद्दाम हा धागा शोधून काढला सरकारी बँकेचा अनुभव लिहायला.

कालच स्टेट बँकेत नवीन अकाउंट काढण्यासाठी गेले होते. अधिकार्‍याने व्यवस्थित माहिती दिली. फॉर्म भरुन दिल्यावर सर्व कागदपत्र ताबडतोब तपासून उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत अकाउंट ओपन होईल असे सांगितले.

अगदी मस्त वाटले सरकारी बँकांकडून दिली जणारी जलद सेवा पाहून.

बरेच महिने गायब होतो, त्यामुळे हे आजच वाचले.
सगळे प्रतिसाद मस्तच, राजसी बाजू चान्गली लढ्वली. ईब्लिसना असा अनुभव देणारा म्हणजे असेच सगळे बॅन्कर्स असे नाही , पण त्या महान व्यक्तीचा असाच समाचार घेतला पाहीजे.

खाजगी बॅन्क व सरकारी मधील कामाबद्दल सगळ्याना माहीती नाही, त्यामुळे झकपक प्रायव्हेट छान वाटते. प्रत्येकाची नोकरी महत्वाची व जोखमीची असते, पण बॅन्कर्स रोजच आगीशी खेळत असतो, तो कॅशीअर असेल , ऑफीसर / मॅनेजर असला तरीही.

जी काही प्रगती आपण बघतोय, त्यातील सार्वजनीक क्षेत्रातील बॅकाचे योगदान आपण विसरुन अन्याय करु असे होईल. त्या वेळी हे प्रायव्हेट प्लेअर्स कुठे होते ?

बर्‍याच दिवसानी लिहितो आहे, जमत नाही. पण आता ह्यावर काही दिवस लिहीन.
रच्याकने , अनुस्वार कसा द्यायचा?

होम branch la Email करून कुणी Bank Account दुसरी कडे Tranfer करून घेतले आहे ka ? काय अनुभव आहे ..

Bank account transfer karta yeta branch la mail karun Or bank cha format madhe request letter deun.. New branch la transfer zalyawar latest kyc documents submit karawe lagtil...

सरकारी बॅक आहे का खाजगी?
मी स्टेट बॅकेच्या नवीन शाखेत पत्र आणि नवीन पत्ता असलेले आधार कार्ड्ची कॉपी दिली आणि त्यानी जुन्या बॅकेतुन अकाऊट ट्रन्सफर करुन घेतले. ८ दिवस लागले. जुन्या शाखेत जावे लागले नाही.

Pages